Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

पोलिसांनी तृतीयपंथीयांवर कडक कारवाई केली, कायदा २०२३ लागू!

VKVISHAL KAROLE
Aug 16, 2025 03:16:28
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn police action av Feed attached लग्न, धार्मिक कार्यक्रम, सण, जन्म-मृत्यूची घटना तसेच ट्रॅफिक सिग्नल किंवा रस्त्यावर नागरिकांकडून पैशांची जबरदस्तीने मागणी करणाऱ्या तृतीयपंथीय आणि इतर गटांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. छत्रपती संभाजी नगर  पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत मनाई आदेश निर्गमित केला आहे. तो १७ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संपूर्ण पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात लागू राहील. या आदेशानुसार, कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारे लग्नसोहळा, धार्मिक कार्यक्रम किंवा सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना त्रास देऊन पैसे मागण्यास बंदी असेल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाणार आहे
13
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Aug 16, 2025 08:30:15
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
feed by tv u संजय शिरसाट Byte ऑन संजय राऊत संजय राऊत यांनी जे विधान केले आहे, ते दोन्ही पक्षाचे प्रवक्ते म्हणून केले आहेत का याबद्दल शंका उपस्थित होत आहे, दोन्ही भाऊ एकत्र आले महाराष्ट्राने आनंद साजरा केला, आम्हालाही आनंद झाला, परंतु काल त्यांनी केलेले एका स्टेटमेंटमुळे, आजपर्यंत संजय राऊतने जी काही भाकीत केली आहे, ती भाकीत किती पूर्ण झाली आहेत हा इतिहास आहे, लग्न अजून झालं नाही पण मुलाच्या नावाने बार्शी साजरे करण्याचे काम संजय राऊत करत आहे... नामकरण करण्याची विधी पार पाडण्याचं काम ते करत आहे... असे असताना राज साहेब शांत कसे आहेत हा प्रश्न आहे,, त्यांची युती हो, त्यांनी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करावे, ही निवडणूक आहे, निवडणुकीत जो जिंकेल तो खरा बादशाह होत असतो, एकदा येणारी निवडणूक लागू द्या त्यानंतर हे सर्व चित्र स्पष्ट होईल.... ऑन संजय राऊत यांना याच्याशी काय करायचं मला कळत नाही, यांची काय लोकप्रियता आहे, आमच्या मतांवर निवडून आलेले राज्यसभा सदस्य कधी नगरसेवक सुद्धा झाले नाही, हे नेतृत्वाचे गुण कोणाला सांगतायात, या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे साहेबांनी 60 जागा निवडून आणल्या आहेत, त्याही छातीवर बसून ठोकून निवडून आणल्या आहेत, हे त्यांचे नेतृत्व नाही का, तुम्ही जे काही ... तुम्ही जे काही घोषणा करत होते मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण, निश्चित आले. स्वतःच्या पराभवासाठी कधीतरी चिंतन केलं पाहिजे, इथे नेते काही बोलत नाही मात्र या संजय राऊत सारख्या माणसाने पक्षाला धुळीस मिळवला आहे हे मात्र निश्चित आहे.... ऑन बेस्ट पतपिढी कारवाई जर घोटाळा झाला असेल तर प्रत्येक गोष्टीची चौकशी होत असते, घोटाळा झाला नसेल तर चिंता काय आहे, तिथे काहीतरी आहे म्हणून एवढी मोठी ताकद लागते असा त्याचा अर्थ होऊ शकतो, चौकशी अंतिम जे काही होईल ते होईल, आम्ही कायदेशीर कारवाईत कुठेही पडत नाही ऑन संजय राऊत मोदींवर टीका 12 वाजले आहेत संजय राऊतची मोदींवर बोलण्याची लायकी देखील आहे का? , यांच्यासारखे चिल्लर माणसाने मोदींवर बोलू नाही, ज्यांची जगात प्रतिमा आहे अशा माणसावर संजय राऊतने बोलणं म्हणजेच सूर्यावर थुकण्यासारखं आहे
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Aug 16, 2025 08:30:11
Washim, Maharashtra:
