Back
वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना आले पूर, मार्ग बंद!
GMGANESH MOHALE
Aug 17, 2025 07:18:27
Washim, Maharashtra
वाशिम :
File:1708ZT_WSM_RIVERS_FLOOD
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
वाशिम जिल्ह्यात आज सकाळी मुसळधार पाऊस पडल्यानं पैन गंगा,कांच नदी सह अनेक नदी नाल्यांना आला पूर...
पैंन गंगा नदीच्या पुरामुळं सरपखेड - धोडप,करडा - गोभणी मार्ग बंद...
तर रिसोड - मेहकर मार्ग ही एकलासपूर जवळ नाल्याच्या पुरामुळं बंद...
कांच नदीच्या पुरामुळं मसला - मांगुळ झनक आणि मांगुळ झनक - नेतंसा मार्ग बंद...
मुसळधार पाऊस आणि नदी नाल्यांच्या पुरामुळं शेतीचं अतोनात नुकसान...
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowAug 17, 2025 10:01:18Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1708ZT_INDAPURBHRNEKRIDA
BYTE 1
क्रीडा खातं बरं होतं, लय त्रास नव्हता… पण आता त्रास घ्यावाच लागेल* मात्र लगेच सारवा करत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, हा त्रास नाही ही जबाबदारी आहे…
ANCHOR - इंदापूर तालुक्यातील दगडवाडी येथे निरा नदीकाठावर पूर संरक्षण भिंत बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्यात मंत्री भरणे बोलत होते. भाषणात ते म्हणाले, परवा मी विदर्भात होतो, काल मराठवाड्यात होतो… त्यामुळे सतत फिरावं लागतं. क्रीडा व अल्पसंख्यांक खातं बरं होतं, लय त्रास नव्हता, पण आता त्रास घ्यावाच लागेल.
यानंतर तात्काळ त्यांनी स्पष्ट करत सांगितलं, हा त्रास नाही… ही जबाबदारी आहे. आपल्या नेत्यांनी ठेवलेला विश्वास आहे,असे म्हणत मंत्री भरणे यांनी पुन्हा सारव केली.
*साउंड बाईट – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे*
0
Report
LBLAILESH BARGAJE
FollowAug 17, 2025 09:33:02Pune, Maharashtra:
अण्णा हजारे ऑन पुणे फेक्सबोर्ड
Anc:-
पुण्यात अण्णा हजारेंचे फ्लेक्सबोर्ड लागल्यानंतर अण्णांनी नाराजी व्यक्त करत दिली प्रतिक्रिया आहे. मी दहा कायदे आणले मात्र 90 वर्षानंतर देखील मी करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं अशी अपेक्षा चुकीची असल्याचं म्हटलं आहे.
अण्णांनी जे केलं ते आपण करावं असं तरुण युवकांना वाटलं पाहिजे, देशाचे नागरिक आहेत तर आपलं काही कर्तव्य आहे की नाही. आपण स्वतंत्र दिवस साजरा केला नुसता तिरंगा हातात घेऊन होणार नाही, बोट दाखवून काहीही होणार नाही. मी मोठ्या आशेने तरुणाकडे पाहतोय, युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती आहे, ही जागी झाली तर उद्याच भविष्य दूर नाही. मात्र एवढे वर्ष लढून कायदे करून जेव्हा अण्णांनी जाग झालं पाहिजे अस कानावर येत तेव्हा वाईट वाटत अस अण्णा हजारेंनी म्हटलं आहे.
बाईट:- अण्णा हजारे, जेष्ठ समाजसेवक
5
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 17, 2025 09:31:48Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_DESAI_BYTE
शंभूराज देसाई On शरद पवार
1978 च्या शरद पवारांच्या पुलोद सरकारच्या वक्तव्यावर त्यांचे साथीदार आणि वसंतदादांच्या कुटुंबियांनीच भाष्य करावे, असे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.
शंभूराज देसाई On उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी आपलं देशप्रेम असल्याने आम्ही महाविकास आघाडी केली असल्याचे म्हटले यावर शंभूराज देसाई यांनी निवडणुका एका बरोबर आणि सरकार स्थापन दुसऱ्या बरोबर हे लोकशाहीचे तत्व नसल्याची टीका केली.
10
Report
MNMAYUR NIKAM
FollowAug 17, 2025 08:47:49Buldhana, Maharashtra:
व्यवस्थेच्या उदासीनतेचा बळी: विनोद पवार यांच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित
स्वतंत्र भारतातही हक्कांसाठी मरावं लागतंय..!
