Back
दुचाकीला लागली आग, चालकाने पळ काढला!
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 10, 2025 02:01:51
Bhandara, Maharashtra
अचानक दुचाकीला लागली आग...शिंगोरी रोडवरील घटना
Anchor ;- लाखनी कडून भंडारा कडे येत असलेल्या दुचाकीला अचानक भरस्त्यात आग लागल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या राष्ट्रीय महामार्ग 53 वरील शिंगोरी येथे घडली असून दुचाकीचालकाने दुचाकीसोडून पळ काढला तर उपस्थित नागरिकांनी दुचाकीला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला यात दुचाकी चालक समीर ठवकर यांचे मोठे नुकसान झाले आहे.
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowJul 10, 2025 12:09:18Yeola, Maharashtra:
अँकर :- नाशिकच्या येवला तालुक्यातील कोळगाव येथे सेमी इंग्रजी असलेल्या जिल्हा परिषद शाळेत पटसंख्या पुरेशी असताना देखील शाळेला अतिरिक्त शिक्षक नसल्याने पालकांनी शाळेला टाळे ठोकल्याची बातमी झी 24 तास ने दाखवली होती या बातमीने खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागाने कोळगाव जिल्हा परिषद शाळेला त्वरित शिक्षक उपलब्ध करून दिल्याने येथील पालकांनी झी 24 तास चे आभार मानले आहे.
8
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 10, 2025 12:08:56Kalyan, Maharashtra:
कल्याण मध्ये डेंग्यूचा बळी..
31 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
Anchor :- कल्याण मध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत आहे . डेंग्यूची लागण झालेल्या 31 वर्षे तरुणाचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे विलास म्हात्रे असे या तरुणाचे नाव असून तो कल्याण पश्चिमेकडील बेतुरकर पाडा परिसरात राहत होता .
Vo... पावसाळ्यात कल्याण डोंबिवली मध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय. मलेरिया डेंगू या आजाराने कल्याण डोंबिवलीत डोकं वर काढलंय . मे पासून आतापर्यंत डेंग्यूचे सुमारे 30 रुग्ण कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आलेत . कल्याण पश्चिम बेतूरकर पाडा येथे राहणाऱ्या विलास म्हात्रे या 31 वर्ष तरुणाला डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले होते .सात जुलै रोजी विलासला कल्याणमधील केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले .मात्र प्रकृती खालावल्याने त्याला कळवा येथील रुग्णालयात नेण्याच्या सूचना केडीएमसी रुग्णालयाकडून करण्यात आला होत्या. मात्र विलास याच्या कुटुंबीयांनी त्याला कल्याण पूर्वेकडेल एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले . उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने आज विलास म्हात्रे याचा मृत्यू झाला .
Byte :- हर्षल गायकवाड ( अतिरिक्त आयुक्त केडीएमसी )
3
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 10, 2025 12:06:15Pandharpur, Maharashtra:
10072025
Slug - PPR_MLA_GRAPELOSS
feed on 2c
file 01
-----
Anchor - सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष बागांच्या नुकसानीवरून माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सभागृहात आज रुद्रावतार धारण केला. जिल्ह्यातील माढा पंढरपूर येथील 20,000 हेक्टर वरील द्राक्ष बागांच नुकसान झालेला असताना सरकारने फक्त 33 हेक्टर वरील द्राक्ष बागांना नुकसान भरपाई दिली आहे. सभागृहात प्रश्न मांडू दिला जात नसताना त्यांनी आक्रमक होत मतदारसंघातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला.
