Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410502

रमेश खरमाळे यांना राष्ट्रपती भवनात स्वातंत्र्य दिनासाठी आमंत्रण!

HCHEMANT CHAPUDE
Aug 04, 2025 07:45:45
Junnar, Maharashtra
Feed 2C Slug: Junnar Kharmale Presidential File:05 Rep: Hemant Chapude(Junnar) Anc:जुन्नर तालुक्यातील पर्यावरणप्रेमी रमेश खरमाळे यांना राष्ट्रपती भवनामध्ये होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी अधिकृत आमंत्रण प्राप्त झाले आहे. भारतीय टपाल विभागामार्फत आलेले हे आमंत्रण पोस्टमनने त्यांच्यापर्यंत पोहोचवले. रमेश खरमाळे यांच्या ऑक्सिजन पार्कसारख्या उल्लेखनीय उपक्रमामुळे त्यांचे पर्यावरण क्षेत्रातील योगदान देशपातळीवर पोहोचले आहे.  गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मन की बात" या कार्यक्रमात रमेश खरमाळे यांच्या वृक्षारोपण व जलसंधारण उपक्रमांचा विशेष उल्लेख केला होता. त्यांनी जनतेला या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले होते. खरमाळे कुटुंबीयांनी हजारो झाडे लावली असून, पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी शोषखड्ड्यांची निर्मिती केली आहे. “राष्ट्रपती भवनातून आलेले आमंत्रण म्हणजे ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदवाक्याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे,” अशी भावना रमेश खरमाळे यांनी यावेळी व्यक्त केली. या निमित्ताने त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली असून, पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या सर्वांसाठी हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. Byte:- रमेश खारमळे (माजी सैनिक आणि वनविभात जुन्नर चे कर्मचारी) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Aug 04, 2025 11:50:29
Kolhapur, Maharashtra:
Story :- Sundar Elephant PKG Feed :- Old News Link, 2C & Photo Zee 24 Taas Old News Link https://youtu.be/_Z8rPKi7GjU?feature=shared https://youtu.be/4Icp1Jks3m4?feature=shared https://youtu.be/ShGfkC_Ctq0?feature=shared ANC :- आता बातमी 2014 मध्ये पेटाच्या तक्रारीनंतर मुक्तता केलेल्या दख्खनचा राजा जोतिबाच्या सुंदर हत्तीचे पुढे काय झाल याची.. नांदणी मठातील महादेवी हत्ती पेटाच्या तक्रारीनंतर गुजरात मधील वनतारामध्ये हलवण्यात आले. या घटनेच्या निमित्ताने जोतिबाच्या सुंदर हत्तीचं नेमकं काय झालं याची चर्चा सुरू झाली आहे.पाहूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट. VO 1 :- श्री क्षेत्र जोतीबाच्या सेवेसाठी वारणा उद्योग समहाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांनी 2004 पूर्वी सुंदर हत्ती जोतीबाला भेट दिला होता. पण दरम्यानच्या काळात सुंदरला चांगली सोयी मिळत नाही, त्याचबरोबर माहूतकडून सुंदर हत्तीला मारहाण होत असल्याची तक्रार पेटा संघटनेन कोर्टात केली. यावर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयानं सुंदरची मुक्तता करुन त्यांची जंगलात रवानगी करावी असा आदेश दिला. या आदेशानंतर आमदार विनय कोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण सर्वोच्च न्यायालयानही सुंदरला 15 जुन 2004 पर्यत बनेरगट्टा अभयारण्यात हालवण्याचे आदेश दिला.. त्यानंतर त्या सुंदर हत्तीला बाणेरगट्टा मध्ये हालविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी सुंदरला अनेक वेळा ट्रक मध्ये चढविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यानी