Anchor - १५ ऑगस्ट... स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी, जिथे आपण देशासाठी काहीतरी चांगलं करण्याच्या शपथा घेतो, तिथेच एका तरुणाला आपल्या मागण्यांसाठी, आपल्याच लोकांसाठी जीव द्यावा लागला. हा तरुण होता विनोद पवार... आणि त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरली ती प्रशासनाची दिरंगाई आणि उदासीनता...पाहुयात हा सविस्तर वृत्तांत
VO 1- बुलढाणा जिल्ह्यातील आडोळ खुर्द गाव. अनेक वर्षांपासून या गावकऱ्यांच्या मूलभूत मागण्या प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. रस्ते, पाणी, आणि घरांसाठी ते अनेक वर्षांपासून निवेदनं देत आहेत. पण त्यांची ही हाक कुणीही ऐकली नाही. अखेर, याच मागण्यांसाठी त्यांनी १५ ऑगस्ट रोजी जिगाव प्रकल्पाजवळ जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनात विनोद पवार आघाडीवर होते. त्यांनी प्रशासनाचा निषेध करत पूर्णा नदीत उडी घेतली."
VO 2- ही घटना घडल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. एनडीआरएफच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली, पण तब्बल ३० तासांनंतर १६ ऑगस्टला विनोद पवार यांचा मृतदेह मलकापूर जवळ सापडला. ३० तास... प्रशासनाच्या बेफिकीरीचा हा सर्वात मोठा पुरावा आहे."
Vo 3 - आम्ही कितीवेळा प्रशासनाकडे गेलो, निवेदनं दिली, पण त्यांनी आमच्याकडे दुर्लक्षच केलं. माझ्या नवऱ्याचा जीव त्यांच्या याच बेपर्वाईमुळे गेला. त्यांना काहीच फरक पडत नाही की एक माणूस मरेपर्यंत लढतोय... अशी दुःखद भावना विनोद पवार यांच्या पत्नीने व्यक्त केली....
Byte - आशा पवार, पवार यांच्या पत्नी
Vo 4 - माझे वडील ज्यांच्यासाठी लढत होते, त्यापैकी एकानंही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. हे खूप धक्कादायक आहे. प्रशासन तर जबाबदार आहेच, पण ज्यांनी त्यांना एकटं सोडलं, ते सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत... हे सांगताना विनोद पवार यांच्या मुलीला गहिवरून आलं....
Byte - करुणा पवार, पवार यांची मुलगी
VO 5- विनोद पवार... एक समाजसेवक, जो लोकांच्या प्रश्नांसाठी लढला. आज त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पण त्यांच्या मनात एकच प्रश्न आहे: 'याला जबाबदार कोण?' यापूर्वीही जिल्ह्यात कैलास नागरे या तरुणाने शेतकऱ्यांना पाणी मिळाव यासाठी आत्महत्या केली होती. या दोन घटनांमध्ये एक गोष्ट समान आहे - प्रशासनाचे दुर्लक्ष आणि सामान्य माणसाचा बळी."
आजही अनेक ठिकाणी सामान्य माणूस मूलभूत सुविधांसाठी लढतोय. विनोद पवार यांचा बळी हे केवळ एक उदाहरण आहे. हा प्रश्न आहे व्यवस्थेवरच्या विश्वासाचा. जेव्हा एक माणूस लोकांच्या हक्कांसाठी जीव देतो, आणि प्रशासन शांत बसतं, तेव्हा कोणावर विश्वास ठेवायचा? यापुढे किती विनोद पवार यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागणार? मयूर निकम झी 24 तास बुलढाणा....
13
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 17, 2025 08:47:41Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
4 FILES
SLUG NAME -SAT_THIEF_DEATH
सातारा- सातारा शहरात मध्यरात्री धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. चोरीसाठी आलेल्या युवकाचा चौथ्या मजल्यावरून पडून जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या साथीदाराला नागरिकांनी पकडून मारहाण केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. मात्र इतर काही साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व चोरटे पुणे जिल्ह्यातील मंचर येथील असल्याचे समोर आले आहे.
