Back
परभणीतील वृद्धाच्या अंत्यसंस्कारासाठी रस्त्याची भयानक कमतरता!
Parbhani, Maharashtra
अँकर- परभणी तालुक्यातील पोरवड येथे मृत्यूनंतर ही एका वृद्ध व्यक्तीला मरण यातना सहन कराव्या लागल्यात. स्मशानात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अंत्यसंकार दिवसभर ताटकळल्याची घटना घडलीय. पोरवड येथे लक्ष्मण रामचंद्र घाडगे या ९० वर्षीय वृद्ध व्यक्तीचे अल्पशा आजाराने निधन झाले. परंपरागत रस्त्यावर गावातील शेतकऱ्यांनी नाला खोडल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशान भूमीत जायला रस्ताच शिल्लक राहिला नसल्याने आता अंत्यसंस्कार करायचे कुठे का प्रश्न निर्माण झाला होता. सकाळी 7 वाजता पासून ते सायंकाळ पर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सगळेचजण ताटकळले होते. त्यामुळे कुटुंबियांनी कुणाशी ही वाद न घालता ग्रामपंचायत कार्यलयासमोरच सरण रचून अग्निडाक देण्याचा निर्णय घेतला. अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. येथील सरपंचाने या प्रश्ना बाबत परभणी तहसीलदारांना रस्ता खुला करून देण्याची अनेकदा मागणी केली आहे. 2012 पासून ह प्रश्न प्रलंबित आहे. यावर हा रस्ता खुला करण्याविषयी दोन वेळा तहसीलदार परभणी यांनी आदेश काढला होता. परंतु पोलीस प्रशासनाने बंदोबस्त न दिल्यामुळे हा रस्ता आत्तापर्यंत मोकळा करण्यात आलेला नाही. गावामध्ये कुणाचं निधन झाल्यावर हा जटिल प्रश्न डोकं वर काढत असतो. सायंकाळी उशिरा दैठणा पोलीसांनी या प्रकरणात मध्यस्ती करून इतर शेतकऱ्यांच्या शेतातील पेरलेल्या पिकातून रस्ता देण्याची विंनती केली, एका महिन्यात स्मशानभूमीचा रस्ता खुला करण्याचे आश्वासन दिले. अखेर सायंकाळी साडेपाच वाजता या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परभणी तहसीलदारांनी दोन वेळेस हा रस्ता खुला करण्याचे लेखी आदेश दिले होते, परंतु विभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांनी पोलीस बंदोबस्त देऊ शकत नाही कोर्टात जा असे सांगितल्याचे गावकरी सांगतायेत,त्यामुळे हा सामाजिक प्रश्न अधिकच जटिल होत चाललाय,एकीकडे आपण विकासाच्या गप्पा मारत असतांना आज ही ग्रामीण भागातील अनेक गावात कुठे स्मशानभूमीच नाही म्हणून तर कुठे स्मशानात जायला रस्ताच नसल्याने अनेकांना मृत्यू नंतर ही हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असतात.
बाईट- शेख नूरबी शेख सालार- ग्रामस्थ
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement