Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

आमदार रमेश कराड यांनी लातूरला पाकिस्तान म्हटले, वाद वाढला!

VBVAIBHAV BALKUNDE
Aug 12, 2025 08:15:30
Latur, Maharashtra
लातूर PKG स्किप्ट ::- आमदार रमेश कराड यांची जीभ घसरली.... स्वतःच्या मतदारसंघालाच म्हणाले पाकिस्तान.... आमदार रमेश कराड यांच्या वक्तव्यानंतर नवा वाद.... AC ::- सत्ताधारी मंत्री-आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी सरकारची डोकेदुखी वाढली असतानाच, आता लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केलेल्या भाषणाने नवा वाद पेटलाय. गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमात लातूर ग्रामीण मतदारसंघात विजय कसा मिळवला हे सांगताना कराड यांची जीभ घसरली आणि त्यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघाची तुलना थेट पाकिस्ताशी केली. पाहुयात ZEE 24 TAAS चा स्पेशल रिपोर्ट.... VO 01 ::- काल लातूरमध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. याच व्यासपीठावर आमदार रमेश कराड विजय मिळवण्याचा प्रवास सांगत होते. पण बोलता बोलता भाषण भरकटलं आणि भाषणादरम्यान कराड यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानात भारताचा झेंडा लावण्यासारखा आहे असं वक्तव्य केलं. खरं तर, या मतदारसंघात अनेक वर्ष काँग्रेसचं वर्चस्व होतं. देशमुख कुटुंब ठरवत असे की कोण आमदार होणार. 2019 च्या निवडणुकीत लातूर ग्रामीण ची जागा शिवसेनेला मिळाली आणि धीरज देशमुख मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यावेळी कराड यांना संधी मिळाली नाही, मात्र भाजपने विधानपरिषदेवर घेतलं. त्यानंतर 2024 मध्ये भाजपच्या तिकिटावर त्यांनी काँग्रेसचं गड मोडून विजय मिळवला. हा विजय मुख्यमंत्र्यांसमोर सांगताना त्यांनी अजब उपमा दिली आणि वाद ओढवून घेतला. साऊंड बाईट ::- रमेश कराड ( आमदार ग्रामीण ) VO 02 ::- या वक्तव्यावर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. माजी आमदार धीरज देशमुख यांनी ट्विट करत रमेश कराड यांच्यावर टीका केली आहे. ज्या मतदारसंघातून तुम्ही निवडून आला, त्याची तुलना पाकिस्तानशी कशी करता? हे मतदारांचा अपमान आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे... बाईट ::- अभय साळुंखे ( जिल्हाध्यक्ष काँग्रेस ) बाईट ::- मोहसीन खान  ( लातूरकर ) VO 03 ::-  या अगोदर आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांनी सरकारला अनेकदा अडचणीत आणलं आहे. विशेष म्हणजे, आमदार रमेश कराड यांचा अधीकार्याला दम देतानाचा व्हिडीओ नुकताच समोर आला होता. त्यामुळे आता त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या वक्तव्यावरून – बेताल बोलणाऱ्यांना आणि वागणाऱ्यांना लगाम कोण लावणार? असा सवाल राजकीय वर्तुळात अधिक जोरात उपस्थित होत आहे. ............................ वैभव बालकुंदे  ZEE 24 TAAS लातूर  Mo.9168315296
14
comment
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Aug 12, 2025 11:30:06
Nagpur, Maharashtra:
Ngp UBT Kumeriya live u ने फीड पाठवले ---------- नागपूर महानगरपालिकेने स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट व श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कत्तलखाने व मास विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे... त्याबाबत उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते किशोर कुमेरिया यांचा वन-टू-वन केला आहे पॉईंटर -- हा देश काढण्याची गरजच काय होती... याआधी आपण पाहिला आहे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारला सगळेच दुकाने बंद असतात... अनेक वर्षांपासून हे सुरू आहे... या सरकारने यावेळेस हा आदेश काढणं... जनतेचा कुठलाही विचार न करता धर्मा धर्मात आणि जाती-जातीत राजकारण करणे, भांडण लावणे,द्वेष ची भावना निर्माण करणे.. या आदेशामुळे दिसत आहे आतापर्यंत आपण तसे पाहिले तर इथे दुकान बंद असतात.. त्या दिवशी जन्माष्टमीपण आहे.. माझा स्पष्ट आरोप आहे आदेश काढण्याची काहीही गरज नव्हती... हे फक्त भांडणं लावण्याकरता आहे.. इतक्या वर्षापासून आदेश काढलेच नाही आदेश काढणे म्हणजेच भांडण लावणे सरकारला केवळ धर्म आणि जातीमध्ये भांडण लावायचे आहे ---
