Back
भिवंडीतील गणेशोत्सवात निर्माल्य संकलनाने पर्यावरणाची केली काळजी!
UJUmesh Jadhav
Sept 07, 2025 08:32:48
Thane, Maharashtra
श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने भिवंडीत निर्माल्य संकलन....
फुलांच्या निर्माल्यातून तयार केले जाते सेंद्रिय खत...
ॲंकर...
गणेशोत्सव निमित्ताने भिवंडी शहरातील कामवारी नदीवरील गणेश घाट, वऱ्हाळ देवी तलाव गणेश घाट आणि भादवड तलावावरील गणेश घाटांवर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने श्री सदस्यांच्या माध्यमातून निर्माल्य संकलन करण्यात आले. संकलित फुलांच्या निर्माल्यातून सेंद्रिय खताची निर्मिती करून वृक्षारोपण कार्यक्रमातील वृक्ष लागवड केलेल्या वृक्षांच्या संवर्धन वाढीसाठी या खताचा उपयोग केला जातो. श्री सदस्य निर्माल्याचे विघटीकरण करून धागा, प्लास्टिक, फुले आणि इतर कचरा यांचे वर्गीकरण करतात. श्री सदस्यांच्या पर्यावरण स्वच्छता, निर्माल्य संकलन आणि सुरक्षितता बाळगण्यास सहकार्य कार्याचा भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले.
बाईट : श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (श्री सदस्य )
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowSept 08, 2025 04:15:15Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0809ZT_WSM_SEARCH_FOR_YOUTH
रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील सेवादास नगर येथे दुर्दैवी घटना घडली.मूत्यूंजय राजू राठोड हा युवक काल सकाळी गणपती विसर्जनासाठी अरुणावती नदीकाठी गेला असता अचानक पाय घसरल्याने तो प्रचंड प्रवाहात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनाचे शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.मात्र रात्रीचा अंधार वाढल्याने शोधमोहीम स्थगित करण्यात आली होती. आज सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आलं आहे.
4
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 08, 2025 04:02:21Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव ब्रेकिंग
DHARA_KUNABI
धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील चिंचोली एकाच गावात सापडल्या 50 कुणबी नोंदी
मात्र उर्दू आणि मोडी लिपीतील भाषांतराच्या चुकांमुळे गावातील 50 नोंदी पैकी 5 जणालाच मिळाले कुणबी प्रमाणपत्र
हैदराबाद गॅझेट संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या जीआर मधून आम्हाला न्याय मिळावा अशी चिंचोली ग्रामस्थांनी व्यक्त केली अशा
भाषांतरामुळे वंशावळीची अडचण असल्याने चिंचोली गावातील 45 वारस कुणबी प्रमाणपत्रापासून आहेत वंचित
तहसीलदारांनी गावात येऊन स्पॉट पंचनामे व घरटी चौकशी करावी, ग्रामस्थांची मागणी
Byte- ग्रामस्थ
9
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 08, 2025 03:46:37Mumbai, Maharashtra:
अँकर -- राज्यातील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या कॅप प्रवेशाच्या चार फेऱ्यांनंतर आतापर्यंत १,४१,९०५ विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामध्ये यंदा सर्वाधिक पसंती कॉम्प्युटर आणि त्यासंबंधित अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी दिले आहे. तसेच प्रवेशासाठी जवळपास ६० हजार जागा रिक्त असून, त्या आता संस्थात्मक फेरीत भरल्या जाण्याचे आव्हान महाविद्यालयांसमोर आहे.
यंदा राज्यात इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या २,०२,६३८ जागांवर प्रवेश सुरू आहेत. त्यातील ६०,७३३ जागा अद्यापही रिक्त आहेत. आता संस्थात्मक स्तरावर प्रवेश सुरू असून, त्यामध्ये आणखी काही विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे अपेक्षित आहे. त्यावर विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दिलेल्या आकडेवारीनुसार, यंदा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित शाखांकडेच
पारंपरिक शाखा नकोशा
पारंपरिक शाखांकडे विद्यार्थ्यांचा फारसा कल नसल्याचे चित्र आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये २३,८५३ जागांपैकी १५,२३३ प्रवेश झाले.
