Back
पावसाने शेतकऱ्यांचा उत्साह वाढवला, भात लागवडीस सुरुवात!
TTTUSHAR TAPASE
FollowJul 11, 2025 06:04:34
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_BHAT_LAGAN
साताऱ्याच्या पश्चिम भागात दमदार पावसामुळे भात लागवडीस सुरुवात झाली आहे. वेळेकामथी आणि कण्हेर परिसरात शेतकरी गारवा, चिखल आणि पावसाची तमा न बाळगता भात लावण्यात मग्न आहेत. वाफेतील भाताची रोपे काढून त्याच्या जुड्या तयार केल्या जात असून बैल आणि यंत्राच्या सहाय्याने चिखल करून ओळीने भात रोपण होत आहे. काही शेतकरी पेरणी करतात, तर अनेकजण लागवडीवर भर देतात. शेतकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहतोय आणि सामूहिक कामाच्या जोरावर भात लावणी सुरू आहे.
13
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 11, 2025 12:38:35Raigad, Maharashtra:
स्लग – अलिबाग मुरूडमध्ये चरस पुरवणारी टोळी जेरबंद ....... आतापर्यंत 13 जणांना अटक ........ साडेतेरा लाखांचे अडीच किलो चरस जप्त .........
अलिबाग- अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील पर्यटन स्थळी अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी रायगड पोलीसांनी जेरबंद केली आहे. या प्रकरणी तब्बल १३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण १३ लाख ६१ हजार रुपये किंमतीचे २ किलो ६५९ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधील पोखरभिंडा येथे राहणारा विशाल जैसवाल हा टोळी चालवत होता. नेपाळमधून चरस आणून अलिबाग, मुरुड मध्ये स्थानिक साथीदारांना चरस विक्रीसाठी देत होता. स्थानिक दुकानदार, बीचवरील घोडेवाला, आईस्क्रीम विक्रेता अशा वेगवेगळ्या घटकात काम करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून त्याने स्वतःची टोळी निर्माण केली होती. पर्यटकांना आणि स्थानिक तरुणांना अंमली पदार्थांचा मागणीनुसार ही टोळी पुरवठा करत होती.
बाईट – आंचल दलाल , पोलीस अधिक्षक
2
Share
Report
APAMOL PEDNEKAR
FollowJul 11, 2025 12:38:21Mumbai, Maharashtra:
अँकर
मुलुंड मधील पालिकेच्या प्रियदर्शनी क्रीडा संकुलातील जलतरण तलाव गेली अनेक वर्ष यांना त्या कारणामुळे बंद आहे ज्याचा फटका येथील सभासदांना बसला आहे त्यात आता या जलतरण तलावाच्या दागडूजीचे 18 कोटींचे टेंडर काढण्यात आलेले आहे यासाठी पुन्हा एकदा हा जलतरण तलाव बंद करण्यात आलेला आहे याच्या विरोधात काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी प्रियदर्शनी क्रीडा संकुलाच्या बाहेर आंदोलन केले वर्षभरापूर्वी याच कामाचे टेंडर काढण्यात आले आणि आता पुन्हा एकदा 18 कोटी रुपये खर्चून याच कामाची दगडोजी केली जाते त्यामुळे सदर कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे
बाईट.... राकेश शेट्टी
0
Share
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 11, 2025 12:06:22Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 1107ZT_MAVAL_RAILWAY
Total files : 01
Headline :खंडाळा मंकीहिल जवळ मालगाडी घसरली
मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प
Anchor :
कर्जतहून पुण्याकडे जाणारी मालगाडी खंडाळा मंकीहिल जवळ रुळावरून घसरल्याने मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. गाडीच्या ब्रेकची चाक निखळल्यामुळे मंकीहिल स्टेशनजवळ मुख्य लेनवर मालगाडी गेल्या दीड तासापासून बंद आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. ही घटना झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
2
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 11, 2025 12:05:31kolhapur, Maharashtra:
नागपूर
नागपूरातल्या शिवाजीनगर येथील एका पब मध्ये दोन गटात झालेल्या मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय
टेबल वरून झालेला वाट पाहता पाहता जोरदार मारामारीत रूपांतरित झाला
