Back
साताऱ्यात पावसाचा कहर: छत्रपती शाहू महाराजांची समाधी पाण्याखाली!
TTTUSHAR TAPASE
Aug 19, 2025 10:24:39
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_RAIN_WKT
सातारा - सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.यामुळे कृष्णा आणि वेण्णा नद्या दुथडी भरून वाहत आहेत.साताऱ्यातील संगम माहुली या ठिकाणी असणारी छत्रपती शाहू महाराज थोरले यांची समाधी पाण्याखाली गेली आहे.त्याच बरोबर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातून देखील विसर्ग वाढविण्यात आला आहे.सध्या कोयना धरणातून 80500 क्युसेक एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातो आहे.साताऱ्यातील पावसाचा या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी...
wkt
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowAug 19, 2025 13:05:00Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील पळशी आणि संगम चिंचोली गावाचा पुराच्या पाण्यामुळे संपर्क तुटला आहे.
त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन पथक पळशी आणि चिंचोली संगम मध्ये दाखल झाले आहे. पैनगंगा नदी पात्रात ईसापुर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने पैनगंगेने रौद्ररूप धारण केले आहे. पुराचे पाणी शेतशिवारासोबतच आता पळशी आणि संगम चिंचोली या गावांमध्ये शिरल्याने गावांना पाण्याचा वेढा घातला आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी बोटीद्वारे स्थलांतरित केल्या जात आहे.
0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowAug 19, 2025 12:49:39Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.Name : 1908ZT_MAVAL_RAIN_LONAVLA
Total files : 02
Headline -लोणावळ्यात 10 तासांत 150 मिलिमीटर पाऊस बरसला.
Anchor:
पर्यटन नगरी लोणावळ्यात आज पावसाने तुफान बॅटिंग केलीये. अवघ्या दहा तासांत 150 मिलिमीटर पाऊस बरसलाय. सकाळी 7 ते सायंकाळी 5 दरम्यान पावसाने विक्रमी नोंद केलीये. यंदाच्या मोसमात दहा तासांत पहिल्यांदाच पावसाने अशी बॅटिंग केलीये. घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी केल्यानं अन तसा पाऊस ही बरसत असल्यानं लोणावळ्यातील सर्व शाळांना उद्या आणि परवा सुट्टी ही जाहीर केलेली आहे. तर मावळ तालुक्यातील सर्वच धरणांमधून मोठा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्याने मावळ तालुक्यातील जनतेला महत्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
मावळातील धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग :
-पवना धरण- 9950 क्यूसेस
-कासारसाई धरण- 1480 क्यूसेस
-मुळशी धरण- 19,500 क्यूसेस
-वडिवळे धरण- 7574 क्यूसेस
या प्रमाणे मावळ मधील धरणांतून विसर्ग चालू आहे.
2
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 19, 2025 12:49:18Nashik, Maharashtra:
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_ganpati
*नाशिक ब्रेकिंग*
- *नाशिकमध्ये गणेशोत्सवातील शेवटचे पाच दिवस विशेष मुभा*
- नाशिकमध्ये शेवटचे पास दिवस रात्री १२ वाजेपर्यंत देखावे सुरू ठेवता येणार
- रात्री १० वाजताच देखावे बंद करण्याचा आजवर होता नियम
- या पूर्वी शेवटचे २ किंवा ३ दिवस मिळत होती १२ वाजे पर्यंत परवानगी
- नाशिक जिल्हाधिकारी यांनी अधिकाराचा वापर करत दिलीये मुभा
- *१५ दिवस रात्री १२ पर्यंत सण उत्सव साजरे करण्यासाठीच्या परवानगीचे आहेत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार*
- त्या अधिकाराचा वापर करत जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव काळात शेवटचे ५ दिवस रात्री १२ पर्यंत साजरा करण्याची दिलीये परवानगी
- *आता राज्य सरकार यामध्ये वाढ करून १० संपूर्ण दिवस रात्री १२ वाजेपर्यंत गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी देण्याची शक्यता*
5
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 19, 2025 12:47:29Nashik, Maharashtra:
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_dam
नाशिक -