0
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 10, 2025 12:05:59Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे शहरात धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहरातील ६५ मराठी शाळांपैकी तब्बल ४५ शाळा बंद असून, उर्वरित सुरु असलेल्या २० शाळांपैकी १३ उर्दू माध्यमाच्या तर फक्त ७ शाळा मराठी माध्यमाच्या शाळा अस्तित्वात आहेत. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी यासाठी महापालिकेच्या वतीने शिक्षण मंडळाच्या शाळा सुरु करण्यात येतात. मात्र धुळ्यातील मराठी शाळांचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.शहरात महापालिकेच्या ६५ शाळा होत्या मात्र त्यातील ४५ शाळा बंद अवस्थेत आहेत.विशेष म्हणजे सुरु असलेल्या २० शाळांपैकी १३ शाळा या उर्दू माध्यमाच्या असून फक्त ७ शाळा मराठी माध्यमांच्या सुरु आहेत. राज्यात मराठी हिंदी भाषेचा वादंग सुरु असतांनाच धुळे शहरात महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या तब्बल ४५ शाळा बंद पडल्या आहेत.सुरु असलेल्या २० शाळांपैकी देखील काही शाळांचे बांधकाम जुनं असल्याने शाळांची दुरवस्था झाली आहे.२० शाळांपैकी काही शाळांमध्ये पावसात गळत असलेल्या वर्गखोलींमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहे. एकेकाळी धुळ्यात खाजगी शाळांपेक्षा जास्त पटसंख्या या महापालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळेत असायचे. मात्र आता परिस्थिती अवघड झाली आहे.धुळे शहरात खाजगी शाळांचा सुळसुळाट वाढला आहे.एकीकडे महापालिकेच्या गुणवत्ता आणि सोयी सुविधा बघता पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत शिकवण्याची पसंती दर्शविली आहे.गुणवत्ता नसल्याने विद्यार्थ्यांच्या संख्येत घट निर्माण होत आहे. मराठी शाळांची तब्बल ४५ शाळा बंद असतांनाच या बाबत कुठल्याच लोकप्रतिनिधींना काही एक देनघेन नाही.मराठी भाषे संदर्भात राज्यात देखील वाद होत असले तरी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून सुरु असलेल्या मराठी शाळेची ही अवस्था म्हणजे दुर्देव म्हणाले लागेल.
Byte - व्हि एल दसरवाड,शिक्षण मंडळाधिकारी, महापालिका
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 10, 2025 12:05:02Dhule, Maharashtra:
Anchor धुळे तालुका पोलिसांनी कारवाई करत दरोड्याच्या गुन्ह्यातील सुमारे 42 लाखांची रोकड जप्त केली असून चौघांना अटक केली आहे. लखनऊ इथून एका ऍग्रो कंपनीची सुमारे दीड कोटी रुपयांची रोकड घेऊन कंपनीचे लोक स्कॉर्पिओने मुंबईला जात होते. यादरम्यान धुळे जिल्ह्यातील पुरमेपाडा गावाजवळ चौघांनी गाडीला रोखत बंदुकीचा धाक दाखवून दीड कोटी रुपयांची रोकड लुटून नेली होती. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान धुळे तालुका पोलिसांनी तपास चक्र फिरवत सुरत इथून चौघांना अटक केली आहे. रोकड घेऊन जात असलेल्या कारच्या चालकानेच इतर साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकल्याचे पोलीस तपासात समोर आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीसह सहभागी असलेल्या चौघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 42 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.
Byte- धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक धुळे तालुका
प्रशांत परदेशी, धुळे.
2
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 10, 2025 12:02:10Dhule, Maharashtra:
anchor - नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील डाब ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या मालीआंबा गावातील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा धोकादायक प्रवास करावा लागत आहे. गावातून वाहणाऱ्या वरखेडी नदीवर पूल नसल्याने गावकऱ्यांनी बांबू आणि दोरीच्या साह्याने तयार केला बांबूचा झुलता पूल वरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासन एकीकडे निधी नसल्याचा कांगावा करत अशा परिस्थितीत पूल बांधण्यास नकारघंटा देत असताना गावकऱ्यांनी हा तात्पुरता पूल बांधून प्रशासनाला चपराकदिली आहे. मात्र एका ठिकाणी पूल बांधल्यानंतर देखील दुसऱ्या ठिकाणी पुल नसल्याने नदीच्या पुराच्या पाण्यातून धोकादायक पद्धतीने कमरे एवढ्या पाण्यातून विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. चाळीस विद्यार्थी आणि जवळपास १३० अंगणवाडीचे लहान बालक रोज अशा पद्धतीने शिक्षणासाठी धोकादायक प्रवास करीत आहेत. केलंखाडी नंतर मालीअंबाच्या या परिस्थितीसमोर आल्यानंतरून शासन प्रशासन अशा ठिकाणी कधी लक्ष देणार हा प्रश्न अनुत्तारित आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी या चिमुकल्या मुलांना पाहून पूल तयार करून द्यावा अशीच काहीशी भावना व्यक्त केली जात आहे.
byte - स्थानिक
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 10, 2025 12:01:16Pandharpur, Maharashtra:
10072025
Slug - PPR_GOLD_CHAIN
feed on 2c
file 01
-----
Anchor - करमाळा पोलिसांनी अवघ्या काही वेळात एक लाख 60 हजार रूपयांचे १७ तोळ्याचे गळ्यातील सोन्याची चेन आणि आरोपीला घेतले ताब्यात. करमाळा येथील आरोग्य केंद्रातील महिला कर्मचारी यांची खाली पडलेली पर्स उचलून देताना आरोपी हरी भोसले याने पर्स मधील सोन्याची चेन लंपास केली होती. यानंतर फिर्यादी महिलेने करमाळा पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी माहिती आधारे आरोपी भोसले याला ताब्यात घेऊन त्याच्या कडून सोन्याची चेन जप्त करून अटक केले आहे.
