Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

नाना पटोले: उपराष्ट्रपतींचा राजीनामा म्हणजे बीजेपीचा संविधानिक अपमान!

PTPRAVIN TANDEKAR
Jul 22, 2025 10:36:59
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara Slug - 2207_BHA_NANA_BYTE FILE - 5 VIDEO नाना पटोले ऑन उपराष्ट्रपतींचा अवमान ANCHOR :- काल उपराष्ट्रपती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्या पदाची गरिमा सुद्धा बीजेपी ठेवू शकत नाही हे आपण सातत्याने पाहीलय. राष्ट्रपतींना बोलावलं गेलं नाही. ते प्रमुख असतात त्यांच्या आदेशाने हे सभागृह चालत पण त्याच्यातही त्यांच्या सहभाग नाही, आणि काल जे जेपी नड्डा भाजपचे मंत्री आहेत त्यांनी ज्या पद्धतीने उपराष्ट्रपती यांचा अवमान केला त्याच्यामुळे दुखी आणि कष्टी मनाने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बीजेपी हे संविधानिक व्यवस्थेला मानत नाही हे आता उघड झाले आहे........ बाईट :- नाना पटोले (१:०८) ................... नाना पटोले ऑन जन सरक्षा कायदा ANCHOR :- हे बिल सरकारच्या बहुमताच्या आधारावर मंजूर झाले असले तरी या बिलाला आजही आमचा विरोध आहे. परवा मी राज्यपाल महोदयांना भेटलो आणि सांगितलं की हे बिल आपण वापस पाठवा आणि पुन्हा याच्यावरती चर्चा झाली पाहिजे जवळपास 14 हजार लोकांनी याच्यावर ऑब्जेक्शन नोंदवला आहे. मग राज्यातील इतक्या लोकांनी याच्यावर ऑब्जेक्शन नोंदवल्यानंतर या बिलाची गरज नव्हती....... जन सुरक्षा कायदा हा जनतेच्या सुरक्षेसाठी नाही तर स्वतः सरकारच्या सुरक्षेसाठी आहे असं आमच मत आहे. आपल्या राज्यात केंद्राचे असो किंवा राज्याचे कायदे असो त्याला नक्षल मुव्हमेंटच्या विरोधात तयार केलेले कायदेच सक्षम आहेत पण हा जनसुरक्षा कायदा सरकारने जनतेच्या संरक्षणासाठी नाही तर स्वतःच्या आणि मूठभर उद्योगपती जे सरकारचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आणला आहे. बाईट - नाना पटोले (१:३१) .... .... .... नाना पटोले ऑन सुप्रीम कोर्ट स्टेटमेंट ऑन ईडी ANCHOR :- सुप्रीम कोर्टाने सुद्धा तीच भूमिका मांडली आहे त्याच्यामुळे आमचे नेते राहुल गांधी यांनी सातत्याने ईडीला घाबरले नाही. देशाच्या एकात्मतेसाठी, संविधानासाठी, कल्याणासाठी गांधी परिवारचे आजही लढाई चाललेली आहे. सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने फटकारले त्यावरून हि वस्तुस्थिती आता जनतेच्या समोर आली आहे........... ((सुप्रीम कोर्टाने ईडीला फटकारले त्यावर नाना पटोले बोलत होते)) बाईट :- नाना पटोले (०:३४) .................... *हे सरकार गँग ऑफ वासेपूर आहे* ANCHOR :- हा जो त्यांच्या सरकार मधला गॅंगवार सुरू आहे तो सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे येथे आता चार-पाच नाव नाही तर सर्वांचाच हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे एकाच नाव घेण्यापेक्षा हे सरकारच जबाबदार आहे सर्व व्यवस्थेला आणि हे सरकार सर्व लोकांना समर्थन करत आहे त्यामुळे सरकार जबाबदार आहे. ही पूर्ण जणू वासेपुरची गॅंग आहे आणि महाराष्ट्राला लुटायसाठी हे एकत्रित आले आहेत त्यांना या जनतेशी घेणेदेणे नाही. मुंबईच्या रेल्वे मध्ये जो पासपोर्ट झाला होता तो फक्त मुंबईवर नव्हता या देशावर हल्ला होता. असे असताना गेले 19 वर्षे त्याला जेलमध्ये ठेवलं आणि काल कोर्टाने सांगितलं की याच्या विरोधात पुरावे नाहीत. सरकारकडून बाजूच मांडली गेली नाही. त्यामुळे या सगळ्या स्फोट