गेल्या आठवड्यात रात्री अकरा वाजताच्या सुमारास ही घटना असल्याचं सांगण्यात येत आहे.. या पब मध्ये अल्पवयीन मुलांना येत असल्याचा आरोपही होत आहे
1
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 11, 2025 12:05:24Washim, Maharashtra:
वाशीम:
File:1107ZT_WSM_WATER_PIPELINE_LEAKAGE
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम शहरातील शर्मा पेट्रोल पंप समोर नगर परिषदची शहराला पाणी पुरवठा करणारी नवीन पाईप लाईन फुटली आहे.त्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.यापूर्वी ही पाईप लाईन फुटली असून अनेक वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे.मात्र तरी वारंवार पाईप लाईन फुटतच आहे.शर्मा पेट्रोल पंप समोर एक बॅटरी ची दुकान आहे.या दुकानातून नेहमीच बॅटरी मधील ऍसिड या पाइपलाइन मधील नाली मध्ये सोडले जाते.त्यामुळे ही पाईपलाईन फुटत असल्याचे बोललं जातं आहे.याकडे नगर पालिकेने लक्ष देऊन त्या बँटरी दुकान चालकाला समज देऊन जलवाहीनीची कायम स्वरूपी ही दुरुस्त करण्याची गरज आहे.
1
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 11, 2025 12:03:34Dhule, Maharashtra:
ANCHOR - नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये यंदा पाऊस प्रशासनाची पोलखोल करीत आहे. रस्त्या आणि पुलाभावी कमरे इतक्या पाण्यातून वाट काढत एक अंत्ययात्रा काढण्याची वेळ अक्कलकुवा तालुक्यात आली. नदीला पूल आणि रस्ता नसल्याने पुराच्या पाण्यातून अंतयात्रा काढण्याची वेळ नातेवाईकांवर आली. अक्कलुवा तालुक्यातील मोरांबा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रोजकुंड गावातील ही दुर्देवी घटना असून, गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करून देखील नदीवर पूल आणि रस्ता होत नसल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. पाऊस आणि पुराने अधिकच दैना या भागाची केली आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report
JMJAVED MULANI
FollowJul 11, 2025 12:00:12Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 1107ZT_DAUNDPKG
BYTE 3
त्रिशूल डोक्यात मारल्याने अकरा महिन्याच्या मुलाचा मृत्यू...
नवरा बायकोच्या भांडणात गेला निष्पाप मुलाचा जीव...
दौंड तालुक्यातील केडगाव आंबेगाव पुनर्वसन मध्ये घडली घटना...
Anchor:- पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव येथील आंबेगाव पुनर्वसन मध्ये गुरुवारी 10 जुलै रोजी एक धक्कादाय घटना घडलीय. नवरा बायकोचं भांडण झालं वाद विकोपाला गेला आणि बायकोने नवऱ्याला मारण्यासाठी त्रिशूल उभारला या घटनेत नवरा वाचला गेला पण त्रिशूळाचा घाव मात्र एका निष्पाप अकरा महिन्याच्या कोवळ्या जीवाच्या मस्तकी बसला. यात अवधूत सचिन मेंगवडे या 11 महिन्याच्या निष्पाप बालकाचा जागीच मृत्यू झालाय....
बाईट _ क्रमांक एक_ बापूराव दडस उपविभागीय पोलीस अधिकारी
Vo 2 _ नितीन अजिनाथ मेंगवडे हे केडगावमध्ये राहतात. किरकोळ गोष्टीवरून त्यांचे बायको पल्लवी सोबत भांडण झालं. त्यावेळी पल्लवीने नवरा नितीन याला मारण्यासाठी त्रिशूल उगारला.पण तो त्रिशूल नवरा बायकोचे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या भाऊजयीच्या कडेवर असणाऱ्या 11 महिन्याच्या बाळाच्या डोक्यात घुसला.यात अवधूतचा जागीच मृत्यू झाला.या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यामध्ये पती-पत्नीच्या विरोधात सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यवत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
बाईट_क्रमांक दोन_ बापूराव दडस उपविभागीय पोलीस अधिकारी
Vo 3_ या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पाहणी ही केली, आरोपींना ताब्यात घेतलं प्रथमदर्शनी हे अंधश्रद्धेचा भाग आहे का ? अशा चर्चा होत्या मात्र असा कोणताही प्रकार नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केल आहे...
