Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

परभणी-पिंगळी महामार्गावर भीषण अपघात: दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी!

GDGAJANAN DESHMUKH
Jul 24, 2025 02:00:10
Parbhani, Maharashtra
परभणी-पिंगळी महामार्गावरील शेंद्रा पाटीजवळ रात्री ट्रक आणि ऑटोचा भीषण अपघात झाला. यामध्ये दोघे जण ठार तर तिघे जण गंभीर जखमी झालेत. परभणी येथून पिंगळीकडे जाणारा ऑटो आणि ताडकळस येथून परभणीकडे येणाऱ्या ट्रकमध्ये धडक झाली. ही धडक इतकी जोराची होती,की ऑटो दुर रस्त्याच्या कडेला फेकला गेला. यात ऑटोमधील दोघे जण ठार झाले, तर तिघे जखमी झाले आहेत. घटनास्थळी शेंद्रा, बलसा आणि पिंगळी परिसरातील ग्रामस्थ, वाहनधारक मदतीसाठी दाखल झाले होते. अपघातात मयत झालेल्या दोघांपैकी हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील बोथी गावच्या 21 वर्षीय करण माहोरेचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. करण माहोरे हा परभणीच्या इंदिरा गांधी कॉलेजमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत होता. पिंगळी येथे बहिणीला भेटण्यासाठी ऑटोने जाताना झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झालाय. घटनेतील अन्य एका मयताची ओळख पटली नाहीये. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HPHARSHAD PATIL
Jul 25, 2025 11:51:09
Palghar, Maharashtra:
पालघर - पालघर जिल्ह्यात उद्या पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने दिला आहे . त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील अंगणवाडी , शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे खबरदारी घेत जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी हा आदेश काढला आहे . जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज तर उद्या रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही भागात आज पावसाची संततधार सुरू आहे.
1
Report
TTTUSHAR TAPASE
Jul 25, 2025 11:34:04
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -SAT_KARAD_ANDOLAN सातारा - शासनाकडून जलजीवन मिशन कामातील पैसे न मिळाल्याने ठेकेदार हर्षल पाटील याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेच्या विरोधात कराड येथील ठेकेदारांनी भर पावसात शासनाचा निषेध करत हर्षल पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच 90 हजार कोटीची जलजीवन मिशनची बिले ठेकेदारना मिळावी, यासाठीचे निवेदन कराड पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच जलजीवनची बिले न मिळाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा ठेकेदारांनी शासनाला दिला आहे. बाईट:- जगदीश पाटील, ठेकेदार
6
Report
JMJAVED MULANI
Jul 25, 2025 11:33:19
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 2507ZT_BARAMTICHKNKR BYTE 1 बारामती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर भाषण पॉइंटर बारामती रक्तदान शिबिर* https://www.facebook.com/share/v/1LCQzFBM1i/ *बारामती मधील रिक्रेशन हॉल या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भेट दिली आहे यावेळी मार्गदर्शन करत होत्या* मागील दोन वर्षांपूर्वी देखील मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. चांगले मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहतात त्याचे सर्व श्रेय उपमुख्यमंत्री यांचे सीबीएस सहाय्यक मुसळे यांच आहे. गेल्या पंधरा दिवसापासून राज्यात अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संघटना कार्यक्रम घेत आहेत. 2500 ते 3000 हजार रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करणार आहेत महाराष्ट्रातील सर्वात भव्य दिव्य ही रक्तदान शिबिर आहे. मागील वेळी मी कोरोना कालावधीत आले होते त्यावेळी जमावबंदी