Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

चंद्रहार पाटलांचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार!

SMSarfaraj Musa
Aug 15, 2025 08:51:14
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - रक्ताला कोणती जात धर्म नसतो, सिंदूरचा प्रस्ताव तुम्हाला पण दिला होता,पण धमक एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे - चंद्रहार पाटलांचा संजय राऊतांवर पलटवार.. अँकर - खासदार संजय राऊतानी शिवसेनेचा सिंदूर रक्तदानवरून केलेल्या टिकेचा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी समाचार घेतला आहे.जम्मू कश्मीरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सिंदूर रक्तदानावरून,गद्दारांचा रक्त जवानांना नको, अशी टीका केली होती.यावरून चंद्रहार पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया एक्स अकाऊंटवरून "रक्त हे रक्तच असतं त्याला कोणतीही जात धर्म नसते आणि सिंदूर रक्तदानाचा प्रस्ताव आपल्यासमोर ठेवला होता,पण ती धमक फक्त एकनाथ शिंदेंच्या मध्ये आहे,अश्या शब्दात चंद्रहार पाटलांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे. पै.चंद्रहार पाटलांनी नेमके काय पलटवार केलय ,ते पाहूया. आदरणीय संजय राऊत साहेबांनी,आपल्या सुरक्षेसाठी सीमेवर रक्त सांडणाऱ्या जवानांसाठी समर्पित असलेल्या आणि देश स्वतंत्र झाल्यापासून इतिहासात पहिल्यांदाच संपन्न झालेल्या सिंदूर महारक्तदान यात्रेवर टिका करणे उचित नव्हते, कारण कुणाचंही रक्त हे रक्तच असतं,रक्ताला कोणताही जात, धर्म नसतो. हा प्रस्ताव मी आपल्यापुढेही ठेवला होता, परंतु हे करण्याची धमक फक्त मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मध्येच आहे, आणि शिवसेना पक्षाने हा इतिहास घडवला आहे.
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UPUmesh Parab
Aug 15, 2025 11:03:34
Oros, Maharashtra:
अँकर ---- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कणकवली मधील सावडाव धबधब्याच्या नूतनीकरणाच्या कामाचे खासदार नारायण राणे यांच्या हस्ते आज उद्घाटन पार पडले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे देखील उपस्थित होते. या उद्घाटन कार्यक्रमानंतर नारायण राणे यांनी सेल्फी पाँईटवर जावून कॅमेऱ्यात पोझ दिली. यावेळी राणे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन दृष्ट्या विकसित होण्यासाठी या धबधब्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे बारमाही हा धबधबा सुरू राहण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी या धबधब्याचा फायदा होणार असल्याचे यावेळी राणे म्हणाले. बाईट- नारायण राणे खासदार
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 15, 2025 11:03:18
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -SAT_KHINDWADI सातारा - साताऱ्यातील खिंडवाडी येथील राज्य मार्ग क्रमांक १४० वरील खिंडवाडी रस्त्याचे काँक्रिटीकरण अतिक्रमणांमुळे अडथळ्यात आले आहे. गेल्या महिन्यांपासून हे काम प्रलंबित असून, रहिवाशांना चिखलातून प्रवास करावा लागतो आहे.रहिवाशांनी या अडचणींबाबत यापूर्वी लेखी आणि तोंडी तक्रारी दिल्या होत्या. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या भागाचे आ.महेश शिंदे यांनी या रस्त्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे मात्र आ.शशिकांत शिंदे यांनी या रस्त्याला विरोध केल्या मुळे हे काम रखडले आहे.त्यामुळे या खिंडवाडी येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे.या उपोषणस्थळी आ.महेश शिंदे भेट देत या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.आ.शशिकांत शिंदे हे हलक्या कानाचे असून त्यांनी अभ्यास करून काम केलं पाहिजे अशी खोचक टिका आ.महेश यांनी केली आहे. Byte - आ.महेश शिंदे विओ 2- या रस्त्यात येणारी अतिक्रमणे तात्काळ हटवून काम सुरू न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थानी दिला आहे. Byte - ग्रामस्थ
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 15, 2025 11:02:51
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज... स्किप्ट ::- लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा...भुसनी डॅमचे दरवाजे वेळेवर न उघडल्याने पिके पाण्याखाली, शेतकर्यांची आत्महत्या – आमदार अमित देशमुखांची चौकशीची मागणी.... AC ::- लातूर जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाचा तडाखा सुरूच आहे. पावसामुळे भुसनी डॅमचे स्वयंचलित दरवाजे वेळेवर न उघडल्याने शेतांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचा मोठा फटका भुसणी येथील शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. पिके पाण्याखाली गेल्याने हतबल झालेल्या खंडू देवकते या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच लातूर शहराचे आमदार माजी मंत्री अमित देशमुख यांनी तत्काळ कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.भुसनी डॅमचे स्वयंचलित दरवाजे वेळेवर का उघडले नाहीत याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.... बाईट ::- आमदार अमित देशमुख