0
comment
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 12, 2025 11:20:17
Bhandara, Maharashtra:
भंडारा जिल्ह्यात पावसाची हजेरी..... धान उत्पादक शेतकऱ्यांसह उकळ्या पासून हैराण असलेले नागरिक सुखावले..... ANCHOR :- अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर भंडारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण असताना दुपारी काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आठवडाभरापासून पावसाअभावी शेतकरी चिंतेत होते. विशेषतः धान शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेल्या पावसाची प्रतीक्षा होती. आज अचानक आलेल्या या पावसामुळे काही नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र हवामानात गारवा निर्माण होऊन उकाड्यापासून दिलासा मिळालाय. अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतीच्या दृष्टीने अनिश्चितता कायम आहे. पुढील काही दिवसांत जोरदार पावसाची अपेक्षा भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
0
comment
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 12, 2025 11:18:08
Raigad, Maharashtra:
स्लग - मग त्यांना आम्ही कफन चोरांचे सरदार म्हणायचं का ? ; प्रविण दरेकर यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा ....... अँकर - उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख चोरांचे मुख्यमंत्री असा केला आहे. यावर प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचे सहकारी कोविड काळात कफनातही पैसे खात होते, मग ठाकरेना आम्ही कफन चोरांचे सरदार म्हणायचं का असा सवाल दरेकरांनी केला आहे. उद्धव ठाकरे तिरस्काराने बोलतात, पण वाकडं-तिकडं बोलण्यापलीकडे त्यांना काही जमत नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे. बाईट - प्रविण दरेकर
3
comment
Report
PNPratap Naik1
Aug 12, 2025 11:05:07
Kolhapur, Maharashtra:
Kop:- girls suicide update Anc feed :- Live U Anc:- कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वसतिगृह क्रमांक एक मधील एम ए एम एससी भूगोल प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने वसतिगृह मध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली आहे. गायत्री रेळेकर असं मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. गायत्री सुट्टीनिमित्त 8 ते 11 ऑगस्ट दरम्यान सांगली इथे असणाऱ्या तिच्या घरी गेली होती. सोमवारी सकाळी ती सांगलीहून कोल्हापूरला निघाली. शिवाजी विद्यापीठातील वसतीगृहात पोहोचल्यानंतर आपण सुखरूप पोहोचण्याचा फोन ही गायत्रीने आपल्या वडिलांना केला. त्यानंतर ती वस्तीगृहातील खोलीत गेली. काही वेळाने गायत्रीच्या मैत्रिणी देखील वसतिगृहात आल्या. मात्र रूमचा दरवाजा गायत्री उघडच नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी ही माहिती वसतिगृहातील रेक्टरना दिली. गायत्रीने तिच्या खोलीतील फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती राजारामपुरी पोलिसांना देण्यात आली. गायत्रीने नेमकी आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली ? या संदर्भातला तपास राजारामपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन सरगर सुरू केला आहे. Byte - गजानन सरगर, प्रभारी पोलीस निरीक्षक राजारामपुरी Byte- एम व्ही वाळवेकर, वसतीगृह अधीक्षक
5
comment
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 12, 2025 11:04:46
Beed, Maharashtra:
बीड: अंबाजोगाई शहरातील शॉपिंग मॉलला आग, आगीत दुकानाचे लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही..! Anc- बातमी आहे बीडमधून... अंबाजोगाई शहरातील शॉपिंग मॉलला भीषण आग लागली आहे. या आगीत दुकानातील सामान जळून खाक झाल्याने दुकानाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कसलीही जिवितहानी झालेली नाही. अंबाजोगाई शहरातील फयाज मोमीन यांनी सहा महिन्यांपूर्वी भाड्याने मंडी बाजार या ठिकाणी फेमस फर्निचर या नावाने शॉपिंग मॉल टाकला होता. यात कुलर, कपाट यासह विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र दुकानाला आग लागल्याने सर्व वस्तू जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
