Back
सोलापूर: मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा आडम मास्तरांचा इशारा!
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालण्याचा आडम मास्तरांचा इशारा
- आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालण्याचा आडम मास्तरांचा इशारा
- 70 फूट रस्त्यावर भाजी विक्रीला बंदी आणल्यामुळे मुख्यमंत्र्यांना घालणार घेराव
- सोलापूर महानगरपालिकेने गेल्या 25 दिवसांपासून 70 फूट रोडवर भाजी विक्रीला घातली आहे बंदी
- पालकमंत्र्यांना भेटून निवेदन दिले मात्र त्याचा उपयोग न झाल्याने आडम मास्तर आक्रमक
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Pandharpur, Maharashtra:
02072025
Slug - - PPR_ROAD_LIGHT
feed.on 2c
file 02
-------
Anchor - आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून या वर्षी पंढरपूर आषाढी वारी नियोजनात वारकऱ्याना उपयुक्त नियोजन केले आहे. प्रथमच पंढरपूर शहर सर्व संतांच्या पालख्या आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी रंगबिरंगी विद्युत रोषणाईने उजळले आहे.
0
Share
Report
Thane, Maharashtra:
*ठाणे महापालिक प्रभाग रचना लोकप्रतिनिधींवर अन्यायकारक*
*वाढलेल्या लोकसंख्येनुसार प्रभाग संख्या वाढवा*
*सर्वच पालिकांमध्ये अनुसूचित जातीचे प्रभाग पाचने वाढवा*
Rpi एकतावादी पार्टीची मागणी
Anc - उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेले तीन ते सहा वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, सन 2017 प्रमाणे प्रभाग रचना करण्यात येणार आहे. वाढते नागरीकरण आणि त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता, अशा पद्धतीची प्रभाग रचना अन्यायकारक ठरणार आहे..त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभागांची संख्या वाढवावी तसेच प्रत्येक महानगर पालिकेत अनुसूचित जातीच्या प्रभागांची संख्या पाचने वाढवावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया - एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी पत्रकार परिषदेत केली. या बाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांची भेट घेतली असून त्यांनीही या मागणीबाबत अनुकूलता दर्शविली असल्याचेही इंदिसे यांनी सांगितले.
Byte- नानासाहेब इंदिसे -rpi एकतवादी पार्टी,ठाणे
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0207ZT_WSM_RAIN_2JULY
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिम तालुक्यातील वाई, वारला, टणका तसेच जिल्ह्यातील काही इतर भागांमध्ये मंगळवारी जोरदार पावसास सुरुवात झाली आहे.यामुळे खरिपातील सोयाबीन,तूर, कपाशी आणि इतर पिकांना चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. पावसामुळे शेतातील आद्रता वाढेल आणि आधीच पेरलेली पिके चांगल्या प्रकारे उगम पावतील.