Back
नागपंचमी: नाशिकच्या प्राचीन नाग मंदिरात भक्तांची मोठी गर्दी!
YKYOGESH KHARE
Jul 29, 2025 04:31:57
Nashik, Maharashtra
nsk_nagapanchmi
feed by 2C
vidoe 1
पंचवटीच्या नागचौक येथील शहरातील एकमेव स्वयंभू आणि प्राचीन नाग मंदिरात नागपंचमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे. पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी मंदिरात पाहायला मिळत आहे.
ब्रिटिशपूर्व काळापासून या मंदिरात नागपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. नागदेवतेचे हे नाशिकमधील एकमेव भव्य मंदिर असून, इच्छापूर्ती नाग मंदिर म्हणून राज्यभर त्याची ओळख आहे.
पूर्वी वडाच्या झाडाखाली नागदेवतेची मूर्ती होती, आणि त्या मूर्तीभोवती नाग व सर्पांचा विळखा असायचा. आजही या मंदिरात नागपंचमीच्या दिवशी परिसरातील नागरिक मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करतात.
दिवसभर नागचौक मित्र मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा आणि अभिषेकाचे आयोजन करण्यात आले असून, नागभक्तांचा उत्साह पाहण्याजोगा आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowJul 29, 2025 13:51:37Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 2907ZT_GAD_POLICE_BRIDGE
( single file sent on 2C)
टायटल:-- अतिदुर्गम लिंगापूर टोला येथील नागरिकांसाठी गडचिरोली पोलीसांनी श्रमदानातून उभारला पूल, सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर उप पोलिस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी राबविला समाजाभिमूख उपक्रम
अँकर:-- गडचिरोली पोलीसांनी अतिदुर्गम लिंगापूर टोला येथील नागरिकांसाठी श्रमदानातून पूल उभारला. सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर उप पोलिस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी हा समाजाभिमूख उपक्रम राबवून शाबासकीची थाप मिळविली. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. जिल्ह्यात ब-याच नद्यांना पूर आल्याने काही ठिकाणी वाहतूकीची समस्या निर्माण झाली आहे. उप पोलीस स्टेशन झिंगानूर हद्दीतील मौजा लिंगापूर टोला या गावाजवळील नाल्यामूळे वाहतूकीचा मार्ग बंद होत होता. स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी एसआरपीएफ जवानांच्या मदतीने नागरिकांच्या सुविधेसाठी श्रमदानातून पूलाची उभारणी केली. पावसाळ्यात नाल्याला येणाऱ्या पुराने गावाशी संपर्क तुटणे, वैद्यकीय मदतीत विलंब आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यावर मार्ग काढत श्रमदानातून एक नवीन पूल तयार केला. आता नागरिकांची ये-जा सुकर झाली आहे. पोलीस दल केवळ सुरक्षेसाठीच नव्हे, तर समाजाच्या विकासासाठीही कटिबद्ध आहे हे या उपक्रमाद्वारे अधोरेखित झाले आहे.
बाईट १) स्थानिक नागरिक
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
0
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 29, 2025 13:49:02Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2907ZT_WSM_CITY_PROBLEMS
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम शहरातील स्वच्छता, नालेसफाई, घंटागाड्या,मोकाट जनावरे,तुंबलेले नाले या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत.या पार्श्वभूमिवार 15 माजी नगरसेवकांनी वाशिम नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक निलेश गायकवाड यांची भेट घेऊन शहरातील समस्या मांडल्या.या वेळी नालीसफाई वेळेवर करणे,नवीन कचरा कंत्राटदाराने जुन्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर घेणे, नव्यांची भरती टाळणे यासह कंत्राटदाराची मनमानी थांबवण्याची मागणी करण्यात आली. मुख्याधिकाऱ्यांनी स्वच्छता निरीक्षकाला तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
1
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 29, 2025 13:48:42Pandharpur, Maharashtra:
29072025
slug - PPR_PRANITI_SHINDE
file 01
-----
Anchor - ऑपरेशन सिंदूर बाबत वक्तव्य करणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांचे पोस्टर भाजप कार्यकर्त्यांनी पेटवल
ऑपरेशन सिंदूर हा मीडिया ट्रायल साठी केलेला तमाशा आहे असं वक्तव्य सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेमध्ये केलं. त्यानंतर त्यांच्या मतदार संघामध्ये मंगळवेढ्यात भाजप आक्रमक झाली आहे
खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत शिंदे यांचे पोस्टर फाडून पेटवण्यात आले.
