Back
रमेश थोरात यांची घर वापसी: अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!
JMJAVED MULANI
Jul 31, 2025 07:05:16
Baramati, Maharashtra
JAVEDMULANI
SLUG 3107ZT_DAUNDNCP
FILE 5
दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांची घर वापसी....उद्या पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश...शरदचंद्र पवार पक्षाची सोडणार साथ...
Anchor_दौंड चे माजी आमदार रमेश थोरात शरद पवारांची साथ सोडून पुन्हा अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसापासून रंगत होती. आता यावरती शिक्कामोर्तब झाले असून उद्या एक ऑगस्ट रोजी रमेश थोरात हे शरद पवारांची साथ सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
मागील अनेक दिवसांपासून दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात हे घर वापसी करणार अशा चर्चा होत्या मागील दोन दिवसापूर्वी रमेश थोरात यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती त्यामुळे या चर्चांना अधिक भूत आला होता आता एक ऑगस्ट रोजी रमेश थोरात यांचा दौंड तालुक्यातील वरवंड येथील नागनाथ विद्यालयाच्या प्रांगणात अजित पवार गटात पक्ष पवेश होणार आहे.
दौंड तालुक्यातील वरवंड येथे नागनाथ विद्यालयाच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे आणि या मेळाव्यात माजी आमदार रमेश थोरात यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
राहुल कुल यांकडून रमेश थोरातांचा तीन वेळा पराभव...
भाजपाचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी रमेश थोरात यांचा सलग तीन वेळा पराभव केला आहे.यंदाच्या निवडणुकीत भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुती झाल्यानंतर रमेश थोरात यांनी अजित पवारांची साथ सोडून शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करीत तुतारी हाती घेतली होती.मात्र त्यांचा या निवडणुकीतही पराभव झाल्याने ते काहीसे नाराज होते.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी रमेश थोरात यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला होता. विधानसभेला मात्र महायुतीमुळे थोरात यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अजित पवारांची साथ सोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. थोरात यांनी राहुल कुल यांच्या विरोधात तुतारी चिन्हावरती दौंड विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र या निवडणुकीतही थोरात यांचा पूल यांच्याकडून पराभव झाला.
अजित पवारांनी यापूर्वी रमेश थोरात यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमनपद देऊन मोठी ताकद दिली होती सध्या देखील रमेश थोरात हे बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowAug 01, 2025 03:04:23Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_cort
( नाशिक कोर्टाचे स्टॉक व्हिज्युअल्स वापरा )
न्यायमूर्ती अभय लाहोटी होणार नाशिकचे जिल्हा सत्र न्यायाधीश
अँकर
बॉम्बस्फोटाचा ऐतिहासिक निकाल देणारे मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाचे न्यायमूर्ती अभय लाहोटी हे या निकालानंतर त्यांच्या गेल्या महिन्यात झालेल्या बदलीनुसार नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी येत्या सोमवारी रुजू होणार आहे आहेत. मालेगाव येथे सन २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ६ नागरिकांचा मृत्यू होऊन १००हून अधिक नागरिक जखमी झाले होते. याप्रकरणी सुरुवातीला दहशतवादविरोधी पथकाने तपास करून साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह लष्करातील कर्नल प्रसाद पुरोहित याच्यासह १२ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. आरोपी केले. या गुन्ह्यात एटीएसने या संशयितांना अटक करून त्यांच्याविरोधात मोक्का अन्वये गुन्हा दाखल करून खटला चालविला होता. नंतर हा तपास राष्ट्रीय तपासी यंत्रणेकडे (एएनआय) वर्ग झाला होता.हा खटला मुंबईच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या समोर चालविण्यात आला. वारंवार न्यायाधीशांच्या होणाऱ्या बदल्यांमुळे निकालाला होणारा विलंब लक्षात घेता न्याय विधी विभागाकडून न्या. लाहोटी यांच्यासमोरी नियमित सुनावणी करण्यात आली. या खटल्यात १६० साक्षीदार तपासून ११०० पानांचे निकालपत्र देण्यात आले. न्या. लाहोटी यांची नियमीत बदल्यांमध्ये गेल्या महिन्यातच नाशिक येथे जिल्हा सत्र न्यायाधीश एक या पदावर नियुक्ती झाली होती. मात्र, या निकालामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली. आता हा निकाल लागल्यानंतर ते येत्या सोमवारपासून नाशिक जिल्हा न्यायालयात वर्ग एक सत्र न्यायाधीश व विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून रुजू होणार आहे.....