दोन ते तीन वेळेला ट्रक मध्ये चढण्यास नकार दिला. तरीदेखील बाणेरगट्टा च्या टीमने वन विभागाच्या मदतीने सुंदरच्या पायाला दोरखंड बांधून जबरदस्तीने ट्रकमध्ये चढवले. यावेळी सुंदरला गुंगीचे औषध दिलाचा देखील आरोप करण्यात आला.. सुंदर हत्तीच्या नकारानंतरही सुंदर हत्तीला बाणेरगट्टा अभयारण्यात हलवलं... त्यानंतर या सुंदरला सगळेच विसरून गेले. पण महादेवी हत्तीनीच्या निमित्ताने सुंदर हत्तीचं काय झालं ? असा सवाल विचारला जाऊ लागला. ज्यांनी सुंदर हत्तीला सांभाळण्याची जबाबदारी उचलली होती त्याच वारणा उद्योग समूहाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांनी याबाबत मौन सोडलं... 2004 मध्ये बाणेरगट्टा अभयारण्यात जबरदस्तीने नेलेल्या सुंदर हत्तीचा अवघ्या तीनच वर्षात मृत्यू झाला याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केलाय. Byte :- आमदार विनय कोरे, नेते जनसुराज्य शक्ती पार्टी VO 2 :- जोतिबा डोंगरावर सुंदर हत्तीची देखभाल व्यवस्थित होत नाही असा आरोप पेटा संघटनेन करत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने प्रथमदर्शनी जे पुरावे समोर आले त्यानुसार सुंदर हत्तीनीला बनेरगट्टात सोडावे असा आदेश दिला. पण याच सुंदर हत्तीचे अवघ्या काही वर्षात निधन झाल हे पेटाने का जाहीर केले नाही.. त्याचबरोबर कोणत्या कारणाने सुंदर हत्तीचे निधन झाले त्याची वाचता का केली नाही ? असा संतप्त सवाल विचारला जातोय.. Byte :- राजू शेट्टी, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना VO 3:- सुंदर हत्तीला बाणेरगट्टा अभयारण्यात हलवत असताना पायाला जखम झाल्या. तरीदेखील सुंदरला जबरदस्तीने बाणेरगट्टा अभयारण्यात हलवले.. त्याच हत्तीचे निधन झाल्यानंतर पेटाने काय भूमिका घेतली. या बद्दल अद्याप कोणाला काहीही माहिती नाही.. त्यामुळेच नागरिकांच्या मनात पेटा संघटनेच्या कार्यपद्धतीवर देखील तीव्र आक्षेप आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर
0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Aug 04, 2025 11:50:09
Virar, Maharashtra:
Date-4aug2025 Rep-prathamesh tawade Loc-virar Slug-VIRAR CCTV Feed send by 2c Type-AV Slug- विरार मध्ये एटीएम मधून पैसे चोरणारी टोळी सक्रिय चोरीची घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद वसई विरार मध्ये चिमटा गँग सक्रीय नागिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज अँकर - विरारच्या कारगील नगरातील हिताची कंपनीच्या एटीएम मधून पैसे चोरी करणारी चिमटा गँगची टोळी सुरक्षा रक्षाच्या सतर्कतेमुळे हाती लागली आहे. या दोन्ही चोरट्यांना परिसरातील नागरिकांनी बेदम चोप देऊन विरार पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सोनू सूरजप्रसाद गौतम ( 28 ) रणजीतकुमार गोविंदप्रसाद पासी ( 22 ) असे या दोन्ही चोरट्यांची नावे आहेत. या एटीएम मध्ये चोरी करतानाच सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. चोरटे एटीएम मशीन मधून पैसे येण्याच्या ठिकाणी चिमटा लावून ठेवत असत जेणेकरून दुसऱ्या ग्राहकांनी काढलेले पैसे त्या चिमट्यामध्ये अडकले जायचे आणि ते पैसे हे चोरटे घेत असत. हा प्रकार सीसीटीव्ही तपासणाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर उघडकीस आला आहे. या चोरट्यांच्या विरोधात विरार पोलिसांनी विविध गुन्हे दाखल करून अटक केली आहे या दोघांनी आणखी कुठे कुठे चोरी केले आहेत त्याचा तपास पोलीस घेत आहेत...
