Back
वाशिममध्ये जुन्या इमारतीचा भयानक कोसळा, ऑटोरिक्षावर पडले मलबा!
GMGANESH MOHALE
FollowJul 22, 2025 17:01:14
Washim, Maharashtra
वाशिम:
File:2207ZT_WSM_OLD_BUILDING_COLLAPSED
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिमच्या मंगरूळपीर शहरातील दर्गा चौक भागात असलेल्या जुन्या गल्लीत एक निर्मनुष्य असलेली मोडकळीस आलेली धोकादायक इमारत रात्री पासून सुरू असलेल्या पावसामुळे कोसळल्याची घटना घडली आहे.सुरजमल रामकिसन चांडक यांच्या मालकीची असलेली इमारत पत्त्याच्या इमारती प्रमाणे जमीनदोस्त झाली.सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ही दोन मजली इमारत कोसळली असून,सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी इमारतीच्या खाली एक ऑटोरिक्षा उभा होता. त्या ऑटोवर इमारतीचा मलबा पडल्याने ऑटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowJul 23, 2025 01:32:34Navi Mumbai, Maharashtra:
story slug - जितेंद्र आव्हाड याचे न्यायमूर्ती भूषण गवई यांना आव्हान
न्यायमुर्ती भूषण गवई को आवाहन
ftp slug - nm jitendra aavhad
byet- jitendr avhad
shots-
reporter - swati naik
navi mumbai
anchor - तुम्हाला माहिती आहे मुसलमानाचे कार्यक्रमला हिंदुनी जायचं नाही आणि हिंदूंच्या कार्यक्रमाला मुसलमानांनी जायचं नाही.
असे होऊ देऊ नका म्हणजे नशिबा आमचा नाहीतर पूर्ण महाराष्ट्रात आग लागलेय आणि ती पेटविण्याचा प्रयत्न होतोय. हे लोकांच्या मनात नाही आहे पण ज्या राजकीय शक्ती काम करत आहेत त्यांच्या शंभर टक्के म्हणत आहे कारण मतं मिळवायची असेल तर विकासाचा बोलायला नको मत मिळवायचे असेल तर फक्त जाती धर्मावर मत मिळवा हे आजकालच राजकीय गणित आहे आणि या विरोधात मी 40 वर्ष लढतोय.
sound byet- जितेंद्र आव्हाड
महाराष्ट्राला जाने बदनाम केलं त्याची मिरवणूक निघते विधिमंडळात जाऊन लोकशाहीच्या पवित्र मंदिरात मारहाण करायचे आणि त्याचा सत्कार आणि मिरवणूक निघते मात्र समुद्रात बुडणाऱ्या अनेकांचे प्राण ज्याने वाचवले त्याची मिरवणूक निघत नाही. किती जण याला ओळखतात अशांना ओळखच मिळत नाही ओळख कोणाला मिळते जो विधानसभेत मारहाण करून येतो आणि त्याचं कौतुक करायला एक टोळक जमा होतं. ज्या प्रवृत्तींना समाजाने वाळीत टाकलं पाहिजे ज्या प्रवृत्ती महाराष्ट्राच्या संत परंपरेला लोकशाही परंपरेला बदनाम करतायेत त्यांचं कौतुक या महाराष्ट्र मध्ये होतंय.
sound byet- जितेंद्र आव्हाड
vo3 - काल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवइ एका सुनावणी दरम्यान म्हणाले मला जास्त बोलायला लावू नका मला बऱ्याच गोष्टी माहित आहेत राजकीय कारणासाठी ईडीचा कसा वापर केला आहे हे देखील मला माहिती आहे राजकारणात निवडणुका लढवून जिंकायच्या असतात ईडी चा वापर करून नाही हे जेव्हा भूषण गवई बोलतात तेव्हा महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती काय आहे हे आपण काय वेगळं सांगणार. मी भूषण गवई यांना आव्हान करतोय की तुम्हाला जर महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल एवढं माहिती आहे महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराबद्दल एवढं माहिती आहे तर मग महाराष्ट्राच्या सत्तांतराचा खटला तुमच्याच सर्वोच्च न्यायालयात चालू दे . महाराष्ट्रातील सत्तांतर लोकांना घाबरून केलं गेलंय हा जो तुमचा निर्देश आहे हा निर्णयात रूपांतर झालं पाहिजे हे मी महाराष्ट्राच्या वतीने मागणी करतो.
