Back
महिलेला मारहाण करणाऱ्या लंके दांपत्याला अखेर पोलिसांनी केली अटक!
VKVISHAL KAROLE
Jul 28, 2025 07:18:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn arrest break
छत्रपती संभाजी नगरच्या सातारा परिसरातील महिलेला मारहाण प्रकरणात आरोपी लंके दांपत्याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे, त्यांच्या शोधासाठी दहा पथक लावण्यात आली होती, पोलिसांचा त्यांना शोधण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू होता अखेर संभाजी नगर जिल्ह्यात ग्रामीण भागात हे कुटुंब लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली आहे आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.. शिकवणीत मुलींचा वादातून लंके कुटुंबीयांनी शिंदे कुटुंबातील महिलेला अमानुष मारहाण केली होती या मारहाणी ची माहिती पुढ आल्यानंतर लंके कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता...
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 28, 2025 14:02:46Beed, Maharashtra:
माजलगाव, बीड: आमदार प्रकाश सोळंके 121 पॉइंटर
• मी तर धनंजय मुंडेंना शुभेच्छा दिले आहेत. पक्षसृष्टीच्या मनात जर असेल त्यांना मंत्रिपद द्यायचं तर परत त्यांना शुभेच्छा आहेत.
• जी खंत आहे ती मी बोलून दाखवली आहे. ती फक्त माझ्या बाबतीत नाही.
गेल्या 45 वर्षाचा इतिहास जर पाहिला फार थोडा वेळ मराठा समाजाच्या व्यक्तींना राज्यमंत्री पदापर्यंत संधी मिळाली.
• त्या उलट जर पाहिलं तर ओबीसी असेल मागासवर्गीय असेल यांनाच संधी देण्याचे काम झालं..
• राजकारणामध्ये एनसीपीचा पाठीराखा म्हणून मराठा समाज आहे.
• याच्या विरोधात ओबीसी समाज नेहमीच एनसीपीच्या विरोधात राहिलाय.
• तरी देखील प्राधान्य देताना ओबीसी समाजाला मागासवर्गीय समाजाला मिळतं ही खरोखरच खंत आहे.
• याच्यामध्ये माझं काही वैयक्तिक मागणी आहे असं काही नाही.
• याबाबतीत शरद पवार साहेब अजित दादा यांच्यापुढे जी काय वस्तुस्थिती आहे.
• अगदी निकाल जो असतो लोकसभेचा असो किंवा विधानसभेचा असो त्याचे पुरावे देऊन आम्ही त्यांच्यासमोर आमची बाजू बऱ्याच वेळा मांडली.
• परंतु जी काय पक्षाची विचारसरणी आहे.
• फुले, आंबेडकर, शाहू त्यांच्याप्रमाणे प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा ते प्रयत्न करतात.
• याच्यामध्ये विशेषता बीड जिल्ह्यातला मराठा समाज भरडला जातोय. असे माझे मत आहे.
• मंत्री पदाबाबतचा विचार पक्षसृष्टीने करायचाय जी वस्तुस्थिती आहे जी खंत आहे ती मी फक्त बोलून दाखवली.
• त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचा विरोध अशी माझी भूमिका नाही.
•उलट मी त्यांना शुभेच्छा दिल्यात. मंत्रीपद द्यावं अजून त्यांना महाराष्ट्राचा नेतृत्व करण्याची संधी मिळाली तरी आनंदच होईल.
• ज्येष्ठ म्हणून डावललं जातंय याची मनात कुठेतरी खंत आहे म्हणूनच मी हे बोलून दाखवलं आहे.
• हे असं सातत्याने घडतंय या जिल्ह्यामध्ये मराठा समाजाला कधीच मंत्रिपदाची संधी मिळाली नाही.
• बीड जिल्ह्यात मराठा समाजाला गेल्या 45 वर्षात पालकमंत्री पद मिळाले नाही. ही खरोखरच खंत आहे.
• जे लोक तुमच्या पाठीमागे निवडणुकीत असतात त्यांना न्याय मिळत नाही नंतर ही वस्तुस्थिती आहे.