इंजिनिअरिंगमध्ये १३,६४९ पैकी फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये १७,४५० जागांपैकी केवळ १०,९३९ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला. इलेक्ट्रिकल ८,७१४ प्रवेश झाले आहेत.
विद्यार्थ्यांचा ओढा कायम आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये सर्वाधिक म्हणजे २२,९५५ प्रवेश नोंदविले गेले आहेत. या अभ्यासक्रमासाठी ३२,१७१ जागा यंदा आहेत. कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग या शाखेत १९,८६० जागांपैकी १५,२६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. आयटी अभ्यासक्रमासाठी १७,३११ जागांपैकी १२,५२० जागा भरल्या गेल्या आहेत. त्याचजोडीला विद्यार्थ्यांचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग यांसारख्या आधुनिक शाखांनाही चांगला प्रतिसाद दिसत आहे.
मनोज कुळकर्णी
Use file vdo
4
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 08, 2025 03:33:06Mumbai, Maharashtra:
अँकर -- अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण मुंबई शहरात मालिका बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा व्हॉट्सअॅप संदेश पाठवल्याबद्दल मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातील नोएडा
येथील एका ५० वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेत अटक केली आहे. अश्विन कुमार सुप्रा असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा बिहारचा आहे आणि गेल्या पाच वर्षापासून नोएडामध्ये राहात आहे. मित्राला धडा शिकवण्यासाठी त्याने मित्राच्या नावाने खोटा संदेश पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिस तपास सुरू आहे.
अनंत चतुर्दशीच्या बंदोबस्तात
पोलिस यंत्रणा व्यस्त असताना, भारतात १४ पाकिस्तानी अतिरेकी ४०० किलो आरडीएक्ससह घुसले असून, मुंबईत मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट घडवून आणणार आहेत, असा धमकीचा संदेश मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवर मिळाल्याने खळबळ उडाली होती. त्यात 'लष्कर - ए - जिहादी' नावाच्या कथित दहशतवादी संघटनेचा उल्लेख करण्यात आला होता.
पोलिस चौकशीदरम्यान कुमारने वैयक्तिक सूडबुद्धीतून खोटा संदेश पाठवल्याची कबुली दिली. त्याच्याविरोधात एका मित्राने २०२३मध्ये पाटणा येथे खटला दाखल केला होता. त्यात त्याला तीन महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. याचा बदला घेण्यासाठी त्याने मित्राच्या नावाचा वापर करून धमकीचा संदेश पाठवला, अशी माहिती पोलिसांनी सांगितले.
मनोज कुळकर्णी
Vdo आणि फोटो 2C
2
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 08, 2025 03:17:28Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_rain
नाशिकसह राज्यात ११ सप्टेंबरपर्यंत पावसाची उघडीप राहण्याची शक्यता
अँकर
नाशिक शहरात गतवर्षपेिक्षा यंदा ७ सप्टेंबरपर्यंत १०८ मिलीमीटर अधिक पर्जन्यमान झाले आहे. सलग चार दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस झाला....काल ही सकाळपासून पावसाने सुरुवात केली होती, मात्र दुपारनंतर रिमझिम पाऊस सुरू होता. हवामान केंद्रात ४.० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. आगामी चार ते पाच दिवस म्हणजे ११ सप्टेंबरपर्यंत पाऊस उघडीप देणार असल्याचे हवामान तज्ञ यांनी सांगितले. नाशिक, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांत ११ सप्टेंबरपर्यंत पावसाची उघडीप राहाणार आहे. इतर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. १२ सप्टेंबरपासून पुन्हा नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे तज्ञांनी यांनी सांगितले.