12
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 17, 2025 08:47:32Akola, Maharashtra:
Anchor : श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार... आणि अकोल्याच्या राजेश्वर देवाच्या जलाभिषेकाची परंपरा! तब्बल सात दशकांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे. अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या राज राजेश्वर देवाला जल अर्पण करण्यासाठी हजारो भाविक १७ किलोमीटर अंतरावरील पूर्णा नदीकडे पायी जातात..अकोला शहरातील सर्वात मोठी डाबकी रोडची महाकाय कावड यंदाही जल आणण्यासाठी निघाली आहे. तब्बल १०५ फूट लांबीची २१०० भरण्यांची ही कावड... आणि यात सुमारे ३००० युवकांचा उत्साही सहभाग पाहायला मिळत आहे.श्रद्धा, भक्ती आणि जल्लोषाचा संगम झालेली ही कावड यात्रा शहरभर आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
13
Report
JMJAVED MULANI
FollowAug 17, 2025 08:35:41Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1708ZT_INDAPURMINIBHARNE
BYTE 1
रामराजे निंबाळकर आयोगाच्या शिफारशीच्या मागणीसाठी इंदापुरात शेती महामंडळाच्या कामगारांचे उपोषण... कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली उपोषण स्थळी भेट.... कामगारांच्या मागण्यांसाठी महसूलमंत्र्यांसोबत लवकरच बैठक लावणार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आंदोलकांना आश्वासन....
Anchor— इंदापूर तालुक्यातील खंडकरी शेतकरी कामगारांना दोन गुंठे राहण्यासाठी जागा व काम मिळावे यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्याहा कामगारांनी जंक्शन चौकात आमरण उपोषण सुरू केल आहे.आज उपोषण स्थळाला राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट दिली असून या आंदोलकांशी चर्चा केली आहे.राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांसोबत लवकरच मी या कामगारांची बैठक लावली जाईल असा आश्वासन मंत्री भरणे यांनी उपोषणकर्त्यांना दिला आहे.
कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या अत्यंत बरोबर आहेत. 2014 सालापासून मी या मागण्यांसाठी प्रश्न लावून धरला आहे. आज पावसाळ्यात त्यांची घरं पाहिली तर त्यांच्या चुलीत पाणी होतं, त्यांच्या झोपण्याच्या अडचणी आहेत. पाठीमागे देखील पाठपुरावा केला आहे. रामराजे निंबाळकर समितीच्या शिफारशी लागू कराव्यात ही मुख्य मागणी आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांसोबत लवकरच मी या कामगारांची बैठक लावणार आहे अस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे.
*बाईट — कृषिमंत्री दत्तात्रय भरणे*
13
Report
JMJAVED MULANI
FollowAug 17, 2025 08:34:02Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 1708ZT_INDAPURBHRNEBYTE
FILE 1
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे भाषण पॉइंटर दगडवाडी नंदिकेश्वर अभिषेक कार्यक्रम*
(इंदापूर तालुक्यातील दगडवाडी येथे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज श्री नंदिकेश्वराला अभिषेक घालण्यात आला यानंतर भरणे उपस्थित यांना मार्गदर्शन करत होते)
तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कृषी मंत्री पद मिळालं
उद्या पुसदला राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या निमित्ताने खूप मोठा कार्यक्रम आहे.
आज रात्री उशिरा मुंबईला जाणार.
या ठिकाणी नीरा नदीकाठी आपण पाच कोटी रुपये खर्चून संरक्षण भिंत बांधत आहे त्याचे भूमिपूजन झालं आहे.
2012 साली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर या भागात विकासाचा निधी दिला.
त्यानंतर प्रत्यक्षेत्रात या परिसरात विकासाचा निधी देण्याचा प्रयत्न प्रमाणिकपणे केला.
एखाद्या कामाचा शो जाहिरात पुढे पुढे समोर मीडियासमोर जायचं हे मला पहिल्यासमोर आवडत नाही.
कृषिमंत्री झाल्यामुळे थोडसं मला तिथं पकडलं जातंय.
जबाबदारी मोठी आहे याची जाणीव आहे.
शेतकऱ्याच्या अडचणी प्रश्न समस्या काय आहेत हे मला माहित आहेत.
सकाळी उठल्यानंतर मला शेत दिसते झोपायला गेल्यानंतर शेत दिसतं. कुठले निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने घेण हिताच आहे. याचा विचार मी करत असतो.
माझ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे जे चांगले निर्णय असतील तो घेण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे घेईल हे मी नंदकेश्वराची शपथ घेऊन सांगतो.