बाईट - जितेंद्र आव्हाड - आमदार
13
Report
SNSWATI NAIK
FollowJul 23, 2025 01:31:53Navi Mumbai, Maharashtra:
story slug - जितेंद्र आव्हाड ऑन माणिकराव कोकाटे
जितेंद्र आव्हाड ऑन कोकाटे
FTP slug - nm jitendra aavhad
shots-
reporter - swati naik
navi mumbai
*माणिकराव कोकाटे राजीनामा*
माणिकराव खोट बोलतच नाही, ते बोले शेतकरी भिकारी आहेत, शेतकऱ्यांना भीक लागलेय. शेतकरी कर्ज घेतात आणि लग्न करतात. माणिकराव हुशार माणूस आहेत.
कोण म्हणालं ते रम्मी खेळत होते, ते बुद्धिबळ खेळत होते.
*शरद पवार फडणवीस कौतुक*
वाढदिवसानिमित्त मी पण कौतुक केलंय, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मला कौतुक आहे की संवाद जो संपत चाललाय तो फडणवीस जिवंत करायला बघतायत फक्त त्यांच्या आजूबाजूचे जिवंत ठेवतील की नाही याची शाश्वती देता येत नाही.
6
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 23, 2025 01:31:46Yeola, Maharashtra:
अँकर:-नाशिकच्या येवला शहरातील मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना शनी पटांगण परिसरात एक चोरटा मोटरसायकलची चोरी करत असताना काही जागरूक नागरिकांनी या चोरट्याला रंगेहात पकडले असून नागरिकांनी या चोरट्याला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केला आहे .ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पोलिसांनी मोटरसायकल चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
1
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 23, 2025 01:30:45Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - पडळकरांनी दिलेल्या शिव्या तर पारा वरच्या ,खऱ्या शिव्या अजून आमच्या खिशात,त्या दिल्यातर तोंड दाखवायला जागा राहणार - आमदार सदाभाऊ खोत.
अँकर - गोपीचंद पडळकरांनी दिलेल्या शिव्या तर पारा वरच्या आहेत,त्या तुम्ही पहिल्यांदा ऐकल्या आहेत,पण खऱ्या शिव्या अजून आमच्या खिशात आहेत,त्या बाहेर काढला की तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही,अश्या शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी विरोधकांना सुनावला आहे.तसेच पडळकरांनी मुंबईत जाऊन दाखवलं,यहां हमारा चलता है,तुम्हारा नही,त्यामुळे आडवे आले आडवं,आव्हाड नाही, अशी मिश्किल टीका देखील आमदार सदाभाऊ खोत यांनी जितेंद्र आव्हाडांच्यावर अप्रत्यक्ष केली,तसेच 50 वर्ष सत्तेचा माज तुम्हाला आला होता,तो माज खानापूर-आटपाडीचा एक तरुण उतरवत होता,हा इतिहास लिहला जाणार आहे,असं देखील आमदार खोत म्हणाले,ते सांगलीच्या आळसंद येथे आयोजित भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत होते,यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार गोपीचंद पडळकर उपस्थिती होते.
साउंड बाईट - सदाभाऊ खोत - आमदार.
1
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 23, 2025 01:30:20Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - सहा मंत्र्यांची विकेट पडण्याचे स्वप्न आताच्या कलियुगातील संजय राऊतांना पडलयं,पण तुम्ही कितीही देव पाण्यात घाला,तुमच्या तोंडाला यश येणार नाही - सदाभाऊ खोत..
अँकर - सहा मंत्र्यांची विकेट पडणार,असे स्वप्न आताच्या कलियुगातील संजयला पडलय,पण देवेंद्र फडणवीसां नेतृत्वाखालील सरकार भक्कम असून तुम्ही कितीही देव पाण्यात घातले तरी तुमच्या तोंडाला यश येणार नाही,अशा शब्दात सदाभाऊ खोतांनी संजय राउतांवर टीका केली आहे,तसेच
जयकुमार गोरे ,गोपीचंद पडळकर आणि आपण आधीच फाटके आहे,पण आम्ही तुमचे फाडायला लागलो,की तुम्हाला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही,असा इशारा ही आमदार सदाभाऊ खोत यांनी विरोधकांना दिला आहे,ते सांगलीच्या आळसंद येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये मध्ये पार पडलेल्या भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
साउंड बाईट - सदाभाऊ खोत - आमदार .