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Aug 15, 2025 11:01:02
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव: DHARA_SIRNIKE सगळ्या महापालिकेत महायुतीचे महापौर बसतील, ठाकरेंच्या युतीचा काहीही फरक पडणार नाही कोणी कितीही युती करू द्या, काहीही बोलू द्या महायुतीला काहीही फरक पडणार नाही सगळीकडे महायुतीचे महापौर बसतील मुंबई,ठाणे, पनवेल सगळीकडे महायुतीचे नगरसेवक निवडून येतील दोन्ही ठाकरे एकत्र येण्याचा एकनाथ शिंदेंना काहीही फरक पडणार नाही उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येणार आणि जिंकणार या संजय राऊतांच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया Byt: प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 15, 2025 11:00:38
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - बार्शीत पावसाची तुफान हजेरी, संपूर्ण हॉटेलमध्ये शिरले पाणी - बार्शी तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस, सोशल मीडियावर फेमस असणाऱ्या तिरंगा हॉटेलला पावसाचा फटका. - विश्वरूप नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे तिरंगा हॉटेलमध्ये घुसलं पाणी.. - भांडगाव येथील हॉटेल तिरंगा या ठिकाणी गुडघाभर पाणी असल्यामुळे हॉटेलमधील साहित्यांचा नुकसान - महाराष्ट्रात सध्या सोशल माध्यमांवर ट्रेंडिंगवर असणाऱ्या तिरंगा हॉटेलचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.. - धाराशिव जिल्ह्यातून वाहणाऱ्या विश्व रूपा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाल्यामुळे भांडगावसह अनेक गावांना फटका - हॉटेल मालक लक्ष्मण भोसले यांच्यासह काम करणाऱ्या कामगारांना पुराच्या पाण्यातून काढावी लागली वाट.. - तिरंगा हॉटेल हे मटण ढवारा थाळी साठी प्रसिद्ध म्हणून ओळखले जाते..
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 15, 2025 10:52:21
Nashik, Maharashtra:
मंत्री गिरीश भाषण points - अनेक दिवसापासून ते मला बोलवत होते या कार्यक्रमाला - माझ्या मतदारसंघात देखील मला अभ्यासिका करायची होती पण विसरलो - पण आता मी करणारच आहे 7 वेळा मी आमदार झालो - माझी बायको देखील 7 वेळा निवडणूक आली - गेल्या 15 वर्षांपासून ती नगराध्यक्ष आहे - आम्ही दोघे राजकारणात काम करतो आमच्या दोन मुली आहेत पण ते राजकारणात नाही - या अभ्यासिका मध्ये शिकुन 122 जण अधिकारी झाले आहेत - *सध्या नौकरी मिळणे किती कठीण आहे तुम्हाला माहिती आहे* - *थोड्या जागा निघाले यारी हजारो तरुण अर्ज करतात* - *नौकरी मिळत नाही तर छोकरी मिळत नाही* - *अधिकारी म्हणून चांगलं काम केले पाहिजे सरकारी बाबू कसे असतात तुम्हाला माहिती आहे* - भ्रष्टाचार पासून दूर राहिले पाहिजे व्यसन करू नका - साहेब कुठे गेले बसलेत तिकडे मग acb मध्ये अडकतात - कुंभमेळा आपल्यासाठी मोठा आवाहन आहे - प्रयागराज ला जी गर्दी झाली होती अशीच गर्दी होणार आहे - रामकुंड आणि कुशावर्त ठिकाण अतिशय छोट्या जागा आहेत - होणाऱ्या गर्दीतून आपल्याला भाविकांना वाचवायचे आहे - सुधाकर बडगुजर आता आमच्या पक्षात आले आहेत - भाजप काम करणाऱ्या माणसाचा सन्मान करतो - राहुल ढिकले आमच्याकडे आले आणि आमदार झाले - *भाजपात सर्वात जास्त वेळा निवडून येणार माणूस आहे मी* - सात वेळा निवडून येणे हे काय सोपं नाही मोठं योगदान लागतो - *60 टक्के लोक असे आहेत की एकदा निवडून येतात आणि पुन्हा निवडून येत नाहीत* - आमदाराच्या डोक्यात हवा गेल्यावर दुसऱ्यांदा दिसत नाही - अनेक लोक असे आहेत आमच्याकडे त्यांना पद अजून मिळालं नाही - लक्ष्मण सावजी कधी म्हणतात का मला आमदार करा म्हणून - बडगुजर दुसऱ्या पक्षात होते त्यांच्यावर टीका झाली असे टीका होत असतात - *यावेळी अबकीबर 100 पार अस आपला नारा आहे*" - *महायुती मध्ये लढणायचा आमचा प्रयत्न असणार आहे* - *महायुती मध्ये लढो किव्हा नाही यावेळी आपल्याला महापालिका निवडणुकीत 100 पार आपल्या जायचं आहे* - *गिरीश महाजन यांचा पुन्हा नाशिक मनपसाठी 100 पारचा नारा*
3
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 15, 2025 10:52:10
Parbhani, Maharashtra:
अँकर - हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 32 दिवसांपासून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचे विशेष पदभरती आणि रिक्त 8 हजार पदांची बाबर्टी करण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू केले होते, आज पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे ध्वजारोहनासाठी हिंगोली येथे आले असता त्यांनी उपोषणाला भेट देत जागा भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदर उपोषण मागे घेन्यात आले.
