Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

कसारा लोकलमध्ये प्रवाशांची दादागिरी, व्हिडिओने उडवली गोंधळाची लाट!

ABATISH BHOIR
Aug 04, 2025 06:00:21
Kalyan, Maharashtra
दोन्ही सीट आमच्या! " कसारा लोकलमध्ये चाकरमान्यांची दादागिरी, प्रवाशांचा गोंधळ – मोबाईल व्हिडिओ व्हायरल! Anc..कसारा ते कल्याण दरम्यान लोकल ट्रेनमध्ये आज सकाळी मोठा गोंधळ उडाला.दररोज कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पहाटे 6:10 वाजताच्या लोकल ट्रेनमध्ये, दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या एका ग्रुपने सीट राखून ठेवण्यासाठी दादागिरी केली.या ग्रुपमधील एका प्रवाशाने स्वतः खिडकीच्या सीटवर बसत, शेजारच्या दोन सीट्सवर आपली बॅग ठेवली आणि इतर प्रवाशांना तिथे बसण्यास मज्जाव केला.त्याचा स्पष्टपणे आग्रह होता, "आमचा माणूस येणार आहे, दोन्हीही सीट आमच्या आहेत, तुम्हाला जे करायचं आहे करा."या बोलण्यामुळे अन्य प्रवाशी संतप्त झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला. काही प्रवाशांनी या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला.व्हिडिओ शूट होताच संबंधित ग्रुपने शांतता राखली, मात्र हा प्रकार तितकाच धक्कादायक होता.या प्रकारामुळे सकाळच्या वेळेस रेल्वेचा प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांना जागा असूनही उभं राहून प्रवास करावा लागला. यामुळे मुंबई लोकलमधील अशा गटबाजी व दादागिरीवर रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलावीत,अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Aug 04, 2025 09:03:53
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - भटक्या कुत्र्यांच्या टोळीने थेट घरात घुसून महिलेवर हल्ला करत केले जखमी.. अँकर - सांगलीच्या संजयनगर मध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीने थेट खरात घुसून एका महिलेवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.चार ते पाच जणांच्या भटक्या कुत्र्यांनी महिलेवर हल्ला करून लचके तोडून सविता कोळेकर यांना गंभीर जखमी केले आहे.संजयनगर मधील स्फूर्ती सोसायटी मध्ये एका घरामध्ये महिला एकटी असताना परिसरातील चार ते पाच मोकाट कुत्रे थेट घरात घुसले,त्यानंतर कुत्र्यांनी सविता कोळेकर यांच्यावर हल्ला चढवला,यामध्ये पायाला,हाताला,मानेला चावा घेत जखमी केला आहे,यावेळी सविता कोळेकर यांनी आरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेऊन घरातील कुत्र्यांना हुसकावून लावले आहे.मात्र या घटनेमुळे संजयनगर परिसरामध्ये भीतीच वातावरण पसरला असून पालिका प्रशासनाकडून तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास आयुक्तांच्या दालनात भटकी कुत्री सोडू,असा इशारा नागरिकांनी दिला आहे. बाईट - संजय कांबळे - सामाजिक कार्यकर्ते - सांगली.
0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 04, 2025 08:18:51
Akola, Maharashtra:
Anchor : अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या श्रीराज राजेश्वर मंदिरात आज श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहाटे चार वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असून, श्रीराज राजेश्वराच्या जलाभिषेकाची परंपरा भक्तिभावाने पार पाडली जात आहेय. मंदिर परिसरात 'हर हर महादेव' च्या गजरांनी वातावरण भक्तिमय झाले होते..पूर्णा नदीचे पवित्र जल घेऊन अनेक भाविकांनी जलाभिषेक केलाय..मंदिर समिती व पोलिस प्रशासनाकडून गर्दीचे योग्य नियंत्रण ठेवण्यात आले आहेय. श्रावणात येथे अशीच भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते तर दर सोमवारी विशेष गर्दी पाहायला मिळते , हे अकोल्याच्या धार्मिक परंपरेचे जिवंत उदाहरण आहेय..
