Back
देवळाईतील खड्ड्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू: ठेकेदारावर गुन्हा दाखल!
VKVISHAL KAROLE
Sept 08, 2025 03:05:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn pothole dead av
Feed attached
देवळाईतील पाणीपुरवठा योजनेसाठी खोदलेल्या खड्यातील पाण्यात बुडून ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता, ठेकेदार आणि मजीप्राच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट आणि मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी घटनास्थळाची पाहणी करत खड्डे २४ तासांत बुजवा आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करा, असे आदेश पालकमंत्री शिरसाटांनी दिले होते. या आदेशानंतर मजीप्रा आणि संबंधित कंत्राटदार कंपनी जीव्हीपीआरच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर चिकलठाणा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा अधिकाऱ्यांची स्पष्ट नावे किंवा हुद्दा नाही. नेमकी कुणाची जवाबदारी होती याचा नेमका शोध सुरू असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांनी दिली.
या प्रकरणी संबंधितांवर कलम १०५, बीएनएस ३ (५) नुसार चिकलठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भागातील नागरिकांनी यापूर्वीही वारंवार संबंधित कंपनीकडे खड्डे बुजवण्याची मागणी केली होती. खड्डयांभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने येथे अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने आणि कंत्राटदाराने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. त्याच निष्काळजीपणामुळे 3 वर्षीय ईश्वरचा बळी गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे...
9
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowSept 08, 2025 05:49:01Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - आटपाडीच्या शेळी-मेंढी बाजारात विक्रमी दर, एका बकऱ्यास तब्बल ३४ हजार तर सहा बकऱ्यांची २ लाखात विक्री..
अँकर - सांगलीमध्ये आटपाडी मध्ये शेळया-मेंढ्यांच्या बाजारात बकऱ्यांना विक्रमी दर मिळाला आहे.एका बकऱ्याला तब्बल 34 हजार रुपये इतका दर तर सहा बकऱ्यांची दोन लाख रुपयात विक्री झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी डॉल्बी, घोडा आणि रथासह बकऱ्यांची गावातुन वाजत गाजत मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला. अनंत चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आटपाडी मध्ये पारंपरिक आणि राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या शेळया मेंढ्यांचा आठवडी बाजार पार पडला,ज्यामध्ये बकऱ्यांना चांगला दर मिळाला आहे.ज्यामध्ये लवटेवाडीतील शेतकरी तानाजी महादेव लवटे यांच्या बकऱ्यांना हा विक्रमी दर मिळाला आहे.
10
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 08, 2025 05:31:42Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - खासदार विशाल पाटील कधी काय करेल याचा नेम नाही - जयंत पाटील यांचा खासदार विशाल पाटलांना टोमणा.
अँकर - नदीत जास्त होड्या झाल्या की शहाण्याने काठ कधी सोडू नये,आमच्यातले अनेकजण तिकडे गेले आहेत,त्यानां विशालनेच सांगितले असेल तिकडे जावा, त्यामुळे विशाल पाटील कधी काय करेल याचा नेम नाही,असा टोमणा माजी मंत्री जयंत पाटील यांनी खासदार विशाल पाटलांना लगावला आहे,ते सांगलीच्या सांगलीवाडी मध्ये पार पडलेल्या होड्याच्या स्पर्धे दरम्यान जाहीर कार्यक्रमात बोलत होते. सांगलीतील अनेकांचे भाजपात झालेल्या पक्ष प्रवेशावरून विशाल पाटलांच्या उपस्थिती जयंत पाटलांनी हा टोमणा लगावताच कार्यक्रमात एकच हशा पिकली,
आमदार सुहास बाबर पण तिकडे गेले आहेत,त्यांच्याकडेही खूप होड्या झाल्या आहेत,नदीत लय होड्या असल्या की काठ सोडू नये,त्यामुळे कोण कुठल्या होडीत बसलंय हे कळायला अवघड होते,2029 च्या वेळी कोण कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता लागली आहे,असं ही जयंत पाटलांनी सांगत आटपाडी-खानापूर विधानसभा मतदार संघातील भाजपातील भाऊगर्दीवरून टोला लगावला.यावेळी
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार विशाल पाटील,आमदार सुहास बाबर हे उपस्थित होते.
