Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला में 'आई लव मोहम्मद' बैनर पर भारी प्रदर्शन, कानपुर कांड हलचल फैलती है

JJJAYESH JAGAD
Sept 26, 2025 11:06:03
Akola, Maharashtra
Anchor : उत्तरप्रदेशच्या कानपूर येथे "आय लव्ह मोहम्मद" या बॅनरवरून उफाळलेला वाद आता उत्तर प्रदेशपुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रातही पोहोचला असून त्याचे पडसाद अकोल्यात उमटले आहेत.आज अकोला शहरातील मोहम्मद अली चौक येथे मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत कानपूर घटनेचा निषेध व्यक्त केला.या आंदोलनादरम्यान मुस्लिम बांधवांनी हातात "आय लव्ह मोहम्मद" असे बॅनर घेऊन शांततेत पण ठाम भूमिका मांडली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस प्रशासनाने परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता.या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला. अकोल्यातील मुस्लिम समाजाने सांगितले की, हा निषेध केवळ धार्मिक भावनांच्या संरक्षणासाठी असून समाजात कोणताही तणाव निर्माण करण्याचा हेतू नाही.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Sept 26, 2025 13:35:50
Yavatmal, Maharashtra:पंजाब सरकार पूरग्रस्त शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करू शकते तर महाराष्ट्र सरकार मधील महायुतीच्या हाताला लकवा मारला आहे का असा संतप्त सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यवतमाळ च्या बेलोना येथे वडेट्टीवार यांनी अतिपावसाने व येलो मोझॅक मुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. सरकारने दिल्लीकडे बोट दाखवणे बंद करून तिजोरी खाली करावी व शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. शासन सुस्त असल्यामुळे, प्रशासन शेतकऱ्यांसाठी जागरूक नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. बाईट : विजय वडेट्टीवार
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 26, 2025 13:06:29
Washim, Maharashtra:वाशीम : File:2609ZT_WSM_DHANGAR_ANDOLAN रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:हैदराबाद गॅझेटनुसार धनगर समाजाला आदिवासी एसटी आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे.वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच मालेगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.जालना येथे दीपक बोहाडे यांचे आमरण उपोषण आज दहाव्या दिवशी पोहोचले असून शासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.याला पाठिंबा म्हणून वाशीम व मालेगाव येथे धरणे आंदोलन झाले.धनगर समाजाला एसटी आरक्षणाबाबत शासनाने तात्काळ निर्णय घेतला नाही,तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारवर राहील असा इशार देण्यात आला.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 26, 2025 12:47:43
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात सोशल मीडियावर पोस्ट करत रिलस्टारने केली आत्महत्या - सोलापुरात रीलस्टारने सोशल मीडियावर पोस्ट ठेवत केली आत्महत्या, शेळगी भागातील धक्कादायक प्रकार. - प्रज्वल कैनूर असं रीलस्टार असलेल्या युवकाचे नाव, प्रज्वल यांनी गळफास घेऊन केली होती आत्महत्या. - 'आज हम है, कल हमारी याद होगी' असा इंस्टाग्रामवर मेसेज करून आपल्या भावना केल्या होत्या व्यक्त. - प्रज्वल हा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कामाला होता. - प्रज्वल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी दोन फोटो शेअर करत संदेश देत आपलं दुःख दाखवण्याचा केला प्रयत्न. - तर दुसऱ्या पोस्टमध्ये 'सॉरी पब्लिक, माफ करा मित्रांनो, खूप मोठा निर्णय घेत आहे, माझी आई माझा भावाची काळजी घ्या, इच्छा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. - याप्रकरणी सोलापुरातील सिव्हिल पोलीस चौकी येथे नोंद झाली आहे..
