Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422103

सिन्नरमध्ये मराठा समाजाचा जल्लोष, मनोज जरांगे पाटील यांचा विजय!

SKSudarshan Khillare
Sept 02, 2025 15:32:19
Sinnar, Maharashtra
अँकर:- सिन्नर तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने मोठा जल्लोष साजरा करण्यातआला.सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्याची बातमी येताच, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे व राज्य सरकारचे आभार या वेळी सकल मराठा समाजाच्या वतीने मानण्यात आले
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Sept 04, 2025 01:27:17
Yavatmal, Maharashtra:
वणी (जि. यवतमाळ) येथे महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने ७ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय कापूस-सोयाबीन उत्पादकांची विराट परिषद होणार आहे. या परिषदेला किसान आंदोलनाचे नेते का. राजन क्षीरसागर, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते भाई तुकाराम भस्मे, किसान सभेचे राज्य अध्यक्ष ऍड. हिरालाल परदेशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. परिषदेत शेतमालाचा कायदेशीर हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी, विदेशी आयात बंदी, पिक विमा सुधारणा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, पायाभूत सुविधा व शासकीय खरेदी केंद्र वर्षभर सुरू ठेवण्यासह विविध मागण्यांवर चर्चा होईल. ही परिषद यशस्वी करण्यासाठी वणी, मारेगाव, झरी आणि राळेगाव तालुक्यातील ४०० हून अधिक गावांत प्रचारासाठी किसान सभे
12
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 04, 2025 01:17:05
Ambernath, Maharashtra:
बदलापुर पालिकेकडून पीओपी गणेश मूर्तींच विघटण   पालिकेचा अभिनव पर्यावरण पूरक उपक्रम Anchor  बदलापूर पालिके कडून पीओपी गणेश मूर्तींचं सेंद्रिय पद्धतीने विघटन करण्याचा अभिनव  उपक्रम राबविण्यात आला आहे . शहरातील दोन ठिकाणी हा पर्यावरण पूरक प्रयोग करण्यात आला  आहे . या पद्धतीने सत्तर ते ऐंशी तासांमध्ये पीओपी मूर्तींचे विघटन करण्यात येत .  शहरातील दोन ठिकाणी  अमोनियम बायकार्बोनेटचे ड्रम ठेवण्यात आले आसुन त्यात गणेश मूर्तींच विघटन करण्यात येत,  पीओपी मूर्तींपासून  होणाऱ जलप्रदूषण रोखण्यासाठी कुळगाव बदलापूर पालिकेने हा अभिनव प्रयोग राबविला असल्याचं पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सांगितलं. Byte मारुती गायकवाड, मुख्याधीकारी  नगरपालिका चंद्रशेखर भुयार , बदलापूर
14
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 04, 2025 01:16:48
Lasalgaon, Maharashtra:
अँकर,:- केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ या दोन नोडल एजन्सींमार्फत तब्बल तीन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी पूर्ण करण्यात आली आहे मात्र दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांचे तब्बल 200 कोटी रुपये थकीत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत याप्रकारणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून तातडीने हे पैसे व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत या मागणीसाठी नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सचिव देवेश चतुर्वेदी यांची भेट घेतली आहे
14
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 04, 2025 01:16:37
Lasalgaon, Maharashtra:
अँकर :- नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगाव येथून पिंपळगाव बसवंत येथे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर कोटमगाव येथे रेल्वे पाण्यामुळे पुलाखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे अनेक लहान मोठे अपघात होत आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप बाजार आवार खानगाव येथे भाजीपाल्याचा मोठा बाजार भरतो चार ते पाच तालुक्यातून शेतकरी भाजीपाला आपल्या वाहनांमध्ये घेऊन येतात आणि या खड्ड्यांमध्ये गाडीचे चाके अडकल्यामुळे ट्रॅक्टर वाहने पलटी होऊन शेतीमालाचेही मोठे नुकसान होते रेल्वेने 200 मीटर अंतरावर अंडरपास केलेला आहे मात्र त्या ठिकाणी दिवाने जाऊ नये म्हणून गडर लावल्यामुळे शेतकऱ्यांना आपले शेतीमाल याच मार्गावरून घेऊन जावे लागत असल्याने आज एका ट्रॅक्टर मधून येवला तालुक्यातील सोमठाणा येथील शेतकरी मिरची घेऊन जात असताना टारली पलटी झाल्याची घटना घडली यात या शेतकऱ्याचे मिरचीचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे या पुलाखालील खड्डे बुजवण्याची मागणी जोर धरू लागली आहे
14
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 04, 2025 01:16:28
Sinnar, Maharashtra:
अँकर:- बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता वेगळे आरक्षण द्यावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील  समता परिषद, बारा बलुतेदार संघ व सकल ओबीसी बांधव यांच्या वतीने देण्यात आला आहे. मागण्याचे निवेदन सिन्नरचे तहसीलदार यांना  देण्यात आले.
