Back
वसईत सावत्र आईची हत्या: ऑनलाइन गेमसाठी पैसे हवे होते!
PTPRATHAMESH TAWADE
Jul 28, 2025 18:02:21
Vasai-Virar, Maharashtra
Date-28july2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI MURDER
Feed send by 2c
Type-AV
Slug- ऑनलाईन गेम खेळण्यासाठी सावत्र आईची हत्या
पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दफन केला
दफन केलेला मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी केला तपास
अँकर - ऑनलाईन गेम खेळण्यासाठी पैसे हवे असल्याने एका तरुणाने आपल्या सावत्र आईची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार वसईत उघडकीस आला आहे.
आरसीया खुसरो असं मृत्यू झालेल्या आईचे नाव असून इमरान खुसरो असं आरोपी मुलाचे नाव आहे..
इम्रान खुसरो (३२) याला मोबाईल गेम खेळण्याचे व्यसन होते. त्याला व्हीआरपीओ नावाचा गेम खेळण्यासाठी १ लाख ८० हजारांची गरज होती. त्याने हे पैसे सावत्र आई आर्शिया हिच्याकडे मागितले.. मात्र तिने पैसे दिले नाही या रागात इम्रान शनिवारी बाभोळा येथील आर्शिया यांच्या घरी गेला आणि तिला लाथाबुक्क्याने मारहाण करून डोके आपटून तिची क्रूर हत्या केली.
हा सर्व प्रकार इम्राननेने वडिलांना सांगितला ..त्यानंतर दोघांनी पुरावा नष्ट करण्यासाठी तातडीने विधी करत मृतदेह दफन करून नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवले होते. या बाप लेकाने परिसरातीलच एका डॉक्टरकडून आरसीया नैसर्गिक रित्या मरण पावल्याचे प्रमाणपत्र घेतले होते. मात्र घरात कामवाल्या महिलेला घरात रक्ताचे डाग दिसले आणि हा सर्व प्रकार पोलिसांना समजला .. पोलिसांनी आरोपी बाप लेकाला अटक केली आहे.. या गुन्ह्यात डॉक्टरचाही सहभाग दिसून येत असून पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत....
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowJul 29, 2025 02:16:52Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn university av
Feed attached
छत्रपती संभाजीनगर च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम असणाऱ्या महाविद्यालयांतील प्रथम वर्ष प्रवेश विद्यापीठाने रोखले होते. सुविधांचा अभाव आणि पूर्णवेळ प्राध्यापक नसल्याने महाविद्यालयांच्या अडचणीत ऐन प्रवेशावेळी अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता विद्यापीठाने या महाविद्यालयांना त्रुटी पूर्ततेसाठी ५ ऑगस्टची डेडलाइन दिली आहे. तेव्हा सर्व माहिती कागदपत्रांसह मुदतीपूर्वी सादर करावी लागणार असल्याच्या सूचना शैक्षणिक विभागाने दिल्या आहेत.
विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले. यापूर्वी २९ जुलैपर्यंत मुदत होती. व्यवस्थापन परिषदेत पीजी महाविद्यालयांना मुदतवाढीची मागणी झाली. त्यावर महाविद्यालयांना आठवडाभराची संधी दिली आहे. एकुण १९६ पैकी १८९ पदव्युत्तर महाविद्यालयांची पथकाने तपासणी केली, त्यापैकी ७ महाविद्यालयांची तपासणी झाली नाही. अंतिम मुदतीनंतर अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत या त्रुटी पूर्ततेवर निर्णय होणार आहे. दरम्यान महाविद्यालयांच्या तपासणीतून ७० महाविद्यालयांचा सकारात्मक असल्याने त्यांना प्रवेश करता येणार आहेत. आता त्रुटी दुरुस्तीनंतरच ५ ऑगस्टला किती महाविद्यालय पूर्तता करतात याकडे लक्ष लागले आहे.