2
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 10, 2025 12:01:05Dhule, Maharashtra:
Anchor - पुराच्या पाण्यात अनेकांचे जीव गेल्याच्या घटना सर्वश्रुत असतानाही, काही वाहन चालक अकारण धारिष्ट करण्याच्या टाळत नाहीत. पुराच्या पाण्यातून पुलावरून दुचाकी धारकाचा जीव घेणा प्रवास करणाऱ्याचा जीव धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात स्थानिकांच्या मदतीमुळे वाचला आहे. साक्री तालुक्यात पांझरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला असताना अशा परिस्थितीमध्ये नांदवड-बेहेड फरशी पुलावरून दुचाकी नेण दुचाकी धारकाला चांगलंच महागात पडलं असतं, परंतु परिसरातील नागरिकांनी धाव घेत बचाव कार्य केल्यामुळे वाहून जाणारी दुचाकी व त्यावरील दुचाकी धारक सुदैवाने बचावला आहे. नांदवड-बेहेड गावांना जोडणाऱ्या फरशी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी पुराच्या पाण्यामधून फरशी पुलावरून प्रवास करू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले असताना, याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत पुराच्या पाण्यामधून प्रवास करणे या दुचाकी धारकाच्या जीवावर बेतले होते, परंतु सुदैवाने परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत बचाव कार्य करत या दुचाकी धारकाला वाचविले आहे.
प्रशांत परदेशी, धुळे.
2
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 10, 2025 11:43:31Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे शहरात मुलींची छेड काढणाऱ्या दोघा रोड रोमियोना शिंदे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगला चोप दिला. धुळे शहरातील गल्ली नंबर चार येथे दोघेजण मुलींची छेड काढत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिंदे गट शिवसेनेचे पदाधिकारी घटनास्थळी पोहचले. संबंधित रोड रोमिओ घटनास्थळावरून पसार झाले होते. शिवसैनिकांनी त्यांचा शोध घेत त्यांची गली नंबर चार येथेच चांगला चोप देत समाचार घेतला. मारत मारत या रोड रोमिंयोंची धिंड काढत या रोडरोमोयोंना केले पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
byte - शिवसेना कार्यकर्ता
प्रशांत परदेशी, धुळे.
8
Share
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 10, 2025 11:34:17Nashik, Maharashtra:
Feed send by TVU 51
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_student_suicide
अँकर - बातमी आहे नाशिक मधून, नाशिकमध्ये १६ वर्षाच्या तरुणाने गळफास घेत आपलं जीवन संपवलंय. जीवन संपविण्याचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. नेमकं नाशकात काय घडलंय, पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट.
Vio/1
-फोटोत दिसणारा हा आहे नाशिकच्या नगर परिसरातील जय भवानी रोड या ठिकाणी राहणारा सम्राट भालेराव, अवघ्या १६ वर्षाचा तरुण..... एकुलता एक मुलगा... दोन बहिणींचा लाडका भाऊ... त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केलीये. त्याच्या आत्महत्याचे कारण ऐकून कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. मोबाईलमध्ये ऑनलाईन गेम खेळत असतांना त्यात तो १२०० रुपये हरला होता. त्यातून निर्माण झालेल्या तणावातून त्याने आपली जीवन यात्रा संपवलीये.... यामुळे भालेराव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे... अवघ्या सोळा वर्षाच्या मुलांना आत्महत्या केल्याने संपूर्ण कुटुंबच उध्वस्त झाल...
माझा मुलगा नेहमी मोबाईल मध्ये गुंतून असायचा तासनतास फोन मध्ये असायचा... असं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं... आणि त्याने ऑनलाइन गेम खेळत असताना पैसे हरले आणि तो मानसिक तणावात केला आणि त्यांनी हे कृत्य केलं असं त्याच्या नातेवाईकने सांगितलं...
बाईट- नातेवाईक
बाईट - सम्राट भालेरावचे नातेवाई ( आज्जी आणि आत्या )
Vio/02
याबाबत उपनगर पोलिसांनी सम्राटच्या मृत्यूप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करत तपास सुरू केलाय. तपास करत असताना सम्राटचा मोबाईलही उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतलाय... तू कुठला ऑनलाईन गेम खेळत होता, आणि या ऑनलाइन गेम खेळत असताना त्याने किती पैसे गुंतवले होते याबाबत पोलीस तपास करत आहे....
बाईट - जयंत शिरसाठ - पोलीस निरीक्षक, उपनगर पोलीस ठाणे
Vio/03
- खरंतर ऑनलाईन गेमच्या नादात अनेकांचा गेम झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यातून नागरिकांनी धडा घेणे गरजेचे असताना आणि सायबर पोलिसांनी ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात अडकू नये असा वारंवार आवाहन केले....मात्र नागरिक त्याला बळी पडतात ही शोकांतिका आहे. त्यामुळे ऑनलाइन गेमिंग च्या जाळ्यात पडू नये असा आवाहनही सायबर पोलिसांकडून करण्यात आलेय....
बाईट - सुभाष ढवळे - पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस
Vio/05
दरम्यान सायबर पोलिसांकडूनही एका बाजूला आवाहन केलं जात असताना दुसऱ्या बाजूला सायबर तज्ञांनी टेक्निकल बाजू मांडल्यात. आपली मुलं काय करतात याकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिलाय... एकविसाव्या शतकात आता पती-पत्नी हे दोघेही नौकरी करतात.... यामुळे मुलांकडे लक्ष केंद्रित होत नाही मात्र यावर देखील टेक्निकल पर्याय तयार करण्यात आला आहे... आपला पाल्य काय करतो आपल्या मोबाईलवर किती वेळ गुंतून असतो यासाठी गुगल वर मेल करून याबद्दल माहिती घेऊ शकतो... यामुळे पाल्यांकडे देखील पालकांचं लक्ष केंद्रित राहतं....
अनेक वेळा नवरा बायको हे
बाईट - भूषण देशमुख - सायबर तज्ञ
Vio/05 -
ऑनलाइन गेमिंग जाळ दिवसेंदिवस वाढत चाललंय, त्यावर नियंत्रण मिळवणं सायबर पोलिसांचं काम आहे, याबरोबरच नागरिकांनीही आपला पाल्य नेमकं काय करतोय यावर लक्ष देण्याची गरज आहे... नाशिकच्या घटनेत नेमकं काय घडलं हे प्रकरण समोर येईलच, मात्र तुम्ही आम्ही सर्वांनीच ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात अडकू नये हीच या निमित्ताने अपेक्षा....
3
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 10, 2025 11:34:08Yavatmal, Maharashtra:
AVB
गल्लीत आणि दिल्लीत तुमचं सरकार आहे, तर मग केंद्र सरकारकडून पैसे आणा आणि शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करा. शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करा त्यांचा सातबारा कोरा करा अशा शब्दात मनसे नेते बाळा नांदगावंकर यांनी सरकारला धारेवर धरले. नांदगावकर यांनी यवतमाळच्या लाखखिंड येथे असलेल्या बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेत सहभागी होऊन मनसेचा पाठिंबा दर्शविला. सरकारकडे पैसे नाहीत तर मग घोषणा करता कशाला, साडेनऊ कोटीचे कर्ज राज्यावर आहे. असेही नांदगावंकर यांनी सुनावले.
बाईट : बाळा नांदगावकर : मनसे नेते
3
Share
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 10, 2025 11:32:28Latur, Maharashtra:
PKG...
स्किप्ट ::- आमदार गायकवाडांचा बैल 'मारका'? लातूर जिल्ह्यात त्या बैलाचीच चर्चे...
AC ::- शेतकऱ्याच्या मदतीसाठी पुढे आलेल्या बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या ‘बैलजोडी’ची सध्या लातूर जिल्ह्यात मोठीच चर्चा आहे. कारण – मदत म्हणून मिळालेल्या बैलजोडीतील एक बैल शेतकऱ्याच्या अंगावर धावून येत आहे. शेतकरी जवळ गेला, तर बैल पाय मागे घेतो, डोळे वटारतो आणि शिंगं हलवतो... जणू काही समोरच्या व्यक्तीलाच आव्हान देतोय. त्यामुळे या बैलाला सांभाळण्यासाठी तिन माणसं लागत आहेत....
V001 ::- बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी नुकतेच लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथील वृद्ध शेतकरी अंबादास पवार यांना मदतीचा हात पुढे करत एक बैलजोडी भेट दिली.
