Back
नांगोळ्यात ऐतिहासिक 'देवाभाऊ केसरी' बैलगाडी शर्यत, 555 चालकांचा सहभाग!
SMSarfaraj Musa
Jul 26, 2025 01:16:37
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - नांगोळ्यामध्ये रंगणार ऐतिहासिक "देवाभाऊ केसरी" बैलगाडी शर्यत,555 बैलगाडी चालक होणार सहभागी..
अँकर - सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे 28 जुलै रोजी
देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.भाजपा आमदार गोपीचंद पडळकर व भाजपा किसन सभेचे प्रदेशाध्यक्ष संदीप गिड्डे यांनी या शर्यतीच्या आयोजनाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात सर्वात जुना शर्यतीचे मैदान म्हणून रांगोळ्याच्या बैलगाडी शर्यतीची ओळख असून नागपंचमी निमित्ताने या स्पर्धा पार पडणार असून यंदा 555 बैलगाड्या शर्यतीमध्ये सहभागी होतील.या शर्यती पाहण्यासाठी दोन लाखाहून अधिक शैक्षणिक उपस्थित राहतील,असा विश्वास पडळकर यांनी व्यक्त केला आहे. उद्घाटन भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार असल्याचेही आमदार पडळकर यांनी स्पष्ट केले आहे.
बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार, भाजपा
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowJul 26, 2025 12:46:47Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
Big Breaking
संत युवराज पुन्हा बरळले...
गुन्हा दाखल झाल्यानंतरही हिंदू सेनेचे संत युवराज वक्तव्यावर ठाम...
साई बाबांविषयीच्या वक्तव्यावर ठाम असल्याचा व्हिडिओ केला व्हायरल...
मी केवळ साई मूर्ती गटारात फेकण्याचे विधाना मागे घेतोय..
ज्यांना पूजा करायची त्यांनी घरात आणि शिर्डीच्या साई मंदिरात जाऊन करावी...
सनातन हिंदू मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटवणारच...
ब्राम्हण सभा, बजरंग दल, शिवसेना, करणी सेना, सनातन धर्म सभा आपल्यासोबत असल्याचा दावा...
0
Report
DPdnyaneshwar patange
FollowJul 26, 2025 12:35:37Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_R3_CRIME
शंभर रुपयांच्या बॉण्डवर दत्तक करार करत दहा हजार रुपयाला मुलाची विक्री ?
धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथील धक्कादायक घटना, सोलापुरातील दांपत्याला मुलाची विक्री केल्याचा आरोप
चिमुकल्या मुलाची आई , तिच्या मामी यांनी चाळीसगाव इथ आपल्या नातवाची विक्री केल्याचा आजीचा गंभीर आरोप , गुन्हे दाखल करण्याची मागणी
चिमुकल्या मुलाच्या आईच चाळीस गावातील व्यक्तीसोबत दुसरे लग्न , पहिल्या पतीचे निधन झाले असून दुसरे लग्न करायचे आहे त्यामुळे पहिल्या पतीपासून झालेलं मूल दत्तक देत असल्याचा दत्तक करारात उल्लेख
चिमुकल्या मुलाची आई आणि सावत्र वडिल यांनी दत्तक करार करत मुलाची विक्री केल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप
सुनेने नातवंडाला न दिल्याने मुलाच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचाही आजीचा आरोप
सून आणि नातू घरातून गायब झाले असल्याची मिसिंग तक्रार आजीने यापूर्वीच धाराशिवच्या मुरूम पोलिसात दिली होती, त्यानंतर सुनेचा दुसरा लग्न आणि नातवाला विक्री केल्याचं समजल आजीने सांगितलं
सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने चिमुकल्या मुलाला ताब्यात घेत बालकल्याण समितीसमोर हजर केल , धाराशिव येथील सरकारी रुग्णालयात चिमुकल्या मुलावर उपचार सुरू
दत्तक करार करत ज्यांना मुलाची विक्री केली त्या ठिकाणी मूल जुलाब आणि तापीने फणफणलेल्या अवस्थेत आढळल्याची सामाजिक कार्यकर्त्यांची माहिती
मुलगा दत्तकप्रक्रिया बेकायदेशीरपणे झाली असल्याचा बालकल्याण समितीचा प्राथमिक निष्कर्ष, गुन्हा नोंद करण्याच्या सूचना