तसेच भारतीय सैन्याचा जयजयकार यावेळी करण्यात आला
2
Report
SKShubham Koli
FollowJul 29, 2025 13:46:05Thane, Maharashtra:
Thane flash
*दीपक काटे ( शिवधर्म फाउंडेशन अध्यक्ष ) byte pointer*
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला का झाला, तर त्यांच्याच संघटनेच्या नावामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा होत असलेला एकेरी उल्लेख यासाठी त्यांच्यावर शाई फेकली
त्यांच्यावर शाईफेक झाली ही प्रथा संभाजी ब्रिगेडनेच पाडलेली आहे, बोवोगे बबुला तो आम कैसे उगेंगे, यांचाच निषेध व्यक्त करण्याची ही पद्धत आहे
त्यांनी हा विषय झाकण्यासाठी, महाराष्ट्रातील शिव प्रेमींना, सर्वसामान्य जनतेला जर ही गोष्ट समजली की संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख त्यांच्या नावामध्ये होतोय तरीही जनता पेटून उठेल आणि आपल्याला राहत्या घरात देखील राहून देणार नाही त्यामुळे या विषयाला त्यांनी पूर्णपणे डायव्हर्ट केलं
आणि सांगितलं दीपक काटे हा भाजपचा माणूस आहे, दीपक काटे ने केलेला हल्ला हा जीव गेला होता, यामुळे समता,बंधुता, एकता धोक्यात येते
खऱ्या अर्थाने जर बघितलं शिवधर्म फाउंडेशनच हे आंदोलन 2019 ते 20 पासून सुरू आहे महापुरुषांच्या विषयावर
भाजपचा या विषयात काडीमात्र संबंध नाही
गेली दीड वर्षापासून संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत माझं फोनवर बोलणं झालं आणि पत्रव्यवहार देखील झाला याच त्यांनी एकदाही उत्तर दिलेलं नाही
ज्यावेळी आम्ही विधानभवना बाहेर आंदोलन केल त्यावेळी त्यांचा प्रवक्ता संतोष शिंदे याने मीडियाला जाऊन सांगितलं की आम्हाला कोणीही शहाणपणा शिकवू नये, आम्हाला कोणीही डीवटण्याचा प्रयत्न करु नये म्हणजे तुम्ही मनमानी कारभारासारखा महापुरुषांचा अपमान करत राहणार, देवी देवतांचा अपमान करत राहणार तर हे महाराष्ट्र सहन करणार नाही
संभाजी ब्रिगेड जर स्वत:ला पुरोगामी म्हणतेय ना तर ते पुरोगामी नाही तर प्रतिगामी विचारांचे आहेत
संभाजी ब्रिगेड ही खंणीखोर आणि अर्बन नक्षली संघटना आहे,हिला बॅन केल पाहिजे
*ऑन संभाजी ब्रिगेड आंदोलन*
क्रांतीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, पण आम्ही मेलो का? त्यांच्या डोळ्यात राख टाकून आम्ही आज पत्रकार परिषदेला हजर झालोय, चार हात करायची ताकद त्यांची आहे तर आमचीही आहे, पण आम्ही डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाला मानतो
संभाजी ब्रिगेड ने संविधान कधी मानलय हे त्यांचा इतिहास उघडून बघा, ते सारखं सारखं सांगतात आमचा इतिहास बघा,तुमचा इतिहास तुम्हाला माहित आहे का
संभाजी ब्रिगेड जहादिंची पाठराखण करणारी संघटना आहे, महाराष्ट्रावरती जे परकीय हल्ले झाले औरंग्या, अफझल्या असेल असल्याच्या विचारांना जोपसणारी आणि त्यांचं उदात्तीकरण करणारी ही संघटना आहे
*ऑन पुढील भूमिका*
आम्ही धर्मदाय आयुक्त आणि निवडणूक आयोगाला आधीच पत्र दिलेलं आहे, त्यांना 30 दिवसांची वेळ दिलेली आहे, 30 दिवसात संभाजी ब्रिगेड संघटना आणि पक्षावर कारवाई करावी,त्यांना समज द्यावी की त्यांनी त्यांच्या नावात एकेरी उल्लेख काढून आदरयुक्त करा अन्यथा धर्मदाय आयुक्त आणि निवडणूक आयोगा बाहेर आंदोलन करू
