Back
अक्कलकोटमध्ये पावसाची कहर, जीवघेणी वाहतूक सुरू!
AAABHISHEK ADEPPA
Aug 16, 2025 09:18:34
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट मध्ये पावसाची जोरदार हजेरी, पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून गावाकऱ्यांची जीवघेणी वाहतूक
- जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी.
- तालुक्यातील भुरीकवठा तलावाची पाणी पातळी वाढल्यामुळे पाणी तलावा बाहेर
- भुरीकवठा तलाव ओव्हेर फ्लो झाल्याने खैराट - वरनाळ पूल गेला पाण्याखाली
- भुरीकवठा परिसरातील, नदी-नाले तलाव, ओढे तुडुंब भरून वाहण्यास सुरवात
- भुरीकवठा तलाव पाणी पातळी वाढल्यामुळे अनेक बंधारे पाण्याखाली..
-*ग्रामस्थ स्वतःचा जीव धोक्यात घालून जेसीबीवर थांबून ओलांडतायत खैराट - वरनाळ पूल*
- नागरिकांनी जीवघेणी वाहतूक करू नये प्रशासनाचे आवाहन
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowAug 16, 2025 11:20:18Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - गोपीचंद पडळकर म्हणजे बेंन्टेक्सचे सोने ! आमदार रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांवर अप्रत्यक्ष निशाणा..
फुटर - सांगली जिल्ह्यातील भाजपात नवीन झालेले आमदार बेंन्टेक्स सोन्या प्रमाणे आहेत,अशी टीका आमदार रोहित पवारांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांवर अप्रत्यक्षपणे केली आहे.चंद्रकांतदादा पाटील भाजपातील खरे सोने आहेत,पण त्यांच्या पक्षातील बेंन्टेक्सच्या सोनेकडुन खालच्या लेव्हलवर जाऊन मोठ्या नेत्यांवर करण्यात येत आहे टीका.त्यामुळे चंद्रकांतदादा यांनी त्यांच्या पक्षातील बेंन्टेक्सच्या सोन्याला सांभाळावे ,अशी विनंती केल्याचा खोचक टोलाही आमदार रोहित पवारांनी लगावलाय.
बाईट - रोहित पवार - आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस ( SP )
7
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 16, 2025 11:20:03Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1608ZT_WSM_HEAVY_RAIN_KINKHEDA
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यात दुपारनंतर पावसाने जोर धरला असून वाशिम तालुक्यातील किनखेडा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन मोठे नुकसान झाले आहे.अति पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले तसेच काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले व घरगुती साहित्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे.परिसरातील नद्या-नाल्यांना पूर आल्याने शेतजमिनींमध्ये पाणी घुसले असून सोयाबीन,कापूस,मूग व उडीद पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.वाशिम जिल्ह्याला हवामान विभागाने आधीच मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाने नागरिक व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
8
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 16, 2025 11:19:07Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1608ZT_JALNA_WAGHMARE(2 FILES)
जालना : आंदोलकाच्या कमरेत लाथ घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करा,ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची मागणी
अँकर - जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलीय.काल एका उपोषणकर्त्याला अनंत कुलकर्णी यांनी फिल्मी स्टाईलने कमरेत लाथ मारली होती,दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून,त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जातेय,आता याप्रकरणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी देखील कारवाईची मागणी केलीय..
बाईट :नवनाथ वाघमारे, ओबीसी नेते
9
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 16, 2025 11:05:12Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1608ZT_NANDED_THAR(1 FILE)
नांदेड :पुराच्या पाण्यात अडकली थार कार
अँकर - नांदेड जिल्हयात सकाळ पासून पाऊस सूरू आहे .. हिमायतनगर तालुक्यात हदगाव - हिमायतनगर रस्त्यातील अंडरब्रीज मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले .. या पाण्यातुन एकाने थार कार नेण्याचा प्रयत्न केला .. पण ब्रीज मध्ये पाणी जास्त असल्याने कार बंड पडली आणि पाण्यात अडकली . हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव जवळची ही घटना आहे ..