प्रकरणी सगळे आरोपी निर्दोष सुटावे ही गंभीर बाब आहे. केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार असताना अशा या देशावर हल्ले करणाऱ्या आतंकवाद्यांना समर्थन करत करतायेत का? अशी भावना जनतेच्या मनात तयार झाली आहे. बाईट - नाना पटोले ऑन महायुती सरकार(२:३०) .................... *नाना पटोले ऑन कृषिमंत्री कोकाटे* ANCHOR :- यांना जनाची आणि मनाची लाज नाही, मंत्र्यांनी मान्य केले पाहिजे तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. विधान परिषदेमध्ये रमी गेम खेळताना ते दिसत आहेत. सगळ्यांना तो कुठलाही एडिट केलेला व्हिडिओ नाही. या लोकांना शेतकऱ्याची काळजीच नाही. फक्त कृषिमंत्रीच नाही तर फडणवीस सरकारनेच राजीनामा देण्याची वेळ आली आहे कारण की ते शेतकरी विरोधी आहेत. शेवटच्या दिवशी एक कमिटी तयार करण्याचे निवेदन करतात. मोठ्या उद्योगपतींचे कर्जमाफ करतात तेव्हा कुठली कमिटी तयार बसवता तुम्ही?? जो शेतकरी पोशिंदा आहे आमच्या सर्वांचा बाप आहे त्याच्यासाठी हे लोक खोटे बोलतात आहेत. आणि म्हणून अशा नालायक सरकारला आता लोकांनीच एकजुटीने येऊन या सरकारला खुर्ची खाली ओढलं पाहिजे हे जनतेला आव्हान करतो. बाईट - नाना पटोले (१:३०)
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
APAMOL PEDNEKAR
Jul 22, 2025 17:32:40
Mumbai, Maharashtra:
Anchor : घाटकोपर च्या जागृती नगर मेट्रो स्थानकाच्या बाजूला अनेक वर्षे जुना असलेल्या स्तंभ आणि झेंडा पालिकेने निष्कासन करण्याचे नोटीस दिल्यावर इथे वातावरण तापले आहे. या विभागातील नागरिक, वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते आणि शिवसेना शिंदे गटाच्या वतीने या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले.या वेळी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.या अगोदर देखील राजकीय आणि विकासक यांच्या दबावमुळे मुंबई मनपाने हा स्तंभ हटविण्याची प्रयन्त केला होता.मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे त्यांनी हा निर्णय मागे घेतला होता.मात्र आता पुन्हा रस्ता रुंदीकरण मध्ये हा स्तंभ येत असल्याचे सांगत पालिकेने हा स्तंभ निष्कासन करायला सांगितले आहे.मात्र हे फक्त राजकीय दबावामुळे आणि जातीय तेढ निर्माण करण्यासाठी केले जात असून याला आमचा विरोध असेल, पालिकेने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी या वेळी सर्व पक्षीय नेतेमंडळी आणि स्थानिकांकडून करण्यात आली. Byte : चेतन अहिरे(वंचित बहुजन आघाडी , नेते) Byte : दीपक हांडे(शिवसेना स्थानिक माजी नगरसेवक) Byte : स्थानिक नागरिक
1
Report
GMGANESH MOHALE
Jul 22, 2025 17:01:14
Washim, Maharashtra:
वाशिम: File:2207ZT_WSM_OLD_BUILDING_COLLAPSED रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर: वाशिमच्या मंगरूळपीर शहरातील दर्गा चौक भागात असलेल्या जुन्या गल्लीत एक निर्मनुष्य असलेली मोडकळीस आलेली धोकादायक इमारत रात्री पासून सुरू असलेल्या पावसामुळे कोसळल्याची घटना घडली आहे.सुरजमल रामकिसन चांडक यांच्या मालकीची असलेली इमारत पत्त्याच्या इमारती प्रमाणे जमीनदोस्त झाली.सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ही दोन मजली इमारत कोसळली असून,सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी इमारतीच्या खाली एक ऑटोरिक्षा उभा होता. त्या ऑटोवर इमारतीचा मलबा पडल्याने ऑटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे.
