Back
नाशिक कुंभमेळ्यासाठी महापालिकेने 400 कोटींचं कर्ज उभारलं!
SGSagar Gaikwad
Aug 17, 2025 04:35:18
Nashik, Maharashtra
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_nmc_kumbh
कुंभमेळ्यासाठी खर्चासाठी महापालिकेकडे निधीची उपलब्धता नसल्यामुळे ४०० कोटींच घेणार कर्ज...
अँकर
नाशिक मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी खर्चासाठी महापालिकेकडे निधीची उपलब्धता नसल्यामुळे कर्जाद्वारे ४०० कोटींच्या निधीची उभारणी केली जाणारये.... निधी खर्चाचा अंदाज नसल्याने सुरुवातीला २०० कोटी रुपयांचे हरित कर्जरोखे काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय... त्यानंतर त्यात बदल करीत ३०० कोटींचे थेट कर्ज, तर २७५ कोटींचे हरित कर्जरोखे उभारण्याचा निर्णय घेतला गेलाय... आता पुन्हा त्यात बदल करीत २०० कोटींचे थेट कर्ज व २०० कोटींचे हरित कर्जरोखे काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय... सिंहस्थ कुंभमेळ्यातील निधी खर्चाची आकडेवारी लक्षात घेता सिंहस्थ कामांवरील एकूण खर्चाच्या २५ टक्के निधी महापालिकेला खर्च करावा लागणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मंजूर ३,२७७ कोटींच्या कामांसाठी तब्बल ८१९ कोटी रुपयांचा निधी महापालिकेला उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२६-२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. सिंहस्थासाठी महापालिकेने १५ हजार कोटींचा, तर अन्य विभागांनी नऊ हजार कोटींचा अशा प्रकारे एकूण २४ हजार कोटींचा आराखडा शासनाला सादर करण्यातआलेला आहे. त्यास अद्याप शासनाच्या उच्चस्तरीय शिखर समितीची मंजुरी मिळू शकलेली नाही.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowAug 17, 2025 07:30:40Kalyan, Maharashtra:
कल्याणच्या बारावे गाव परिसरात हादरवून टाकणारी घटना
कचराकुंडीजवळ टाकलेले स्त्री जातीचे बाळ आढळले
निर्दयी पालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन विशेष पथके सक्रिय,
Anc.. कल्याण पश्चिमेकडील बारावे गावातील कचराकुंडीलगत गोणीत गुंडाळून फेकलेली नवजात बालिका सापडल्याची घटना आज रविवारी सकाळच्या सुमारास घडली. बाळाच्या रडण्याच्या आवाजाच्या दिशेने शोध घेत स्थानिक ग्रामस्थांनी या चिमुरडीची गोणीतून सुटका करत खडकपाडा पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी तातडीने धाव घेत या चिमुरडीला रुग्णालयात दाखल केले असून तिच्या निर्दयी अज्ञात पालकांचाशोध सुरु केला आहे.
आज सकाळच्या सुमारास बारावे गावात असलेल्या कचरा कुंडीलगत छोट्या बाळाच्या रडण्याच्या आवाजाने ग्रामस्थ चक्रावले. कचरा कुंडीलगत फेकलेल्या एका गोणीतून आवाज येत असल्याचे पाहून नागरिकांनी तातडीने गोणी उघडून पहिले असता यात महिनाभर वयाची एक चिमुरडी रडत विव्हळत असल्याचे दिसून आले. नागरिकांनी तातडीने या मुलीला उचलून घेत तिला चांगल्या कपड्यात गुंडाळत पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या चिमुरडीला ताब्यात घेत तिला रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ समीर सरवनकर यांनी सांगितले. दरम्यान या चिमुरडीला कचऱ्यात फेकणार्या निर्दयी पालकांचा पोलिसाकडून शोध घेण्यासाठी तीन पथके तयार केली असून लवकरच या निर्दयी पालकांचा शोध घेतला जाईल असे पोलिसांनी सांगितले.
byte.. डॉ समीर सरवणकर
रुक्मिणी हॉस्पिटल केडीएमसी
0
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 17, 2025 07:19:22Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी - संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका
गडनदीची पाणीपातळी वाढल्यानं माखजन बाजारपेठेत पुन्हा शिरु लागलं पाणी
दोन दिवसात दुस-यांदा माखजन बाजारपेठेत भरलं पुराचं पाणी
बाजारपेठेतील सात ते आठ दुकानांत शिरलं पुराचं पाणी
सतत पुराचं पाणी भरत असल्यानं व्यापा-यांच होतय नुकसान
5
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 17, 2025 07:18:27Washim, Maharashtra:
वाशिम :
File:1708ZT_WSM_RIVERS_FLOOD
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
वाशिम जिल्ह्यात आज सकाळी मुसळधार पाऊस पडल्यानं पैन गंगा,कांच नदी सह अनेक नदी नाल्यांना आला पूर...