हे तेच अंबादास पवार ज्यांचा स्वतःच्या खांद्यावर औत ओढतानाचा व्हिडिओ समोर आला आणि जनतेच्या मनात खदखद निर्माण झाली होती. बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी मोठ्या भावना व्यक्त करत शेतकऱ्याच्या बांधावर बैलजोडी सुपूर्द केली. मात्र, त्यातील एक बैल मात्र शेतकऱ्यालाच जवळ येऊ देत नाही. त्याच्याकडे गेलं की बैल आक्रमक पवित्रा घेतो आणि अंगावर धावून यायच्या तयारीत दिसतो. त्याला सांभाळण्यासाठी आता अंबादास पवार यांना तिन दोन माणसं ठेवावे लागलेत.
बाईट ::- चंद्रकांत पवार ( अंबादास पवार यांचे भाऊ )
VO 02 ::- दरम्यान, अभिनेता सोनू सूद यांनी देखील पवार यांच्या बँक खात्यावर थेट ४५ हजार रुपये जमा केल्याचं समोर आलं. त्यावर गावात थेट मिश्कील चर्चा सुरू झाली. बरं झालं सोनूनं बैल न पाठवता पैसे दिले… नाहीतर तोही बैल ‘मारका’ निघाला असता तर ?...
बाईट ::- नागरीक
VO End ::- एकीकडे मदतीचा हेतू कौतुकास्पद असला, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या अडचणीत भर पडल्याचं चित्र दिसत आहे. बैलजोडी मिळाली खरी… पण आता शेतकऱ्याला शेतात कामापेक्षा बैल संभाळण्यातच दिवसभर घालावा लागतो.शेतकऱ्याला मदत करताना भावना कितीही मोठ्या असल्या, तरी मदत ‘उपयोगी’ ठरावी लागते.
नसता – ती फक्त फोटोपुरती उरते... किंवा मग, मारक्या बैलासारखी 'ओझ' बनते !
..............................
वैभव बालकुंदे
ZEE मिडिया लातूर
0
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 10, 2025 11:30:31Kalyan, Maharashtra:
पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाकडून आमदार राजेश मोरे यांची पलावा ब्रिज ची पाहणे..
विरोधकाच्या ठीकेनंतर शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी आज कार्यकर्त्यांसोबत केली मला ब्रिजची पाहणी..
कल्याण शीळ रोडवरील पलावा पुलाची पाहणी करत शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांचा ठाकरे गट ,मनसेसह विरोधकाना टोला
लोकांच्या सोयीसाठी पूल सुरू केला ..
टीका करणार्यांना टीका करू द्या आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देणार
पलावा पुलाची पाहणी केली ..
वाहतूक सुरळीत झाली पाहिजे यासाठी पुलाची पाहणी
या पाहणीदरम्यान पुलावर स्टोन क्रेशर टाकण्यात आले होते त्यात पाऊस पडल्याने खड्डे पडल्यासारखे दिसत होते मात्र प्रत्यक्षात खड्डे पडलेच नव्हते
टीकाकारांचे काम टीका करण्याचे आहे आमचं कामविकास कामे करण्याचे आहे ..टीका करणार्यांना टीका करू द्या आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देणार
पुलावर खड्डे नाही ..अपघात झाल्याची कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये नोंद नाही
विरोधकानी खोटेनाटे पसरवले होते ..त्यामुळे टीका काराकडे आम्ही लक्ष देत नाही
पुलाचे उदघाटन झाले नाही आम्ही लोकांच्या सेवेसाठी पूल खुला केला
Byte - राजेश मोरे ( आमदार शिवसेना शिंदे गट)
1
Share
Report
SKShubham Koli
FollowJul 10, 2025 11:09:57Thane, Maharashtra:
गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळावर केले अभिवादन
विचारे यांचे राजकीय गुरु आनंद दिघे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त विचारे यांनी केले अभिवादन
4
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 10, 2025 11:07:38Parbhani, Maharashtra:
अँकर- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सरकारने कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी आज रिपब्लिकन पार्टीच्या वतीने औंढा नागनाथ तहसिल समोर आसूड आंदोलन करण्यात आले. पिक विमा निकषांमध्ये सरकारने केलेले बदल तातडीने रद्द करून 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. जर वेळीच ह्या मागण्या पूर्ण न केल्यास सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा ईशारा आंदोलकांकडून देण्यात आलाय....
बाईट- किरण घोंगडे- प्रदेशाध्यक्ष,युवा रिपब्लिकन पार्टी
2
Share
Report