12
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 04, 2025 01:16:24
Yeola, Maharashtra:
अंकात:- येवला शहरातील क्षत्रीय ग्रुपच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात एक भव्य व दैदीप्यमान देखावा साकारण्यात आला आहे. "रौद्रशंभू" या नावाने सादर होत असलेल्या या देखाव्यात छत्रपती संभाजी महाराजांनी सातारा जिल्ह्यातील एका प्राचीन शिवलिंगाचा केलेला अभिषेक दाखवण्यात आला आहे. हा ऐतिहासिक प्रसंग अलीकडेच *"छावा"* चित्रपटामध्येही प्रेक्षकांनी अनुभवला होता.
14
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 04, 2025 01:16:05
Yeola, Maharashtra:
अँकर येवला शहरातील मधली गल्ली येथील श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ यावर्षीच्या गणेशोत्सवात भक्तिमय आणि ऐतिहासिक सजीव देखावा सादर करत आहे. मंडळाने दुर्गामातेचा महाकाली अवतार उभा करून रक्तबीज राक्षसाचा वध हा प्रसंग कलात्मक पद्धतीने मांडला आहे. महाकालीने उन्मत्त स्वरूप धारण करून रक्तबीजाचा नाश केला. मात्र, रौद्र रूप धारण केलेल्या कालीमातेचा कोप शांत व्हावा यासाठी भगवान शंकरांनी स्वतः तिच्या पायाखाली छातीवर स्थान घेतले. हा अद्वितीय प्रसंग मंडळाने सजीव देखाव्याच्या माध्यमातून उभा केला.
13
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 04, 2025 01:15:54
Yeola, Maharashtra:
अँकर गणेशोत्सवाच्या पारंपरिक उत्साहात यंदा येवलातील संत गजानन महाराज मित्र मंडळ यांनी सादर केलेला नृसिंह अवताराचा सजीव देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली. धार्मिक वातावरणात भक्तीभाव, थरारक सादरीकरण आणि अप्रतिम सजावट यांचा सुंदर संगम मंडळाने उभा केला.भक्त प्रह्लादाची अढळ श्रद्धा, हिरण्यकश्यपूचा अहंकार आणि नृसिंहाचे क्रोधावतार या प्रसंगांच्या सादरीकरणाने गणेश भक्तांची मने जिंकली.
13
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 04, 2025 01:15:37
Beed, Maharashtra:
बीड: मुंबईहून मराठा आंदोलक गावी पोहचले, महिलांचा आनंद गगनात मावेना; मोठा जल्लोष Anc- मराठा आरक्षणासाठी हजारो आंदोलक मुंबईत पोहचले होते. मराठा आरक्षणाचा शासन निर्णय हाती आल्यानंतर आंदोलक त्यांच्या मूळ गावी पोहचले.. ग्रामस्थांनी त्यांचा येतेच्छ जंगी स्वागत केले. बीडच्या नांदूरघाट मध्ये महिलांनी गाण्यावर ठेका धरत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. आंदोलकांचा भव्य सत्कार करत गुलाल उधळून गावातून भव्य मिरवणूक काढली.. या मिरवणूक आनंदोत्सवात संपूर्ण गाव न्हाऊन निघाले होते.