1
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 15, 2025 10:52:04
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ जिल्ह्यातील हरदडा ते पुसद हा मार्ग गेल्या एक वर्षांपासून रखडलेला असल्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी करीत आझाद समाज पक्षाच्यावतीने स्वातंत्र्यदिनी हातात तिरंगा झेंडा घेऊन चक्काजाम आंदोलन करण्यात आले, यावेळी आक्रमक आंदोलकांनी अभियंत्याला घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली, यावेळी तब्बल दोन तास वाहतूक व्यवस्था खोळंबल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान या रस्त्याच्या कंत्राटदराने रस्ता ताबडतोब दुरुस्त करून देण्याचे आश्वासना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
4
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 15, 2025 10:45:28
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn biryani party av, wkt Feed by live u काही जिल्ह्यातील मास बंदीच्या विरोधात इम्तियाज जलील यांनी त्यांचे घरी बिर्याणी आंदोलन केलं घरी स्वतः बिर्याणी बनवून त्यांनी सरकारच्या कत्तलखाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला आणि मास विक्री बंद ठेवण्याच्या निर्णयाचा निषेध केला कोणी काय खायचं हे तुम्ही ठरवू शकत नाही आणि म्हणूनच मी हे आंदोलन केल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्यासोबत बातचीत केली आमची प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
4
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 15, 2025 10:45:16
Parbhani, Maharashtra:
अँकर_ हिंगोलीच्या आजेगाव मंडळामध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे, आजेगाव ताकतोडा रस्त्यावरील ओढ्याला पूर आल्याने ताकतोडा गावाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे, या परिसरात दोन तासापासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने ताकतोडा शिंदेफळ गावाकडे येणाऱ्या फुलावर ओढ्याचे पाणी असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिक अडकून पडले असून नदी नाल्यांना पूर आल्याने नदीकाठच्या शेती पिकांचे मोठं नुकसान झाल आहे,
4
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 15, 2025 10:35:46
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 1508ZT_BARAMATIAJIT FILE 4 बारामतीत सुभद्रा मॉलच्या एस्केलेटरचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन...... Slug : बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुनेत्रा पवारांसह पाहिला बाजीराव मस्तानी 2 चित्रपटाचा ट्रेझर... उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते सुभद्रा सिनेमा थिएटरचे झाले उद्घाटन.. Anchor : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत यावेळी अजित पवारांच्या हस्ते सुभद्रा सिनेमा थेटरचे उद्घाटन करण्यात आले..यावेळी अजित पवार यांनी सपत्नीक राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह बाजीराव मस्तानी 2 चित्रपटाचा टीझर पाहण्याचा आनंद घेतला..एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार व आई सुनंदा पवार एकत्र आले होते.
