Back
विल्होळीत भंगार गुदामात भीषण आग, अग्निशमन दलाच्या शर्थीचे प्रयत्न!
SGSagar Gaikwad
Aug 28, 2025 03:17:22
Nashik, Maharashtra
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_fire
विल्होळीत भंगार मालाच्या गुदामात आग
अँकर
मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिकच्या विल्होळी शिवारात असलेल्या जैन मंदिराच्या पाठीमागील एका भंगार - मालाच्या प्लास्टिकच्या गुदामाला काल भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार - ते पाच बंबांच्या साहाय्याने शर्थीचे प्रयत्न करत सुमारे दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. घटनेची माहिती मिळताच नाशिक तालुका पोलिसांच्या पथकानेही धाव घेतली होती. नाशिक तालुका पोलिस ठाण्याच्या -हद्दीतील जैन मंदिराच्या पाठीमागे असलेल्या एका भंगार मालाच्या गुदामाला सायंकाळच्या सुमारास अचानकपणे भीषण आग लागली घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचारी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच मनपा अग्निशमन मुख्यालयात संपर्क साधून मदत मागविण्यात आली. सिडको उपकेंद्रावरील दोन बंब एकापाठोपाठ रवाना करण्यात आले. त्यानंतर अंबड एमआयडीसी व सातपूर केंद्रावरील प्रत्येकी एक असे एकूण चार बंब घटनास्थळी पाठविण्यात आले होते..
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowAug 28, 2025 10:49:47Manmad, Maharashtra:
अँकर :- मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या मनमाड रेल्वे स्थानकातून येवला ,मनमाड, नांदगाव येथील शेकडो मराठा बांधव जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना झाले.यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.आता आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचे नाही असा निर्धार मराठा आंदोलकांनी केलाय.यावेळी मुस्लिम समाजाने मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला सकाळपासूनच मनमाड रेल्वे स्थानकावर परिसरातील मराठा बांधवांची गर्दी जमायला सुरुवात झाली होती या प्रसंगी घोषणाबाजी करत जनशताब्दी एक्सप्रेस ने सर्व मराठा आंदोलन मुंबईच्या दिशेने रवाना झाले
3
Report
SNSWATI NAIK
FollowAug 28, 2025 10:49:10Navi Mumbai, Maharashtra:
story slug - नवी मुंबई मद्ये मराठी अमराठी वाद
नवी मुंबई मे मराठी हिंदी वाद
FTP slug - nm marathi hindi
shots-
reporter - swati naik
navi mumbai
anchor -
पनवेलमध्ये पुन्हा हिंदी मराठी वाद समोर
पनवेल येथील गोदरेज बिल्डिंगमध्ये हिंदी मराठी वाद समोर
देशात फक्त हिंदीचं बोलणार, हिंदी बोलणाऱ्या रहिवासीयांची दादागिरी
मराठी मे बोलता भी नही और ना कभी बोलुंगा
हिंदी भाषिक नागरिकांची दादागिरी
gf-
2
Report
AKAMAR KANE
FollowAug 28, 2025 10:48:25kolhapur, Maharashtra:
Ngp OBC Taywade
live u ने फीड पाठवले
--=------*
राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून शनिवारपासून नागपुरात साखळी उपोषण करण्यात येणार आहे... मराठा आरक्षण करता जरांगे पाटील मुंबईला रवाना झाले असताना आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नागपुरात महत्त्वाची नियोजन बैठक झाली.. या बैठकीत जरांगे पाटील यांच्या आंदोलनात उत्तर देण्याकरता राष्ट्रीय ओबीसी महासंघाने रणनीती आखताना शनिवारपासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्याचं जाहीर केलं... नागपुरातील संविधान चौकात हे साखळी उपोषण शनिवारी सकाळपासून सुरू होईल... दरम्यान विविध जिल्ह्यांमध्ये ओबीसी महासंघाचे पदाधिकारी जनजागृती ही करणार आहे...गरज पडल्यास ओबीसी समाजही मुंबईकडे कूच करेल हे पण बैठकीत निश्चित करण्यात आलं.... ओबीसी समाजातील लोकप्रतिनिधी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आलं...
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायडे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
------------
बाईट
बबनराव तायवाडे,अध्यक्ष,राष्ट्रीय ओबीसी महासंघ
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 28, 2025 10:48:13Manchar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Manchar Jarange Welcome
Rep: Hemant Chapude(Manchar)
Anc: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईच्या दिशेने निघाल असून मनोज जारंगे पाटील यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी गडावरती जाऊन जन्मस्थळी नतमस्तक होत शिवजन्मभूमीची माती आपल्या कपाळी लावून जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेत जरांगे पाटील यांचा आजचा दौरा नारायणगाव मंचर राजगुरुनगर चाकण मार्गे ते मुंबईकडे जाणार असून जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मंचर शहरात जय्यत अशी तयारी करण्यात आलीय याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
Wkt+121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To दत्ता गांजाळे (मराठा समन्वयक)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया मंचर पुणे...