14
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 04, 2025 01:15:21
Beed, Maharashtra:
बीड : बुलेटच्या कर्कश सायलेन्सरवर परळी पोलिसांची तोडक कारवाई... Anc : परळी शहरात कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटच्या सायलेन्सरवर पोलिसांनी थेट बुलडोझर चालवून मोठी कारवाई केली. गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांकडून या त्रासदायक आवाजाबाबत तक्रारी होत होत्या. परळी पोलिसांनी विशेष मोहिम राबवून तब्बल 49 बुलेटचे सायलेन्सर जप्त केले. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या परिसरातील रस्त्यावर हे सर्व सायलेन्सर ठेवून त्यावर बुलडोझर फिरवण्यात आला. या कारवाईनंतर शहरात समाधान व्यक्त होत असून, असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी पोलिसांनी युवकांना इशारा दिला आहे. बाईट : रघुनाथ नाचर, पोलीस निरीक्षक
14
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 03, 2025 17:31:07
Kolhapur, Maharashtra:
Story:- Kop Balgopal Tarun Mandal WT Feed:- Live U Anc:- कोल्हापुरातील दिलबार तालीम मंडळ देखील सामाजिक उपक्रमासह विविध धार्मिक कार्यक्रम राबवत गणेशोत्सव साजरा करतात.. यावर्षी दिलबहार तालीम मंडळाच्या वतीने दख्खनचा राजा गणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापना केली आहे. त्याचबरोबर नवदुर्गा गाभारा उभारला आहे. हा गाभारा पाहण्यासाठी कोल्हापूरकर मोठी गर्दी करत आहेत. याचाच आढावा घेऊन मंडळाचे पद्माकर कापसे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. Play WT पद्माकर कापसे, जेष्ठ सदस्य दिलबहार तालीम मंडळ
14
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 03, 2025 16:18:21
Kolhapur, Maharashtra:
Kop Pulgalli Vanaraj Ganesh WT Feed:- Live U Anc:- कोल्हापुरात देखील अनेक गणेश मंडळ सामाजिक भान जपत गणेशोत्सव साजरा करतात. त्यापैकीच एक असणारे उमा टॉकीज चौकातील पुलगल्ली तालीम मंडळ. 130 वर्षापासून या मंडळाच्या वतीने सामाजिक भान जपत गणेशोत्सव साजरा केला जातो.. यंदाही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वनांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी वनराज गजानन या 21 फुटी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केलीय.. याचाच आढावा घेवून मंडळाच्या कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. Play WT Byte 1:- अमोल कवडे, कार्यकर्ता Byte 2:- सिद्धार्थ मोळके, कार्यकर्ता
14
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 03, 2025 13:32:27
Kolhapur, Maharashtra:
Kop:- KMC Prabhag Rachana Feed:- Live U कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना जाहीर २० प्रभाग महापालिकेने केले जाहीर पहिल्यांदाच चार नगरसेवकांचा एक प्रभाग अशी रचना २० नंबरचा प्रभाग असणार पाच नगरसेवकांचा महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रभाग रचना पाहायला उपलब्ध Anc :- कोल्हापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर होताच सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत... काँग्रेसकडून सत्ताधाऱ्यांच्या सोयीची प्रभागरचना झाल्याचा आरोप करत त्याला तीव्र आक्षेप घेण्याचा इशारा दिलाय... तर भाजपने विरोधकांच्याकडे कोणतेच मुद्दे नसल्याने त्यांचे रडगाणे सुरू असून त्यांचे डिपॉझिट जप्त होईल असा पलटवार केलाय... Byte:- बाबा इंदुलकर, सामाजिक कार्यकर्ते Byte:- सचिन चव्हाण ,शहराध्यक्ष कांग्रेस Byte :- महेश जाधव, सचिव, भाजप