साऊंड बाईट - जयंत पाटील आमदार
0
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 08, 2025 05:31:09Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0809ZT_WSM_APMC_MALEGAON
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिमच्या मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पोफळे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा उद्या,९ सप्टेंबरला मालेगाव तहसील कार्यालयात होणार आहे.२८ ऑगस्ट रोजी उपसभापती संदीपराव घुगे यांच्यासह १०संचालकांनी जिल्हा निबंधकाकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.१९ मे २०२५ रोजी सभापतीपदी निवडून आलेल्या पोफळे यांच्या केवळ तीन महिन्यांच्या कार्यकाळानंतरच हा प्रस्ताव दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. उद्याच्या सभेत पोफळे पदावर कायम राहतात की पद गमावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 08, 2025 05:15:47Nashik, Maharashtra:
nsk_drtheft
nsk_drtheft
feed by 2C
anchor कोरोनात वडिलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरने ३ लाखांचे बिल घेतले तरी वडील वाचले नाही. या रागातून चार डॉक्टरांच्या घरासह पाठोपाठ १० घरफोड्या करणाऱ्या सराईताला नाशिक पोलिसांनी अटक केलीय. फारुख रज्जाक काकर असे या गुन्हेगाराचे नाव आहे. राधानगरी ड्रीम कॅसलच्या मागे घरफोडीचा प्रकार घडला होता. परिसरातील सर्व घरफोडींच्या गुन्ह्याच्या ठिकाणांवरील सीसीटीव्हींची तसेच रस्त्यावरील सीसीटीव्हींची तपासणी करण्यात आली. चार ठिकाणी झालेल्या घरफोडीत एकच संशयिताचे वर्णन जुळले. गेट अनालिसीस आणि तंत्रविश्लेषण शाखेच्या मदतीने माग काढत औदुंबरनगर, अमृतधाम येथे संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताने केलेल्या १० घरफोडीचे गुन्हे उघड झाले असून यात पंचवटी पोलिस ठाणे ९, म्हसरुळ १ अशा १० घरफोडीत ११ तोळे सोने, १ किलो ५२ ग्रॅम चांदी असे १३ लाख ६ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले.
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 08, 2025 04:33:27Beed, Maharashtra:
बीड: काळजी घ्या विधिलिखित आहे.. ते घडलं.. आम्ही सर्वजण आहोत तुमच्या बरोबर चिंता करू नका.. माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मराठा आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला फोन
सावंतांचा बीड जिल्ह्यातील तीन आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात
Anc:मराठा आरक्षणाच्या चळवळीत आतापर्यंत एकट्या बीड जिल्ह्यात 27 तरुणांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली. यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना राज्य सरकारने दोन कोटी 70 लाखांची मदत दिली. मात्र त्यानंतर नुकतेच मुंबईमध्ये पार पडलेल्या आरक्षणाच्या आंदोलनात बीड जिल्ह्यातील तीन जणांना जीव गमवावा लागला. याच आत्महत्याग्रस्त कुटुंबाला माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आलाय.
बीड तालुक्यातील आहेर वडगाव गावातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला थेट तानाजी सावंत यांनी फोन करून धीर दिला.. काळजी घ्या.. विधिलिखित आहे ते घडलं.. आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत चिंता करू नका.. अडचणीला काही लागलं तर आपली मराठ्याची टीम आहे.. आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत चिंता करू नका.. असं म्हणत सावंत यांनी या कुटुंबाला मदतीचा हात देत धीर दिला..
