Back
कोल्हापूरमध्ये अवयवदान मोहिमेचा प्रारंभ, आरोग्यमंत्र्यांनी भरला अर्ज!
PNPratap Naik1
Aug 15, 2025 07:21:58
Kolhapur, Maharashtra
Kop organ donet story
Feed:- Live U
Anc :- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यामध्ये अवयवादानाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे... राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वतः आज कोल्हापुरात अवयवदानाचा अर्ज भरला आहे... त्याचबरोबर राज्यातील नागरिकांना अवयवदान अर्ज भरण्यासंदर्भात आवाहन केलं आहे....कोल्हापूर जिल्हा हा अवयवादानाच्या मोहिमेमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे..नागरिकांनी मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता अवयवदान करावं. आपण केलेल्या अवयवादानामुळे आपल्याच राज्यातील एखाद्या बांधवांचे प्राण वाचू शकतात असं मत यावेळी प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले. यावेळी अवयवदानाचे अर्ज भरलेल्या नागरिकांचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सत्कार केला.
8
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowAug 15, 2025 09:16:57Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी शिवारात झेंडावंदन करत शक्तीपीठ रद्दची केली मागणी
अँकर - सांगली मध्ये शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी देखील स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे.आपल्या शिवारात झेंडावंदन करत शक्तीपीठ महामार्ग रद्दची मागणी करण्यात आली आहे.बुधगाव या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली शक्तिपीठ बाधित शेतकऱ्याच्या शेतामध्ये ध्वजारोहण करण्यात आलं.यावेळी बुधगावच्या सरपंचांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.शिवारामध्ये तिरंगा झेंडा फडकवत शक्तिपीठ रद्द झाला पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी करत मागणी देखील करण्यात आली आहे.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 15, 2025 09:16:33Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - बार्शी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी, 50-60 हेक्टर क्षेत्रातील पिके गेली पाण्यात
- बार्शी तालुक्यात पावसाची दोन दिवसापासून दमदार हजेरी, चांदणी नदीला आला पूर
- तालुक्यातील कोरेगाव येथील 50 ते 60 हेक्टर जमीन पुराच्या पाण्यात
- कोरेगाव येथील यमाई तलाव ओव्हर फ्लो, तलावातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरलं..
- त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन उडीद भुईमूग तुर पिकाला मोठा फटका..
- शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी
Byte : शेतकरी
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 15, 2025 09:16:22Akola, Maharashtra:
युवकाचा चेहरा ब्लर करणे..
Anchor : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव–अकोला रोडवर एका युवकावर प्राणघातक हल्ला करत एसिड फेकून लुटण्याची धक्कादायक घटना घडली आहे..ही घटना अमरावती येथील एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या अमोल इसाळ या युवकासोबत घडली आहे..अमोल शेगावला दर्शनासाठी गेला होता आणि परतीच्या प्रवासात अज्ञात दोन इसमांनी त्याला अडवून शेतात नेले, त्याच्यावर जबर मारहाण केली आणि मोबाईल व रोख रक्कम लुटली.. प्राण वाचवण्यासाठी अमोलने पुलाखाली लपण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी तिथेही त्याच्यावर हल्ला करत एसिड फेकले..जखमी अवस्थेत मुख्य रस्त्यावर पोहोचलेल्या अमोलला नागरिकांनी तातडीने खामगाव येथील रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला अकोल्यात हलवण्यात आले.अमोलच्या भावाच्या माहितीनुसार, अमरावतीत ज्या खोलीत अमोल राहत होता, त्याच्या रूम पार्टनरसह मागील महिनाभर त्याचे वाद सुरू होते आणि त्यामुळे संशयाची सुई रूम पार्टनरकडे वळवत असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे..सध्या अमोलला पुढील उपचारासाठी त्याच्या मूळ गावी यवतमाळ येथे हलवण्यात आले आहे तर पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे.
Byte : स्वप्निल इसाळ , अमोलचा भाऊ
0
Report
KJKunal Jamdade
FollowAug 15, 2025 09:16:09Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
*साईबाबांना सोन्या - चांदीचे दान...*
*17 लाख रुपयांच्या वस्तू दान...*
191 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ताट...
283 ग्रॅम वजनाचे चांदीचे अगरबत्ती स्टँड साई चरणी अर्पण...
*सुंदर नक्षीकाम केलेले आणि " श्रद्धा - सबुरी " नाव असलेले चांदीचे अगरबत्ती स्टँड...*
तेलंगाणा येथील साईभक्त डॉक्टर जी. हरीनाथ आणि जी. पुष्पलता असे दानशूर साईभक्तांचे नाव...