वाशिम : File:1608ZT_WSM_FARMERS_DEATH रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वाडी रायताळ येथे नाल्याच्या पुरात एक व्यक्ती वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पिराजी किसन गवळी असे मृतकाचे नाव असून ते १५ ऑगस्ट रोजी शेतात गेले होते. मात्र ते घरी परतले नाहीत.आज सकाळी त्यांचा मृतदेह खालतलची नावाच्या नाल्यात आढळला.ग्रामस्थांनी पोलिसांना कळवून मृतदेह बाहेर काढला व तो शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, रिसोड येथे हलविण्यात आला.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 16, 2025 08:04:58
Kalyan, Maharashtra:
भाजपाच्या वतीने डोंबिवलीचा मानबिंदू दहीहंडी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, यांचे आयोजन, Anc : यंदाही महाराष्टातील मानाची असलेली भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, यांच्या वतीने डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, याठिकाणी दहीहंडी पथकांचा उत्साह दिसून येत आहे, रविंद्र चव्हाण, स्वतः याठिकाणी उपस्थित राहून गोविंदा पथकांचा उत्साह वाढवत आहेत, भारतीय जनता पार्टी नेहमीच हिंदू संस्कृती जपण्याचं काम करत असून गेली वर्षानुवर्षे भाजपा डोंबिवली शहर उत्साहात दहीहंडी सण साजरा करत आहे, याठिकाणी फक्त 5 थरांची दहीहंडी असून सुरक्षेचे सर्व उपाय याठिकाणी पाळले जातात, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार ट्रीलीयन इकॉनॉमीकडे वाटचाल सुरू असून यामध्ये युवकांचा जास्तीत जास्त सहभाग असला पाहिजे म्हणून येणाऱ्या काळात आपणच महाराष्ट्राचे शिल्पकार होऊया हा संदेश याठिकाणी देण्यात येत आहे, तर महायुतीच्या वतीने हिंदू सणांवरील सर्व निर्बंध हटविण्याचे काम केले असून गोविंदा पथकातील प्रत्येक गोविंदाना इन्शुरन्स देण्याचं काम देखील सरकारने केलं, असल्याची माहिती यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद चव्हाण यांनी दिली, 121.. रवींद्र चव्हाण प्रदेश अध्यक्ष भाजपा बाईट, रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष भाजपा,
4
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 16, 2025 08:04:41
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
feed by tvu छत्रपती संभाजीनगर.. *विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे पत्रकार परीषद पॉइंटर* ऑन बेस्ट. - बबिता पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. विक्रोळी भांडुप मध्ये कार्यक्रमात.त्या आमच्या सोबत आल्याने आमच्या बॅनरमधे आहेत. मनसेची युनियन देखील आमच्या सोबत लढत आहे. - प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना भाजप मध्ये कोटी मान्यता आहे माहित नाही. ते दोघे मिळून लढत आहे. - यांचा इतिहास आणि कारभार बघितला तर यांची चौकशी करण्याची गरज आहे. पाटपेढीवर कारवाई करण्याची यांचं चालले आहे.सत्तेचा गैरवापर होत आहे. - मनसे शिवसेना पॅनल जिंकेल. - अजित दादा नुसत्या घोषणा करतात टायर मधे घेतो, काहीही करत नाही. अजित दादा कडून काहीही होत नाही. - कुणी गांजा पिऊन त्रास देत असेल तर पोलिसांना माहिती देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले पाहिजे. - बीड आणि धाराशिव मधे पवन ऊर्जा बाबत नागरिकांच्या मनात रोष व असंतोष आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. मसाजोग प्रकरण यावरूनच घडले होते. - युती होईल तर सगळीकडे होईल. ऑन रोहित पवार. - स्पष्ट सुनील तटकरे यांचं नाव घ्यायला पाहिजे. - जाहीर रित्या अधिकाऱ्यांनी अशी मारहाण करू नये. मात्र पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे का मारले? असे असले तरी कुठल्याही गुन्ह्यातील आरोपींना मारणे चुकीचे आहे. ऑन लाडकी बहीण - लाडक्या बहिणीवर चर्चा होऊन गेली आहे. आता लाडक्या बहिणी यांना नकोशा झाल्या आहेत. ऑन गणेश नाईक वक्तव्य, - गणेश नाईक बरोबरच बोलले आहे.लॉटरीच लागली, गद्दारीच बक्षीस त्यांना मिळालेलं आहे. - जो मुलगा वाहून गेला तो आंदोलन करीत होता, याची जबाबदारी अधिकाऱ्यावर टाकली पाहिजे. - हा तांदूळ लहान मुलांना न देता आफ्रिकेला पाठवा..
