Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

साताऱ्यातील रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल जनआंदोलनाची धमकी!

TTTUSHAR TAPASE
Aug 16, 2025 07:48:23
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE 2 FILES SLUG NAME -SAT_RASTA_ROKO साताऱ्यातील देऊर ते कोरेगाव या अर्धवट बनवलेल्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे यामुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले असून वारंवार ठेकेदाराला सांगूनही रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्यामुळे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको करत आंदोलन केले.. यावेळी प्रशासनाला हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अन्यथा यापुढील काळात मोठे जन आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. बाईट - सुनील माने (शरद पवार राष्ट्रवादी पक्ष पदाधिकारी)
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Aug 16, 2025 10:17:05
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1608ZT_NANDED_DEATH(2 FILES) नांदेड:घराची भिंत कोसळून पती-पत्नीचा जागीच मृत्यू अँकर  - नांदेड जिल्हयातील कंधार तालुक्यातील  कोटबाजार येथे अंगावर  भिंत कोसळून  पती-पत्नीचा मृत्यू झाला .दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कच्च्या मातीची भिंती कमकुवत झाली  .. त्यातून  ही घटना घडली..  रात्री शेख नासेर  त्यांच्या पत्नी शेख हसीना  झोपलेले असताना अंगावर भिंत पडली ... यात दोन्ही वृद्ध दाम्पत्यांचा जागीच मृत्यू झाला.
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Aug 16, 2025 10:16:57
Palghar, Maharashtra:
पालघर - पालघरसह केळवे सफाळे परिसरात मागील दोन तासांपासून पावसाची दमदार बॅटिंग . मागील दोन तासापासून पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू . सफाळे सह परिसरात सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात . बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात देखील रस्त्यावर पाणीच पाणी . गटारींचे योग्य काम केलं नसल्याने रस्ते पाण्याखाली . वाहन चालक आणि प्रवाशांची तारांबळ . आज पालघर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट . दुपारनंतर पालघर ,सफाळे , केळवे , चिंचणी , तारापूर या भागात मुसळधार पाऊस सुरू.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Aug 16, 2025 09:47:41
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - सोन्याच्या चमचावरून अजित पवार आणि चंद्रकांत पाटलां मध्ये रंगली जुगलबंदी अँकर - उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात सोन्याचा चमच्यावरुन चांगलीच जुगलबंदी रंगली.सांगलीच्या इस्लामपूर मध्ये एन डी पाटील विधी महाविद्यालयाच्या कार्यक्रमाप्रसंगी चंद्रकांत पाटलांनी भाषणात आपण गिरणी कामगार असून सोन्याचे चमचा घेऊन जन्माला आलो नाही,असा चिमटा अप्रत्यक्ष अजित पवारांना काढला,मग यावरून अजितदादांनी आम्ही पण कष्ट केलं आहे,वरून पडलो नाही,आणि सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, असा टोला मंत्री चंद्रकांत पाटलांना लगावला. साऊंड बाईट - चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री साऊंड बाईट - अजित पवार - उपमुख्यमंत्री.
3
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 16, 2025 09:47:16
Ratnagiri, Maharashtra:
ब्रेकिंग - चिपळूण मधील पेढे येथील वस्त्यांमध्ये पुन्हा चिखलयुक्त पाणी शिरल्याने पेढेमधील रहिवासी हैराण.. मुसळधार पावसामुळे परशुराम घाटातील भरावाची माती पाण्याच्या प्रवाहातून थेट नागरी वस्तीत शिरून रहिवाशांचे नुकसान. मुंबई गोवा महामार्गाच्या चुकीच्या कामाचा पेढे गावाला मोठा फटका.
6
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Aug 16, 2025 09:45:37
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_VARUD_PRAVESH दोन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 वरुड–मोर्शी मतदार संघात काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदाराच्या पुत्राचा बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश अँकर :– विदर्भात काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसचे वरूड–मोर्शी मतदारसंघाचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांनी आज बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे हे अनेक दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होते गेल्या विधानसभा निवडणुकीत विक्रम ठाकरे यांना महाविकास आघाडने उमेदवारी न दिल्याने अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विक्रम ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. अखेर आज विक्रम ठाकरे यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
5
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 16, 2025 09:45:18
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सीना नदीपत्रात 30 हजार क्युसेसने वाढला पाण्याचा विसर्ग, शेकडो एकरावरील खरीपाची पिके पाण्यात - सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोरामुळे , सीना नदी पात्रात पाण्याचा प्रवाह वाढला - सीना नदी पात्रात 30 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग - सीना नदीवरील अनेक बंधारे, पुल गेले पाण्याखाली, सीना नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील खरीप हंगामाला सीना नदीच्या पुराचा फटका - सीना नदीकाठच्या अनेक शेतांमध्ये पाणीच पाणी.. - शेतकऱ्यांना व नागरिकांना महसूल प्रशासन पोलीस प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा Byte : शेतकरी..