3
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 01, 2025 03:04:18Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn mahapalika av
Feed attched
महापालिकेच्या आदेशानुसार रजिस्ट्री साठी आता बेबाकी प्रमाणपत्र किंवा पाणीपट्टी व मालमत्ताकराची भरलेली पावती अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे आता मनपाचे कर बुडवणाऱ्यांना चाप बसणार आहे.
राज्य शासनाने २७ जून २०२५ रोजी कलम ५ आणि ७ अंतर्गत आदेश दिला होता. त्यानुसार, कोणतीही शासकीय सेवा देताना संबंधित विभागांनी इतर विभागांच्या डेटाचा वापर करावा. अर्जदाराकडे थकबाकी असल्यास सेवा नाकारावी. या आदेशाची अंमलबजावणी करत महापालिकेने सर्व सेवा (मृत्यू प्रमाणपत्र वगळता) देताना बेबाकी प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.
महापालिका हद्दीतील खरेदी-विक्री, तारण, हस्तांतर यांसारख्या व्यवहारांमध्ये रजिस्ट्री आवश्यक असते. मात्र, अनेक व्यवहारांमध्ये थकबाकी, अपूर्ण माहिती आणि बनावट कागदपत्रे आढळत होती. त्यामुळे दस्त नोंदणीपूर्वी मालमत्तेवर कोणतीही थकबाकी नसल्याचा अधिकृत पुरावा आता बंधनकारक करण्यात आला आहे.
4
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 01, 2025 03:03:07Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_mahasuldut
( नाशिकचे महसूल विभागाचे शॉट वापरा)
महाविद्यालयीन विद्यार्थी होणार आता महसूलदूत
अँकर
शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्तालय महसूलदूत हा उपक्रम राबविणार आहे. ज्या महाविद्यालयीन युवक व युवतींना जनसंपर्काची आवड आहे, ते या उपक्रमात सहभागी होऊ शकतील. तालुक्याचे गाव किंवा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावांमध्ये ते काम करणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याकडून देण्यात आलीये...महसूल विभागातर्फे १ ते ७ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात महसूल सप्ताह राबविण्यात येणार आहे. यानिमिताने आज दुपारी ४ वाजता उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानही केला जाईल. त्यांची आरोग्य तपासणीही होईल, सप्ताहात आज गौरव सोहळा, २ ऑगस्टला अतिक्रमित जागेचे पट्टे वितरण, ३ पाणंद व शिवरस्त्यांची मोजणी व दुतर्फा वृक्षारोपण, ४ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, ५ लाभार्थीच्या गृहभेटी घेऊन तांत्रिक अडचणी दूर करणे, ६ शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासन, ७ वाळू धोरणाची अंमलबजावणी हे उपक्रम करण्यात येणार आहे...
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 01, 2025 03:03:03Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn railway update av
Feed attched
संभाजीनगर येथून परभणीपर्यंत १७७किमी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारकडून २१७९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. हा प्रकल्प आगामी चार वर्षांत पूर्ण होणार आहे. यामुळे मुंबई व हैदराबाद या शहरांमध्ये कमी वेळेत प्रवास शक्य होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना येथील पिटलाइन, ड्रायपोर्ट, तसेच नव्याने होणाऱ्या जालना-जळगाव रेल्वेमार्गाला या दुहेरीकरणाचा मोठा फायदा होणार आहे. सध्या मनमाड ते संभाजीनगर या मार्गाचे ९३ किमी दुहेरीकरण सुरू आहे. त्यासाठी ९७० कोर्टीची तरतूद केली आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर ऑरिक सिटी, बिडकीन औद्योगिक वसाहत यासाठी हे दुहेरीकरण महत्त्वाचे आहे. औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये हा प्रकल्प मोलाची भर घालेल...