3
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 29, 2025 02:16:40Nashik, Maharashtra:
nsk_jaljivan
feed by 2C
video 5
Anchor नाशिक जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या पाणिपूरवठा योजनेत काम झालंय, पण ठेकेदारांचं तब्बल १०० कोटींचं देयक अजून मिळालेलं नाही. यामध्ये बहुतांशी योजना गैर मार्गाने सबलेट करण्यात आल्या आहेत. देयके देण्यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे निधी मागितलाय, पण मागच्या दीड वर्षांपासून पैसा नाही. त्यामुळे प्रमुख ठेकेदार मस्त असला तरी इतर सबलेट काम करणारे ठेकेदार त्रस्त आहेत. त्यांनी सर्व कामे उधार घेत केली आहे. २०२४ पर्यंत योजना असलेली ही योजना मुदत संपल्यावर फक्त ७५ प्रकल्प पूर्ण झाले. हातांत दिलेल्या ३१० योजनेपैकी बऱ्याच अर्धवट आहेत. आता कामही थांबलंय आणि गावेही पाण्याअभावी त्रस्त आहेत अशी परिस्थिती ग्रामीणभागत दिसून येत आहे
1
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 29, 2025 02:15:52Raigad, Maharashtra:
स्लग - मासेमारी बंदीच्या आदेशाचे उल्लंघन ..... रायगडात 38 मच्छिमारांवर कारवाई ....... 8 बोटी जप्त, 29 लाखांची दंड वसुली ....... रायगडात मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई .........
अँकर - बंदी आदेशाचे उल्लंघन करीत मासेमारी केल्या प्रकरणी रायगड जिल्ह्यात 38 मच्छिमारांवर कारवाई करण्यात आली आहे. यात 8 बोटी जप्त करण्यात आल्या असून 29 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मत्स्यव्यवसाय विकास विभागाने ही कारवाई केली आहे. 1 जून ते 31 जुलैपर्यंत खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी असते. मात्र ही बंदी झुगारून मासेमारी केली जाते. दोन दिवसांपूर्वी अलीबागच्या समुद्रात खांदेरी किल्ल्याजवळ मच्छीमार बोटीला जलसमाधी मिळून तीन मच्छीमारांना आपला जीव गमवावा लागला.
2
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 29, 2025 02:00:37Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Gondia
Slug - 2907_GON_GUN
FILE - 1 VIDEO 4 IMAGE
गोंदिया पोलिसांची मोठी कारवाई… अवैध शस्त्र तस्करी रोखत, एका तरुणाला दोन गावठी पिस्टल आणि १० जीवंत काडतूसांसह अटक
Anchor :- गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून, गोंदिया-बालाघाट रोडवरील मुरपार गावाजवळ रात्री नाकाबंदी करण्यात आली. सुमारे साडेआठ वाजता, एक तरुण मोटारसायकलवरून संशयास्पद हालचाल करताना आढळून आला. त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रशांत सोनवणे, वय १८, रा. कोपरगाव, जिल्हा अहमदनगर असे सांगितले. त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली असता दोन गावठी पिस्टल आणि १० जीवंत काडतूस सापडले. या शस्त्रांची एकूण किंमत सुमारे एक लाख पाच हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात रावणवाडी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 29, 2025 01:46:11Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2907_BHA_ACCIDENT
FILE - 2 IMAGE
शाळेत जायला निघालेल्या विद्यार्थिनीचा ट्रॅक्टरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू
Anchor : तुमसर तालुक्यातील कोष्टी गावाजवळ ट्रॅक्टरची धडक लागून दहाव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनी कु. सिमरन ठवकर हिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. विद्यार्थिनी ही आपल्या घरून शाळेत जाण्याकरिता वर्ग मैत्रिणींसोबत सायकलने निघाली होती. काही अंतर गेल्यावर समोर ट्रॅक्टरच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टरच्या मागे चाकाखाली येऊन सदर विद्यार्थिनी जागीच ठार झाली. या घटनेमुळे तिच्या कुटुंबासहित संपूर्ण गावात एकच शोककडा पसरली असून सर्वीकडे एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
7
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 29, 2025 01:46:06Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी - हातखंबा गावातील वाणी पेठ येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मागील सात तासांपासून ठप्प
मागील दोन महिन्यातील दुसरी घटना
पलटी झालेला टँकर सरळ करण्याचे प्रयत्न सुरू
टँकर सरळ झाल्यानंतर गॅस दुसरा टँकरमध्ये ट्रान्सफर केला जाणार
छोट्या वाहनांसाठी बाबनदी पाली मार्गे वाहतूक वळवली
अवजड वाहनांच्या रांगा
याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी
5
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 29, 2025 01:45:24Raigad, Maharashtra:
स्लग - रायगडात सुनील तटकरे यांचा भरत गोगावले यांना दे धक्का ..... शिवसेना प्रवक्ते राजीव साबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर ...... 2 तारखेला अजित पवारांच्या उपस्थितीत होणार प्रवेश ...... शिवसेना राष्ट्रवादीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता .......
