Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
RaigadRaigad

रायगडात शिवसेनेला धक्का: राजीव साबळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार!

PPPRAFULLA PAWAR
Jul 29, 2025 01:45:24
Raigad, Maharashtra
स्लग - रायगडात सुनील तटकरे यांचा भरत गोगावले यांना दे धक्का ..... शिवसेना प्रवक्ते राजीव साबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर ...... 2 तारखेला अजित पवारांच्या उपस्थितीत होणार प्रवेश ...... शिवसेना राष्ट्रवादीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता ....... अँकर - रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिलाय. मंत्री भरत गोगावले यांचे कट्टर समर्थक आणि शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळे शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार आहेत. येत्या 2 तारखेला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत माणगाव इथं हा कार्यक्रम होईल. साबळे यांच्या सोबत शिवसेनेचे नगरसेवक देखील राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत. तळकोकणात कार्यकर्त्यांच्या पळवापळवी वरून शिवसेना आणि भाजप मध्ये धुमशान सुरू असतानाच रायगड जिल्ह्यात देखील सुनील तटकरे यांनी धक्कातंत्र अवलंबले आहे. यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Jul 29, 2025 12:31:19
Shirdi, Maharashtra:
Anc - शिर्डी साईबाबांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांच्या सेवेतील निस्सीम भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना चांदीचे 9 नाणे भेट दिले होते...त्यावरून लक्ष्मीबाई शिंदे यांचे वंशजांमध्ये दावे - प्रतिदावे सुरू आहेत त्यात झालेल्या तक्रारीनंतर अहिल्यानगर सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी सुनावणी वेळी प्रतिवादी हजर न राहिल्याने साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांचा दावा योग्य ठरवत सदर 9 नाणे हे ट्रस्टकडे असल्याचे चौकशी अहवालात नमुद केलय..त्यामुळे आमच्याकडील नाणे हेच खरे असल्याचा दावा पुन्हा एकदा अरुण गायकवाड यांनी केलाय...तर धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात कायदेशीर मार्गाने अपील दाखल करणार असल्याचे तक्रारदार संजय शिंदे आणि चंद्रकांत शिंदे यांनी सांगितलय... V/O - 1918 साली विजयादशमीच्या दिवशी साईबाबांचे महानिर्वाण झाले...अखेरच्या समयी साईबाबांना नित्यनियमाने भोजन आणि सेवा देणा-या तत्कालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना साईबाबांनी चांदिचे 9 नाणे भेट दिले होते...लक्ष्मीबाई शिंदे यांचे वंशज चंद्रकांत शिंदे आणि त्यांचे नातेवाईक सदर चांदिचे नाणे आमच्याकडे असल्याचा दावा करतायत तर लक्ष्मीबाई शिंदे यांची नात शैलेजा गायकवाड आणि त्यांचे कुटूंबीय चांदिचे 9 नाणे आमच्याकडे असल्याचा दावा करतायत...9 नाण्यांचे 18 नाणे झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता त्यानंतर संजय शिंदे , चंद्रकांत शिंदे यांनी 2022 साली साईबाबा संस्थान आणि पोलिस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती...अरुण गायकवाड हे लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि 9 नाणे भाविकांना दाखवुन मोठ्या देणग्या जमा करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता...धर्मादाय आयुक्तांच्या चौकशी अहवालात देणगीचा तपशील आणि विनीयोग तसेच नऊ नाणे हे अरुण गायकवाड अध्यक्ष असलेल्या ट्रस्टकडे असल्याच निरिक्षण नोंदवल्याच अरुण गायकवाड यांनी म्हणटलय... बाईट - अरुण गायकवाड , अध्यक्ष , साईभक्त लक्ष्मीबाई ट्रस्ट V/O - लक्ष्मीबाई शिंदेंचे आम्ही वंशज आहोत त्यामुळे वारसाहक्काने ती चांदीची नाणी आमच्याकडे असुन ती लक्ष्मीबाईंच्या नात शैलेजा गायकवाड यांचेकडे कसे येतील..? आजही साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना दिलेली नाणी हि जुन्या घरी असलेल्या मंदिरातच आहेत आणि तीच खरी आहेत...धर्मादाय आयुक्तांनी सुनावणी घेताना आम्हाला तारखेला हजर राहाण्याची सुचना किंवा समन्स दिलेले नाहीत... त्यांनी दिलेल्या चौकशी अहवालाविरोधात दाद मागणार असल्याच यावेळी तक्रारदार संजय शिंदे आणि चंद्रकांत शिंदे यांनी म्हणटलय...सर्व नाण्यांची पुरातत्व विभागाकडून सत्यता तपासुन दुध का दुध आणि पाणी का पाणी व्हाव अशी मागणी तक्रारदारांनी केलीय... बाईट - संजय शिंदे , लक्ष्मीबाई शिंदेचे वंशज बाईट - चंद्रकांत शिंदे , लक्ष्मीबाईंचे वंशज V/O - साईबाबांनी दिलेली चांदीची नऊ नाणी ही एक ऐतिहासिक, भक्तिपर आणि भावनिक ठेव आहे.मात्र, सध्या या नाण्यांवरून शिर्डीत मोठा वाद सुरू आहे.साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड आणि त्यांच्या मातोश्री शैलजा गायकवाड यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांचा चौकशी अहवाल पत्रकार परिषदेत मांडल्याने पुन्हा हा वाद चव्हाट्यावर आलाय...देश विदेशातील करोडो भाविकांच्या श्रद्धेचे प्रतिक असलेल्या 9 नाण्यांची सत्यता खर तर जगासमोर येण गरजेच आहे. *कोण आहेत शैलेजा गायकवाड आणि साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड..?* शैलेजा गायकवाड ( माहेरचे नाव शिंदे ) या लक्ष्मीबाई शिंदे यांची नात तर सोनबाई यांची मुलगी आहे तर अरुण गायकवाड हे शैलेजा गायकवाड यांचे चिरंजीव.. 1963 साली लक्ष्मीबाई शिंदे यांचे निधन झाले आणि त्यानंतर चांदिचे नाणे त्यांची मुलगी सोनुबाई आणि त्यानंतर शैलेजा गायकवाड यांचेकडे आल्याचा दावा... *ग्राफिक्स पॉइंट्स -* 1) साईबाबांनी मृत्यूसमयी दिलेली ९ चांदीची नाणी – विवादाचा केंद्रबिंदू... 2) अरुण गायकवाड: “आमच्याकडेच खरी नाणी” - दावा 3) शिंदे वंशज - “गायकवाडांचा दावा खोटा” - आम्हीच खरे वारसदार 4) पुरातत्व विभागाकडून नाण्यांची सत्यता तपासावी - शिंदे कुटूंबीय 5) साईबाबा संस्थान ने देखील दोन्ही कडच्या व्यक्तींना नाण्यांबाबत मार्च महिन्यात नोटीस बजावली... 6) साई भक्तांमध्ये संभ्रम – खरी नाणी नेमकी कुणाकडे..? प्रतिनिधी कुणाल जमदाडे झी 24 तास शिर्डी अहिल्यानगर
0
Report
NMNITESH MAHAJAN
Jul 29, 2025 12:30:50
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2907ZT_JALNA_RESIGN(2 FILES) जालना : ब्रेकिंग | काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांचा प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे पाठवला राजीनामा अँकर | जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी त्यांच्या काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे पाठवला आहे.30 ते 35 वर्ष पक्षाचं एकनिष्ठ राहून काम केलं मात्र आता मि माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे पक्षाचे काम करु शकत नाही त्यामुळे मला कार्यामुक्त करण्यात यावे असं त्यांनी राजीनाम्यात म्हटलं आहे.आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जालन्याच्या दौऱ्यावर आहे.या दौऱ्या दरम्यान गोरंटयाल यांनी त्यांचा राजीनामा सपकाळ यांच्याकडे पाठवला आहे.31 जुलै रोजी गोरंटयाल मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
0
Report
GMGANESH MOHALE
Jul 29, 2025 12:04:57
Washim, Maharashtra:
वाशिम: File:2907ZT_WSM_WORLD_TIGER_DAY रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत जागतिक वाघ दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून Save Tiger संदेश दिला.तसेच स्टोन पेंटिंगच्या माध्यमातून वाघांचे चित्र रेखाटून वाघ संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.विद्यार्थ्यांनी वाघ वाचवण्याची शपथ घेत निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला. बाईट:गोपाल खाडे, शिक्षक बाईट: विद्यार्थी
