Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

भिवंडी-आंजूर-चिंचोटी रोड पर खड्डे, 229 करोड़ खर्च के बाद भी बदहाल

UJUmesh Jadhav
Sept 17, 2025 10:16:36
Thane, Maharashtra
भिवंडी अंजूर फाटा ते चिंचोटी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तर भिवंडी वाडा महामार्गाची चाळण... तालुक्यातील रस्त्यासाठी २२९ कोटी ११ लाख मंजूर,पण नवरात्रीच्या तोंडावर खड्डे जैसे थे... ॲंकर... भिवंडी वाडा महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. तसेच अंजूर फाटा ते चिंचोटी या २४ किमीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. असे असतानाही याकडे संबंधित प्रशासनासह स्थानिक नेतेमंडळीचे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. प्रथमतः अंजूर फाटा ते चिंचोटी रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनाचा खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ मामा यांच्या कडून कांगावा करण्यात आला होता. परंतु गणेशोत्सवात गणेश भक्तांना बाप्पाचे आगमनासह विसर्जनही खड्ड्यातूनच करावे लागले‌. अशातच अवघ्या दोन-चार येऊन ठेपलेल्या नवरात्री उत्सव. या नवरात्रोत्सवाच्या तोंडावरही नवदुर्गा भक्तांना देवीची वाट या खड्ड्यातूनच काढावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त केला जातोय . सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याचा मात्र देखावा केला आहे. दोन दिवसापूर्वी तालुक्यातील खड्ड्यांमुळे संतप्त मनसे कार्यकर्त्यां कडून सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांना कुजलेला फुलांचा हार तर शाल टाकून निषेध व्यक्त करण्यात आला होता. असं असतानाही महामार्ग कोणत्या प्रकारची लांबी करण्यास सुरुवात करण्यात आलेली नाही आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Sept 17, 2025 12:18:47
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील बार्शी तालुक्यात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक, मनोज जरांगे पाटलांचे फोटो शासकीय कार्यालयात लावण्याच्या मागणीसाठी करण्यात येतय उपोषण ( WKT ) - सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक - मनोज जरांगे पाटील यांचे फोटो शासकीय कार्यालयात लावण्याच्या मागणीसाठी करण्यात येते उपोषण - बार्शीतील तहसील कार्यालयाच्या बाहेर गेल्या तीन दिवसांपासून मराठा समाजाचे सुरूय उपोषण - जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा आंदोलकांचा निर्धार याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 17, 2025 11:50:25
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर-करंजा रोडवरील नाल्याला आज सकाळपासून आलेल्या पुरामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सकाळपासून या भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्यानं नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.पूराच्या पाण्याचा जोर एवढा वाढला की पुलावरून पाणी वाहू लागलं असून त्यामुळे वाहनांची ये-जा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने पुलावरून पाणी ओसंडत असताना नागरिकांनी येथेून मार्गक्रमण करू नये, असे आवाहन केले आहे. सध्या या मार्गावरील वाहतूक बंद असल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 17, 2025 11:47:40
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या उमरखेड मध्ये सकल ओबीसी समाजाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक दिली. ओबीसी आरक्षणामध्ये कोणाचाही समावेश हा अन्यायकारक आहे लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना आरक्षण नसल्यामुळे ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज असताना शासनाने मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. हा समस्त ओबीसी बांधवांवर मोठा अन्याय आहे. हा अन्याय कदापिही खपवून घेणार नाही, असा इशारा देत सकल ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. आधीच मर्यादित संधी असलेल्या ओबीसी समाजातील घटकांना आणखी मागे ढकलण्याचे हे षडयंत्र आहे. असा आरोप यावेळी करण्यात आला.
