Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

राहात्यात बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

KJKunal Jamdade
Jul 17, 2025 07:08:37
Shirdi, Maharashtra
Anc - राहाता शहरातील नवनाथ नगर परिसरात बिबट्याने मुक्त संचार केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साधारणत : रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास बिबट्याचा वावर प्रथम भुजबळ मळा परिसरात आढळून आला. तेथील जागरूक नागरिकांनी वेळेवर सावधगिरी बाळगून फटाके वाजवून त्याला पळवून लावले...मात्र, काही वेळातच तो बिबट्या नवनाथ नगरकडे सरकताना दिसला.सदर बिबट्या विनोद गाडेकर यांच्या निवासस्थाना समोरून निर्धास्तपणे फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत स्पष्टपणे कैद झाला आहे. या दृश्यांनी परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडवून दिलीय.वनविभागाला या प्रकाराबाबत तातडीने माहिती देण्यात आली असुन बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केलीय.
9
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top