Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

रवींद्र चव्हाण यांचे सांगलीत जंगी स्वागत, भाजपाने केला भव्य सत्कार!

SMSarfaraj Musa
Aug 11, 2025 11:02:04
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे सांगली भाजपाच्या वतीने जंगी स्वागत व सत्कार... अँकर - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सांगली जिल्हा भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्या नंतर पहिल्यांदा सांगली जिल्ह्यामध्ये रवींद्र चव्हाण येत असल्याने, भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पेठ नाका येथे सांगली जिल्हा भाजपाच्यावतीने क्रेनच्या माध्यमातून पुष्पहार अर्पण करत जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा नेते देखील उपस्थित होते.
14
comment
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Aug 12, 2025 03:03:44
Yavatmal, Maharashtra:
Anchor : विधान मंडळाच्या रोजगार हमी योजना समितीचा राज्यातील पहिला दौरा आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेत यवतमाळ जिल्ह्यात होत आहे, या योजनेचा पैसा नेत्यांच्या खिशातील नसून तो सर्वसामान्य जनतेचा आहे, त्यामुळे जॉब कार्ड धारक शेतकऱ्यांनी व लाभार्थ्यांनी यंत्रणेकडून अडवणूक होत असल्यास कुठल्याही दबावाला न घाबरता थेट समिती पुढे यावे असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले. योजनेतील 95-5 (पंच्यान्नव पाच) च्या कामांमध्ये गुणवत्तेत शंका आल्याने त्याचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याच्या सूचना समितीने दिल्या. रेशीम उद्योगासाठी उभारण्यात येणाऱ्या शेड साठी एक लाख रुपये अधिकचे शासनाकडून देण्या बाबत देखील विचार करण्यात येईल असेही आमदार शेळके यांनी सांगितले. बाईट सुनील शेळके अध्यक्ष रोहयो समिती
0
comment
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 12, 2025 03:03:25
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - इंजिनिअरिंगच्या तरुणांन चोरल्या आठ दुचाकी, अवघ्या 22 वर्षीय चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - इंजिनिअरिंगच्या तरुणांन चोरल्या आठ दुचाकी - दुचाकीचे सुटे पार्ट करून भंगारवाल्याला विकण्याचा सुरू होता गोरख धंदा - साहिल महेबूब शहापुरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून हा संशयीत चोर अवघ्या 22 वर्षांचा आहे - सदर आरोपीला एकूण सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत बाईट - विजय कबाडे ( पोलीस उपायुक्त, सोलापूर शहर )
0
comment
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 12, 2025 03:03:15
Hingoli, Maharashtra:
अँकर- ईसापूर धरण जवळपास 94 टक्के भरल्याने हिंगोली यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यातील 1 लाख 10 हेक्टरवरील सिंचन क्षेत्राचा प्रश्न मिटलाय. धरणाच्या वरच्या भागातून येणारा येवा बघता प्रकल्प व्यवस्थापणाने तीन ईसापूर धरणाच्या तीन गेट प्रत्येकी 20 सेंटीमीटरने उघडले आहेत,यामधून गेट मधून पैनगंगा नदी पात्रात 1975 क्यूसेक्स ने विसर्ग सुरू आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आलाय...
0
comment
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 12, 2025 03:03:03
Bhandara, Maharashtra:
भंडाऱ्याच्या लाखनी येथे काढण्यात आली वृक्षदिंडी..... भक्ती भावाच्या मार्गाने केली पर्यावरण जनजागृती.... ANCHOR :- भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे वृक्षदिंडीच्या माध्यमातून भक्तीभावात पर्यावरण जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. दिंडीत सहभागी झालेल्या लहानग्यांनी विठुरायाची वेशभूषा परिधान करून आकर्षण ठरले. हातात टाळ आणि भगवे ध्वज घेऊन मोठ्या संख्येने नागरिकांनी या दिंडीत सहभाग नोंदविला. "वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. भक्तीगीतांच्या गजरात निसर्ग संवर्धनाचा संदेश देत दिंडी लाखनी येथील मुख्य मार्गाने फिरली. श्रद्धा व पर्यावरणप्रेम यांचा संगम साधत आयोजित या उपक्रमास स्थानिक नागरिक, सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व जनमानसात पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.