*मला स्वप्नातही वाटलं नव्हतं राज्याच्या एवढ्या मोठ्या जे पद पहिल्या पाच पदांपैकी आहे. त्या पदा पर्यंत जाण्याचा योग मला मिळाला*
पूर्वी मी क्रीडा मंत्री होतो त्यामुळे तालुक्यात प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला जाता येत होतो भेटी देता येत होते पण आता मला समजून घ्या.
मी सुखदुखात आलो नाही म्हणजे माझं प्रेम तुमच्यावर नाही असं नाही, पण माझ्यावर राज्यातील मोठे जबाबदारी आहे.
आता माझ्यावर मोठी जवाबदारी मुख्यमंत्र्यांनी पण मला तेच सांगितलं.
एखाद्या कार्यक्रमात मी आलो काय ना आलो काय सुखदुःखात आलो काय न आलो काय तरी मला तुम्ही सर्वांनी समजून घ्या.
मी तुमच्या प्रत्येक सुखदुखात आहे. मला साथ द्या सहकार्य करा. महाराष्ट्रात इतर तालुक्यात गावात जाण्यासाठी मला पाठिंबा द्या.
पूर्वी दगडवाडी परिसरात बंधारे रस्ते काय अवस्था होते.
आज इथले नीरा नदीमधील बंधारे भरल्यानंतर मनाला समाधान वाटतं.
आपण ज्या आयुष्यात काम करतो ते डोळ्याने पाहिलं तर समाधानाचं काम होत आहे.
*कधी कधी एखाद्या योजनेला उशीर होतो एखादी नवीन योजना लगेच होते याचा अर्थ आमचं लक्ष तुमच्यावर अजिबात लक्ष नाही असं नाही.दुसरा माणूस कुठलंही तुमचं काम करणार नाही येतील गप्पा मारतील मला कोणावर करायची नाही. आपण आता आपण पुढे गेलो आहोत.टीका टिपणी न करता गावातील गरीब माणसाला सरकारच्या योजनांचा लाभ मिळेल हे पहा. कुठेही करून टोकाला जाऊ नका गावातील वाद भांडणे बाजूला ठेवा.*(नाव न घेता हर्षवर्धन पाटील यांवर टीका)
खोरोची किंवा आसपासच्या सर्व मंडळींना नंदकिशोर मंदिरातून मी तुम्हा सर्वांना हात जोडतो भांडण तंटा बाजूला ठेवा,काही गोष्टी चार-पाच महिन्यापूर्वी चुकीच्या घडल्या त्या चुकीच्याच आहेत. अशा गोष्टी पुन्हा पुन्हा होणार नाहीत ही काळजी सर्वांनी घ्यावी.
2 कोटी 97 लाख रुपये आपण या ठिकाणच्या आरोग्य उपकेंद्रासाठी मंजूर केले आहेत.
एखादा आजारी पडला तर त्याची गैरसोय झाली नाही पाहिजे त्याला उपचार मिळाला पाहिजे.
पूर्वीचा इंदापूर तालुका आणि आजचा इंदापूर तालुका पहा.
या BKBN रोडची परिस्थिती काय होती.
पूर्वीचे रस्ते आताचे रस्ते पहा अजून खूप काम करायची आहेत.
काही रस्ते बजेट प्लॅनमध्ये असतात काही नसतात.
*पाच वर्ष रोज जरी उद्घाटन केली तरी कामी जास्त होतील एवढी काम इंदापूर तालुक्यात मी केलेली आहेत.काम केली मी जनतेवर उपकार केले नाहीत, एका शेतकऱ्याच्या मुलाला प्रस्थापितांना डावलून या तालुक्यातील जनतेने मला संधी दिली एवढं मोठं पद मला मिळालं याची मला जाण आहे*(नाव न घेता हर्षवर्धन पाटील यांवर टीका)
माझं सर्वांवर प्रेम मी सर्वांचा ऐकणारा कार्यकर्ता.
मी कानाला लागणाऱ्याचं पण तेवढेच ऐकतो आणि न लागणाऱ्याच पण तेवढंच ऐकतो.
*मोठे लोक येथील जातील तुमच्याकडून काम करून घेतील सुखात तुमच्या येतील दुःखामध्ये फक्त तुमचा मामाच तुमच्या सोबत आहे हे पण आयुष्यात लक्षात ठेवा*(नाव न घेता हर्षवर्धन पाटील यांना टोला)
मी पण माणूस आहे, माझ्या पाठीवर शाबासकीची थाप नाही टाकली तरी चालेल पण मार्गात काटे टाकू नका.
