Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

ठाणे महापालिकेला ₹१०.२० कोटींचा दंड, पर्यावरणीय नुकसानाची कहाणी!

SKShubham Koli
Jul 15, 2025 04:04:51
Thane, Maharashtra
दिवा डम्पिंग ग्राउंडवरील बेकायदेशीर कचरा टाकण्यामुळे झालेल्या पर्यावरणीय नुकसानीमुळे ठाणे महापालिकेला राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ₹१०.२० कोटींचा दंड ठोठावला आहे. २०१६ ते २०२३ दरम्यान सातत्याने नियमभंग झाल्याने जैवविविधता, खारफुटी, भूजल व आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. वनशक्ती फाउंडेशन, रोहिदास मुंडे व स्थानिक नागरिकांनी सातत्याने लढा दिल्यानंतर ही कारवाई झाली. "Polluter Pays Principle" वर आधारित हा निर्णय आहे. मुंडे यांनी महापालिकेच्या निष्क्रियतेवरही टीका करत पुनर्वसन, आरोग्य तपासणी शिबिरे व प्रशासनाची जबाबदारी निश्चित करण्याची गरज व्यक्त केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष नागरिकांसोबत खंबीरपणे उभा आहे.
1
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top