3
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 16, 2025 07:48:23
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 2 FILES SLUG NAME -SAT_RASTA_ROKO साताऱ्यातील देऊर ते कोरेगाव या अर्धवट बनवलेल्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे यामुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले असून वारंवार ठेकेदाराला सांगूनही रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्यामुळे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको करत आंदोलन केले.. यावेळी प्रशासनाला हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अन्यथा यापुढील काळात मोठे जन आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. बाईट - सुनील माने (शरद पवार राष्ट्रवादी पक्ष पदाधिकारी)
3
comment0
Report
UPUmesh Parab
Aug 16, 2025 07:47:58
Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग ---- वाळू चोरांचे हात तोडण्याचे आदेश देणाऱ्या पालकमंत्री नितेश राणेंना जिल्हा वासियांचा पाठिंबा.. मात्र दे दिखाव्यासाठी आणि जास्त हप्ते गोळा करण्यासाठी आहे का ? माजी आमदार वैभव नाईक यांचा सवाल... मंत्री नितेश राणे यांनी काल वाळू चोरांचे हात तोडले पाहिजेत अस केलं होत वक्तव्य.. यावर वैभव नाईक यांचं सवाल...बंधू निलेश राणे यांच्या मतदार संघात असलेले वाळू माफिया कोणासोबत असतात याचा शोध घेऊन राणेंनी कारवाई करावी.. त्याच आम्ही स्वागत करू मात्र हप्ते वाढविण्यासाठी असेल तर त्याचा शिवसेना विरोध करेल माजी आमदार वैभव नाईक यांचा इशारा... byte --- वैभव नाईक
4
comment0
Report
GMGANESH MOHALE
Aug 16, 2025 07:47:41
Washim, Maharashtra:
वाशिम: File2:1608ZT_WSM_CROPDAMAGE_WKT WSM_CROPDAMAGE_SHOTS रिपोर्टर.गणेश मोहळे,वाशिम अँकर:काल सायंकाळ पासून वाशिम जिल्ह्यात पाऊस कोसळत आहेत.याचा सर्वाधिक फटका रिसोड व मालेगाव बसला आहे.या मुसळधार पावसामुळं नदी-नाल्यांना पूर आला.चालू हंगामात चौथ्यांदा पूराचा फटका बसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.सोयाबीन,तूर,हळद यांसह इतर पिके पाण्याखाली गेली आहेत.मालेगाव तालुक्यातील वाघी गावाजवळील आडोळ नदीला मोठा पूर आल्याने शेतजमिनी पाण्याखाली गेली आहेत.वारंवारच्या पुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून शेतकरी अक्षरशः हताश झाले आहेत.याचं नुकसानी बाबत शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी..
2
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 16, 2025 07:33:09
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणात पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसमुळे धरणात 94.33 टक्के जिवंत जलसाठा झालाय. यामुळे याभागातील पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटलाय. धरण आता 100 टक्के भरण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे एलदरी धरणाच्या वीज निर्मिती केंद्राच्या दोन जनित्रातुन 1800 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात केला जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आलाय. असाच पाऊस सुरू असल्याने येलदरी धरण 100 टक्के लवकरच भरणार आहे.
5
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 16, 2025 07:19:14
Ratnagiri, Maharashtra:
मराठी परिषदेच्यावतीने आज शनिवारी १६ ऑगस्ट रोजी मुंबई - गोवा मार्गावर निवळी येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी रत्नागिरी आणि लांज्यातील पत्रकार मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. वर्षानुवर्षे मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडले आहे, यंदाही गणेशोत्सव काळात लाखों चाकरमान्याना अर्धवट असलेल्या महामार्गावरील प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे रत्नागिरी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने महामार्गावर आंदोलन करण्यात आले.
11
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Aug 16, 2025 07:18:36
Dhule, Maharashtra:
ANCHOR - काँग्रेस खासदार एडवोकेट गोवाल पाडवी यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया वर बोचरी टीका केली आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे इलेक्शन चोर ऑफ इंडिया झाल असली ची टीका खासदार पाडवी यांनी केलेले आहे. काँग्रेसचे प्रमुख खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. इलेक्शन कमिशनच्या मदतीने झालेली मतदान चोरी ही फक्त काही विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत झाले नाही तर संपूर्ण देशात झाल्याचा दावाही खासदार पाडवी यांनी केला आहे. येणाऱ्या काळामध्ये या विरोधात संसदेत आणि रस्त्यावर दोन्ही ठिकाणी लढा लढण्याची भूमिका काँग्रेसची असणार असल्याचेही संकेत त्यांनी दिलेले आहेत. बाईट- एड गोवाल पाडवी, खासदार प्रशांत परदेशी धुळे
10
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Aug 16, 2025 07:05:31
Dhule, Maharashtra:
ANCHOR - माजी मंत्री पद्माकर वळवी हे पुन्हा आपल्या स्वगृही परतले आहे. भाजप मध्ये जास्त दिवस मन न रमलेले पद्माकर वळवी यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. वळवी यांची घर वापसी काँग्रेसला नवी उर्जा देणारे ठरेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत बुलढाणा येथे वडवे यांनी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला. पद्माकर वळवी यांनी काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार अशी चर्चा रंगलेली असताना अचानक त्यांनी यूटन घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पद्माकर वळवी यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केल्याने नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढणार आहे. पद्माकर वळवी काँग्रेसमध्ये घरवासी झाल्यामुळे काँग्रेसचे नेते पद्माकर वळवी यांना पुन्हा स्वीकारातील का? हा मोठा प्रश्न समोर चर्चेला जातं आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
10
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Aug 16, 2025 07:05:21
Dhule, Maharashtra:
Anchor - माणिकराव कोकाटे हे लोकांवरती दैवी दहशतवाद लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अनिस चे प्रमुख अविनाश पाटील यांनी केला आहे. माणिकराव कोकाटे दुसऱ्यांदा शनी मंदिरात जाऊन विवादात सापडलेले आहेत. अनिस ने त्यांच्यावरत प्रखर टीका करत त्यांचा निषेध केलेला आहे. माणिकराव कोकाटे शनी मंदिरामध्ये पुन्हा पुन्हा जाऊन दैवी दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पाटील यांनी केलेला आहे. रमी खेळण्याच्या वादावरून माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपद अडचणीत आला होत. त्यावेळेस त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ येथे शनी मंदिरात जाऊन पूजा केली होती. त्यानंतर त्यांच्या मंत्रपदावरची साडेसाती टळली. या भावनेने त्यांनी पुन्हा एकदा 15 ऑगस्ट रोजी शनी मंदिरामध्ये जात दर्शन घेतले, यावर आता अनिस ने टीकेचे जोड उठवली आहे. byte - अविनाश पाटील, अनिस प्रशांत परदेशी, धुळे.