बीड जिल्ह्यातील सतीश देशमुख महारुद्र खाकरे आणि भरत खरसाडे या आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाखांची मदत तानाजी सावंत यांच्या माध्यमातून करण्यात आली.. तर आतापर्यंत झालेल्या 27 आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शासनाने दोन कोटी 70 लाखांची मदत केली आहे.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 08, 2025 04:33:08Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - IPS अंजना कृष्णा यांची प्रतिमा पिंपळाच्या पानावर रेखाटात सोलापुरातील कलाकाराचे अनोखे समर्थन
- राज्यभरातून आयपीएस अंजना कृष्णा यांना चांगला प्रतिसाद मिळत असताना सोलापुरातील कलाकारांकडून आपल्या कलेतून करण्यात आले समर्थन
- बार्शीतील महेश मस्के या कलाकाराने पिंपळाच्या पानावर आयपीएस अंजना कृष्णा यांची प्रतिकृती रेखाटत केला सपोर्ट
- नवीन आणि डॅशिंग आयपीएस अधिकाऱ्याचे खच्चीकरण नको या उद्देशाने करण्यात आला सपोर्ट
- सोलापूर जिल्ह्यात आयपीएस अंजना कृष्णा यांची वाढली क्रेझ
- कलाकार महेश मस्के यांच्या वतीने पिंपळाच्या पानावर रेखाटलेली प्रतिकृती आयपीएस अंजना कृष्णा यांना देण्यात येणार भेट
बाईट -
महेश मस्के ( कलाकार )
0
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 08, 2025 04:31:52Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_GRAHAN
तुळजाभवानी मातेला चंद्रग्रहणावेळी ठेवले सोवळ्यात
चंद्रग्रहणामुळे रात्री तुळजाभवानी देवीच्या पूजा विधीच्या वेळेत बदल
अँकर
धाराशिवच्या तुळजापूरात आज मध्यरात्री चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मातेला सोवळ्यात ठेवण्यात आलं. या ग्रहणामुळे देवीच्या नित्योपचार पूजा विधीत बदल करण्यात आले.
चंद्रग्रहणामुळे तुळजाभवानी देवीचा नित्योपचाराचा वेळ बदलण्यात आला. रात्री ९.५७ ते पहाटे १.३० या कालावधीत देवीला शुभ्र श्वेत सोवळ्यात ठेवण्यात आलं. या काळात देवीची नियमित पूजा न करता ग्रहण काळासाठी विशेष धार्मिक परंपरा पाळण्यात आल्या.
ग्रहण सुटल्यानंतर सोमवारी पहाटे १.३० वाजता देवीला पंचामृत स्नान घालण्यात आलं. त्यानंतर शुद्ध स्नान, आरती आणि धुपारतीचा विधी पार पाडला गेला.
तुळजापूरातील भाविकांना मात्र या बदललेल्या वेळापत्रकामुळे देवीच्या दर्शनासाठी थोडा अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागली.
म्हणजेच, खगोलीय घटनांमुळे तुळजाभवानी मातोश्रींच्या पूजा विधीत बदल झाले असले तरी, परंपरा व धार्मिक श्रद्धेनुसार सर्व विधी पार पाडण्यात आले.
0
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 08, 2025 04:31:42Dhule, Maharashtra:
Anchor - धुळे जिल्हा पोलिसांनी सामाजिक सलोखा जपत विसर्जित न झालेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तींना एकत्र करत त्यांचं विधिवत विसर्जन केले. धुळे शहरातील पांझरा नदीत, गणेश भक्तांनी बाप्पाच विसर्जन केलं. मात्र अनेक मुर्त्या पाण्याच्या प्रवाहात किनाऱ्याला जमा झाल्या होत्या. तसेच कमी पाण्याच्या ठिकाणी मूर्ती विसर्जित करण्यात आल्यामुळे त्या पाणी कमी झाल्यावर उघड्यावर पडून होत्या. या सर्व मूर्ती शहरातील विविध पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी एकत्र केल्या आणि त्या वाहनांच्या माध्यमातून जिथे पाणी अधिक आहे त्या ठिकाणी विसर्जित करण्यात आल्या. शहरातील हत्ती डोह या ठिकाणी या सर्व मूर्ती एकत्र करून टप्प्याटप्प्याने विधिवत पद्धतीने विसर्जित करण्यात आल्या. धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून हे काम प्रत्यक्षात आणले गेले. सुमारे 300 पेक्षा अधिक गणेश मूर्तींचा विधिवात पद्धतीने पोलिसांनी विसर्जन केले. गणपती बाप्पाच्या मुर्त्यांच विटंबन होणार नाही याची दक्षता यावेळेस पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली.