- संततधार पावसानं नाशिक जिल्ह्यातील १४ धरणं ओव्हर फ्लो
- तर जिल्ह्यातील २४ लहान मोठ्या धरणांमधील पाणीसाठा ८५ टक्क्यांवर
- नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ८४.२५ टक्के पाणीसाठा
- गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास कधीही धरणातून पाणी सोडण्याचा इशारा
- तर जिल्ह्यातील अन्य ११ धरणांमधून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग
- नाशिकला आज देखील पावसाचा रेड अलर्ट
- धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवणार
- नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
*जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील सध्याचा पाणीसाठा*
गंगापूर - ८४.२५ टक्के
दारणा - ८७.३७ टक्के
मुकणे - ९५.१८ टक्के
नांदुरमध्यमेश्वर - ९६.५० टक्के
गिरणा - ६९.९४ टक्के
चणकापूर - ७० टक्के
4
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 19, 2025 12:38:07Ambernath, Maharashtra:
बारवी धरणाच्या पाण्याच्या विसर्ग वाढला
185 क्यूसेक्स प्रति सेकंद विसर्ग सुरू
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Bdl dam
Anchor आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्याची तहाण भागवणाऱ्या बदलापूर जवळील बारवी धरणातून पाण्याचा विसर्गामध्ये मोठी वाढ झाली आहे.आता धरणाच्या 11 दरवाजांवरून 185 क्यूसेक्स प्रति सेकंद विसर्ग सुरू झालाय, धरणातून होणारा विसर्ग वाढल्याने बारवी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. या नदी काठावर असलेल्या गावांना एमआयडीसी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
6
Report
MKManoj Kulkarni
FollowAug 19, 2025 12:35:13Mumbai, Maharashtra:
अँकर -- मुंबईत आज पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची लाइफ लाइन असलेली लोकल ठप्प झाली आहे. CSMT ते ठाणे अप आणि डाऊन लोकल सेवा सहा ते तास ठप्प झाली आहे.अनेक लोकल रेल्वे स्थानकादरम्यान उभय आहेत.प्रवासी लोकल सुरू होण्याची वाट बघत आहेत. मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकातून ठाण्याच्या दिशेला लोकल सुरू करण्याचा प्रयत रेल्वेने केला पण तोही पूर्ण होऊ शकली नाही.त्तर हार्बर मार्गावरील मानखुर्द ते CSMT सेवा ७ तासापासून बंद आहे.पश्चिम रेल्वेची सेवा चर्चगेट ते विरार सुरू आहे पण तीही अर्धा तास उशिराने धावत आहे.यात फक्त हार्बर मार्गावरील CSMT ते वांद्रे गोरेगाव सुरू होती.यामुळे प्रवाश्यांना खूप त्रास सहन करावा लागला
मनोज कुळकर्णी
3
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 19, 2025 12:34:11Pandharpur, Maharashtra:
19082025
Slug - PPR_UJANI_DAM
file 02
-----
Anchor - उजनी धरणातून भीमा नदीकाठचे पूर नियंत्रण करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. आज सायंकाळी २६ हजार इतका हा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
उजनी धरण सध्या 104 टक्के भरले आहे. सद्य स्थितीत पुणे जिल्ह्यात आणि उजनी धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे.
पूर नियंत्रण करण्यासाठी भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे भीमा नदी काठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. जर पाऊस वाढला तर हा विसर्ग वाढवला जाऊ शकतो.
2
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 19, 2025 12:16:36Akola, Maharashtra:
Anchor : राज्यातील ३५ जिल्ह्यांतील विविध शासकीय विभागांचे काम करणाऱ्या कंत्राटदारांनी तब्बल ९० हजार कोटी रुपयांच्या थकीत देयकांसाठी अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन छेडले आहे.सार्वजनिक बांधकाम, जलजीवन मिशन, ग्रामविकास, जलसंपदा आदी विभागांची कामे पूर्ण करूनही गेल्या आठ महिन्यांपासून देयक मिळाले नसल्याचा आरोप करत कंत्राटदारांनी ‘फाशी आंदोलन’ पुकारले..कंत्राटदारांनी आरोप केला की, निधीअभावी अनेक कामे ठप्प झाली आहेत. मुदतवाढही विनादंड दिली जात नाही, उलट प्रशासकीय दबाव आणत नोटिसा देऊन जबरदस्तीने काम सुरू ठेवण्यास भाग पाडले जात आहे.
या उदासीनतेमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले असून, “आम्हाला फाशी घेण्याची वेळ आली आहे” असा संतप्त आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे.
Byte : सुरेश नाठे, संघटना पदाधिकारी, अकोला
8
Report
MKManoj Kulkarni
FollowAug 19, 2025 12:15:23Mumbai, Maharashtra:
अँकर -- आज सकाळी पडलेल्या पावसाने मुंबईत सर्वत्र पाणीच पाणी झाले.याचा परिणाम लोकल सेवा गेल्या पाच तासांपासून ठप्प आहे तर रस्ते वाहतूक कासव गतीने सुरू आहे.मध्य रेल्वेच्या माटुंगा सायन कुर्ला स्थानकादरम्यान पाणी साचले होते तर हार्बर मार्गावर चुनाभट्टी, वडाळा स्थानकादरम्यान लोकल रेल्वे एकाच ठिकाणी थांबलेल्या आहेत.दादर स्टेशन बाहेर प्रवासी बस,टॅक्सी,ओला उबेर ची वाट बघत आहेत पण काहीच मिळत नाही.जी टॅक्सी येते त्यावाभोवती अनेक प्रवासी गर्दी करत आहेत तर ओला उबेर ने आपले भाडे वाढवले तर टॅक्सी चालक अवाच्या सव्वा भाडे मागत आहेत.दादर स्थानकाबाहेरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी
Wkt,Woxpoc
मनोज कुळकर्णी
Feed send TVU ८१
Slug -- Dadar wkt n woxpock
3
Report
KJKunal Jamdade
FollowAug 19, 2025 12:05:09Shirdi, Maharashtra:
Anc - बाळासाहेब थोरात यांना औरंगजेबाचा पुळका येत असेल तर त्यांचा DNA तपासावा लागेल असं वक्तव्य आमदार अमोल खताळ यांनी केलंय.. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता असून बाळासाहेब थोरात यांनी खताळ यांना प्रतिउत्तर दिलंय.. DNA काय असतो ते अमोल खताळ यांना माहीत देखील आहे का..?.. त्यांच्याकडे बौद्धिक पातळी नाही, त्यामुळे कुणीतरी लिहून दिलेलं त्यांनी वाचलं असेल असा पलटवार थोरात यांनी केलाय..
V/O - संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे कीर्तनात झालेल्या राड्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे.. कीर्तनकार संग्राम भंडारे हे औरंगजेब आणि अफजल खानाचे उदाहरण देत असल्याने बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी चालू कीर्तनात गोंधळ घातल्याचा आरोप आमदार अमोल खताळ यांनी केलाय.. घटनेच्या निषेधार्थ आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वात संगमनेर येथे काल हिंदुत्ववादी संघटनांनी रास्तारोको आंदोलन केले.. भाषणादरम्यान आमदार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरातांवर टिका करताना थेट त्यांचा DNA तपासण्याचे वक्तव्य केले.. आम्ही मामाला टेकवला आता भाच्याला अर्थात आमदार सत्यजीत तांबे यांना देखील टेकवू अशी टीका खताळ यांनी केलीये...
Sound Byte - अमोल खताळ, आमदार संगमनेर, शिवसेना शिंदे गट
V/O - खताळ यांच्या टिकेला बाळासाहेब थोरात यांनी प्रतिउत्तर दिलंय.. खताळ यांचे वक्तव्य म्हणजे निच आणि खालच्या पातळीच्या राजकारणाचे उदाहरण आहे.. DNA काय असतो ते अमोल खताळ यांना माहीत देखील आहे का?.. त्यांच्याकडे बौद्धिक पातळी नाही, त्यामुळे कुणीतरी लिहून दिलेलं त्यांनी वाचलं असेल असा पलटवार थोरात यांनी केलाय..