0
Report
KJKunal Jamdade
Aug 04, 2025 11:36:18
Shirdi, Maharashtra:
Sangmner News Flash *मंत्री मेघना बोर्डीकर बाईट ऑन ग्रामसेवक आणि रोहित पवार -* *ग्रामसेवकाबद्दल महिलांच्या तक्रारी होत्या...* माझ्याजागी कुणीही असते तरी त्याच भावना असत्या... मी घडलेल्या प्रकाराबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली... सर्वच ग्रामसेवक तसे नाहीत... गावात एखाद्या नेत्याचा किती हस्तक्षेप असावा हे लोकांनी ठरवले पाहिजे... सरकारच्या योजना लोकांसाठी असतात... *मात्र खऱ्या गरजूंना योजना मिळत नसेल तर त्रागा होणारच...* रोहित पवार अर्धवट माहिती पसरवतात... *रोहित पवारांना नेता बनण्याची घाई झाली आहे...* *आमच्या मतदारसंघातले रोहित पवारांचे जुने मित्र अजितदादांकडे आलेत...* *त्यांनीच हा कार्यक्रम केलाय...* *त्यांनीच रोहित पवारांना अर्धवट माहिती पोहचवली...* रोहित पवारांना काही काम नसल्याने अर्धवट माहितीच्या आधारे दुसऱ्यांना दोष देताय... *मेघना बोर्डीकर यांचा रोख अजित पवार गटाचे नेते विजय भांबळे यांच्याकडे?...* विजय भांबळे यांनीच रोहित पवारांना दिला मेघना बोर्डीकरांचा व्हिडिओ?... bite - मेघना बोर्डीकर
7
Report
AKAMAR KANE
Aug 04, 2025 11:31:46
kolhapur, Maharashtra:
2c ला बाईट जोडला आहे (assingment ला पाठवला आहे) ------ नागपूर बाईट - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री. On सुप्रीम कोर्ट - सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो.... जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या निकालासाठी थांबल्या होत्या..या निवडणुका होणार आहे,.... ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण राहणार आहे. जे लोक याविरुद्ध गेले त्यांना चपराक बसणार आहे. ओबीसीचा आरक्षणाचा मिळणार आहे ते बदलता येणार नाही. लवकरात लवकर निवडणुका व्हावा जेणेकरून महाराष्ट्राचा ढाच्या मजबूत करण्यासाठी निवडणुका झाल्या पाहिजे. - आयोगाचे काम सुरू झालेल आहे...त्यामुळे निवडणूक प्रक्रिया चालू झालेली आहे. निवडणुका होऊ नये यासाठी काही लोकांनी प्रयत्न केले होते. अनेकांनी खोडा आणण्याचा प्रयत्न केला... पण सरकारने योग्य पद्धतीची बाजू सुप्रीम कोर्टात मांडली. त्यानंतर ओबीसी समाजाला न्याय दिला - प्रभाग रचना झालेल्या ऑब्जेक्शन सजेशन झालेले आहे..लवकरच राज्य सरकार केव्हाही निवडणुका घेतल्या तरी राज्य सरकार तयार आहे. भाजपही निवडणुकीसाठी तयार आहे. - जोपर्यंत लोक प्रतिनिधी निवडून येत नाही. तोपर्यंत जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत जात नाही. लोकप्रतिनिधी असलेल्या प्रशासन योग्य काम करू शकत नाही....तेरा हजाराच्यावर लोकप्रतिनिधी मिळतील...आणि विकासाला मोठी मदत जनतेला मिळणार आहे.