0
Report
JMJAVED MULANI
FollowAug 28, 2025 10:47:59Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 2808ZT_INDAPURSHIVNDR
BYTE3
इंदापूर *सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले बाईट ऑन मराठा आरक्षण*
*ऑन_जरांगे पाटील मोर्चा*
यामध्ये काय झालं मला कल्पना नाही.
समितीची सर्वात मीटिंग झाली आहे.
मराठा आरक्षणाच्या बाबतीत योग्य पद्धतीने तोडगा निघाला पाहिजे.
अध्यक्ष म्हणून पूर्ण अधिकार विखे पाटील यांना दिले आहेत.
आज मंत्री म्हणून मी उभा आहे यापूर्वी मी आमदार होतो सर्व मोर्चात मी होतो.
आरक्षणाबाबत माझी एकच भूमिका आहे मराठा समाजाला ज्या आरक्षण आपण मागत आहोत ते उद्या कोर्टात आरक्षण दिल्यावर कोण नाही कोण ते रद्द करा म्हणून जाणार काहींचा तसा डाव आहे. त्यावेळी ते टिकलं पाहिजे.
हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल कोणीही कुठेही जाऊ दे दिलेल्या आरक्षणाला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे रद्द नाही झालं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा प्रयत्न आहे.
*ऑन_एक दिवसाची परवानगी चेष्टा*
कोर्टाने यामध्ये आदेश केले आहेत.
लोकशाही मार्गाने होणारा आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न नाही.
आम्ही लोकशाही मानणारे सर्वजण आहोत.
मी पण एक मराठा समाजाचा घटक आहे.
आरक्षणाची झळ मला बसत नसेल माझी परिस्थिती चांगली असेल पण मराठा समाजातील अनेक लोक आहेत त्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे.
सरकार आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यात सहानुभूतीपूर्वक विचार करून चांगला तोडगा निघावा यासाठी प्रयत्न करत आहेत.
*ऑन_जरांगे आंदोलन समर्थन*
आरक्षणाच्या मुद्द्याला पहिल्यापासून माझ्या समर्थन आहे. आज सुद्धा आहे.
शेवटी आरक्षण मिळाला पाहिजे.
गरजू मराठा समाजातील लोकांना आरक्षण मिळावे आमची पहिल्यापासून ची भूमिका आहे.
*ऑन_मुंबई भाजप बॅनरबाजी*
ते खरं आहे.
ज्यावेळी पहिला आरक्षण दिलं गेलं त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते.
त्यावेळी ते हायकोर्ट चॅलेंज केलं गेलं. हायकोर्टामध्ये ते टिकलं.
त्यानंतर निवडणुका झाल्या, पुन्हा हायकोर्टामध्ये ते रद्द झालं.
आपला आरक्षण जे उडालं ते निवडणुका झाल्यानंतरच्या नंतर आरक्षण गेलं.
मागच्या गोष्टी काढण्यापेक्षा आज आपल्याला काय पाहिजे ते बघितलं पाहिजे.
घटनेच्या चौकटीमध्ये आणि कायद्याच्या चौकटीत बसल असं कायमस्वरूपी आरक्षण मराठा समाजाला मिळावं.
महायुतीचा सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के प्रयत्नशील आहे.
*ऑन_तोडगा*
नक्की तोडगा निघेल
शिष्टमंडळ असो किंवा त्या समितीमध्ये मी पण आहे.
तुमचा जरांगे पाटील यांना भेटू त्यांच्याशी आपल्या पाचोळ्याच्या ज्या गोष्टी आहेत करता येतील त्या करू.
घटनेचा पेच निर्माण करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपल्याला केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्याशी समन्वय साधून निर्णय घ्यावे लागतील.