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 01, 2025 03:02:44Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील नामांकित शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांनीचा 56 वर्षीय शिक्षकाकडून विनयभंग
- सोलापुरातील नामवंत खाजगी शाळेतून धक्कादायक प्रकार समोर
- खाजगी शाळेतील 56 वर्षीय शिक्षकाकडून दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग
- 19 एप्रिल ते 3 जुलैच्या दरम्यान शाळेच्या पार्किंग मध्ये घडला प्रकार
- विनयभंग करणाऱ्या शिक्षकाने धमकावल्याने विद्यार्थिनीने कोणाकडेही केली नव्हती तक्रार
- तुला काही ज्ञान नाही, तू काही कामाची नाहीस, तु दहावीला आहे, आता तु चांगली सापडली आहेस अशा अनेक प्रकारे पीडित विद्यार्थ्यांनीला देण्यात येत होती धमकी
- मात्र खाजगी शाळेच्या प्राचार्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांच्या सल्ल्याने गुन्हा दाखल
- सदरच्या प्रकाराबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 01, 2025 03:02:35Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn jayakwadi av
Use yesterday feed
जायकवाडी धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरल्याने रब्बीसाठी ३ ते ४ ऐवजी ७ आवर्तने देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यात बागायती शेतीचे क्षेत्र वाढेल. शेतकऱ्यांना रब्बी हंगामात गरजेच्या वेळी पाणी मिळेल. तसेच त्या वेळची गरज ओळखून वाढीव आवर्तन देण्याचा निर्णय घेतला जाईल. मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांसह विदर्भ, तेलंगणातील अनेक जिल्ह्यांना याच लाभ होईल. भूजलपातळी वाढीला चालना मिळेल.
जायकवाडी धरण यंदा १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. गुरुवारी धरणातून विसर्गदेखील करण्यात आला आहे. या पाण्याचा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागाला फायदा होणार आहे. यंदा धरण भरल्यामुळे रब्बी हंगामातील क्षेत्रात वाढ होणार आहे.
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 01, 2025 03:02:11Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn zp election av
Feed attached
छत्रपती संभाजीनगर मध्ये आगामी काळात
होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ४३६ मतदान केंद्र वाढणार आहेत. १८ लाख ७० हजार ५८७ मतदारांसाठी मतदान केंद्रांची एकूण संख्या २,३९६ असेल. मतदारांची वाढलेली संख्या पाहता एका मतदान केंद्रांवर फक्त ९०० मतदारांना मतदान करण्याची मर्यादा आयोगाने घालून दिली आहे. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढेल.
राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी मराठवाड्यातील जि.प., पं.स., महापालिका आणि न.प. निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. महानगरपालिकेच्या आधी जिल्हा परिषद निवडणूक होईल, अशी शक्यता आयोगाने वर्तविली. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर सर्व यंत्रणांची काय तयारी आहे, याचा आढावा आयोगाने घेत आगामी निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ च्या मतदार याद्या अंतिम असल्याने स्पष्ट केले.
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 01, 2025 03:01:57Beed, Maharashtra:
बीड : कारागृहातील मोबाईलवरून नवा संशय सिमकार्ड नसलेल्या फोनचा सीडीआर पोलिसांकडून तपासला जाणार
Anc : जिल्हा कारागृहात आढळलेल्या मोबाईलवरून आता नवा संशय निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या मोबाईलमध्ये सिमकार्ड नव्हते, पण तो मोबाईल कारागृहातीलच एका आरोपीकडे सापडला. आता तो मोबाईल संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याने वापरल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पोलिस आयएमईआय क्रमांकावरून या मोबाईलचा सीडीआर म्हणजेच कॉल डिटेल रेकॉर्ड मागवणार आहेत. त्या दृष्टीने पत्रव्यवहार सुरू आहे.
