Back
अकोले तालुक्यात धबधब्यात पडलेल्या तरुणाची जिवाची थरारक कहाणी!
Shirdi, Maharashtra
Anc_ अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असणा-या महाकाय रंधा धबधब्यात तरूण पडल्याची घटना काल संध्याकाळी घडली होती.. रूद्रावतार धारण केलेली प्रवरा नदी ज्या ठिकाणी दरीत कोसळते त्या प्रवाहात हा तरूण वाहून जाताना दिसत होता मात्र सुदैवाने दरीत कोसळण्या अगोदर हा तरूण पोहत काठावर पोहचला त्यामुळे त्याचा जिव वाचलाय.. हा तरूण कोण होता..? त्याने उडी मारली होती की पडला होता याबाबत माहीती मिळू शकली नाही.. मात्र देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय नक्कीच आला..
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Pune, Maharashtra:
हिंजवडी आयटी पार्कमध्ये 3 ते 4 दिवस वीज पुरवठा विस्कळीत, मोठ्या कंपन्यांना फटका.
pimpri light
kailas puri Pune 7-7-25
feed by 2c
for web also...!
.....हिंजवडीत रविवारी सायंकाळपासून वीज पुरवठा विस्कळीत झालाय. त्यामुळं मोठ्या आयटी कंपन्यांना फटका बसलाय. कारण हा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी 3 ते 4 दिवसांचा अवधी लागणार आहे. असं महावितरण विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही इन्फोसिस ते २२० केव्ही पेगासस अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीत रविवारी दुपारी २.१० च्या सुमारास बिघाड झाल्यामुळे महापारेषणकडून महावितरणच्या एमआयडीसी आणि आयटी पार्क भागातील ९१ उच्चदाब व सुमारे १२ हजार लघुदाब वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळित झाला आहे. पर्यायी मार्गाने वीजपुरवठा पूर्ववत केला जातोय, पण कंपन्यांना लागणारी वीज पुरेशी होत नाही.
महापारेषण कंपनीने नियोजित देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ असा वीजपुरवठा बंद केला होता. तशी सूचना वृत्तपत्रांमध्येही प्रसिद्ध केली होती. मात्र देखभाल दुरुस्तीचे काम आटोपून वीजपुरवठा सुरु करताना दुपारी २.१० वाजेच्या सुमारास २२० केव्ही इन्फोसिस ते २२० केव्ही पेगासस अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीत मोठा बिघाड झाला. परिणामी महावितरणच्या ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या २२ केव्हीच्या २५ वाहिन्या, अतिउच्चदाबचे इन्फोसिस व नेक्सट्रा हे दोन ग्राहक अशा ९१ उच्चदाब आणि सुमारे १२ हजार लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळित झाला आहे.
पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणला शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. तब्बल ६३ मेगावॅटहून अधिक भार इतरत्र मार्गाने वळविण्याचे काम सुरु असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. हिंजवडी भागातील एमआयडीसी, आयटी पार्क, रायसोनी पार्कचा भाग, डॉहलर कंपनी तसेच विप्रो सर्कलच्या परिसराला याचा फटका बसला आहे. दरम्यान ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. पुढचे 3 ते 4 दिवस वीजपुरवठा असाच विस्कळीत राहणार आहे.