0
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 28, 2025 14:01:38Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2807ZT_CHP_SHIVPUJAN
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपुरात पहिल्या श्रावण सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या सहचारिणी अमृता फडणवीस यांनी केले शिवपूजन, राज्यातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची केली पूजा
अँकर:--चंद्रपुरात पहिल्या श्रावण सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या सहचारिणी अमृता फडणवीस यांनी शिवपूजन केले. स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. राज्यातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची पूजा अमृता फडणवीस यांनी केली. शहरातील गोमुख हनुमान मंदिर भागात हे शिवलिंग आहे. स्वतः कावड वाहून नेत अमृता फडणवीस यांनी जलाभिषेक केला. बिल्वपत्रे वाहून शिवशंभोचा जयघोष केला. सृष्टीचा निर्माता आणि संहारक भगवान शिवाची पूजा करून समाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त करत ओम त्र्यंबकं ध्वजामहें, गात शिवाची आराधना केली.
बाईट १) अमृता फडणवीस, मुख्यमंत्र्यांच्या सहचारिणी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 28, 2025 14:01:15Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग -
Sng_baligadi_drone
नोट - ड्रोन फुटेज आहे -
स्लग - हिरवे माळरान,गुलालांची उधळण आणि रंगीबेरंगी धावणाऱ्या बैलागाडयांचे ड्रोन द्वारे टिपलेले विलोभनीय दृश्य..
अँकर - सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे आज देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला होता.
महाराष्ट्रातल्या सर्वात जुना आणि ऐतिहासिक बैलगाडी शर्यतीचे मैदान म्हणून नांगोळ्याचा पट्टा प्रसिद्ध आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटका मधून जवळपास 555 बैलगाड्या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. अत्यंत चुरशीने आणि थरारक अशा या बैलगाड्या शर्यती पार पडल्या, नांगोळ्याच्या हिरव्यागार मैदानावर गुलालांची उधळण आणि रंगीबिरंगी धावणारे बैल,असे हे विलोभनीयपनीय दृश्य पाहायला मिळालं,
भाजपा किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष संदीप गिंडे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं.तर विलोभनीय बैलगाडी शर्यतींचा दृश्य ड्रोन च्या माध्यमातून टिपण्यात आलेत आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे हे दृश्य आहेत
बाईट - संदीप गिड्डे - संयोजक - देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यत.
0
Report
DPdnyaneshwar patange
FollowJul 28, 2025 13:47:09Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_SENA_SALWI
धाराशिव मध्ये राजन साळवी यांच्या बैठकीमध्ये गोंधळ.
राजन साळवी यांच्यासमोर सावंत समर्थकांची घोषणाबाजी.
माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बॅनर वर फोटो नसल्याने उफाळला वाद.
सावंत शिवसेनेचे उपनेते, बैठकीत गोंधळ झालाच नाही साळवी.
Anchor
धाराशिव- धाराशिव मध्ये शिवसेनेचे राज्य समन्वयक राजन साळवी यांच्या बैठकीत राडा झाला. माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बॅनर वरून फोटो हटवल्यानंतर नाराज झालेल्या सावंत समर्थकांनी साळवी यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. तानाजी सावंत जिल्ह्यातील एकमेव शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांचा बॅनर वर का फोटो नाही? असा सवाल करत कार्यकर्त्यांनी साळवी यांच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली. साळवी यांच्यासमोर जवळपास अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. भूम परंडा मतदारसंघातील सावंत समर्थक बैठक सोडून अर्ध्यातूनच निघून गेले. राजन साळवी यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. बैठकीत गोंधळ झालाच नाही. तानाजी सावंत शिवसेनेचे उपनेते आहेत. त्यांचा बॅनर वर फोटो होता असं म्हणत राजन साळवी यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजन साळवी यांनी आज धाराशिव मध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या.
