Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
नाशिकमधून हजारोंची तयारी, मराठा आंदोलक मुंबईकडे!
SGSagar Gaikwad
Aug 28, 2025 06:48:00
Nashik, Maharashtra
feed send by TVU 51 reporter-sagar gaikwad slug-nsk_maratha_meting *उद्या नाशिकमधून हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईला जाणार, मनोज जरांगे यांना देणार पाठिंबा* अँकर - मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये बैठक पार पडली. यावेळी उद्या मोठ्या संख्येने नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाचे बांधव जेवणाच्या सामग्री पुरविण्याची जबाबदारी घेणार आहे. त्यामध्ये यावेळी नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाकडून खास स्टिकर तयार करण्यात आले आहेत. दुचाकीसह चारचाकी वाहनांना ते लावण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्याला एका दिवसाची आंदोलनाची जबाबदारी दिली तरी नाशिकमधून ५ हजार आंदोलक आझाद मैदानावर आंदोलन करतील अशी तयारी यावेळी करण्यात आली आहे. तो पर्यंत आम्ही मुंबईतील गणेशोत्सवात गणरायाचं दर्शन घेऊ अशी भूमिका नाशिकमधील मराठा आंदोलकांनी घेतली आहे. लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू सरकारने दडपशाही करू नये अशी प्रतिक्रिया यावेळी मराठा आंदोलकांनी दिलीये. बाईट - करण गायकर - मराठा आंदोलक
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Aug 28, 2025 17:02:18
Akola, Maharashtra:
Anchor : अकोल्यात आज सायंकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत.अकोला शहरातील सिंधी कॅम्प भागात वीज कोसळली असून त्यावेळची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतेही नुकसान झालेले नाही. मात्र, वीज कोसळतानाचे भयानक दृश्य पाहून नागरिकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे..
4
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 28, 2025 17:00:36
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला शहरालगतच्या गुडधी गावात आज ढगफुटीसदृश पावसाने चांगलाच कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे अन्नधान्य, वस्त्र आणि घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Vo : गावाला अकोल्याला जोडण्यासाठी बांधलेला रस्ता योग्य नियोजनाशिवाय झाल्याने रस्त्यावरील पाणी थेट घरात घुसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे गावकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिक प्रशासनावर संतप्त आहेत.यामुळे संतप्त नागरिकांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशीही मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. Byte : गावकरी
1
comment0
Report
Aug 28, 2025 16:34:49
Yavatmal, Maharashtra:
संक्षिप्त बातमी: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युवक जिल्हाध्यक्ष योगेश धानोरकर यांनी यवतमाळ येथे सांगितले की, आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये विदर्भात मोठे बदल दिसतील व पक्ष सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी शेतकरी, कामगार आणि युवकांसाठी सकारात्मक बदल घडवण्याचा विश्वास व्यक्त केला.
3
comment0
Report
MKManoj Kulkarni
Aug 28, 2025 16:30:35
Mumbai, Maharashtra:
अँकर --  मराठा आरक्षणासाठी मनोरंजरांगे उद्या आपल्या हजारो समर्थकांसह आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी मुंबईत येत आहे. मनोज जरंगे हे उद्या मुंबईत येत असल्याने त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात वाहनांची ही गर्दी होणार आहे त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी काही मार्गात बदल केलेले आहे तर काही मार्गावर सर्वसामान्य वाहनांना वाहतूक करण्यास बंदी सुद्धा घातलेली आहे आज रात्री बारा वाजेपासूनच नवीमुंबई  वाशी कडून मुंबईत येणाऱ्या वाहनांना मानखुर्द  येथील टी पॉइंट पासून वीर जिजामाता भोसले महामार्गावरून छेडा नगर,चेंबूर ,कुर्ला,सायन,दादर या रस्त्याने मुंबईत प्रवेश करता येणार आहे.तर मुंबईतून नवी मुंबईकडे जाण्यासाठी कुर्ला चेंबूर छेडा नगर मानखुर्द अस मार्ग देण्यात आला आहे.तर मनोज जडांगे यांना चेंबूर पांजरापोळ येथून प्रीवेने आझाद मैदानाकडे दक्षिण मुंबईत जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून दिला आहे. आज रात्रीपासून फक्त आंदोलनासाठी आलेल्या वाहनांना पांजरापोळ वरून  फ्रीवे वरून दक्षिण मुंबईकडे आझाद मैदानात जाण्यासाठी मार्ग सुरू देण्यात येणार आहे. मनोज कुळकर्णी 
1
comment0
Report
Aug 28, 2025 16:25:51
Waghapur, Maharashtra:
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा जवळील भांडेगाव येथे आज संध्याकाळी ढगफुटी झाली. हवामान खात्याने पूर्वीच मुसळधार पावसाचा व विजेच्या कडकडाटाचा अंदाज वर्तविला होता. अचानक झालेल्या या ढगफुटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
2
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 28, 2025 15:50:22
Akola, Maharashtra:
Anchor : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सगेसोयऱ्यांचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी हजारो मराठा आंदोलक आंतरवालीतून आणि राज्यभरातून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत..अकोल्यातूनही मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईसाठी रवाना झाले आहेत. यावेळी सुद्धा संविधानिक पद्धतीनेच आंदोलन होईल, जरी एकच दिवसाची परवानगी असली तरी, शांततेच्या मार्गाने आंदोलन केल्यावर शासनाला परवानगी द्यावीच लागेल अस मराठा समाजाने सांगितले आहे. या आंदोलन सामील होण्यासाठी अकोल्यातूनही मोठ्या संख्येने मराठा समर्थक मुंबईला निघाले आहेत. तर रायगड जिल्ह्यातून आलेल्या महिला समर्थकांनी यावेळी आरक्षण घेऊन येणारच असा विश्वास दाखवला आहे.