0
comment
Report
VKVISHAL KAROLE
Aug 12, 2025 03:02:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn jayakwadi av Feed attached जायकवाडी धरण  सध्या ९२ टक्क्यांपर्यंत भरले आहे. धरण बांधल्यापासून आतापर्यंतच्या ४९ वर्षाच्या कालावधीत प्रकल्पात सुमारे १० टक्क्यांपर्यंत गाळ साचला आहे. साचलेल्या गाळामुळे प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ९२ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. मराठवाड्याच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उद्योगांना याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. ३५ हजार हेक्टरवर हा प्रकल्प पसरलेला आहे. मागील ४९ वर्षाच्या कालावधीत प्रकल्पातील गाळाचे सर्वेक्षण १९९६ आणि २०१२ मध्ये असे दोन वेळा नाशिकच्या मेरी संस्थेतर्फे करण्यात आले होते. या सर्वेक्षणाच्या २०१४च्या अहवालानुसार प्रकल्पांतील जिवंत साठ्याच्या 9 टक्के गाळ आहे. मागील ११ वर्षात आणखी गाळाचे सर्वेक्षण करण्यात आले नाही. या कालावधीत गाळ वाढला आहे. या गाळाने प्रकल्पाची साठवण क्षमता १०२ टीएमसीवरून ९२ टीएमसीपर्यंत कमी झाली आहे.
0
comment
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 12, 2025 03:01:40
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- गणेश मूर्ती कलाकार लगबग आढावा फीड 2C Anc:- राज्यात सर्वत्र गणेश मंडळाची लगबग सुरू झाली आहे गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवला आहे अशात गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कलाकारांची ही धावपळ सुरू झाली आहे तयार केलेल्या गणेश मूर्तींना फायनल हात आणि फिनिशिंग देण्याचे काम गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये युद्ध पातळीवर सुरू आहे दरवर्षी नवनवीन गणेशमूर्तींचे ट्रेन्डस पाहायला मिळतात अहिल्यानगर येथील गणेश मूर्ती कारखान्यामध्ये मूर्तिकारांच्या मूर्ती बनवण्याच्या लगबगीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी Wkt with Bite:- लैलेश
0
comment
Report
SGSagar Gaikwad
Aug 12, 2025 03:00:57
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_prabhag_rachna 39 प्रभागांसाठी प्रारूप रचना राज्य शासनाकडून निवडणूक आयोगाकडे अँकर आगामी मनपा निवडणुकीसाठी नाशिकच्या ३१ प्रभागांकरता राज्य शासनाला सादर केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर नगरविकास खात्याने अंतिम हात फिरवून राज्य निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठविला आहे. आता हा प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा येत्या २२ ऑगस्टला प्रसिद्ध केला जाणार आहे. २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत या प्रभागरचनेवर हरकती व सूचना मांडता येणार असून ऑक्टोबरला अंतिम प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे. ओबीसी आरक्षण आणि प्रभागरचनेसंदर्भातील याचिकांवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग खुला केला आहे. चार् चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाला फेर प्रभागरचनेचे निर्देश दिले.  महापालिकांना चार सदस्यीय या प्रमाणे २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे १२२ सदस्यसंख्या असलेले चार सदस्यीय २९ व तीन सदस्यीय दोन असे एकूण ३१ प्रभागांची प्रारूप रचना तयार केली आहे. नवीन प्रभाग रचना कशी करायची याबाबत स्पष्ट सूचना नसल्यामुळे यापूर्वी विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन पुन्हा सीमा निश्चिती, महामार्ग तसेच रस्त्यांच्या सीमा, तसेच अन्य हरकतींची तपासणी केली. त्यानुसार ३१ प्रभागांची प्रारूप प्रारूप रचना रचना बंद लिफाफ्यात महापालिकेने ५ ऑगस्ट रोजी राज्य शासनाला सादर केली होती...
0
comment
Report
VKVISHAL KAROLE
Aug 12, 2025 03:00:48
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn mahapalika tax av Feed attached छत्रपती संभाजीनगर मध्ये मालमत्ता करावरील ९५ टक्के व्याजमाफीची योजना मनपाने १५ जुलैपासून सुरू केली. ११ ऑगस्टपर्यंत २७ हजार मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेत महापालिकेत ४६ कोटी ८७ लाख रुपये भरले. ७ कोटी ५९ लाख रुपयांची व्याजमाफी मालमत्ताधारकांनी मिळविली. १६ ऑगस्टनंतर एक महिनाभर ७५ टक्के व्याजमाफी मिळेल. मालमत्ता कराच्या थकबाकीवर महापालिका २४ टक्के चक्रवाढ पद्धतीने व्याजाची आकारणी करते. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत कर भरला तर व्याज आकारणी होत नाही. शहरात ३ लाखांहून अधिक मालमत्ता मनपाच्या रेकॉर्डवर आहेत. त्यातील ६० टक्के मालमत्ताधारक दरवर्षी कर भरत नाहीत. १०० टक्के दरवर्षी मालमत्ता कराची वसुली झाल्यास मनपाला किमान ५०० कोटी रुपये मिळतील. प्रत्यक्षात १७० ते १७५ कोटी रुपये मिळतात.