पैंन गंगा नदीच्या पुरामुळं सरपखेड - धोडप,करडा - गोभणी मार्ग बंद...
तर रिसोड - मेहकर मार्ग ही एकलासपूर जवळ नाल्याच्या पुरामुळं बंद...
कांच नदीच्या पुरामुळं मसला - मांगुळ झनक आणि मांगुळ झनक - नेतंसा मार्ग बंद...
मुसळधार पाऊस आणि नदी नाल्यांच्या पुरामुळं शेतीचं अतोनात नुकसान...
3
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 17, 2025 06:48:06Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1708ZT_NANDED_SONG(1 FILE)
नांदेड :स्वतःच्या निरोप समारंभात शासकीय खुर्चीवर बसून गाणे गाऊन व्हायरल करणं पडलं महागात, तहसीलदार प्रशांत थोरात निलंबित
अँकर :स्वतःच्या निरोप समारंभात शासकीय कार्यालयात शासकीय खुर्चीवर बसून गाणं म्हणणारे रेणापूरचे तहसिलदार प्रशांत थोरात यांना निलंबित करण्यात आलय .. नांदेड जिल्हयातील उमरी तहसील कार्यालयात ते कार्यरत होते .. गेल्या 8 ऑगस्ट रोजी त्यांची बदली लातुर जिल्ह्यातील रेणापुर येथे झाली ... 8 ऑगस्ट रोजी उमरी तहसील कार्यालयात त्यांचा निरोप समारंभ होता .. यावेळी स्वत: च्या कार्यालयात खुर्चीवर बसून त्यांनी गाणं गायल ... तो व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमावर टाकला होता .. त्यांच्या या कृती बद्दल शासनाने नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले .. प्रशांत थोरात यांच्या कृतीमुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली , त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी असा अहवाल नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी दिला . त्यावरून विभागीय आयुक्तांनी रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांच्या निलंबनाचे आदेश काढले ....
10
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 17, 2025 06:46:55Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1708ZT_JALNA_RAIN_UPDT(2 FILES)
जालना : भराडखेडा भागात ढगफुटी सदृश्य पाऊस,ड्रोन व्हिज्युअल
अँकर : जालना जिल्ह्यातील बदनापुर तालुक्यातील पांगरी, भराडखेडा , केळीगव्हाण,या परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. पावसामुळे नदीला पूर आला असून पुलावरून पाणी वाहत असल्याने पांगरीचा संपर्क तुटला आहे. यामध्ये शेतीमालाचे नुकसान झालेलं आहे. शेतामध्ये तुडुंब पाणी साचले असून या भागातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
6
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowAug 17, 2025 06:34:21Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_RAIN_LOSS_BYTE पाच फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावती जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी ढगफुटी सदृश्य पाऊस; सात हजार हेक्टरवर पिकं झाली बाधित, 406 घरांची पडझड
अँकर :– अमरावती जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर जिल्हाभरात 406 घरांची पडझड झाली असून जिल्ह्यातील 7 हजार हेक्टर शेती गेली खरडून गेली आहे. सोयाबीन, तूर, कपाशी आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे अमरावती जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्याने शेती खरडून गेल्याने पिके उभे करण्यासाठी लागलेला खर्च निघणार कसा हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. मात्र आता आम्हाला आत्महत्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे तात्काळ सरकारने नुकसानीचे पंचनामे करून आम्हाला मदत मिळावी शेतकऱ्यांची मागणी अमरावती जिल्ह्यातील वायगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
बाईट :- नुकसानग्रस्त शेतकरी
12
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 17, 2025 06:32:02Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथील शिवमंदिर पाण्याखाली गेलंय...
अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पूर्णा नदीची पाणीपातळी वाढलीय.. अकोला - अकोट या मार्गावर गांधीग्राम येथे सध्या नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहेय..मात्र पर्यायी मार्ग आल्याने पूर्णा नदीला पूर आला असूनही अकोला-अकोटचा संपर्क तुटलेला नाही..उद्या श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असून अकोला शहरात मोठी पालखी आणि कावड यात्रा असते , याकरिता याच पूर्णा नदीतून भाविक जल आणून आराध्य दैवत राज राजेश्वराला जलाभिषेक करतात.. यामुळे आज सायंकाळ पासून या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असणार आहे तर भाविकांनी नदीपात्रातून जल काढतांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहेय..
10
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 17, 2025 06:31:55Jalna, Maharashtra:
FEED NAME :1708ZT_JALNA_ATTACK(3 FILES)
जालना :बिर्याणीचे बिल मागितल्याने हॉटेल मालकावर चाकू हल्ला; दोघे जखमी, मुख्य आरोपीला अटक
अँकर : बिर्याणीचं बिल मागीतल्यानं हॉटेल मालकासह त्यांच्या सहकाऱ्यावर चाकू हल्ला करण्यात आलाय.जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर चौकात ही घटना घडलीय.या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी मुख्य आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवर बिस्मिल्ला हॉटेल येथे अविनाश मोरे हा त्याच्या एका साथीदारासह जेवणासाठी आला होता. जेवण केल्यानंतर जेवणाचे बील मागितल्यावरून मोरे आणि त्याच्या साथीदाराचा हॉटेल मालक मन्सूर खान आणि फरदीन खान यांच्यासोबत वाद झाला. वाद चिघळताच आरोपींनी धारदार शस्त्राने दोघांवर हल्ला चढवला. यात मन्सूर खान तसेच फरदीन खान हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दरम्यान,नागरिकांनी धाडस दाखवत आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं.त्यानंतर कदीम जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुख्य आरोपी अविनाश मोरे याला अटक केली.त्याचा साथीदार फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.
11
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 17, 2025 06:31:44Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1708ZT_NANDED_CALL_VIRAL(3 FILES)
यातील व्हायरल कॉल रेकॉर्डिंग इनपुटच्या पर्सनल व्हॉट्स अँप वर पाठवली आहे₹
नांदेड :अर्धापूर तालुक्यातील सेलगाव गावाचा संपर्क तुटला
सेलगावच्या तरुणाने लावला थेट पालकमंत्री अतुल सावे यांना फोन
अशोक चव्हाण विदेश दौऱ्यावर आहेत तुम्ही नांदेडला आला होतात तेव्हा अशोक चव्हाण तुम्हांला भेटले का ?
तरुणाचा पालकमंत्री सावे यांना सवाल
ऑडियो क्लिप व्हायरल
अँकर : नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.अर्धापूर तालुक्यातील सेलगाव गावाचा आजूबाजूच्या गावांशी असलेला संपर्क तुटलाय.त्यामुळे नागरीक हतबल झालेत.दरम्यान
सेलगावच्या तरुणाने थेट पालकमंत्री अतुल सावे यांना फोन करून ही माहिती पालकमंत्री अतुल सावे यांना दिलीय.अशोक चव्हाण विदेश दौऱ्यावर आहेत. तुम्ही नांदेडला आला होतात तेव्हा अशोक चव्हाण तुम्हांला भेटले का ?असा सवाल या तरुणाने पालकमंत्री सावे यांना केलाय.या तरुणाने पालकमंत्री अतुल सावे यांना केलेल्या फोनची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय.
12
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 17, 2025 06:31:38Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
Sng_dahihandi
स्लग - इस्लामपूर मध्ये महाडिक युवाशक्ती दहीहंडी जल्लोषात साजरी.
अँकर - सांगलीच्या इस्लामपूर मध्ये महाडिक युवाशक्तीचा दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.तासगावच्या शिवनेरी मंडळांनी हंडी फोडत तीन लाख तीन हजार रुपये यांच पहिलं बक्षीस पटकावलं.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये हा दहीहंडीचा सोहळा रंगला होता.यावेळी मंत्री जयकुमार गोरे म्हणाले.. इस्लामपूरच इश्वरपूर केलं आहे,पुढची दहीहंडी ही उरूण इश्वरपूर नावाने होईल. तसेच मुघलांच्या इतिहासाच्या खुणा पूसण्याचा काम सातत्याने सुरू आहे,असे मत देखील मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं आहे.बहारदार अश्या कार्यक्रमात पार पडलेला दहीहंडा सोहळा पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली होती.
बाईट - जयकुमार गोरे - ग्रामविकास मंत्री.