Byte राजन साळवी
राज्य समन्वयक शिवसेना
Byte सावंत समर्थक
3
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 28, 2025 13:33:15Nashik, Maharashtra:
Nashik breaking
- 15 हजार रुपयांचा लाच स्वीकारताना रेल्वे अधिकाऱ्याला अटक
- केंद्रीय अन्वेषण पथकाकडून कारवाई रेल्वे वर्क शॉप विभागात काम करण्याऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई
- क्वालिटी चेक रिपोर्ट देण्यासाठी मागितली होती लाच
- केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अधिक चौकशी सुरू
7
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 28, 2025 13:33:07Pandharpur, Maharashtra:
28072025
slug. - PPR_ASHADHI_GAURAV
file 03
------
Anchor - पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये केलेल्या वेगळ्या गोष्टी उपक्रमांचा वापर नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये केला जात असेल तर ही आनंदाची बाब असल्याचे गौरव उद्गार ग्रामविकास मंत्री आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
यावर्षीच्या आषाढी वारी काळामध्ये शेवटच्या घटकांपर्यंत काम केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सोहळा ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूरमध्ये संपन्न झाला पुणे सातारा सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते गाव पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांच्या सोयी सुविधा आणि सुरक्षेसाठी प्रशासनाकडून वेगवेगळे उपक्रम तसेच वेगवेगळ्या गोष्टी वापरण्यात आल्या याचा उपयोग आगामी कुंभमेळ्यामध्ये होत असेल तर ही आपल्यासाठी आनंदाची बाब असल्यास मत यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं.
----
Byte - जय कुमार गोरे पालकमंत्री
4
Report
ABATISH BHOIR
FollowJul 28, 2025 13:18:01Kalyan, Maharashtra:
ऑपरेशन सक्सेसफुल करण्यात आला याचा आनंद आम्ही प्रतीक्षेत होतो आणि त्याचा फळ आज मिळाले आले आहे
मला माहिती होतं जे होईल त्याला वेळ लागेल मी आतंकवादी ला सोडणं शक्य नव्हतं मात्र तू सोडून जी कारवाई केली त्याच्यासाठी आम्ही समाधानी आहे
वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी ही गोष्ट घडली हा अनुका योगायोग असून आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स या तिघांचे मी आभार मानतो
तिन्ही दलाने जे परिश्रम घेतले आहे त्यामुळे त्यांचे आणि भारत सरकारचे आभार मानतो
On क्रिकेट बहिष्कार
जे क्रिकेट होणार आहे ते झालं नाही पाहिजे
*यादी मी मानत होतो की.. खेळाला राजकारणाच्या मध्ये आणलं नव्हतं पाहिजे मात्र हे लोक सुधारणारी नाही*
जोपर्यंत आपण पूर्ण बहिष्कार टाकत नाही हे कोणी सुधारणार नाही
*क्रिकेटर खेळाडू यांचे पोस्ट मी पाहत आहे ज्यांनी बहिष्कार टाकला त्या संघाला मी धन्यवाद त्यांचे आभार मानेल आणि एशिया कप सामने जे होत आहेत त्याच्यावर देखील बहिष्कार टाकला पाहिजे*
On गांगुली
पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळलं नाही पाहिजे ते सुधारणार नाही
गांगुली यांनी वाटत असेल ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे
स्पोर्ट वेगळं ठेवलं पाहिजे राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे मात्र हे सगळे शेवटी एकत्रच येणार आहे यांना सर्व बाजूने घेतलं पाहिजे त्याशिवाय ते ऐकणार नाही
121..हर्षल संजय लेले
byte.. हिंदी /मराठी
9
Report
AKAMAR KANE
FollowJul 28, 2025 12:49:37kolhapur, Maharashtra:
64 घरांची राणी दिव्या.... विश्व विजेती 'दिव्या '
नागपूरची ग्रँडमास्टर दिव्या देशमुख आज महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच विजेतेपद पटकावलं..
यापूर्वी अनेक स्पर्धा जिंकत नागपूर आणि महाराष्ट्राची मान उंचावली आहे. कोनेरू हंपीला पराभूत करत आपणच या खेळातील राणी असल्याचे तिने सिद्ध केलय
दिव्याचे वडील डॉ. जितेंद्र देशमुख हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयत डॉक्टर म्हणून कार्यरत आहे, तर आई डॉ. नम्रता यादेखील कधीकाळी खासगी क्लिनिक चालवायच्या. दिव्याच्या आई - वडिलांना मा आपल्या मुलींनी मैदानावर जावे,अशी त्यांची खूप इच्छा होती.त्याकरता दिव्याला बुद्धिबळाचे प्रशिक्षण वर्ग लावून दिले.