होती. त्यावेळी महाराष्ट्रात कोणताच कार्यक्रम होत नव्हता त्यावेळी बारामतीत रक्तदानाचा कार्यक्रम झाला होता. *दादांनी महाराष्ट्राचा राजकारणात एक वेगळे निर्माण केलं* *ज्यावेळी मी कोणाचा महाराष्ट्रात प्रचार करायला जातो त्यांनी तो उमेदवार तिथे मतदारांना शब्द देतो की तुम्ही मला मतदान करा मी आपल्या मतदारसंघाचे बारामती करून दाखवेल* बारामतीकर नशीबवान आहेत, शैक्षणिक औद्योगिक सर्व क्षेत्रात दादांनी योगदान दिले आहे. बारामती बरोबर महाराष्ट्राचं नाव उज्वल होत आहे. दादांनी अर्थमंत्री म्हणून अतिशय उत्तम अर्थसंकल्प मांडला. *दादांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा विरोधकांचे चेहरे पाहण्यालायक झाले होते, विरोधकांनी पहिल्या दिवसापासूनच टीका करायला सुरू केली होती ही योजना फसवी आहे निवडणुकीचा जुमला आहे. विरोधक एवढ्यावर थांबले नाहीत तर ते कोर्टात गेले.* *विरोधक टीका करत होते मात्र त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही आम्हाला मतदान करा आम्ही तुम्हाला तीन हजार रुपये प्रति महिना देऊ असं छापलं याचा अर्थ आमची योजना बरोबर होती.* *ही योजना फसवी आहे असं म्हणत होते पण आपापल्या मतदारसंघात लाडक्या बहीण योजनेचे बॅनर लावत होते.* *माध्यमांसमोर दुतोंडी भूमिका घेणारे विरोधक आपल्या मतदारसंघात लाडक्या बहिणी योजनेचे बॅनर लावत होते हे मतदारांना सुद्धा कळत होतं.* *गेले वर्षभर झालं ही योजना आज बंद उद्या बंद परवा बंद होईल अशी त्यांना स्वप्न पडतात आणि माध्यमांसमोर बोलतात की ही योजना बंद होईल. मला स्पष्टपणे सांगायचं आहे ही योजना दुसरी कोणी चालू केली असती तर बंद पडली असती ही योजना अजित दादांनी चालू केली आहे त्यामुळे ती बंद पडणार नाही* निवडणुकीत विरोधकांनी कितीही अमिष दाखवली तरी त्यांना अजित पवारांनी आपल्याला शब्द दिला आहे हे मतदारांना माहीत होतं ते शब्द पाळणारे आहेत. *लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही* दीड हजार रुपये प्रति महिना महिलांना देणार सन्मानाने देणार हे सरकार आहे. यामध्ये सरकारने पैसे आजपर्यंतची अशी कोणतीही योजना नाही की सरकारने पैसे दिल्यावर थेट महिलांच्या खात्यात जमा होतात. अतिशय पारदर्शकपणे ही योजना राबवली जाते. *दिलेला शब्द पाळणारे अजित दादा आमच्या महिन्याभगिनींच्या पाठीमागे दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करतात* *येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लाडक्या बहिणी महायुती सरकारच्या ठामपणे उभा राहतील आणि ग्रामपंचायत पासून सर्वच निवडणुकात मोठे यश मिळेल* सर्व मंत्री गण आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. *लोकसभा विधानसभेच्या अर्थात नेत्यांच्या निवडणुका झाल्या आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत* एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवणे हे रक्तदात्याचे काम असतो ते आपण पूर्ण करत आहात. *येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक घरात घड्याळाची टिकटिक आणि घड्याळाचा झेंडा फडकवा असा संकल्प करूया* रक्तदान करताना रक्तदाता जात धर्म पाहत नाही. रक्ताचा रंग लाल आहे, आमच्या महिलांच्या गर्भाचा रंग लाल आहे, सृजनतेचा हा लाल रंग आहे. दादांनी कायम सर्व समानतेची भूमिका घेतली. मंत्रिमंडळ स्थान देताना अजित दादांनी सर्वांना जाती-धर्माना सोबत घेतला आहे. *येणाऱ्या काळात बारामतीकरांचे स्वप्न आहे दादांनी मुख्यमंत्री व्हाव पण तुमच्या इतकीच महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्याचे ते स्वप्न आहे सर्व कार्यकर्त्यांच्या आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, केवळ घोषणा देऊन ते स्वप्न पूर्ण होणार नाही कार्यकर्ता म्हणून आपल्याला जबाबदारी निभवावी लागेल.* बारामतीकरांचा पंढरीचा विठुराया हा बारामती मध्येच राहतोय.
