Back
अकोला जिल्ह्यात कावड यात्रा: जिल्हाधिकारी अजित कुंभारांची महत्त्वाची भेट!
JJJAYESH JAGAD
Aug 09, 2025 02:00:51
Akola, Maharashtra
Anchor : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील लक्षेश्वर संस्थान येथे अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी भेट दिलीय..श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी या ठिकाणी मोठी कावड यात्रा भरते.. कावड यात्रा निमित्त मुख्य रस्त्याची पाहणी व घाट व मंदिरातील झालेल्या बांधकांमाची पाहणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केलीय..भाविकांसाठी प्रशासनाकडुन उपाययोजना करण्यात याव्या जेणे करुन हा
भक्तांना सोई सुविधा उपलब्ध होईल अशी मागणी आमदार हरिष पिपळे यांनी जिल्हा अधिकारी अजित कुंभार यांना केलीय..
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowAug 09, 2025 05:47:25Kolhapur, Maharashtra:
Kop Bhaji Mandai Mobile Chor
Feed :- 2C & Live U
Anc :- कोल्हापूर पोलीसांनी भाजी मंडईत मोबाईल चोरणाऱ्या तिघा चोरट्यांना अटक केलीय. या चोट्यांकडून साडेतीन लाखाचे 46 मोबाईल जप्त केलेत. गणेश माने, महादेव पाटील, गणेश शिवाजी पाटील या तिघा चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केलय. हे तिघेही चोरटे आठवडा बाजारातून मोबाईल चोरी करत होते. शहरातील कोणती भाजी मंडई असो त्या ठिकाणी या चोरट्यांचा वावर सुरू होता. हे मोबाईल चोरटे भाजी मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांचे मोबाईल चोरतात याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती, त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आठवडी बाजारात लक्ष ठेवून मोबाईल चोरताना या तीनही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीअंती विविध आठवडी बाजार आणि विविध भाजी मंडईतून या चोरट्यांनी तब्बल 46 मोबाईल चोरल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी हे मोबाईल जप्त करून या तिघांनाही अटक केली आहे. या तिघा मोबाईल चोरट्याने आणखी काही आठवडी बाजार मधून मोबाईल चोरले आहे. का याचा तपास कोल्हापूर पोलीस करत आहेत. दरम्यान भाजी मंडई जाणाऱ्या ग्राहकांनी सावधान रहावे असं आवाहन कोल्हापूर पोलिसांनी केले आहे.
3
Report
APAMOL PEDNEKAR
FollowAug 09, 2025 05:47:16Mumbai, Maharashtra:
संजय राऊत
*ऑन उद्धव ठाकरे दिल्ली दौरा*
* दिल्ली दौऱ्यावर असताना राहुल गांधी मल्लिकार्जुन खारघे या दोन प्रमुख नेत्यांनी सन्माननीय उद्धव ठाकरे यांच्याबरोबर याविषयी स्वतंत्र चर्चा आणि निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरुद्ध लढाई अधिक तीव्र करावी असं दोन्ही नेत्यांचे मत ठरलं
* राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचे घोटाळे काढण्याचे मोहीम सुरू ठेवली त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मेंदू मधील ची डिस्टर्ब झाली आमची चीप बरोबर आहे ११ तारखेला निवडणूक आयोगावर सर्वपक्षीय मोर्चा इंडिया ब्लॉक हे काढण्याचा निश्चित झालं आणि शिवसेनेचे सर्व खासदार या मोर्चामध्ये सहभागी होणार सगळ्या पक्षाचे खासदार इतर प्रमुख पदाधिकारी हे त्या मोर्चात सहभागी होणार हे ठरला आहे
* माननीय उद्धव ठाकरे हे तीन दिवस दिल्लीमध्ये मुक्कामी होते आणि त्यांना श्री राहुल गांधी यांनी आग्रहाचे निमंत्रण दिले होते की तुम्हाला यावच लागेल आणि पूर्ण फॅमिली यावे लागेल त्यानुसार उद्धवजी आले
* दुपारी प्रेसेंटेशन झालं होतं पण आधी त्या ठाकरे यांनी राहुल गांधी यांना विनंती केली पुन्हा एकदा आम्हाला प्रेझेंटेशन दाखवा त्यानुसार राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्पेशल स्क्रीन लावून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्या संदर्भातले प्रेसेंटेशन दाखवलं आम्ही ते शेवटच्या रांगेत बसून पाहिलं कारण तिथून ते उत्तम दिसत होतं आम्ही शेवटची रंग पकडले आणि ते आम्हाला समजून घ्यायचं होतं