12
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 03, 2025 13:30:48
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0309ZT_CHP_BJP_ROW ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर शहर भाजपात गणेश विसर्जन मिरवणुकीवरून पक्षातील शिस्तीचेही विसर्जन, विसर्जन मिरवणुकीत मुनगंटीवार -जोरगेवार यांचे शेजारी असतील स्वतंत्र मंडप , मनपा आणि पोलीस प्रशासनासाठी झाली डोकेदुखी, चंद्रपूर भाजपातील  मुनगंटीवार - जोरगेवार वादाचा नवा अंक बघायला मिळणार      अँकर:-- 6 सप्टेंबर रोजी चंद्रपूरसह राज्यभरात अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन मिरवणुकीची धामधूम राहणार आहे. चंद्रपूरच्या दोन प्रमुख रस्त्यांवर या दिवशी गणेश भक्तांची एकच गर्दी असते. चंद्रपुरात विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांचे स्वागत करण्याची विविध पक्ष व सामाजिक संघटनांची परंपरा राहिली आहे. यासाठी मुख्य रस्त्यावर मंडप उभारून कार्यकर्त्यांचे -मंडळ पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले जाते. याचसाठी शहरातील लोकमान्य शाळेपुढे मंडप उभारण्यावरून आ. मुनगंटीवार आणि आ. जोरगेवार यांच्यातील वादाचा नवा अंक बघायला मिळणार आहे. चंद्रपूर शहर भाजपात गणेश विसर्जन मिरवणुकीवरून पक्षातील शिस्तीचेही विसर्जन होण्याची चिन्हे आहेत. शहर भाजपचे अध्यक्ष असलेल्या सुभाष कासनगोट्टूवार यांनी पालिकेकडे अर्ज करत नेहमीच्या जागी भाजपचा मंडप उभारू देण्याची मागणी केली तर दुसरीकडे याच जागी मुनगंटीवार गटाचे कार्यकर्ते आणि माजी शहर अध्यक्ष राहुल पावडे यांनीही मंडप उभारण्यासाठी तयारी सुरू केली. 2गटांच्या वादात आयुक्तांनी आता दोन मंडप शेजारी उभारण्याची परवानगी दिली आहे. यावरून वाद उत्पन्न होऊ नये यासाठी आता मंडपाच्या शेजारी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आता विसर्जन मिरवणुक स्वागतासाठी आ. मुनगंटीवार आणि आ. जोरगेवार यांचे शेजारी -शेजारी स्वतंत्र मंडप असतील. हा नवा राडा मनपा आणि पोलीस प्रशासनासाठी डोकेदुखी झाला आहे. चंद्रपूर भाजपातील  आ. मुनगंटीवार  विरुद्ध आ. जोरगेवार वादाचा नवा अंक विसर्जनादिवशी बघायला मिळणार आहे. बाईट १) सुभाष कासनगोट्टूवार, शहर अध्यक्ष, भाजप आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
10
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 03, 2025 13:05:34
Raigad, Maharashtra:
स्लग - मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी ...... कोकणातुन परतीच्या प्रवासासाठी निघालेले गणेशभक्त वाहतुक कोंडीत अडकले ...... अँकर - गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासात वाहतुक कोंडीच विघ्न निर्माण झाल आहे. माणगाव ते तळेगाव हे सात किलोमीटर तर लोणेरे ते टेमपाले हे साधारण चार किलो मिटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अरुंद असलेली माणगावची बाजार पेठ आणि लोणेरे येथील उड्डाण पुलाचे काम रखडल्याने वाहतुक कोंडी होत आहे. गणेशोत्सव आटोपुर कोकणवासीय गणेशभक्तांनी काल रात्री पासून मुंबईकडे परतीचा प्रवास सुरु केला आहे. सकाळ पर्यंत परिस्थिती सामान्य होती मात्र दुपारनंतर वाहनांच्या रांगा लागल्या असून माणगाव आणि लोणेरे दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुक ठप्प आहे.
11
comment0
Report
Advertisement
Back to top