byte - श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 08, 2025 04:31:36Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn maratha help av
Letter attached
मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना आता राज्य सरकारकडून मदत देण्यास सुरुवात झाली आहे ..संभाजीनगर जिल्हाधिकारी, बीड जिल्हाधिकारी याना त्याबाबतचे पत्र सुद्धा प्राप्त झाले असल्याची माहिती आहे... संभाजीनगर जिल्ह्यात सात बीड मध्ये 27 तर हिंगोली मध्येही कुटुंबियांना हे मदत मिळाली आहे मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 10 लाखांची ही मदत करण्यात आलेली आहे.. मराठा आरक्षणासाठी सरकार दरबारी 158 जणांनी आत्महत्या केल्या अशा नोंदी आहे आतापर्यंत या कुटुंबीयांना 15 कोटीची मदत करण्यात आली होती त्यात काही लोकांना मदत बाकी राहिली होते जरांगे यांनी उपोषण सोडलं त्यावेळेस याबाबत त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं त्यानुसार हे पैसे जिल्हाधिकारी कार्यालयांना वर्ग झाले आहेत...
0
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 08, 2025 04:15:15Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0809ZT_WSM_SEARCH_FOR_YOUTH
रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील सेवादास नगर येथे दुर्दैवी घटना घडली.मूत्यूंजय राजू राठोड हा युवक काल सकाळी गणपती विसर्जनासाठी अरुणावती नदीकाठी गेला असता अचानक पाय घसरल्याने तो प्रचंड प्रवाहात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनाचे शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.मात्र रात्रीचा अंधार वाढल्याने शोधमोहीम स्थगित करण्यात आली होती. आज सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आलं आहे.
14
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 08, 2025 04:02:21Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव ब्रेकिंग
DHARA_KUNABI
धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील चिंचोली एकाच गावात सापडल्या 50 कुणबी नोंदी
मात्र उर्दू आणि मोडी लिपीतील भाषांतराच्या चुकांमुळे गावातील 50 नोंदी पैकी 5 जणालाच मिळाले कुणबी प्रमाणपत्र
हैदराबाद गॅझेट संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या जीआर मधून आम्हाला न्याय मिळावा अशी चिंचोली ग्रामस्थांनी व्यक्त केली अशा
भाषांतरामुळे वंशावळीची अडचण असल्याने चिंचोली गावातील 45 वारस कुणबी प्रमाणपत्रापासून आहेत वंचित
तहसीलदारांनी गावात येऊन स्पॉट पंचनामे व घरटी चौकशी करावी, ग्रामस्थांची मागणी
Byte- ग्रामस्थ
14
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 08, 2025 03:46:37Mumbai, Maharashtra:
अँकर -- राज्यातील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या कॅप प्रवेशाच्या चार फेऱ्यांनंतर आतापर्यंत १,४१,९०५ विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामध्ये यंदा सर्वाधिक पसंती कॉम्प्युटर आणि त्यासंबंधित अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी दिले आहे. तसेच प्रवेशासाठी जवळपास ६० हजार जागा रिक्त असून, त्या आता संस्थात्मक फेरीत भरल्या जाण्याचे आव्हान महाविद्यालयांसमोर आहे.
यंदा राज्यात इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या २,०२,६३८ जागांवर प्रवेश सुरू आहेत. त्यातील ६०,७३३ जागा अद्यापही रिक्त आहेत. आता संस्थात्मक स्तरावर प्रवेश सुरू असून, त्यामध्ये आणखी काही विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे अपेक्षित आहे. त्यावर विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दिलेल्या आकडेवारीनुसार, यंदा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित शाखांकडेच
पारंपरिक शाखा नकोशा
पारंपरिक शाखांकडे विद्यार्थ्यांचा फारसा कल नसल्याचे चित्र आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये २३,८५३ जागांपैकी १५,२३३ प्रवेश झाले.
इंजिनिअरिंगमध्ये १३,६४९ पैकी फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये १७,४५० जागांपैकी केवळ १०,९३९ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला. इलेक्ट्रिकल ८,७१४ प्रवेश झाले आहेत.