5
Report
SKSACHIN KASABE
Jul 25, 2025 11:33:07
Pandharpur, Maharashtra:
25072025 Slug - PPR_CITIZEN_MEETING feed on 2c file 01 ---- Anchor:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉर बाबतचा आराखडा आज शासनाने नागरिकांना दाखवला आहे. यामध्ये मंदिर परिसरातील जागेवर काशी आणि उज्जैनच्या धरतीवर कॉरिडॉर होईल. यामध्ये प्रत्यक्षात 48 हजार चौरस मीटर जागेचे भूसंपादन होणार आहे. यासाठी बाधित नागरिकांशी प्रशासनाने चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. यामध्ये नागरिकांनी भूसंपादनाला थेट विरोध दर्शवला आहे. असे जरी असले तरी नागरिकांशी चर्चेतून मार्ग काढण्याचा विश्वास प्रशासन व्यक्त करते आहे. तर ऑगस्ट महिन्यात कॉरिडॉर बाबत प्रत्यक्ष गॅझेट नोटिफिकेशन निघणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये निवासी मालमत्तांना 20 हजार तर कमर्शियल मालमत्तांना 40 हजार रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे दर मिळू शकतो. असा सूर या बैठकीतून पुढे आला.
8
Report
PPPRAFULLA PAWAR
Jul 25, 2025 11:32:49
Raigad, Maharashtra:
स्लग - रायगडावरील धनगर कुटुंबांना व्यवसाय उपलब्ध करून द्या ...... संभाजीराजे छत्रपती यांची भूमिका ..... नोटिसा बजावल्याबद्दल व्यक्त केलं आश्चर्य ...... अँकर - किल्ले रायगडावर वास्तव्यास असणाऱ्या धनगर कुटुंबांना पुरातत्व विभागाने नोटिसा बजावून गड सोडण्यास सांगितलं आहे. याबाबत युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. ही कुटुंब पिढ्यानपिढ्या तिथं रहात आहेत. त्यांना तिथून हलवण्यापेक्षा त्यांना व्यवसायासाठी स्टॉल उभारून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. बाईट - युवराज संभाजीराजे छत्रपती
4
Report
SMSarfaraj Musa
Jul 25, 2025 11:32:38
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - कंत्राटदारांची थकीत देणे मिळे पर्यंत,राज्यात एकही काम करणार नाही - राज्यातील कंत्राटदारांनी घेतला निर्णय.. अँकर - कंत्राटदार हर्षल पाटील याच्या आत्महत्येनंतर सरकारच्या अडचणीत आता वाढ होणार आहे.कारण राज्यातील कंत्राटदार आक्रमक झाले असुन राज्यातील कंत्राटदारांची थकीत बिले जोपर्यंत मिळत नाही,तोपर्यंत काम बंदा करण्याचा निर्णय कंत्राटदारांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हर्षल पाटील याला श्रद्धांजली वाहण्यासाठी सांगलीमध्ये कंत्राटदार संघटनांच्यावतीने सभेचे आयोजन करण्यात आलं होतं.या वेळी पार पडलेल्या बैठकीमध्ये राज्यातील हजारो कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले शासनाकडून थकित असून राज्यभर परिस्थिती गंभीर असल्याने जोपर्यंत थकीत बिले दिली जात नाहीत,तोपर्यंत राज्यातील सर्व कामे बंद करण्याचा निर्णय सांगलीतील अभियंता आणि कंत्राटदार संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बाईट - बाबा गुंजाटे - राज्य अध्यक्ष - कंत्राटदार आणि अभियंता संघटना.
7
Report
GDGAJANAN DESHMUKH
Jul 25, 2025 11:06:05
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या पाथरी यवथील काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार सुरेश वरपूडकर हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत,सुरेश वरपूडकर यांनी महसूलमंत्री बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्यामुळे वरपूडकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती,आज राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी वरपूडकर लवकरच भाजपात पक्ष प्रवेश करतील अस म्हटलंय. पाथरी मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन हा निर्णय केला जाणार असल्याचे मेघना बोर्डीकर म्हणाल्या... बाईट- मेघना बोर्डीकर- ऊर्जा राज्यमंत्री,महाराष्ट्र
11
Report
PPPRANAV POLEKAR
Jul 25, 2025 11:05:45
Ratnagiri, Maharashtra:
योगेश कदम यांचा सामना वृत्तपत्रावर जोरदार हल्ला; एकनाथ शिंदे यांच्या खेड दौऱ्याची माहिती खेड – सामना सरकार चालवायला लागलं तर अवघड होईल. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांनी आता सामना वाचणे सोडून दिलं आहे,अशा शब्दांत राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सामना वृत्तपत्रावर जोरदार टीका केली आहे. राजकीय अजेंडा रेटण्यासाठीच 'सामना'चा वापर होत असून, त्यांच्या बातम्यांना आपण कोणतेही महत्त्व देत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सावली बार प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. "या प्रकरणी जो निर्णय घ्यायचा आहे, तो मुख्यमंत्री घेतील,असं सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. योगेश कदम पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना सत्तेबाहेर बसवलं आहे, त्यांनी बाहेरून वायफळ चर्चा करायच्या असतील, तर करू द्या. आमच्यासाठी एकनाथ शिंदे हेच प्रायोरिटी आहेत." त्यांनी स्पष्ट केलं की, एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्याबद्दल कोणी चुकीची वक्तव्य केली, तरी आमच्यात फूट पडणार नाही." या पत्रकार परिषदेत योगेश कदम यांनी एक महत्त्वाची घोषणाही केली. २७ जुलै रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमध्ये येणार असून, स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटनासाठी त्यांचा दौरा ठरलेला आहे. "मराठी भाषा जपली पाहिजे, वाढवली पाहिजे. वायफळ वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, पण त्याचा मराठी भाषेवर काहीही परिणाम होणार नाही," असंही ते म्हणाले. अनिल परब यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याबाबत विचारले असता, योगेश कदम यांनी 'वेट अँड वॉच' भूमिका घेतली असून, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं. यापूर्वी, दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीही अनिल परब यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याचे आव्हान दिले होते.