*विरोधकांना मला एवढंच सांगायचं आहे की मला शाब्बासकी देऊ नका पण माझ्या मार्गात काटे काचा टाकू नका मी कधी तुमच्यावर टीका टीपणी करणार नाही*
या देवाला सुद्धाच कळतं कोण खरा आणि कोण खोट आहे.
आपण जर नंदकिशोर समोर मनाने मस्तक टेकवलं तर तर तो सुद्धा आपल्याला पावतो याचं उत्तम उदाहरण मी आहे तुमच्यासमोर आहे.
खूप काम करायचे आहे. या ठिकाणी पर्यटनासाठी आपण एक कोटी रुपये टाकले आहेत परंतु ते थांबले आहेत आपल्याला ते पैसे आणायचे आहेत.
प्रस्ताव मुंबईला गेलेला आहे तो कसा मंजूर होईल हे पाहू.
*माझ्या लाडक्या बहिणींना एकच विनंती करतो की तुम्ही म्हणाल मामांचं आमच्याकडे लक्ष नाही,आरे लाडक्या बहिणींनो तुमच्यामुळेच मी इथं बोलतोय.लाडक्या बहिणीने आम्हाला सत्तेत सहभागी होण्यात तारल आहे. लाडक्या बहिणीसाठी अजूनही काही गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या करण्याचा भविष्यात प्रयत्न करूया.*
राज्यात पाऊस पाणी चांगला पडत आहे अजून चांगला पडू दे शेतातील पीक पाण्याचं उत्पादन चांगलं होऊ दे त्याला चांगला बाजारभाव मिळू दे हे आज मी नंदकेश्वराला साकडं घालतो.
सकाळी सकाळी शेळगाव मध्ये गेलो होतो, बापूराव दुधाळ आणि त्यांचे बंधू यांच्या डाळिंब बागेत गेलो आज त्यांचं डाळिंब एक्सपोर्टला जात आहे.190 दर मिळत आहे. जर चांगलं कष्ट केलं तर दहा एकरात त्यांना तीन कोटी रुपये मिळाले.
दिवस उगवण्याच्या आत दुधाळ यांचं कुटुंब बागेत औषध फवारते, हे सोपं नाही त्यात तुम्हाला कष्ट करावे लागतील.
अशा कुटुंबाचे देखील यशोगाथा मी ऐकणार आहे, एखादा शेतकरी कष्ट करतोय पण त्याला यश येत नाही मी त्याच्याकडे पण जाणार आहे.
राज्याचा कृषी मंत्री म्हणून काय मदत करता येईल सहकार्य करता येईल तो प्रयत्न मी करणार आहे.
*टीका टिपणी करण्याचे दिवस आता राहिले नाहीत आपण त्याही पुढे गेलो आहोत*
एकदम दिल्यानंतर रुसवे फुगवे लय होतात, शंभर मार्काचा पेपर असतो, 90 मार्क मिळतात दहा मार्क राहतात 90 चा कोण नाव घेत नाही, दहा कमीच पडली असं म्हणतात, त्यामुळे गावातील लोकांना सांगायचं आहे एखादा दुसरा रस्ता राहिला एखादा दुसरे काम राहिलं तरी काम आपणच करणार आहोत दुसरं कोणी करणार नाही.