6
Report
PTPRATHAMESH TAWADE
Jul 29, 2025 12:04:23
Vasai-Virar, Maharashtra:
type-Av 2c entry - अनिल कुमार पवार यांच्या घरी इडी कडून छापा अँकर - वसई विरार मधील अनधिकृत इमारती बांधकाम प्रकरणात माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरी ईडीची धाड..आज सकाळपासून ईडीची टीम पवार यांच्या दारात .....बिल्डर, आर्किटेक, इंजिनियर्स नंतर आता थेट आयुक्तांची चौकशी....इडी च्या हाती काय लागेल याची सर्वांना उत्सुकता ....आयुक्त अनिल पवार यांनी प्रशासक म्हणून पाहिला होता कारभार
3
Report
AAABHISHEK ADEPPA
Jul 29, 2025 12:04:14
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - खासदार प्रणिती शिंदे यांच्या ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्याचा निषेध करत फोटोला जोडमारो आंदोलन करत व्यक्त करण्यात आला निषेध - खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूर बाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजपा आक्रमक - आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली खासदारपणाची शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी - गाढवाच्या गळ्यामध्ये प्रणिती शिंदे यांचा फोटो बांधत भाजपाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध - ऑपरेशन सिंदूर म्हणजे मीडिया मध्ये केलेला तमाशा असे वक्तव्य खासदार प्रणिती शिंदे यांनी केले होते - खासदार प्रणिती शिंदे यांची गाढवाच्या बुद्धीशी करण्यात आली तुलना बाईट - देवेंद्र कोठे ( भाजपा आमदार )
4
Report
JMJAVED MULANI
Jul 29, 2025 12:00:21
Baramati, Maharashtra:
JAVEDMUALNI SLUG 2907ZT_BARAMATIDHNGR FILE 4 BYTE 2 बारामतीत धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी विक्रम ढोणे यांचं आंदोलन..... आंदोलनाचं यंदाचा अकरावं वर्ष.....धनगर विवेक जागृती अभियानाच्या माध्यमातून केलं आंदोलन Anchor _धनगर समाजाच्या एसटी आरक्षणप्रश्नी बारामतीत प्रशासकीय भावनासमोर आंदोलन करण्यात आलं आहे. धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 29 जुलै 2014 रोजी धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची पूर्तता न झाल्याने दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी ढोणे यांच्या नेतृत्वात प्रत्येक वर्षी बारामतीत प्रशासकीय भावना समोर हे आंदोलन केलं जातं. यंदाचे आंदोलनाच 11 वर्ष आहे. धनगर एसटी आरक्षणासाठी राज्य सरकारने तात्काळ मंत्री समितीची स्थापना करून केंद्र सरकारला शिफारस पाठवण्याचे कार्यवाही करावी. पंतप्रधानांनी धनगर समाजाला दिलेले अश्‍वासन पूर्णत्वास नेण्यासाठी केंद्र सरकारने समन्वय समितीची स्थापना करून प्रक्रिया सुरू करावी. याशिवाय महाराष्ट्र शासनाने धनगर आरक्षण प्रश्न श्वेतपत्रिका जाहीर करावी असा मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
4
Report
JMJAVED MULANI
Jul 29, 2025 11:51:32
Baramati, Maharashtra:
JAVED MULANI SLUG 2907ZT_DAUNDLCB FILE 2 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची दौंडच्या नगररचना सहाय्यकावर कारवाई..... दौंडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश; पेट्रोल पंप परवानगीसाठी ३.५ लाख लाचेची मागणी, नगररचना सहायकावर गुन्हा दाखल.. Anchor — दौंड नगरपरिषदेचा नगररचना सहाय्यक विजयकुमार हावशेट्टे यांच्या विरोधात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. पेट्रोल पंपासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या आणि लेआउट मंजुरीसाठी हावशेट्टे याने तक्रारदाराकडे चार लाख रुपयांची लाच मागितले होते पडताळणी दरम्यान तडजोडे यांनी तीन लाख 50 हजारांची लाच मागितल्याच निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी हावशेट्टे यांच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