7
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 16, 2025 11:05:04Ambernath, Maharashtra:
बारवी धरण 'ओव्हरफ्लो'
धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू
Bdl dam
Anchor ठाणे जिल्ह्याची तहान भागवणार बारवी धरण ओव्हर फ्लो झालंय, धरण क्षेत्रात काल रात्री पावसाची संततधार सुरू आहे आहे, या पावसामुळे बारवी धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय ,आज दुपार पासूनच बारवी धरणाच्या 11 दरवाजांमधून 4 क्यूसेक्स पर सेकंद पाण्याचा विसर्ग पाहायला मिळाला , बारवी धरणातून संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो, गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती मात्र कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे आज धरणातू पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे .त्यामुळे आता ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटणार आहे
चंद्रशेखर भुयार ,बदलापूर
10
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 16, 2025 10:30:46Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1608ZT_NANDED_SCHOOL_BUS(2 FILES)
नांदेड :ब्रेकिंग :किनवट तालुक्यात मुसळधार पाऊस , बोधडी जवळ रिकामी स्कूल बस पुराच्या पाण्यात अडकली , चालक बेपत्ता
यामध्ये बसचा 57 सेकंदांचा व्हिडिओ आहे.
अँकर - नांदेड जिल्हयातील किनवट तालुक्यात मुसळधार पाऊस झाला .. तालुक्यात नदी नाल्यांना पुर आला .. बोधडी ते सिंदगी रस्त्यावर शाळेची रिकामी बस पुराच्या पाण्यात अडकली .. पाण्याचा जोर वाढल्याने काही अंतरा पर्यंत ही स्कूल बस वाहून गेली , नंतर एका ठिकाणीं अडकली .. बस मध्ये चालकाशिवाय कोणी नव्हते . दरम्यान बसचाय चालक बेपत्ता असुन त्याचा शोध सूरू आहे .. कोठारी नदीला देखील पुर आला .. या पुराचे पाणी शेतात शिरले. परिसरातील शेती जलमय झाली ..
14
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 16, 2025 10:19:21Jalna, Maharashtra:
FEED NAME :1608ZT_NANDED_HIMAYAT(7 FILES)
नांदेड :हिमायतनगर तालुक्यात मुसळधार पाऊस , शहरात सखल भागात साचले पाणी , शेतीही पाण्याखाली
अँकर - नांदेड जिल्हयातील हिमायतनगर तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला ... जोरदार पावसामुळे हिमायतनगर शहरांतील रस्त्याना तलावाचे स्वरूप आले .. शहरातील सखल भागात पानी साचले .. अनेकांच्या घरात देखील पाणी शिरले ... शिवाय तालुक्यात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली .. त्यामूळे पिकांचे देखील नुकसान झाले ....
14
Report
KPKAILAS PURI
FollowAug 16, 2025 10:18:30Pimpri-Chinchwad, Pune, Maharashtra:
pimpri vaishnavi
kailas puri Pune 16-8-25
feed by 2c
Anchor - .... कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी चा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हुंडाबळीत प्राण गमवाव्या लागलेल्या वैष्णवी हगवणे हिच्या एक वर्षाच्या चिमूरड्याचा अतिशय गोंडस असा व्हिडिओ ट्विटर अर्थात एक्स वर पोस्ट केला आहे. यामध्ये वैष्णवी चा हा चिमुरडा बाल कृष्णाच्या पेहराव्यात बासरी बरोबर खेळताना दिसत आहे... वैष्णवीच्या वैष्णवला खूप खूप लाड अशा रशियाचा संदेशही दमानिया यांनी एक्सच्या माध्यमातून दिला आहे.
13
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 16, 2025 10:17:05Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1608ZT_NANDED_DEATH(2 FILES)
नांदेड:घराची भिंत कोसळून पती-पत्नीचा जागीच मृत्यू
अँकर - नांदेड जिल्हयातील कंधार तालुक्यातील कोटबाजार येथे अंगावर भिंत कोसळून पती-पत्नीचा मृत्यू झाला .दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कच्च्या मातीची भिंती कमकुवत झाली .. त्यातून ही घटना घडली.. रात्री शेख नासेर त्यांच्या पत्नी शेख हसीना झोपलेले असताना अंगावर भिंत पडली ... यात दोन्ही वृद्ध दाम्पत्यांचा जागीच मृत्यू झाला.
12
Report
HPHARSHAD PATIL
FollowAug 16, 2025 10:16:57Palghar, Maharashtra:
पालघर - पालघरसह केळवे सफाळे परिसरात मागील दोन तासांपासून पावसाची दमदार बॅटिंग . मागील दोन तासापासून पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू . सफाळे सह परिसरात सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात . बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात देखील रस्त्यावर पाणीच पाणी . गटारींचे योग्य काम केलं नसल्याने रस्ते पाण्याखाली . वाहन चालक आणि प्रवाशांची तारांबळ . आज पालघर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट . दुपारनंतर पालघर ,सफाळे , केळवे , चिंचणी , तारापूर या भागात मुसळधार पाऊस सुरू.
