Back
75 हजार विद्यार्थियों का सामूहिक महाराष्ट्र गीत, रिकॉर्ड के लिए तैयार
VKVISHAL KAROLE
Sept 11, 2025 03:33:33
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn collector initiative av
File feed attached
छत्रपती संभाजीनगर मध्ये एशिया बुक,
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी जिल्ह्यातील सुमारे ७५ हजार विद्यार्थी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त १७सप्टेंबर रोजी सकाळी ९ वा. महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन करणार आहेत. इयत्ता ८वी ते १२वीचे जिल्हाभरातील विद्यार्थी सामूहिक गीत गायन व सांस्कृतिक सादरीकरण करणार असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. यावेळी म
ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या हडकोतील स्टेडियमवर
शहरातील कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, पालकमंत्री संजय शिरसाट व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
10
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowSept 11, 2025 05:49:04Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1109ZT_BARAMATIHAKE
FILE
बारामतीत ओबीसी मोर्चा काढल्या प्रकरणी लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जाणारवर गुन्हे दाखल....
पोलिसांनी परवानगी नाकारून देखील बारामतीत काढला होता मोर्चा...
बारामती पोलिसांनी लक्ष्मण हाके यांच्यासर अन्य 14 जणांवर केला गुन्हा नोंद...
गणपती विसर्जन आणि ईद च्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नाकारली होती परवानगी
5 तारखेला बारामतीत झाला होता मोर्चा..
विनापरवाना मोर्चा प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन.
Anchor:-
बारामती शहरात सकल ओबीसी समाजाने विनापरवाना मोर्चा काढल्या प्रकरणी लक्ष्मण हाके यांच्यासह १४जणाविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून आणि पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही हा मोर्चा काढण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे..
चंद्रकांत वाघमोडे, अमोल सातकर ,पांडुरंग मेरगळ, नवनाथ पडळकर, किशोर मासाळ, गोविंद देवकाते ,बापूराव सोलनकर यांच्यासह इतरांचा यामध्ये समावेश आहे
. 5 सप्टेंबर रोजी बारामतीतील शारदा प्रांगण ते प्रशासकीय भवना पर्यंत मोर्चाचे आयोजन केले होते मात्र या तारखेला ईद-ए-मिलाद सण तसेच गणेश विसर्जन मिरवणुका असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती...
2
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 11, 2025 05:48:56Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1109ZT_CHP_OBC_MEETING
( single file sent on 2C)
टायटल:-- मराठा समाजाच्या ओबीसी घटकातील संभाव्य थेट समावेशा विरोधात आता ओबीसी समाज आक्रमक, ऑक्टोबर महिन्यात नागपुरात निघणार मोर्चा, मोर्चा संदर्भातील जनजागृतीसाठी चंद्रपुरात ओबीसी सेवा संघाने आयोजित केली बैठक
अँकर:-- मराठा समाजाच्या ओबीसी घटकातील संभाव्य थेट समावेशा विरोधात आता ओबीसी समाज आक्रमक झालाय. ऑक्टोबर महिन्यात नागपुरात यासंदर्भात मोर्चा निघणार आहे. मोर्चा संदर्भातील जनजागृतीसाठी चंद्रपुरात ओबीसी सेवा संघाने बैठक आयोजित केली. बैठकीत ओबीसी समाज घटकातील समाज बांधव सहभागी झाले. मराठा समाजाच्या झुंडशाहीचा निकराने विरोध करण्याचा निर्धार या बैठकीत ओबीसी बांधवानी दर्शविला.
बाईट १) प्रा. अनिल डाहाके, संयोजक
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
5
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 11, 2025 05:33:14Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, शहरातील अनेक भागात शिरले मोठ्या प्रमाणात पाणी ( DRONE SHOT )
ड्रोन सौजन्य - नागेश राशिनकर
- सोलापूर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, शहरातील अनेक भागात शिरले मोठ्या प्रमाणात पाणी
- जिल्ह्यात सर्वत्र काल मध्यरात्रीनंतर तुफान पाऊस
- शहरातील शेळगी भागातील हे सर्व भीषण परिस्थिती ड्रोन कॅमेरात कैद
- याच सर्व परिस्थितीचा खास झी -24 तासच्या प्रेक्षकांसाठी ड्रोनद्वारे आढावा घेतलाय नागेश राशिनकर यांनी....