अँकर - रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिलाय. मंत्री भरत गोगावले यांचे कट्टर समर्थक आणि शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळे शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार आहेत. येत्या 2 तारखेला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत माणगाव इथं हा कार्यक्रम होईल. साबळे यांच्या सोबत शिवसेनेचे नगरसेवक देखील राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत. तळकोकणात कार्यकर्त्यांच्या पळवापळवी वरून शिवसेना आणि भाजप मध्ये धुमशान सुरू असतानाच रायगड जिल्ह्यात देखील सुनील तटकरे यांनी धक्कातंत्र अवलंबले आहे. यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
3
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 29, 2025 01:02:17Manmad, Maharashtra:
अँकर-नाशिकच्या मनमाड शहरात गवळी वाड्यात आज दुपारच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी भाजी विक्रेत्याच्या घरात घुसून 15 तोळे सोने व 50 हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे,भाऊलाल भोई हे भाजी विक्रीचा व्यवसाय करत असतात,दुपारी 3 वाजता घरून जेवण करून दुकानावर गेले,मुलगी घरी आली असता तिला कपाटातील समान अस्तव्यस्त झालेले दिसले तर सोन्याच्या दागिन्यांचे बॉक्स उघडे दिसल्याने तिने आजूबाजूला राहणाऱ्यांना बोलवत घरात चोरी झाल्याचे सांगितले,विशेष म्हणजे आज रविवारचा बाजाराचा दिवस असल्याने वर्दळ असताना चोरीची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
13
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 29, 2025 01:02:08Yeola, Maharashtra:
अँकर: अठरा वर्षापासून प्रलंबित असलेल्या विस्थापित गाळधारकांच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वात येवल्यातील विंचूर चौगुले येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते सुमारे तीन तास होऊन अधिक काळ हे आंदोलन सुरू राहिल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती दरम्यान येवला शहर पोलिसांमध्ये शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासह, शिवसेना शहरप्रमुख अतुल घटे, ज्येष्ठ नेते किशोर सोनवणे यांच्या सह तब्बल 58 आंदोलकांवर गर्दी जमून वाहतुकीस कोंडी निर्माण करणे या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोबत:-शिक्षक आमदार किशोर दराडे यांचा फोटो दिला आहे तसेच झालेल्या आंदोलनाचे विज्वल दिले आहे.
14
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 29, 2025 01:01:56Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
Sng_nagpanchmi
स्लग - शिराळ्यात यंदा नागपंचमीचा उत्साह वाढणार,केंद्राच्या परवानगीमुळे शिराळकरांना यंदा जिवंत नागांचे दर्शन..
अँकर - सांगलीच्या 32 शिराळ्यामध्ये आज नागपंचमी साजरी होत आहे.मात्र यंदाची नागपंचमी शिराळकरांसाठी सुखद अनुभव देणारी ठरणार आहे,कारण केंद्र सरकारने दिलेल्या एका परवानगीमुळे शिराळकरांना
नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागांचे दर्शन घेता येणार आहे.त्यामुळे केंद्राच्या निर्णयाचे शिराळकरांकडून स्वागत करण्यात येत आहे.
पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच यंदाही नागपंचमी साजरी होणार आहे.केंद्र सरकारकडून नागपंचमीच्या पूर्वसंध्येला 21 शिराळकर यांना नाग पकडण्याची परवानगी दिली आहे.शैक्षणिक अभ्यास आणि सर्प संवर्धन पारंपारिक प्रचारासाठी परवानगी देण्यात आली आहे.27 ते 31 जुलै पर्यंत मिळालेल्या परवानगीमुळे आज साजरया होणाऱ्या नागपंचमीच्या दिवशी शिराळकरांना जिवंत नागांचे दर्शन होणार आहे,गेल्या 23 वर्षांपासून शिराळकर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिवंत नागा ऐवज प्रतिमेच्या पूजन करून नागपंचमी साजरी करत आहेत, मात्र यंदाच्या वेळी नागपंचमीच्या दिवशी शिराळाकरांना जिवंत नागांचे दर्शन मिळत असल्याने आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे,पण पारंपरिक पद्धतीने परंपरारीक पध्दतीने जिवंत नागांची पूजा करण्याची परवानगी मिळावी,अशी मागणी देखील शिराळकर महिलांच्याकडून करण्यात येत आहे.
बाईट - सौ. कश्मिरा पृथ्वीसिंग नाईक - शिराळकर महिला.
बाईट - पद्मा शेटे -जेष्ठ महिला - शिराळा.
13
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 29, 2025 01:00:58Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - महाराष्ट्राच्या झालेल्या फसवणुकीचा पहिला बळी म्हणजे हर्षल पाटील - जयंत पाटील.