8
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Jul 29, 2025 11:51:04
Latur, Maharashtra:
लातूर Slug : कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाची आज वाट पाहणार.... राजीनामा न घेतल्यास शेतकऱ्यांसह राज्यभर आंदोलन करणार... उद्या लातूर आत व्यापक बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविणार... छावाचे विजयकुमार घाडगे पाटील यांचा इशारा A/c : काही दिवसांपूर्वी पुण्यात छवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यां सोबत चर्चा करताना कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यासाठी अजित दादा पवार यांनी मंगळवारपर्यंतची मुदत मागून घेतली होती... आज ती मुदत संपणार असून अद्यापपर्यंत, कृषिमंत्र्यांच्या राजीनामा बाबत निर्णय झालेला नाही... आज दिवस संपेपर्यंत आम्ही त्यांच्या निर्णयाची वाट बघणार असून, कृषिमंत्र्यांच्या राजीनामा बाबत काही निर्णय न झाल्यास छावा संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी लातुरात बोलताना दिली.. या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी उद्या लातूर संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली... Byte : विजयकुमार घाडगे पाटील, प्रदेशाध्यक्ष छावा संघटना
4
Report
DPdnyaneshwar patange
Jul 29, 2025 11:49:58
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव तुळजाभवानीचा प्रसाद सहाशे रुपये किलो, मंदिर संस्थांच्या निर्णयाला पुजाऱ्याचा विरोध नाचवणं दर्जा एवढी किंमत कशाला भक्तांनी व्यक्त केली नाराजी DHARA_PRASAD_PKG अँकर धाराशिव – महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आता प्रसादासाठीही "सशुल्क" टॅग लागलाय... चितळे ब्रँडचा लाडू प्रसाद म्हणून वाटला जातोय, पण किंमत आहे थेट 600 रुपये किलो. पन्नास ग्रॅम लाडूसाठी भाव ३० रुपये घेतले जातायत. भक्त नाराज – तर पुजारी मंडळांचा या निर्णयाला तीव्र विरोध... पाहूया रिपोर्ट... VO1: श्रावण महिना आणि तुळजाभवानीच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक दाखल होतायत... मंदिर प्रशासनाने प्रसाद वाटपाचा निर्णय घेतलाय... पण हा प्रसाद म्हणजे बाजारात मिळणाऱ्या लाडवाचा दर्जा असलेला "चितळे ब्रँड"चा लाडू! किंमत थेट 600 रुपये किलो... एक लाडू म्हणजे ५० ग्रॅम आणि त्यासाठी भाविकांकडून घेतले जातायत तब्बल ३० रुपये! बाजारभावाच्या दुप्पट दराने लाडू विकणे हे चुकीचं आहे... आम्ही मंदिर संस्थानकडे स्वस्तात प्रसाद देण्याची मागणी केली आहे." तुळजाभवानीच्या पुजाऱ्यांनी याला कडाडून विरोध केलाय Byte अमर राजे कदम अध्यक्ष पुजारी मंडळ तुळजाभवानी मंदिर VO2: प्रसाद आहे, पण भक्तांनी चव आणि दर्जा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय... काही भक्तांचं म्हणणं आहे की, "३० रुपये लाडूसाठी दिले, पण ना चव आहे ना समाधान!" म्हणूनच लाडूच्या गुणवत्तेवरही आता चर्चा झडू लागलीय... Byte – भाविक Vo4 कसा आहे हा लाडू? किंवा काय आहे त्यात? तर सांगायचं झालं, तर चणाडाळ, साजूक तूप, साखर, बेदाणे, काजू, बदाम, वेलची पावडर, केशर, नट ऑरेंज कलर आणि केसरी सेन्स... यापासून हा लाडू तयार करण्यात आला आहे. श्रावणाचा मूर्त साधत विधिवत पूजा करून मंदिर संस्थांचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत प्रसाद लाडूच वाटप सुरू करण्यात आला आहे. भक्ताच्या मागणीनुसार अत्यंत उत्तम दर्जाचा प्रसाद तुळजाभवानीच्या भक्तांना दिला जातोय असा दावा मंदिर संस्थांच्या अध्यक्षांनी केला आहे Byte – कीर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, मंदिर संस्थान VO4 तुळजाभवानीच्या दागिन्यांच्या वादामुळे