10
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 04, 2025 08:18:33
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- विद्यार्थिनी मनपा कर्मचारी रक्षाबंधन फीड 2C Anc:- अहिल्यानगर शहरातील सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या विद्यार्थिनींनी आज रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर रक्षाबंधनाचा सण साजरा केला. गेल्या अनेक वर्षापासून शहरांमध्ये महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी हे शहरातील कचरा उचलून शहर स्वच्छता करण्याचे काम करत असतात. या कर्मचाऱ्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून आज अहिल्यानगर शहरातील सविता रमेश प्रशालेच्या विद्यार्थिनींनी सफाई कर्मचाऱ्यांबरोबर रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी देखील विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना स्वच्छतेचे महत्त्व सांगत ओला कचरा, सुका कचरा यांचे वर्गीकरण याबाबत सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थिनीने रक्षाबंधन साजरा केल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे देखील उर भरून आले. यावेळी विद्यार्थिनींनी देखील सफाई कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सफाई कर्मचारी बांधव आपले आरोग्य धोक्यात घालून शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असतात. त्यामुळे जसा एक भाऊ आपल्या बहिणीची आईप्रमाणे काळजी घेतो तसेच सफाई कर्मचारी हे आपल्या शहराची काळजी घेत असतात त्यामुळे आज आम्ही सर्व भगिनींनी शहरातील सफाई कर्मचारी बांधवांना राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. बाईट:- विद्यार्थी व मनपा कर्मचारी
10
Report
KJKunal Jamdade
Aug 04, 2025 08:18:14
Shirdi, Maharashtra:
Anc - आर्थिक घोटाळा, जमीन घोटाळा, नोकरभरती घोटाळा असे घोटाळ्याचे एक ना अनेक प्रकार आपण ऐकले असेल.. मात्र आता चक्क पक्ष प्रवेशामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय.. शिंदेंच्या शिवसेनेत समर्थकांसह प्रवेश करताना, अहिल्यानगर जिल्ह्यातील एका नेत्याने चक्क बोगस यादी सादर करत पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप होतोय.. एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य अहिल्यानगर जिल्ह्या दौऱ्याच्या आधीच पक्ष प्रवेश घोटाळ्याच्या आरोपाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.. काय आहे सगळं प्रकरण..? आणि कोण आहे तो नेता..? बघूया.. V/O - अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील मारुती मेंगाळ हे आदिवासी ठाकर समाजाचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात.. मेंगाळ यांनी तीन महिन्यांपूर्वी आपल्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत ठाणे येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.. आपल्या सोबत अकोले तालुक्यातील अनेक ग्रामपंचायचे सरपंच आणि सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते असल्याचा दावा मारुती मेंगाळ यांनी केला होता.. _SOUND BYTE_ मारुती मेंगाळ ( संग्रहित बाईट ) V/O - मेंगाळ यांच्यासमवेत पक्ष प्रवेश केलेल्या लोकांची यादी समोर आली असून यातील अनेक नावे बोगस असल्याचा आरोप केला जातोय.. यादीत नाव असणाऱ्या अनेकांनी आपले व्हिडिओ प्रसारित करत, आपण असा पक्षप्रवेश केलाच नसल्याचा दावा केलाय.. Byte - पक्षप्रवेश यादीतील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य V/O - या सगळ्या प्रकारानंतर शिवसेना शिंदे गटाचे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.. मारुती मेंगाळ यांच्या पक्ष प्रवेशावेळी पक्षाने आम्हाला कल्पना दिली नाही.. काही दिवसांपूर्वी पक्ष प्रवेशाची यादी समोर आल्यानंतर अनेकांनी हरकती घेतल्या आहेत.. शहानिशा केल्यानंतर यादीतील 40 ते 50 लोकांची नावे बोगस असल्याचे समोर आलंय.. पक्षाची आणि वरिष्ठ नेत्यांची दिशाभूल करण्यात आल्याचे आम्ही नेत्यांना कळवलय.. या प्रकारामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असून वरिष्ठांनी योग्य तो निर्णय घ्यावा असे दराडे म्हणालेत... Byte - बाजीराव दराडे, संपर्क प्रमुख, शिर्डी लोकसभा, शिवसेना शिंदे गट V/O - दरम्यान 9 ऑगस्ट रोजी आदिवासी दिनाचे औचित्य साधून मारुती मेंगाळ यांनी अकोले येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलं आहे.. मात्र शिंदे यांच्या संभाव्य दौऱ्यापूर्वीच मेंगाळ यांच्यावर पक्ष प्रवेश घोटाळा आणि पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप होतोय.. या सगळ्या प्रकारानंतर एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.प्रतिनिधी कुणाल जमदाडे झी २४ तास अहिल्यानगर