अँकर - खिशात पैसे नसताना,सरकारने वारे- माप आश्वासन दिली,त्यामुळे महाराष्ट्राच्या झालेल्या फसवणूकीचा पहिला बळी हर्षल पाटील याचा गेला,असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर केला आहे.सांगलीच्या तांदुळवाडी येथील कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येवरून संभाजी राजे पाटील यांनी सरकारवर ही टीका केली आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सह जयंत पाटील यांनी तांदुळवाडी येथे हर्षल पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले आहे.यावेळी हर्षल पाटील कुटुंबीयांना धीर देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष पाटील कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
बाईट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार.
14
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 28, 2025 16:30:58Vasai-Virar, Maharashtra:
Date-28juky2025
Rep-prathamesh tawade
Loc&vasai
Slug-VASAI TOY
Feed send by 2c
Type-AV
Slug- थेट स्मशानभूमीत पालिकेने बसवली लहान मुलांसाठी खेळणी
वसईच्या बेनापट्टी स्मशानभूमीतील धक्कादायक प्रकार
गावगोंगाट झाल्यानंतर पालिकेचा पुन्हा घूम जाओ
अँकर - वसईतील बेनापट्टी गावातील स्मशानभूमीत वसई महापालिकेने चक्क लहान मुलांसाठी खेळणी लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता, बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी याबाबत पालिका आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर पालिकेने तातडीने बसवलेली खेळणी पुन्हा काढून नव्यावादातून हात वर केले आहेत...
मुळात स्मशानभूमीत लहान मुले कशी खेळू शकतात ? अंत्यसंस्कार होणाऱ्या ठिकाणी पालिकेने कोणता विचार करून लहान मुलांना खेळणी लावली असतील ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे... पालिकेचा हा अनागोंदी कारभार सोशल मीडियावर आता वायरल होत आहे..
14
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 28, 2025 16:30:51Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2807ZT_JALNA_TEACHER(10 FILES)
जालना | ब्रेकिंग
जालन्यात क्रीडा प्रबोधिनीतील 4 विद्यार्थिनींचा विनयभंग
क्रीडा शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याचं तपासात उघड
क्रीडा शिक्षकावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल
अँकर | जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनीतील एका क्रीडा शिक्षकाने चार विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिस आणि शिक्षण विभागाने चौकशी केल्यानंतर अखेर या क्रीडा शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनीत ग्रामीण भागातील अल्पवयीन विद्यार्थिनी क्रीडा शिक्षण घेतात. या ठिकाणी क्रीडा शिक्षक प्रमोद खरात हा व्यवस्थापक म्हणून काम पाहतो.याच क्रीडा शिक्षकाकडून येथील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना मिळाली होती. तर शिक्षण विभागानं देखील या प्रकरणात शनिवारी चौकशी केली होती. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव यांनी मुलींची चौकशी केल्यानंतर अखेर या प्रकरणात गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्रीडा शिक्षक आणि प्रबोधिनी व्यवस्थापक प्रमोद खरात याच्या विरोधात विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला बेड्या ठोकल्या असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव करीत असल्याची माहिती जालन्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली...
Byte: अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना
14
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 28, 2025 15:34:04Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_MP_Ashtikar
Feed on - 2C
-------------------------
Anchor - उद्धव ठाकरे सेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना गृहमंत्री अमित शहा यांचा फोन आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. वाढदिवसानिमित्त अमित शहा फोनवरून शुभेच्छा देत असल्याचा व्हिडिओ खासदार आष्टीकर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेयर केला होता. त्यानंतर आता खासदार आष्टीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेला संवाद इंस्टाग्राम अकाउंट वर शेयर केला आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसा निमित्त फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. तुम जियो हजारो साल, हजारो साल सोबत राहावे लागेल उद्धव ठाकरे असा मिश्किल संवाद आष्टीकर यांच्यासोबत करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांचा फोन गृहमंत्री अमित शहा यांच्या फोनपूर्वी आला की नंतर आला याबाबत खासदार आष्टीकरच अधिक स्पष्टीकरण देऊ शकतील. पण ज्याप्रमाणे हजारो साल सोबत राहायचे असे उद्धव ठाकरे म्हणताहेत. त्यामुळे अमित शहा यांच्या फोन नंतरच उद्धव ठाकरे यांचा फोन आणि अश्याप्रकारचे संभाषण असल्याचे दिसत आहे.
--------------------------
खा. आष्टीकर - 976-447-1777
14
Report