दिव्या पाचव्या वर्षापासून 'चेस-बोर्ड'वर खेळत रमली आहे. चेस खेळताखेळता दिव्याला केव्हा बुद्धिबळाचा लळा लागला, हे त्यांच्याही लक्षात आले नाही. कमालीचं सातत्य आणि चिकाटी याचबरोबर त्याग यामुळे ती आज जागतिक स्तरावर चॅम्पियन ठरली आहे... अगदी बालवायापासूनच तिने कार्टून नेटवर्क टीव्ही सारख्या गोष्टींचा त्याग केला होता... आणि बुद्धिबळासाठी स्वतःला झोकून दिले होते दिव्या ही नागपूरच्या भवन्स शाळेची विद्यार्थिनी आहे. तिने २०१२ मध्ये सात वर्षांखालील गटात पहिले 'नॅशनल टायटल' जिंकले होते. दिव्याला खऱ्या अर्थाने ओळख त्यावेळी मिळावी जेव्हा तिने इराणमधील "आशियाई युवा चॅम्पियनशिप स्पर्धेत दिव्य कामगिरी केली.या स्पर्धेत दिव्याने 2 सुवर्णपदकांची कमाई केली शिवाय दिव्याने बुद्धिबळातील प्रतिष्ठेच महिला 'फिडेमास्टर' हा किताबही आपल्या नावे केला. कमी वयात हा बहूमान मिळविणारी दिव्या भारतातील पहिली महिला बुद्धिबळपटू ठरली होती. दिव्या देशमुखने आतापर्यंत जगभरतील विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये २५सुवर्ण,६ रौप्य आणि ४ ब्रँझपदकांची कमाई केलेली आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये तिच्या नावावर सुवर्ण आणि ब्रॉंझपदक आहे. ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियन' व तीन वेळा आशियाई विजेती राहिलेल्या दिव्याने आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्मससह बुद्धिबळातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा महिला ग्रॅण्डमास्टर किताब सुद्धा पटकाविलेला आहे. उल्लेखनीय म्हणजे, देशविदेशातील अनेक दिग्गज खेळाडूंना तिने पराभूत केले आहे. बुद्धिबळातील या अद्वितीय कामगिरी आणि योगदानाबद्दल राज्य सरकारने दिव्याला प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
10
Report
APAMOL PEDNEKAR
FollowJul 28, 2025 12:35:56Mumbai, Maharashtra:
Anchor : जेव्हीएलआर वर पवई येथे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार लालू कांबळे यांचा मृत्यू झाला आहे. लालू कांबळे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे सक्रिय कार्यकर्ते होते. या मुळे आरपीआय आक्रमक झाली असून जिथे अपघात झाला तिथे मोठ्या संख्येने जमून आरपीआय ने आंदोलन केले. रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करीत पालिका प्रशासनाचा निषेध केला. या घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, कांबळे यांच्या कुटुंबाला सरकारने मदत करावी आणि मुंबई चे खड्डे पूर्णपणे बुजवावे अशी मागणी आरपीआय च्या आंदोलकांनी केली.
byte : आरपीआय कार्यकर्ते
14
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 28, 2025 12:33:46Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2807_BHA_SENA_BJP_VAD
FILE - 5 VIDEO
महायुती मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पाठीत खंजीर खुपसला.... शिंदे गटाचा भाजपा वर अप्रत्यक्ष टीका.... स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावळ लढणार.....
Anchor :- भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकी च्या निकालानंतर महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. महायुतीत शिवसेना शिंदे गटाला 4 उमेदवार दिले होते. त्यापैकी एक उमेदवार विजयी झाला आहे. एक निकाल लागणे बाकी असून दोन उमेदवाराला जाणूनबुजून हरविण्यात आले आहे. महायुती मध्ये शिवसेना शिंदे गटाला हरविण्याचा घाट रचला गेला आहे. त्यामुळे या पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गट स्वबळावळ लढणार आहे. महायुतीत आमच्या पाठीत खंजीर खुपसल गेल आहे. अप्रत्यक्ष रित्या भाजपने दगा दिला असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाने पत्रकार परिषदेत केली आहे...