*माझ्यावरती जी जबाबदारी दिली आहे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांच्या सहकार्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप मोठी जबाबदारी दिली आहे, मला जेवढी मदत करता येईल तेवढी करीन. काही गोष्टींमध्ये मला तुम्ही समजून घ्या सांभाळून घ्या. कुठे वाईट दुखी होऊ नका*
*येणाऱ्या काळात निश्चित प्रकारे अजूनही सर्वसामान्य माणसासाठी चांगल्या गोष्टी करता येतील ते करणार आहे*
*काल मी मराठवाड्यात विदर्भात होतो आता मला थोडं फिरावे लागते पळावे लागतंय, क्रीडा आणि अल्पसंख्यांकच थोडं बरं होतं लय त्रास नव्हता पण आता त्रास तर घ्यावाच लागेल.*
*त्रास म्हणता येत नाही आपल्यावर जबाबदारी आहे आपल्यावर विश्वास टाकलेली आहे. राज्यातील नेत्यांनी इंदापूर तालुक्यावर विश्वास टाकला आहे. इंदापूर तालुक्याचे नाव उज्वल व्हावं.*
*माझे काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे या जगात उद्या आपण असेल नसेल पण कोणीतरी म्हटलं पाहिजे या राज्याचा एक कृषिमंत्री होता.*
*काल मी धाराशिव ला गेलो होतो त्या लोकांना एवढं बरं वाटलं की ते म्हणाले की आमच्या आयुष्यात कधी राज्याचा कृषिमंत्री आमच्या गावात बांधावर वाडी वस्तीवर येऊ शकतो. चांगलं समाधान वाटतं की आपण काम करतो फिरतो.*(कोणाला उद्देशून म्हणाले ठरवा)
13
Report
JMJAVED MULANI
FollowAug 17, 2025 08:33:58Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1708ZT_INDPURBHRNETEMPLE
FILE 5
इंदापुरात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते श्री नंदिकेश्वराची महापूजा… यात्रेनिमित्त सपत्नीक दर्शन घेऊन श्री चरणी साकडं… राज्यातील शेतकऱ्यांना सुख-समृद्धी लाभो, भरभराटीचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना
Anchor — इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठी वसलेल्या दगडवाडी येथील श्री नंदिकेश्वर मंदिरात राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते महापूजा व अभिषेक विधिवत पार पडले. श्री नंदिकेश्वराच्या यात्रेनिमित्त भरणे यांनी सपत्नीक दर्शन घेत महापूजा अर्चा केली.यावेळी त्यांनी श्री चरणी साकडं घालत राज्यातील शेतकऱ्यांना सुख, समाधान, समृद्धी आणि भरघोस उत्पादनासोबत चांगला बाजारभाव मिळावा.अशी प्रार्थना केली.दरम्यान कृषिमंत्री भरणे यांच्या हस्ते नीरा नदीकाठावर उभारण्यात येणाऱ्या पूर संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजनही संपन्न झाले...
14
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 17, 2025 08:16:17Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव:
DHARA_JALPUJAN
धाराशिव जिल्ह्यातील तेरणा प्रकल्प ओव्हरफ्लो, भाजपकडून जलपूजन
भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलं तेरणा प्रकल्पातील पाण्याचे जलपूजन
तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा
तेरणा प्रकल्पातून धाराशिवसह तेर, ढोकी या मोठ्या गावांना पाणीपुरवठा
Anc: धाराशिव मध्ये झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्प असलेला तेरणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. भारतीय जनता पार्टी कडून आज प्रकल्पातील पाण्याचे जलपूजनच करण्यात आलं. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी विधिवत पूजा करत जलपूजन केलं. तेरणा प्रकल्प भरल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच धाराशिवसह तेर, ढोकी या गावांचा पाणी प्रश्नही मिटणार आहे.
Byt: राणाजगजीतसिंह पाटील, भाजपा आमदार
14
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 17, 2025 07:47:00Washim, Maharashtra:
वाशीम:
File:1708ZT_WSM_MINISTER_JADHAV
रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशिम
अँकर: असा कोणता दिवस नाही की संजय राऊत कोणावर आरोप करत नाही,खरं तर मीडियाच्या माध्यमातून जनतेची करमणूक करणारे एक पात्र म्हणजे संजय राऊत झालं आहे,रात्री झोपताना तो विचार करतो सकाळी कुठला आरोप करायचा,आणि सकाळी त्याचा भोंगा सुरू होतो ,निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे,आज ते सुप्रीम कोर्टवर सुद्धा आरोप करायला लागले आहेत,असे कुठले क्षेत्र आहे की संजय राऊत यांनी आरोप केले नाही ,जे काही आम्हला चिन्ह मिळाले आहे ते लोकशाही पद्धतीने शिवसेनेचे 50 आमदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या सोबत होते यासह 13 खासदार शिंदे साहेब यांच्या सोबत होते ,निवडणूक आयोगाने सर्व टेक्निकल बाबींचा विचार करून एकनाथ शिंदे साहेबांना शिवसेना पक्षाचे नाव आणि निशाणी आणि महत्वाचे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जे उद्धव ठाकरे यांनी सोडले होते ते विचार एकनाथ शिंदे साहेब पुढे नेत आहेत असे केंद्रीय आरोग्य व आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे वाशिम येथील महेश केयर हॉस्पिटल यांच्या उदघाटनप्रसंगी वाशिम येथे आले असता माध्यमांशी बोलत होते...