4
Report
APAMOL PEDNEKAR
FollowJul 22, 2025 17:32:40Mumbai, Maharashtra:
Anchor : घाटकोपर च्या जागृती नगर मेट्रो स्थानकाच्या बाजूला अनेक वर्षे जुना असलेल्या स्तंभ आणि झेंडा पालिकेने निष्कासन करण्याचे नोटीस दिल्यावर इथे वातावरण तापले आहे. या विभागातील नागरिक, वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते आणि शिवसेना शिंदे गटाच्या वतीने या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले.या वेळी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.या अगोदर देखील राजकीय आणि विकासक यांच्या दबावमुळे मुंबई मनपाने हा स्तंभ हटविण्याची प्रयन्त केला होता.मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे त्यांनी हा निर्णय मागे घेतला होता.मात्र आता पुन्हा रस्ता रुंदीकरण मध्ये हा स्तंभ येत असल्याचे सांगत पालिकेने हा स्तंभ निष्कासन करायला सांगितले आहे.मात्र हे फक्त राजकीय दबावामुळे आणि जातीय तेढ निर्माण करण्यासाठी केले जात असून याला आमचा विरोध असेल, पालिकेने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी या वेळी सर्व पक्षीय नेतेमंडळी आणि स्थानिकांकडून करण्यात आली.
Byte : चेतन अहिरे(वंचित बहुजन आघाडी , नेते)
Byte : दीपक हांडे(शिवसेना स्थानिक माजी नगरसेवक)
Byte : स्थानिक नागरिक
14
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 22, 2025 16:01:37Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2207ZT_JALNA_CHILD_MURDER(7 FILES)
जालना : ब्रेकिंग
सात वर्षाच्या विद्यार्थ्याचा खून,गणपती विद्यालयातील आदिवासी निवासी वस्तीगृहातील घटना
भोकरदन येथील घटना
दोरीने गळा आवळून खून केल्याचं निष्पन्न
रूममधील एका 8 वर्षाच्या विद्यार्थ्यासह 14 वर्षाच्या दुसऱ्या विद्यार्थ्याकडून खुनाची कबुली
किरकोळ भांडणातून खून केल्याची माहिती
दोन विधीसंघर्ष बालक पोलिसांच्या ताब्यात
अँकर | जालन्यातील भोकरदनमध्ये गणपती विद्यालयाच्या आदिवासी निवासी वस्तीगृहात राहणाऱ्या साडेसात वर्षाच्या विद्यार्थ्याचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आलाय.काल रात्री ही घटना घडली असून आज या मयत विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आल्यानं ही घटना समोर आली आहे.सात वर्षीय बालविर पवार असं खून करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे.या प्रकरणी पोलिसांनी याच निवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतलं असून त्यांनी खुनाची कबुली दिलीय.या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक चौकशी सुरु आहे.वस्तीगृहातील विद्यार्थ्याच्या भांडणातून हा खून झाल्याचं पोलीस तपासात समोर आल्यानं खळबळ उडालीय.दरम्यान या घटनेनंतर पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली
बाईट : अजयकुमार बन्सल,पोलीस अधीक्षक,जालना
13
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 22, 2025 15:01:35Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2207ZT_WSM_ROHIT_PAVAR_FARMER_POST
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: आज सकाळी झालेल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील अडाण नदीला मोठा पूर आला होता यामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील कंझारा आणि इतर गावातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, दरम्यान आमदार रोहित पवार यांनी कंझारा येथील निलेश देशमुख हा शेतकरी हळद आणि सोयाबीनचं पिकं वाहून गेल्यानं शेतात थायमोकळून रडत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय आणि या शेतकऱ्याच्या व्यथा सरकार पर्यंत पोहचणार का? असा प्रश्न उपस्थित केलाय. तर पिकं विमा योजनेत बदल केल्याच्या निर्णयवारही टीका केलीये.
