Back
शाळेतील छप्पर उडाले, विद्यार्थ्यांना खुल्या रंगमंचावर शिक्षण घेण्यास भाग!
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 0707ZT_CHP_SCHOOL_SHED
( single file sent on 2C)
टायटल:-- राज्यभर मराठी बाबत रणकंदन सुरू असताना ग्रामीण भागातील मराठी शाळांचे वास्तव आले पुढे, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या सोनापूर शाळेचे छत उडून दोन महिने उलटले, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याने चिमुकले विद्यार्थी खुल्या रंगमंचावर शिक्षण घेण्यास बाध्य, शाळा समिती आणि पालकांनी व्यक्त केला संताप
अँकर:-- राज्यभर सध्या मराठी ,मराठी शिक्षण, मराठी शाळा याबाबत राजकीय रणकंदन सुरू आहे. एकीकडे राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना ग्रामीण भागातील मराठी शाळांची स्थिती मात्र गंभीर होत चालली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या व्याहाड खुर्द या मोठ्या गावाशेजारी असणाऱ्या सोनापूर या खेड्यात जिल्हा परिषदेची 76 वर्ष जुनी शाळा शासकीय अनास्थेचा बळी ठरली आहे. 03 मे 2025 रोजी या भागात आलेल्या मोठ्या वादळाने शाळेवरील छप्पर उडाले. शाळा समिती व मुख्याध्यापकांनी याबाबत चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला तातडीने दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविला. मात्र प्रत्यक्ष शाळा सुरू होण्यापूर्वी दीड महिना शिल्लक असताना कुठलीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. राज्यभर शाळा प्रवेशोत्सव मोठ्या दिमाखात झाला आणि इकडे सोनापूर शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मुलांना कुठे बसवावे हा प्रश्न पडला. एकूण 143 विद्यार्थी असलेल्या या शाळेतील पहिली आणि दुसरीचे दोन वर्ग चक्क खुल्या रंगमंचात भरत आहेत. तर अन्य सर्व वर्ग एकाच खोलीत भरत आहेत. राज्यभर पावसाचे पुढील चार महिने थैमान असणार आहे अशा स्थितीत गळणारे छप्पर, भिंतींना ओलावा, सरपटणाऱ्या जीवांचा धोका आणि विजेचा धक्का बसण्याची सतत भीती यामुळे विद्यार्थी दहशतीत शिक्षण घेत आहेत. शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देत ही स्थिती सुधारण्याची गरज स्थानिक नागरिक व पालकांनी व्यक्त केली आहे. तर आम्ही प्रस्ताव पाठविला असल्याची हतबल प्रतिक्रिया मुख्याध्यापिका- शिक्षकांनी दिली आहे.
बाईट 1) श्रीधर सोनूले, अध्यक्ष, शाळा समिती
बाईट 2) संतोष भांडेकर, पालक
बाईट 3) कमल तोडासे, मुख्याध्यापिका
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement