Back
पवना धरण 100% भरलं, धरणाचे दरवाजे उघडले!
CRCHAITRALI RAJAPURKAR
Aug 19, 2025 08:31:09
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 1908ZT_MAVAL_PAVANA_DAM
Total files : 01
Headline : पवना धरण 100 टक्के भरले, धरणाचे सहाही दरवाजे उघडले, 5720 क्युसेक विसर्ग सुरू
पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Anchor:
मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि मावळ ला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण हे 100 टक्के भरलं आहे. हवामान विभागाने पुणे जिल्हा व घाटमाथा परिसराकरिता रेड अलर्ट जारी केला आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाल्याने धरणात मोठा येवा येत आहे. आज धरणाचे सहाही दरवाजे उघडले असून धरणातून 5720 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाच्या व येव्याच्या प्रमाणानुसार हा विसर्ग कमी-जास्त केला जाऊ शकतो. तरी नागरिकांनी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowAug 19, 2025 10:53:58Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1908ZT_CHP_DEMOLITION
( single file sent on 2C)
टायटल :-- चंद्रपूर मनपाने जमीनदोस्त केली 105 वर्षे जुनी जीर्ण इमारत , घनदाट वस्तीच्या भागात धोकादायक स्थितीत होती इमारत
अँकर:-- चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिकेने कारवाई करत बाजार वॉर्ड, जैन मंदिराजवळील 105 वर्षे जुनी जीर्ण इमारत जमीनदोस्त केली. या इमारतीस पाडण्याचे नोटीस देण्यात आले होते, मात्र मालकाने कोणतीही कार्यवाही न केल्याने मनपानेच इमारत जमीनदोस्त केली. पावसाळ्यात धोका टाळण्यासाठी मनपातर्फे दरवर्षी जीर्ण इमारतींना नोटीस दिली जाते. तरीही अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात येतो. ही धोकादायक इमारत अतिक्रमण निर्मूलन पथक व नगर रचना विभागाच्या सहकार्याने पाडण्यात आली.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 19, 2025 10:53:50Dhule, Maharashtra:
Anchor- धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या भाजी मंडीचे अतिक्रमण काढण्यावरून महापालिका व भाजी विक्रेत्यांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष झाल्याच पाहायला मिळाले. महापालिकेतर्फे देवपुरातील भाजी मंडीचा अतिक्रमण काढण्यासाठी कारवाई करण्यात येणार होती. यावेळी भाजी मंडीचे अतिक्रमण काढण्यास जोरदार विरोध करत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह भाजी विक्रेत्यांनी आंदोलन केलं. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांच्या नेतृत्वात भाजी विक्रेत्यांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कारवाईचा निषेध केला. यावेळी अतिक्रमण विभागाचे अधिकारी व भाजी विक्रेत्यांमध्ये शाब्दिक वाद देखील झाला. जोपर्यंत महापालिका हक्काची जागा देत नाही तोपर्यंत देवपुरातील भाजी मंडी बंद करणार नसल्याचा पवित्रा भाजी विक्रेत्यांनी घेतला आहे.
byte - मनोज मोरे, आंदोलक, शिवसेना
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Report
ABATISH BHOIR
FollowAug 19, 2025 10:52:42Kalyan, Maharashtra:
डोंबिवलीत प्रदूषणाचा कहर : नाल्यात पुन्हा गुलाबी पाणी
Anc..औद्योगिक प्रदूषणाचा परिणाम पुन्हा एकदा स्पष्टपणे समोर आला आहे. डोंबिवली MIDC फेज-२ मधील आशापुरा मंदिर परिसरातील मोठ्या नाल्यात पुन्हा एकदा गुलाबी पाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही वर्षांपूर्वी याच नाल्यात अशीच घटना घडली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 19, 2025 10:52:18Bhandara, Maharashtra:
भंडारा जिल्ह्यात पावसाची संततदार सुरुच.... शेतकरी राजा सुखावला
Anchor :- भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संतधार सुरूचतआहे. अधून मधून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहे. जिल्ह्यात सर्वत्र पाऊस बरसत असल्याने शेतकरी सुखावला आहे. मागील आठवड्यात पावसाने पाठ फिरविली होती म्हणून शेतकरी चिंतेत होता. मात्र काल पासुन येणाऱ्या पावसामुळे शेतकरी सुद्धा आनंदित आहे. तर दुसरीकडे नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळाली आहे.
0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowAug 19, 2025 10:51:40Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 1908ZT_MAVAL_LONAVALA
Total files : 02
Headline : लोणावळा नगरपरिषद हद्दीतील सर्व शाळांना पुढील 2 दिवस सुट्टी जाहीर
Anchor :
-पुणे हवामान विभागाने रायगड, ठाणे, पुणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा Red Alert घोषित करण्यात आलेला आहे. तसेच, लोणावळा शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहे. लोणावळा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाखालील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना बुधवार व गुरुवार, दिनांक २० व २१ ऑगस्ट २०२५ रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलीये...
0
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 19, 2025 10:51:21Washim, Maharashtra:
वाशिम :
File2:1908ZT_WSM_PANGANGA_FLOOD_WKT
WSM_PANGANGA_FLOOD_SHOTS
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर : बुलढाणा जिल्ह्यातील पेन टाकळी धरण 84.38 टक्के भरल्याने व सतत पाण्याची आवक सुरू असल्याने धरणाची 9 द्वारे 30 सें.मी. ने उघडण्यात आली असून 9,689 क्युसेक्स पाण्याचा पैनगंगा नदीत विसर्ग केला जात आहे.या विसर्गामुळे वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला पुन्हा मोठा पूर आला आहे.नदीने रौद्ररूप धारण केल्याने गोहोगाव हाडे परिसरातील घरांमध्ये व गोठ्यांमध्ये पाणी शिरले असून गावाचा संपर्क तुटला आहे.पूरामुळे गोहोगाव हाडे–वाकद मार्गावरील विद्रुपा नदीवरील रस्ता आणि गोहोगाव हाडे–मेहकर मार्ग बंद झाले आहेत. तसेच रिसोड–मेहकर मार्गावरील महागाव जवळील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. करडा–गोभणी व धोडप–सरपखेड मार्गही तीन दिवसांपासून बंद आहेत.नदीकाठच्या शेतीत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले असून प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.या पुरस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी..
0
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 19, 2025 10:50:49Raigad, Maharashtra:
स्लग - साळाव ते तळेखार रस्त्याची दुरवस्था ....... शिवसेना ठाकरे गटाचा भर पावसात रास्तारोको ......
अँकर - मुरूड तालुक्यातील साळाव ते तळेखार रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी यासाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. भर पावसात झालेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद लाभला. रोहा ते साळाव रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे मात्र ते अर्धवट राहिल्याने नागरिकांना चिखल तुडवत प्रवास करावा लागतो आहे. यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. आता गणेशोत्सवापूर्वी रस्ता वाहतूक योग्य करण्याचे आश्वासन संबंधित यंत्रणांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 19, 2025 10:31:21Ambernath, Maharashtra:
अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी
मुसळधार पावसामुळे वालधुनी नदीचं पाणी गाभाऱ्यात
प्राचीन शिमंदिरातील शिवलिंग पाण्यात बुडालं
Amb shivmandir
Anchor : अंबरनाथ शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरलं. त्यामुळं प्राचीन शिवमंदिरातील शिवलिंग पाण्यात बुडालं. तसे शिवमंदिर कडे जाणारा पुलही पाण्याखाली आला आहे,
Vo : अंबरनाथमध्ये तब्बल ९६२ वर्ष जुनं प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिराला लागूनच वालधुनी नदी वाहते. आज सकाळ पासून शहरात मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे वालधुनी नदीला मोठा प्रवाह आला आहे. ज्यामुळे शिवलिंग देखील पाण्यात बुडाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी शिवलिंगाचा मुखवटा, नाग हे काढून ठेवण्यात आलं होतं. तसेच शिव मंदिरात बाजूने वाहणाऱ्या नदीच्या प्राण्याचा प्रवाही वाढल्याने शुव मंदिराकडे जाणारा पुलही पाण्याखाली आला आहे
चंद्रशेखर भूयार (अंबरनाथ)
1
Report
LBLAILESH BARGAJE
FollowAug 19, 2025 10:26:11Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- लम्पि प्रादुर्भाव
फीड 2C
Anc:-
अहिल्यानगर जिल्ह्यात जनावरांमध्ये लंम्पि आजाराचा प्रादुर्भाव वाढला असून आतापर्यंत 50 जनावरांचा लम्पि मुळे मृत्यू झाला आहे सध्या जिल्ह्यात 1 हजार 770 जनावरे बाधित झाले आहे. त्यापैकी 1 हजार 163 जनावरे बरे झाले असून सध्या 557 जनावरे बाधित आहेत या बाधित जनावरांवर सध्या उपचार सुरू आहे. तसेच बाधित जनावरांपैकी आत्तापर्यंत 50 जनावरांचा मृत्यू झाला आहे. लंम्पिचा प्रादुर्भाव झालेल्या गावाच्या 5 किलोमीटर अंतरापर्यत बाधित क्षेत्र तर 10 किलोमीटर पर्यत नियंत्रित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाकडून आतापर्यंत 96% लसीकरण पूर्ण झाले असून 12 लाखापेक्षा जास्त जनावरांचा लसीकरण करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता जिल्हा प्रशासनाकडून उपाय योजना केल्या जात असल्याच पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येत आहे.