मी आणि आमच्या संघटनेचे शेकडो कार्यकर्ते गमीनीकावा करून मंत्रालयासमोर आत्मदहन करू
*ऑन छत्रपती शिवाजी महाराज अपमान*
कोणीही राजकीय नेते, सेलिब्रिटि असतील, मी असेल किंवा माझा बाप असेल छत्रपतींचा किंवा कुठल्याही महापुरुषांचा अपमान तकरत असेल त्याला शासन झालंच पाहिजे
अशा विचारांच्या लोकांना महाराष्ट्रात जगण्याचा अधिकार नाही, त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे
संभाजी ब्रिगेडने जर करोडो शिवप्रेमींची मागणी मान्य केली, त्यांनी त्यांच्या संघटनेच्या नावात बदल केला तर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ज्या पुरंदरवर झालाय तिथे नेऊन त्यांचा दुग्धाभिषेक घालेल ज्या हाताने काळ फासलय त्या हाताने
0
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 29, 2025 13:37:28Yeola, Maharashtra:
अँकर:-
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात तब्बल पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने अखेर पुनरागमन केले आहे. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण फुलले असून, विशेषतः सोयाबीन पिकाला मोठे जीवदान मिळाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानंतर अचानक वातावरण कोरडे पडल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता पसरली होती. रोपांची वाढ थांबलेली होती, तर काही ठिकाणी पिकावर करपा रोग आणि कीडही पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, कालपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे जमिनीत नमी निर्माण झाली असून सोयाबीनच्या वाढीस चालना मिळाली आहे
2
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 29, 2025 13:37:18Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Road Rada
File:01
Rep: Hemant Chapude(Khed)
*ब्रेक*
*खेड/पुणे*
- गावच्या रस्त्याच्या वादातून दगडफेक ,
- वाहनाची मोठ्या प्रमाणात तोडफोड
- पुण्याच्या खेड तालुक्यातील जैदवाडी येथील घटना
- रस्त्याचे काम सुरू असल्याने मुरूम घेऊन आलेल्या वाहनाची तोडफोड
- गावच्या रस्त्याला विरोध करण्यासाठी वाहनावर दगडफेक
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
2
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 29, 2025 13:30:35Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Junnar Three Leopard
File:02
Rep: Hemant Chapude(Junnar)
Anc:जुन्नर तालुक्यात बिबट्याच दर्शन होणं काही नवीन नाही.जुन्नर तालुक्यातील अनेक भागात बिबट्या सर्रास दिसतो. नागरिकांना त्याच दर्शन होतच असतं. मात्र जुन्नर तालुक्यातील रोहोकडी गावातील एक असा काहीसा व्हिडिओ समोर आलाय की तो पाहून अंगाचा थरकाप उडेल.रोहोकडी येथील विजय मुरादे या शेतकऱ्याच्या घराजवळ एक दोन नाही तर तब्बल तीन तीन बिबटे फिरताना दिसले आणि बिबट्याचा हा मुक्त वावर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. जुन्नर तालुक्यातील मानवी वस्ती असलेल्या परिसरात बिबट्या आल्याच्या यापुर्वी अनेक घटना घडल्या. अनेकदा तर बिबट्याने नागरिकांवर हल्ले देखील केले आहेत. मात्र तीन तीन बिबटे एकत्र फिरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये मात्र दहशत पसरली आहे.