आधीच बदनाम झालेलं मंदिर संस्थान... आता लाडूच्या किंमतीवरून पुन्हा चर्चेत आलंय. भक्तीपेक्षा कमाईवर भर असल्याची भावना भक्तांमध्ये निर्माण होत असल्याचं चित्र आहे... Fvo श्रद्धा आणि समर्पणाचा महिना असलेल्या श्रावणात, भाविकांची श्रद्धा प्रसादावरून डळमळीत झाली आहे. तुळजाभवानीच्या भक्ताला दिल्या जाणाऱ्या लाडूच्या किंमतीवरून उठलेला वाद प्रशासनासाठी नवा डोकेदुखी ठरू शकतो. किंवा मंदिर प्रशासन निर्णयाचा पुनर्विचार करतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल... ज्ञानेश्वर पतंगे, झी २४ तास, धाराशिव. ग्राफिक्स तुळजाभवानीच्या प्रसादावरून गोंधळ! सहाशे रुपये किलोचा ‘प्रसाद’! चितळे लाडूवरून भक्त नाराज! पुजाऱ्यांचा विरोध, भक्तांचा संताप!
6
Report
SMSarfaraj Musa
Jul 29, 2025 11:15:36
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - सांगली शहरातल्या वीज वितरणच्या ट्रांसफार्मरला लागली आग.. अँकर - सांगली शहरातल्या एका वीज वितरणच्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागल्याचा प्रकार घडला.शहरातल्या गणपती पेठ येथील असणाऱ्या झाशी चौक येथील या वीज वितरण च्या ट्रान्सफॉर्मरला आग लागली होती अचानकपणे ट्रान्सफर मध्ये स्फोट झाला आणि आग लागली,यानंतर ट्रान्सफरच्या शेजारीच असणाऱ्या एका धान्य दुकानात देखील शॉर्टसर्किट झालं. मात्र बर्थडे मध्ये कोणतीही मोठी वित्तहानी झाली नाही,मात्र ट्रांसफार्मरला लागलेल्या आगीमुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला, याघटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली मात्र या आगीच्या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
12
Report
SRSHRIKANT RAUT
Jul 29, 2025 11:06:37
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या रेमंड कंपनीतील कामगारांच्या संपात प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू यांनी उडी घेतली, 9 दिवसापासून सुरु असलेला हा संप मिटविण्यासाठी कामगारांची बाजू घेऊन त्यांनी व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली मात्र ही मध्यस्ती देखील निष्फळ ठरली. एक पाऊल कंपनी आणि एक पाऊल कामगार यांनी मागे घेऊन तोडगा काढावा अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली मात्र कंपनी त्यांच्या प्रस्तावावर अडून बसल्याने तोडगा निघू शकला नाही. दरम्यान पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
12
Report
YKYOGESH KHARE
Jul 29, 2025 11:06:26
Nashik, Maharashtra:
*कळवण ( नाशिक )...ब्रेकींग.. विशाल मोरे* Anchor - आश्रमशाळांमधील समस्या आणि प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात राष्ट्रवादीचे आ.नितीन पवार यांनी एकात्मिक प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या मांडत आंदोलन केले..मात्र तब्बल पाच तास ठिय्या मांडूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून समर्पक असे उत्तर मिळत नसल्याने आ.पवार हे चांगलेच संतापले..उपस्थित अधिकाऱ्यांना ' तुम्हाला काय माज आला आहे एवढा, तुमचा माज मी जिरवतो.. ? मला च्युत्यात काढता का ? या वाक्यासह अजूनही काही अश्लील शब्द काढत खडे बोल सुनावत आमदार महोदयांची जीभ घसरली..त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनाही मटका, दोन नंबर हे कुठलेच धंदे इथे चालू देवू नका मला सगळे धंदे बंद पाहिजे असा सज्जड दमच भरला..तर जोपर्यंत आश्रमशाळांना शिक्षक मिळत नाही तोपर्यंत त्या शाळा बंदच ठेवा..असे सांगितले.. आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या जागा रिक्त असणे, बाह्यस्त्रोत शिक्षकांची भरती न होणे, जेवणाचा अत्यंत निकृष्ट दर्जा, आणि अन्य मूलभूत सुविधांचा अभाव यासह अनेक मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते..