बाईट:- उमेश पाटील, उपयुक्त पशुसंवर्धन
2
Report
MAMILIND ANDE
FollowAug 19, 2025 10:25:49Wardha, Maharashtra:
वर्धा
SLUG- 1908_WARDHA_KEDAR_BYTE
सुनील केदार बाईट
*सुनील केदार ऑन मतदान चोरी*
- जगाने जी व्यवस्था मान्य केली आहे बॅलेट पेपरची ती मान्य करावी राहुल गांधींनी मतदानाचा यादीमध्ये कशा पद्धतीने चोरी होतात ते सिद्ध केला आहे
- वर्धेमध्ये घ्या महाराष्ट्राचा निवडणुकीमध्ये चोरी करूनच निवडून आलेल्या राहुल गांधींनी या सगळ्या प्रकरणावर चीप इलेक्शन कमिशन निवडणूक आयोगाच्या विरोधात आपली तक्रार नारा दिला मुख्य निवडणूक आयोग तीन महिन्यानंतर बाहेर आले बीजेपीचे लोक बाहेर येतात भारतीय जनता पार्टीच्या लोकांना बाहेर येण्याचा काम काय?
- राहुल गांधीची शंका नाही ते विश्वास आहे हे पंतप्रधान निवडून आलेलेच नाहीये जो माणूस निवडूनच येत नाही तो पंतप्रधान होऊ कसा शकतो कोण कुठल्या जातीचा आहे कोणत्या विचारधाराचा कोणाला मतदान करणार आहे हात महत्त्वाचा नाही मतदानाचा संविधानांना सगळ्यांना देशाचा मालक केलाय देशापासून मालकीचा हक्क हिरावून घेत असेल तर आपण सगळ्यांनी उभं झालं पाहिजे
- संविधान बदलण्याचा मानस 400 पार मदन पूर्ण करू शकलो नाही मला विश्वास आहे ज्या पद्धतीने देशाचे खासदार तीनशे खासदार पहिल्यांदा संसदेत उतरले या माणसाच्या डोक्यामध्ये *पुतीन* आहे पुतीन पुतीन जसा आपल्या देशामध्ये कोण उभा राहील ते ठरवतो कोण मतदान करेल ते देखील तेच ठरवतो तशा पद्धतीच्या मानसिकतेने हे विश्वगुरू आहे त्या पद्धतीने चाललंय हा देश जातीपदाचा देश आहे सर्वधर्मसमभावाचा देश आहे अवघ्या महिन्यात दोन महिन्यांमध्ये सर्वांना मिळेल
- राहुल गांधींनी निवडणूक आयोगाबद्दल शंका व्यक्त केली आणि बीजेपीचे नेते बोलून राहिले कितीतरी लोकांनी इलेक्शन पिटीशन टाकले हायकोर्टाच्या डायरेक्शन प्रमाणे देखील नागपूरचा विचार नागपूरचा विचार केला तर हिंगणा मतदार संघामध्ये इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी यादी जशीच्या तशी ठेवली मतदाना चोरीच्या भरोशावर संविधानाच्या सगळ्या अधिकाराचा चोर करून हे लोक सत्तेत बसले आहे
*सुनील केदार ऑन evm हॅक*
ईव्हीएम चोरीचा भाग आहेच सुरुवात आपण इथूनच करू जगाने evm नाकारलेल्या आपण सुद्धा नाकारला पाहिजे एलॉन मस्क सारखा व्यक्तिमत्व ईव्हीएम मध्ये चोरी होऊ शकते ते म्हणतात आम्हाला करून दाखवा. आम्हाला ईव्हीएम मशीन चा सोर्स कोड द्या आम्ही करून दाखवू
2
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 19, 2025 10:24:39Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_RAIN_WKT
सातारा - सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.यामुळे कृष्णा आणि वेण्णा नद्या दुथडी भरून वाहत आहेत.साताऱ्यातील संगम माहुली या ठिकाणी असणारी छत्रपती शाहू महाराज थोरले यांची समाधी पाण्याखाली गेली आहे.त्याच बरोबर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातून देखील विसर्ग वाढविण्यात आला आहे.सध्या कोयना धरणातून 80500 क्युसेक एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातो आहे.साताऱ्यातील पावसाचा या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी...