नवरा बायकोच्या वादात केवळ आईच्या कडेवर बसून असणाऱ्या अकरा महिन्याच्या बालकाचा त्रिशूळ लागून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जावेद मुलाणी ,
झी 24 तास,
दौंड.
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 11, 2025 11:41:55Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_TANNASHAK
सातारा - साताऱ्यात शेतीसाठी लागणारी बनावट औषधे विक्रीस आणणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई करत तब्बल 12 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. करंजे नाका येथे सापळा रचून धैर्यशील घाडगे या संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आले. त्याच्या टेम्पोत बायर कंपनीच्या ‘राउंडअप’ नावाने बनावट औषधांचे 260 बाटल्या सापडल्या. पुढील तपासातून साताऱ्यातील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली. बनावट औषधे तयार करणाऱ्या कारखान्यांवरही छापे टाकून चारचाकी वाहनांसह मोठा साठा जप्त करण्यात आला.
14
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 11, 2025 11:36:26Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण येथे कापसाच्या आंतरमशागतीसाठी बैलजोडीच्या साह्याने काम करीत असलेले बैल मालक आणि दोन्ही बैलांचा विद्युत पोलला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून मृत्यू झालाय,
या घटनेत अल्पभूधारक शेतकरी प्रल्हाद गोपाळराव घांडगे (वय ४०) यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ते त्यांच्या लहान भाऊ विकास घांडगे सह गावशिवारातील गट क्रमांक २६८ मधील स्वतःच्या शेतात कापसाच्या आंतरमशागतीचे काम करीत होते,
2
Share
Report
PNPratap Naik1
FollowJul 11, 2025 11:36:19Kolhapur, Maharashtra:
Kop Teacher Andolan
Feed:- 2C
Anc :- अन्यायी संच मान्यतेचा आदेश रद्द करावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीचे अधिकार पूर्वीप्रमाणे संस्था चालकांना द्यावेत यासाठी कोल्हापुरात आज जंगी मोर्चा काढण्यात आला. आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य आणि संस्थाचालक सारे घटक या मोर्चात उतरल्यामुळे संच मान्यतेच्या निर्णयाच्या विरोधात संघटित शक्तीचे दर्शन घडल. या आंदोलनात आजी-माजी आमदारासह, मुख्याध्यापक संघ विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सहभाग घेतला. आंदोलनात महिला शिक्षकांची संख्या लक्षणीय होती. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी शाळा बंद करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
1
Share
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 11, 2025 11:02:05Latur, Maharashtra:
AC ::- लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील पन्नगेश्वर खाजगी साखर कारखान्यावर शेतकरी आणि कामगारांचे विविध प्रश्न घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेने मोर्चा काढला. हा साखर कारखाना भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केला होता. कर्मचाऱ्यांच्या पगारीचे १२ कोटी ५० लाख तात्काळ द्यावे, शेतकऱ्यांचे शेअर्स नियमित करा , जुन्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या जुन्या वेतनश्रेणीसह कामावर घ्यावे, शेतकऱ्यांचे थकीत बील तात्काळ द्यावे. अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. कारखाना प्रश्नाकडे याप्रश्नी वारंवार मागणी करूनही हा प्रश्न न सोडविल्यामुळेच हा मोर्चा काढण्यात आला आहे.
बाईट ::- शेतकरी
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 11, 2025 11:01:16Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली,पोलिसा आणि शेतकऱ्यांच्या मध्ये वादावादी..