साईबाबा संस्थानकडून दानशूर साईभक्तांचा सत्कार...
0
Report
MKManoj Kulkarni
FollowAug 15, 2025 09:05:24Mumbai, Maharashtra:
अँकर -- मुंबईत दहीहंडी उत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे.गोविंदा पथक जास्तीतजास्त थर लाऊन दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करणार आहेत तर आयोजकांनीही याची तयारी सुरू केली आहे.पश्चिम उपनगरात आमदार प्रकाश सुर्वे गेल्या २० वर्षांपासून दहीहंडीच मोठ्या प्रमाणात आयोजन करत असतात.यावर्षी एकविसाव वर्ष आहे. मागठने येथील देवपाडा मैदानात जोरदार तयारी सुरू आहे स्वतः आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांचे पुत्र राज सुर्वे यांनी तयारीची पाहणी केली.जास्तीत जास्त थर लावून दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला २५ लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आहे.यावर्षी कर्करोग ग्रस्तांना मदत करणार,तर मनोरंजनासाठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार हजेरी लावणार असल्याचे आयोजक राज सुर्वे यांनी सांगितलं आहे.याचाच आढावा आणि राज सुर्वे यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी
Wkt n tiktak
मनोज कुळकर्णी
Feed send TVU 50
Slug-- Prakash Surve Dahihandi
3
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 15, 2025 09:04:15Dhule, Maharashtra:
anchor - धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण दरम्यान अनेकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. धुळे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणा दरम्यान आत्मदहन करण्यांमुळे वातावरण चांगलेच तापले होते.आत्मदहन रोखण्यासाठी पोलिसांची यावेळी चांगलीच तारांबळ उडाली होती.जिल्हाधिकारी येथे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते स्वतंत्र दिनानिमित्त होत असलेल्या ध्वजारोहण सोहळ्या दरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील गरताड येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले असतांना लक्ष दिले जात नसल्याने मुलीचे आई आणि नातेवाईकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. दुसऱ्या घटनेत, धुळे जिजामाता गर्ल हॉस्टेल येथे लहान मुलीवर झालेल्या मारहाण प्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी पीडित मुलीचा आईने ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. तीसऱ्या घटनेत शिरपूर तालुक्यातील भोरटेक येथे ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी तरुणाने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकुन आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. चौथ्या घटनेत मोरदड येथे खूनाचा गुन्हा दाखल असतांनाच आरोपींना अटक झाली नसल्याने आरोपींना अटक करावी यासाठी आत्मदहन पुर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 15, 2025 09:01:18Dhule, Maharashtra:
Anchor- भारताचा 79 व स्वातंत्र्य दिन धुळे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राज्याचे पणन व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. धुळे जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा येत असून येणाऱ्या काळात जिल्ह्यात उद्योग सिंचन आणि शेती क्षेत्रात भरघोस कामगिरी करण्यासाठी प्रशासन व सरकार तत्पर असल्याचं मनोगत यावेळी मंत्री लावल्याने व्यक्त केलं.
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 15, 2025 09:00:51Dhule, Maharashtra:
ANCHOR :- भारतीय स्वातंत्र्य चा ७९ वा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाचा मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून, पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली, ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारीना विविध पुरस्कार आणि पालकमंत्र्यांनी जील्ह्यावसियाना शुभेच्छा दिल्यात, त राज्य शासनाच्या वतीने अनेक विकासाच्या योजना राबवल्या जात असून या योजनेच्या लाभ जिल्हावासीयांना मोठ्या प्रमाणावर मिळाला आहे तर जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या दर्जा उंचावर यासाठी वर्ग खोल्या दिल्या जात आहे तर डिजिटल शाळा देखील मोठ्या प्रमाणावर तयार होत आहे येणाऱ्या काळात नंदुरबार जिल्हा हा राज्यात विकसित जिल्हा म्हणून आग्रहाने पुढे राहणार आहे यासाठी राज्य सरकार आणि जिल्ह्यातील सर्वच अधिकारी प्रयत्न करतील अशी अपेक्षा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री माणिकराव पाटील यांनी अपेक्षा व्यक्त केली, वेळी स्वातंत्र्य सनिक लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 15, 2025 09:00:24Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून पाच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पिंगळी,परभणी ग्रामीण,लिमला,कातनेश्वर,रावराजूर या पाच मंडळात अतिवृष्टी झालीय,यामध्ये पूर्णा तालुक्यातील तीन मंडळाचा समावेश आहे,पिकात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने पीक सडून जाऊन नुकसान होणार आहे. शिवाय पुढे नाल्यांना पूर आल्याने अनेक भागातील पीक खरडून गेली असून काही गावांचा हे संपर्क तुटला आहे. वेळीच पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
