Back
नाशिकच्या शेतकऱ्यांची २५ कोटींची फरफट, विमा अद्याप थकीत!
SGSagar Gaikwad
Jul 25, 2025 03:46:36
Nashik, Maharashtra
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_peek_vima
( कृषी विभागाचे स्टॉक विज्युअल वापरा)
पीकविम्याचे ९४ कोटी मिळाले पण २५ कोटींसाठी बळीराजाची फरफटच....
अँकर
नाशिक जिल्ह्यातील एक लाख २७ हजार ६३ शेतकऱ्यांना मागील खरीप हंगामातील पीक विम्याचे तब्बल ९४ कोटी ९० लाख २७ हजार ३६५ रुपये अदा करण्यात आले आहे... मात्र असून अजूनही २४ हजार ४८३ शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत... अर्ज वेळेवर भरूनदेखील या शेतकऱ्यांचे विमा कंपनीकडे २५ कोटी ८८ लाख ५१ हजार ८०१ रुपये अद्यापही अडकले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी थकीत भरपाई मिळावी यासाठी कृषी कार्यालयासह विमा कंपनीचे उंबरठे झिझवताय... अहिल्यानगरनंतर सर्वाधिक थकीत रक्कम नाशिक जिल्ह्याची आहे... एकीकडे थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांची दमछाक होत असताना सुधारित पीक विमा योजनेसाठी २२ जुलैअखेर तब्बल एक लाख ६२ हजार शेतकऱ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. मे व जून महिन्यात झालेल्या नुकसानीची भरपाई या शेतकऱ्यांना दिली जाईल; परंतु पहिले मागील वर्षाचे थकीत 25 कोटी अदा करा, अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे......
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 26, 2025 02:34:28Raigad, Maharashtra:
स्लग - महाड पोलादपूर तालुक्यात जोरदार पाऊस ...... सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ .... महाड पोलादपुरात शाळांना सुटी जाहीर .......
अँकर - रायगडच्या महाड आणि पोलादपूर तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे . काल दुपारनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री पुन्हा जोर धरला. त्यातच महाबळेश्वर इथं देखील जोरदार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे महाड पोलादपूर तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. महाड शहराच्या काही भागात पावसाचे पाणी साचले आहे. सावत्री नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगितले असून महाड आणि पोलादपूर तालुक्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 26, 2025 02:34:21Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2607_BHA_WELL_COLLAPSE
FILE - 2 VIDEO
साकोलीत सततच्या पावसाने विहीर खचली ..... सुदैवाने जीवितहानी टळली......
ANCHOR :- सतत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझीम पावसामुळे साकोली शहरातील सिव्हिल लाईन चौकातील असलेली जूनी मोठी विहीर जमिन समांतर होऊन कोसळली. यामध्ये सुदैवाने जीवितहानी टळली आहे. घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी चमुंसह घटनास्थळी दाखल होत घडलेल्या प्रकाराबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली व सदर परिसरात बॅरिगेट्स लावून घेण्यात आले.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 26, 2025 02:34:13Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Talegaon Sarapnch Election
File:02
Rep: Hemant Chapude(Shirur)
Anc: शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावच्या सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली असून यात स्वाती बाळासाहेब लांडे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड झालीय,लांडे यांच्या निवडीनंतर गावात वाजत गाजत फटाक्यांची आतषबाजी करत जंगी स्वागत करण्यात आलं.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 26, 2025 02:33:54Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 2607ZT_MAVAL_SHIVSENA
Total files : 01
Headline -मंत्र्यांचा जुगार आणि डान्स बारप्रेम, मावळातील शिवसैनिकांचा तीव्र निषेध!
-कोकाटे आणि कदम यांच्या राजीनाम्याची शिवसैनिकांकडून जोरदार मागणी!
Anchor:
मावळ तालुक्यातील शिवसेना (उबाठा गट) यांच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप करत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला लज्जास्पद ठरणारी कृत्ये हे दोन्ही मंत्री करत असून, कोकाटे यांनी विधानसभा कामकाजादरम्यान जंगली रम्मीसारखा जुगार खेळत लोकशाहीची थट्टा केली. तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या मालकीचे डान्स बार असून, त्यांच्या बारमध्ये बारबाला नृत्य चालते, असा आरोप करत शिवसेना आंदोलकांनी संताप व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर, या दोन्ही मंत्र्यांचा तत्काळ राजीनामा घेऊन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 26, 2025 02:33:46Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 2607ZT_MAVAL_MULSHI_FOREST
Total files : 02
Headline - मुळशी मधील भांबुर्डा वनपरिक्षेत्रात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा स्थानिक नागरिक यांचा गंभीर आरोप, चौकशीची मागणी
Anchor:
मुळशी तालुक्यात वन विभागातील
भांबुर्डा वन परिक्षेत्रात चालू वर्षात जलमृदा संधारणासाठी कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली. यात दगडी बंधारे, चेकडॅम, गॅबियन बंधारे यांसारख्या रचना उभारल्या गेल्या. मात्र, या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी प्रत्यक्ष काम न करता पैसे घेण्यात आले आणि काही ठिकाणी ई-टेंडर न करता थेट ओळखीच्या ठेकेदारांना कामं देण्यात आली आहेत. वन परिक्षेत्र अधिकारी पदाचा गैरवापर करत कोट्यवधींचा निधी लुटला जात आहे, असा आरोप करण्यात आलाय तर पुणे वन अधिकाऱ्यांकडून माहितीचीही टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक लखन चव्हाण यांनी वन प्रशासनास इशारा दिलाय जर याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई झाली नाही, तर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.