0
comment0
Report
SKShubham Koli
Sept 17, 2025 11:39:03
Thane, Maharashtra: मनपाडा इडन वूड्समध्ये बिबट्याचा हल्ला भटक्या कुत्र्यांमुळे धोका वाढला... ठाण्यातील मानपाडा येथील इडन वूड्स, खेवरा सर्कल परिसरात काल मध्यरात्री बिबट्याने हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, परिसरातील वाढती भटक्या कुत्र्यांची संख्या ही बिबट्यांच्या वस्तीमध्ये वावर वाढण्याचे मुख्य कारण ठरत आहे. अन्नाच्या शोधात बिबटे निवासी वसाहतींकडे वळत असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला आहे. निवासी संघटनांनी सरकारला तातडीने भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र झोन तयार करण्याची आणि त्यांचे स्थलांतर करण्याची मागणी केली असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
2
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 17, 2025 11:38:34
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1709ZT_CHP_SUDHIR_BITE ( single file sent on 2C)  टायटल:-- मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर झालेल्या शाईफेकीचा भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केला तीव्र निषेध, समाजकंटकांवर कठोर कारवाईची केली मागणी अँकर:--मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याच्या प्रकाराचा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र निषेध केला आहे. महाराष्ट्रात पुन्हा अशा घटना होणार नाही अशी शिक्षा समाजकंटकांना झाली पाहिजे असेही ते म्हणाले. स्व. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना अशा प्रकारच्या घटनांबाबत एक जीआर काढण्यात आला होता, त्या जीआरचं पुन्हा अवलोकन करून जबाबदारी निश्चित करणे, अशा जागांच्या सुरक्षेची उत्तम व्यवस्था करणे याबाबत सरकार भविष्यात धोरण आखेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. बाईट १) सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 17, 2025 11:34:59
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Gondia Slug - 1709_GON_CHAKANKAR FILE - 4 VIDEO 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील महिलांच्या विविध समस्यांवर जनसुनावणी... राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांच्या विविध समस्यांवर जन सुनावणी.... राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन महिलांच्या तक्रारीचे निवारण करणार असल्याची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची माहिती.... Anchor : महिला आयोग आपल्या दारी या योजनेअंतर्गत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत... महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असून प्रत्येक महिला या ठिकाणी येऊन आपल्या तक्रारी दाखल करू शकत नाही... त्याकरिता त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन महिलांच्या काय तक्रारी आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत आणि त्यांच्या समस्या कशा प्रकारे सोडवल्या जातील यासाठी त्यांनी महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम हाती घेतला असून त्या निमित्त आज त्यांनी गोंदिया येथे आले आहेत. गोंदिया येथे त्यांना महिलांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाले असून विविध पॅनलच्या माध्यमातून या सर्व महिलांच्या तक्रारी सोडवण्याच्या त्यांनी यावेळी प्रयत्न केला. तसेच तक्रारींवर काम करून त्यांच्या निराकरण करण्याच्या आश्वासन त्यांनी दिलं आणि दर महिन्याला याचा आढावा घेऊन या महिलांच्या ज्या तक्रारी असतील त्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितले. आणि या जन सुनावणी च्या माध्यमातून महिलांना न्याय देण्याच्या प्रयत्न करत असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले... BYTE :- रूपाली चाकणकर, अध्यक्ष राज्य महिला आयोग...
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 17, 2025 11:34:32
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज बंजारा समाजाने अनुसूचित जमातीचे (एस.टी.) आरक्षण लागू करण्यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. आंध्रप्रदेश व तेलंगणात बंजारा समाजाला एस.टी. आरक्षण आहे. तसेच भाषावार प्रांत रचनेपूर्वी आंध्रप्रदेश आणि सी.पी. ॲन्ड बेरारमध्येही या समाजाला आदिवासी आरक्षणाचा लाभ मिळत होता. मात्र महाराष्ट्रात आजही समाज वंचित असल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.नांदेड, परभणी, संभाजीनगर, उस्मानाबाद, बीड, जालना, लातूर, हिंगोलीसह राज्यातील सर्व जिल्ह्यांतील बंजारा समाजाला तात्काळ एस.टी. आरक्षण द्यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहून शासनाविरोधात घोषणाबाजी केली.
0
comment0
Report
SKShubham Koli
Sept 17, 2025 11:21:01