अँकर - सांगली जिल्ह्यामध्ये नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गा विरोधी आंदोलन कायम आहे.तासगाव तालुक्यातल्या गव्हाण येथे चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी आक्रमक शेतकऱ्यांनी रोखून धरली आहे. मोजणी होऊ देणार नाही,अशी भूमिका शेतकरयांनी घेतली आहे.त्यामुळे चार दिवसांपासून प्रशासन मोजणी करू शकलेलं नाही,चौथ्या दिवशी शेतकऱ्यांनी आक्रमक पद्धतीने मोजणीला विरोध केलेला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात असणाऱ्या प्रशासनाच्या गाड्या बाहेर काढण्यावरून पोलीस आणि शेतकऱ्यांच्या मध्ये यावेळी वादावादीचा प्रकार देखील घडला आहे.आक्रमक शेतकरयांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी होऊ देणार नाही,अशी भूमिका शेतकरी व शेतकरी संघटनांकडून घेण्यात येत आहे,त्यामुळे मोजणी कशी करायची ,असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
बाईट - आबासाहेब पाटील - शेतकरी , गव्हाण, तासगाव.
1
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 11, 2025 10:34:35Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1107ZT_CHP_BANK_RESULTS
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसच्या वर्चस्वाला भाजपकडून आव्हान, *बहुमत आमच्याच कडे आहे, अध्यक्ष भाजपचाच होईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाचं गिफ्ट देऊ*, भाजप आमदार किशोर जोरगेवार यांचं वक्तव्य, तर गटातटाच राजकारण न करता चांगला अध्यक्ष निवडून देऊ अशी महाविकास आघाडीचे नेते आणि बँकेचे निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक रवींद्र शिंदे यांची प्रतिक्रिया
अँकर:-- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक तेरा वर्षानंतर काल पार पडली. या बँकेवर परंपरागतरीत्या काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. एकूण 21 संचालकांपैकी बारा संचालक याआधीच अविरोध निवडून आले होते. तर नऊ संचालक पदांसाठी काल मतदान पार पडले. आज चंद्रपूर शहरातील चांदा इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात मतमोजणी पार पडली. यात भाजप आणि काँग्रेस समर्थित संचालकांचा विजय झाला. बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसच्या वर्चस्वाला भाजपकडून आव्हान मिळाल्याचे चित्र आहे. *बहुमत आमच्याच कडे आहे, अध्यक्ष भाजपचाच होईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाचं गिफ्ट देऊ*, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी मतमोजणी पूर्ण झाल्यावर दिली आहे. तर गटातटाच राजकारण न करता या प्रमुख वित्तीय संस्थेवर चांगला अध्यक्ष निवडून देऊ अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे नेते आणि बँकेचे निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक शिवसेना उबाठा नेते रवींद्र शिंदे यांनी दिली आहे.
बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर
बाईट २) रविंद्र शिंदे, शिवसेना उबाठा नेते, बँक संचालक
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
5
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 11, 2025 10:05:44Parbhani, Maharashtra:
अँकर- आई वडिलांना कधि ही सोडून न राहिलेल्या मुलीच निवासी शाळेत मन रमत नसल्याने मुलीची टीसी परत मागणीसाठी शाळेत गेलेल्या पालकाला स्वस्थाचालक दाम्पत्याने जीवे ठार मारल्याची घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे. ही घटना शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी असून मयताच्या पत्नीने आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे...