विद्यार्थ्यांचा ओढा कायम आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये सर्वाधिक म्हणजे २२,९५५ प्रवेश नोंदविले गेले आहेत. या अभ्यासक्रमासाठी ३२,१७१ जागा यंदा आहेत. कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग या शाखेत १९,८६० जागांपैकी १५,२६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. आयटी अभ्यासक्रमासाठी १७,३११ जागांपैकी १२,५२० जागा भरल्या गेल्या आहेत. त्याचजोडीला विद्यार्थ्यांचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग यांसारख्या आधुनिक शाखांनाही चांगला प्रतिसाद दिसत आहे.
मनोज कुळकर्णी
Use file vdo
13
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 08, 2025 03:33:06Mumbai, Maharashtra:
अँकर -- अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण मुंबई शहरात मालिका बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा व्हॉट्सअॅप संदेश पाठवल्याबद्दल मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातील नोएडा
येथील एका ५० वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेत अटक केली आहे. अश्विन कुमार सुप्रा असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा बिहारचा आहे आणि गेल्या पाच वर्षापासून नोएडामध्ये राहात आहे. मित्राला धडा शिकवण्यासाठी त्याने मित्राच्या नावाने खोटा संदेश पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिस तपास सुरू आहे.
अनंत चतुर्दशीच्या बंदोबस्तात
पोलिस यंत्रणा व्यस्त असताना, भारतात १४ पाकिस्तानी अतिरेकी ४०० किलो आरडीएक्ससह घुसले असून, मुंबईत मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट घडवून आणणार आहेत, असा धमकीचा संदेश मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवर मिळाल्याने खळबळ उडाली होती. त्यात 'लष्कर - ए - जिहादी' नावाच्या कथित दहशतवादी संघटनेचा उल्लेख करण्यात आला होता.
पोलिस चौकशीदरम्यान कुमारने वैयक्तिक सूडबुद्धीतून खोटा संदेश पाठवल्याची कबुली दिली. त्याच्याविरोधात एका मित्राने २०२३मध्ये पाटणा येथे खटला दाखल केला होता. त्यात त्याला तीन महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. याचा बदला घेण्यासाठी त्याने मित्राच्या नावाचा वापर करून धमकीचा संदेश पाठवला, अशी माहिती पोलिसांनी सांगितले.
मनोज कुळकर्णी
Vdo आणि फोटो 2C
13
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 08, 2025 03:17:28Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_rain
नाशिकसह राज्यात ११ सप्टेंबरपर्यंत पावसाची उघडीप राहण्याची शक्यता
अँकर
नाशिक शहरात गतवर्षपेिक्षा यंदा ७ सप्टेंबरपर्यंत १०८ मिलीमीटर अधिक पर्जन्यमान झाले आहे. सलग चार दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस झाला....काल ही सकाळपासून पावसाने सुरुवात केली होती, मात्र दुपारनंतर रिमझिम पाऊस सुरू होता. हवामान केंद्रात ४.० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. आगामी चार ते पाच दिवस म्हणजे ११ सप्टेंबरपर्यंत पाऊस उघडीप देणार असल्याचे हवामान तज्ञ यांनी सांगितले. नाशिक, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांत ११ सप्टेंबरपर्यंत पावसाची उघडीप राहाणार आहे. इतर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. १२ सप्टेंबरपासून पुन्हा नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे तज्ञांनी यांनी सांगितले.
14
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 08, 2025 03:17:24Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_River
Feed on - 2C
----------------------------
Anchor - नांदेड शहाराजवळील विष्णुपुरी प्रकल्पाचे दरवाजे उघडल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पा मध्ये पाण्याची आवक वाढली आहे. अतिवृष्टी मुळे या आधीही प्रकल्पाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला होता. काल रविवारी सकाळ पासून प्रकल्पा मध्ये पाण्याची आवक सुरु होती. त्यामुळे दुपारी विष्णुपुरी प्रकल्पाचे दोन दरवाजे पुन्हा उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 746 क्युमेक्स प्रती सेकंद प्रमाणे पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आलाय.
----------------------------
13
Report