0
Share
Report
Wardha, Maharashtra:
वर्धा
SLUG - 0707_WARDHA_MP_121
- वर्ध्यात आत्महत्याग्रस्त पीडित कुटुंबाचे खासदारांकडून सात्वन
- आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघितल्या मात्र विध्यार्थ्यांच्या आत्महत्या म्हणजे हे शोकांतिका - खासदार
- शिक्षण विभाग, प्रोजेक्ट अधिकारी,कोणत्याच अधिकाऱ्यांनी कुटुंबाची भेट घेतली नाही
- निर्लज्य आणि कुंभकर्णी झोपेतलं सरकार आहे; खासदार अमर काळे यांचा सरकारवर घणाघात
- वर्ध्याच्या घटनेची आदिवासी मंत्र्यांनी दखल घ्यावी आणि पीडित कुटुंबाला मदत करा- काळे
- अशी दुसरी सोनिया घडू नये अशीच अपेक्षा- काळे
अँकर - वर्ध्यामध्ये 12 वि मध्ये शिकणाऱ्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहेय..खासदार अमर काळे यांनी आत्महत्याग्रस्त उईके कुटूंबाला भेट देऊन सात्वन केले..आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघितल्या मात्र विध्यार्थ्यांच्या आत्महत्या म्हणजे हे शोकांतिका आहेय..जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडेच शिक्षण खातं आहे..शिक्षण विभाग, प्रोजेक्ट अधिकारी,कोणत्याच अधिकाऱ्यांनी कुटुंबाची भेट घेतली नाही.. त्याची खंत देखील बोलून दाखविली आहेय..निर्लज्य सरकार आहे याची ही प्रचिती आहेय..झोपलेलं सरकार आहे या घटनेच्या माध्यमातून तरी कुंभकर्णी झोपेतून उठतील त्यानिमित्ताने मी करतो...या घटनेची आदिवासी मंत्र्यांनी दखल घ्यावी आणि पीडित कुटुंबाला मदत करावी.. अशी दुसरी सोनिया घडू नये अशीच अपेक्षा मी करतोय अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली आहेय.. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी...
बाईट- 121,अमर काळे, खासदार, वर्धा
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ..
अँकर - सांगलीच्या कृष्णा नदी आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू आहे.त्यामुळे धरणाच्या आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे.कृष्णा नदीची पाणी पातळी सांगलीच्या आयर्विन पूल येथे साडेअठरा फुटांवर पोहचली आहे,तर चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन धरण ८२ टक्के भरले आहे,त्यामुळे धरणातून साडेचार हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, परिणामी वारणा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढत झाली आहे त्यामुळे दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीने वाढल्या वाढवताना पाहायला मिळत आहे, याचाच आढावा घेतला आहे आमची सांगलीचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी..
0
Share
Report
Nagpur, Maharashtra:
वाठोडा पोलीस स्टेशनचे संग्रहित shots पाठवले आहे
----
नागपूर
*पत्नीने प्रियकराच्या सहाय्याने पतीला संपविल असल्याची घटना वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली आहे ...
पती अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानं खून केल्याच समोर आले....
*पत्नीने पतीच्या हत्येला नैसर्गिक मृत्यूचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला... मात्र पोस्टमॉर्टम अहवालातून ती हत्या असल्याचं आलं समोर.*
38 वर्षीय चंद्रसेन रामटेके असे मृताचे नाव आहे.
30 वर्षीय दिशा रामटेके ही पत्नी असून चंद्रसेन यांच्याशी तिचे तेरा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुली आणि एक सहा वर्षांचा मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी चंद्रसेन याला अर्धांगवायू गेल्यानं तेव्हा पासून तो घरीच राहत होता...
दिशा रामटेके खर्च भागविण्यासाठी पाण्याची कॅन भरून विक्रीचा व्यवसाय करत होती....
काही महिन्यांपूर्वी तिची आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबू टायरवाला या दुचाकी दुरुस्ती आणि पंक्चरचे काम करणाऱ्या व्यक्तीशी असलेली ओळख प्रेम संबंधात पडली...
*दिशांचे पती चंद्रसेन 4 जुलै रोजी घरी निपचित पडलेले दिसले. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोस्टमॉर्टम अहवालात गळा, नाक आणि तोंड दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे उघड झाल्याने तपासाची दिशा बदलली.*
पोलिसांनी शासकीय रुग्णालयाच्या पोस्टमॉर्टम कक्षाजवळ दिशाला बोलवून तीची चौकशी केल्यावर तिने हत्येची कबुली दिली.