BYTE :- संजय कुंभलकर, शिवसेना शिंदे गट संपर्क प्रमुख भंडारा गोंदिया
12
Report
AKAMAR KANE
FollowJul 28, 2025 12:33:32kolhapur, Maharashtra:
Ngp Chess Fukey 121
live u ने फीड पाठवले
---------------
महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशन विश्वविजेते पद मिळवल्यानंतर दिव्या देशमुखला 11 लाखांचे पारितोषिक घोषित केल आहे.. नागपूरला तिचा भव्य स्वागत करणार येणर आहे... यावेळी महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष आमदार परीणय फुके यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमर कामे यांनी
9
Report
JMJAVED MULANI
FollowJul 28, 2025 12:22:34Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 2807ZT_BARAMATIPKG
BYTE 4
बारामतीत भीषण अपघातानं गेला एकाच कुटुंबातील तिघांचा बळी.... तर तिघांच्या मृत्यूच्या धक्क्यांना आजोबांनी ही प्राण त्यागले.... एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यून गाव हळहळल.... आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर......
Anchor_पुण्याच्या बारामतीत रविवारी सकाळी सव्वा कशा सुमारास झालेले एका भीषण अपघाताने आख कुटुंब उध्वस्त झालंय. मूळचा इंदापूर तालुक्यातील संसार येथील असणाऱ्या मात्र सध्या बारामतीत रहिवाशी असणाऱ्या आचार्य कुटुंबातील एकाच वेळी चौघांचा मृत्यू झाल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.....
Vo 1 _ बारामती मधील ओंकार आचार्य आपल्या दुचाकीवरून मधुरा आणि सई या दोन्ही मुलींना घेऊन घराकडे निघाले होते. दरम्यान महात्मा फुले चौकात त्यांच्या दुचाकीला भरधाव डंपर ने धडक दिली. या अपघातात घटनास्थळीच ओंकार आचार्य यांचा मृत्यू झाला. तर सई आणि मधुरा या दोन चिमुकल्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बारामतीत घडली.या घटनेनंतर आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.या घटनेचा धक्का सहन न झाल्याने आणि अपघातात आपला मुलगा आणि दोन्ही नातींनी जीव गमावल्याने 24 तासाच्या आतच ओंकार आचार्य यांचे वडील राजेंद्र आचार्य यांचही निधन झाले. यामुळे आचार्य कुटुंबावर मोठा आघात झाला आहे...
गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र आचार्य हे आजारी होते. बारामतीतील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना अपघाताच्या घटनेच्या आधी म्हणजे शनिवारी रात्री डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांची प्रकृती तशी नाजूक होती, मात्र कालच्या घटनेने प्रचंड धक्का बसलेल्या राजेंद्र आचार्य यांनी आज शेवटचा श्वास घेतला. आज पहाटे त्यांनीदेखील इहलोकीची यात्रा संपवली.
हा विकासाच्या भयावह वेगाला आणि कलियुगातल्या दशरथाला शापच म्हणावा लागेल काल ओंकार आणि त्याची मुलगी सई व माधुरी यांचा बळी घेणारा हायवा डंपरच्या चालक दशरथ होता. पुराणकाळात देखील दशरथाला श्रावणबाळाच्या आई वडिलांनी शाप दिला होता. सध्याही धावपळीचे युग आहे दशरथाने आपल्या श्रावणबाळाचे प्राण घेतले हा विरह सहन न झाल्याने त्या बापाने देखील प्राण सोडला..!
बारामतीतच नव्हे तर राज्यात विकास भयावह वेगाने वाहतो आहे. दीडविताच्या पोटासाठी भाकरीचा चंद्र शोधताना प्रत्येक जण जीवाच्या आकांताने धावपळ करतो आहे आणि तोच वेग दुसऱ्याचा जीव घेतो आहे. निष्काळजीपणा दुसऱ्याच्या जीवावर बेततो हे माहीत असूनही बारामतीत अनेक घटना घडूनही हायवा डंपरच्या वेगावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही.
Vo 2_ एका अपघातामुळे घरातील चौघांचा बळी गेला अक्ख कुटुंबच उध्वस्त झालं खंडोबा नगर परिसरातील नागरिक आक्रमक झाले. त्यांनी बारामती मधील महात्मा फुले चौकात ठिय्या आंदोलन केलं. तातडीने महात्मा फुले चौकासह बारामतीत आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसवावेत याशिवाय रहदारी या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी यासह इतर मागण्या ग्रामस्थांनी लावून धरल्या....