या घटनेनंतर वनवभागाने तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
1
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 29, 2025 13:02:30Pandharpur, Maharashtra:
29072025
slug - PPR_WATER_SELL
file 02
-----
Anchor - पंढरपुरात बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून भाविकांच्या भक्तीचा सौदा, चंद्रभागेचं पाणी तीर्थ म्हणून सुरक्षेसाठी उभ्या असलेल्या बीव्हिजी कंपनी सुरक्षा रक्षका कडून भाविकांना विकले
चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे महाद्वार घाटावरून नदीत उतरण्यास भाविकांना प्रतिबंध करण्यात आला आहे.या ठिकाणी बॅरिकेटिंग लावून बिव्हीजी कंपनीचे कंत्राटी सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहेत. मात्र हे सुरक्षारक्षक नदीतील पाणी भाविकांना तीर्थ म्हणून विकत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. बीव्हीजी कंपनीला मंदिर सुरक्षा रक्षकाचा ठेका मिळाल्यापासून ही कंपनी सतत वादाच्या सापडलेली आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि प्रशासनाने या पूर्वीच्या घटनांवर कठोर कारवाई केली नसल्याने अशा घटना वाढत आहे.
8
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 29, 2025 13:00:31Nashik, Maharashtra:
nsk_teacherscamstory
feed by 2C
Anc: राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगावमध्ये बोगस शिक्षकांची भरती मोठ्या प्रमाणात झाल्याचा समोर येत आहे. झी 24 तास ना सर्वात आधी हा घोटाळा समोर आणला होता. मालेगाव आता या घोटाळ्या संदर्भात चौथा गुन्हा दाखल झाला आहे
vo 1 मालेगाव शिक्षण क्षेत्रातल्या घोटाळ्याची व्याप्ती पुन्हा वाढली आहे. स्पेस हायस्कूल, सरदार प्रायमरी स्कूल, महात्मा फुले शिक्षण संस्था, यांच्या घोटाळ्यानंतर आता मालेगाव महाविद्यालय इथे एक नवीन घोटाळा समोर आला असून, बनावट कागदपत्र तयार करून शिक्षण अधिकाऱ्यांकडून 13 शिक्षकांना 100 टक्के अनुदान मंजूर करून दोन कोटी 56 लाखांचा अपहार केल्या प्रकरणी मालेगाव पवारवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चारही गुन्ह्यात अद्याप एकही आरोपी अटक नाही त्यांना अटक करावी. या संस्थांवर प्रशासक नेमण्याची मागणी तक्रादराने केली. कारण यातील मुख्याध्यापक, संस्थाचालक हेच आरोपी असल्याने प्रशासक नेमावा. तसेच शिक्षण क्षेत्रातला प्रमुख सूत्रधार नाविक आफ्टर याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे
*बाईट: जाबिर शाह, तक्रारदार*
VO 1: मालेगाव महात्मा फुले शिक्षण संस्थेत आरक्षण डावलून भरती करण्यात आली असून त्या संदर्भात एक गुन्हा छावणी पोलिस ठाण्यात दाखल आहे.. त्यात सात जणांवर गुन्हा दाखल असून त्यात शिक्षणाधिकारी व वेतन अधिक्षक व शिक्षण उपसंचालक हे दोषी ठरत असल्याचा तसेच याच संस्थे विरोधात अजून दोन तक्रार अद्याप पेंडिंग असून त्यावर अद्याप कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप तक्रादरने केला आहे.
*बाईट: शेखर पाटील, तक्रारदार*
VO 2: मालेगाव मध्ये चार गुन्हे दाखल असून तीन गुन्हे हे नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे व एक गुन्हा अद्याप तपासावर असून त्याचा तपास चालू आहे..
