Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

पंकजा मुंडे म्हणतात: सेल्फी काढणाऱ्यांना निधी नाही!

NMNITESH MAHAJAN
Aug 15, 2025 08:16:39
Jalna, Maharashtra
FEED NAME : 1508ZT_JALNA_MUNDE_BYTE(11 FILES) जालना : माझ्यासोबत फोटो,सेल्फी काढणाऱ्यांना मि निधी देणार नाही,कामांना निधी देईल : पंकजा मुंडे अँकर : माझ्याकडे चांगला निधी आहे .त्यामुळे चांगलं काम करण्याचा माझा प्रयत्न असणार असून माझ्यासोबत फोटो,सेल्फी काढणाऱ्यांना मि निधी देणार नाही.तसेच मतदान केलं म्हणून मतदारांना निधी देता येणार नाही,कामांना निधी देता येईल,माझ्यासोबत फोटो काढला म्हणून निधी देता येणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.आज ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी मुंडे जालन्यात आलेल्या होत्या.ध्वजारोहण संपल्यानंतर मुंडे यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शहरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. साऊंड बाईट : पंकजा मुंडे,पालकमंत्री ,जालना
12
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Aug 15, 2025 10:15:50
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1508ZT_NANDED_JARANGE(3 FILES) नांदेड:नांदेड दौऱ्या दरम्यान मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली अँकर : मराठा आंदोलक मनोज जरांगे आज दिवसभर नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.या दौऱ्यात जरांगे मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी बैठका घेणार आहेत.दरम्यान या दौऱ्यात जरांगे यांची प्रकृती खालावली आहे?जरांगे यांना चक्कर आल्यानं डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 15, 2025 10:15:34
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज... स्किप्ट ::- लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा... तावरजा व तेरणा नदीला पूर... नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा....भुसनी डॅमची दरवाजे वेळेवर न उघडल्याने तावरजा नदीकाठच्या शेतीत घुसले पाणी, पिकांचे प्रचंड नुकसान.... AC ::- लातूर जिल्ह्यात तुफान पाऊस, तावरजा व तेरणा नदीला पूर. रात्रीपासूनच्या मुसळधार पावसामुळे जिल्हाभर पाण्याचा जोर वाढला आहे. भुसनी डॅमची दरवाजे वेळेवर न उघडल्याने तावरजा नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी घुसले असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, औसा तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पाचा पाणी साठी ७३% झाला आहे तर माकणी येथील निम्न तेरणा धरण ८५% भरले आहे. पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस होण्याची शक्यता असल्याने दोन्ही प्रकल्पातून पाणी सोडले जाणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापने नदीकाठच्या गावांना व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, नदी-नाल्यांपासून आणि पुलांपासून दूर रहावे, मुलांना पाण्याजवळ पाठवू नये, तसेच पूर प्रवण भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बाईट ::- शेतकरी
0
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 15, 2025 10:07:39
Nagpur, Maharashtra:
Ngp Bawankule B live u ने फीड पाठवलं --=------- ( शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बाईट) -------- नागपूर - बाईट - चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्री - बाईट - स्वातंत्र्यांच्या 79 व्या वर्षांमध्ये आपण सर्व सहभागी झालो आहोत, 78 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आज या पद्धतीने हर घर तिरंगा आणि तिरंगा यात्रा काढून प्रत्येक भारतीय, प्रत्येक नागरिक या देशाला विकसित करण्या करता सज्ज झाला आहे, मी सर्व भारतीयांचा सर्व जनतेचा स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देतो - मला विश्वास आहे मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पुढे नेण्याकरिता आजच्या दिवशी सर्व धर्म, जात, पंथ एकत्र येऊन या महाराष्ट्राला विकसित करूया,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प पूर्ण करूया अशी अपेक्षा करतो आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो - आज पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना विकसित भारत हा कसा पुढे जातो आहे, 2025 मध्ये भारताने सुरक्षित भारत जगाला दाखवला आहे - आपल्या देशाकडे कोणी डोळे वाकडे करून बघितले तर आपण त्यांच्या घरात घुसून त्यांना मारू शकतो हे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दाखवले आहे - ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून आतंकवाद्या विरोधात अभियान झालेला आहे, सर्व भारतीयांचे विकसित भारताकडे वाटचाल सुरू झाले आहे - नागपूरचा सहभाग ऑपरेशन सिंदूर मध्ये आहे On नागपूर सीसीटीव्ही - - मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या की नागपुरात सीसीटीव्ही सिस्टम मजबूती करण करा - समाजात वितुष्ट घडवणारे जे सुरू आहेत ते आमच्या पोलीस विभागाने सायबर माध्यमातून प्रत्येक गुन्हेगार शोधून काढला पाहिजे - आर्थिक किंवा सामाजिक गुन्हा असो तो पकडला जावा याकरिता चांगले पद्धती तयार करण्यात आली, त्या पद्धतीला सायबर मजबूत करण्याकरिता प्रयत्न करतोय - नागपुरातील प्रत्येक नगरपालिका सीसीटीव्ही मध्ये आणून मार्व्हल नावाच्या तंत्रज्ञानाने सर्वांना सुरक्षा देण्याचा विचार करतोय - कुठलाही गुन्हेगार या शहराला धोका पोहोचवणार नाही याचं जाळं पसरवतोय On महसूल विभाग - - मुख्यमंत्र्यांनी महसूल विभागाला उंची देण्याकरिता महसूल परिषद घेतली, पुणे आणि नागपूर येथे झाले, आणि जे टारगेट देण्यात आला आहे की जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी महसूल खात्याची आहे, यासाठी 36 निर्णय महसूल खात्याने घेतले आहेत - 17 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी यांचा जन्मदिवस आहे महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबरला आहे - मोदी यांच्या जयंती पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत महसूल विभागाचे जे मुद्दे आहेत, प्रश्न आहेत, ज्यात रस्ते,तुकडे बंदी कायदा यासारखे यासाठी अभियान राबवणार - दहा कोटी वृक्ष लागवडीचा विचार करतोय, सिंधुदुर्ग मध्ये खाजगी वनाच्या जमिनी मोठ्या प्रमाणात लावून दिले आहेत, या राज्यात विविध प्रश्न आहेत त्यात झुडपी जंगलाचाही आहे प्रश्न आहे - नागपूर शहरात डीसीपी झोन सहा हा मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे, नवीन डीसीपी येणार आहे, दोन एसीपी नागपूरला मंजूर केले आहे, ट्राफिक विभागाचे मजबुतीकरण होणार, नागपुरात कळमना, कान्होलीबारा आणि भिलगाव हे पोलीस स्टेशन होणार आहेत - यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी कालेक जीआर काढला, त्यात कामठी तालुक्यातील वडोदा, कुही मधील पाचगाव आणि कळमेश्वर मधील मोहपा या तीन पोलीस स्टेशनाही मंजुरी दिली आहे - मारवल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपूर्ण घर सीसीटीव्हीच्या अंतर्गत आणण्याचा प्रकल्प सुरू होतोय -
1
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 15, 2025 10:01:30
Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी - शहर विकास आराखडा विरोधात लांजा वासी यांचा एल्गार लांजा कुवे बचाव समितीचे लांजा तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन लांजा शहर विकास आराखडा बनवणारी टंडन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने तयार केलेल्या आराखडा चुकीचा ताबडतोब या विकास आराखड्याला स्थगिती द्या शेकडो ग्रामस्थ आराखडा रद्द करण्यासाठी उपोषणाला या आराखड्यात खाजगी इमारती शासकीय इमारती म्हणून सुद्धा देखील दाखवण्यात आल्याची धक्कादायक माहिती लांजा शहरातील सद्यस्थितीत असलेले रस्ते या आराखड्यातून झालेत गायब लांजा कुवे गावातील शेकडो ग्रामस्थ आक्रमक
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Aug 15, 2025 10:01:20
Pune, Maharashtra:
आळंदी,पुणे -आळंदीत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 जन्मोत्सवानिमित्ताने समाधी मंदिरावर अकरा किलोचा सुवर्ण कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे -सोहळ्याची सुरुवात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाद्वार पूजनाने होणार असून कलशाची पूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे... -सोहळ्याच्या पूर्वसंध्येला अलंकापुरीतून प्रदक्षिणा मार्गाने ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात, ढोल ताशाच्या निनादात सुवर्ण कलशाची मिरवणूक काढण्यात आली -हा संपूर्ण सोहळा वारकरी संप्रदायाच्या परंपरेत ऐतिहासिक क्षण ठरणार आहे -या सोहळ्यासाठी लाखो भाविकांनी अलंकापुरी एकच गर्दी केली आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 15, 2025 10:01:00
