Back
अमृता फडणवीसने चंद्रपुरात शिवपूजन करून केला ऐतिहासिक जलाभिषेक!
AAASHISH AMBADE
Jul 28, 2025 14:01:38
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 2807ZT_CHP_SHIVPUJAN
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपुरात पहिल्या श्रावण सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या सहचारिणी अमृता फडणवीस यांनी केले शिवपूजन, राज्यातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची केली पूजा
अँकर:--चंद्रपुरात पहिल्या श्रावण सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या सहचारिणी अमृता फडणवीस यांनी शिवपूजन केले. स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. राज्यातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची पूजा अमृता फडणवीस यांनी केली. शहरातील गोमुख हनुमान मंदिर भागात हे शिवलिंग आहे. स्वतः कावड वाहून नेत अमृता फडणवीस यांनी जलाभिषेक केला. बिल्वपत्रे वाहून शिवशंभोचा जयघोष केला. सृष्टीचा निर्माता आणि संहारक भगवान शिवाची पूजा करून समाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त करत ओम त्र्यंबकं ध्वजामहें, गात शिवाची आराधना केली.
बाईट १) अमृता फडणवीस, मुख्यमंत्र्यांच्या सहचारिणी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 28, 2025 18:02:21Vasai-Virar, Maharashtra:
Date-28july2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI MURDER
Feed send by 2c
Type-AV
Slug- ऑनलाईन गेम खेळण्यासाठी सावत्र आईची हत्या
पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दफन केला
दफन केलेला मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी केला तपास
अँकर - ऑनलाईन गेम खेळण्यासाठी पैसे हवे असल्याने एका तरुणाने आपल्या सावत्र आईची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार वसईत उघडकीस आला आहे.
आरसीया खुसरो असं मृत्यू झालेल्या आईचे नाव असून इमरान खुसरो असं आरोपी मुलाचे नाव आहे..
इम्रान खुसरो (३२) याला मोबाईल गेम खेळण्याचे व्यसन होते. त्याला व्हीआरपीओ नावाचा गेम खेळण्यासाठी १ लाख ८० हजारांची गरज होती. त्याने हे पैसे सावत्र आई आर्शिया हिच्याकडे मागितले.. मात्र तिने पैसे दिले नाही या रागात इम्रान शनिवारी बाभोळा येथील आर्शिया यांच्या घरी गेला आणि तिला लाथाबुक्क्याने मारहाण करून डोके आपटून तिची क्रूर हत्या केली.
हा सर्व प्रकार इम्राननेने वडिलांना सांगितला ..त्यानंतर दोघांनी पुरावा नष्ट करण्यासाठी तातडीने विधी करत मृतदेह दफन करून नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवले होते. या बाप लेकाने परिसरातीलच एका डॉक्टरकडून आरसीया नैसर्गिक रित्या मरण पावल्याचे प्रमाणपत्र घेतले होते. मात्र घरात कामवाल्या महिलेला घरात रक्ताचे डाग दिसले आणि हा सर्व प्रकार पोलिसांना समजला .. पोलिसांनी आरोपी बाप लेकाला अटक केली आहे.. या गुन्ह्यात डॉक्टरचाही सहभाग दिसून येत असून पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत....
14
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 28, 2025 16:30:58Vasai-Virar, Maharashtra:
Date-28juky2025
Rep-prathamesh tawade
Loc&vasai
Slug-VASAI TOY
Feed send by 2c
Type-AV
Slug- थेट स्मशानभूमीत पालिकेने बसवली लहान मुलांसाठी खेळणी
वसईच्या बेनापट्टी स्मशानभूमीतील धक्कादायक प्रकार
गावगोंगाट झाल्यानंतर पालिकेचा पुन्हा घूम जाओ
अँकर - वसईतील बेनापट्टी गावातील स्मशानभूमीत वसई महापालिकेने चक्क लहान मुलांसाठी खेळणी लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता, बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी याबाबत पालिका आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर पालिकेने तातडीने बसवलेली खेळणी पुन्हा काढून नव्यावादातून हात वर केले आहेत...