5
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 08, 2025 03:17:24Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_River
Feed on - 2C
----------------------------
Anchor - नांदेड शहाराजवळील विष्णुपुरी प्रकल्पाचे दरवाजे उघडल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पा मध्ये पाण्याची आवक वाढली आहे. अतिवृष्टी मुळे या आधीही प्रकल्पाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला होता. काल रविवारी सकाळ पासून प्रकल्पा मध्ये पाण्याची आवक सुरु होती. त्यामुळे दुपारी विष्णुपुरी प्रकल्पाचे दोन दरवाजे पुन्हा उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 746 क्युमेक्स प्रती सेकंद प्रमाणे पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आलाय.
----------------------------
8
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 08, 2025 03:17:11Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग : महायुतीत शिक्षक मतदार संघ आम्हाला द्या आणि पदवीधर भाजपकडे घ्या - मा.आ. शहाजी बापू पाटील
- महायुतीत शिक्षक मतदार संघ आम्हाला द्या आणि पदवीधर भाजपकडे घ्या
- शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांची शिक्षक मेळाव्यातून मागणी
- राज्यात लवकरच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूका होणार आहेत.
- त्यामुळे ही मागणी पूर्ण होऊ शकते कारण हा व्यक्ती ( मंगेश चिवटे) तिथे आहे.
- हा माणूस मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार तिघांकडे असतोय.
- माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी महायुतीकडे अप्रत्यक्ष मंगेश चिवटेंसाठी शिक्षक मतदार संघाची मागणी केली.
Sound Byte : शहाजी बापू पाटील ( माजी आमदार शिंदे गट)
6
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 08, 2025 03:17:02Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn high court av
Feed attached
छत्रपती संभाजी नगरच्या विद्यादीप बालगृहातील अल्पवयीन मुलींवरील अन्याय, पोलिस आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाची गंभीर दखल घेत औरंगाबाद खंडपीठाने स्वतःहून दखल घेतलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीत राज्य यंत्रणेची तीव शब्दांत कानउघाडणी केली. बालगृहांची नियमित तपासणी होत नसेल तर ही व्यवस्थाच संशयास्पद वाटते, असेही न्यायालयाने नमूद केले. पोलिसांनी वेळेवर गुन्हे दाखल न करता तपास अधिकाऱ्यांची फक्त बदली केली. ही गंभीर बाब आहे. बालगृहांची नियमित तपासणी होत नसेल तर ही व्यवस्थाच संशयास्पद वाटते, असेही कोर्टाने मूद केले. सर्व यंत्रणांनी ३० सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करावे अन्यथा न्यायालयाच्या अवमानाची कारवाई केली जाईल,
असे आदेशात म्हटले आहे. पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला होणार आहे...
7
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 08, 2025 03:16:31Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- शनी अभिषेक पुजारी नियुक्ती
फीड 2C
Anc:-
अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर येथे धार्मिक विधींबाबत पारदर्शकता असावी, यासाठी आता शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाने शनिदेवाचा अभिषेक करण्यासाठी मानधन तत्त्वावर पाच पुरोहितांची नेमणूक केलीये... भाविकांना देवस्थानकडे शंभर रुपयांची अभिषेक पावती करून पुरोहितांकडून अभिषेक करता येणार आहे... अभिषेकासाठी पुरोहितांना स्वतंत्र दक्षिणा देण्याची आता गरज नाही...तसेच देवस्थानसाठी एक हजारांची पावती करणाऱ्या भाविकांना अभिषेकाची शंभर रुपयांची पावती करण्याची गरज नसणार आहे... या निर्णयाची अंमलबजावणी सहा सप्टेंबरपासून करण्यात आलीये...
शनिशिंगणापूर येथील ऑनलाइन पूजा अॅप घोटाळाप्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलिसांकडे चौकशी सुरू असल्याने गेल्या काही महिन्यांपासून हे देवस्थान चर्चेत आहे...ऑनलाईन अँपच्या माध्यमातून पूजा करून घेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर देवस्थानने पगारी पुरोहित ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला...शनी मंदिर हे पहाटे चार वाजल्यापासून ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत सुरू असते या कालावधीत पाच पुरोहितांची शिफ्ट नुसार नियुक्ती करण्यात आलीये.