बाईट : लखन चव्हाण, स्थानिक, मुळशी (file no.02)
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 26, 2025 02:33:35Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn vidya deep av
Feed attached
शहरातील विद्यादीप बालगृहातील आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सावत्र बापाने मुलीवर अत्याचार केल्याने ती बालगृहात दाखल होती. त्या वेळी तिचा काका (आरोपीचा भाऊ) बालगृहातील सिस्टरच्या मदतीने पीडितेला भेटायचा. त्याने मुलीला धमकावून कोर्टात बलात्कार झालाच नसल्याची खोटी साक्ष द्यायला भाग पाडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑक्टोबर २०२३ पासून 'विद्यादीप'मध्ये राहणाऱ्या १७ मुलीने दिलेल्या जबाबानुसार, तिच्यावर सावत्र पित्याने अत्याचार केला. त्यामुळे आरोपी अशफाक शेख हा हसूल कारागृहात शिक्षा भोगतोय. त्याचा भाऊ महेमूद गफार शेख हा मुलीचा सख्खा काका असल्याचे भासवून कमल सिस्टरच्या मदतीने बालगृहात येऊन पीडितेला तक्रार मागे घे असा दबाव टाकायचा. कोर्टातील सुनावणीवेळी कमल सिस्टर मीनाला घेऊन गेल्या. त्या ठिकाणी वडिलांनी अत्याचार केला नसल्याचा जबाब महेमूद व कमल सिस्टरच्या मदतीने लिहून घेत कोर्टात सादर केल्याचं सांगण्यात येताय...
0
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 26, 2025 02:16:34Pimpalgaon Baswant, Maharashtra:
अँकर : सरकारी शाळा म्हटलं की पालक वर्ग पाठ फिरवतात मात्र जिल्हा परिषदेच्या काही शाळा याला अपवाद ठरल्या आहे.
येवला तालुक्यातल्या अंदरसुल येथील जिल्हा परिषद शाळा पाठोपाठ पिंपळगाव बसवंत येथील कारसूळ जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूल ठरली आहे.
येथील विद्यार्थ्यांना इंटरॅक्टिव्ह स्क्रीन यंत्रणेद्वारे शिक्षणाचे धडे दिले जात असून यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.
सुमारे 40 लाख रुपयांचा निधी खर्च करून 25 फ्युचरस्टिक क्लासरूम उभारण्यात आले आहेत.
कारसुळ येथील या शाळेला युनेस्को चे सदसत्व व आयएसओ मानांकन देखील मिळाले आहे.
या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे वह्यांची जागा स्क्रीन ने घेतली असून अभ्यासक्रम व्हिज्युअल डिजिटल आणि इंटरॅक्टिव्ह स्वरूपात विद्यार्थ्यांपुढे सादर केला जात आहे.
बाईट: मुख्याध्यापक,
बाईट :- शिक्षक,
बाईट: विद्यार्थिनी,
5
Report
HPHARSHAD PATIL
FollowJul 26, 2025 02:00:50Palghar, Maharashtra:
पालघर _ हवामान खात्याने पालघर जिल्ह्यासाठी आज अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू असून पुढील तासांत काही ठिकाणी अत्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तानसा, मोडकसागर आणि मध्य वैतरणा धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. तसेच धामणी धरणाचे तीन दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडले गेले आहेत. त्यामुळे सूर्या नदीत दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सूर्या आणि वैतरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
6
Report
KPKAILAS PURI
FollowJul 26, 2025 01:45:27Pune, Maharashtra:
pimpri ajit pawar
kailas puri pune 26 -7-25
feed by 2c
Anchor -...दोन आठवड्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुन्हा एकदा हिंजवडीत पाहणी दौरा करत आहेत...दोन आठवड्यापूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचा पालन करत त्यांनी सूचनांची अंमलबजावणी सुरुवात केली की नाही याची ते पाहणी करत आहेत...हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी रस्ते आणि इतर नागरी समस्या बाबत अजित पवार आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय....त्यांनी सुचवलेल्या कामांपैकी मागील दोन आठवड्यात हिंजवडीतील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारे सुमारे 166 बांधकामे जमीन दोस्त करत प्रशासन देखील कामाला लागल्याचे बघायला मिळत आहे... त्याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...!
kailas wkt+ vis
13
Report
KPKAILAS PURI
FollowJul 26, 2025 01:30:42Pune, Maharashtra:
pimpri ajit pawar
kailas puri pune 26 -7-25
feed by 2c
Anchor -...दोन आठवड्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुन्हा एकदा हिंजवडीत पाहणी दौरा करत आहेत...दोन आठवड्यापूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचा पालन करत त्यांनी सूचनांची अंमलबजावणी सुरुवात केली की नाही याची ते पाहणी करत आहेत...हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी रस्ते आणि इतर नागरी समस्या बाबत अजित पवार आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय....त्यांनी सुचवलेल्या कामांपैकी मागील दोन आठवड्यात हिंजवडीतील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारे सुमारे 166 बांधकामे जमीन दोस्त करत प्रशासन देखील कामाला लागल्याचे बघायला मिळते...