नेमकं काय लिहलंय रोहित पवार यांनी.
वाढत्या नैसर्गिक आपत्तीमुळं शेती व्यवसायच जुगार बनलाय, कधी काय होईल याचा इथं कसलाही भरवसा नाही. आज सकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं उध्वस्त झालेलं हळद आणि सोयाबीनचं हे शेत!
या शेतकऱ्याची व्यथा सरकारपर्यंत पोहचणार का ?
पिकविम्याचे ट्रिगर काढल्याने या शेतकऱ्याला पिक विम्याची भरपाई मिळणार नाही, मग या शेतकऱ्याने करायचं तरी काय?
पिकविमा योजनेचे ट्रिगर काढून शेतकऱ्याला मृत्यूच्या सरणावर सोडू नका, शेतकरी खाक होईल. आज दोन मोठ्या नेत्यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त तरी शेतकऱ्यांची व्यथा समजून तत्काळ आधीची पिकविमा लागू करा, ही विनंती!
बाईट:निलेश देशमुख, शेतकरी
14
Report
KJKunal Jamdade
FollowJul 22, 2025 15:00:49Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे बाईट पॉइंटर
सर्वात प्रथम फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..
मी विरोधी पक्षात असतानाच फडणवीस यांचे नेतृत्व होऊन ओळखले होते..
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिल्यात..
यावरून त्यांनी फडणवीस यांचे नेतृत्व मान्य केलंय असं दिसतं.. आणि महाराष्ट्राला देखील या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही हे त्यांच्या लक्षात आलं आहे..
आगामी काळात युती आघाड्याचे निर्णय पक्ष नेतृत्व घेईल..
मात्र सगळ्या निवडणुकीत भाजप व महायुती यांचा झेंडा लागेल..
उद्धवजींच्या मनात नेमकं काय मला माहित नाही..
इतक्या कमी वायात त्यांची दूरदृष्टी खूप मोठी..
महाराष्ट्राला फडणवीस यांची गरज..
ऑन काँग्रेस
महाविकास आघाडीत एकमेकांमध्ये गैरविश्वास निर्माण झालाय..
तो त्यांनीच दूर केला पाहिजे..
दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रियांचा संदर्भ मला माहित नाही..
मात्र फडणवीस यांच्या नेतृत्व शिवाय पर्याय नाही हे दोन्ही नेत्यांच्या लक्षात आलं असावं..
7
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 22, 2025 13:40:42Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2207ZT_JALNA_PATIENT(2 FILES)
जालना : पुराच्या पाण्यातून आईला पाठीवर उचलून नेण्याची वेळ,पुराच्या पाण्यातून धोकादायक प्रवास,परतूर तालुक्यातील सावरगाव बुद्रुक येथील प्रकार
अँकर : जालन्यातील परतूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, नाल्यांना पूर आलाय.तालुक्यातील सावरगाव बुद्रुक येथील नदीला देखील पूर आलाय.त्यामुळे वृद्ध आईला पाठीवर उचलून पुराच्या पाण्यातून दवाखान्यात नेण्याची वेळ ग्रामस्थावर आलीय.या भागात पाऊस मोठ्या प्रमाणात झालाय.त्यामुळे ग्रामस्थांचं जनजीवन विस्कळीत झालाय.अनेक गावांचा संपर्क तुटलाय.परिणामी रुग्ण सेवेवर देखील परीणाम झाला असुन रुग्णांना दवाखान्यात उपचारासाठी नेताना जीवाशी खेळ खेळावा लागत आहे
14
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 22, 2025 13:39:27Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- रोहित पवार
फीड 2C
रोहित पवार ऑन कोकाटे