0
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 28, 2025 10:47:30Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
Sng_rathotsav
स्लग - तासगावचा ऐतिहासिक रथोत्सव
पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा..दीड दिवसांच्या बाप्पांना देण्यात आला निरोप
अँकर - सांगलीच्या तासगाव मद्धे पारंपारिक पद्धतीने 246 वा रथोउत्सव सोहळा उत्साहात पार पडला.हजारो भक्तांच्या उपस्थितीत मोरयाच्या जयघोषात तासगाव गणपती संस्थांच्या दीड दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला आहे.हजारो गणेशभक्तांनी दोरखंडाच्या सहाय्याने हा लाकडी रथ ओढला जातो, गणपती मंदिरा पासून हा रथ नजीकच अर्धा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या काशी विश्वेश्वर मंदिरा पर्यंत ओढत नेला जातो. आणि भक्तीपूर्ण वातावरणात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.ढोल-ताशांचा गजरासह हत्ती घोडयांसह निघालेल्या रथोत्सव मध्ये गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, गुलाल खोबरयांची उधळण करत दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला. या रथोत्सवात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातुन हजारो भाविकांनी उपस्थितीत लावली होती.
0
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 28, 2025 10:33:39Nashik, Maharashtra:
nsk_trainganesh
फीड by 2C
Anchor :- राज्यात लाडक्या गणरायाचे उत्साहात स्वागत होत असताना यंदा मात्र नाशिकच्या मनमाड - लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेसमध्ये होणारी गणरायाची रेल्वे वारी हुकणार आहे. दरवर्षी चाकरमानी मोठ्या भक्तिभावाने गणरायाची पासबोगीमध्ये प्रतिष्ठापणा करतात आणि दहा दिवस गणरायाची मनमाड - मुंबई वारी होत असते.गेल्या 28 वर्षांपासून ही परंपरा आहे.गोदावरी एक्स्प्रेसचा गणेशोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.मात्र रेल्वे प्रशासनाने गोदावरी एक्सप्रेस धुळ्यापर्यंत वाढविल्याने धावत्या रेल्वेत गणपतीची प्रतिष्ठापना करण्यास अडचण येणार असल्याने यंदा गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळाने गणपती न बसविण्याचा निर्णय घेतल्याने 28 वर्षांनंतर प्रथम गणरायाची रेल्वे वारी खंडित होणार असल्याने गणेशभक्त, चाकरमानी तसेच प्रवाशांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 28, 2025 10:18:53Jalna, Maharashtra:
FEED NAME : 2808ZT_JALNA_DEATH_CCTV(1 FILES)
जालना : सिंधीबाजारातील पत्र्याच्या शेडमध्ये विद्यूत प्रवाह,पावसात शेडचा आधार घेतलेल्या 45 वर्षाच्या नागरिकाचा शॉक लागून मृत्यू,नागरिकाला वाचवण्यासाठी गेलेली 14 वर्षीय मुलगीही गंभीर
शॉक लागल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर
सिंधी बाजार भागातली घटना
अँकर : पावसात टीन पत्र्याच्या शेडचा आधार घेणं जालना शहरातील एका नागरीकाच्या जीवावर बेतलं आहे.पाऊस आलेला असताना ओलं होऊ नये म्हणून एक 45 वर्षीय नागरीक टिनपत्र्याच्या शेडजवळ जाऊन उभा राहिला. मात्र या शेडला या नागरीकाचा धक्का लागल्यानं शॉक लागून त्याचा मृत्यू झाला आहे.45 वर्षीय मितेश बिधानिया असं मृत्यू झालेल्या नागरीकाचं नाव असून तो शहरातीलच लक्कडकोट भागातील रहिवासी आहे.दरम्यान या नागरिकाला शॉक लागून खाली पडल्याचं लक्षात येताच त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या 14 वर्षीय मूनमून नवलकर ही मुलगीही शॉक लागून गंभीर जखमी झाली आहे.या जखमी मुलीवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
2
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 28, 2025 10:18:24Nashik, Maharashtra:
*Breaking.... विशाल मोरे, मनमाड*
- स्लग :
ANC :-आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मनमाड,मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मोठया संख्येने मराठा बांधव ट्रेन ने मुंबईकडे रवाना झाले
*बाईट: मराठा बांधव*
3
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 28, 2025 10:17:26Raigad, Maharashtra:
स्लग – माणगावच्या चेरवली येथे जुन्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन ....... संतोष खडतर यांच्या घरच्या गणेशोत्सवात सजावट ........... कोकणातील जुन्या पदधतीचे साकारले घर ........
अँकर – रायगडच्या माणगाव तालुक्यातील चेरवली येथील संतोष खडतर यांच्या घरच्या गणेशोत्सवात जुन्या ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात त्यांनी जुन्या काळातील घराचा देखावा साकारला आहे. अगदी 20 – 25 वर्षांपूर्वी पर्यंत कोकणात असलेली घरांची ठेवण, घरासभोवतालचा परीसर, घरातील नेहमीच्या वापरातील वस्तू म्हणजे जाती, उखळ, पाटा वरवंटा, नांगर, तुळशी वंदावन, कंदील अशा वस्तू मांडल्या आहेत. आपली जुनी संस्कृती हळूहळू काळाच्या ओघात लोप पावत चालली आहे अशावेळी जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न यातून केल्याचे संतोष खडतर यांनी सांगितले. हा देखावा साकारण्यासाठी जवळपास 20 – 25 दिवस मेहनत घेतली आहे.