तथापि, अनेक शेतकऱ्यांनी अजून पेरण्या केलेल्या नसल्याने, या अचानक सुरू झालेल्या पावसामुळे त्यांच्या पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी,अशा शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पुढील काही दिवस हवामानाची अनिश्चितता लक्षात घेता योग्य नियोजन करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या सेलू शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना वापरण्यासाठी असलेले शौचालय घाणीच्या साम्राज्यात सँडलव असून ते स्वच्छ ठेवण्याकडे सेलू नगरपालिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी नागरीकांनी सेलू नगर पालिकेच्या प्रवेशद्वारावर बेशरमांची झाडे लावून हटके आंदोलने केले, शहरातील उपजिल्हा रुग्णालयात असलेले हे शौचालय साफ करण्यासाठी नगर परिषद सेलू यांना वारंवार सांगून देखील रुग्णांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील केरवाडी ते शिरपुर रस्त्याच रुपडं कंत्राटदाराच्या आडमुठे धोरणामुळे पलटायला तयार नाहीये, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अभियंत्यांनी दिलेल्या आदेशाला कंत्राटदार केराची टोपली दाखवत आल्याने या भागातील नागरिकांना अश्या घसरगुंडी रस्त्याने जीव धोक्यात घालून ये जा करावी लागत आहे. या तीन किलोमीटर च्या रस्त्याला एप्रिल 2022 मध्ये मंजुरी देण्यात आली असून या रस्त्याचे डिसेंम्बर 2022 ला रस्त्याच्या कडेच्या नाल्या आणि पुलाचे काम ही सुरू केले, पण तेव्हापासून गायब झालाय,त्यानंतर गावकर्यांनी आंदोलन उपोषणे तहसिल कार्यालयासमोर केले, यावेळी ग्रामस्थाची आश्वासनावर बोळवण करन्यात आली. रस्त्याचे काम तर सोडाच पण माती मिश्रित मुरूम टाकून या रस्त्याने येजा करण्याचे काम कंत्राटदाराने केलेय, अधिकाऱ्यांनी तब्बल 11 नोटिसा देऊन ही रस्त्याचे प्रत्यक्ष काम मात्र सुरू झालेच नाहीये. त्यामुळे विद्यार्थी,गरोदर माता,वृद्धांची रस्त्याने येजा करतांना आबाळ होत आहे...
0
Share
Report
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - एपीएमसी मध्ये वाहतूकदारांचे आंदोलन,
ट्रक चालकोका आंदोलन
ftp slug - nm truck aandolan
byet- hulepatil
shots- apmc
reporter- swati naik
navi mumbai
anchor - वाहतूक पोलिसांकडून होत असलेली ई चलन कारवाई आणि त्याबाबतच्या तक्रारीची दखल सरकारने घ्यावी, ई चलनावर सहा महिन्यांपूर्वी लावण्यात आलेले दंड वसूल करण्यात येऊ नयेत या प्रमुख मागण्यांसाठी वाहतूकदार बचाव कृती संघटना यांच्यावतीने आज मध्यरात्रीपासून चक्का आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. यामध्ये राज्यातील जवळपास 250 वाहतूकदार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. वाशी इथल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कांदा बटाटा मार्केटमध्ये वाहतूकदार संघटनेने आंदोलनाला सुरूवात केली आहे. पुढील चार दिवसांत संघटनेच्या मागण्यांबाबत सरकारने निर्णय न घेतल्यास उपोषणाला सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य समन्वयक विलासराव हुले पाटील यांनी दिली.
सामान्य वाहतूकदार असलेले उदय जी बर्गे यांनी आझाद मैदान इथे जून महिन्यात उपोषण केलं होतं त्यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत संपूर्ण मागण्यांपैकी जवळपास 90 टक्के मागण्या त्यांनी तत्वतः मान्य करण्याचं आश्वासन दिलं त्यानुसार उपोषण स्थगित करण्यात आलं होतं. मात्र यावेळी केलेल्या मागणीनुसार 30 जून पूर्वी याबाबत अध्यादेश काढला न गेल्यानं हे आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.