Anc:- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा अधिवेशन सुरू असताना विधिमंडळातील ऑनलाइन पत्ते खेळताना चा व्हिडिओ ट्विट केल्याने मोठी खळबळ उडाली यावर कृषिमंत्री कोकाटे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपल्या विरोधात सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये बदनामी केल्याचा आरोप करत खटला दाखल करणार असल्याचे म्हटला आहे यावर रोहित पवार यांनी देखील आपण वेळीच घाबरलो नाही तर अशा खटल्यांना काय घाबरणार आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे कोकाटे यांना त्यांच्या नेत्यांनी कृषिमंत्री हे जबाबदारीचे पद दिलेलं आहे आणि तुम्ही जर विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांवर चर्चा सुरू असताना पत्ते खेळत असाल तर तुम्ही जी कारवाई कराल त्या कारवाईला आम्ही घाबरत नाही असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे
बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
रोहित पवार ऑन कोकाटे सरकार भिकारी
Anc:- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारला भिकारी म्हटलं आहे याचा आमदार रोहित पवार यांनी समाचार घेतला आहे आधी तुम्ही शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात नंतर तुम्ही सरकारला भिकारी म्हणता तुम्ही महाराष्ट्राच्या महान सरकारला भिकारी म्हणतात याचा आम्ही निषेध करतो आम्ही सरकारकडे पैसे नाहीत असं म्हणतो तरीही ही आतली गोष्ट तुम्हाला माहिती आहे का याचे उत्तर अर्थमंत्री अजित पवार यांनी द्यावं आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी द्यावं असं म्हटलं आहे
बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
रोहित पवार ऑन अजित दादा व देवेंद्र फडणवीस वाढदिवस
Anc:- आज राज्यातल्या दोन मोठ्या नेत्यांचे अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवस आहेत या दोघांनाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आजच विदर्भात एक शेतकऱ्याचा चिखला त बसलेला व्हिडिओ समोर आला आहे त्यामुळे आजच्या दिवशी या दोघांनीही शेतकऱ्यांसाठी काही तरी जाहित करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे
बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
14
Report
MAMILIND ANDE
FollowJul 22, 2025 13:38:32Wardha, Maharashtra:
वर्धा
SLUG- 2207_WARDHA_MAHAJAN
- गिरीश महाजन बाईट
*गिरीश महाजन ऑन एकनाथ खडसे
झाली ना त्याच्यावर कारवाई एवढ्या कारवाया झाल्या वेगवेगळ्या ठिकाणचा महिला आहेत पुण्यामध्ये असतील मुंबईत असतील कुठे काय असतील नाशिकला असतील महिलांची कंप्लेंट असेल तर गुन्हे दाखल होतील ना खडसेंवर आता मी बोलणार नाही त्यांचं मानसिक संतुलन खरंच बिघडलेलं आहे मी त्यांची मुलाखत बघत होतो खरंच विचारांची आता मला की यायला लागली त्यांचा राग येत नाही मला त्याच्या नावावर एवढ्या प्रॉपर्टी सगळे तपासून पहा माझा काही म्हणणं नाही तुमचा जावई तीन वर्ष जेलमध्ये राहून आला ना तुम्हाला काहीच वाटत नाही 136 कोटीची रॉयल्टी चोरल्याचा गुन्हा आहे भोसरी प्रकरणातला एमआयडीसी खाली तुम्ही टाके टाकतात आणि दिल्लीला जाऊन आडवे पडून पाया पडतात आणि त्यांच्याकडून काही स्टे करून घेता माफ करा माफ करा माफ करा हा धंदा त्यांचा चाललेला आता खरंच मला त्यांची किंवा लागले लाईन सोडून बडबड करतात गेल्या पाच वर्षापासून बटन दाबले की असं बटन दाबले की दिल्लीहून जाईल तुझं बटन हरवला आमचा बटन आमचा मोबाईल कुठे गायब झाला मला अजून त्यांच्याकडून हाल बघितले जात नाही त्यांच्यावर मी जास्त बोलणार नाही
*गिरीश महाजन ऑन लोढा*