0
comment
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 12, 2025 02:46:49
Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांची गर्दी पहाटे 3.30 वाजल्यापासून श्रींचं दर्शन सुरू त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची गणपतीपुळेत मोठी गर्दी दर्शनासाठी मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था नारळबागेत 37 दर्शन रांगा, पार्किंग परिसरात 9 रांगा आणि मंदिर व रेस्ट हाऊसच्या मधल्या भागात 3 रांगा अशा पद्धतीने भाविकांना दर्शनासाठी व्यवस्था रात्री 10.30 पर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार दिवसभरात 50 ते 60 हजार भाविक येण्याची शक्यता
6
comment
Report
AKAMAR KANE
Aug 12, 2025 02:46:40
Nagpur, Maharashtra:
आमदार संदीप जोशी यांच्या माध्यमातून तुमच्या पत्नीला लावून देतो असे सांगून तब्बल साडे चार लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध खुद्द आमदारांनीच पोलिसात तक्रार केली आहे. अभय घोडवैद्य, रा. आदर्श नगर, दिघोरी असे त्या भामट्या तरुणाचे नाव आहे. तर फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव नीलेश खोडतकर असे आहे. खोडतकर यांच्या पत्नीला नोकरी लावून देण्याचे आश्वासन घोदवैद्य याने दिले होते. आमदार संदीप जोशी यांच्याशी आपले सलोख्याचे संबंध असल्याचे भासवून खोडतकर यांच्याकडून घोडवैद्य ने साडे चार लाख रुपये घेतले. मात्र, नोकरी न लावता दिलेले पैसेही परत केले नाहीत. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, ही रक्कम रोख स्वरूपात दिली होती. पैसे परत करण्यासाठी वारंवार मागणी करूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. अखेर नीलेश यांनी थेट आमदार संदीप जोशी यांच्याकडे तक्रार केल्यावर हा गंभीर प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने याप्रकारची दखल घेत यासंदर्भात गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तांकडे तक्रार केली. यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना आमदार संदीप जोशी यांनी दिल्या आहेत.
2
comment
Report
SGSagar Gaikwad
Aug 12, 2025 02:46:31
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_tadipari गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून तब्बल ८७ गुन्हेगारांवर तडीपारी अँकर गणेशोत्सवात कायदा, सुव्यवस्था आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिस यंत्रणेकडून प्रभावी नियोजन सुरुकेलंय...नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ १ मधील ७ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ४२ आणि परिमंडळ २ मधील ६ पोलिस ठाण्यात रेकॉर्डवरील ५२ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात येणार आहे. गेल्या उत्सवात ८७ गुन्हेगारांवर तडिपारीची कारवाई केली गेली होती. परिमंडळ १ मधील पंचवटी, आडगाव, म्हसरुळ, सरकारवाडा, मुंबईनाका, भद्रकाली, गंगापूर या ७पोलिस ठाण्यात रेकॉर्डवरील ४२ तर परिमंडळ २ मधील नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प, अंबड, इंदिरानगर, सातपूर पोलिस ठाण्यांतील ५२ गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. परिमंडळ कार्यालयाकडून त्यांना नोटीस बजावली असून उपआयुक्त मोनिका राऊत, किशोर काळे यांच्या कार्यालयाकडून लवकरच तडिपारीची कारवाई होणार आहे...