4
Report
NMNITESH MAHAJAN
Jul 22, 2025 16:01:37
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2207ZT_JALNA_CHILD_MURDER(7 FILES) जालना : ब्रेकिंग सात वर्षाच्या विद्यार्थ्याचा खून,गणपती विद्यालयातील आदिवासी निवासी वस्तीगृहातील घटना भोकरदन येथील घटना दोरीने गळा आवळून खून केल्याचं निष्पन्न रूममधील एका  8 वर्षाच्या विद्यार्थ्यासह 14 वर्षाच्या दुसऱ्या विद्यार्थ्याकडून खुनाची कबुली किरकोळ भांडणातून खून केल्याची माहिती दोन विधीसंघर्ष बालक पोलिसांच्या ताब्यात अँकर | जालन्यातील भोकरदनमध्ये गणपती विद्यालयाच्या आदिवासी निवासी वस्तीगृहात राहणाऱ्या साडेसात वर्षाच्या विद्यार्थ्याचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आलाय.काल रात्री ही घटना घडली असून आज या मयत विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आल्यानं ही घटना समोर आली आहे.सात वर्षीय बालविर पवार असं खून करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे.या प्रकरणी पोलिसांनी याच निवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतलं असून त्यांनी खुनाची कबुली दिलीय.या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक चौकशी सुरु आहे.वस्तीगृहातील विद्यार्थ्याच्या भांडणातून हा खून झाल्याचं पोलीस तपासात समोर आल्यानं खळबळ उडालीय.दरम्यान या घटनेनंतर पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली बाईट : अजयकुमार बन्सल,पोलीस अधीक्षक,जालना
4
Report
GMGANESH MOHALE
Jul 22, 2025 15:01:35
Washim, Maharashtra:
वाशिम: File:2207ZT_WSM_ROHIT_PAVAR_FARMER_POST रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर: आज सकाळी झालेल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील अडाण नदीला मोठा पूर आला होता यामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील कंझारा आणि इतर गावातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, दरम्यान आमदार रोहित पवार यांनी कंझारा येथील निलेश देशमुख हा शेतकरी हळद आणि सोयाबीनचं पिकं वाहून गेल्यानं शेतात थायमोकळून रडत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय आणि या शेतकऱ्याच्या व्यथा सरकार पर्यंत पोहचणार का? असा प्रश्न उपस्थित केलाय. तर पिकं विमा योजनेत बदल केल्याच्या निर्णयवारही टीका केलीये. नेमकं काय लिहलंय रोहित पवार यांनी. वाढत्या नैसर्गिक आपत्तीमुळं शेती व्यवसायच जुगार बनलाय, कधी काय होईल याचा इथं कसलाही भरवसा नाही. आज सकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं उध्वस्त झालेलं हळद आणि सोयाबीनचं हे शेत! या शेतकऱ्याची व्यथा सरकारपर्यंत पोहचणार का ? पिकविम्याचे ट्रिगर काढल्याने या शेतकऱ्याला पिक विम्याची भरपाई मिळणार नाही, मग या शेतकऱ्याने करायचं तरी काय? पिकविमा योजनेचे ट्रिगर काढून शेतकऱ्याला मृत्यूच्या सरणावर सोडू नका, शेतकरी खाक होईल. आज दोन मोठ्या नेत्यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त तरी शेतकऱ्यांची व्यथा समजून तत्काळ आधीची पिकविमा लागू करा, ही विनंती! बाईट:निलेश देशमुख, शेतकरी
5
Report
KJKunal Jamdade
Jul 22, 2025 15:00:49
Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे बाईट पॉइंटर सर्वात प्रथम फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.. मी विरोधी पक्षात असतानाच फडणवीस यांचे नेतृत्व होऊन ओळखले होते.. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिल्यात.. यावरून त्यांनी फडणवीस यांचे नेतृत्व मान्य केलंय असं दिसतं.. आणि महाराष्ट्राला देखील या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही हे त्यांच्या लक्षात आलं आहे.. आगामी काळात युती आघाड्याचे निर्णय पक्ष नेतृत्व घेईल.. मात्र सगळ्या निवडणुकीत भाजप व महायुती यांचा झेंडा लागेल.. उद्धवजींच्या मनात नेमकं काय मला माहित नाही.. इतक्या कमी वायात त्यांची दूरदृष्टी खूप मोठी.. महाराष्ट्राला फडणवीस यांची गरज.. ऑन काँग्रेस महाविकास आघाडीत एकमेकांमध्ये गैरविश्वास निर्माण झालाय.. तो त्यांनीच दूर केला पाहिजे.. दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रियांचा संदर्भ मला माहित नाही.. मात्र फडणवीस यांच्या नेतृत्व शिवाय पर्याय नाही हे दोन्ही नेत्यांच्या लक्षात आलं असावं..