ड्रोन सौजन्य - नागेश राशिनकर
1
Report
KJKunal Jamdade
FollowSept 11, 2025 05:30:33Shirdi, Maharashtra:
Anc - संगमनेर शहरात कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी भर बाजारपेठेतून धिंड काढली आहे.. मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील एका दुकानात घुसून आरोपींनी 2 लाख 60 हजारांचा मुद्देमाल लुटला होता.. दुकानदाराच्या फिर्यादीवरून संगमनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता.. पोलिसांनी काही तासातच आरोपींच्या मुसक्या आवळत संगमनेर शहरातून आरोपींची धिंड काढली.. पोलिसांच्या या कृतीने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत..
0
Report
PNPratap Naik1
FollowSept 11, 2025 05:18:58Kolhapur, Maharashtra:
Kop Gas Blast
Feed:- 2C
Anc :- कोल्हापुरातील कळंबा जेल परिसरातील एलआयसी कॉलनीमध्ये घरगुती गॅसमध्ये स्फोट् होऊन झालेल्या अपघातात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झालाय. या अपघातात दोन लहान मुलांसह चार जण जखमी झाले होते. शहरामध्ये थेट गॅस पाईपलाईनने गॅस पुरवठा सुरू झाला आहे. नुकताच कळंबा जेल परिसरातील एलआयसी कॉलनीमध्ये सुद्धा थेट गॅस पाईपल्याने गॅस पुरवठा सुरू झाला आहे. त्यामध्ये 25 ऑगस्ट रोजी कळंब्यातील शितल भोजने यांच्या घरातील गॅसमध्ये अचानक स्फोट झाला. यामध्ये शितल भोजने (29) यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर अनंत भोजने (60) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गेल्या काही दिवसापासून 5 वर्षीय प्रज्वल भोजने याच्यावर उपचार सुरू होते, पण उपचार सुरू असतानाच चिमुकल्या प्रज्वलचाही मृत्यू झालाय. त्यामुळे गॅस पाईपलाईन स्फोटाचा तिसरा बळी गेलाय. दरम्यान या प्रकरणाची दखल घेऊन सुरू असलेल्या तपासात गॅस कंपनीचा ठेकेदार आणि अभियंता विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
3
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 11, 2025 05:18:48Akola, Maharashtra:
Anchor : नेपाळमधील अराजकतेत अकोल्यातील 10 पर्यटक अडकले आहेत मात्र हे सर्वजण सुखरूप असल्याची माहिती आहे.
नेपाळमध्ये काही दिवसांपासून सुरू असलेल्या अराजकतेमुळे अनेक भारतीय पर्यटक अडकले आहेत. यामध्ये अकोल्यातील 10 जणांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
यातील पाच पर्यटक पोखरा येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत, तर उर्वरित पाच जण काठमांडू येथील हॉटेलमध्ये थांबले आहेत. सर्वजण सुरक्षित असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. काठमांडूमध्ये असलेले राजेश निनाले यांनीही स्वतःच्या सुरक्षिततेची माहिती दिली आहे तर नेपाळमध्ये जनजीवन सुरळीत होत असल्याचा एक व्हिडिओ ही त्यांनी पाठवला आहे..दरम्यान, पोखरा येथील पाच जण बुधवारी रात्री भारतात परतण्यासाठी रवाना झाले असून, काठमांडू येथील उर्वरित पाच जणदेखील आज भारतासाठी निघणार आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
दहाही जण सुखरूप असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी काळजी करू नये, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.
Byte : राजेश निनाले , पर्यटक.
3
Report
KJKunal Jamdade
FollowSept 11, 2025 05:16:28Shirdi, Maharashtra:
Anc - शासनाकडून आलेल्या शालेय पुस्तकांचा ट्रक खाली करण्यासाठी चक्क लहान मुलांचा वापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात समोर आलाय.. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत..
V/O - श्रीरामपूर नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक 2 मध्ये मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास शालेय पुस्तकांनी भरलेला ट्रक आला होता.. मात्र पुस्तकांचे बंडल खाली करताना चक्क लहान मुलांचा वापर करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला होता.. मुख्याध्यापक आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने पालकवर्गात नाराजी होती.. गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कारवाई करणार असल्याचं म्हटलंय..