बालकल्याण समितीने धाराशिव येथील सह्याद्री अंकुर शिशुगृहात बाळाला दाखल करण्याच्या सूचना दिल्या मात्र गालफुगी ताप आणि जुलाब असल्याने सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची शिशुग्रह चालक डॉक्टर दापके यांची माहिती
चिमुकल्या मुलावर धाराशिव येथे उपचार सुरू, सामाजिक कार्यकर्ते आणि मुलाला दत्तक घेणाऱ्या महिलेमध्ये धाराशिवच्या सरकारी रुग्णालयासमोर शाब्दिक बाचाबाची
Byt: लता तळभंडारे , चिमुकल्याची आजी
Byt: सत्यभामा सौंदरमल, सामाजिक कार्यकर्त्या
Byt: डॉ. दिग्गज दापके, सह्याद्री अंकुर शिशुग्रह
- *लहान मुलाचा व्हिडीओ ब्लर करावा*
1
Report
PNPratap Naik1
FollowJul 26, 2025 12:18:13Kolhapur, Maharashtra:
Kolhapur Breaking
आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केलेल्या पोलीस कॉन्स्टेबल कडून 30 हजार रुपयांची खंडणी उकळण्या प्रकरणी दोन पोलिसांवर गुन्हा दाखल.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील हेड क्लार्क आणि शहर वाहतूक शाखेतील महिला पोलीस कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल.
हेड क्लार्क संतोष मारुती पानकर याला शाहूपुरी पोलिसांनी केली अटक. तर महिला पोलीस कर्मचारी धनश्री जगताप हिच्यावर गुन्हा दाखल
दोन पोलिसांवरच खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस दलात खळबळ.
4
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 26, 2025 12:16:19Parbhani, Maharashtra:
हिंगोली
अँकर - हिंगोली जिल्ह्यात सकाळ पासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे, त्यामुळे ओढे नदी नाले खळखळून वाहत आहेत, या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील भंडारी गावाजवळ असलेल्या ओढ्याला पूर आल्याने वाहतूक बंद पडलीय,
या रस्त्यावरून सायंकाळच्या सुमारास सेनगाव हिंगोली या शहरात कामानिमित्त गेलेल्या अनेक नागरिकांना गावाकडे जाता येत नाहीये. तर शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी आणि त्यांची बस अडकून पडलीय... सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी ताटकळलेत. परिणामी काही गावांचा संपर्क तुटलाय...
5
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 26, 2025 12:06:26Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
छत्रपती संभाजीनगर
पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चितेगाव येथे जलवाहिनी फुटल्याने महामार्गावर पाणीच पाणी
पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी
पैठण ते छत्रपती संभाजी नगरला जल पुरवठा करणारी जलवाहिनी,
ड्रेनेस लाईनचे काम ग्रामपंचायत कडून चालू होते.
त्या कामांमध्येच त्या पाईपलाईन आचानक फुटली ती पाईपलाईन फुटल्यामुळे चितेगाव मध्ये सगळीकडे पाणीच पाणी झाले
6
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 26, 2025 12:05:46Pandharpur, Maharashtra:
26072025
slug - PPR_MIL_ROLAR
feed on 2c
file 01
----
Anchor - पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा मिल रोलर पूजन चेअरमन आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी या वर्षीच्या हंगामात १५ ते २० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती दिली. गत वर्षी 2 हजार 803 प्रति टन प्रमाणे ऊस बिले दिली आहे. यावेळी संचालक अधिकारी आणि सभासद उपस्थित होते
11
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 26, 2025 12:05:30Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn flood av
feed attached
मुसळधार पावसाने पुर्णा नदीला पुर, सावरगांवाचा संपर्क तुटला.
कन्नड तालुक्यातील सावरगांव परिसरात आज सकाळ पासून मुसळधार पावसाने थैमान घातला आहे. पावसाने सावरगांव येथील पुर्णा नदिला पुर आल्याने दोन्ही कढील बाजूने गावांचा संपर्क तुटला आहे. तर सकाळ पासून जनजीवन विस्कळीत झाले आहा.
6
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 26, 2025 12:04:48Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी आज खासदार अनुप धोत्रे यांनी केली..काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे बाळापुर तालुक्यातील अनेक शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेय.. या पाहणी दौऱ्यात खासदारांसोबत महसूल अधिकारीही उपस्थित होते..शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आणि नुकसानीची माहिती खासदारांसमोर मांडली. यावर प्रतिक्रिया देताना अनुप धोत्रे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आणि अहवाल लवकरात लवकर शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले..शेतीचे झालेलं नुकसान लक्षात घेता शासनाकडून योग्य ती मदत लवकर मिळावी यासाठी प्रयत्न करू, असं आश्वासन अनुप धोत्रे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिलं..अधिकृत अहवालानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेय.
7
Report
SNSWATI NAIK
FollowJul 26, 2025 12:00:26Navi Mumbai, Maharashtra:
story Slug -: गाडी पडली थेट खाडीत, सागरी सुरक्षा पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला मिळाले जीवनदान. pkj
गाडी गिरी समुद्र मे
ftp slug - nm belapur Audi car accident
byet- police, and 1 to 1 with rescue team
shots- spot
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: उलवेला जात असणारी भरधाव कार थेट खाडीत कोसळल्याची धक्कादायक घटना बेलापूर जेट्टी जवळ घडलेय. सागरी सुरक्षा पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचवत क्रेनच्या साहाय्याने खाडीत पडलेली कार देखील बाहेर काढण्यात आलेय.28 वर्षीय स्वायत्तता वर्मा ही तरुणी कारने उलवेच्या दिशेने जात असताना बेलापूर येथील खाडीपुलावर जाण्याच्या ऐवजी त्यांनी पुलाखालील मार्ग निवडला. जेट्टीला सुरक्षा कठडा नसल्याने त्यांची कार थेट ध्रुवतारा जेट्टीवर जाऊन खाडीत कोसळली. सुदैवाने हा प्रकार जवळच असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या निदर्शनात आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कारमधील महिला वाहत जात असल्याचे दिसताच त्यांना रेस्क्यू बोटीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले तर खाडीत पडलेली कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली. रात्रीचा अंधार आणि पाऊस यामुळे भरकटला असल्याने रस्ता संपून पुढे जेट्टी असल्याचे न कळल्याने हा अपघात घडल्याचे सदर महिलेने पोलिसांना सांगितले. याबाबत घटनास्थळी जाऊन आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी
बाईट - wkt with पोलीस
vo 2 - तरुणीची गाडी खाडीत पडल्यावर इंडियन रेस्क्यू अकॅडमी च्या जवानांनी ही गाडी बाहेर काढली याच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी
बाईत - 1 to 1
6
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 26, 2025 11:35:46Washim, Maharashtra:
वाशिम :
File:2607ZT_WSM_FLOOD_RIVER
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशीम व बुलढाणा जिल्ह्यातील सीमावर्ती परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद गावाजवळून वाहणाऱ्या काच नदीला आज पूर आलाय त्यामुळं अवघ्या महिन्या भरात या परिसरातील शेती तिसऱ्यांदा पाण्याखाली जाऊन शेतीचं मोठं नुकसान झालंय.या भागातून जाणाऱ्या समृद्धी समृद्धी महामार्गावरचं किमान १० किलो मीटर भागातील पाणी एकाचं ठिकाणावरून बाहेर पडत असल्यानं थोडा पाऊस झाला तरी वारंवार काच आणि उतावळी नदीला पूर येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून या संदर्भात लवकर कायम स्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनकडून केली जातं आहे.