*अनैतिक संबंधांची चंद्रसेन याला माहिती मिळाली होती... आणि त्यांचे कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे त्याला संपविण्याचा प्लॅन आखण्यात आल्याच तपासात समोर आल...*
*दोघांनी चंद्रसेन याचा गळा आवळला आणि नाका तोंडावर दाबून धरली. श्वास गुदमरून तडफडून चंद्रसेन याचा मृत्यू झाल्याच तपासात समोर आलं..*
0
Share
Report
Mumbai, Maharashtra:
anchor : मुंबई मनपाच्या घाटकोपर येथील टिळक मार्ग शाळेच्या नव्या इमारती मध्ये पालक आणि विद्यार्थी स्वतः बेंच घेऊन घुसले आहेत. मुंबई मनपाने गेले तीन वर्ष या शाळेच्या नव्या इमारतीचे काम सुरू ठेवले आहे. यामुळे जुन्या जागेत अतिशय धोकादायक ठिकाणी साडे तीनशे विद्यार्थी शिकत आहेत. मात्र अचानक पालिका प्रशासनांने सदर जागा धोकादायक आहे सर्व विद्यार्थ्यांना दीड ते दोन किमी लांब शाळेत स्थलांतरित करणार असल्याचे पालकांना सांगितले. मात्र बाजूचीच नवी इमारत जवळजवळ तयार आहे तर यात का शाळा सुरू होत नाही असा सवाल करीत या नव्या इमारतीत घुसले आहेत. स्वतः पालक आणि विद्यार्थ्यांनी बाजूच्या जुन्या शाळेतील बेंच आणि वस्तू या नव्या इमारती मध्ये आणल्या आहेत. आणि इथेच पालक आणि विद्यार्थी ठाण मारून बसले आहेत.याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी
Wkt with teachers and parents
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
07072025
slug - PPR_SUICIDE
feed on 2c
file 01
---
Anchor - पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे एकाच कुटुंबातील चार जणांची आत्महत्या, घरगुती वादातून महिलेने उचलले टोकाचे पाऊल, पतीला कळताच पतीनेही घेतला गळफास
कासेगाव येथील आसबे कुटुंबातील मोनाली आसबे यांनी लहान मुले ऐश्वर्या आणि कार्तिक यांना सोबत घेऊन घरगुती वादातून विहिरीत उडी मारून आपले जीवन संपवले. ही बाब पती ममाजी याला कळताच त्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच दिवशी आसबे कुटुंबाचा असा शेवट झाल्याने कासेगावात हळहळ व्यक्त होत आहे.
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0707ZT_JALNA_UBT_ANDOLAN(10 FILES)
जालना | महापालिकेत नागरी समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं 'आंखे तो खोलो स्वामी आंदोलन'
महापालिका आयुक्तांना स्क्रिनवर दाखवल्या 'झी-२४ तास' ने शहरातील समस्यांबाबत दाखवलेल्या बातम्यांचे व्हिडीओ
अँकर | 'झी-२४ तास' नं जालना शहरातील नागरी समस्यांबाबत दाखवलेल्या बातम्या महानगरपालिका आयुक्तांना त्यांच्या दालनातील स्क्रिनवर दाखवून उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जालना महापालिका आयुक्तांच्या दालनात 'आँखे तो खोलो स्वामी"आंदोलन केलंय.
शहरातील मोकाट जनावरांना आवर घालावा,रस्त्यांची दयनीय अवस्था दूर करावी,सावरकर जलतरण तलावाची दुरावस्था झाली असून तो दुरुस्त करावा,शहरातील बंद पडले ले पथदिवे सुरु करावेत या मागण्यांसाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जालना महानगरपालिकेत आँखे तो खोलो स्वामी आंदोलन करण्यात आलं.या आंदोलनादरम्यान आयुक्तांच्या दालनात जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना त्यांच्या समोर असलेल्या स्क्रिनवर शहरातील समस्यांची 'झी-२४ तास' नं वारंवार दाखवलेल्या बातम्यांच्या चित्रफीत दाखवल्या.या चित्रफीतीतून शहरातील समस्या मांडत उबाठा पक्षानं आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महापालिका आयुक्तांनी डोळे उघडे ठेवून नागरी समस्या सोडवण्याची मागणी केली.जर समस्या सोडवल्या नाही तर आणखी कठोर आंदोलन करण्याचा ईशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महापालिका आयुक्तांना देण्यात आला आहे.