बाईट:- गोरक्ष दरंदले, मुख्य कार्यकारी अधिकारी
7
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 08, 2025 03:16:17Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn jayakwadi av
Feed attached
जायकवाडी धरण परिसर आणि नाशिक परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे दीड फुटाने उघडून गोदावरी नदीपात्रात ३७ हजार ७२८ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे, सध्या धरणाची पाणी पातळी १५२१.८८ फुटावर पोहोचली असून, जिवंत पाणीसाठा २१५६.६०६ दलघमी आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी जायकवाडी धरणातील पाणीसाठा ९३.९१ टक्के होता. यावर्षी जायकवाडी धरणात ९२ टीएमसी पाणी आले असून, धरणाचे दरवाजे उघडून ३२ टीएमसी पाणी आजपर्यंत गोदावरी पात्रात सोडण्यात आले आहे.
9
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 08, 2025 03:15:42Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn jarange discharge av
Use file shots
गेली पाच दिवस संभाजीनगर मध्ये मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरू होते अखेर आज त्यांना रुग्णालयांतुन सुट्टी मिळणार आहे.. मुंबईतील उपोषणामुळे मनोज जरांगे यांची तब्येत खालावली होती त्यांचे ब्लड प्रेशर कमी झालं होतं शुगर ही कमी झाली होती त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते.. दरम्यान आज रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यावर मनोज जरांगे पहिले अंतरवली सराटीत दर्शनासाठी जाणार आहे त्यानंतर बीड जिल्ह्यातील नारायणगड इथे दर्शनासाठी जाणार आहे आणि आज रात्री ते स्वगृही परतणार आहे.. आरक्षणाच्या लढाईत मोठे यश मिळाले त्यामुळे घरी जाणार असल्याचे जरांगे यांनी सांगितलंय...
4
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 08, 2025 03:06:01Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - जो प्रकार घडला त्याचं समर्थन कोणी करणार नाही पण गैरसमजातून झालेला प्रकार मंत्री जयकुमार गोरे
जयकुमार गोरे ऑन धैर्यशील मोहिते पाटील
--
ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केला त्यांना माझ सांगणं आहे त्यांनी खुदके निगेबान मे कभी झाँककर देखना चाहिये
आपण स्वतः आपल्याकडे बघितलं पाहिजे आपण काय करतोय
मी जेव्हापासून पालकमंत्री झालोय तेव्हापासून अवैध वाळू, मुरूम किंवा कुठलाही अवैध व्यवसाय चालू देणारं नाही ही भूमिका मांडली होती
ज्यांनी अवैध धंदे केले त्यांच्यावर अधिकाऱ्यांनी कारवाई केली, अजूनही कारवाई चालू आहे
100 टक्के थांबलं असं मी म्हणणार नाही पण बहुतांश ठिकाणी आम्ही आळा घातला आहे
अजूनही काही ठिकाणी उपसा सुरु असल्याची तक्रार आहे मी त्याबाबतीत तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे
कधी नव्हे ते MPD कायद्याने आपण अशा लोकांवर कारवाई केली
अजितदादांच्या बाबतीत त्यांनी स्वतः आपली भूमिका स्पष्ट केली आहे
जो प्रकार घडला त्याचं समर्थन कोणी करणार नाही पण गैरसमजातून झालेला प्रकार
पण या विषयाचा राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतोय
इथं बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभा आहे
कुठल्याही बाबतीत कुठल्याही अधिकाऱ्यावर दबाव येणार नाही, दबाव आला तर प्रशासनाच्या पाठीशी मुख्यमंत्री उभे आहेत
ऑन पालकमंत्री ips अधिकाऱ्यांच्या पाठशी आहेत का?