बाईट:गौरव देशमुख, शेतकरी
9
Report
KJKunal Jamdade
FollowJul 26, 2025 11:32:46Shirdi, Maharashtra:
Anc - राज्यभरातील सहकारी सोसायटी सचिवांचे अधिवेशन आज पार पडल.. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले शहरात झालेल्या अधिवेशनासाठी राज्यभरातून सचिव सहभागी झाले होते.. आज पर्यंतच्या इतिहासात प्रथमच राज्यातील सहकारी सोसायटीचे सचिव एकत्र आले असून स्वाभिमानी सचिव या संघटनेच्या बॅनरखाली ही अधिवेशन पार पडले.. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर उपस्थित होते.. पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून सचिवांच्या न्यायासाठी पुढाकार घेत आहेत.. यावेळी पंकज भोयर यांनी विदर्भातील सहकारावर टीका केली तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केलीय..
सहकार राज्यमंत्री पंकज भोयर साउंड बाईट
मी आज या भागात आलो.. या भागातली हिरवळ बघितल्यावर खूप बरं वाटलं.. या भागातील हिरवळ सहकाराच्या माध्यमातून तयार झालेली आहे.. मात्र आमच्या विदर्भात अशी हिरवळ दिसणार नाही.. तुमचा मंत्र आहे सहकारातून समृद्धी तर आमच्याकडे सहकारातून स्वहकार हा मंत्र अनेक वर्ष करण्यात आला.. त्यामुळेच आमच्या विदर्भातलं सहकार पूर्णपणे संपलं..
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साउंड बाईट
मला एक तरी उदाहरण दाखवा त्यांनी सहकारी सोसायटीसाठी भरीव काम केल आहे.. केंद्रामध्ये सुद्धा ते मंत्री होते त्यांच्याकडे सहकार खातं होतं.. पूर्वी कृषी मंत्रालयाकडे सहकार खात असायचं.. मग दहा वर्ष कृषी मंत्री असताना काय सहकारासाठी यांचे योगदान झालं..
अमित शहांच्या माध्यमातून आज सहकारी सोसायटी यांना नवसंजीवनी दिली जात आहे.. दीडशे हून धिक व्यवसाय करण्याची परवानगी सोसायटी यांना दिली..
सरकार सरकारचं काम करेल.. मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत सहकारी सोसायटीनी या संधीचा फायदा घेतला पाहिजे..
10
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 26, 2025 11:07:06Beed, Maharashtra:
बीड: जिल्हा कारागृहातून आरोपी वाल्मीक कराडचा एका व्यक्तीला फोन..? अंबादास दानवे यांचा खळबळजनक दाव्यानंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया...
Anc : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी वाल्मीक कराड याचा एका व्यक्तीला जिल्हा खरातून फोन केल्याचा खळबळजनक दावा अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला होता यानंतर धनंजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे
... त्यांनी म्हटले आहे की ते जे बोलले त्याचे पुरावे त्यांच्याकडे असतील शंभर टक्के असं काही कोणी खोटं बोलण्याचा विषय नाही. फोन आला असेल आणि तो फोन नेमका कोणाचा आहे? त्याचे कॉल डिटेल्स सह संपूर्ण तपासणी करणे गरजेचे आहे.. असेही धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.
बाईट: धनंजय देशमुख
14
Report
ABATISH BHOIR
FollowJul 26, 2025 11:06:30Kalyan, Maharashtra:
कल्याणच्या तरुणीला मारहाण प्रकरणातील आरोपी गोकुळ झा ला दुसऱ्या गुन्ह्यात २ दिवसांची पोलीस कोठडी!
राजकीय दबावामुळे पोलिसांकडून अडकवले जात असल्याचा आणि सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्ट नसल्याचा आरोपीचे वकिलांनी, ॲड. सुदाम गावाने याचा दावा .