*बाईट: अपर पोलिस अधीक्षक तेगबीरसिंग संधू*
VO 3: गेल्या एक महिन्यापूर्वी लासलगाव येथील एका उर्दू इंग्लिश मीडियम स्कूलवर शिक्षण क्षेत्रासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचे देखील धागेदोरे मालेगावच्या उर्दू शाळेकडे वळाले आहेत. लासलगाव येथील उर्दू शाळेत शिकलेल्या मुलांना मालेगाव येथील अशनब उर्दू व डायमंड गर्ल्स हायस्कूल प्रशस्तीपत्र दाखले प्रगती पुस्तक हे देण्यात आल्याने खळबळ उडाली होती त्याचे देखील चौकशीचे आदेश दिले असून अध्यात त्यातही अजून कारवाई झाली नसल्याचा आरोप व आरोपीला अटक नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे
*बाईट: युनूस तांबोळी, लासलगाव तक्रारदार*
VO 4: एकंदरीत मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव हे शिक्षण क्षेत्रातल्या घोटाळ्याचे केंद्रबिंदू बनले असून मालेगावात चार गुन्हे शिक्षण क्षेत्रात संबंधित दाखल झाले व लासलगाव मध्ये सुद्धा दाखल झालेल्या गुन्ह्याचे धागेद्वारे मालेगाव मध्ये आहे तेव्हा मालेगाव सह नाशिक जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रातला घोटाळा हा फोफावतोय याकडे आता मंत्री दादा भुसे काय कारवाई करतील हे बघ हे महत्त्वाचे ठरेल.
7
Report
KJKunal Jamdade
FollowJul 29, 2025 12:31:19Shirdi, Maharashtra:
Anc - शिर्डी साईबाबांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांच्या सेवेतील निस्सीम भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना चांदीचे 9 नाणे भेट दिले होते...त्यावरून लक्ष्मीबाई शिंदे यांचे वंशजांमध्ये दावे - प्रतिदावे सुरू आहेत त्यात झालेल्या तक्रारीनंतर अहिल्यानगर सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी सुनावणी वेळी प्रतिवादी हजर न राहिल्याने साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांचा दावा योग्य ठरवत सदर 9 नाणे हे ट्रस्टकडे असल्याचे चौकशी अहवालात नमुद केलय..त्यामुळे आमच्याकडील नाणे हेच खरे असल्याचा दावा पुन्हा एकदा अरुण गायकवाड यांनी केलाय...तर धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात कायदेशीर मार्गाने अपील दाखल करणार असल्याचे तक्रारदार संजय शिंदे आणि चंद्रकांत शिंदे यांनी सांगितलय...
V/O - 1918 साली विजयादशमीच्या दिवशी साईबाबांचे महानिर्वाण झाले...अखेरच्या समयी साईबाबांना नित्यनियमाने भोजन आणि सेवा देणा-या तत्कालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना साईबाबांनी चांदिचे 9 नाणे भेट दिले होते...लक्ष्मीबाई शिंदे यांचे वंशज चंद्रकांत शिंदे आणि त्यांचे नातेवाईक सदर चांदिचे नाणे आमच्याकडे असल्याचा दावा करतायत तर लक्ष्मीबाई शिंदे यांची नात शैलेजा गायकवाड आणि त्यांचे कुटूंबीय चांदिचे 9 नाणे आमच्याकडे असल्याचा दावा करतायत...9 नाण्यांचे 18 नाणे झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता त्यानंतर संजय शिंदे , चंद्रकांत शिंदे यांनी 2022 साली साईबाबा संस्थान आणि पोलिस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती...अरुण गायकवाड हे लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि 9 नाणे भाविकांना दाखवुन मोठ्या देणग्या जमा करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता...धर्मादाय आयुक्तांच्या चौकशी अहवालात देणगीचा तपशील आणि विनीयोग तसेच नऊ नाणे हे अरुण गायकवाड अध्यक्ष असलेल्या ट्रस्टकडे असल्याच निरिक्षण नोंदवल्याच अरुण गायकवाड यांनी म्हणटलय...