8
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Aug 16, 2025 07:05:08
Dhule, Maharashtra:
Anchor - धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलीस ठाण्याला नवी इमारत मिळाली आहे. यां इमारतीचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न झाले. सांगवी येथील शिरपूर तालुका पोलीस स्टेशन कार्यालयीन विस्तारीकरण, बीट रूम, अधिकारी कक्ष व बहुउद्देशीय हॉल या नव्या सुविधांचे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यास माजी शालेय शिक्षण, क्रीडामंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा उपस्थितीत होते. तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी आणि मान्यवरांसह सांगवी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री जयकुमार रावल याप्रसंगी सांगितले की, पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासी वसाहतीसाठी प्रयत्न करून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तालुका पोलीस स्टेशनने स्वंयसेवी संस्थांच्या मदतीने उभारलेला विकास कामांचा हा उपक्रम जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. byte - जयकुमार रावल पालकमंत्री. प्रशांत परदेशी, धुळे.
9
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 16, 2025 06:46:33
Ratnagiri, Maharashtra:
खेडमध्ये जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी; शहराला पुराचा धोका खेड (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील नद्या-नाले धोकादायक स्थितीत पोहोचले आहेत. १५ ऑगस्टपासून कोसळणाऱ्या अविरत पावसाचा फटका खेड शहरालाही बसत असून, खेडजवळून वाहणाऱ्या जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नदीची इशारा पातळी ५ मीटर तर धोका पातळी ७ मीटर इतकी आहे. सध्या नदीचे पाणी ६ मीटरवरून वाहत असल्याने शहरात पुन्हा एकदा पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. जगबुडी नदीचे पाणी पात्राबाहेर पडून खेडमधील मटण-मच्छी मार्केट परिसरासह शेजारील रस्त्यांमध्ये शिरले आहे. अचानक आलेल्या पाण्यामुळे व्यापारी व स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खेड नगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत परिस्थिती हाताळण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. खेड नगरपरिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे की, “खेड शहरातील सर्व नागरिक व व्यापाऱ्यांना सूचित करण्यात येते की, रात्रीपासून पाऊस जोराचा पडत आहे. नारंगी व जगबुडी नद्या इशारापातळी ओलांडून वाहत आहेत. सर्वांनी सतर्कता बाळगावी, आपले सामान व कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे.” नगरपरिषदेने दिलेल्या या सूचनेनंतर शहरात प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा हायअलर्टवर असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास जगबुडी नदी धोका पातळी गाठण्याची शक्यता असल्याने खेडवासीयांची चिंता अधिक वाढली आहे.
13
comment0
Report
KPKAILAS PURI
Aug 16, 2025 06:46:26
Pune, Maharashtra:
pimpri palakhi kailas puri Pune 16-8-25 feed by 2c Anchor - संत ज्ञानेश्वर माऊलींच्य 750 व्या जयंतीनिमित्त कासारवाडी मधल्या ज्ञानराज विद्यालयाच्या वतीन आज कासारवाडी गावात पालखी सोहळ्याच आयोजन करण्यात आले होत. त्याला विद्यार्थी,पालक आणि नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरावर काल 22 किलो सुवर्ण कलशारोहन झाले तिथी नुसार 750 वा जन्मोत्सव असल्यान या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी मोठा उत्साह पाहायला मिळाला.
11
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top