11
Report
GDGAJANAN DESHMUKH
Jul 29, 2025 11:03:30
Parbhani, Maharashtra:
अँकर- नागपंचमीनिमित्त आठवे ज्योतिर्लिंग नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. काल पहिला श्रावणी सोमवार झाल्या नंतर ही आज भाविकांची गर्दी बघायला मिळाली. 'बम बम बोले', 'हर हर महादेव, श्री नागनाथ महाराज की जय'च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता. अनेक शिवभक्त अनवाणी पायाने दाखल झाले होते.
14
Report
PTPRAVIN TANDEKAR
Jul 29, 2025 10:50:04
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 2907_BHA_FORREST_DAY FILE - 2 VIDEO भंडाऱ्यात नवेगाव- नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र वन विभागा कडून जागतिक व्याघ्र प्रकल्प दिन साजरा. Anchor - भंडाऱ्यात नवेगाव- नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र वन विभागा कडून जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यात आला असून वाघाचे सुरक्षा तसेच वाघा बदल नागरिकांना जागरूकता निर्माण करणे तसेच इतर वन्यजीव वाचवण्यासाठी कशे प्रयत्न करता येईल व वाघा पासून पर्यटन कसा तयार होईल याची माहिती कर्मचाऱ्यांना व जंगलालगतच्या गावातील वन समित्याना देण्यात आली. तसेच जंगलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर कारण्यात आला असून यावेळी वनअधिकारी व वनकर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाईट - पियुषा जगताप उपवनसंरक्षक व क्षेत्र संचालक नवेगाव - नागझिरा.
12
Report
MMMahendrakumar Mudholkar
Jul 29, 2025 10:37:49
Beed, Maharashtra:
परळी,बीड: करुणा शर्मा-मुंडे यांनी आज महादेव मुंडे कुटुंबियांची भेट घेतली आणि यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला करुणा शर्मा - मुंडे बाईट पॉइंटर्स.... - ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या लढ्यात त्यांना मनोबल देण्यासाठी मी इथे आले आहे - *पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी देखील येथे भेटायला यायला पाहिजे, तुम्ही जातीच्या नावावर राजकारण केलं पण तुम्ही त्यांना भेट द्यायला येत नाहीत* - समाजाच्या प्रोग्राम मध्ये तुम्ही मोठ्या गप्पा मारत आहात - मी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाच्या आंदोलनात येणार होते पण तब्येत बरी नसल्यामुळे आले नाही - *आज तुम्ही लढत रहा आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत रहा कोणीही महिलेची कुंकू पुसण्याची हिंमत करणार नाही* - *अजित पवार तुम्हाला धनंजय मुंडेंचे दुःख दिसते पण महादेव मुंडे परिवाराचे दुःख दिसत नाही* - आज ज्ञानेश्वरी मुंडे, मी आणि सारंगी महाजन असे आम्ही सगळे लोक अन्याय विरुद्ध लढत आहोत.
14
Report
Advertisement
Back to top