बाईट – संतोष खडतर
बाईट - साहिल खडतर
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 28, 2025 10:17:01Beed, Maharashtra:
बीड: आरक्षण लढ्यासाठी मुंबईकडे निघालेल्या आंदोलनकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू , खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून फेसबुक पोस्ट शेअर
Anc : मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेल्या सतीश देशमुख यांचा पुणे जिल्ह्यात हृदयविकाराने मृत्यू झाला. आंदोलकाचा मृत्यू झाल्याची माहिती बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून शेअर केली आहे. सतीश देशमुख हे बीडच्या केज तालुक्यातील वरपगाव येथील रहिवासी आहेत.. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे ते थांबलेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यात त्यांचा मृत्यू झाला. आंदोलनाच्या प्रश्नासाठी जात असलेल्या आंदोलकांनी प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहनही खासदार सोनावणे यांनी केली आहे.
1
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 28, 2025 10:16:45Jalna, Maharashtra:
FEED NAME : 2808ZT_JALNA_AMBAD(9 FILES)
जालना : अंबडच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची गर्दी, डॉक्टरांची रुग्णालयात दांडी, डॉक्टरांवर कारवाईची मागणी
अँकर :जालन्यातील अंबडच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढलीय.सध्या अंबड तालुक्यात सर्दी तापेचे रुग्ण वाढले आहेत.या रुग्णांनी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतलीय. पण रुग्णालयात डॉक्टरच नसल्यानं रुग्णांचे हाल होतायत.उपचारासाठी रुग्णांनी दवाखान्यात रांगा लावल्यायत.उपचारासाठी रांगेत उभी असलेली एक महिला चक्कर येऊन खाली कोसळली.मात्र तिला उचलायला देखील कुणीच न आल्याचा आरोप नागरीकांनी केलाय.तर रुग्णालयात दांडी मारणाऱ्या डॉक्टरांवर देखील कारवाईची मागणी नागरीकांनी केलीय.
बाईट : शिवप्रसाद चांगले, माजी नगसेवक, अंबड
3
Report
Waghapur, Maharashtra:
आज दिनांक २८ ऑगस्ट रोजी बाभुळगाव तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा ‘विद्यार्थी संवाद दौरा’ झाला . या उपक्रमाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी केले. या दौऱ्यात शाळा, महाविद्यालये तसेच वसतिगृहांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मूलभूत सोयीसुविधा आणि इतर अडचणी जाणून घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या समस्या प्रशासनासमोर मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कटिबद्ध असल्याचे नानवटकर यांनी सांगितले. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना योग्य मंच मिळेल आणि त्यांना न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
4
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 28, 2025 10:00:31Beed, Maharashtra:
बीड: वाण नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे वाहून गेले, एकाचा मृतदेह सापडला
Anc- काल झालेल्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्यातील धारूर आणि केज परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. केजच्या मांजरा धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने अनेक नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. धारूर तालुक्यातील वाण नदी देखील तुडुंब वाहत आहे. आणि याच पाण्याचा अंदाज आला नसल्याने दोघे जण वाहून गेले. गावकरी आणि पोलिसांच्या शोध मोहिमेनंतर एका नितीन कांबळे या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. तर एक जण अद्याप बेपत्ता आहे. दुसरा मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.. दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
0
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 28, 2025 09:51:44Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_CHORI_CCTV
सातारा- साताऱ्यात प्रतापसिंह नगर रस्त्याला हार्मोनी पार्क येथे महिलेला कोयत्याचा धाक दाखवून मंगळसूत्र लुटण्याची घटना घडलीये..दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमानी कोयत्याचा धाक दाखवून ही जबरी लूट केली आहे.आज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलांना लक्ष करत लुटमार करण्यात आली असून मेडिकल कॉलेज समोर ही घटना घडल्याने महिलांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे..जिवाच्या भीतीने महिलांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र एक महिला पळताना खाली पडली आणि लुटारूनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला..तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये महिलांनी जिवाच्या भीतीने आरडाओरडा करत गेटवरून उडी मारलीये.. ही संपूर्ण घटना cctv कॅमेऱ्यात कैद झाली असून महिला वर्गात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे..
3
Report