बाईट-प्रतापराव जाधव,केंद्रीय राज्यमंत्री आरोग्य
14
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 17, 2025 07:46:40Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_aropi_dhindi
*नाशिक ब्रेकिंग...*
* अंबड पोलिसांचा गुन्हेगारांना दणका
* दुकानातील कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या गुंडांना पोलिसांनी दाखवला खाक्या..
* ज्या ठिकाणी केली दहशत तिथेच घडायला लावल्या उठाबशा..
* अंबड पोलिसांनी गुंडांची काढली धिंड..
* काही दिवसांपूर्वी याच गुंडांनी एका दुकानात केली होती तोडफोड आणि मारहाण
* घटनेचा सीसीटीव्ही देखील झाला होता व्हायरल...
अँकर:
नाशिकमध्ये दुकानातील कर्मचाऱ्याला मारहाण करून परिसरात दहशत माजवणाऱ्या गुंडांना अंबड पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलाय.... काही दिवसांपूर्वी या गुंडांनी एका दुकानात तोडफोड करत कर्मचाऱ्याला मारहाण केली होती.... संबंधित प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.घटनेची गंभीर दखल घेत अंबड पोलिसांनी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतलं.... केवळ ताब्यातच न घेता, गुन्हा घडलेल्या ठिकाणीच त्यांच्या रस्त्यावर उठाबशा काढत पोलिसांनी सक्त मेसेज दिला की, कायदा हातात घेतल्यास अशा प्रकारे कारवाई होणारच...या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांत पोलिसांविषयी विश्वास वाढला असून गुंडगिरीला चाप बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे....
14
Report
ABATISH BHOIR
FollowAug 17, 2025 07:30:40Kalyan, Maharashtra:
कल्याणच्या बारावे गाव परिसरात हादरवून टाकणारी घटना
कचराकुंडीजवळ टाकलेले स्त्री जातीचे बाळ आढळले
निर्दयी पालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन विशेष पथके सक्रिय,
Anc.. कल्याण पश्चिमेकडील बारावे गावातील कचराकुंडीलगत गोणीत गुंडाळून फेकलेली नवजात बालिका सापडल्याची घटना आज रविवारी सकाळच्या सुमारास घडली. बाळाच्या रडण्याच्या आवाजाच्या दिशेने शोध घेत स्थानिक ग्रामस्थांनी या चिमुरडीची गोणीतून सुटका करत खडकपाडा पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी तातडीने धाव घेत या चिमुरडीला रुग्णालयात दाखल केले असून तिच्या निर्दयी अज्ञात पालकांचाशोध सुरु केला आहे.
आज सकाळच्या सुमारास बारावे गावात असलेल्या कचरा कुंडीलगत छोट्या बाळाच्या रडण्याच्या आवाजाने ग्रामस्थ चक्रावले. कचरा कुंडीलगत फेकलेल्या एका गोणीतून आवाज येत असल्याचे पाहून नागरिकांनी तातडीने गोणी उघडून पहिले असता यात महिनाभर वयाची एक चिमुरडी रडत विव्हळत असल्याचे दिसून आले. नागरिकांनी तातडीने या मुलीला उचलून घेत तिला चांगल्या कपड्यात गुंडाळत पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या चिमुरडीला ताब्यात घेत तिला रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ समीर सरवनकर यांनी सांगितले. दरम्यान या चिमुरडीला कचऱ्यात फेकणार्या निर्दयी पालकांचा पोलिसाकडून शोध घेण्यासाठी तीन पथके तयार केली असून लवकरच या निर्दयी पालकांचा शोध घेतला जाईल असे पोलिसांनी सांगितले.
byte.. डॉ समीर सरवणकर
रुक्मिणी हॉस्पिटल केडीएमसी
14
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 17, 2025 07:19:22Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी - संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका
गडनदीची पाणीपातळी वाढल्यानं माखजन बाजारपेठेत पुन्हा शिरु लागलं पाणी
दोन दिवसात दुस-यांदा माखजन बाजारपेठेत भरलं पुराचं पाणी
बाजारपेठेतील सात ते आठ दुकानांत शिरलं पुराचं पाणी
सतत पुराचं पाणी भरत असल्यानं व्यापा-यांच होतय नुकसान
14
Report