13
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 17, 2025 06:30:27Yeola, Maharashtra:
अँकर:-
शेतकऱ्यांचा लाडका सण पोळा अवघ्या काही दिवसांवर आला असून सणाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात व परिसरात मातीच्या तसेच पीओपीच्या बैलांची निर्मिती करण्यासाठी कारागीर दिवस-रात्र व्यस्त झाले आहेत. मातीच्या बैलांशिवाय पोळा सण अपूर्ण मानला जातो. मातीचे बैल विकत घेण्याची प्रथा शतकानुशतकांपासून सुरू आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही येवल्यातील पारंपरिक कारागीर घराणी मोठ्या उत्साहाने हे बैल घडवत आहेत. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या कामामध्ये बैलांना आकार देणे, त्यावर रंगकाम करणे, सुशोभित करणे अशी प्रक्रिया केली जाते.
बाईट शोभा जगदाळे
बाईट सुनील जगदाळे
14
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 17, 2025 06:03:54Nandgaon Rural, Uttar Pradesh:
अँकर:- नांदगावं शहरासॊबत ग्रामीण भागात दोन दिवसा पासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे लेंडी आणि शाकंबरी या दोन्ही नद्याना पाणी आले असून सखल भागात ही पाणी साचले आहे जोरदार पावसामुळे रेल्वे मार्गांवर असलेल्या भुयारी मार्गात दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे त्यातून मार्ग काढतांना वाहनधारकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे सुमारे 3 फुटा पर्यंत पाणी साचल्यामुळे या मार्गातून पायी जाणे कठीण झाले आहे थोडा जरी पाऊस झाला की या भूमिगत मार्गात नेहमीच पाणी साचत असतो त्यामुळे भुयारी मार्ग असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे.
14
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 17, 2025 06:01:40Yeola, Maharashtra:
अँकर :-गेल्या दोन दिवसा पासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे मनमाड पासून जवळ असलेल्या अंकाई किल्ल्यावरील सर्वच धबधबे प्रवाहित झाले असून डोंगरावरून पाणी कोसळत आहे शिवाय किल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यावरून देखील पाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.. एकीकडे डोंगरावरून धबधब्यांचे कोसळणारे पाणी दुसरीकडे सर्वत्र पसरलेली हिरवी चादर, डोंगराला खेटून जाणारे ढग असे मनमोहक आणि नयनरम्य दृश्य पर्यटकांना खुणावात आहे.
13
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 17, 2025 06:01:30Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1708ZT_CHP_BRIDGE_CLOSE
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीला पूर, भोयेगाव पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली , चंद्रपूर- गडचांदुर मार्ग बंद,अमरावती - यवतमाळ जिल्ह्यातील दमदार पावसाचा परिणाम
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहत असून गडचांदूर मार्गावरील भोयेगाव पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गडचांदूर-चंद्रपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील दमदार पावसाने वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
13
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 17, 2025 05:49:17Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1708ZT_CHP_MONSOON_TOUR_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील हिंडगवरे समूहाने पुन्हा केले मान्सून ट्रेकचे आयोजन, जिवती तालुक्यातील जंगुबाई गुहा व भीमलकुंड धबधब्याचा घेतला रोमांचकारी अनुभव
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील माणिकगड डोंगरात ‘हिंडगवरे’ समूहाने यावर्षीही मान्सून ट्रेकचे आयोजन केले. १६ जणांचा समुह आणि तीन गाड्यांनी हा ट्रेक केला. पहिल्या दिवशी जंगुबाईच्या निसर्गनिर्मित गुहेच्या दिशेने, स्थानिकांच्या मदतीने दगड आणि पाण्याने भरलेली नदी चढत पार केली. जंगुबाई ही आदिवासी गोंड-कोलाम समाजाचे श्रद्धास्थान असून तिची मूर्ती प्रतिकात्मक असते. नदी व गुहा त्यांच्या दृष्टीने पवित्र मानली जाते. दुसऱ्या दिवशी २००-२५० फुटांवरून कोसळणाऱ्या भीमलकुंड धबधब्याचे उलट्या दिशेने ट्रेकिंग करत मुखाजवळील प्रवाहाचा थरार अनुभवला. मग सदस्यांनी धबधब्याखाली उतरण्याचा थरारक अनुभव घेतला. हा ट्रेक धार्मिक, ऐतिहासिक आणि साहसी ठरला.
बाईट १) प्रशांत बोराडे, सदस्य, हिंडगवरे समूह
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report