बाईट- शेतकरी
0
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 15, 2025 08:51:26Dhule, Maharashtra:
ANCHOR - मंत्री पदाच संकट टाळल्यानंतर क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा नंदुरबार जिल्ह्यातील शनि मंदिरात लीन झाले. मंत्रीपद जाऊ नये यासाठी कोकाटे काही दिवसांपूर्वी शनी मंदिरात आले होते. मनोभावे पूजा करीत आरती केली. यावेळेस मंत्रीपदावरील साडेसाती दूर व्हावे असं सकाळ कोकाटे यांनी घातल होत आणि दैव कृपेमुळे हे संकट दूर गेल्याची भावनने कोकाटे पुन्हा शनी चरणी लिन झाल्याची चर्चा यावेळी रंगली. माणिकराव कोकाटे यांनी स्वतंत्र दिनाच ध्वजारोहन केल्यानंतर शनि देवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी थेट दुसऱ्यान्दा दर्शनाचे कारण न सांगता, आमचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मागच्यावेळी शनी मंदिरात आलो होतो, नंदुरबार येथील शनी मंदिर हे प्रसिद्ध असून साडेसात शक्तिपीठांपैकी एक शनी मंदिर आहे. मी नेहमी धार्मिक विचार करत असतो, म्हणून दर्शन न करता जाना योग्य नाही, असं सांगितलं. शनि महाराजांची माझ्यावर कृपा आहे. त्यामुळे शनि महाराजांचं वारंवार दर्शन मला घडत आहे, असं कोकाटे यांनी सांगत शनिदेवाचे आभार मानले. माझ्यावर शनिमहाराजांची कृपा असल्याशिवाय काही घडत नाही, शनि महाराज माझ्या मागे लागला नाही आहे तर खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा आहे, असं सांगायला कोकाटे विसरले नाहीत.
byte - माणिकराव कोकाटे, मंत्री
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
4
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 15, 2025 08:51:14Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - रक्ताला कोणती जात धर्म नसतो,
सिंदूरचा प्रस्ताव तुम्हाला पण दिला होता,पण धमक एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे - चंद्रहार पाटलांचा संजय राऊतांवर पलटवार..
अँकर - खासदार संजय राऊतानी शिवसेनेचा
सिंदूर रक्तदानवरून केलेल्या टिकेचा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी समाचार घेतला आहे.जम्मू कश्मीरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सिंदूर रक्तदानावरून,गद्दारांचा रक्त जवानांना नको, अशी टीका केली होती.यावरून चंद्रहार पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया एक्स अकाऊंटवरून "रक्त हे रक्तच असतं त्याला कोणतीही जात धर्म नसते आणि सिंदूर रक्तदानाचा प्रस्ताव आपल्यासमोर ठेवला होता,पण ती धमक फक्त एकनाथ शिंदेंच्या मध्ये आहे,अश्या शब्दात चंद्रहार पाटलांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे.
पै.चंद्रहार पाटलांनी नेमके काय पलटवार केलय ,ते पाहूया.
आदरणीय संजय राऊत साहेबांनी,आपल्या सुरक्षेसाठी सीमेवर रक्त सांडणाऱ्या जवानांसाठी समर्पित असलेल्या आणि देश स्वतंत्र झाल्यापासून इतिहासात पहिल्यांदाच संपन्न झालेल्या सिंदूर महारक्तदान यात्रेवर टिका करणे उचित नव्हते, कारण कुणाचंही रक्त हे रक्तच असतं,रक्ताला कोणताही जात, धर्म नसतो. हा प्रस्ताव मी आपल्यापुढेही ठेवला होता, परंतु हे करण्याची धमक फक्त मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मध्येच आहे, आणि शिवसेना पक्षाने हा इतिहास घडवला आहे.
3
Report
KJKunal Jamdade
FollowAug 15, 2025 08:50:52Shirdi, Maharashtra:
Anc - कुंभमेळ्याच्या तयारीचं मोठं आव्हान आपल्या खांद्यावर असल्याचं सांगत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी एक वेगळाच योगायोग सांगितला. मागच्या कुंभमेळ्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि आपण जलसंपदामंत्री तसेच कुंभमंत्री होतो, आणि यावेळीही तीच परिस्थिती असल्याचं त्यांनी नमूद केलं. मात्र , मागच्या वेळी मी नाशिकचा पालकमंत्री होतो.यावेळी पालकमंत्री पदाबाबत अजून घोषणा व्हायची असून , त्यावर त्यांनी स्मितहास्य करत सूचक इशारा दिला.