---
चांगलं काम करणाऱ्या, बेकायदेशीर कामाना आळा घालणाऱ्या, लोकांभिमुख कामं करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यांच्या पाठीशी मी आहे
ऑन लक्ष्मण हाके
--
ओबीसी समाजाच्या हक्कासाठी जे देवेंद्रजींनी सोसले आहे ते अन्य कोणीही सोसलेले नाही
त्यांच्यावर झालेले शाब्दिक, वैचारिक आणि वैयक्तिक पातळीवर झालेले हल्ले असतील किंवा त्यांना टार्गेट केलं गेलं
जबादारीने मी सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समजवर कोणतीही गदा येणार नाही, अडचण येणार नाही यासाठी अस्वस्थ केलं
ओबीसी, मराठा समजबांना विनंती तुम्ही GR बघावं त्याचे परिणाम बघावे त्यातून आपले मतं बनवावे
समाज व्यवस्था बिघडणार नाही, ही व्यवस्था अस्वस्थ होणार नाही अशी विधान कोणी करू नये
गोरे ऑन ओबीसी आंदोलन
--
आंदोलनाचा अधिकार सर्वांना आहे मात्र सरकार म्हणून आमचे एवढेच सांगणे आहे सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही
मराठा समाजाच्या हक्काचे रक्षण करताना ओबीसी समाजाचे हक्काचे रक्षण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि आम्हा सगळ्यावर आहे
माननीय मुख्यमंत्री या बाबतीत एकदम ठाम आहे त्यामुळे ओबीसी समाजाने अस्वस्थ्य राहावं
बाईट : जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री
7
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 08, 2025 03:05:50Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn pothole dead av
Feed attached
देवळाईतील पाणीपुरवठा योजनेसाठी खोदलेल्या खड्यातील पाण्यात बुडून ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता, ठेकेदार आणि मजीप्राच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट आणि मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी घटनास्थळाची पाहणी करत खड्डे २४ तासांत बुजवा आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करा, असे आदेश पालकमंत्री शिरसाटांनी दिले होते. या आदेशानंतर मजीप्रा आणि संबंधित कंत्राटदार कंपनी जीव्हीपीआरच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर चिकलठाणा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा अधिकाऱ्यांची स्पष्ट नावे किंवा हुद्दा नाही. नेमकी कुणाची जवाबदारी होती याचा नेमका शोध सुरू असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांनी दिली.
या प्रकरणी संबंधितांवर कलम १०५, बीएनएस ३ (५) नुसार चिकलठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भागातील नागरिकांनी यापूर्वीही वारंवार संबंधित कंपनीकडे खड्डे बुजवण्याची मागणी केली होती. खड्डयांभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने येथे अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने आणि कंत्राटदाराने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. त्याच निष्काळजीपणामुळे 3 वर्षीय ईश्वरचा बळी गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे...
7
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 08, 2025 03:04:49Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn shinde daura av
Use file shots
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहे या दौऱ्यात ते विविध विभागाच्या विकास कामांची आढावा बैठक घेणाऱ्या आणि सोबतच महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाचा मेळावा सुद्धा घेणार आहे या मेळाव्यात दोन माजी आमदार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.. महत्त्वाचं म्हणजे महिनाभरापूर्वी पाणी योजनेच्या उद्घाटनाला शिंदे आले नव्हते फक्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होते त्यावेळेस शिवसेनेच्या नेत्यांमध्ये कुजबूज होती या योजनेची मंजुरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मिळाली असा त्यांचा दावा होता त्यामुळे शिंदे यांचा हा दौरा महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे...
12
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 08, 2025 03:03:03Raigad, Maharashtra:
स्लग - कोकण रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी ....... दिवा सावंतवाडी पॅसेंजरला पेण स्थानकात थांबा ....... खासदार धैर्यशील पाटील यांचे प्रयत्न ......
अँकर - कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दिवा सावंतवाडी पॅसेंजर गाडीला आता पेण रेल्वे स्थानकाकात पुन्हा थांबा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील पेण हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने याचा लाभ प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. कोरोना काळात या स्थानकावरील या गाडीचा थांबा बंद करण्यात आला होता. राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन हा थांबा पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती.
10
Report