Anc...कल्याणमधील तरुणीला मारहाण प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळालेल्या गोकुळ झा याला आता दुसऱ्या एका गुन्ह्यात दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या वेळी आरोपी गोकुळ झा चे वकील ॲड. सुदाम गावाने यांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी गोकुळचा जुन्या गुन्ह्यात काहीही संबंध नाही. त्याला राजकीय दबावामुळे पोलीस अडकवत असल्याचा आरोप आरोपीच्या वकिलांनी केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी स्पष्ट दिसत नसल्याचा दावाही ॲड. गावाने यांनी केला आहे.
Byte:-ॲड. सुदाम गावाने (आरोपी गोकुळ झा वकील )
13
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 26, 2025 11:06:17Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2607ZT_CHP_DARSHAN_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी चंद्रपूरच्या ऐतिहासिक महाकाली मंदिरात देवीचे घेतले दर्शन , इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीला जाताना देवीचे दर्शन घेऊन गेल्याची आहे आख्यायिका, नव्या पिढीतील छत्रपतींच्या वारसांपैकी मला इथे येता आलं याचे समाधान असल्याची दिली प्रतिक्रिया
अँकर:-- चंद्रपूरचे स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सध्या सेवा सप्ताह आयोजित केला आहे. या सप्ताहातील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले चंद्रपुरात आले आहेत. शिवेंद्रराजे भोसले यांनी चंद्रपूरच्या ऐतिहासिक महाकाली मंदिरात महाकाली देवीचे दर्शन घेतले. इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीला जाताना देवीचे दर्शन घेऊन गेल्याची आख्यायिका आहे. नव्या पिढीतील छत्रपतींच्या वारसांपैकी मला इथे येता आलं याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी याप्रसंगी दिली.
बाईट १) शिवेंद्रराजे भोसले , सा. बां. मंत्री
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
11
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 26, 2025 11:05:32Dhule, Maharashtra:
ANCHOR - कृषीमंत्री धुळे जिल्हा दौऱ्यावर असतांना युरियासाठी शेतकऱ्याच्या गळ्यात दोरखंड घालत आत्महतयेचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युरिया द्या अन्यथा गळफास लावतो असं सांगत एका शेतकऱ्याने कृषि केंद्रात फाशीचा घेम्याचा प्रयत्न केला. यां घटनामुळे खळबळ उडाळी आहे. शिरपूर तालुक्यात युरिया खताचा तुटवडा जाणवत असल्याने एका शेतकऱ्याने गळ्यात दोरखंड टाकून कृषी सेवा केंद्रात युरिया द्या अन्यथा गळफास घेतो अशी धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली.विशेष म्हणजे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे धुळे जिल्हा दौऱ्यादरम्यान असतांना शेतकऱ्यांकडून युरिया खतासाठी गळ्यात दोरखंड टाकावा लागल्याची दुर्दैवी बाब उघड झाली आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे धुळे आणि नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते शिरपूर येथून नंदुरबारकडे रवाना झाले होते.यादरम्यानच शिरपूर तालुक्यातील कुवे येथील शेतकरी रवींद्र धोंडू पाटील हे काही शेतकऱ्यांसोबत शिरपूर येथील कृषी सेवा केंद्रात युरिया खत मागण्यासाठी गेले होते. मात्र, युरिया उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर त्यांनी तेथेच गळ्यात दोरखंड टाकून युरिया द्या अन्यथा आत्महत्या करू अशी धमकी दिली.गळ्यात दोरखंड टाकून कृषी सेवा केंद्रात शेतकरीच्या गळफासच्या धमकीमुळे गदारोळ झाला. घटनास्थळी तालुका कृषी अधिकारी दाखल झाले.तर सोबत काही शेतकरी उपस्थित होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी कृषीसेवा केंद्रात धाव घेत रवींद्र पाटील यांना समजावले आणि शेतकरी संतापाला वाट न जाऊ देता शांततेत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, कृषी केंद्राचे संचालक व कृषी अधिकाऱ्यांनी युरिया उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर वातावरण निवळले.
प्रशांत परदेशी, धुळे.
14
Report