7
Report
KJKunal Jamdade
Aug 04, 2025 08:00:29
Shirdi, Maharashtra:
Anc - देशाच्या सीमांचे रात्रंदिवस संरक्षण करणाऱ्या जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिर्डीतून “एक राखी जवानांसाठी” या उपक्रमांतर्गत रक्षाबंधनानिमित्त शिर्डी ते श्रीनगर रक्षायात्रेची उत्साहात सुरुवात करण्यात आली. संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि संजीवनी सैनिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या यात्रेला आज साईबाबा मंदिराजवळून शुभारंभ झाला. V/O - या रक्षारथाच्या माध्यमातून देशभरातून जमा झालेल्या हजारो राख्या थेट श्रीनगरमधील जवानांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. जवळपास २२५० किलोमीटरचा प्रवास करत हा रथ महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा, पंजाबमार्गे जम्मू कश्मीरपर्यंत पोहोचणार आहे.उद्घाटनप्रसंगी संजीवनी सैनिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर वाद्य सादरीकरण करीत वातावरणात उत्साह आणि देशप्रेम जागवलं.या उपक्रमाचे आयोजन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक विवेक कोल्हे यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाने सामाजिक भान आणि देशप्रेमाचे अनोखे दर्शन घडवले आहे.या उपक्रमाबाबत संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी अधिक माहिती दिलीये... Bite - विवेक कोल्हे , अध्यक्ष संजीवनी युवा प्रतिष्ठान Bite - साईभक्त महिला
9
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 04, 2025 07:45:45
Junnar, Maharashtra:
Feed 2C Slug: Junnar Kharmale Presidential File:05 Rep: Hemant Chapude(Junnar) Anc:जुन्नर तालुक्यातील पर्यावरणप्रेमी रमेश खरमाळे यांना राष्ट्रपती भवनामध्ये होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी अधिकृत आमंत्रण प्राप्त झाले आहे. भारतीय टपाल विभागामार्फत आलेले हे आमंत्रण पोस्टमनने त्यांच्यापर्यंत पोहोचवले. रमेश खरमाळे यांच्या ऑक्सिजन पार्कसारख्या उल्लेखनीय उपक्रमामुळे त्यांचे पर्यावरण क्षेत्रातील योगदान देशपातळीवर पोहोचले आहे.  गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मन की बात" या कार्यक्रमात रमेश खरमाळे यांच्या वृक्षारोपण व जलसंधारण उपक्रमांचा विशेष उल्लेख केला होता. त्यांनी जनतेला या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले होते. खरमाळे कुटुंबीयांनी हजारो झाडे लावली असून, पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी शोषखड्ड्यांची निर्मिती केली आहे. “राष्ट्रपती भवनातून आलेले आमंत्रण म्हणजे ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदवाक्याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे,” अशी भावना रमेश खरमाळे यांनी यावेळी व्यक्त केली. या निमित्ताने त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली असून, पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या सर्वांसाठी हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. Byte:- रमेश खारमळे (माजी सैनिक आणि वनविभात जुन्नर चे कर्मचारी) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
12
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 04, 2025 07:35:45
Parbhani, Maharashtra:
अँकर- हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांच्या वतीने दरवर्षी श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी कावड यात्रा काढली जाते. कळमनुरी चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली येथील ओम कयाधु अमृतधारा मंदिर अशी ही कावडयात्रा काढली जाते. चिंचाळेश्वर मंदिरात महादेवाची आरती करून या यात्रेला सुरुवात झालीय, वसमत विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू नावघरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या यात्रेत तरुणाचा मोठा उत्साह बघायला मिळतो,18 किलोमीटर ची पाई यात्रा करीत ही यात्रा हिंगोलीत पोहोचत असते. मागील तीन वर्षांपासून राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कावड यात्रेला येत असतात याही वेळी एकनाथ शिंदे कावड यात्रेला येणार असून उपमुख्यमंत्री शिंदे यांची सायंकाळी 5 वाजता हिंगोली शहरातील गांधी चौकात जाहीर सभा पार पडणार आहे.