बाइट - विलासराव हुले पाटील
संघटनेचे राज्य समन्वयक
0
Share
Report
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- मुख्याध्यापकाची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थी पालकांचं आंदोलन
फीड 2C
अँकर:- अहिल्यानगर येथील मुख्याध्यापकाची झालेली बदली तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी धरणे आंदोलन सुरू केला आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. पालकांनी आजही आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवता रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयासमोर शाळा भरवली आहे. रयत शिक्षण संस्थेची नगर शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील या शाळेत शिवाजी लंके हे मुख्याध्यापक आहेत त्यांची बदली संस्थेतील दुसऱ्या शाळेवर झाली आहे मात्र या बदलीला विद्यार्थी आणि पालकांनी विरोध करत रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केल आहे शिवाजी लंके यांची बदली झाल्यामुळे शाळा पूर्णतः बंद झाली असून दोन दिवसांपासून एकही विद्यार्थी शाळेमध्ये गेला नाही जोपर्यंत बदली रद्द होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं विद्यार्थी आणि पालकांनी सांगितलं आहे
बाईट:- विद्यार्थी 2 बाईट
बाईट:- पालक 2 बाईट
0
Share
Report
Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना चपलेने बदडण्याची भाषा वापरणाऱ्या शिवसेना युबीटीच्या अयोध्या पौळ यांच्या विरुद्ध यवतमाळ जिल्ह्यातील महिला शिवसैनिक आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यामध्ये धडक देऊन पौळ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अयोध्या पौळ कोण कुठली भटक भवानी आहे, तिच्या भाषेनुसार आम्ही तिला पण चपलांनी झोडणार, संजय भाऊंना आम्ही राखी बांधतो त्यामुळे त्यांच्याबाबत अपमानजनक बोलणाऱ्या विरोधात आम्ही शांत बसणार नाही असा इशारा महिला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला. पौळ ह्यांची भाषा अश्लील, शिवराळ असून त्यांनी संजय राठोड यांना मारण्याची धमकी दिली आहे. त्यांची बदनामी चालवली आहे. एवढेच नव्हे तर फेसबुक पोस्टद्वारे विठ्ठल रूखमाई व वारकऱ्यांचा देखील अपमान केल्याने, पौळ विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी महिला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली.
बाईट वैशाली मासाळ : महिला जिल्हाप्रमुख शिवसेना
संजीवनी शेरे : शिवसैनिक
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
02072025
slug - PPR_APPRECIATION
feed.on 2c
file 01
-----
Anchor - मागील वर्षीपासून आषाढी वारीला आलेल्या भाविकांना सुविधा देताना समाधानी स्तरावर नेण्याचं काम सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सहभाग आहे. त्यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सोबत पंढरपूर मध्ये आलेला वारकरी केंद्रबिंदू मानून सर्व उपक्रम हाती घेतले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज पंढरपुरात पायी फिरून वारीच्या कामाचा आढावा घेतला असता दर्शन रांगेतून दर्शन घेतलेल्या भाविकांनी त्यांचं आभार मानले. अवघ्या सहा ते सात तासांमध्ये दर्शन होत आहे पंढरपूरमध्ये चांगली स्वच्छता आहे. प्रसन्न वातावरण आहे. अशा पद्धतीने प्रशासनाच्या कामाचं कौतुक करून त्यांची पोचपावती दिलेली आहे.
0
Share
Report
Shirdi, Maharashtra:
Anc - राहुरी येथील डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर कर्जाच्या बोजाखाली असलेला कारखाना सुरू करण्यासाठी सत्तेसोबत जाण्याशिवाय पर्याय नसल्याने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे काका आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे सख्खे बंधू अरुण तनपुरे यांनी अजीत पवार गटात प्रवेश केलाय...प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटील यांचे भाचे आहेत.त्यामुळे प्राजक्त तनपूरे हे देखील अजित पवार गटात प्रवेश करणार का..? अशा अनेक चर्चांना उधान आले होते...तनपुरे यांनी मात्र मी शरद पवार यांचेसोबतच राहणार असल्याच स्पष्ट केलय...
V/O - आमदार शिवाजी कर्डीले आणि भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी तनपुरे कारखान्यातून माघार घेत निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 21 च्या 21 जागा जिंकत सत्ता काबीज केली...कारखान्यावर 140 कोटींचे कर्ज असल्याने कर्जाचे पुनर्गठन आणि नव्याने कर्ज घेण्यासाठी सत्तेशिवाय पर्याय नसल्याने अरुण तनपुरे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम करत अजीत पवार गटात प्रवेश केलाय त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी आपली याबाबतची भुमिका स्पष्ट केली...कारखाना सुरू करण्यासाठी अरुण तनपुरे हे अजीत पवारांसोबत गेले मात्र मी शरद पवारांची साथ सोडणार नसल्याचे प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केलय...
बाईट - प्राजक्त तनपुरे , माजी मंत्री
0
Share
Report