व्हीओ- सांप्रदायिक वातावरणात वावरनाऱ्या एका सज्जन पित्याचा मग्रुर शिक्षण संस्थाचालकांनी बेदम मारहाण करून खून केल्याची घटना परभणीच्या झिरो फाटा येथील हायटेक रेसिडेन्सी स्कुल मध्ये घडलीय, परभणी तालुक्यातील उखळद येथील 42 वर्षीय जगन्नाथ हेंडगे हे सांप्रदायिक परिवातील सज्जन गृहस्थ होते,त्यांची मुलगी पल्लवीच्या शाळेतील मैत्रिणी झिरो फाटा येथील हायटेक रेसिडेन्सी स्कुल मधील शिकायला गेल्या होत्या,ही शाळा रेसिडेंशियल असल्याने जगन्नाथ यांनी पल्लवीच हट्ट बघून तिच्या मैत्रिणी बरोबर रेसिडेन्सी स्कुल मध्ये टाकलं,पण आई वडिलांना सोडून कधीच न राहिलेल्या पल्लवीचे मन त्या शाळेत रमत नसल्याने तिने घरी जाण्याचा हट्ट धरला,त्यांनतर जगन्नाथ हेंगडे चार दिवसातच पल्लविला घरी घेऊन गेले. एके दिवशी मयत जगन्नाथ हेंडगे आणि त्यांचे काका मुंजाजी हेंडगे हे या शाळेत टीसी काढण्यासाठी गेले असता संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि रत्नमाला चव्हाण या दाम्पत्याने सुरुवातीला कार्यालयात बेदम मारहाण केली,मारहाण करीत त्यांना बाहेर काढला आणि पुन्हा जगन्नाथ यांच्या काका मुंजाजी यांच्या समोर लाथा घातल्या,यातच जगन्नाथ यांचा जाग्यावर मृत्यू झल्याचा आरोप करीत मयताच्या काका मुंजाजी हेंडगे यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केलाय,
बाईट- मुंजाजी हेंडगे- मयताचे काका
बाईट- भास्कर हेंडगे- मयताचा भाऊ
बाईट- रवींद्रसिंह परदेशी -पोलीस अधीक्षक, परभणी
व्हीओ- पल्लवी केवळ चार दिवस या शाळेत निवासी होती, जगन्नाथ यांनी 2 हजार रुपये फी भरली होती,वर्षाभरासाठी आणखीन 28 हजार रुपये ते भरणार होते, पण पल्लवीच मन शाळेत रमत नसल्याने आता या शाळेतून नाव काढणं त्यांना आवश्यक बनल होत. त्यामुळे जगन्नाथ यांनी शाळेकडे टीसी माघीतली होती,पण शाळा व्यवस्थापनाने सर्व पैसे भरल्याशिवाय टीसी देणार नसल्याचा पवित्रा घेतला, त्यातूनच त्यांना बेदम मारहाण झाली, शिक्षना सारख्या पवित्र ज्ञान मंदिरात आपल्या पतीचा जीव घेतल्याने आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मयतची पत्नी यशोदा हेंगडे यांनी केलीय...
बाईट- यशोदा हेंगडे- मयतची पत्नी
व्हीओ- या घटनेने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजलीय,परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निवासी गुरुकुल शिक्षण पद्धती निर्माण झाल्या असून अनेक शाळा पालकांची पैश्यासाठी पिळवणूक करीत असल्याचा घटना नेहमीच घडत असतात, अद्याप आरोपी पोलिसांना सापडले नसल्याने पालक वर्गातून संतप्त भावना समोर येत आहेत...
गजानन देशमूख,झी मीडिया परभणी
11
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 11, 2025 10:01:16Raigad, Maharashtra:
स्लग - गेल प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा ...... जिल्हाधिकारी कार्यालयात खा. धैर्यशील पाटलांची बैठक ....... तीन मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा ...... प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन स्थगित ........
अँकर - अलिबाग तालुक्यातील गेल प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. खासदार धैर्यशील पाटील , जिल्हाधिकारी किशन जावळे, कंपनीचे अधिकारी, ठेकेदार यांनी प्रकल्पग्रस्ताशी सविस्तर चर्चा केली. सीएसआर निधी स्थानिक पातळीवर वापरावा, 264 जणांना कंत्राटी म्हणून कामावर घ्यावे तसेच आंदोलनात सहभागी झाल्यामुळे कमी करण्यात आलेल्या 600 जणांना पुन्हा कामावर घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मागील 16 दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन आज स्थगित करण्यात आले.
बाईट 1 - धैर्यशील पाटील , खासदार भाजप
बाईट 2 - महेश मोहिते , सरचिटणीस भाजप
5
Share
Report