0
Report
NMNITESH MAHAJAN
Jul 22, 2025 13:40:42
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2207ZT_JALNA_PATIENT(2 FILES) जालना : पुराच्या पाण्यातून आईला पाठीवर उचलून नेण्याची वेळ,पुराच्या पाण्यातून धोकादायक प्रवास,परतूर तालुक्यातील सावरगाव बुद्रुक येथील प्रकार अँकर : जालन्यातील परतूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, नाल्यांना पूर आलाय.तालुक्यातील सावरगाव बुद्रुक येथील नदीला देखील पूर आलाय.त्यामुळे वृद्ध आईला पाठीवर उचलून पुराच्या पाण्यातून दवाखान्यात नेण्याची वेळ ग्रामस्थावर आलीय.या भागात पाऊस मोठ्या प्रमाणात झालाय.त्यामुळे ग्रामस्थांचं जनजीवन विस्कळीत झालाय.अनेक गावांचा संपर्क तुटलाय.परिणामी रुग्ण सेवेवर देखील परीणाम झाला असुन रुग्णांना दवाखान्यात उपचारासाठी नेताना जीवाशी खेळ खेळावा लागत आहे
12
Report
LBLAILESH BARGAJE
Jul 22, 2025 13:39:27
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- रोहित पवार फीड 2C रोहित पवार ऑन कोकाटे Anc:- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा अधिवेशन सुरू असताना विधिमंडळातील ऑनलाइन पत्ते खेळताना चा व्हिडिओ ट्विट केल्याने मोठी खळबळ उडाली यावर कृषिमंत्री कोकाटे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपल्या विरोधात सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये बदनामी केल्याचा आरोप करत खटला दाखल करणार असल्याचे म्हटला आहे यावर रोहित पवार यांनी देखील आपण वेळीच घाबरलो नाही तर अशा खटल्यांना काय घाबरणार आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे कोकाटे यांना त्यांच्या नेत्यांनी कृषिमंत्री हे जबाबदारीचे पद दिलेलं आहे आणि तुम्ही जर विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांवर चर्चा सुरू असताना पत्ते खेळत असाल तर तुम्ही जी कारवाई कराल त्या कारवाईला आम्ही घाबरत नाही असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP रोहित पवार ऑन कोकाटे सरकार भिकारी Anc:- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारला भिकारी म्हटलं आहे याचा आमदार रोहित पवार यांनी समाचार घेतला आहे आधी तुम्ही शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात नंतर तुम्ही सरकारला भिकारी म्हणता तुम्ही महाराष्ट्राच्या महान सरकारला भिकारी म्हणतात याचा आम्ही निषेध करतो आम्ही सरकारकडे पैसे नाहीत असं म्हणतो तरीही ही आतली गोष्ट तुम्हाला माहिती आहे का याचे उत्तर अर्थमंत्री अजित पवार यांनी द्यावं आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी द्यावं असं म्हटलं आहे बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP रोहित पवार ऑन अजित दादा व देवेंद्र फडणवीस वाढदिवस Anc:- आज राज्यातल्या दोन मोठ्या नेत्यांचे अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवस आहेत या दोघांनाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आजच विदर्भात एक शेतकऱ्याचा चिखला त बसलेला व्हिडिओ समोर आला आहे त्यामुळे आजच्या दिवशी या दोघांनीही शेतकऱ्यांसाठी काही तरी जाहित करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
12
Report
MAMILIND ANDE
Jul 22, 2025 13:38:32
Wardha, Maharashtra:
वर्धा SLUG- 2207_WARDHA_MAHAJAN - गिरीश महाजन बाईट *गिरीश महाजन ऑन एकनाथ खडसे झाली ना त्याच्यावर कारवाई एवढ्या कारवाया झाल्या वेगवेगळ्या ठिकाणचा महिला आहेत पुण्यामध्ये असतील मुंबईत असतील कुठे काय असतील नाशिकला असतील महिलांची कंप्लेंट असेल तर गुन्हे दाखल होतील ना खडसेंवर आता मी बोलणार नाही त्यांचं मानसिक संतुलन खरंच बिघडलेलं आहे मी त्यांची मुलाखत बघत होतो खरंच विचारांची आता मला की यायला लागली त्यांचा राग येत नाही मला त्याच्या नावावर एवढ्या प्रॉपर्टी सगळे तपासून पहा माझा काही म्हणणं नाही तुमचा जावई तीन वर्ष जेलमध्ये राहून आला ना तुम्हाला काहीच वाटत नाही 136 कोटीची रॉयल्टी चोरल्याचा गुन्हा आहे भोसरी प्रकरणातला एमआयडीसी खाली तुम्ही टाके टाकतात आणि दिल्लीला जाऊन आडवे पडून पाया पडतात आणि त्यांच्याकडून काही स्टे करून घेता माफ करा माफ करा माफ करा हा धंदा त्यांचा चाललेला आता खरंच मला त्यांची किंवा लागले लाईन सोडून बडबड करतात गेल्या पाच वर्षापासून बटन दाबले की असं बटन दाबले की दिल्लीहून जाईल तुझं बटन हरवला आमचा बटन आमचा मोबाईल कुठे गायब झाला मला अजून त्यांच्याकडून हाल बघितले जात नाही त्यांच्यावर मी जास्त बोलणार नाही *गिरीश महाजन ऑन लोढा* यांना लोक मतदान करायला तयार नाही एवढ्या मोठ्या बहुसंख्य लोकांनी फडणवीस यांच्या काळात आम्ही फार वेगाने पुढे जातो आहे आणि या सरकारला बदनाम कसं करायचं यांच्याकडे हाच एक विषय कुठे काय विचार करतोय हाईट वर्तन करतो त्याचा आरोप सरकारवर फोडायचा तुमच्याकडे तुम्ही आनंदासमोर बडबड काय करताय फालतू कशासाठी तुम्ही असं करा उलट सगळ्यांना बदनाम करायचं संभ्रम निर्माण करायचं सोमवार ठेवलं पाहिजे विधानसभेमध्ये यायचं तिथे काहीतरी दाखवायचे हे क्लिप माझ्याकडे या पेन ड्राईव्ह माझ्याकडे द्या ना अध्यक्षांकडे बघू द्या उद्या सक्षमक्ष सरकार याचा घोडा चार आमदारांचा पाच खासदारांचे होतो नुसत्या बॉयफ्रेंड गोष्टी करू नये लोक पण आता कंटाळले आहे चांगल्या चार गोष्टी करा राज्याचा हिताचा महत्वाचा गोष्टी करायला लोक हिताच्या गोष्टी करा ते दिलं सोडून आणि सकाळपासून बघ बघ करायची अश्लील बोलायचं बाईट- गिरीश महाजन,मंत्री
14
Report
AAASHISH AMBADE
Jul 22, 2025 13:35:08
Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 2207ZT_GAD_TREE_CM ( single file sent on 2C)  टायटल:-- गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यभरातील 11 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा प्रारंभ, गडचिरोलीच्या कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्र्यांनी लावले रोपटे, राज्यात यंदा 11 कोटी पुढील वर्षी 25 कोटी त्यानंतर अधिक असा क्रम राहणार असल्याचा केला निर्धार ,सर्वच लावलेल्या वृक्षांचे जिओ टॅगिंग आणि ट्रॅकिंग आवश्यक असल्याचे व्यक्त केले मत अँकर:-- गडचिरोलीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवशी राज्याच्या 11 कोटी वृक्ष लागवड उपक्रमाचा प्रारंभ झाला. गडचिरोलीच्या कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात मुख्यमंत्र्यांनी रोपटे लावत उपक्रमाचा प्रारंभ केला. राज्यात यंदा अकरा कोटी, पुढील वर्षी 25 कोटी व त्यानंतर अधिक असा वाढीचा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे ते म्हणाले. औद्योगिक गडचिरोलीसह पर्यावरण पूरक गडचिरोली साकार करूया असे आवाहन त्यांनी केले. गडचिरोलीतील जल - जमीन आणि जंगल संतुलन राखण्याचे काम आपण करू असे सांगत यासाठी आवश्यक रोपवाटिका तयार करण्याचे काम हाती घ्यावे असेही ते म्हणाले. गडचिरोलीला देशातील सर्वात हरीत जिल्हा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. लावलेल्या रोपट्यांचे जिओ टॅगिंग आणि ट्रॅकिंग आवश्यक असून हरित अच्छादन वाढले पाहिजे असेही फडणवीस म्हणाले. बाईट १) देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