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 26, 2025 12:34:17
Nashik, Maharashtra:feed by amar kahaane Anchor देशाच्या संरक्षण क्षेत्रावर अमिट ठसा उमटवल्याने नाशिककरांच्या सार्थ अभिमानाचा विषय असलेली 'मिग २१' ही लढाऊ विमाने इतिहासजमा करण्यात आलियेत. त्या विमानांच्या निर्मितीमागील राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत नाशिकच्या योगदानासह विमानाच्या स्मृती चिरंतन राहणार आहेत. Vo 1 1964 मध्ये यशवंतराव चव्हाण यांना नाशिकने खासदार म्हणून निवडून दिले आणि देशाचे संरक्षणमंत्री करत पंडित नेहरू यांनी देशाच्या सुरक्षेची कमान त्यांच्या हाती सोपविली. त्यावेळी देशाची हवाई सुरक्षा करण्यासाठी रशियाची मदत घेण्यात आली. भारत आणि रशिया यांच्यात झालेल्या करारानुसार १९६४ ते १९९५ या सुमारे तीन दशकांच्या कालावधीत ८७४ मिग २१ लढाऊ विमाने निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यातील तब्बल ६५७मिग २१ विमानांची निर्मिती प्रक्रिया नाशिकनजीकच्या ओझर एचएएलमध्ये करण्यात आली.मिग २१ चे टाइप ७५, टाइप ७७, टाइप २६ आणि बायसन, अशा स्वरूपातील अपग्रेडेड विमानांची निर्मिती करण्यात आली. ओझर एचएएलच्या कारखान्यालगतच भारतीय हवाई दलाचे देखभाल व दुरुस्ती केंद्र १९७४ मध्ये सुरू करण्यात आले. त्यामुळे हे केंद्र आणि ओझर एचएएल या दोन्ही ठिकाणी मिग २१ विमानांची देखभाल व दुरुस्ती करण्यात येत होती. प्रारंभी रशियन अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ विमानांचे असेम्ब्लिंग झाली. त्यानंतर ओझर येथे सर्व सुट्या भागांची जुळणी आणि मिग २१ विमानाची निर्मिती करण्यात आली. Byte अमर कहाणे यांनी पाठविला आहे Vo 2 १९६२ च्या चीनविरुद्धच्या युद्धातील पराभवानंतर भारतात लढाऊ विमान निर्मिती सुरू करण्यासाठी रशियाने तंत्रज्ञानासह तांत्रिक आणि कुशल मनुष्यबळासह सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नाशिकनजीकच्या ओझरची जागा निश्चित झाल्यावर १९६४ पासूनच या विमानांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. तेव्हापासून रशियन इंजिनिअर्सच्या मार्गदर्शनाखाली भारतीय अभियंते, तंत्रज्ञांनी तब्बल ३० वर्षे दरवर्षी किमान २० ते २५ विमानांची निर्मिती केली. GFX मिग चा पराक्रम १९७१ साली झालेल्या भारत-पाक युद्धात याच मिग-२१ विमानांनी पाकिस्तानची चार एफ-१०४ विमाने पाडली होती. दोन एफ ६ विमाने, एफ-८६ साब्रे ॐ विमान आणि एक लॉकहीड सी-१३० हर्म्युलस विमान यांचा धुव्वा उडवला होता. या हवाई युद्धाने जगाचे लक्ष भारताच्या हवाईदलाकडे आणि मिग-२१ या विमानांकडे वेधले गेले होते. त्यानंतर १९९९ मध्ये 3 कारगिलवरून भारत-पाक युद्ध छेडले गेल्याने या युद्धातही मिग-२१ विमानांचा वापर भारताने केला. भारतीय हवाईदलाच्या याच विमानांनी हवेतल्या हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा प्रयोग करून पाकिस्तानी नौदलाचे ब्रिगेट अलांटिक विमान पाडले होते. Byte अमर कहाणे यांनी पाठविलेला Vo आता फ्रान्स शी झालेल्या करारानुसार राफेल हायप्रसनिक विमानाची निर्मिती आणि तेजस या भारतीय बनावटीच्या विमानांची निर्मिती करत भारतीय सीमा अधिक बळकट केल्या जाणार आहेत. मात्र मिगच्या इतिहासातील पाऊलखुणावर आता हवाई सुरक्षा अधिक गडद होणारे
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 26, 2025 12:32:30
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये, जयंत पाटलांनी जाहीर करावे,पुन्हा असा विषय होणार नाही - आम्ही इशारा सभा रद्द करू - मंत्री चंद्रकांत पाटील. अँकर - काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत,तुम्ही तुमची पिलावळ शांत करणार नसाल, तर आम्ही देखील शांत बसणार नाही,असा इशारा भाजपाचे उंच व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दिला आहे, तसेचं पडळकरांचा विषय संपवायचा असेल तर जयंत पाटलांनी जाहीर करावं,या जिल्ह्यात अशा पद्धतीने कुठलाही विषय होणार नाही,आम्ही आमची इशारा सभा रद्द करतो,असं आवाहन भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांना केला आहे. तसेच सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा झालेली सभा महाराष्ट्र संस्कृती बचावसाठी नव्हती तर जयंत पाटील बचाव सभा होती, आणि जयंत पाटील हे धुतल्या तांदळासारखे आहेत,असा खोचक टोला देखील चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 26, 2025 12:31:27