7
Report
PPPRAFULLA PAWAR
Jul 25, 2025 11:05:28
Raigad, Maharashtra:
स्लग - किल्ले रायगडच्या पायथ्याशी लवकरच शिवसृष्टी उभारणार ...... युवराज संभाजी राजे छत्रपती यांची माहिती ....... प्रकल्पासाठी सरकार कडून 50 कोटी रुपये प्राप्त ...... मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील मिळाल्यावर कामाला सुरुवात ....... अँकर - किल्ले रायगडच्या पायथ्याशी लवकरच शिव सृष्टी उभारण्यात येणार असल्याची माहिती रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. 88 एकरावर साकारणाऱ्या या प्रकल्पासाठी मंत्री भरत गोगावले यांच्या प्रयत्नातून 50 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. ज्या गोष्टी रायगडावर करता येत नाहीत त्या या शिवसृष्टीत केल्या जातील. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील मिळाल्यावर या कामाला सुरुवात होईल असं संभाजी राजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं. बाईट - युवराज संभाजी राजे छत्रपती
13
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 25, 2025 11:02:25
Ambernath, Maharashtra:
उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ  कर्जत परिसरात पडत असलेल्या पावसामुळे उल्हास नदीची पाणी पातळी वाढली Bdl rain Anchor कर्जत परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे  बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. हवामान खात्याने रायगड जिल्हा रेड अलर्ट जारी केला आहे . रायगड जिल्ह्यात  काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे उल्हास नदी ही दुथडी भरून वाहत आहे. मात्र बदलापूर परिसरात पावसाचा जोर कमी असल्याने  अजूनही बदलापूर शहरात कुठेही पाणी साचलेल्याच्या घटना  समोर आल्या नाहीत , मात्र पालिका प्रशासनाने उल्हास नदीच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चंद्रशेखर भुयार ,  बदलापूर
10
Report
VKVISHAL KAROLE
Jul 25, 2025 11:01:20
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn girl murder av, wkt Feed by live u छत्रपती संभाजीनगरहुन एक धक्कादायक बातमी आहे, प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून एक तरुणीला तिच्या प्रियकराने  दौलताबाद घाटातुन धक्का देऊन खाली पाडले यात या मुलीचा मृत्यू झाला आहे,  या नंतर या तरुणाने स्वतः शिउर  पोलीस ठाण्यात हजर होत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे... या मुलीचा मृतदेह पोलिसांनी काढला आहे , याबाबत दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतोय.. दीपाली त्रिभुवन  असे मृत महिलेचे नाव घटना स्थळ वरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी...