13
Report
UPUmesh Parab
Aug 04, 2025 07:35:38
Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग- आमदार दीपक केसरकर बाईट पॉईंटर- *ऑन : परिणय फुके वक्तव्य* एखाद्या कोणी केलेल्या विधानाला पक्षाचे विधान म्हणून बघता नये. अशी वक्तव्य करण्यापासून सर्वांनी संयम राखला पाहिजे. हे युतीचे शासन आहे. लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा असून लोकांनी आपल्याला मोठ्या अपेक्षांनी निवडून दिले आहे. त्यामुळे लोकांची जास्तीत जास्त सेवा आपल्या माध्यमातून कशी होईल, यावर भर दिला पाहिजे. *ऑन: माधुरी हत्ती* हा शासनाचा निर्णय आहे. पूर्वी लोक हत्तींचे पालनही करीत. मात्र, आता शासन मान्यता असलेल्या ठिकाणी त्यांना न्यावे लागते. पण हा लोकांच्या भावनेचा प्रश्न असून त्याचा विचार व्हावा. मी त्या ठिकाणचा पालकमंत्री होतो, त्यामुळे मी लोकांच्या भावना वनमंत्र्यांना कळवेन. *ऑन : दोडामार्ग हत्ती विषय* याबाबत दोन पर्याय आहेत. तिलारी धरणाच्या मागच्या बाजूला कंपाउंड करून हत्तीचे त्या ठिकाणी संवर्धन करावे. तसेच पालकमंत्री येथील हत्तींबाबत “वनतारा”शी बोलले असतील तर तो एक पर्याय आहे. *ऑन: राज ठाकरे सभा* राज ठाकरेंनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. ते स्वतःचा निर्णय घेऊ शकतात. त्यांना यापूर्वी कशी वागणूक मिळाली हे त्यांनी बघितलंय. राज हे चांगले नेतृत्व असून त्यांना आमच्या कायम शुभेच्छा असतील. *ऑन : अमित ठाकरे* महिलांवर अन्याय होता नये या मताशी सहमत आहे. मात्र, कुणीही कायदा हातात घेऊ नये. राज्य सरकारने महिलांबाबत कडक कायदे केलेत. *ऑन: महायुती तणाव* महायुतीमधील पक्षांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊ नये. असे प्रवेश दिल्यास महायुतीमधील वातावरण खराब होते. त्यामुळे असे प्रवेश मी थांबविले आहेत. एकमेकांच्या विरोधात विधाने येऊ नयेत. सर्वांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. युती म्हणून सर्वांनी महायुतीचा धर्म पाळावा. *ऑन: जिल्हाध्यक्ष मुख्यमंत्र्यांकडे तक्रार* मी सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटून वस्तुस्थिती कानावर घालेन. भाजपमधील कोणाचेच प्रवेश आमच्या पक्षात झालेले नाही. आमची कायम भूमिका अशी आहे की, युतीने एकत्रच निवडणुका लढल्या पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल. *ऑन: महायुती स्वबळाचा नारा* असे निर्णय वरिष्ठांकडून होत असतात. युती म्हणून सर्व निवडणुका एकत्र लढल्या पाहिजेत. त्यामुळे युतीतील वातावरण चांगले राहिले पाहिजे असा मी सर्वांना सल्ला देईन. *ऑन: शिवसेना नेत्यांवर जबाबदारी* ते सर्व जेष्ठ नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला होईल. byte - आमदार दिपक केसरकर
13
Report
SNSWATI NAIK
Aug 04, 2025 07:18:15