Raigad, Maharashtra:
स्लग - सुनील तटकरेंवर टीका म्हणजे हाथी चले बाजार ....... अनिकेत तटकरे यांनी मंत्री भरत गोगावलेना डिवचले ...... कुणाची उलटी गिनती सुरू झालीय यापेक्षा काम महत्त्वाचं ...... यापूर्वी अशा वल्गना अनेकदा झाल्या ..... अनिकेत तटकरे यांचं जोरदार प्रत्युत्तर ....... अँकर - सुनील तटकरेंनी अनेक टीका टिपण्णी सहन करत आजवरची राजकीय वाटचाल केली आहे. त्यामुळे गोगावले यांची टीका म्हणजे हाथी चले बाजार असल्याचं सांगत माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांना डिवचले आहे. सुनील तटकरे यांची उलटी गीनती सुरू झाली असल्याचा दावा भरत गोगावले यांनी माणगाव येथील मेळाव्यात केला होता. त्याला अनिकेत तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अनेक वल्गना यापूर्वीही झाल्यात जो काम करतो त्याच्यावरच टीका होत असते. त्यामुळे कुणाची कसली गिनती सुरू झालीय यापेक्षा आम्ही आमचं काम करत राहू जनता जनार्दन त्याबाबतचा निर्णय घेईल , असंही अनिकेत तटकरे यांनी म्हटलं आहे. बाईट - भरत गोगावले, मंत्री बाईट - अनिकेत तटकरे, माजी आमदार
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Aug 15, 2025 10:00:43
Palghar, Maharashtra:
पालघर _ मनोर वाडा रोडवर वाघोटे टोलनाका येथे केमिकल टँकरचा भीषण अपघात . उभ्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने घडला अपघात अपघातानंतर संपूर्ण केमिकल आजूबाजूच्या भात शेतीमध्ये गेल्याने मोठे नुकसान . तर आजूबाजूला बोरवेल असल्याने त्याच्या पाण्यामध्येही केमिकल मिक्स झाल्याने भीतीच वातावरण . केमिकल टँकरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात घडल्याची चालकाची माहिती.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 15, 2025 10:00:09
Nashik, Maharashtra:
*मालेगाव ब्रेकिंग... विशाल मोरे* - स्वातंत्र्यदिनी मालेगाव महापालिका आयुक्तांना साडी चोळी देण्याचा प्रयत्न.. - अनेक वर्षे तक्रारी करून देखील निकाली लावले जात असल्याने आयुक्तांचा निषेध करीत साडी चोळी देण्याचा प्रयत्न - अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणी पूर्ण करत नसल्याने तक्रारदार यांनी केला आयुक्तांचा साडी चोळी देत निषेध.. - ध्वजारोहण करीत वापस होत असतांना दिला साडी चोळीचा आहेर.. - स्वतंत्र दिनी मालेगावात मनपा विरोधात आंदोलन करीत सामाजिक कार्यकर्ते आणि तक्रारदारांनी केला निषेध.. - वारंवार तक्रारी करून देखील कारवाई केली जात नसल्याने केला निषेध.. - शहरातील समस्या, निकृष्ट रस्ते, भ्रष्ट्राचार संदर्भात तक्रारी करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने आयुक्तांचा केला निषेध.. - आंदोलकाला पोलिसांनी घेतले ताब्यात.. -
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 15, 2025 09:45:40
Nashik, Maharashtra:
मालेगाव ( नाशिक ) : ब्रेकींग... - मालेगावात मटण मास विक्रेत्यांनी स्वातंत्र्यदिनी ठेवल्या आस्थापना बंद.. - मालेगाव महानगरपालिकेने कत्तलखाने, मांस विक्रेते, व हॉटेल व्यावसायिकांना स्वातंत्र्य दिनानिमित्त बंद ठेवण्याचे काढले होते आदेश.. - आदेशाचे पालन करत मटण विक्रेत्यांनी दुकाने ठेवली बंद..
4
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 15, 2025 09:45:33
Nashik, Maharashtra:
*विशाल मोरे,मालेगाव..* अँकर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा अभियानाला प्रतिसाद देत, जन अधिकार रक्षा मंचतर्फे मालेगावात 2100 फूट लांबीच्या तिरंग्याची सन्मान यात्रा काढण्यात आली. श्रीराम मंदिर रामसेतू पुलापासून रणगाडा शौर्यतीर्थ येथे भारतमातेचे पूजन करून यात्रेचा समारोप झाला. भर पावसातही विविध संघटनांचे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि भूतपूर्व सैनिकांनी उत्साहात सहभाग घेतला. तरुणाई नशामुक्त व्हावी हा संदेश देत पोलीसही या रॅलीत सहभागी झाले. भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणांनी परिसर दुमदुमला, तर शहरात या रॅलीची मोठी चर्चा रंगली.