12
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 26, 2025 01:30:27Yeola, Maharashtra:
अँकर:-नाशिकच्या येवला तालुक्यातील ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना या गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबत येवला तालुक्यातील आंबेगाव येथून ऋषिकेश मोतीराम माळी व निफाड तालुक्यातील मरळगोई येथून सोपान निवृत्ती जगताप या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यात एक गावठी कट्टा व तीन जिवंत काढतूस मिळून आली आहे पोलिसांनी आर्म एक अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला असून या कारवाईसाठी लासलगाव पोलिसांची देखील मदत घेण्यात आली असून पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत.
बाईट - संदीप मंडलिक, पोलीस निरीक्षक येवला तालुका
6
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 26, 2025 01:16:37Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - नांगोळ्यामध्ये रंगणार ऐतिहासिक "देवाभाऊ केसरी" बैलगाडी शर्यत,555 बैलगाडी चालक होणार सहभागी..
अँकर - सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे 28 जुलै रोजी
देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.भाजपा आमदार गोपीचंद पडळकर व भाजपा किसन सभेचे प्रदेशाध्यक्ष संदीप गिड्डे यांनी या शर्यतीच्या आयोजनाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात सर्वात जुना शर्यतीचे मैदान म्हणून रांगोळ्याच्या बैलगाडी शर्यतीची ओळख असून नागपंचमी निमित्ताने या स्पर्धा पार पडणार असून यंदा 555 बैलगाड्या शर्यतीमध्ये सहभागी होतील.या शर्यती पाहण्यासाठी दोन लाखाहून अधिक शैक्षणिक उपस्थित राहतील,असा विश्वास पडळकर यांनी व्यक्त केला आहे. उद्घाटन भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार असल्याचेही आमदार पडळकर यांनी स्पष्ट केले आहे.
बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार, भाजपा
14
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 26, 2025 01:16:25Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याला "लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड".
अँकर - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या
राजारामबापु साखर कारखान्याला
'लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५'मिळाला आहे.साखर उद्योगातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल"द शुगर टॅक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया"कडुन पुरस्कार हा पुरस्कार देण्यात आला आहे.दिल्ली येथे शानदार सोहळ्यात आमदार जयंत पाटलांनी साखर उद्योगातला हा मानाचा पुरस्कार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते स्वीकारला आहे. या नामांकित पुरस्कारामुळे राजारामबापू साखर कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
12
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 26, 2025 01:16:03Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांनी हर्षल पाटील पाटील कुटुंबियांची भेट घेत केले सांत्वन.
अँकर - काँग्रेसचे माजी मंत्री व कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी सांगलीतील कंत्राट हर्षल पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.या ठिकाणी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन योजनेची थकीत दीड कोटी ची बिल मिळत नसल्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी तांदुळवाडी मध्ये हर्षल पाटील कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले आहे.त्याच बरोबर हर्षल पाटील याची आत्महत्या ही सरकारचे अपयश असून राज्य सरकारने तातडीने राज्यातल्या कंत्राटदारांचे थकीत बिल प्राधान्याने दिली पाहिजेत,अशी मागणी देखील केली.
12
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 26, 2025 01:15:54Ambernath, Maharashtra:
बारवी धरण 84 टक्के भरले
बारवी नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा!
एमआयडीसीचं कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाडच्या तहसीलदारांना पत्र
Bdl baravi
Anchor : बदलापूरचं बारवी धरण कधीही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सुरक्षेच्या कारणास्तव एमआयडीसीनं बारवी नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाडच्या तहसीलदारांना तातडीची सूचना जारी केली आहे.
Vo : बारवी धरणाची ओव्हरफ्लो होण्याची पातळी ७२.६० मीटर असून शुक्रवारी दुपारी पाणी ७०.६० मीटर इतकी होती. पाणीपातळी ७२.६० मीटरपर्यंत जाताच धरणाचे स्वयंचलित दरवाजे पाण्याच्या दाबाने आपोआप उघडले जातात आणि पाण्याचा विसर्ग सुरू होतो. सध्या धरणक्षेत्रात जोरदार
पाऊस सुरू आहे . पावसाचा जोर असाच राहिला तर लवकरच बारवी धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे , याच पार्श्वभूमीवर एमआयडीसीने एक तातडीची सूचना जारी केलीये, यात बारवी नदीलगत असलेल्या असलेली चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागाव, पाटीलपाडा, पादीरपाडा, कारंद, चोण मोऱ्याचा पाडा, रहाटोली या गावांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर बारवी आणि उल्हास नदी लगतच्या इतर गावं आणि शहरांनाही सतर्कतेच्या सूचना एमआयडीसीकडून देण्यात आल्या आहेत.
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
14
Report