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - पनवेल तालुका पोलिसांनी मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात बार तोडफोड के मामले मे योगेश चिले अरेस्ट FTP slug - nm mns yogesh chile shots- reporter - swati naik navi mumbai anchor- राज ठाकरेंच्या इशारानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पनवेल येथील नाईट रायटर ऑर्केस्ट्रा आणि बारवर तोडफोड करण्यात आली होती त्यानंतर मनसे कार्यकर्ते पळून गेले होते मात्र पनवेल तालुका पोलिसांनी मनसे नेते योगेश चिले सह आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे दंगल घडून आणणे खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे जीव मारण्याची धमकी देणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद नोंद करण्यात आलेत पोलिसांकडून आज त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे
14
Report
AAASHISH AMBADE
Aug 04, 2025 07:17:23
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0408ZT_CHP_CM_LETTER ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपुरात स्थानिक भाजप आमदाराच्या मनमानीविरोधात मुख्यमंत्री फडणवीस यांना साकडे, आमदारांनी स्वतःच्या दिवंगत आईच्या नावाने चौक नामकरणाची चालविली आहे तयारी, दुसरीकडे गोवा मुक्ती संग्रामात आहुती दिलेल्या हुतात्म्यांचा मात्र विसर, शहीद बाबुराव थोरात यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मांडली कैफियत      अँकर:--चंद्रपुरात स्थानिक भाजप आमदाराच्या मनमानीविरोधात मुख्यमंत्री फडणवीस यांना साकडे घालण्यात आले आहे. आमदारांनी स्वतःच्या दिवंगत आईच्या नावाने चौक नामकरणाची जोरदार तयारी चालविली आहे.  मात्र दुसरीकडे गोवा मुक्ती संग्रामात आहुती दिलेल्या हुतात्म्यांचा मात्र त्यांना विसर पडलाय. गोवा मुक्ती संग्रामात प्रथम शहीद झालेल्या शहीद बाबुराव थोरात यांच्या आणि असंख्य शहिदांच्या नावाने एक रस्ता देखील नामीत झाला नाही, मात्र कुठलाही स्वातंत्र्य संग्राम अथवा सामाजिक कार्य नसलेल्या आमदारांच्या दिवंगत आईच्या नावाने शहरातील महत्वाच्या चौकात गुपचूप सौंदर्यीकरण केले जात आहे. यावर व्यथित झालेल्या शहीद कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे कैफियत मांडली आहे. बाईट १) विजय थोरात, शहीद बी. के. थोरात यांचे पुत्र आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
14
Report
SKSudarshan Khillare
Aug 04, 2025 07:03:02
Yeola, Maharashtra:
अँकर :-आज श्रावण महिन्याचा दुसरं सोमवार असून या निमित्त चांदवडच्या चंद्रेश्वरी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळी असून सकाळ पासून भाविकांची रांग लागली आहे विशेष म्हणजे दर्शनासाठी शालेय विद्यार्थी देखील मोठया संख्येने आले आहे मंदिर मुंबई-आग्रा महामार्गाला खेटून डोंगरावर असल्यामुळे सर्वत्र पसरलेली हिरवळ, दाट धुके या निसर्गरम्या वातावरणामुळे भाविकांचा आनंद द्विगुणित होत आहे
14
Report
AKAMAR KANE
Aug 04, 2025 06:48:40
kolhapur, Maharashtra:
Ngp Bawankule byte live u ने फीड पाठवले ---------------- नागपूर - बाईट - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री - महसूल परिषदेमध्ये विषयावर अभ्यासगट तयार करून महसुली प्रशासनात काय बदल केले. जुने कायदे कालबाह्य झाले आहे, त्यात बदल काय केला पाहिजे, डीपीसीच्या याच्यात काय बदल केले पाहिजे यावर चर्चा झाली. - शेतकऱ्यांच्या मोजण्या होत नाही, कामात काय बदल केले पाहिजे, 2035 चा विकसित महाराष्ट्र आणि त्यासाठी लागणारे महसूल खात्याचे काम यासाठी दिशा देण्याचं नियोजन झाल आहे... यात साडेतीनशे सुधारणा