माजलगावचा रफिक खुर्शिद नावाचा आरोपी मोबाईलसह पकडला गेला होता. त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. दरम्यान, या मोबाईलवरून कारागृहातून कोणालाही फोन गेला होता का? गेला असेल तर कुणाला? याचे तपशील आता समोर येणार आहेत. कारण या मोबाईलवर सिम नव्हते, पण आयएमईआयवरून त्याचे कनेक्शन कोणत्या सिमकार्डशी होते, हे शोधले जाणार आहे. या प्रकरणाची मागणी धनंजय देशमुख यांनी केली होती, तर अंबादास दानवे यांनीसुद्धा कारागृहातून फोन आल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच हा मोबाईल हा कसा असल्याचा दावा आमदार सुरेश धसानेही केला होता. आता पोलिस तपास अधिक वेगात सुरू झाला आहे.
0
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 01, 2025 03:01:47Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0108ZT_WSM_VACCINE_BOX_THEFT
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यातुन जाणाऱ्या नागपूर-मुबंई समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंतची सर्वात मोठी चोरी उघडकीस आली आहे.कोलकत्या कडे निघालेल्या एका वातानुकूलित ट्रकमधून तब्बल 46 व्हॅक्सिनचे बॉक्स चोरीला गेल्याची धक्कादायक घटना कारंजा परिसरात समोर आली आहे.या बॉक्सची एकूण किंमत 2 कोटी 43 लाख 86 हजार 684 रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे.ही घटना समृद्धी महामार्गावर कारंजा तालुक्यात घडली असून,याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हिओ: महेश कार्गो मूव्हर्स ट्रान्सपोर्टचा वातानुकूलित ट्रक भिवंडी येथून कोलकत्याकडे निघाला होता.या ट्रकमधून रुग्णालयीन वापरासाठी आवश्यक असलेल्या व्हॅक्सिनचे एकूण 408 बॉक्स वाहून नेले जात होते. ट्रक भिवंडीहून निघाल्यानंतर बुलढाण्याच्या डोनगाव येथे डिझेल भरण्यात आले.त्यानंतर ट्रक जेव्हा वाशिम जिल्ह्यातील कारंजा जवळ पोहोचला,तेव्हा ट्रकच्या वातानुकूलन यंत्रणेत तापमान वाढ झाल्याचे चालकाच्या लक्षात आले.त्यामुळे त्याने वाहनाचा वेग कमी केला. यावेळी चालकाने साइड मिररमधून मागे पाहिल्यावर ट्रकच्या मागील भागातून तीन जण उतरत असल्याचे दिसले. हे लक्षात येताच त्याने तात्काळ ट्रक थांबवून 112 वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात आणला.ट्रकची तपासणी केली असता, त्यातील 408 बॉक्सपैकी 46 व्हॅक्सिन बॉक्स चोरीला गेले असल्याचे स्पष्ट झाले.पोलिसां कडून या चोरीचा अधिक तपास सुरू आहे. असून,चोरट्यांचा लवकरच छडा लावण्यात येईल,असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. वाढत्या अपघाताच्या घटना बरोबर आता समृद्धी महामार्गाव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
बाईट:मनोज कुमार शर्मा,मॅनेजर, महेश कार्गो मूव्हर्स ट्रान्सपोर्ट.
बाईट:अनुज तारे,पोलिस अधीक्षक,वाशिम.
0
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 01, 2025 03:01:03Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_nmc_karvai
सार्वजनिक ठिकाणी कचरा केला , तर २५ हजारापर्यंत दंड
अँकर
उत्पन्नवाढीबरोबरच सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांना शिस्त लावण्यासाठी नाशिक महापालिकेने आता दंडात्मक कारवाईचा बडगा उभारलाय... यासाठी माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली आता ७३ जणांचे पथक सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास १८० रुपयांपासून २५ हजारांपर्यंत दंड करणार आहे.... पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात स्वच्छतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने उपद्रव शोधपथक स्थापन केले आहे. त्यात प्रामुख्याने माजी सैनिकांना प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांच्या माध्यमातून १२ पथके स्थापन करून सार्वजनिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे...