मुळात स्मशानभूमीत लहान मुले कशी खेळू शकतात ? अंत्यसंस्कार होणाऱ्या ठिकाणी पालिकेने कोणता विचार करून लहान मुलांना खेळणी लावली असतील ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे... पालिकेचा हा अनागोंदी कारभार सोशल मीडियावर आता वायरल होत आहे..
14
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 28, 2025 16:30:51Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2807ZT_JALNA_TEACHER(10 FILES)
जालना | ब्रेकिंग
जालन्यात क्रीडा प्रबोधिनीतील 4 विद्यार्थिनींचा विनयभंग
क्रीडा शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याचं तपासात उघड
क्रीडा शिक्षकावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल
अँकर | जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनीतील एका क्रीडा शिक्षकाने चार विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिस आणि शिक्षण विभागाने चौकशी केल्यानंतर अखेर या क्रीडा शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनीत ग्रामीण भागातील अल्पवयीन विद्यार्थिनी क्रीडा शिक्षण घेतात. या ठिकाणी क्रीडा शिक्षक प्रमोद खरात हा व्यवस्थापक म्हणून काम पाहतो.याच क्रीडा शिक्षकाकडून येथील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना मिळाली होती. तर शिक्षण विभागानं देखील या प्रकरणात शनिवारी चौकशी केली होती. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव यांनी मुलींची चौकशी केल्यानंतर अखेर या प्रकरणात गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्रीडा शिक्षक आणि प्रबोधिनी व्यवस्थापक प्रमोद खरात याच्या विरोधात विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला बेड्या ठोकल्या असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव करीत असल्याची माहिती जालन्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली...
Byte: अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना
14
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 28, 2025 15:34:04Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_MP_Ashtikar
Feed on - 2C
-------------------------
Anchor - उद्धव ठाकरे सेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना गृहमंत्री अमित शहा यांचा फोन आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. वाढदिवसानिमित्त अमित शहा फोनवरून शुभेच्छा देत असल्याचा व्हिडिओ खासदार आष्टीकर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेयर केला होता. त्यानंतर आता खासदार आष्टीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेला संवाद इंस्टाग्राम अकाउंट वर शेयर केला आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसा निमित्त फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. तुम जियो हजारो साल, हजारो साल सोबत राहावे लागेल उद्धव ठाकरे असा मिश्किल संवाद आष्टीकर यांच्यासोबत करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांचा फोन गृहमंत्री अमित शहा यांच्या फोनपूर्वी आला की नंतर आला याबाबत खासदार आष्टीकरच अधिक स्पष्टीकरण देऊ शकतील. पण ज्याप्रमाणे हजारो साल सोबत राहायचे असे उद्धव ठाकरे म्हणताहेत. त्यामुळे अमित शहा यांच्या फोन नंतरच उद्धव ठाकरे यांचा फोन आणि अश्याप्रकारचे संभाषण असल्याचे दिसत आहे.
--------------------------
खा. आष्टीकर - 976-447-1777
13
Report
AKAMAR KANE
FollowJul 28, 2025 15:19:02kolhapur, Maharashtra:
Ngp Divya Kaku 121
live u ने फीड पाठवले
------
महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या दिव्या देशमुखच्या काकू डॉक्टर स्मिता देशमुख यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
बाईट --- डॉक्टर स्मिता देशमुख, दिव्या देशमुख हिची काकू
14
Report
AKAMAR KANE
FollowJul 28, 2025 15:18:56kolhapur, Maharashtra:
Ngp Divya Granmother 121
live u ने फीड पाठवले
------------
नागपूर
दिव्या देशमुख ने महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेतेपद मिळवल्यानंतर सर्वप्रथम आजी डॉक्टर कमल देशमुख यांची संपर्क केला आणि विजेतेपदाचा आनंद व्यक्त केला... दिव्याच्या विजेतेपद हे बुद्धिबळाबाबत तिच्या समर्पित आणि सातत्य भावनेमुळे मिळाल्याचेही तिच्या आजीने झी24तास शी बोलताना सांगितले... यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
-----
बाईट
डॉक्टर कमल देशमुख, दिव्या देशमुख हिची आजी
14
Report
PNPratap Naik1
FollowJul 28, 2025 14:49:22Kolhapur, Maharashtra:
Kop Mahadevi Elephant
Feed :- File
Anc :- कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीनी संदर्भात नांदणी मठाने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर गेल्या आठवड्यापासून प्रतिक्षेत असणारी गुजरात मधील वनतारा टीम हत्तीचा ताबा घेण्यासाठी नांदणी गावात पोहोचली आहे. सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला, त्यामुळे नांदणी इथल्या स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींचे संस्थान मठ आणि मठांतर्गत येणाऱ्या 865 गावा मधील जैन धर्मीय समाज नाराज झालाय. दरम्यान प्रशासनाने मठाचे मठाधिपती यांची भेट घेऊन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे अंमलबजावणी करावे लागेल असे सांगितलं, त्यामुळे नाराज नांदणीकर ग्रामस्थ महादेवी हत्तीची गावातून मिरवणूक काढून महादेवी हत्तीन वनतारा कल्याण केंद्राच्या स्वाधीन करणार आहे.