बाईट : भास्कर अंबेकर, जिल्हाप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, जालना
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
आमदार संजय गायकवाड यांच्या बॅनर ला जोडे मारत केलं आंदोलन
मनसेचे कार्यकर्ते आक्रमक...
डोंबिवलीमध्ये संजय गायकवाड आले तर फिरून देणार नाही व त्यांच्या गाड्या फोडू मनसेने दिला इशारा..
Anc..शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी महापुरुष बद्दल बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ डोंबिवली इंदिरा चौकात मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी संजय गायकवाड यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन केले तसेच प्रतिमात्मक बॅनर वर संजय गायकवाड यांच्या चेहऱ्याला गाढवाचं तोंड लावून बॅनर वरती जोडे मारो आंदोलन केले तर आमदार संजय गायकवाड हे डोंबिवली मध्ये आले तर फिरू देणार नाही व त्यांच्या गाड्या फोडू असे मनसेच्या कार्यकर्ते इशाराच दिला आहे..
Byte.. प्रकाश भोईर.
जिल्हा अध्यक्ष
Byte.. संदीप म्हात्रे.
मनसे पदाधिकारी
0
Share
Report
Navi Mumbai, Maharashtra:
story slug -कॉम्पुटर कलासेसच्या मालकाने केला शिक्षिकेचा विनयभंग.
कॉम्प्युटर क्लास के मलिक ने किया विनयभंग
FTP slug - nm computer class story
shots- photo ,vidio
reporter- swati naik
navi mumbai
anchor -
नवी मुंबईतील ऐरोली मध्ये कॉम्पुटर कलासेसच्या मालकाने केला शिक्षिकेचा विनयभंग.
ऐरोली सेक्टर 3 मधील एसआयटी कॉम्पुटर कलासेसचे मालक संदीप पाटील यांच्यावर गुन्हा दाखल.
विद्यार्थ्यांना कॉम्पुटरचे बेसिक नॉलेज शिकविण्यासाठी शिक्षिका गेली असता मालक संदीप पाटील याने केला विनयभंग.
शिक्षिकेच्या तक्रारी वरून रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
कॉम्पुटर क्लासचा मालक संदीप पाटील याला रबाळे पोलीसांनी तात्काळ केली अटक.
कॉम्पुटर कलासेस मध्ये शिक्षिकेचा विनयभंग होतं असेल तर विद्यार्थ्यांचे काय असा प्रश्न आता उपस्थित होतं असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Shaktipith
Feed on - 2C
---------------------------
Anchor - शक्तिपीठ महामार्गाची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधीऱ्यांना शेतकरी महिलांच्या आक्रमकतेमुळे माघारी फिरावे लागले. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील देगाव मध्ये मोजणी करण्यासाठी अधिकारी आले होते. शेतकऱ्यांचा विरोध पाहता मोठ्या पोलीस बंदोबस्तात अधिकारी मोजणी करण्यासाठी आले होते. मात्र शेतकरी महिलांचा रोष पाहून अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील काही गावांची जमीन शक्तिपीठ महामार्गात बाधित होणार आहे. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना कोणत्याच गावात आतापर्यंत मोजणी करता आली नाही. देगावमध्ये आज अधिकारी पोलीस बंदोबस्तात आले. पण गोळ्या घाला मग मोजणी करा असा पवित्रा महिलांनी घेतला. ह्या जमिनीवर तीन पिढ्याचा उदरनिर्वाह चालतो, जमीन गेली तर खायचे काय असा सवाल महिलांनी उपास्थित केला. लाडक्या बहिणीचे दिड हजार परत घ्या पण जमीन देणार नाही अशी प्रतिक्रिया शेतकरी महिलांनी व्यक्त केली.
Byte - लक्ष्मी कदम - देगाव
Byte - मीनाबाई कदम - देगाव
Byte - शिवाजी कदम - देगाव
-----------------------
0
Share
Report