4
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 16, 2025 09:18:48
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1608ZT_CHP_CHIMUR_TRIBUTE ( single file sent on 2C)  टायटल:-- 16 ऑगस्ट चिमूर क्रांतिदिनानिमित्त पालकमंत्री प्रा. अशोक ऊईके यांनी वाहिली आदरांजली, देशात 1942 साली याच दिवशी चिमूर ब्रिटिश गुलामगिरीतून 3 दिवसांसाठी झाले होते स्वतंत्र अँकर:-- चिमूर क्रांती दिनानिमित्त आज चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील शहीद स्मारकावर श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके आणि चिमूर चे आमदार बंटी भांगडीया यांनी शहिदांना अभिवादन केलं. चिमूर हे गाव 16 ऑगस्ट 1942 रोजी देशात सर्वात आधी ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाले होते. महात्मा गांधी यांच्या भारत छोडो आंदोलनातून प्रेरणा घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ही क्रांती घडवून आणली होती. चिमूर च्या लोकांनी इंग्रज फौजेविरुद्ध मोठा एल्गार पुकारत इथला इंग्रज फौजदार व काही शिपायांना बंदिस्त करून ही भूमी 3 दिवस स्वतंत्र केली. यानंतर चिमूर मध्ये मोठा रक्तपात झाला होता त्यामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांना प्राणाची आहुती द्यावी लागली. या क्रांतीचे स्मरण म्हणून दरवर्षी 16 ऑगस्ट रोजी चिमूर शहरातील क्रांतीस्थळी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. चिमूर क्रांतीचा इतिहास जपण्यासाठी चिमूरच्या विकासासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली. बाईट १) डॉ. अशोक उईके, पालकमंत्री आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
11
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 16, 2025 09:18:34
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट मध्ये पावसाची जोरदार हजेरी, पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून गावाकऱ्यांची जीवघेणी वाहतूक - जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. - तालुक्यातील भुरीकवठा तलावाची पाणी पातळी वाढल्यामुळे पाणी तलावा बाहेर - भुरीकवठा तलाव ओव्हेर फ्लो झाल्याने खैराट - वरनाळ पूल गेला पाण्याखाली - भुरीकवठा परिसरातील, नदी-नाले तलाव, ओढे तुडुंब भरून वाहण्यास सुरवात - भुरीकवठा तलाव पाणी पातळी वाढल्यामुळे अनेक बंधारे पाण्याखाली.. -*ग्रामस्थ स्वतःचा जीव धोक्यात घालून जेसीबीवर थांबून ओलांडतायत खैराट - वरनाळ पूल* - नागरिकांनी जीवघेणी वाहतूक करू नये प्रशासनाचे आवाहन
10
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 16, 2025 09:16:30
Nashik, Maharashtra:
nsk_marathiissue feed by 2C अँकर - नाशिकच्या दिंडोरी नाका परिसरातील रुपश्री अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या परप्रांतीय नागरिकांना मनसेने चांगलाच चोप दिला. त्रिपाठी नामक व्यक्तीची अलोक सर्व्हीसेस नावाने सिक्युरिटी एजन्सी असून या अपार्टमेंटच्या सात फ्लॅटमध्ये परप्रांतीय नागरिक राहतात आणि त्यांची स्थानिक मराठी नागरिकांवर दादागिरी बघायला मिळते. हे परप्रांतीय लोक महिलांसमोर अर्धनग्न अवस्थेत फिरतात, महिलांशी अर्वाच्च भाषेत बोलतात असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे दरम्यान एका महिलेसोबत देखील परप्रांतीयांनी गैरवर्तन करतात या महिलेने मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि मनसेने त्यांना मनसे स्टाईल चोप दिला दरम्यान या घटनेबाबत परप्रांतीय नागरिक कोणीही कॅमेऱ्यासमोर बोलण्यास तयार नाहीत हे प्रकरण स्थानिक पंचवटी पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचले होते मात्र त्यानंतर आपापसातच हे प्रकरण मिटले असून कोणतीही तक्रार आमच्याकडे देण्यात आले नसल्याचं पोलिसांनी माहिती दिली आहे..