6
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 15, 2025 10:35:37
Nagpur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ आणि बाईट जोडला आहे ---------- नागपूर नागपुरात महानगरपालिकेच्या आदेशानंतर कत्तलखाने आणि मटण विक्रीचे दुकान बंद ठेवण्यात आलेले आहे... नागपूर शहरामध्ये मागील अनेक वर्षांपासून 15 ऑगस्ट 26 जानेवारीला मटन विक्री साधारणतः कत्तलखाने बंदच असतात. यामध्ये एक दिवस बंद ठेवल्याने काही फारसा फरक पडत नाही..अशी प्रतिक्रियां नॉनव्हेज खवय्याने दिली ------- बाईट अतुल वासनिक,
5
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 15, 2025 10:35:25
Raigad, Maharashtra:
स्‍लग – खुटलवाडीतील आदिवासी विद्यार्थ्‍यांचा नदीतून जीवघेणा प्रवास ......... पावसाळ्यात चिखल तुडवत , वाहत्‍या पाण्‍यातून कसरत ........ पूल नाही, रस्‍ता नाही, ग्रामस्‍थ हैराण .......... अँकर – भारताला स्‍वातंत्रय मिळून 80 वर्षे होत आली तरी आजही अनेक वाडया वस्‍त्‍यांवर साधी रस्‍त्‍याची सुविधा नाही. मुंबईच्‍या अगदी जवळ असलेल्‍या अलिबाग तालुक्‍यातील बामणगाव ग्रामपंचायत हद्दीतील खुटलवाडी या आदिवासी वस्‍तीवर जाण्‍यासाठी आजही रस्‍ता नाही. ग्रामस्‍थांना पायवाटेवरून चिखल तुडवत जावे लागत आहे. आजच्‍या पावसामुळे गावाकडे जाणारया रस्‍तयात असलेल्‍या नदीचे पाणी वाढले आहे. या साधा पूल देखील नाही. जास्‍त पाऊस झाला तर नदीला पूर येतो आणि या नदीतून ग्रामस्‍थांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. आज या पाण्‍यातून शाळकरी विद्यार्थ्‍यांना कसरत करत झेंडावंदनासाठी जाण्‍याची वेळ आली आहे. 60 घरांच्‍या या वाडीत 250 लोक राहतात. अनेकदा मागणी करूनही त्‍याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. बाईट – रूपेश मेंगाळ, ग्रामस्‍थ तरूण
5
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 15, 2025 10:35:11
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1508ZT_JALNA_POLICE(11 FILES) या फिडमध्ये लाथ मारतानाचा 11 सेकंदांचा व्हिडीओ आहे जालना :ब्रेकिंग : पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून निवेदन देण्याचा आंदोलकाचा प्रयत्न, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यानं घातली फिल्मी स्टाईलने आंदोलकाच्या कंबरेत लाथ उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांचा प्रताप आंदोलकांवर कौटुंबिक वादातून गुन्हा,न्याय मिळण्याच्या मागणीसाठी महिनाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण अँकर : स्वातंत्र्यदिनानिमित्त आज जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या जालना दौऱ्यावर होत्या.या दौऱ्यात मुंडे यांचा ताफा जात असताना एका आंदोलकांने पंकजा यांचा ताफा अडवून निवेदन देण्याचा प्रयत्न केला.यावेळी पोलिसांनी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं.यावेळी आंदोलकांना  पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी पाठीमागून येऊन ताब्यात घेतलेल्या आंदोलकाच्या कंबरेत पाठीमागून धावत येत फिल्मी स्टाईल लाथ घातली. निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौधरी कुटुंबावर कौटुंबिक वादातून जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र पोलीस आरोपींना सहकार्य करत असून फिर्यादीना त्रास देत असल्याचा आरोप करत अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी यांनी केला आहे. अमित आणि गोपाल चौधरी हे गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत. आज पालकमंत्री पंकजा मुंडे या जालन्यात स्वातंत्र्य दिनासाठी आल्या असताना त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेताच आंदोलकांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीस आंदोलकाला ताब्यात घेऊन जात असतानाच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी धावत जात फिल्मी स्टाईलने आंदोलकाच्या कमरेत लाथ घातल्याचं पाहायला मिळालं..  बाईट : गोपाल चौधरी,आंदोलनकर्ता बाईट: रमेश चौधरी, आंदोलनकर्ते
3
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Aug 15, 2025 10:31:13
Ambernath, Maharashtra:
बदलापूर वर्षा मॅरेथॉन संपन्न  मॅरेथॉन मध्ये धावले हजारो स्पर्धक. bdl marathon  Anchor - आज बदलापूरकर धावले निमित्त होते बदलापूर वर्षा मॅरेथॉनचे. गेल्या 32  वर्षांपासून शिवसेना शहर शाखाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली जाते.आजच्या मॅरेथॉन स्पर्धेत ११ वेगवेगळ्या वयोगटातील 12 हजाराच्या वर स्पर्धक धावले.शालेय विद्यार्थी,विद्यार्थिनी आणि जेष्ठ नागरिकांनी या स्पर्धेत उस्फुर्त सहभाग घेतला होता.बदलापूरच्या कात्रप,बदलापूर गांव,बेलावली या विविध भागातून या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे बदलापुर ग्रामीण भागातील आदिवासी वाड़यातील विद्यार्थी सुद्धा मोठ्या संखेने सहभागी होतात , चंद्रशेखर  भूयार (बदलापुर)
1
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top