14
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 28, 2025 14:46:17Beed, Maharashtra:
बीड मधला दहशतीचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल : हातात कोयते आणि सत्तुर घेऊन मारहाण करत व्हिडिओ काढला..!
note ( या व्हिडिओ मध्ये अश्लील शिवीगाळ आहे... )
Anc : बीडमधून दहशतीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.. एका तरुणाला दोघेजण हातात कोयता व सत्तूर घेऊन धमकावत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते.. तुझ्यावर आता वार करतो असे देखील हे तरुण बोलताना दिसतात .. दरम्यान त्यानंतर काही वेळातच या तिघा जणांनी शेख असीम याला मारहाण देखील केली असून त्याच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.. त्यानंतर आता तो खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला असून बीडमध्ये पुन्हा दहशत पसरली आहे.
14
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 28, 2025 14:45:59Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 2807ZT_GAD_PROTEST
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक कंत्राटदारांना जिल्हा विकासाची कामे मिळत नसल्याची ओरड, सुमारे 400 कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेत स्थानिक नसलेल्या कंपन्यांना दिले जात आहे झुकते माप, स्थानिक कंत्राटदारांनी रोष व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
अँकर:--गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक कंत्राटदारांना जिल्हा विकासाची कामे मिळत नसल्याची ओरड होत आहे. सुमारे 400 कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेत स्थानिक नसलेल्या कंपन्यांना झुकते माप दिले जात आहे. स्थानिक कंत्राटदारांनी रोष व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांना बदनाम करत अधिकारी बड्या ,स्थानिक नसलेल्या कंपन्यांना कंत्राट देत असल्याचा आरोप कंत्राटदार संघटनेने केला आहे . या पुढच्या काळात स्थानिक कंत्राटदारांना निविदा प्रक्रियेत सहभागी करत कामे न दिल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
बाईट १) प्रणय खुणे, आंदोलक कंत्राटदार
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
14
Report
ABATISH BHOIR
FollowJul 28, 2025 14:33:32Kalyan, Maharashtra:
यूपीएससी, एमपीएससी परीक्षा क्लासेच्या नावाखाली विद्यर्थ्यांची केली फसवणूक
जीएसटी इन्स्पेक्टर असल्याचे सांगत थाटले स्पर्धा परीक्षांच्या क्लासचे दुकान
विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस जीएसटी इस्न्पेक्टरला मनसेने दिला चोप
मनसेने दिले पोलीसांच्या ताब्यात
Anchor : कल्याणमध्ये जीएसटी इन्स्पेक्टर असल्याचे सांगत स्पर्धा परीक्षांचे क्लास चालवणाऱ्या बोगस जीएसटी इन्स्पेक्टरला चोप देत त्याचा भांडाफोड महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला. विद्यार्थांची अवाजवी फी घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी पोलीसांनी या ठगाला त्याब्यात घेतले आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन समोर सिद्धार्थ लॉजिक नावाने यूपीएससी एमपीएससी बँकिंग रेल्वे आणि इतर स्पर्धा परीक्षांचे क्लास सिद्धार्थ सिंग चंडेल याने सुरू केले. आतापर्यंत आपण 700 विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत लावले असल्याचे सांगत विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेतले. मात्र या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे न शिकवता विद्यार्थ्यांकडून वारेमाप फी आकारून योग्य शिकवणी न देता विद्यार्थ्यांना दमदाटी करण्याचा प्रकार सिद्धार्थ चांडेल हा करत होता.