8
comment0
Report
SMSarfaraj Musa
Aug 16, 2025 09:16:22
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - काका-पुतण्यात रंगली जुगलबंदी. रोहित पवारांनी चिमटे काढले,मग अजितदादांनी रोहित पवारांचे सगळेच काढलं.. अँकर - सांगलीच्या इस्लामपूर मध्ये काका- पुतण्यांमध्ये चांगलीचं जुगलबंदी रंगली. आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटे काढले,अजित पवारांनी देखील रोहित पवारांना टोले लगावता चांगलेचं सुनावले.दादा गावकीकडे लक्ष देतात,थोडं भावकीकडेही लक्ष द्या,असं सांगत आमदार रोहित पवारांनी अजितदादांचा चिमटा काढला.त्यानंतर अजितदादांनी जोरदार फटकेबाजी करत भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तू आमदार झालास,असा सुनावत.मला सल्ला द्यायची गरज नसून माझ्या नादाला लागू नको,असा दम देखील अजितदादांनी भर व्यासपीठावर रोहित पवारांना भरला. साऊंड बाईट - रोहित पवार - आमदार - राष्ट्रवादी शरद पवार. साउंड बाईट - अजित पवार - उपमुख्यमंत्री.
9
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 16, 2025 09:01:57
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn rescue av feed attached छत्रपती संभाजीनगरच्य वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द परिसरात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे नदीला मोठं पाणी आलं, गाव शेजारील चिकटगाव लोणी परिसरात 3 ते 4 तास मुसळधार पावसामुळे शेतात गेलेल्या शेतक करी शेतात अडकले त्यामुळे त्यांना पुलावर दोरी बांधून नदी पार करावे लागले.
11
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 16, 2025 09:01:33
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn bridge collapse av feed attached अतिवृष्टीच्या पावसामुळे गावाला जोडणारा मुख्य पूल गेला वाहून दुसरा कुलही अर्धा तुटला; पावसाने संभाजीनगराला धो- धो धुतलं ANCHOR: छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पळशी गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पूल काल झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे वाहून गेला. तर दुसरा पूल देखील अर्ध्याच्या वर तुटून पडला. त्यामुळे गावकऱ्यांना ये-जा करण्यासाठी जीव धोक्यात घालून अर्धा तुटलेल्या पुलावरून प्रवास करावा लागतोय. पुलावरून आज देखील पाणी सुरू असून, मुख्य रस्त्यांवरले पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांना गावातून बाहेर जाण्यासाठी किंवा येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
14
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Aug 16, 2025 08:50:25
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_BONDE_BYTE चार फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 भाजप खासदार अनिल बोंडे यांची परप्रांतीय तरुणांना मारण्याची धमकी; सिटीलँड, बिजीलँड व्यापारी संकुलात कामाला जाणाऱ्या संशयास्पद व्यक्तींना बोंडे यांनी दिलं पोलिसांच्या ताब्यात अँकर :– भाजप खासदार अनिल बोंडे यांनी परप्रांतीय तरुणांना मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागपूर महामार्गावर ऑटो रिक्षा मधून सिटीलँड, बिजीलँड व्यापारी संकुलात कामाला जाणाऱ्या संशयास्पद व्यक्तींना बोंडे यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले असून व्यापारी संकुलांमध्ये अवैध बांगलादेशी घुसखोर काम करत असल्याचा बोंडे यांनी आरोप केला आहे. अवैध घुसखोरांमुळे अमरावतीत गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचाही आरोप बोंडे यांनी केला आहे. पोलिसांनी चौकशी करून कारवाई करण्याची अनिल बोंडे यांनी मागणी केली आहे. त्यामुळे अनिल बोंडेनी थेट रस्त्यावर उतरून वाहनांची तपासणी केली आहे. बाईट :– अनिल बोंडे, भाजप खासदार
14
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 16, 2025 08:47:54
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1608ZT_JALNA_BAJAR_WATER(1 FILE) जालना : बदनापूरमधील आठवडी बाजारात शिरलं पावसाचं पाणी,दुकानातील सामानामध्ये पाणी शिरल्यानं नुकसान अँकर : गेल्या दोन दिवसापासून जालना जिल्हयात पाऊस सुरू आहे. बदनापूर मधील आठवडी बाजाराला देखील या पावसाचा फटका बसला.पावसाच्या पाण्यामुळे बदनापूर मधील आठवडी बाजारात चिखलाच साम्राज्य पाहायला मिळालं असून हेच पाणी साचून बाजारातील अनेक दुकानांमध्ये शिरल्यानं मोठं नुकसान झालं.दरम्यान नगरपंचायतीचा भोंगळ कारभार बदनापूरमध्ये पाहायला मिळत असल्यानं नागरिक संतप्त झाले आहेत
14
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 16, 2025 08:35:21
Raigad, Maharashtra:
स्लग - रायगडमध्ये जोरदार पाऊस रायगडला पावसाचा रेड अलर्ट अंबा नदीने धोका पातळी तर कुंडलीका नदीने इशारा पातळी ओलांडली अँकर - रायगडमध्ये पावसाचा जोर वाढत असून पाली, खोपोली, नागोठणे, रोहा परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार पावसाने रोह्यातुन वाहणाऱ्या कुंडलीका नदीने इशारा पातळी तर पाली नागोठणे परीसरातून वाहणाऱ्या अंबा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
13
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top