3
comment
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 12, 2025 10:47:50
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- लाडकी बहीण गृहचौकशी ला अंगणवाडी सेवकांचा विरोध फीड 2C ANC:- राज्य सरकारने लाडक्या बहीणींची गृहचौकशी करण्याचा निर्णय घेतलाय अहिल्यानगर जिल्ह्यातील 1 लाख 25 हजार लाडक्या बहिणींची चौकशी हाती घेण्यात आलीये...हे काम अंगणवाडी सेविकांकडून केले जाणार आहे, मात्र अंगणवाडी सेविकांनी हे काम करण्यास नकार दर्शवला आहे...अंगणवाडी सेविकांकडे एफआरएसचे काम पुरक पोषण आहार, सर्वे अद्ययावत करणे, गरोदर माता नोंदी ठेवणे, जन्म व मृत्यू नोंदी, लाभार्थी वजन घेणे आणि मोबाईलचे ऑनलाईन कामकाज, हजेरी अशी कामे आहेत...आधीच भरपूर काम आहे, आणि बाहेरील काम दिल्यास मुलांच्या कुपोषणात वाढ होण्याची शक्यता असल्याचे म्हणत लाडकी बहीण योजनेची पडताळणी आणि मातृ वंदनाचे काम सेविकांकडून करणे शक्य होणार नसल्याचे अंगणवाडी सेविकांनी म्हंटले आहे...तर अंगणवाडी सेविकांसोबत चर्चा सुरू असून सध्या इतर यंत्रणांच्या माध्यमातून गृहचौकशी सुरू केली असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. बाईट-: सुनंदा बिडकर, अंगणवाडी सेविका बाईट:- संजय कदम, प्रभारी अधिकारी, महिला आणि बाल विकास विभाग
9
comment
Report
ABATISH BHOIR
Aug 12, 2025 10:47:29
Kalyan, Maharashtra:
"केडीएमसीचा ‘हरित बाप्पा’ उपक्रम जागतिक विक्रमाच्या उंबरठ्यावर; 4,657 विद्यार्थ्यांनी घडवले इको-फ्रेंडली गणपती" Anc...कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हरित बाप्पा फरीद बाप्पा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळूच्या मातीपासून इको-फ्रेंडली गणपती बाप्पा तयार करण्याची कार्यशाळा डोंबिवलीतील बंदिस्त गृह येथे पार पडली.या कार्यशाळेत 4,657 विद्यार्थी सहभागी झाले होते. हे विद्यार्थी कल्याण डोंबिवलीतील पालिका, खाजगी आणि शासकीय मान्यता असलेल्या 90 पेक्षा जास्त शाळांमधून आले होते. प्रत्येक विद्यार्थ्याने शाळूच्या मातीपासून स्वतःचा हाताने गणपती घडवले.पालिकेने या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची भावना जागवणे आणि समाजात इको-फ्रेंडली गणपतीचा संदेश पोहोचवणे असा ठेवला होता. या वेळी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी “हा केवळ उपक्रम नाही, तर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा सण साजरा करण्याची चळवळ आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींपेक्षा शाळूच्या मातीच्या मूर्तींचा वापर करावा असे आवाहन केले विशेष म्हणजे पालिकेच्या या कार्यशाळेत एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी इको-फ्रेंडली गणपती बनवल्यामुळे, या उपक्रमाची नोंद ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे, तर लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. अभिनव गोयल केडीएमसी आयुक्त
6
comment
Report
AKAMAR KANE
Aug 12, 2025 10:36:05
Nagpur, Maharashtra:
*‘स्वातंत्र्य दिन’ व श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त १५ ऑगस्ट रोजी* *कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद* : नागपूर महानगरपालिकेद्वारा स्वातंत्र्य दिन आणि श्रीकृष्ण जयंती (जन्माष्टमी) निमित्त शुक्रवार १५ ऑगस्ट 2025 रोजी शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. असे आदेश मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्तराजेश भगत यांनी निर्गमित केले आहे. आदेशात नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील असे नमूद केले आहे. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाद्वारे कार्यवाही करण्यात येईल असेही नमूद करण्यात आले आहे.