Byte - सुभाष म्हस्के , गटविकास अधिकारी , श्रीरामपूर
4
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 11, 2025 05:16:06Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1109ZT_CHP_BADMINTON
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात 3 दिवस चालणाऱ्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचा प्रारंभ, 2036 साली ऑलिम्पिक आयोजनाच्या तयारीसाठी स्पर्धांच्या संख्येत वाढीसाठी चंद्रपूर सज्ज असल्याचे उद्घाटक माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
अँकर:--चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात 3 दिवस चालणाऱ्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचा थाटात प्रारंभ झाला. माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. आ.मुनगंटीवार यांनी स्वतः खेळून आनंद घेतला. चंद्रपूर क्रीडा संकुलात अत्याधुनिक बॅडमिंटन हॉल तयार झाल्यापासून राज्यस्तरीय स्पर्धां आयोजित होत आहेत. या हॉलसह बल्लारपूर येथील सुसज्ज क्रीडा संकुल देखील स्पर्धांसाठी तयार होत आहे. याशिवाय म्हाडा प्रकल्पात 16 एकर जागेवर 160 कोटी रु. खर्चून अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारले जात असून चंद्रपूरकर खेळाडूंना राज्य- देशस्तरावर नैपुण्य दाखविण्याची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती स्पर्धा उदघाटन प्रसंगी आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
साउंड बाईट १) आ. सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
3
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 11, 2025 05:03:27Pandharpur, Maharashtra:
Anchor - सोलापूर जिल्ह्यामध्ये तमाशा बारीच्या कला केंद्रातील नर्तकीच्या प्रकरणातून बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंचाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचं प्रकरण ताजा असताना आता माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे तमाशा बारी केंद्रात नर्तकींची बैठक लावण्याच्या कारणावरून गोळीबार करण्यात आला आहे. या मध्ये एक जण जखमी झाला आहे. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
टेंभुर्णी नदीच्या वेणेगाव येथील जय मल्हार लोकनाट्य कला केंद्रात पंढरपूर येथील दोन मित्र यांचे सहकार्यांमध्ये नर्तकींची नाच गाण्याची बैठक लावण्यावरून भांडण झाले. हे भांडण सोडवत असताना त्यापैकी एकाने त्यांच्याकडे रिव्हॉल्वर मधून जीवे मारण्याच्या हेतूने गोळी झाडली.
यात देवा बाळू कोठावळे वय 27 राहणार वाखरी यांच्या मांडीत गोळी लागून तो गंभीर जखमी झाला आहे.
त्याला टेंभुर्णी मधील खासगी रुग्णालयाला दाखल केले आहे
याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
1
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 11, 2025 04:51:42Bhandara, Maharashtra:
मानेगाव येथे वीज कोसळून गुराखी ठार....जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी....धानाला पोषक
Anchor ;- भंडारा जिल्ह्यात मेघ गर्जनेसह ठिकठिकाणी पाऊस बरसला. यात भंडारा तालुक्यातील मानेगाव बाजार शेतशिवारात शेळी चारायला गेलेल्या ५२ वर्षीय गुराख्यावर वीज कोसळली.यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.बबन नत्थू भदाडे (मानेगाव बाजार) असे मृताचे नाव आहे.गावात शोककळा पसरली आहे.
3
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 11, 2025 04:51:12Buldhana, Maharashtra:
बुलढाणा ब्रेकींग.
चिखलीत दोन गटात राडा ..
रक्तदान शिबिरात रक्तदान केल्याच्या कारणावरून झाला राडा ..
पोलिसांना करावा लागला सौम्य लाठीचार्ज ..
तर पोलिसांनी वेळीच पोहचून परिस्थिती आणली नियंत्रणात ..
परिसरात तणावपूर्ण वातावरण ..
Anchor - वेगवेगळ्या रक्तदान शिबिरात रक्तदान केल्याच्या कारणावरून रात्री बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली शहरातील बाबू लॉज चौकात दोन गटांत चांगलाच वाद होऊन हाणामारी झाली.. यावेळी त्याठिकाणी तणाव निर्माण झाला होता .. मात्र, वेळीच ठाणेदार संग्राम पाटील यांनी हस्तक्षेप केल्याने वाद निवळला... मात्र पोलिसाना जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज ही करावा लागला आहे .. या संदर्भात अद्याप चिखली पोलिसात दोन्ही गटाकडून तक्रारा दाखल झाली नाही. . ईद चे दिवशी चिखली शहरामध्ये दोन ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होत .. या रक्तदान शिबिरामध्ये अनेकांनी रक्तदान ही केले.. मात्र एका गटाने दुसऱ्या गटातल्या युवकाला आमच्याकडे रक्तदान का केले नाही, असे म्हटले असता वाद झाला. . त्यामुळे दोन गट समोरासमोर भिडल्याचे पहायला मिळत असून बाबू लॉज चौकात चांगलाच राडा झाला आहे . . सध्या परिसरात तणाव असून पोलिस बंदोबस्त तैनात आहे .