बाईट _ आंदोलक,ग्रामस्थ
Vo 3_ एकाच कुटुंबातील चौघांचा गेलेला बळी आणि आक्रमक झालेले बारामतीकर पाहून प्रशासन ही नमलं अन् ग्रामस्थांच्या असणाऱ्या सर्व मागण्या क्षणात मान्य करत आवश्यक ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवले जातील आणि हे काम रातोरात पूर्ण करू असं आश्वासनच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी दिलं आणि जनतेच्या रागाला आवर घातली....
साऊंड बाईट _सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी
END VO _बारामतीत असे अपघात काय नवीन नाहीत यापूर्वी देखील असे अपघात बारामतीत घडले आहेत मात्र कालच्या या दुर्दैवी अपघातामुळे आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आख्खा एक कुटुंब उध्वस्त झालंय. त्यानंतर आता बारामती शहरातील आवश्यक ठिकाणी गतिरोधक घालण्यासाठी प्रशासनाने काम ही सुरू केलेय.उशिरा का असेना पण प्रशासनाला बुद्धी सुचली खरी पण यात नाहक आचार्य कुटुंबाचा बळी गेला याला जबाबदार कोण हा प्रश्न उरतोच ?
जावेद मुलाणी ,
झी 24 तास ,बारामती.
13
Report
JMJAVED MULANI
FollowJul 28, 2025 12:22:26Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 2807ZT_INDAPURKETKESHWR
FILE 4
निमगाव केतकीच्या ग्रामदैवत श्री केतकेश्वर मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई..
Anchor:
इंदापूर तालुक्यातील
निमगाव केतकीचे ग्रामदैवत श्री केतकेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी आकर्षक विद्युत रोषणाई ,फुलांची आरास करण्यात आली होती.मंदिरात रात्री उशिरापर्यंत गावासह परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
केतकेश्वर मंदिरात सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील समस्त गावकरी मंडळींच्या वतीने शंभू महादेवाच्या गाभाऱ्यात तसेच मंदिर परिसरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीय. पिंडी वरती फुलांची सुंदर सजावट करण्यात आलीय... तसेच मंदिरामध्ये विविध लहान मोठ्या रंगीबेरंगी दिव्यांनी विद्युत रोषनाई करण्यात आली होती. सोमवारी पहाटेपासूनच मंदिरामध्ये विविध अभिषेक घालण्यात येत होते. गावात सह परिसरातील अनेक भाविक भक्तांनी दर्शनासाठी व ही आरास पाहण्यासाठी गर्दी केली होती.
13
Report
JMJAVED MULANI
FollowJul 28, 2025 12:22:18Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 2807ZT_INDAPURINDRESHR
FILE 4
इंदापूरच्या इंद्रेश्वर महादेव मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची गर्दी.
ANCHOR:— इंदापूरच्या ग्रामदैवत इंद्रेश्वर महादेव मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीय... इंदापूर तालुक्यातील गावागावातून आलेले श्रद्धाळू मोठ्या भक्तिभावाने इंद्रेश्वर महादेवाचे दर्शन घेत आहेत... मंदिरात विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली असून.. सकाळपासूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत भाविक रांगेत उभे राहून दर्शन घेत आहेत... संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने फुलून गेला होता.
14
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 28, 2025 12:21:55Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_RACE
ड्रोन सौजन्य: विश्वजीत साळुंखे, वाई
सातारा:माण तालुक्यातील दहिवडी येथे नामदार जयकुमार गोरे आयोजित सोन्या 50-50 केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते यासाठी राज्यभरातून 900 बैलगाडा स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला शेवटच्या राऊंडमध्ये झालेल्या बैलगाडा शर्यतीत कार्तिक आणि बकासुर ही बैल जोडी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले असून ही बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बैलगाडा शर्यत प्रेमी दहिवडीमध्ये दाखल झाले होते... या बैलगाडा शर्यतीची ड्रोन द्वारे टिपलेली काही दृश्य
14
Report