10
comment
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 12, 2025 10:35:59
Parbhani, Maharashtra:
अँकर- शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यामागणीसाठी आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यलयावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जोरदार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते,मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून सुरुवात झाली होती. जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी,थकलेला पीकविमा शेतकऱ्यांना तात्काळ द्यावा. वन्यप्राण्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय...
11
comment
Report
ABATISH BHOIR
Aug 12, 2025 10:33:40
Kalyan, Maharashtra:
१५ ऑगस्टला मटण-चिकन विक्रीवर बंदी : केडीएमसीचा हट्ट, १९८८ चा ‘जुना आदेश’ ढाल करून विरोधकांना झुगारले! केडीएमसी उद्या निर्णय मागे घेतला नाही तर 15 ऑगस्ट ला कोंबड्या, बकऱ्या घेऊन उपोषणाला बसणारा. “खाण्यावर नाही, विक्रीवर बंदी” – अतिरिक्त आयुक्तांचा अजब खुलासा, हिंदू खाटीक समाजाचा संताप : “विक्रीच नसेल तर खाणार कोण?” Anc..कल्याण डोंबिवली महापालिकेने 15 ऑगस्ट रोजी महापालिका क्षेत्रात चिकन मटन विक्रीवर बंदीचा निर्णय घेतला आहे . या निर्णयाचा हिंदू खाटीक समाज विरोधी पक्षांसह चिकन मटन व्यापारी असोसिएशनने देखील कडाडून विरोध केला केडीएमसी मात्र या विरोधाला झुगारून आपल्या निर्णयावर ठाम आहे .केडीएमसीकडून विरोध करणाऱ्याना मटण चिकन विक्रीवर बंदी आहे खाण्यावर बंदी नाही असे सांगत 1988 च्या आदेशाची प्रत दाखवली जात आहे .1988 साली तत्कालीन प्रशासकाने हा आदेश काढला असून दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन राष्ट्रीय सणाच्या दिवशी चिकन मटन विक्रेत्यांना दुकाने बंद ठेवण्याच्या नोटीसा दिल्या जात असल्याचे स्पष्टीकरण दिले जात आहे. तर दुसरीकडे गेल्या दोन दिवसांपासून राजकीय पक्ष आपली भूमिका मांडतायत तर मटन चिकन विक्रेते ,हिंदू खाटीक समाजाकडून केडीएमसीला निवेदन देण्यात आले याबाबत मात्र केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी निवेदन प्राप्त झाले नसल्याचा अजब खुलासा केलाय तसेच स्थानिकांचा विरोध असल्यास याबाबत विचार करण्यात येईल असे सांगितले .तर विक्रीच झाली नाही तर खाणार कोण ?असा सवाल करत केडीएमसी अधिकार्यांचे म्हणणं हास्यास्पद आहे ,केडीएमसीने निर्णय मागे घेतला नाही तर 15 ऑगस्ट रोजी केडीएमसी मुख्यालयासमोर मटण चिकन विक्रीचे दुकान सुरू करून निषेध नोंदवन्यात येइल असे सांगितले . कल्याण डोंबिवली महापालिकेकडून 15 ऑगस्ट निमित्ताने शहरातील चिकन मटन विक्री दुकाने आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश दुकानदारांना देण्यात आले . केडीएमसीच्या या निर्णयाचे पडसाद संपूर्ण राज्यभरत उमटल्याचे पाहायला मिळाले . शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी केडीएमसीच्या या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्र घेत निषेध नोंदवलाय . दुसरीकडे स्थानिक पातळीवर देखील विरोधी पक्षाने या निर्णयाचा कडाडून विरोध केला . हिंदू खाटीक समाज आणि महाराष्ट्र राज्य मटन चिकन विक्रेता असोसिएशनने देखील काल महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेत हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली निर्णय मागे न घेतल्यास महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच मटन चिकन विक्री करण्यात येईल असा इशारा देखील दिलाय . महापालिकेच्या या निर्णयाला विरोध असताना देखील हा विरोध झुगारून महापालिका आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतेय . महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली महापालिकेने हा निर्णय घेतलाय का असा आरोप देखील केला जातोय तर याबाबत केडीएमसी अतिरिक्त आयुक्त गोडसे यांनी मटण चिकन विक्रीवर बंदी आहे ..खाण्यावर बंदी नाही ..कुणी संभ्रम निर्माण करू नये ..1988 पासून या आदेशाची अमलबजावणी सुरु असून हा नव्याने काढलेला आदेश नाही ..आजवर कधीही कोणीही याला विरोध केलेला नाही ..बदलत्या परिस्थिती नुसार आदेश बदलले जातात..काही लोकांचा आग्रह असेल ,निवेदने प्राप्त झाले तर विचार करू मात्र अद्याप निवेदन प्राप्त झाले नसल्याचे स्पष्ट केले. केडीएमसी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी केलेल्या वक्तव्याचा हिंदू खाटिक समाजाने निषेध नोंदवलाय .विक्रीच झाली नाही तर खाणार कोण ?असा सवाल करत केडीएमसी अधिकार्यांचे म्हणणं हास्यास्पद आहे ..आमचा विरोध कायम राहणार ,आम्हि उपायुक्त कांचन गायकवाड यांना निवेदन दिले आहे ,केडीएमसी ने निर्णय मागे घेतला तर केडीएमसीचे स्वागत करू ..अन्यथा 15 ऑगस्ट रोजी केडीएमसी मुख्यालयासमोर कोंबड्या बकऱ्या घेऊन उपोषणा ला बसणार byte... परवेज शेख. मटण विक्रेता byte.. योगेश गोडसे हिंदी / मराठी अतिरिक्त आयुक्त.
9
comment
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 12, 2025 10:30:42
Khed, Maharashtra:
Feed 2C Slug: Khed Pait Accident 10 Death Spot File:02 Rep: Hemant Chapude(Khed) Anc: पुण्याच्या खेड तालुक्यातील कुंडेश्वरच्या दर्शनाला निघालेल्या 40 महिला भाविकांच्या पिकअप गाडीचा घाटाच्या मध्यावर अपघात होऊन 10 महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय,तर 29 महिला भाविकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या वरती सध्या रूग्नालयात उपचार सुरू आहेत या दुर्दैवी घटनेनंतर या अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला असून कुंडेश्वर देवस्थान क वर्ग दर्जाचे झाल्यानंतर या परिसरात झालेल्या विकास कामांमधील रस्ते खड्डेमय झाले घाट तयार करताना तांत्रिक बाबी न तपासल्याने घाटाचा भाग मोठा झाला अशातच भाविकांनी घेऊन जाणारे पिकअप गाडी घाटाचा चढ चढण्याऐवजी माघारी रिटन परत खाली आली, आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी थेट शंभर फूट खोल दरीत कोसळली, महत्त्वाचं म्हणजे ही गाडी ओव्हरलोड असल्याची माहिती स्थानिक नागरिक सांगत असून,या अपघाता नंतर चालकावरती ही संदोष मनुष्यवधाचा चा गुन्हा म्हाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल झालाय, त्यामुळे या अपघाताला जबाबदार कोण याची चौकशी व्हायला हवी अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत यावेळी घटनास्थळावरून या अघाताचा आढावा घेत ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... Wkt+121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To ग्रामस्थ प्रथम दर्शनी प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे...