21
Report
NMNITESH MAHAJAN
Jul 22, 2025 13:08:28
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2207ZT_JALNA_RIVER (12 FILES) जालना : ब्रेकिंग | मंठा शहराचा लिंबेवडगावशी असलेला संपर्क तुटला पाटोदा साठवण प्रकल्पाच्या बँकवॉटरमुळे ग्रामस्थांना प्रवास करता येईना आबाल वृद्धांचा बँक वॉटरच्या पाण्यातून पोहत जाऊन जीवघेणा प्रवास पोहत असताना झाडाची फांदी पकडल्यानं वृद्ध वाहून जाताना थोडक्यात बचावला, अँकर : जालन्यातील मंठा, परतूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालाय. या पावसामुळे मंठा तालुक्यातील पाटोदा साठवण तलावातील पाणी साठ्यात वाढ होऊन लिंबेवडगाव ते मंठा शहराचा संपर्क तुटला आहे.लिंबेवडगाव येथील दलित वस्तीतील नागरीकांना मंठा शहरात जाता येत नाहीय.त्यामुळे पाटोदा साठवण तलावाच्या बँक वॉटर मधून पोहत जाऊन महिला आणि आबाल वृद्धांना रस्ता पार करावा लागतोय.जिल्हा प्रशासनाने तातडीनं लिंबेवडगाव येथील ग्रामस्थांच्या रस्त्याचा प्रश्न सोडवावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा ईशारा वंचित बहुजन आघाडीसह ग्रामस्थांनी दिलाय. बाईट : दीपक डोके,स्थानिक  नेते,वंचित बहुजन आघाडी
16
Report
AAASHISH AMBADE
Jul 22, 2025 13:02:42
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2207ZT_CHP_RAIN_SPELL ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपुरात दडी मारलेला पाऊस परतला, शहर- जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी ,बेपत्ता झालेल्या पावसाने चिंताग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, धरणे- सिंचन प्रकल्प अद्याप निम्मेही भरले नसताना पावसाने दिला होता सुमारे दहा दिवसांचा खंड     अँकर:-- चंद्रपुरात दडी मारलेला पाऊस परतलाय. आज दुपारपासून शहर -जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या. बेपत्ता झालेल्या पावसाने चिंताग्रस्त शेतकऱ्यांना या जलधारांनी दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील धरणे आणि सिंचन प्रकल्प निम्मेही भरले नसताना पावसाने सुमारे दहा दिवसांचा खंड दिला होता. धान आणि सोयाबीन पेरणी करून शेतकरी उत्तम पावसाची वाट बघत असताना प्रत्यक्ष ऊन पडत होते. त्यामुळे पिके कोमेजून चालली होती. आजच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
13
Report
UPUmesh Parab
Jul 22, 2025 13:02:19
Oros, Maharashtra:
अँकर --- महाराष्ट्र राज्यातील पहिले असलेल्या नापणे धबधब्या वरील काचेच्या पुलाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला. वैभववाडी येथील नापणे धबधब्यावर सिंधुरत्न योजनेतून हा पूल बांधण्यात आला असून या पुलामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक पर्यटन स्थळ निर्माण झाले असल्याचा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलाय. या पुलाचे नयनरम्य दृश्य ड्रोनच्या माध्यमातून चित्रित केलंय विराज ढवण यांनी byte --- नितेश राणे, पालकमंत्री सिंधुदुर्ग ड्रोन सौजण्य --- विराज ढवण