महसूल विभागाने सुचवले आहे. सर्व सूचना या महत्त्वाच्या या केल्यास महसूल विभाग महाराष्ट्रात नंबर 1 ठरेल On शरद पवार- मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस कधीही काहीच बोलत नाही. ते जबाबदारीने बोलतात, त्यांना सर्व माहिती आहे त्यामुळे त्यांनी स्पष्टता आणली असेल. On उद्धव ठाकरे - - उद्धव ठाकरे यांनी पाच वर्षे उरले सुरले कार्यकर्ते आहे ते सांभाळायचे आहे त्यामुळे त्यांना असं बोलावं लागतं हे बदलणार आहे ते बदलणार आहे. उद्धव ठाकरे पक्ष बदल आमच्याकडे सुरू आहे. - मतदार यादी चुकलेली, बोगस मतदान असे विषय घेऊन उद्धव ठाकरे बोलत आहे... असं बोलल्यास सोडून जाणारे पार्टीचे लोक थांबतील... तुटणारी पार्टी थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे असे बोलत असतात. On संजय राऊत - संजय राऊत यांना खूप सिरीयस घ्यायचं नसतं. त्यांच्याकडे हिंसाचार करणारी टीम नाही आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा काळ गेला...खरं हिंदुत्ववादी विचाराच्या आंदोलन त्यांनी आहे...आता कायद्याचे राज्य आहे, हिंसाचार केल्यास सरकार चूप बसणार नाही, सरकार सोडणार नाही. कुठे हिंसाचार करते, बघू किती धमक आहे. ते सुद्धा बघू.... इथे कायद्याने राज्य आहे. या महाराष्ट्रात मराठी भाषा याविरुद्ध कोणी बोलत असेल तर आम्ही सहन करणार नाही यापूर्वी सांगितला आहे. On शेतकरी राज ठाकरे मेळावा - - यांना कोणासोबत जायचं त्यांना त्यांच्या ठरू द्या आमच्या माहिती म्हणून आम्ही निवडणुका लढणार आहे. On मुंडे बंगला सोडला नाही... - बंगला सोडला की नाही आता, अजित पवार त्याबाबतीत निंर्णय घेतील. On ठाकरे गांधी डिप्लोमसी - - उद्धव ठाकरे यांनी रोज गांधी कुटुंबासोबत जेवण कराव, नाश्ता करावा On मेघना बोर्डीकर - मेघना बोर्डीकर यांचा वक्तव्य तोडून मोडून दाखवलं. त्यामुळे वाद उद्भवला आहे. मी त्यांच्याशी उद्या बोलणार आहे. On शिंदे शिवसेना राष्ट्रीय स्तरावर विस्तार- - एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.. त्यांना त्यांचापक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. On जितेंद्र आव्हाड - *जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या मतदारसंघात मत मिळवण्यासाठी असे वक्तव्य करत असतात. त्यांनी असे वक्तव्य केले तरी निवडून येणार नाही... त्यांचा वक्तव्याने हिंदू समाजाच्या भावना भडकवण्याचा काम जितेंद्र आव्हाड यांनी करू नये, असे केल्यास सनातन धर्म ही मागे राहणार नाही. अशा पद्धतीचे आरोप केल्यास सनातन धर्म बसणार नाही.* On साध्वी प्रज्ञा ठाकूर - - त्या काय बोलल्या हे मी बघितलं नाही On महसूल विभाग - - आतापर्यंत सर्व ऑफिसेस मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी एक प्रवास केला, पाहिजे एखाद्या गावात जाऊन जनतेशी चर्चा संवाद केला पाहिजे, गावात जाऊन जनतेच्या सोडवल्या पाहिजे. शेवटी सर्वात उत्कृष्ट प्रशासन कुठला आहे, ज्या दिवशी एकही तक्रार अर्ज म्हणता येणार नाही. आपल्याला असं महसूल खाता करायचा आहे. की कुठलाही शेतकरी कुठलाही व्यक्ती हा मंत्र्यांना भेटणारच नाही, असे प्रशासन तयार करावयाचे आहे.. दिल On खासदार दुबे - - कोणी कोणाचा राजकारण संपवत नाही, कोणी कोणावर टीका करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकासाचा काम केलं पाहिजे.. On बच्चू कडू नौटंकी- - बच्चू कडू यांच नाव घेतल नाही, अनके पश्चिम महाराष्ट्र नेते आहे ते नौकटंकी करत आहे...