Thane, Maharashtra:देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठाण्यातील भाजपा कार्यालयात प्रदेशाध्यक्षांनी पंधरवड्या निमित्ताने रक्तदान शिबिराला भेट दिली... *भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण बाईट पॉइंटर* - देशासाठी आणि जगासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिवस आहे हा जन्मदिवस संपूर्ण देशभरामध्ये सेवा संघटन या नावाखाली सर्व देशांमध्ये असणाऱ्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये वसुदेव कुटुंब म्हणून जगभरामध्ये देशाचं नाव वाढवता येतं असं नेतृत्व ज्यांना पंतप्रधान बद्दल आधार आहे असे सगळेच एनजीओ संस्था प्रत्येक जण सेवाभावी उपक्रम करून नरेंद्र मोदींना त्यांचा काम करत असताना देशाची सेवा करत असताना देशाची सेवा करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त म्हणून सर्वजण ईश्वराकडे प्रार्थना करत आहे सेवाभावी प्रकल्पांमध्ये जनतेची सेवा करून जनतेकडून जाशीर्वाद मिळत आहेत त्या आशीर्वाद सुद्धा देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळावे यासाठी सर्वजण त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून बळ देण्याचे काम करत आहे - आज पासून येत्या 2 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून या शुभेच्छा कामाच्या रूपाने उपक्रमाच्या रूपाने त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे - टीका करणाऱ्यांना टीका करू द्या आणि काम करणाऱ्यांना काम करू द्या - जनसेवेच्या माध्यमातून जे घेतलेला उरात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हे पुढच्या पिढीपर्यंत प्रत्येकापर्यंत असाच अविरतपणे पोहोचला पाहिजे हा संदेश या पंधरवड्याच्या माध्यमातून हा जनतेला द्या हेच आपल्या सर्वांना विनंती
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 17, 2025 11:06:13
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - कुणबी अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी समाजाचा विटा येथे धडक मोर्चा.. अँकर - मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देऊ नये,या मागणीसाठी सांगलीच्या विटा येथे ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.विटा तहसील कार्यालयावर ओबीसी समाजाच्यावतीने मोर्चा काढत राज्य सरकारने मराठा समाजाल आरक्षणाबाबत काढलेले कुणबी अध्यादेश रद्द करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.जोरदार घोषणाबाजी करत विटा शहरातील प्रमुख मार्गावरून विटा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकार्‍यांना देत राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
1
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 17, 2025 11:03:21
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1709ZT_CHP_HEALTH_MISSION_1_2_3 ( 3 file sent on 2C)   टायटल:-- ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा उपजिल्हा रुग्णालयात संपन्न, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. अँकर:-- महिलांच्या आरोग्य सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारतर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत देशभर राबविण्यात येणाऱ्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज राजूरा उपजिल्हा रुग्णालयात खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते झाला. या अभियानातून चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल 23 लाखांहून अधिक नागरिकांना आरोग्यसेवेचा थेट लाभ मिळणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील 345 आयुष्यमान आरोग्य मंदिरे, 65 प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये, तसेच खाजगी आणि धर्मदाय संस्थांतर्फे आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. महिलांच्या आरोग्य तपासणी, माता-बाल आरोग्य, सिकलसेल व रक्तक्षय तपासणी, लसीकरण, मानसिक आरोग्य समुपदेशन, किशोरवयीन जनजागृती, रक्तदान, आहार मार्गदर्शन, कॅन्सर तपासणी अशा विविध आरोग्यसेवा या अभियानात दिल्या जाणार आहेत. सर्व तालुक्यातील रुग्णालयांमध्ये 2 ऑक्टोबरपर्यंत हा उपक्रम राबवून महिलांचे आरोग्य, त्यातून कुटुंब व समाज सशक्त करण्याचा संदेश देण्यात येणार आहे. बाईट 1) देवराव भोंगळे , आमदार ,राजुरा विधानसभा क्षेत्र आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 17, 2025 11:02:36
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शी तालुक्यातील चांदणी नदीला आला पूर, चांदणी नदीच्या मांडेगाव पुलावरील वाहतूक गेल्या चार दिवसांपासून ठप्प ( WKT ) - बार्शी तालुक्यातील चांदणी नदीला आला पूर, नदीच्या मांडेगाव पुलावरील वाहतूक गेल्या चार दिवसांपासून ठप्प - जिल्ह्यातील 11 पैकी 6 तालुक्यात झाली अतिवृष्टी - अतिवृष्टीमुळे बार्शी तालुक्यात तब्बल 47 हजार 451 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान - मांडेगाव पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आले असून अशा पाण्यात युवकांची जीवघेणी मासेमारी सुरूय - बार्शी तालुक्यात मंगळवारी एका दिवसात तब्बल 70 मिमी पेक्षा अधिकचा पाऊस संपूर्ण परिस्थितीचा बार्शी तालुक्यातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 17, 2025 10:48:08
Akola, Maharashtra:Anchor : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त राज्य सरकारतर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे “सेवा पंधरवाडा” म्हणून राज्यभर साजरे करण्यात येत आहे. हा उपक्रम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत तीन महत्त्वाचे टप्पे राबविण्यात येणार आहेत १) पांदन रस्ते विषयक मोहीम – ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी पांदन रस्त्यांचे नियोजन व बांधकाम. २) सर्वांसाठी घरे उपक्रम – नियमाप्रमाणे शासकीय जमिनीवरील कब्जे हक्काने प्रदान करून गृहनिर्माणाचा मार्ग मोकळा करणे. ३)नाविन्यपूर्ण उपक्रम – विकासाशी निगडित नवीन संकल्पना व योजना राबविणे. अकोल्यात आजपासून या मोहिमेला सुरुवात झाली असून राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते सेवा पंधरवाड्याचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना पायाभूत सुविधा, निवारा आणि विकास योजनांचा थेट लाभ मिळणार आहे. Byte : आकाश फुंडकर, कामगार मंत्री.
0
comment0
Report
Advertisement
Back to top