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Aug 28, 2025 15:50:09
Mumbai, Maharashtra:
अँकर -- मनोज जरांगे आरक्षण आंदोलनासाठी हजारो मराठा बांधवांसह मुंबईत येत आहेत.त्यांनी आवाहन केल्या प्रमाणे हजारो मराठा बांधव वाहनाने मुंबईत येत आहेत.आज लातूर जिल्ह्यातील काही मराठा बांधव पीकअप वाहनाने मुंबईत येत असताना फ्री वे वर या हाताचा अपघात झाला यात तिघेजण जखमी झालेत त्यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे.दुपारपासून मुंबईत पावसाची रिमझिम सुरू असल्याने रस्ते निसरडे झाले आहेत त्यात चालकाचे नियंत्रण सुटले आणि पीकअप उलटली. मनोज कुळकर्णी  फोटो २C 
0
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 28, 2025 15:46:49
kolhapur, Maharashtra:
Ngp Satnavari spl live u ने फीड पाठवले -------
3
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 28, 2025 15:30:12
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला शहरालगतच्या गुडधी गावात आज ढगफुटीसदृश पावसाने चांगलाच कहर केला. मुसळधार पावसामुळे गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे अन्नधान्य, वस्त्र व घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अचानक आलेल्या या पावसामुळे गावकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.यामुळे त्रस्त नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
13
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 28, 2025 15:00:20
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला शहरात आज सायंकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले. सलग दोन तास झालेल्या मुसळधार पावसाचा फटका वाहतूक आणि वीजपुरवठ्याला बसला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागले.जेल चौक परिसरात पावसाच्या धारेमुळे विद्युत पोल कोसळला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला. त्याचप्रमाणे मुख्य मार्गावर विद्युत वाहिनीचा तार खाली पडल्याने काही वेळेसाठी वाहतूक ठप्प झाली होती. मात्र विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे ही अडचण लवकर दूर झाली. कर्मचाऱ्यांनी भर पावसातच तातडीने विद्युत तार कापून मार्ग मोकळा केला.या कारवाईत वाहतूक पोलिसांनीही मोठा सहभाग नोंदवत रहदारीची कोंडी दूर करण्यास हातभार लावला. सध्या जेल चौक परिसराचा वीजपुरवठा खंडित असून, तो सुरळीत करण्यासाठी विद्युत विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.सुदैवाने मात्र यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
7
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 28, 2025 14:32:15
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाने अनेक भागांना झोडपून काढले, तासभर कोसळलेल्या पावसामुळे नदी नाले व ओढ्यांना पूर आला, तर शहरामध्ये सखल भागात पाणी साचले. उमरखेड, आर्णी, पुसद, यवतमाळ शहरात रस्ते जलमय झाले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची देखील पावसामुळे त्रेधातिरपीट उडाली. शेतशिवारातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
11
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 28, 2025 14:32:04
Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 2808ZT_GAD_NAX_IDENTIFIED ( single file sent on 2C)  टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील कोपर्शी जंगलात पोलीस नक्षल चकमकीत ठार झालेल्या चार नक्षलवाद्यांची ओळख पटली, एक पीपीसीएम दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह तीन सदस्य टिपले, शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकूण 14 लाख रुपयांचे बक्षिस, 48 तासांपेक्षा अधिक चाललेल्या अभियानात घटनास्थळावरुन 01 एस.एल.आर., 02 इन्सास व एक .303 रायफल अशी एकूण 04 अग्निशस्त्रे जप्त      अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्यातील  नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात विध्वंसक कारवाया करुन घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने तळ करून बसलेल्या 4 नक्षलवाद्यांना टिपण्यात सुरक्षा दलांना यश आले. अवघड जंगल परिसर व प्रतिकूल हवामानाचा सामना करत सतत सुरु असलेल्या पावसादरम्यान सलग दोन दिवस अभियान राबवून पोलीस पथके सदर जंगल परिसरात पोहचली होती. चकमकीनंतर पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.   जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर 01 पुरुष व 03 महिला असे एकुण 04 नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले.  1) मालु पदा, वय 41 वर्षे, रा. बुर्गी (रेंगावाही), ता. बेटीया, जि. कांकेर (छ.ग.) दलमचे नाव - कंपनी क्र. 10 पद – पीपीसीएम बक्षिस – 06 लाख रुपये  कार्यकाळात दाखल गुन्हे - चकमक – 05, खून – 01, जाळपोळ – 01, इतर – 01 - एकुण – 08 2) क्रांती ऊर्फ जमुना रैनु हलामी, वय 32 वर्षे, रा. बोधीनटोला, तह. धानोरा, जि. गडचिरोली दलमचे नाव - कंपनी क्र. 10 पद – कंपनी सदस्य  बक्षिस – 04 लाख रुपये  कार्यकाळात दाखल गुन्हे - चकमक – 13, खून – 06, जाळपोळ – 03, इतर – 05 - एकुण – 27 3) ज्योती कुंजाम, वय 27 वर्षे, रा. बस्तर एरीया, राज्य छत्तीसगड दलमचे नाव - अहेरी दलम पद – दलम सदस्य  बक्षिस – 02 लाख रुपये कार्यकाळात दाखल गुन्हे - चकमक – 07, खून – 01 – एकूण – 08 4) मंगी मडकाम, वय 22 वर्षे, रा. बस्तर एरीया, राज्य छत्तीसगड दलमचे नाव – गट्टा दलम पद – दलम सदस्य  बक्षिस – 02 लाख रुपये कार्यकाळात दाखल गुन्हे - चकमक – 02, इतर – 01 – एकूण – 03 जप्त शस्त्रे 1. SLR रायफल - 01 2. INSAS रायफल – 02 3. .303 रायफल – 01 4. जिवंत काडतूस  – 92 5. वॉकी टॉकी  – 03     सन 2021 पासून  आजपर्यंत गडचिरोली पोलीसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 91 कट्टर नक्षल्याना कंठस्नान घालण्यात आले असून, 128 नक्षल्याना अटक करण्यात आली आहे तर 75 नक्षल्यानी गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.  बाईट १) निलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
11
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 28, 2025 14:31:36
Akola, Maharashtra:
Anchor : हवामान विभागाने पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार आज अकोल्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. तब्बल दोन तास चाललेल्या पावसाने शहर आणि ग्रामीण भागात चांगलाच धुमाकूळ घातला. नदी-नाले ओसंडून वाहू लागले असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. शेतांमध्ये पाणी शिरल्याने काही ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
11
comment0
Report
SMSATISH MOHITE
Aug 28, 2025 14:17:03
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_Student Feed on - 2C ------------------------- Anchor - पुराच्या पाण्यामुळे पलीकडे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना मानवी साखळी करून सुखरूप काढण्यात आले. नांदेड जिल्हयातील नायगाव तालुक्यातील कोलंबी येथील हळदा रोडवर पाणी आल्याने विद्यार्थी अडकून पडले होते. नायगाव तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे नदी नाल्याना पूर आलाय. या पुरात हाळदा - कोलंबी मार्गावर स्कूल बस अडकली होती. बस मध्ये 18 विद्यार्थी, एक शिक्षक आणि चालक होता. या सर्वांना पुराच्या पाण्यातुन बाहेर काढण्यात आले. स्थानिक नागरिक आणि आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी करून या सर्व विध्यार्थाना सुरक्षितपणे बाहेर काढले. ------------------------
13
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 28, 2025 14:16:47
Beed, Maharashtra:
बीड: आरक्षण लढ्यासाठी मुंबईकडे निघालेल्या आंदोलनकर्त्याचा रस्त्यातच हृदयविकाराने मृत्यू , कुटुंबावर दुःखाचे डोंगर Anc : मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेल्या सतीश देशमुख यांचा पुणे जिल्ह्यात हृदयविकाराने मृत्यू झाला. गेल्या अनेक वर्षापासून सतीश देशमुख मराठा आरक्षणाच्या चळवळीत कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच देशमुख कुटुंबाने अक्षरशः हंबरडा फोडला. मायबाप सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडवावा आणि देशमुख कुटुंबाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे..सतीश देशमुख हे बीडच्या केज तालुक्यातील वरपगाव येथील रहिवाशी आहेत. सतीश देशमुख यांची दुःखद घटना समजताच नातेवाईकांनी त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या गावी सरसावले आहेत. बाईट: नातेवाईक 1 बाईट: नातेवाईक 2
1
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top