14
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 16, 2025 09:47:41Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - सोन्याच्या चमचावरून अजित पवार आणि चंद्रकांत पाटलां मध्ये रंगली जुगलबंदी
अँकर - उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात सोन्याचा चमच्यावरुन चांगलीच जुगलबंदी रंगली.सांगलीच्या इस्लामपूर मध्ये एन डी पाटील विधी महाविद्यालयाच्या कार्यक्रमाप्रसंगी चंद्रकांत पाटलांनी भाषणात आपण गिरणी कामगार असून सोन्याचे चमचा घेऊन जन्माला आलो नाही,असा चिमटा अप्रत्यक्ष अजित पवारांना काढला,मग यावरून अजितदादांनी आम्ही पण कष्ट केलं आहे,वरून पडलो नाही,आणि सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, असा टोला मंत्री चंद्रकांत पाटलांना लगावला.
साऊंड बाईट - चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
साऊंड बाईट - अजित पवार - उपमुख्यमंत्री.
14
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 16, 2025 09:47:16Ratnagiri, Maharashtra:
ब्रेकिंग -
चिपळूण मधील पेढे येथील वस्त्यांमध्ये पुन्हा चिखलयुक्त पाणी शिरल्याने पेढेमधील रहिवासी हैराण..
मुसळधार पावसामुळे परशुराम घाटातील भरावाची माती पाण्याच्या प्रवाहातून थेट नागरी वस्तीत शिरून रहिवाशांचे नुकसान.
मुंबई गोवा महामार्गाच्या चुकीच्या कामाचा पेढे गावाला मोठा फटका.
14
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowAug 16, 2025 09:45:37Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_VARUD_PRAVESH दोन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
वरुड–मोर्शी मतदार संघात काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदाराच्या पुत्राचा बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश
अँकर :– विदर्भात काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसचे वरूड–मोर्शी मतदारसंघाचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांनी आज बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे हे अनेक दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होते गेल्या विधानसभा निवडणुकीत विक्रम ठाकरे यांना महाविकास आघाडने उमेदवारी न दिल्याने अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विक्रम ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. अखेर आज विक्रम ठाकरे यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
14
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 16, 2025 09:45:18Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सीना नदीपत्रात 30 हजार क्युसेसने वाढला पाण्याचा विसर्ग, शेकडो एकरावरील खरीपाची पिके पाण्यात
- सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोरामुळे , सीना नदी पात्रात पाण्याचा प्रवाह वाढला
- सीना नदी पात्रात 30 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग
- सीना नदीवरील अनेक बंधारे, पुल गेले पाण्याखाली, सीना नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला
- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील खरीप हंगामाला सीना नदीच्या पुराचा फटका
- सीना नदीकाठच्या अनेक शेतांमध्ये पाणीच पाणी..
- शेतकऱ्यांना व नागरिकांना महसूल प्रशासन पोलीस प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा
Byte : शेतकरी..
14
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 16, 2025 09:18:48Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1608ZT_CHP_CHIMUR_TRIBUTE
( single file sent on 2C)
टायटल:-- 16 ऑगस्ट चिमूर क्रांतिदिनानिमित्त पालकमंत्री प्रा. अशोक ऊईके यांनी वाहिली आदरांजली, देशात 1942 साली याच दिवशी चिमूर ब्रिटिश गुलामगिरीतून 3 दिवसांसाठी झाले होते स्वतंत्र
अँकर:-- चिमूर क्रांती दिनानिमित्त आज चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील शहीद स्मारकावर श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके आणि चिमूर चे आमदार बंटी भांगडीया यांनी शहिदांना अभिवादन केलं. चिमूर हे गाव 16 ऑगस्ट 1942 रोजी देशात सर्वात आधी ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाले होते. महात्मा गांधी यांच्या भारत छोडो आंदोलनातून प्रेरणा घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ही क्रांती घडवून आणली होती. चिमूर च्या लोकांनी इंग्रज फौजेविरुद्ध मोठा एल्गार पुकारत इथला इंग्रज फौजदार व काही शिपायांना बंदिस्त करून ही भूमी 3 दिवस स्वतंत्र केली. यानंतर चिमूर मध्ये मोठा रक्तपात झाला होता त्यामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांना प्राणाची आहुती द्यावी लागली. या क्रांतीचे स्मरण म्हणून दरवर्षी 16 ऑगस्ट रोजी चिमूर शहरातील क्रांतीस्थळी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. चिमूर क्रांतीचा इतिहास जपण्यासाठी चिमूरच्या विकासासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.
बाईट १) डॉ. अशोक उईके, पालकमंत्री
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report