*गिरीश महाजन ऑन कुंभमेळा योगायोग आणि पालकमंत्री पद -*
कुंभमेळा यशस्वी करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे...
मागच्या कुंभमेळ्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते.. यावेळीही तेच मुख्यमंत्री आहेत
तेंव्हा मी जलसंपदामंत्री होतो, आताही मीच जलसंपदामंत्री आहे...
मागच्या वेळी कुंभमंत्री मीच होतो, यावेळीही कुंभमंत्री मीच आहे...
हा सगळा योगायोग म्हणजे नशिबाचा भाग..
मागच्यावेळी मी नाशिकचा पालकमंत्री होतो , यावेळी मात्र... पालकमंत्री अजून डिक्लेअर व्हायचंय...
स्मित हास्य करत नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत गिरीश महाजन यांचं सूचक वक्तव्य..
speech - गिरीश महाजन ,
3
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 15, 2025 08:49:40Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_tirnga_rally
शहरात एक हात देशासाठी या अभिनव संकल्पनेतून विश्वविक्रम
अँकर
नाशिक शहरात एक हात देशासाठी या अभिनव संकल्पनेतून विश्वविक्रम नोंदवण्यात आलाय.. नाशिक शहरातील मानवधन संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. माझा हात देश कार्यासाठी या संकल्पनेतून पांढऱ्याशुभ्र कापडावर राष्ट्रध्वजातील तीन रंगांनी 9 हजार 999 हातांच्या ठशांचा 381 मीटर लांब तिरंगा तयार करण्यात आलाय... दरम्यान विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या हाताच्या ठशांच्या तिरंगा ध्वजाची रॅली आयोजित करण्यात आली होती.. या तिरंगा ध्वजाची रॅली शहरात फिरवण्यात आली यात अनेक विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला.... या ध्वजाची सध्या शहरभर चर्चा सुरू झालीये....
6
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 15, 2025 08:49:15Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_JALEBI_NEWS
सातारा - भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध सांस्कृतिक, देशभक्तीपर कार्यक्रमांची रेलचेल असते. मात्र, साताऱ्यात १५ ऑगस्ट म्हटलं की एक गोड परंपरा ताजी होते — तिरंग्याच्या शानसोबत तोंडात विरघळणाऱ्या गरमागरम जिलब्यांचा आस्वाद घेण्याची!
विओ - दरवर्षीप्रमाणे यंदाही साताऱ्यातील मुख्य बाजारपेठ, चौपाट्या, चौक आणि गल्लीबोळात सकाळपासूनच जिलेबीचे स्टॉल सजू लागले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कुटुंबियांसह, मित्रांसह किंवा सकाळच्या ध्वजवंदनानंतर थेट जिलेबीच्या स्टॉलवर जाण्याची साताऱ्याची ही जुनी परंपरा आहे. "१५ ऑगस्टला जिलेबी नाही खाल्ली, तर दिवसच अपुरा वाटतो," असे स्थानिक नागरिक हसत सांगतात.
प्लास्टिक पिशव्यांविरोधात मोहीम
यंदा मात्र या गोड परंपरेला एक नवा सामाजिक संदेशही जोडला गेला आहे. शहरातील काही जिलेबी विक्रेत्यांनी प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. ग्राहकांनी जिलेबी खरेदीसाठी आपले डबे आणल्यास त्यांना बिलावर थेट १० टक्के सवलत देण्यात येत आहे.
Byte - ग्राहक
विओ3-"आम्ही रोज शेकडो ग्राहकांना जिलेबी देतो. प्लास्टिक पिशव्या कमी करण्यासाठी हा छोटा प्रयत्न आहे. ग्राहकांनीही उत्साहाने प्रतिसाद दिला आहे. शहर अधिक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनेल," असे एका विक्रेत्याचे सांगणे आहे
Byte - प्रशांत मोदी - विक्रेते
विओ 3- सकाळपासूनच जिलेबीच्या स्टॉलवर खवय्यांची रांग लागलेली दिसते. साताऱ्यात १५ ऑगस्टच्या दिवशी मिळणारी ही 'देशभक्तीची गोड भेट' वर्षानुवर्षे लोकांच्या मनात ताजी राहत असून, यंदा प्लास्टिकविरोधी मोहिमेमुळे ती अधिक खास ठरणार आहे.
3
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 15, 2025 08:49:01Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील चिरकुटा येथील अरुणावती प्रकल्पाला स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा रंगात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे अरुणावती धरण तीन रंगांनी न्हाऊन निघाल्याचे भासत आहे, धरणाचे हे विहंगम दृश्य कार्यकारी अभियंता विनोद बागुल यांनी
ड्रोन कॅमेऱ्यात चित्रित केले आहे.
3
Report