बाईट - अरुण गायकवाड , अध्यक्ष , साईभक्त लक्ष्मीबाई ट्रस्ट
V/O - लक्ष्मीबाई शिंदेंचे आम्ही वंशज आहोत त्यामुळे वारसाहक्काने ती चांदीची नाणी आमच्याकडे असुन ती लक्ष्मीबाईंच्या नात शैलेजा गायकवाड यांचेकडे कसे येतील..? आजही साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना दिलेली नाणी हि जुन्या घरी असलेल्या मंदिरातच आहेत आणि तीच खरी आहेत...धर्मादाय आयुक्तांनी सुनावणी घेताना आम्हाला तारखेला हजर राहाण्याची सुचना किंवा समन्स दिलेले नाहीत... त्यांनी दिलेल्या चौकशी अहवालाविरोधात दाद मागणार असल्याच यावेळी तक्रारदार संजय शिंदे आणि चंद्रकांत शिंदे यांनी म्हणटलय...सर्व नाण्यांची पुरातत्व विभागाकडून सत्यता तपासुन दुध का दुध आणि पाणी का पाणी व्हाव अशी मागणी तक्रारदारांनी केलीय...
बाईट - संजय शिंदे , लक्ष्मीबाई शिंदेचे वंशज
बाईट - चंद्रकांत शिंदे , लक्ष्मीबाईंचे वंशज
V/O - साईबाबांनी दिलेली चांदीची नऊ नाणी ही एक ऐतिहासिक, भक्तिपर आणि भावनिक ठेव आहे.मात्र, सध्या या नाण्यांवरून शिर्डीत मोठा वाद सुरू आहे.साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड आणि त्यांच्या मातोश्री शैलजा गायकवाड यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांचा चौकशी अहवाल पत्रकार परिषदेत मांडल्याने पुन्हा हा वाद चव्हाट्यावर आलाय...देश विदेशातील करोडो भाविकांच्या श्रद्धेचे प्रतिक असलेल्या 9 नाण्यांची सत्यता खर तर जगासमोर येण गरजेच आहे.
*कोण आहेत शैलेजा गायकवाड आणि साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड..?*
शैलेजा गायकवाड ( माहेरचे नाव शिंदे ) या लक्ष्मीबाई शिंदे यांची नात तर सोनबाई यांची मुलगी आहे तर अरुण गायकवाड हे शैलेजा गायकवाड यांचे चिरंजीव..
1963 साली लक्ष्मीबाई शिंदे यांचे निधन झाले आणि त्यानंतर चांदिचे नाणे त्यांची मुलगी सोनुबाई आणि त्यानंतर शैलेजा गायकवाड यांचेकडे आल्याचा दावा...
*ग्राफिक्स पॉइंट्स -*
1) साईबाबांनी मृत्यूसमयी दिलेली ९ चांदीची नाणी – विवादाचा केंद्रबिंदू...
2) अरुण गायकवाड: “आमच्याकडेच खरी नाणी” - दावा
3) शिंदे वंशज - “गायकवाडांचा दावा खोटा” - आम्हीच खरे वारसदार
4) पुरातत्व विभागाकडून नाण्यांची सत्यता तपासावी - शिंदे कुटूंबीय
5) साईबाबा संस्थान ने देखील दोन्ही कडच्या व्यक्तींना नाण्यांबाबत मार्च महिन्यात नोटीस बजावली...
6) साई भक्तांमध्ये संभ्रम – खरी नाणी नेमकी कुणाकडे..?