2
Report
AKAMAR KANE
Aug 04, 2025 11:04:27
kolhapur, Maharashtra:
2c ला बाईट जोडला आहे -------- चंद्रशेखर बावनकुळे (महसूल मंत्री) आज महसुली सप्ताहाचा चौथा दिवस आहे.. प्रत्येक मंडळात छत्रपती शिवाजी महाराज अभियान सुरू झाला आहे.. शैक्षणिक कामासाठी च्या दाखल्याची गरज पडते त्याकरिता हे अभियान सुरू केला आहे.. On राज ठाकरे मराठी भाषा ही आमच्या रक्तातली भाषा आहे.. मराठी भाषा महाराष्ट्राला देशातील सर्वोत्तम राज्य करणारी भाषा आहे.. मराठी भाषेसाठी आम्ही सर्वजण एका विचाराने आहोत... त्यासोबत हिंदी भाषा बोलणारा व्यक्ती असेल तर आपण कोणाच्या बोलीभाषेवर बंदी आणू शकत नाही... मराठी सोबत हिंदी बोलणाऱ्या सोबत मारपीट होते हे राज्याला शोभणारे नाही.. मराठी आपली भाषा आहे त्यासोबत हिंदीचा सन्मान केला पाहिजे ही राज ठाकरेंची भूमिका योग्य आहे.. On ठाकरे हेवेदावे विधान भाजप महायुतीने 51 टक्के मतदानाची तयारी केली आहे.. विधानसभेत सुद्धा आम्हाला 51.78 टक्के मत मिळाले.. राज ठाकरे आणि त्यांच्या मित्र पक्षांनी काय तयारी केली की मला माहिती नाही..मात्र आमची तयारी झाली आहे.. कोणीही आलं आणि लढलं तरीही 51% मत महायुती घेणार आहे.. त्यावेळी एकही जागा काँग्रेस किंवा शरद पवार आणि ठाकरे याच्या पक्षाला मिळणार नाही.. कारण जनतेने स्वीकारला आहे..की देशात नरेंद्र मोदी हे देशाला समृद्ध करत आहे..तर देवेंद्र फडणवीस ते महाराष्ट्राला विकसित करत आहेत.. त्यामुळे जनता विकासासोबत जाणार आहे.. On ठाकरे युती संदर्भ ज्यांची निवडणूक लढविण्याची तयारी नाही.. ते लोक असे विधान करतात.. आम्ही उद्या निवडणुका लागल्या तरीही आम्ही तयार आहोत.. एक कोटी 51 लाख सदस्य असणार भाजप आणि अजित पवार ,एकनाथ शिंदे तयार आहे... ते काय करणार हे माहित नाही मात्र आमची तयारी पक्की आहे.... On नरेंद्र भोंडेकर, परिणय फुके वाद..शिवसेना बाप कोणीही वादग्रस्त वक्तव्य करू नये.. तुम्ही सांगत आहात बाप काढलं तर बाप वगैरे असे शब्द काढू नये.. ते चूक आहे...राज्यात आम्ही सर्व भाऊ भाऊ म्हणून काम करत आहोत.. भाजपा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे... मला विषय माहित नाही.. मात्र बाप वगैरे काढला असेल तर हे योग्य नाही... On राहुल गांधी सुप्रीम कोर्ट फटकारले... राहुल गांधी वेडे झाले आहे.. ते कधी निवडणूक आयोग, कधी सैन्यावर बोलत असतात.. त्यांना अजून या देशाची लाईन कळाली नाही.. त्यांना काही दिवस प्रशिक्षणाची गरज आहे.. जर विदेशात चांगलं प्रशिक्षण मिळत असेल तर एकदा विदेशात जाऊन यावं.. नाहीतर आमच्याकडे प्रशिक्षण संस्था चांगले आहेत...त्यांनी आम्हाला सल्ला मागितला तर कुठे जायचं ते सल्ला आम्ही राहुल गांधींना देऊ.. On एकनाथ शिंदे दिल्ली दौरा.. दिल्लीचा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांशी काही संबंध नाही.. जागा वाटपाचा निर्णय आम्ही अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस मिळून घेणार. दिलीतील एकनाथ शिंदे यांची भेट स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडीत असू शकत नाही.. On मेघना बोर्डीकर वादग्रस्त विधान मंत्र्यांनी वादग्रस्त विधान करू नये असं मी आणि मुख्यमंत्र्यांनी या अगोदर सांगितले आहे.. मेघना ताईंसोबत मी बोललो मात्र त्यांच्या बोलण्याचा संदर्भ वेगळा होता असं त्यांनी सांगितलं... तरीही मंत्री म्हणून आचारसहिता पाळली पाहिजे आणि वादग्रस्त विधान टाळले पाहिजे..