7
comment
Report
MNMAYUR NIKAM
Aug 12, 2025 10:04:24
Buldhana, Maharashtra:
आ संजय गायकवाड बाईट गेल्या दहा महिन्यापासून कोणत्याच योजनेवरती पैसे नाही हे खर आहे.. मागील दोन अधिवेशनामध्ये बजेट नुसार पैसे नाहीत.. कोणत्याही मंत्र्याकडे गेले की सांगतात पैसे नाहीत..मात्र पुढील काळात परिस्थिती सुधारेल अस मुख्यमंत्री सांगतात.. बाईट - आ संजय गायकवाड
12
comment
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 12, 2025 10:03:53
Beed, Maharashtra:
बीड ब्रेक: वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडे यांचे वर्चस्व कायम Anc: वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव झालाय. केवळ 1407 मतं राजाभाऊ फड यांना मिळाले असून त्यांच्या समोरील उमेदवार रमेश कराड यांचा 14316 मतांनी विजय झाला आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच शरद पवार गटाने उमेदवार दिले होते. शरद पवार गटाचे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात प्रामुख्याने राजाभाऊ फड यांचा हा दारून पराभव आहे. वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मुंडे बहीण भाऊ एकत्र होते. पंकजा मुंडे यांनी आपले वर्चस्व कायम राखल्याचे दिसून आले. बाईट: रमेश कराड - विजयी उमेदवार
12
comment
Report
UPUmesh Parab
Aug 12, 2025 10:02:37
Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग ---- माजी खासदार विनायक राऊत byte --- *ऑन विजयदुर्ग किल्ला* --- छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर पैसे उकळविणाऱ्यांचे सध्या दिवस आहेत. सध्याच्या राज्यकर्त्यांनी लाखो रुपये उखळण्याचे काम केले आहे. किल्ल्याच्या परिस्थितीला पुरातत्व विभागासोबत इथले पालकमंत्री जबाबदार आहेत. माजी खासदार विनायक राऊत यांचा आरोप *ऑन भरत गोगावले* ( बैठक उपस्थिती नाही ) ---- एकनाथ शिंदे गटाला अंतर्गत कुरघोडीनी पोखरल आहे. संजय गायकवाड संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांना थोपवण एकनाथ शिंदेना पेलणार नाही. *रायगडच पालकमंत्री पद कोणत्याही परिस्थितीत अजित पवार गटाला मिळणार* आपल्याला मिळणार नाही हे गोगावलेंना माहिती असल्याने ते आता ओम फट स्वाहा करायला निघालेले आहेत. *ऑन संजय गायकवाड वक्तव्य* ( बापाला कॉपी करणं ) --- असल्या वात्रट आणि अक्कल शून्य लोकांची कीव करावीशी वाटते. तुमच्या वात्रट चाळ्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होतेय. त्यामुळे राज्यातील जनता ज्याला बाप दाखवायचा आहे त्याला नक्की बाप दाखवेल. *ऑन उदय सामंत* ( भाजप डिवचन ) --- हे उदय सामंत यांचं शिंदे गटावरच नकली प्रेम आहे. जिकडे सरशी असते तिकडे धावत जाणारे उदय सामंत. भाजपशी पंगा घेतील अस मला वाटत नाही. *ऑन भास्कर जाधव* --- भास्कर जाधव ज्या अर्थी आरोप करत आहेत त्यात नक्की तथ्य असेल. *ऑन सिंधुदुर्ग उबाठा* ( दोन गट ) --- वैभव नाईक आणि मी एकत्र आहोत संघटनेच्या कामासाठी कटिबद्ध आहोत. काही रिकाम टेकडे लोक हे कंडे पिकवण्याचे धंदे करत आहेत. byte विनायक राऊत, माजी खासदार उबाठा feed on desk
13
comment
Report
MKManoj Kulkarni
Aug 12, 2025 10:00:43
Mumbai, Maharashtra:
अँकर -- कबुतरांमुळे मानवी आरोग्य धोक्यात येत असल्याने मुंबईतील कबूतर खाणे बंद करण्यात यावे असे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.यावरून बरेच रणकंदन सुद्धा माजले होते.अनेक ठिकाणी अजूनही कबुतरांना खाद्य दिले जाते.गेट वे ऑफ इंडिया येथेही कबूतर खाना आहे.पर्यटक कबुतरांना खाद्य देत असतात पण गेल्या काही दिवसात या ठिकाणी खाद्य देणाऱ्यांना पालिका कर्मचारी बसू देत नाही त्यामुळे येथील कबुतरांची संख्या कमी झाल्याचे दिसते.याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी  Wkt  मनोज कुळकर्णी  Feed send TVU 48  Slug-- Gate way Kabutarkhana wkt 
13
comment
Report
Advertisement
Back to top