ते बच्चू कडूसाठी नव्हत, सभागृहात प्रश्न मांडत नाही. मात्र बाहेर जाऊन बसले होते. बच्चू कडू यांनी सांगीतलेल्या बैठका आम्ही घेतल्या, दिव्यांग बांधवांचा महिना वाढला, ते इतर रोज अनेक नौटंकी आंदोलन सुरू आहे....परवा दांडी यात्रा निघाली असे आंदोलन सुरू आहे. त्यावर बोललो.गरीब माणसाचे कर्ज माफ झाले पाहिजे, त्यासाठी कमिटी केली आहे, आठ दिवसानंतर बैठक घेणार आहे. असेही बावनकुळे म्हणालेत... On स्थानिक स्वराज्य निवडणूक - - उद्या निवडणूक झाल्यास भाजप तयार आहे, यात प्रत्येक जिल्ह्यात मेळावे होतील, धाराशिव, बुलढाणा या भागात जानार आहे, विधानसभा प्रमाणे 51 टक्के मत घेऊन आम्ही जिंकणार आहे.
14
Report
AKAMAR KANE
Aug 04, 2025 06:48:35
kolhapur, Maharashtra:
2c ला संग्रहित व्हिडिओ जोडले आहे -=---- नागपूर शहरात बहुतांश भागात उद्यापासून दीड दिवसाचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. पेंच-एक जलशुद्धीकरण केंद्रा अंतर्गत पाणीपुरवठ्याच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी हे नियोजित 36 तासांचे शटडाऊन असणार.नागपूर महानगरपालिका (NMC) आणि ऑरेंज सिटी वॉटर (OCW) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सकाळी १०:०० वाजल्यापासून ते बुधवार ६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०:०० वाजेपर्यंत, ३६ तासांचे शटडाऊन नियोजित करण्यात आले आहे. हे शटडाऊन AMRUT योजनेअंतर्गत अत्यावश्यक देखभाल आणि पायाभूत सुविधा सुधारणेच्या कामासाठी आवश्यक आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस पाणीपुरवठा खंडित असल्याने नागपूरकरांनी त्यादृष्टीने उपाययोजना करून ठेवण्याची गरज आहे
14
Report
SKSudarshan Khillare
Aug 04, 2025 06:47:49
Yeola, Maharashtra:
अँकर: दुष्काळाने ग्रस्त असलेल्या येवला तालुका आणि नगरसुल परिसरासाठी आजचा दिवस महत्वाचा ठरला असून मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी अखेर पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे येवला-नगरसुल परिसरात दाखल झाले. यावेळी शेतकऱ्यांनी जलअभिषेक करून या पाण्याचे उत्साहाने स्वागत केले.
14
Report
PNPratap Naik1
Aug 04, 2025 06:45:11
Kolhapur, Maharashtra:
Story :- Kop KMC Gherav Andolan Feed :- Live U Anc :- कोल्हापूर महानगरपालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा जाब विचारण्यासाठी ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज कोल्हापूर महानगरपालिकेला दुचाकी रिक्षासह घेराव घालण्यात येणार आहे. दुपारी साडेबारा वाजता गांधी मैदान येथून शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या दिशेने निघणार आहेत. कोल्हापूर शहरातील शंभर कोटी रस्त्याची वाताहात, गांधी मैदान व इतर मैदानाची झालेली दयनीय अवस्था, पथदिवांमध्ये झालेला भ्रष्टाचार यासह ठेकेदाराने अधिकाऱ्याशी हात मिळवणी करून केलेला भ्रष्टाचाराचा ठाकरे शिवसैनिक कोल्हापूर महानगरपालिकेला घेराव घालून जाब विचारणार आहेत.
14
Report
Advertisement
Back to top