प्रतिनिधी कुणाल जमदाडे झी 24 तास शिर्डी अहिल्यानगर
11
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 29, 2025 12:30:50Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2907ZT_JALNA_RESIGN(2 FILES)
जालना : ब्रेकिंग | काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांचा प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे पाठवला राजीनामा
अँकर | जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी त्यांच्या काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे पाठवला आहे.30 ते 35 वर्ष पक्षाचं एकनिष्ठ राहून काम केलं मात्र आता मि माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे पक्षाचे काम करु शकत नाही त्यामुळे मला कार्यामुक्त करण्यात यावे असं त्यांनी राजीनाम्यात म्हटलं आहे.आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जालन्याच्या दौऱ्यावर आहे.या दौऱ्या दरम्यान गोरंटयाल यांनी त्यांचा राजीनामा सपकाळ यांच्याकडे पाठवला आहे.31 जुलै रोजी गोरंटयाल मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
11
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 29, 2025 12:04:57Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2907ZT_WSM_WORLD_TIGER_DAY
रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशिम
अँकर:वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत जागतिक वाघ दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून Save Tiger संदेश दिला.तसेच स्टोन पेंटिंगच्या माध्यमातून वाघांचे चित्र रेखाटून वाघ संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.विद्यार्थ्यांनी वाघ वाचवण्याची शपथ घेत निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला.
बाईट:गोपाल खाडे, शिक्षक
बाईट: विद्यार्थी
12
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 29, 2025 12:04:23Vasai-Virar, Maharashtra:
type-Av
2c entry - अनिल कुमार पवार यांच्या घरी इडी कडून छापा
अँकर - वसई विरार मधील अनधिकृत इमारती बांधकाम प्रकरणात माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरी ईडीची धाड..आज सकाळपासून ईडीची टीम पवार यांच्या दारात
.....बिल्डर, आर्किटेक, इंजिनियर्स नंतर आता थेट आयुक्तांची चौकशी....इडी च्या हाती काय लागेल याची सर्वांना उत्सुकता ....आयुक्त अनिल पवार यांनी प्रशासक म्हणून पाहिला होता कारभार
11
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 29, 2025 12:04:14Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - खासदार प्रणिती शिंदे यांच्या ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्याचा निषेध करत फोटोला जोडमारो आंदोलन करत व्यक्त करण्यात आला निषेध
- खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूर बाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजपा आक्रमक
- आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली खासदारपणाची शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
- गाढवाच्या गळ्यामध्ये प्रणिती शिंदे यांचा फोटो बांधत भाजपाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध
- ऑपरेशन सिंदूर म्हणजे मीडिया मध्ये केलेला तमाशा असे वक्तव्य खासदार प्रणिती शिंदे यांनी केले होते
- खासदार प्रणिती शिंदे यांची गाढवाच्या बुद्धीशी करण्यात आली तुलना
बाईट -
देवेंद्र कोठे ( भाजपा आमदार )
11
Report
JMJAVED MULANI
FollowJul 29, 2025 12:00:21Baramati, Maharashtra:
JAVEDMUALNI
SLUG 2907ZT_BARAMATIDHNGR
FILE 4
BYTE 2
बारामतीत धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी विक्रम ढोणे यांचं आंदोलन..... आंदोलनाचं यंदाचा अकरावं वर्ष.....धनगर विवेक जागृती अभियानाच्या माध्यमातून केलं आंदोलन
Anchor _धनगर समाजाच्या एसटी आरक्षणप्रश्नी बारामतीत प्रशासकीय भावनासमोर आंदोलन करण्यात आलं आहे. धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 29 जुलै 2014 रोजी धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची पूर्तता न झाल्याने दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी ढोणे यांच्या नेतृत्वात प्रत्येक वर्षी बारामतीत प्रशासकीय भावना समोर हे आंदोलन केलं जातं. यंदाचे आंदोलनाच 11 वर्ष आहे.
धनगर एसटी आरक्षणासाठी राज्य सरकारने तात्काळ मंत्री समितीची स्थापना करून केंद्र सरकारला शिफारस पाठवण्याचे कार्यवाही करावी. पंतप्रधानांनी धनगर समाजाला दिलेले अश्वासन पूर्णत्वास नेण्यासाठी केंद्र सरकारने समन्वय समितीची स्थापना करून प्रक्रिया सुरू करावी. याशिवाय महाराष्ट्र शासनाने धनगर आरक्षण प्रश्न श्वेतपत्रिका जाहीर करावी असा मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
14
Report