10
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 04, 2025 11:00:42
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ च्या पुसद तालुक्यातील मारवाडीखुर्द येथील हनुमान मंदिरातल्या 'नंदी'ला गावाकऱ्यांनी शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप दिला. अनेक वर्षांपासून मंदिराला हा 'नंदी' सोडण्यात आला होता. त्यामुळे नंदीने गावकऱ्यांच्या हृदयात स्थान मिळवले होते. लाडक्या 'नंदी'ने प्राण त्यागल्यानंतर गावकऱ्यांनी या 'नंदी'ची गावातून अंत्ययात्रा काढत त्याला साश्रु नयनांनी भावनिक निरोप दिला.
8
Report
ABATISH BHOIR
Aug 04, 2025 10:49:22
Kalyan, Maharashtra:
धावत्या मेल मधील प्रवासाच्या हातावर फटका मारून  खाली पाडून प्रवाशाची लुटपाठ प्रकरण.. कल्याण जीआरपी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला घेतले ताब्यात .. आरोपीवर या आधीही पाच गुन्ह्यांचा रेकॉर्ड; आता सज्ञान आरोपीप्रमाणे खटल्याची पोलिसाची मागणी Anc...कल्याण रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा फटका गँगने आपली दहशत निर्माण केली आहे. आंबिवली ते शहाड दरम्यान धावणाऱ्या मेल एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या गौरव निकम या तरुणावर फटका मारून त्याला ट्रेनमधून खाली पाडण्यात आलं. हा धक्का एवढा गंभीर होता की गौरवने आपला एक पाय गमावला आहे.घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने गौरवच्या हातावर फटका मारला, ज्यामुळे तो ट्रेनच्या दरवाजातून खाली पडला. त्यानंतर आरोपीने निकम ला मारहाण करत त्याच्या कडील ₹ २०,००० रक्कम व मोबाईल हिसकावून घेतला.या घटनेनंतर कल्याण जीआरपीने तात्काळ कारवाई करत एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीवर याआधी पाच गुन्हे फटका मारून लूट केल्याचे नोंदवले गेले आहेत. तो अल्पवयीन असल्यामुळे प्रत्येकवेळी कायद्याच्या पळवाटांचा फायदा घेत सुटत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.या वेळी मात्र पोलिसांनी न्यायालयात या आरोपीविरोधात सदन्यान आरोपीप्रमाणे खटला चालवण्याची विनंती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता या गंभीर प्रकरणात आरोपीला शिक्षा होण्याची शक्यता आहे दरम्यान, जखमी गौरव निकम याच्यावर सध्या मुंबईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. रेल्वे सुरक्षा यंत्रणांची कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. Byte पंढरीनाथ कांदे ( कल्याण जीआरपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक)
9
Report
SKSACHIN KASABE
Aug 04, 2025 10:48:26
Pandharpur, Maharashtra:
04082025 Slugv- PPR_SENA_RADA file 01 ---- Anchor - शिवसेनेच्या दोन गटांमध्ये पंढरपूरमध्ये राडा शिवसेनेचे संपर्क नेते शिवाजी सावंत यांच्या राजीनाम्या नंतर आज पंढरपूर शासकीय विश्राम गृहात बैठक बोलावण्यात आली होती पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला डावल जात असल्याचा आरोप सावंत यांनी केला होता त्यांच्या समर्थनात अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते यानंतर पक्षाचे निरीक्षक संजय कदम यांनी बैठक बोलावली होती त्यांच्या समोरच दोन गट भिडले सोलापूर जिल्ह्यात शिवाजी सावंत विरुद्ध महेश साठे असे दोन गट निर्माण झाले आहेत
9
Report