Jalna, Maharashtra: FEED NAME : 2609ZT_JALNA_HINDU_SABHA(8 FILeS) आमदार संग्राम जगताप यांचा बाईट इनपुट पर्सनल व्हाट्स अँप वरून घ्यावा. जालना : जालन्यातील भोकरदनमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा आनवा गावात महादेवाच्या मंदिरात मासाचे तुकडे आढळून आल्याच्या निषेधार्थ घेण्यात आली सभा हिंदू आरोपींना अटक करून पोलिसांनी तपास भरकटवण्याचा प्रयत्न केल्याने हिंदू जनआक्रोश मोर्चा प्रत्येक गावात हिंदूत लॉरेन्स बिष्णोई तयार झाला पाहिजे म्हणजे गाय वाचेल-संग्राम बापू भंडारे आनवा प्रकरणी SIT स्थापन करावी-आमदार संग्राम जगताप जिथे अन्याय होईल तिथे मोर्चे काढू-जगताप अँकर: प्रत्येक गावात हिंदूत लॉरेन्स बिष्णोई तयार झाला पाहिजे म्हणजे हिंदूची गाय वाचेल असं वक्तव्य संग्राम बापू भंडारे यांनी केलं आहे. जालन्यातील भोकरदन येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू जनआक्रोश सभा आणि मोर्चात त्यांनी हे वक्तव्य केलं.जालन्यातील भोकरदन तालुक्यातील आनवा गावात महादेवाच्या हेमाडपंथी मंदिरात मांसाचे तुकडे आढळून आले होते. या प्रकरणी पोलिसांनी भरकटवणारा तपास करून हिंदू विरोधात गुन्हे दाखल केलेत या घटनेच्या निषेधार्थ आज भोकरदनमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा आणि सभेच आयोजन करण्यात आलं होतं.या सभेतून पोलिसांनी हिंदूला अटक केल्याचा निषेध नोंदवण्यात आला.या सभेला हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते.मोर्चात आमदार संग्राम जगताप हे देखील सहभागी झाले होते.आनवा येथील हेमाडपंथी मंदिरात गोमांस आढळून आलेलं असून या प्रकरणाची SIT स्थापन करण्याची मागणी सरकारकडे केल्याचं संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे.लवकरात लवकर राज्यात लव्ह जिहादचा कायदा तयार झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.प्रत्येक गावात हिंदूत लॉरेन्स बिष्णोई तयार झाला पाहिजे म्हणजे हिंदूची गाय वाचेल अस संग्राम बापू भंडारे यांनी म्हटलं आहे. बाईट संग्राम बापू भंडारे बाईट संग्राम जगताप आमदार
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 26, 2025 12:31:18
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 26, 2025 12:19:01
Baramati, Maharashtra: JAVEDMULANI SLUG 2609ZT_PURNDRJEJURI FILE 1 खंडेरायाला १२लाखांचा ८ किलो चांदीचा त्रिशूळ अर्पण. . दोन दिवसानंतर दुसरा त्रिशूळ खंडेराया चरणी अर्पण... Anchor:- अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हारी मार्तंडाच्या चरणी नवरात्र उत्सवाच्या काळात पनवेल येथील खंडेराया भक्त विकास तुकाराम कदम यांनी आठ किलो वजनाचा बारा लाख रुपये किमतीचा त्रिशूळ खंडेराया चरणी अर्पण केलाय. मागील दोन दिवसांपूर्वी सोळा लाख रुपयांचा अकरा किलो चांदीचा त्रिशूळ खंडोबा भक्त थेऊर गावचे सुजित काळे यांनी खंडेरायाच्या चरणी अर्पण केला होता. अनेक भाविक खंडेरायाला सोन्याचांदीचे दागिने अर्पण करीत असतात.... मार्तंड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांनी खंडेरायाचे भक्त विकास कदम यांचा ८ किलोचा चांदीचा त्रिशूळ अर्पण केल्याने सन्मान केला. दरम्यान या खंडेराया चरणी अर्पण केलेले दोन्हीही त्रिशूळ पाहण्यासाठी भाविक गर्दी करीत आहेत...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 26, 2025 12:18:44
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 26, 2025 12:18:38
Pandharpur, Maharashtra:Anchor - सीना नदीला आलेल्या पुरामुळे माढा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या महापुरामुळे तालुक्यातील सुमारे 3 हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागा उध्वस्त झाल्या आहेत. मोठ्या कष्टाने आणि हिमतीने वाढवलेल्या द्राक्ष बागा डोळ्यात देखत महापुरामध्ये वाहून गेल्याने या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी हताश झाला आहे. सीना नदीचा पूर ओसरल्यानंतर आता पिकांच्या नुकसानीची स्थिती समोर येत आहे. माढा तालुक्यातील मानेगाव, केवड, वाकाव,खैराव,कुंभेज,दारफळ निमगाव या भागातील हजारो हेक्टर वरील द्राक्ष बागा पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. अजूनही द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्याने द्राक्षाची वाढ खुंटली आहे तर दुसरीकडे पानांमध्ये गाळ साचल्याने बागा वाळून गेल्या आहेत. सततचा पाऊस आणि दलदलीमुळे उरल्या-सुरल्या भागांवर करपा, भुरी, डाऊनी,मूळकूज, तुडतुडे, मिलीबग या सारख्या रोग आणि किडींचा प्रादुर्भाव मोठ्या वाढला आहे. यंदा निसर्ग कोपल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी नितीन कापसे यांनी केली आहे. .... बाईट - नितीन कापसे, द्राक्ष उत्पादक शेतकरी माढा
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top