याची तक्रार या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष विनोद केणे यांच्याकडे केली असता, मनविसेचे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी,शहर अध्यक्ष विनोद केणे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या क्लास मध्ये जाऊन त्याच्याकडे त्याच्या जीएसटी इन्स्पेक्टर पदाबाबत विचारणा केली असता, त्याची बोबडी वळाली. सरकारी अधिकारी असतांना आपण क्लास कसे घेऊ शकता असा सवाल मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर न दिल्याने यावेळी संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सिद्धार्थ सिंग चांडेल याला मनसे स्टाईल चोप देत धडा शिकवला. तसेच विद्यार्थ्यांची घेतलेली फी परत करण्याची मागणी केली.सिद्धार्थ सिंग चंडेल याने विद्यार्थ्यांकडून सर्व विषयांची वेगवेगळ्या प्रकारे फी घेत असल्याचे समोर आले. कोणाकडून 15 हजार कोणाकडून 20 हजार तर कोणाकडून 50 हजार अशी वेगवेगळी फी जशी मिळेल तशी वसूल केली. एवढी फी घेऊन देखील शिक्षण मात्र शून्य. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळोवेळी शिक्षक बदलत होता. हे शिक्षक केवळ स्पर्धा परीक्षांची प्राथमिक माहिती या विद्यार्थ्यांना देत होते. वारंवार बदली होणारे शिक्षक यामुळे योग्य शिक्षण मिळत नसल्याने याची तक्रार विद्यार्थ्यांनी सिद्धार्थ याच्याकडे केली असता, मी जे शिक्षक देईल तेच तुम्हाला शिकवतील असे उडवाउडवीची उत्तरे देत होता. तसेच काही विद्यार्थ्यांनी भरलेली फी परत मागितली असता विद्यार्थ्यांना धमकावत तुम्हाला काय करायचे आहे ते करा फी परत मिळणार नाही अशी दमदाटी केली.
byte... विनोद केणे / परेश चौधरी
मनसे पदाधिकारी
byte.. विदयार्थी
14
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 28, 2025 14:33:13Beed, Maharashtra:
परळी, बीड: आमदार धनंजय मुंडे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन; श्रावण सोमवार निमित्त मुंडेंकडून प्रभु वैद्यनाथाचा अभिषेक आणि महाआरती
Anc : माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी परळी येथे श्रावण सोमवार निमित्त प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.. प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळी येथे लाखो भाविक दाखल झाले असून आमदार धनंजय मुंडे यांनी या पावन पर्वावर योग साधत महाआरती आणि अभिषेक देखील केला.. दरम्यान धनंजय मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना नात प्रतिष्ठानच्या वतीने होत असलेल्या फराळ वाटपाच्या ठिकाणी देखील भेट देऊन फराळ वाटप केले..
14
Report
AKAMAR KANE
FollowJul 28, 2025 14:32:43kolhapur, Maharashtra:
नागपूर -
बाईट - देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री, -
- अतिशय आनंद आहे की नागपूरची, महाराष्ट्राची दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या जागतिक स्पर्धेत अजिंक्यपद प्राप्त केले, आहे स्पर्धा जिंकलेली आहे आणि ग्रँडमास्टर चा किताब देखील या ठिकाणी प्राप्त केला आहे
- खरं म्हणजे किशोरवयीन अशी पहिली खेळाडू आहे जिने महत्त्वाच्या चॅम्पियनशिप जिंकली आहे, दुसऱ्यांदा तिने त्यामध्ये भाग घेतला
- यापूर्वीही तिने भारताकरिता अनेक मेडल घेतले आहेत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अतिशय उत्तम अशी कामगिरी तिने केली आहे