wkt
4
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 19, 2025 10:05:19Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - चांदोलीतला विसर्ग वाढला ,वारणा नदी पात्रा बाहेर,ऐतवडे खुर्द येथील पूल पाण्याखाली..
अँकर - सांगलीच्या वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. चांदोली धरणातून विसर्ग वाढवून 30 हजार क्यूसेक करण्यात आला आहे,शिवाय संततधार पडणारा पाऊस,यामुळे वारणा नदीची पातळी वाढली असून वारणा नदी पात्र बाहेर पडले आहे.त्यामुळे वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील पूल पाण्याखाली गेला आहे,सध्या पुलावरून पाणी वाहत आहे,त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे,त्यामुळे कोल्हापूर जिल्हाशी असणारा जवळचा संपर्क तुटला आहे.तसेच वारणा नदीवरील मांगले-सावर्डे, सित्तुर-आरळा,सोंडोली चरण,रेठरे -कोकरूड आणि सोंडोली-माळेवाडी येथील छोटे पूल पाण्याखाली पाण्याखाली गेले आहेत.
तर वारणा नदी पात्रा बाहेर पडल्याने नदी काठच्या शेतामध्ये नदीचे पाणी शिरल्याने शेतीचे मोठं नुकसान झाले आहे.तर चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरूच असून धरणातून विसर्ग वाढवण्यात येत आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असा आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
4
Report
SNSWATI NAIK
FollowAug 19, 2025 10:02:00Navi Mumbai, Maharashtra:
story slug - नवी मुंबई मधील औद्योगिक वसाहती मद्ये पाणी
नवी मुंबई के एमआयडीसी इलके मे पानी
FTP slug - nm midc water logging wkt
shots- midc
reporter- swati naik
navi mumbai
anchor- नवी मुंबई मधील औद्योगिक वसाहती मधील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे ,महापे ते तुर्भे औद्योगिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी असून रस्त्याशेजारील दुकाने हॉटेल मद्ये देखील पाणी भरले आहे , अवजड तसेच हलकी वाहने या रस्त्यावरून ये जा करत असून लहान वाहनांना या पाण्यातून रस्ता काढताना मुशकील झाले आहे ,याचा आढावा घेतला आहे तसेच स्थानिक शी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक
बाईट- wkt
-----------
5
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowAug 19, 2025 09:47:24Vasai-Virar, Maharashtra:
Date-19aug2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI TANSA WKT
Feed send by 2c
Type-WKTa
Slug- वसईतील तानसा नदीवरील पांढरतरा पूल पुराच्या पाण्याखाली
१२ गावांचा संपर्क करणारा पूल पाण्याखाली,
अँकर - वसईतील तानसा नदीवरील पांढरतारा पूल पाण्याखाली.. धोक्याची पातळी ओलांडली... १२ गावांचा संपर्क करणारा महत्वाचा रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला असून पुराचे पाणी आजूबाजूच्या गावात शिरू लागले आहे ...जिल्ह्यातील सर्व नद्यानी धोक्याची पातळी ओलांडली आहे.. तानसा नदीच्या किनाऱ्यावरून या पुरस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी...
Wkt- प्रथमेश तावडे
10
Report
HPHARSHAD PATIL
FollowAug 19, 2025 09:46:42Palghar, Maharashtra:
पालघर- पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे सेवेला फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेची डहाणू विरार उपनगरीय रेल्वे सेवा कोलमडली आहे. विरार ते डहाणू दरम्यान अनेक लोकल अडकून पडल्या होत्या. गुजरातहून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या देखील बोईसर मधील रेल्वे स्थानकांवर थांबल्या आहेत. तर रेल्वे रुळावर पाणी आल्याने काही गाड्या धिम्या गतीने सुरू आहेत.
6
Report