यांना लोक मतदान करायला तयार नाही एवढ्या मोठ्या बहुसंख्य लोकांनी फडणवीस यांच्या काळात आम्ही फार वेगाने पुढे जातो आहे आणि या सरकारला बदनाम कसं करायचं यांच्याकडे हाच एक विषय कुठे काय विचार करतोय हाईट वर्तन करतो त्याचा आरोप सरकारवर फोडायचा तुमच्याकडे तुम्ही आनंदासमोर बडबड काय करताय फालतू कशासाठी तुम्ही असं करा उलट सगळ्यांना बदनाम करायचं संभ्रम निर्माण करायचं सोमवार ठेवलं पाहिजे विधानसभेमध्ये यायचं तिथे काहीतरी दाखवायचे हे क्लिप माझ्याकडे या पेन ड्राईव्ह माझ्याकडे द्या ना अध्यक्षांकडे बघू द्या उद्या सक्षमक्ष सरकार याचा घोडा चार आमदारांचा पाच खासदारांचे होतो नुसत्या बॉयफ्रेंड गोष्टी करू नये लोक पण आता कंटाळले आहे चांगल्या चार गोष्टी करा राज्याचा हिताचा महत्वाचा गोष्टी करायला लोक हिताच्या गोष्टी करा ते दिलं सोडून आणि सकाळपासून बघ बघ करायची अश्लील बोलायचं
बाईट- गिरीश महाजन,मंत्री
14
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 22, 2025 13:35:08Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 2207ZT_GAD_TREE_CM
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यभरातील 11 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा प्रारंभ, गडचिरोलीच्या कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्र्यांनी लावले रोपटे, राज्यात यंदा 11 कोटी पुढील वर्षी 25 कोटी त्यानंतर अधिक असा क्रम राहणार असल्याचा केला निर्धार ,सर्वच लावलेल्या वृक्षांचे जिओ टॅगिंग आणि ट्रॅकिंग आवश्यक असल्याचे व्यक्त केले मत
अँकर:-- गडचिरोलीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवशी राज्याच्या 11 कोटी वृक्ष लागवड उपक्रमाचा प्रारंभ झाला. गडचिरोलीच्या कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात मुख्यमंत्र्यांनी रोपटे लावत उपक्रमाचा प्रारंभ केला. राज्यात यंदा अकरा कोटी, पुढील वर्षी 25 कोटी व त्यानंतर अधिक असा वाढीचा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे ते म्हणाले. औद्योगिक गडचिरोलीसह पर्यावरण पूरक गडचिरोली साकार करूया असे आवाहन त्यांनी केले. गडचिरोलीतील जल - जमीन आणि जंगल संतुलन राखण्याचे काम आपण करू असे सांगत यासाठी आवश्यक रोपवाटिका तयार करण्याचे काम हाती घ्यावे असेही ते म्हणाले. गडचिरोलीला देशातील सर्वात हरीत जिल्हा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. लावलेल्या रोपट्यांचे जिओ टॅगिंग आणि ट्रॅकिंग आवश्यक असून हरित अच्छादन वाढले पाहिजे असेही फडणवीस म्हणाले.
बाईट १) देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
21
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 22, 2025 13:08:28Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2207ZT_JALNA_RIVER (12 FILES)
जालना : ब्रेकिंग | मंठा शहराचा लिंबेवडगावशी असलेला संपर्क तुटला
पाटोदा साठवण प्रकल्पाच्या बँकवॉटरमुळे ग्रामस्थांना प्रवास करता येईना
आबाल वृद्धांचा बँक वॉटरच्या पाण्यातून पोहत जाऊन जीवघेणा प्रवास
पोहत असताना झाडाची फांदी पकडल्यानं वृद्ध वाहून जाताना थोडक्यात बचावला,
अँकर : जालन्यातील मंठा, परतूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालाय. या पावसामुळे मंठा तालुक्यातील पाटोदा साठवण तलावातील पाणी साठ्यात वाढ होऊन लिंबेवडगाव ते मंठा शहराचा संपर्क तुटला आहे.लिंबेवडगाव येथील दलित वस्तीतील नागरीकांना मंठा शहरात जाता येत नाहीय.त्यामुळे पाटोदा साठवण तलावाच्या बँक वॉटर मधून पोहत जाऊन महिला आणि आबाल वृद्धांना रस्ता पार करावा लागतोय.जिल्हा प्रशासनाने तातडीनं लिंबेवडगाव येथील ग्रामस्थांच्या रस्त्याचा प्रश्न सोडवावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा ईशारा वंचित बहुजन आघाडीसह ग्रामस्थांनी दिलाय.
बाईट : दीपक डोके,स्थानिक नेते,वंचित बहुजन आघाडी
16
Report