0
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 01, 2025 02:45:54Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_accident
कचरा डेपो समोर विचित्र अपघात – पाच वर्षीय मुलगी व तिचे वडील थोडक्यात बचावले
अँकर
नाशिकच्या सिडको परिसरात असलेल्या गौळाणे शिवारात खत प्रकल्पासमोरील रस्त्यावर काल सायंकाळी भरधाव कारने दुचाकीला धडक दिलीये. यात दुचाकीवरील पाच वर्षांची चिमुकली आणि तिचे वडील रामकृष्ण जाचक हे घोडक्यात बचावले आहे... मात्र, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. जाचक यांनी हेल्मेट घातल्याने ते बचावले. मात्र, किरकोळ दुखापत झाल्याने दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई चुंचाळे पोलिस करत आहेत.रामकृष्ण चाचक हे आपल्या मुलगी त्रिशा हिला शाळेतून घेवून दुचाकीवरून घरी जात होते. त्रिशा ही एक खासगी शाळेत ज्युनियर केजीमध्ये शिक्षण घेत असून नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर तिचे वडील तिला घरी घेऊन चालले होते. दरम्यान, मागून भरधाव वेगात आलेली वॅगन-आर गाडी हिने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिलीये...
6
Report
AKAMAR KANE
FollowAug 01, 2025 02:45:46kolhapur, Maharashtra:
राष्ट्र सेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलताई मेढे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा प्रमिलताई मेढे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली... आज प्रमिलताई मेढे यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाचे देहदान एम्स रुग्णालयाला करण्यात येणार आहे...
4
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowAug 01, 2025 02:45:41Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
विजयकुमार घाडगे....
AC ::- छावा संघटनेच्या आणि शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं काढून घेण्यात आलं. मात्र, त्यांना आता क्रीडा खातं दिलं गेलंय. यावर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केलीय. माणिकराव कोकाटे सभागृहात रम्मी खेळतात, त्यामुळे त्यांचं आवडीचं खातं म्हणजे क्रीडा खातं आहे असं म्हणत राज्यातील तरुणांना रम्मी नव्हे तर खरे खेळ शिकवा असा सल्लाही विजयकुमार घाडगे यांनी दिलाय. तर दुसरीकडे नवनियुक्त कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आता तातडीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, सोयाबीन आणि कापसाला हमीभाव द्यावा आणि रखडलेला पीक विमा मिळवून द्यावा, अशी स्पष्ट मागणी विजयकुमार घाडगे यांनी केलीय.
6
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 01, 2025 02:45:07Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुसऱ्यांदा वंचित बहुजन आघाडीने सत्ता स्थापित केलीय.. सभापती आणि उपसभापतीच्या या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे श्याम भोंगे यांची तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती म्हणून अविरोध निवड झाली तर उपसभापती म्हणून शेतकरी पॅनलचे हरिदास वाघ यांची निवड झाली..
निवड झाल्यानंतर श्याम भोंगे यांचे जंगी स्वागत करून तेल्हारा मध्ये मिरवणूक काढण्यात आलीय..
4
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 01, 2025 02:31:12Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - मनपा प्रसूतीगृहातून खाजगी रुग्णालयात रुग्ण पाठवणाऱ्यांवर कडक कारवाई करा, राज्य महिला आयोगाचे महापालिकेला पत्र
- मनापासून खाजगी रुग्णालयात पाठवण्याच्या धक्कादायक प्रकाराची राज्य महिला आयोगाकडून घेण्यात आली दखल
- सोलापुरातील मनपा प्रसुतीगृहातून खाजगी रुग्णालयात रुग्ण पाठवण्याचा धक्कादायक प्रकार आला होता उघडकीस
- सदर प्रकारामध्ये आशासेविकांची मोठी भूमिका असल्याचे समोर
- खाजगी रुग्णालयात रुग्ण पाठवणाऱ्या 50 आशांनी पैसे घेतल्याचे पुरावे मनपाच्या हाती
- खाजगी रुग्णालयाच्या जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रातून माहिती समोर
- खाजगी रुग्णालयाकडून आशा सेविकांना रुग्णांच्या बिलाच्या पंचवीस टक्के कमिशन आणि भेटवस्तूंचे केले जात होते वाटप
- राज्य महिला आयोगाकडून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्याचे देण्यात आले आदेश
5
Report