2
comment0
Report
SMSarfaraj Musa
Aug 15, 2025 09:16:57
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी शिवारात झेंडावंदन करत शक्तीपीठ रद्दची केली मागणी अँकर - सांगली मध्ये शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी देखील स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे.आपल्या शिवारात झेंडावंदन करत शक्तीपीठ महामार्ग रद्दची मागणी करण्यात आली आहे.बुधगाव या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली शक्तिपीठ बाधित शेतकऱ्याच्या शेतामध्ये ध्वजारोहण करण्यात आलं.यावेळी बुधगावच्या सरपंचांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.शिवारामध्ये तिरंगा झेंडा फडकवत शक्तिपीठ रद्द झाला पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी करत मागणी देखील करण्यात आली आहे.
3
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 15, 2025 09:16:33
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - बार्शी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी, 50-60 हेक्टर क्षेत्रातील पिके गेली पाण्यात - बार्शी तालुक्यात पावसाची दोन दिवसापासून दमदार हजेरी, चांदणी नदीला आला पूर - तालुक्यातील कोरेगाव येथील 50 ते 60 हेक्टर जमीन पुराच्या पाण्यात - कोरेगाव येथील यमाई तलाव ओव्हर फ्लो, तलावातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरलं.. - त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन उडीद भुईमूग तुर पिकाला मोठा फटका.. - शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी Byte : शेतकरी
10
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 15, 2025 09:16:22
Akola, Maharashtra:
युवकाचा चेहरा ब्लर करणे.. Anchor : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव–अकोला रोडवर एका युवकावर प्राणघातक हल्ला करत एसिड फेकून लुटण्याची धक्कादायक घटना घडली आहे..ही घटना अमरावती येथील एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या अमोल इसाळ या युवकासोबत घडली आहे..अमोल शेगावला दर्शनासाठी गेला होता आणि परतीच्या प्रवासात अज्ञात दोन इसमांनी त्याला अडवून शेतात नेले, त्याच्यावर जबर मारहाण केली आणि मोबाईल व रोख रक्कम लुटली.. प्राण वाचवण्यासाठी अमोलने पुलाखाली लपण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी तिथेही त्याच्यावर हल्ला करत एसिड फेकले..जखमी अवस्थेत मुख्य रस्त्यावर पोहोचलेल्या अमोलला नागरिकांनी तातडीने खामगाव येथील रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला अकोल्यात हलवण्यात आले.अमोलच्या भावाच्या माहितीनुसार, अमरावतीत ज्या खोलीत अमोल राहत होता, त्याच्या रूम पार्टनरसह मागील महिनाभर त्याचे वाद सुरू होते आणि त्यामुळे संशयाची सुई रूम पार्टनरकडे वळवत असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे..सध्या अमोलला पुढील उपचारासाठी त्याच्या मूळ गावी यवतमाळ येथे हलवण्यात आले आहे तर पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे. Byte : स्वप्निल इसाळ , अमोलचा भाऊ
6
comment0
Report
KJKunal Jamdade
Aug 15, 2025 09:16:09
Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash *साईबाबांना सोन्या - चांदीचे दान...* *17 लाख रुपयांच्या वस्तू दान...* 191 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ताट... 283 ग्रॅम वजनाचे चांदीचे अगरबत्ती स्टँड साई चरणी अर्पण... *सुंदर नक्षीकाम केलेले आणि " श्रद्धा - सबुरी " नाव असलेले चांदीचे अगरबत्ती स्टँड...* तेलंगाणा येथील साईभक्त डॉक्टर जी. हरीनाथ आणि जी. पुष्‍पलता असे दानशूर साईभक्तांचे नाव... साईबाबा संस्थानकडून दानशूर साईभक्तांचा सत्कार...
9
comment0
Report
MKManoj Kulkarni
Aug 15, 2025 09:05:24
Mumbai, Maharashtra:
अँकर -- मुंबईत दहीहंडी उत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे.गोविंदा पथक जास्तीतजास्त थर लाऊन दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करणार आहेत तर आयोजकांनीही याची तयारी सुरू केली आहे.पश्चिम उपनगरात आमदार प्रकाश सुर्वे गेल्या २० वर्षांपासून दहीहंडीच मोठ्या प्रमाणात आयोजन करत असतात.यावर्षी एकविसाव वर्ष आहे. मागठने येथील देवपाडा मैदानात जोरदार तयारी सुरू आहे स्वतः आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांचे पुत्र राज सुर्वे यांनी तयारीची पाहणी केली.जास्तीत जास्त थर लावून दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला २५ लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आहे.यावर्षी कर्करोग ग्रस्तांना मदत करणार,तर मनोरंजनासाठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार हजेरी लावणार असल्याचे आयोजक राज सुर्वे यांनी सांगितलं आहे.याचाच आढावा आणि राज सुर्वे यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी Wkt n tiktak मनोज कुळकर्णी Feed send TVU 50 Slug-- Prakash Surve Dahihandi
12
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top