3
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 11, 2025 04:50:10Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1109ZT_WSM_NHRM_STRIKE_BACK
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा १७ दिवस चाललेला बेमुदतसंप काल यशस्वीरीत्या संपुष्टात आला.आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी त्यांच्या मागण्या तत्त्वतःमान्य केल्याने कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे.१४ मार्च २०२४ रोजी शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता.मात्र अंमलबजावणी न झाल्याने तसेच मानधनवाढ,लॉयल्टी बोनस, ग्रॅच्युटी, ईपीएफ योजना व बदली धोरण या मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेने आंदोलन छेडले होते.जिल्ह्यातील ४५० कंत्राटी अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी झाले होते.यामुळे आरोग्य विभागात मनुष्यबळाचा तुटवडा जाणवून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा प्रभावित झाली होती.आजपासून सर्व कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर रुजू होणार असून आरोग्य सेवा पूर्ववत होणार आहेत.
3
Report
KPKAILAS PURI
FollowSept 11, 2025 04:47:13Pimpri-Chinchwad, Maharashtra:
pimpri garden
kailas puri pune 11-9-25
feed by 2c
Anchor - पिंपरी चिंचवड मधील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या आणि आय टी कर्मचाऱ्यांच्या पसंतीच ठिकाण असलेल्या पिंपळे सौदागर परिसरात महाराष्ट्रातील सर्वात मोठी क्लाइंबिंग वॉल उभारण्यात आलीय....तब्बल १४ कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेल्या योगा गार्डन मध्ये ही क्लाइंबिंग वॉल उभारण्यात आलीय...! एवढच नाही तर या योगा गार्डन मध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत...! योगा गार्डन आणि क्लाइंबिंग वॉल चे लवकरच उद्घाटन केले जाणार आहे. नेमके कसे आहे योगा गार्डन कधी होणार उद्घाटन संदर्भात शत्रुघ्न काटे यांच्याशी चर्चा केलीय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...!
kailas 1 to 1+ vis
6
Report
AKAMAR KANE
FollowSept 11, 2025 04:36:08kolhapur, Maharashtra:
नागपूर -
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या अमृत महोत्सव निमित्त अभिष्टचिंतन
- डॉ. मोहन भागवत यांचा आज 75 वा वाढदिवस, डॉ भागवत यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते डॉ. भागवत यांना 'नंदी'ची मूर्ती भेट देऊन अभिनंदन करण्यात आले
- "देवभक्ती आणि देशभक्ती हे जरी वेगवेगळे दिसत असले तरी ते आपल्या भारत देशात ते दोन्ही वेगवेगळे नसून एकच आहेत"
- "जो वास्तविक देवभक्ती करेल तो देशभक्ती करतो,आणि जो प्रामाणिकपणे देशभक्ती करतो त्याच्याकडून ईश्वर देवभक्तीपण करवून घेतो"
- अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या नागपुरातील 'महारुद्रपूजन' सोहळ्यात आरएसएस प्रमुख डॉ. मोहन भागवत यांचं वक्तव्य
- "इतिहासाच्या आधीपासून आपला भारत देश आहे,भगवान शिवशंकर हे आदीगुरु आहेत"
- "सर्वांमधील जे मूळ तत्व आहेत आहे,त्याला जाणण्याचे 108 मार्ग शिकवणारे भगवान शिव होते"
साउंड बाईट - डॉ. मोहन भागवत,आरएसएस प्रमुख
7
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 11, 2025 04:35:03Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1109ZT_CHP_BLDG_COLLAPSE
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट येथे दुध विक्री करणाऱ्या महिलेवर इमारतीचा भाग कोसळला, महिला जखमी, उपचार सुरू
अँकर:-- चंद्रपूर शहरात जटपुरा गेट परिसरात आज सकाळी दुध विक्री करणाऱ्या मनिषा सुनील लोखंडे (वय 50) या महिलेवर अचानक इमारतीचा काही भाग कोसळला. यात त्यांच्या हाताला, पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तत्काळ चंद्रपूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. लोखंडे कुटुंब गेल्या 35 ते 40 वर्षांपासून दूध व्यवसायाशी जोडलेले आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या पतींचे आकस्मिक निधन झाल्यानंतर मनिषा लोखंडे यांनी एकट्यानेच व्यवसाय सुरू ठेवला. त्यांना दोन मुली असून त्या दोघींचे शिक्षण सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन जखमी महिलेला मदत केली. शहरातील धोकादायक इमारती मनपाने त्वरित पाडाव्या अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
बाईट १) स्थानिक नागरिक
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
4
Report