Byte - बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेते तथा माजी मंत्री
11
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 19, 2025 11:30:52Raigad, Maharashtra:
स्लग - धबधब्यात अडकलेल्या पर्यटकांची सुटका .....
अँकर - खोपोली येथील झेनिथ धबधब्याच्या प्रवाहात अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. तमिळनाडू येथील 15 पर्यटक खोपोली येथील झेनिथ धबधबा पहाण्यासाठी आले होते पावसामुळे अचानक वाढलेल्या धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने हे 15 पर्यटक प्रवाहात अडकले होते. खोपोली पोलिसांना याबाबत माहिती मिळताच खोपोली पोलिस, खोपोली नगर पालिका अग्नीशमनदल आणि हेल्प फाऊंडेशन यांनी बचाव कार्य करीत या पर्यटकांची सुटका केली.
6
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 19, 2025 11:30:46Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - कामतीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी हराळवाडी ग्रामस्थांचे चिखलात ठिय्या आंदोलन
Anchor - कामती गावाला जोडणारा हराळवाडी येथील प्रमुख मार्ग करण्याच्या मागणीसाठी हराळवाडी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत चिखलात ठिय्या आंदोलन केले. पावसाचे पाणी खड्ड्यात साचत असल्याने मोठ्या प्रमाणात चिखल जमा झालाय. ग्रामस्थांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, तसेच रुग्णालयात जाणारे वृद्ध नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
बाईट -
ग्रामस्थ
7
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 19, 2025 11:30:30Ambernath, Maharashtra:
कल्याण-कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली
बदलापूरच्या जुवेली गावाजवळ पावसाचं पाणी तुंबलं
पाणी तुंबल्यानं वाहन चालकांची तारेवरची कसरत
Bdl rain water
Anchor - मुसळधार पावसामुळे बदलापुरात कल्याण-कर्जत राज्य महामार्गावर पाणी साचलय. जुवेली गावाजवळ पाणी तुंबल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय. या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प आहेत. सखल भागात रस्ता असल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याचा कुठलाही मार्ग नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फा गटारही काढलेलं नाही. त्यामुळे या ठिकाणी पाणी तुंबलं असून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागतीय.
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
4
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 19, 2025 11:17:53Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1908ZT_NANDED_FOUND(5 PHOTOES)
नांदेड : ब्रेकिंग
आतापर्यंत वाहून गेलेल्या एकूण 4 जणांचे मृतदेह सापडले,एकाचा शोध सुरू
काल सापडले होते 3 महिलांचे मृतदेह
आज एका महिलेचा मृतदेह सापडला
सर्व मृत हसनाळ गावातील रहिवासी आहेत
अँकर : नांदेड जिल्ह्यातील हसनाळ येथून 5 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले होते.यातील 3 महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात काल SDRF च्या पथकाला यश आलं होतं.वाहून गेलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी आज आणखी शोध मोहीम राबवण्यात येत आहे.यात एका महिलेचा मृतदेह शोध मोहीमे दरम्यान हाती लागला आहे.दरम्यान एक जण अजूनही बेपत्ता असून बेपत्ता असलेल्या एकाचा शोध सुरु आहे.
11
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 19, 2025 11:16:49Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1908ZT_CHP_PWD_PROTEST
( single file sent on 2C)
टायटल :-- चंद्रपूर जिल्ह्य़ातील कंत्राटदारांची देयके थकली, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, प्रलंबित देयके द्या, मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन
अँकर :---- महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम, जलजीवन मिशन, ग्रामविकास, जलसंपदा यांसारख्या विभागांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची आठ महिन्यांपासून देयके प्रलंबित आहेत. शासन निधी उपलब्ध करून न दिल्याने विकासकामे ठप्प झाली असून लाखो मजूर, अभियंते, वाहतूकदार व पुरवठादारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघासह विविध संघटनांच्या वतीने आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रलंबित देयके तातडीने द्यावी ही विनंती मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देत करण्यात आली.
बाईट १) जगदिश लवाडीया, जिल्हाध्यक्ष चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
10
Report