- 23 गोल्ड मेडल जिंकले आहेत त्यामुळे अतिशय होतकरू खेळाडू म्हणून पण तिच्याकडे पाहू शकतो
- कोनेरू हम्पी यांचंही मी अभिनंदन करतो, पण नागपूरकरिता आणि महाराष्ट्रातील तमाम जनते करिता आपले सुपुत्र या ठिकाणी अशा प्रकारे कमी वयात ग्रँडमास्टर हा खितांब मिळवते आणि जागतिक अजिंक्यपद मिळवते ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांचा सन्मान करू
- ज्यांनी आपल्या भारताचा आणि महाराष्ट्राचे नाव मोठं केलाय अशा खेळाडूंचा उचित सन्मान झालाच पाहिजे म्हणून मी आमचे दोन्ही सहकारी उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यांची चर्चा करून कशाप्रकारे त्यांच्या सन्मान करायचा हे ठरवू
- या संदर्भात काही नवीन योजना आखण्याचे विषय असतील तर अतिशय नक्कीच आखू, आपल्या खेळाडूंना नक्कीच मदत झाली पाहिजे, वातावरण निर्माण झालं पाहिजे असा आपला हा प्रयत्न असेल
- हे खरोखर आनंदाची गोष्ट आहे की पहिल्या दोन्ही स्पॉटवर या स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळणारे दोन्ही खेळाडू हे आपल्या भारताचे खेळाडू होते, दिव्या देशमुख आणि कोणेरू हम्पी देखील आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे
- दिव्या देशमुख प्रमाणे कोनेरू यांचाही अभिमान आहे, आपल्या खेळाडूंनी सगळ्या देशातील खेळाडूंना मागे टाकत फायनल मध्ये गेल्या याचा अभिमान आहे
- विलक्षण अशा प्रकारचा आहे, इतक्या कमी वयात फायनल पर्यंत पोहोचते आणि 19 व्या वर्षी एक महत्त्वाचा टूर्नामेंट ती जिंकते हे महत्त्वाची गोष्ट आहे
On राज ठाकरे वर्षा गायकवाड पत्र -
- मला याबद्दल काही माहिती नाही
On ऑपरेशन महादेव -
- ऑपरेशन महादेव मध्ये तीन आतंकवाद्यांना मारण्यात आल्याचे आतापर्यंत माहिती आहे, जे भारत विरुद्ध जी लढतील त्यांना भारत कुठे पोहोचले हे आता स्पष्ट झाला यापेक्षा जास्त माहिती माझ्याकडे नाही जी काही अधिकृत घोषणा होईल तेव्हा मी नक्की बोलेल
On एकनाथ खडसे -
- दुपारी देखील बोललो मला या संदर्भात कुठलेही राजकीय वक्तव्य करायचं नाही, पोर्षे प्रकरणात ज्या लोकांनी अहवालात गडबडी केली त्यांना नोकरीतून काढून टाकला आहे, त्यामुळे कोणीही गडबड करेल तर त्यावर कारवाई होईल आणि तेव्हापासून जे काही अहवाल आहे ते वेळेत आणि योग्य आले पाहिजे अशा प्रकारचा हा प्रयत्न विभागाचा आहे
- एखादा अहवाल आधी आला, एखादा उशिरा आला यातून त्याचा मूल्यमापन करणे योग्य नाही, मी याला राजकीय रंग देऊ इच्छित नाही आणि त्यांनीही याला विनाकारण राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये, त्यातून कुठेतरी त्यांच्याकरिता योग्य दिसणार नाही
-
14
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 28, 2025 14:19:30Beed, Maharashtra:
बीड: आमदार रोहित पवारांचा परळी - केज दौरा; मुंडे आणि देशमुख कुटुंबीयांची घेणार भेट
संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय हालचालींना वेग
Anc : जिल्ह्यातील दोन गाजलेल्या हत्याकांडांनंतर राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परळीतील व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणी आमदार रोहित पवार उद्या बीड दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते परळीत मुंडे कुटुंबीयांची तर केज येथे देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार आहेत…
या अगोदरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा या दोन्ही कुटुंबीयांना धीर दिला होता. याआधी खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर आणि मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी देखील भेटी देत न्यायाची मागणी केली होती. आता रोहित पवारांच्या या भेटीमुळे दोन्ही हत्याकांडांतील तपास आणि राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
14
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 28, 2025 14:19:23Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2807ZT_CHP_IRAI_2_GATES
( single file sent on 2C)
vis stock आहेत
टायटल:-- चंद्रपूर शहरालगतचे इरई धरण 72 टक्के भरले, पावसाळ्याचे पुढील 2 महिने आणि नद्यांची सामान्य जलपातळी बघता 7 पैकी 2 दारे उघडली
अँकर:--चंद्रपूर शहरालगतचे इरई धरण 72 टक्के भरले आहे. पावसाळ्याचे पुढील 2 महिने आणि नद्यांची सामान्य जलपातळी बघता 7 पैकी 2 दारे उघडण्यात आली आहेत. हे धरण महाऔष्णिक वीज केंद्र अर्थात म्हानिर्मितीच्या मालकीचे आहे. धरणाची 1 आणि 7 क्रमांकाची दारे पाव मीटरने उघडण्यात आली आहेत. 34 क्यूसेक्स इतक्या वेगाने पाणी ईरई नदीत प्रवाहित होत आहे. यंदाच्या पावसाळ्यात पाणी प्रथमच सोडले गेले. एकूण 6 टीएमसी पैकी धरण 72 टक्के भरले आहे. नदीकाठच्या गावे आणि ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा इशारा देण्यात आलाय.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 28, 2025 14:02:46Beed, Maharashtra:
माजलगाव, बीड: आमदार प्रकाश सोळंके 121 पॉइंटर
• मी तर धनंजय मुंडेंना शुभेच्छा दिले आहेत. पक्षसृष्टीच्या मनात जर असेल त्यांना मंत्रिपद द्यायचं तर परत त्यांना शुभेच्छा आहेत.
• जी खंत आहे ती मी बोलून दाखवली आहे. ती फक्त माझ्या बाबतीत नाही.
गेल्या 45 वर्षाचा इतिहास जर पाहिला फार थोडा वेळ मराठा समाजाच्या व्यक्तींना राज्यमंत्री पदापर्यंत संधी मिळाली.
• त्या उलट जर पाहिलं तर ओबीसी असेल मागासवर्गीय असेल यांनाच संधी देण्याचे काम झालं..
• राजकारणामध्ये एनसीपीचा पाठीराखा म्हणून मराठा समाज आहे.
• याच्या विरोधात ओबीसी समाज नेहमीच एनसीपीच्या विरोधात राहिलाय.
• तरी देखील प्राधान्य देताना ओबीसी समाजाला मागासवर्गीय समाजाला मिळतं ही खरोखरच खंत आहे.
• याच्यामध्ये माझं काही वैयक्तिक मागणी आहे असं काही नाही.
• याबाबतीत शरद पवार साहेब अजित दादा यांच्यापुढे जी काय वस्तुस्थिती आहे.
• अगदी निकाल जो असतो लोकसभेचा असो किंवा विधानसभेचा असो त्याचे पुरावे देऊन आम्ही त्यांच्यासमोर आमची बाजू बऱ्याच वेळा मांडली.
• परंतु जी काय पक्षाची विचारसरणी आहे.
• फुले, आंबेडकर, शाहू त्यांच्याप्रमाणे प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा ते प्रयत्न करतात.
• याच्यामध्ये विशेषता बीड जिल्ह्यातला मराठा समाज भरडला जातोय. असे माझे मत आहे.
• मंत्री पदाबाबतचा विचार पक्षसृष्टीने करायचाय जी वस्तुस्थिती आहे जी खंत आहे ती मी फक्त बोलून दाखवली.
• त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचा विरोध अशी माझी भूमिका नाही.
•उलट मी त्यांना शुभेच्छा दिल्यात. मंत्रीपद द्यावं अजून त्यांना महाराष्ट्राचा नेतृत्व करण्याची संधी मिळाली तरी आनंदच होईल.
• ज्येष्ठ म्हणून डावललं जातंय याची मनात कुठेतरी खंत आहे म्हणूनच मी हे बोलून दाखवलं आहे.
• हे असं सातत्याने घडतंय या जिल्ह्यामध्ये मराठा समाजाला कधीच मंत्रिपदाची संधी मिळाली नाही.
• बीड जिल्ह्यात मराठा समाजाला गेल्या 45 वर्षात पालकमंत्री पद मिळाले नाही. ही खरोखरच खंत आहे.
• जे लोक तुमच्या पाठीमागे निवडणुकीत असतात त्यांना न्याय मिळत नाही नंतर ही वस्तुस्थिती आहे.
13
Report