7
Report
SMSATISH MOHITE
Jul 22, 2025 13:00:52
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_Cemetery Feed on - 2C ----------------------- Anchor - अंत्यसंस्कारासाठी गावात जागा नसल्याने दुसऱ्या गावात मृतदेह नेणाऱ्या ग्रामस्थाना तिथल्या गावक-र्यांनी जोरदार विरोध केला. दोन्ही गावातील शेकडो ग्रामस्थ आमनेसामने आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील मनुर आणि संगम या दोन गावात हा वाद झाला. मनुर गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने जवळच असलेल्या संगम या गावात स्मशानभूमीसाठी महसूल विभागाने जागा निश्चित केली. परंतु ही जागा स्मशानाभूमीसाठी देण्यास संगम गावाचा विरोध आहे. आज मनुर येथील एका व्यक्तीचे निधन झाले. अंत्यविधी करण्यासाठी मनुरचे गावकरी संगमच्या गायरान जमीन इकडे जात असताना संगम गावच्या गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला. यावेळी दोन्ही गावचे गावकरी आपापसात भिडले. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मागवण्यात आला. पोलीस बंदोबस्तात संगमच्या गायरान जमिनीवर अंत्यविधी पार पडला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण परिस्थिती आहे. Byte - मनूर येथिल ग्रामस्थ Byte - मनूर येथिल ग्रामस्थ --------------
10
Report
AAASHISH AMBADE
Jul 22, 2025 13:00:37
Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 1) 2207ZT_GAD_JOB_ORDER 2) Gad CM naxal rojgar  टायटल:-- गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नक्षल पीडितांना थेट नोकरी नियुक्ती पत्रे      अँकर:-- गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नक्षल पीडिताना थेट नोकरी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या गडचिरोली दौऱ्यात त्यांनी एका कार्यक्रमात ही नियुक्तीपत्रे दिली. गेल्या काही वर्षात नक्षलवाद्यांनी मारलेल्या कुटुंबातील सदस्यांना थेट पोलीस शिपाई  नोकरी देण्यात आली आहे . एकूण 23 जणांना थेट नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोघांना अशी नियुक्तीपत्रे दिली गेली. बाईट १) देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री ( bite sent via ngp liv u naming Gad CM naxal rojgar) आशीष अम्बाडे झी मीडिया  गडचिरोली
12
Report
GDGAJANAN DESHMUKH
Jul 22, 2025 13:00:27
Hingoli, Maharashtra:
अँकर- परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघातील अनेक महसूल मंडळात धगफूटीसदृश्य पाऊस झालाय, काही ठिकाणी घरात ही पाणी शिरले आहे,तर अनेक शेतात पावसाचे पाणी साचुन पीक पाण्याखाली गेली आहेत. या गावांना राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी सोनपेठ व पाथरी तालुक्यातील अनेक गावांना भेट देऊन अतिवृष्टी ग्रस्त शेतीची पाहणी केली. सोनपेठ आणि पाथरी तालुक्यातील 5 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. पाहणी नंतर जिल्हाधिकारी गावडे यांना फोन करून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. पाथरी तालुक्यातील हदगावच्या इंदिरानगरात घरात पाणी शिरून नागरिकांच्या संसार उपोयोगी साहित्याचे मोठे नुकसान झालंय.
13
Report
Advertisement
Back to top