SMSATISH MOHITE
Aug 04, 2025 10:46:45
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_Solar Feed on - 2C ----------------------- Anchor - सोलार बसवून दिड वर्ष उलटले तरी जोडणी न दिल्याने नांदेड जिल्हा परिषदेचे सोलार धुळखात पडून असल्याचा प्रकार झी 24 तासने उघड केला होता. जवळपास 70 ते 80 लाख रुपये खर्चून सोलार बसवन्यात आले होते. मात्र महावितरनची जोडणी न दिल्याने सोलार बंद अवस्थेत होते. सोलार बसवूनही वापराविना पडून असल्याने जिल्हा परिषदेला दर महिन्याला लाखो रुपयांचे बिल भरावे लागत होते. आमदार आनंद बोनढारकर यांनीही जिल्हा परिषदेत जाऊन सोलार बंद असल्याबाबत अधिकाऱ्यांची कानउघानी केली होती. जिल्हा परिषदेचा हलगर्जिपणा उघड केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनीस्वतः लक्ष घालून सोलार सुरु करून घेण्यासाठी पाठपुरावा केला. शनिवारी महावितरनणे जोडणी देऊन सोलार यंत्रणा सुरु केली. Byte - संतोष शिंदे - कार्यकारी अभियंता जी. प. नांदेड ------------------
12
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 04, 2025 10:45:47
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 0408_BHA_MAHAYUTI_PKG FILE - 8 VIDEO भंडारा जिल्ह्यात भाजपा शिवसेना वाद शिगेला.... नरेंद्र भोंडेकर व परिणय फूके यांच्यात दुरावा... शिवसेनेचा बाप मीच अस फुकेच वक्तव्य.... फुकेणी जाहीर माफी मागावी शिवसेनेची भूमिका.... Anchor :- भाजप आमदार परिणय फुके यांनी महसूल दिनाच्या कार्यक्रमात शिवसेनेचा बाप मीच,.. असे वादग्रस्त वक्तव्य केले. आता हा वक्तव्य चांगलाच शिगेला गेला असून राज्यात महायुती मध्ये आता वाद पेटला आहेः.... Vo :- *शिवसेनेचा बाप मीच आहे*..... आमदार परिणय फूके यांच्या वक्तव्याने राज्यात महायुतीमध्ये मोठा वाद पेटला आहे.... भंडारा जिल्ह्यात परिणय फुके व आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा वाद काही नवीन नाही.... 2019 च्या विधान सभा निवडणुकीत नरेंद्र भोंडेकर हे अपक्ष मैदान होते. भाजपा वतीने अरविंद भालाधरे यांना मैदान उतरवल होत. यात नरेंद्र भोंडेकर यांचा विजय झाला. पुन्हा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुती मध्ये भंडारा विधानसभा शिवसेनेच्या वाट्याला गेली. यात शिवसेनेकडून नरेंद्र भोंडेकर हे मैदानात होते. पण परिणय फुके यांना भोंडेकर नको होते. शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा विरोध म्हणून फुकेंनी भंडारा विधानसभेची जागा भाजपला द्यावी असा अठ्ठहास केला होता. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास मर्जीतील नरेंद्र भोंडेकर असल्यामुळे. इथेही फुके यांची चालली नाही... अशा चर्चा रंगल्या होत्या या निवडणुकीत अपक्ष उमेदवार नरेंद्र पहाडे यांना भाजपाचा लोकांनी सहकार्य दिलं पण शेवटी निवडणूक जवळ येताच शिवसेनेच्या दबावानंतर परत भाजपाने महायुतीच्या उमेदवाराला मदत केली... त्यानंतर जून 2025 ला जिल्हा सहकारी दूध संघाची संचालक मंडळाची निवडणूक झाली व त्यात शिंदे सेनेचे आमदार भोंडेकर यांनी नवीन समीकर तयार करत काँग्रेस सोबत ही निवडणूक लढविली यातून पुन्हा नवीन वादाला सुरुवात झाली. त्यानंतर जुलै महिन्यात झालेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत भोंडेकर व फुके हे एकत्र निवडणूक लढविताना दिसले..... मात्र