9
Report
SMSarfaraj Musa
Jul 25, 2025 11:01:14
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग जलजीवन मिशन योजनेपैकी हर्षल पाटलांनी केलेल्या कामांचे 1 कोटी 26 लाख राज्य शासनाकडे थकीत - मुख्य ठेकेदाराचा खुलासा... अँकर - हर्षल पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात मुख्य ठेकेदार असणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी मोठा खुलासा केला आहे.हर्षल पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामांची थकीत रक्कम राज्य शासनाकडे आहे.हर्षल पाटील याला आपल्याकडून तांदूळवाडी आणि मालेवाडी या दोन गावांच्यासाठी जलजीवन मिशन योजनेचा सबलेट देण्यात आलं होतं, ज्यापैकी तांदूळवाडीचे काम पूर्ण होऊन हर्षलला या कामापोटी 1 कोटी 98 कोटींची देयक दिली आहे,उर्वरित 64 लाखांची देयक थकीत आहे,तर मालेवाडीचे कामा पैकी 1 कोटी 57 लाखांची रक्कम अदा केली होतो, ज्यामध्ये 62 लाखांची रक्कम शासनाकडे थकीत असून एकूण 1 कोटी 26 लाख शासनाकडे थकीत असल्याचे मुख्य ठेकेदार असणारया चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले आहे. बाईट - चंद्रकांत पाटील -मुख्य ठेकेदार, जलजीवन मिशन योजना,सांगली.
6
Report
PPPRASHANT PARDESHI
Jul 25, 2025 11:01:04
Dhule, Maharashtra:
ANCHOR - कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शिरपूरात तीव्र आंदोलन करण्यात आले. महिला आंदोलकासह इतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बाबळे येथून खाजगी कार्यक्रमातून चोपड्याकडे न जाता माणिकराव कोकाटे यांनी शिरपूर कडे जाने पसंद केले. या ठिकाणी त्यांनी भाजप आमदार अमरेश पटेल यांची भेट घेण्याच नियोजन होत. मात्र त्याआधीच शिरपूर येथे शिरपूर फाट्यावर प्रहार संघटनेस अन्य पक्षाच्या आंदोलकांनी कोकाटे यांच्या दौऱ्याला विरोध केला. पोलिसांची ही गोष्ट लक्षात आल्यावर, पोलिसांनी आंदोलन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळेस कोकाटे विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर माणिकराव कोकाटे नंदुरबार कडे रवाना झाले. प्रशांत परदेशी, धुळे.
8
Report
GMGANESH MOHALE
Jul 25, 2025 11:00:53
Washim, Maharashtra:
वाशिम: File:2507ZT_WSM_GAME_PARLOR_POLICE_ACTION अँकर : वाशिमच्या मंगरूळपीर शहरातील भगतसिंह चौक व मरीमाता मंदिर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या पथकाने काल रात्री टाकलेल्या धाडीत एकूण १२ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या कारवाईत १९ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा १८८७ मधील कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील मरीमाता मंदिराजवळील टिनशेडवर छापा टाकून ६ लाख ३० हजार ४०० रुपये, तर राजधानी गेस्ट हाऊसमधून ६ लाख १२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.धाडीत जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाईल फोन व इतर साहित्याचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित सर्व १९ जणांना अटक केली असून, मंगरूळपीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई SDPO नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पोलिसांच्या या तत्परतेमुळे शहरात पुन्हा एकदा अवैध जुगार अड्ड्यांवर वचक बसला आहे. बाईट:नवदीप अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी
4
Report
HCHEMANT CHAPUDE
Jul 25, 2025 10:49:08
Chakan, Maharashtra:
Feed 2C Slug: Chakan Medankarwadi File:05 Rep' Hemant Chapude(Chakan) Anc :- औद्योगिक हब म्हणून ओळख असलेल्या चाकण औद्योगिक क्षेत्रातील मेदनकरवाडीत 15 वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना आणि कामगारांना रोजच्या रोज फरपट सहन करावी लागतेय  Vo :- मेदनकरवाडी ग्रामपंचायतीच्या जनजीवन पाणी योजनेंतर्गत काही भागांमध्ये पाणीपुरवठा सुरू असला तरी, अमृतनगरसारख्या भागात अजूनही पाणी मिळत नाही.स्थानिक राजकारणाच्या दबावामुळेच या भागात पाणी सोडले जात नाही, असा थेट आरोप महिलांनी केला असून, "राजकारण करणाऱ्यांनी आमच्या हालच पाहावेत," अशी माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.वर्षानुवर्षे कर भरणाऱ्या नागरिकांना मूलभूत गरजेसाठीही संघर्ष करावा लागतोय, ही बाब अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालावं, अशी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे. Byte :- महिला कामगार  Byte: संजय वाघमारे - ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया चाकण पुणे....
14
Report
Advertisement
Back to top