0
comment
Report
VKVISHAL KAROLE
Aug 12, 2025 02:46:25
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn firing av Feed attached छत्रपती संभाजी नगरात सराईत गुन्हेगार सय्यद फैजल ऊर्फ तेजाने आपल्या मैत्रिणीवर गोळी झाडली. गोळी तिच्या हाताला लागल्याने ती जखमी झाली. ही घटना शहरातील किलेअर्क परिसरात घडली,  सय्यद फैजल रात्री १२ वाजेच्या सुमारास  तिथे गेलेला, राखी मुरमरे असे जखमी मैत्रिणीचे नाव आहे. तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले आणि त्यांनी आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे तेजा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर बलात्कार, चोरी, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एमपीडीएनुसारही कारवाई झाली होती. तो सुरुवातीला भुरट्या चोऱ्या करायचा. नंतर तो काही सराईतांच्या संपर्कात आला अन् गंभीर गुन्हे करू लागला. २०२१ मध्ये त्याच्या अल्पवयीन मैत्रिणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्याने तिला चाकूने भोसकल्याचीही नोंद आहे. एप्रिलमध्ये त्याने टीव्ही सेंटर चौकात भरदिवसा एका रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला केला होता. दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी त्याला अटक करून त्याच ठिकाणी त्याची धिंड काढली होती. मेमध्ये त्याच्या सासुरवाडीत ड्रग्जचा गोरखधंदा सुरू असल्याचे अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई केलेली...
0
comment
Report
VKVISHAL KAROLE
Aug 12, 2025 02:45:09
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn zoo lion av Feed attached देशातील अनेक प्राणिसंग्रहालयांत सिद्धार्थ उद्यानातील वाघ गेले आहेत. आता तीन वाघ कर्नाटकच्या शिवमोगा प्राणिसंग्रहालयाला देऊन त्याबदल्यात तेथील सिंह, अस्वल आणि कोल्ह्यांची जोडी महापालिका आणणार आहे. त्यानुसार शिवमोगा प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन वाघांची पाहणी केली. प्राणिसंग्रहालयात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्राण्यांची संख्या वाढवली जात आहे. प्राणिसंग्रहालयात यापूर्वी सिंहांची जोडी होती. मात्र, १५ वर्षांपूर्वी उद्यानातील शेवटची मादी सिंह  मरण पावली. तेव्हापासून उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयाला सिंहांची जोडी मिळू शकली नाही. सिंह नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत होता. प्राणिसंग्रहालयात सिंह नसले तरी सध्या ७ पिवळ्या पट्ट्याचे वाघ आणि ५ पांढरे वाघ आहेत. वाघांची संख्या अतिरिक्त असल्याने तीन वाघ देऊन त्याबदल्यात सिंह घेण्यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालयाच्या परवानगीने महापालिकेने कर्नाटकातील शिवमोगा प्राणिसंग्रहालयासोबत पत्रव्यवहार सुरू केला होता.
0
comment
Report
SGSagar Gaikwad
Aug 12, 2025 02:32:05
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_marhan_cctv अंबड परिसरात टवाळखोरांची दहशत...दुकानात शिरुन दुकानदाराला मारहाण... घटना cctv मध्ये कैद... अँकर नाशिकच्या सिडको परिसरात असलेल्या सदर पारस कलेक्शन नावाच्या दुकानांमध्ये परिसरात असलेल्या मद्यप्राशन केलेल्या टवाळखोर दुकानदारासह कर्मचाऱ्याला जबर मारहाण केलाचा धक्कादायक प्रकार घडलाय... हे चार-पाच संशयित मद्यप्राशन केल्या असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आला आहे... मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे...मात्र यामुळे परिसरात एकच घबराट निर्माण झाले असून या टवाळखोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे....  याबाबत अंबड पोलिसांनी दोन ते तीन जणांना ताब्यात घेतला असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे... जुन्या वादातून हा प्रकार घडलेल्या असल्याचं पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.... मात्र या घडलेल्या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाला आहे....गेल्या अनेक दिवसांपासून सिडको परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असताना पाहायला मिळत आहे...
4
comment
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 12, 2025 02:17:26
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1208ZT_JALNA_RAJUR(8 FILES) जालना : अंगारकी चतुर्थी, राजूरमध्ये दर्शनासाठी गर्दी अँकर : तब्बल दीड वर्षानंतर अंगारकी चतुर्थी आल्यानं गणेश भक्तांनी जालन्यातील राजूरमध्ये दर्शनासाठी गर्दी केली आहे.राजूरमध्ये आज लाखो गणेश भक्त दर्शन घेण्याची शक्यता आहे.काल रात्री पासून राजूरमध्ये भविकांची गर्दी झालीय.त्यामुळे पोलिसांनी वाहतुकीत बदल करत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. बाईट :संजय अहिरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक, हसनाबाद पोलीस ठाणे
10
comment
Report
Advertisement
Back to top