निकाल पुढे येताच शिंदे शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर यांनी पत्रकार परिषद घेत कुणाचेही नाव न घेता महायुतीत आमचा गळा कापला गेला असा आरोप लावला होता.... BYTE :- संजय कुंभलकर, VO :- 1 ऑगस्टला महसूल दिनाचे निमित्त साधून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भंडारा दौरा कार्यक्रमात परिणय फुके म्हणाले, माझ्यावर अनेकांनी खापर फोडले. मी काही कोणाच्या आरोपाला उत्तर देत नाहीत. पण त्या दिवशी मला हे माहीत झाले की, कसे असते तुमच्या घरी जर पोराला चांगले मार्क मिळाले, तर कोणाचे कौतुक होते पोरगा किंवा आई. काही चांगले झाले तर कोणी केले आईने केले आणि जर काही खराब झाले तर कोणी केले, बापाने केले. त्या दिवशी मला हे पक्क माहीत झाले की शिवसेनेचाही बाप मीच आहे, असे वादग्रस्त विधान परिणय फुके यांनी केले आहे. BYTE :- परिणय फूके, Vo :- तर परिणय फुके यांनी हे एका व्यक्तीवर टीका केली नाही तर पक्षावर केली आहे.... परिणय फुके परिपक्व नाही त्याच हे वक्तव्य पोरकट आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी असं वक्तव्य स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केलं आहे.... BYTE - नरेंद्र भोंडेकर, 121 VO :- महायुतीतील या दोन्ही पक्षाचे अंतर्गत वाढ हे मागील काही वर्षांपासूनच सुरू होते..... मात्र आता सहकार क्षेत्रातील निवडणुका व यांचे आलेले निकाल यामुळे आता हे वाढ चव्हाट्यावर आल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या वादाची ठिणगी पडणार आहे.... त्यामुळे भंडारा विधानसभा मतदार संघात भाजपा विरूद्ध शिवसेना असा संघर्ष पहायला मिळणार आहे...
14
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 04, 2025 10:34:56
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -Sat_Crocodile सातारा -कराड येथील प्रीतिसंगम घाटावर मगरचे दर्शन झालं आहे. कृष्णा आणि कोयना नदीचा संगमावर मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते .या घाटावर अनेक वेळा या भागात मगरीचे दर्शन झाले होते.आज या भागातील छायाचित्रकार सुरेश पवार यांनी dron कॅमेऱ्याच्या सहाय्याने या मगरीला चित्रीकरण केलं आहे.खूप मोठी अशी ही मगर असल्याने या संगमावर पोहण्यासाठी जाणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
13
Report
SMSATISH MOHITE
Aug 04, 2025 10:20:20
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_Sand Feed on - 2C ------------------------------ Anchor - गोदावरी नदीपात्रातून अवैध्य वाळू उपसा करणाऱ्या 3 बोट स्फ़ोट घडवून नष्ट करण्यात आल्या. नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध्य वाळू उपसा होतो. नायगाव तालुक्यातील बरबडा परिसरातील नदीत वाळू माफियानी थैमान घातले होते. दिवसरात्र बोटच्या सहाय्याने वाळू उपसा केला जात होता. पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या पथकाने 3 बोट पकडल्या. या तिन्ही बोटी जिलेटिनचा स्फोट करुन नष्ट करण्यात आल्या. --------------------
14
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 04, 2025 10:18:15
Khed, Maharashtra:
Feed 2C Slug: Khed Sairat File:05 Rep: Hemant Chapude(Khed) ब्रेक* *खेड/पुणे* - पतीला जबर मारहाण करत २८ वर्षीय पत्नीचे अपहरण - पुण्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी येथील धक्कादायक प्रकार - सैराट चित्रपटा सारखा अंतर जातीय प्रेम विवाहातून मारहाण आणि अपहरण झाल्याचा प्रकार - खेड पोलिस स्टेशनमध्ये मुलीचा भाऊ आणि आई सह १५ जणांवर अपहार आणि जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल - विश्वनाथ गोसावी आणि त्याची पत्नी प्राजक्ता गोसावी २८ वर्षीय असे मारहाण झालेल्या दांपत्याचे नाव Byte: विश्वनाथ गोसावी(पती) Byte: स्नेहल राजे (सहाय्यक पोलिस निरीक्षक ) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे
14
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 04, 2025 10:17:35
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0408ZT_JALNA_WAGHMARE(4 FILES) जालना : रोहीत पवार शेंबडा,त्याच्याच रसदीवर जरांगेंचं आंदोलन सुरुय ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा आरोप राशीनमध्ये झालेल्या घटनेची किंमत रोहित पवारांना चुकवावी लागेल रोहित पवार जातीयवादी, मतदान मागायला आल्यानंतर त्यांच्या तोंडाला काळं फासा- वाघमारे जरांगे बीडमध्ये जाऊन जाती जातीत भांडणं लावतो,स्वतः राहत असलेल्या मतदान संघात होणाऱ्या खून करणाऱ्या आरोपीबाबत जरांगे का बोलत नाही.? महादेव मुंडे प्रकरणात SIT नेमली म्हणजे त्यात त्यांनी बहादरकी मिळवून घेऊ नये.SIT नेमून काहीही होत नाही, अँकर : आमदार रोहीत पवार शेंबडा असून त्याच्याच रसदीवर जरांगेंचं आंदोलन सुरु असल्याचा आरोप जालन्यातील ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला आहे.रोहित पवार यांच्या मतदार संघातील राशीनमध्ये झालेल्या घटनेची किंमत रोहित पवारांना चुकवावी लागेल असा ईशारा वाघमारे यांनी रोहित पवार यांना दिला आहे.रोहित पवार जातीयवादी, मतदान मागायला आल्यानंतर त्यांच्या तोंडाला काळं फासा असं आवाहन देखील वाघमारे यांनी पवारांच्या मतदार संघातील जनतेला केलं आहे.जरांगे बीडमध्ये जाऊन जाती जातीत भांडणं लावतो,स्वतः राहत असलेल्या मतदार संघात होणाऱ्या खून करणाऱ्या आरोपीबाबत जरांगे का बोलत नाही.?या खुनातील आरोपींना पकडण्याबाबत का बोलत नाही असा सवाल वाघमारे यांनी केला आहे.महादेव मुंडे प्रकरणात SIT नेमली म्हणजे त्यात त्यांनी बहादरकी मिळवून घेऊ नये.SIT नेमून काहीही होत नाही,जरांगे यांच्या अंतरवालीतील SIT चौकशीचं काय झालं असं सवाल देखील वाघमारे यांनी केला आहे. बाईट नवनाथ वाघमारे, ओबीसी नेते
14
Report
MAMILIND ANDE
Aug 04, 2025 10:16:35
Wardha, Maharashtra:
वर्धा SLUG- 0408_WARDHA_RAIN - वर्ध्यात आठवडाभरानंतर बरसलाय पाऊस - उकाड्यापासून हैराण सामान्य नागरिकाला मिळालाय दिलासा - पाऊस झाल्यानं पिकाला मिळालय जीवदान - येत्या काही दिवसात उकाडा वाढण्याची शक्यता अँकर - वर्ध्यात गेल्या आठवडाभऱ्याच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावलीय. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहेय. गेल्या काही दिवसात उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. पाऊस झाल्यानं वातावरणात गारवा निर्माण झालाय. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. त्यामुळं पाऊस येण्याची शक्यता वर्तविली जात होती.असाच पाऊस अधून मधून सुरू राहिल्यास पिक वाढी साठी चांगली मदत होऊ शकते...
14
Report
Advertisement
Back to top