* उत्तम सिनेमा पाहताना आपण शेवटच्या रांगेतील तिकीट घेतो महागडी आणि बसतो पवार साहेब सुद्धा आमच्यासमोर होते त्यांनी सुद्धा पाहिलं आणि नंतर एकत्र भोजन झालं सोनिया गांधी रश्मी ठाकरे माननीय उद्धव ठाकरे कमल हसन खडगे साहेब असे प्रमुख लोक एका टेबलावर होते
* आणि आम्ही बाकीचे दुसऱ्या टेबल वरती बसलो होतो प्रमुख लोक आमच्या आज पास होते त्यानंतर एक बैठक झाली राहुल गांधी यांच्या निवासस्थाने काही मोजके लोक होते प्रमुख नेते सगळे बसलो होतो अनेक विषयावर चर्चा झाली का आम्ही सगळे त्या बैठकीनंतर राहुल गांधी यांच्या निवासस्थानामध्ये काही मोजके लोक होते उद्धवजी होते आधी त्याचे होते आणि प्रमुख नेते आम्ही सगळे बसलो होतो आणि त्याच्यावर पुढील रूपरेषा झाली महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल चर्चा झाली स्वतंत्रपणे बैठक संपल्यानंतर अनेक विषयांवर चर्चा झाली ती आता इथे सांगण्या सारखे नाही पण आम्ही सगळे त्या बैठकीनंतर आशादायी आहोत
* जे आम्ही सांगतो त्या घडामोडी घडू शकतात किंवा घडतील पूर्णपणे राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी कशाप्रकारे निवडून आले आणि 50 लोकसभा वरती घोटाळे करून हे त्यांनी उघड केले आहे खरं म्हणजे तोंड लपवाचे पाणी भारतीय जनता पक्षावर आले आहे राहुल गांधी यांनी बॉम्ब टाकला आहे त्याच्या अब्रूच्या चिंधड्या उडाल्या आहेत खूलाशे कसले करत बसले आहेत
*ऑन दोन ठाकरे बंधू एकत्र बेस्ट कामगार पतपेढी बॅनरबाजी*
* माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे जे युती आहे हा इंडिया ब्लॉगचा विषय नाही हा स्थानिक स्वराज्य संस्था यांचा विषय आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या विषयावरती राष्ट्रीय स्तरावर चर्चा होत नाही किंवा तुमची काय एनडीए असेल किंवा महा महा युती असेल काही लोक दिल्लीत त्यांचे प्रमुख लोक बसले असल्यामुळे जात असतील आणि चर्चा करत असतील पण या प्रमुख बंधूंचा एकत्र येण्याचा निर्णय आहे तो माननीय राज साहेब आणि उद्धव साहेबांनी घेतला आहे आणि ते समर्थ आहेत आणि आता त्या विषयावर चर्चा होते कारण ती महाराष्ट्रातील सर्वात मोठी घडामोडी आहे राजकीय दृष्ट्या
* इंडिया आघाडीच्या बैठकीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चर्चा होते मला असं वाटतं दोन प्रमुख लोक एकत्र येत असल्यामुळे इंडिया आघाडीमध्ये कोणालाही आक्षेप नाही
* दोन बंधू एकत्र येत असेल तर आक्षेप का येत असेल मराठीच्या प्रश्नावर हर्षवर्धन सकपाळ इकडे काँग्रेसच्या महाराष्ट्रातील युनिट सुद्धा मराठीच्या प्रश्नावर भूमिका घेऊन उभी आहे
* आम्ही राजकीय दृष्ट एकत्र आले आहोत त्याचा केंद्रबिंदू मराठी भाषा मराठी अस्मिता मराठी माणूस महाराष्ट्राचे रक्षण हाच आहे त्याच्यामध्ये वेगळा विषय काय
* शरद पवार असतील किंवा राज्याचे काँग्रेसचे प्रमुख हर्षवर्धन सकपाळ असतील या सगळ्यांच्या भूमिका मराठी भाषा अस्मिता आणि मराठी वरती होण्यावरती सक्ती इतर भाषांची आम्ही सगळे एकत्र आलो होतो त्यासाठी
* मुंबई मुंबई हे महाराष्ट्राचे राजधानी आणि मुंबई वाचण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काही एकत्र ठरवलं असेल तर मराठी जनतेला स्वाभिमानी जनतेला त्याचा आनंद असेल
* राज ठाकरे यांनी परप्रांतीच्या विरोधात कोणते भूमिका घेतली नाही कधीकाळी शिवसेनेवरती आरोप होत होते महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी बोलता आलं पाहिजे तुमच्या माहितीसाठी सांगतो अशा प्रकारचा आंदोलन सध्या बंगालमध्ये सुरू आहे ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये भाषा आंदोलन सुरू केला तामिळनाडूमध्ये तेच आंदोलन सुरू आहे तुम्ही महाराष्ट्रावर का आक्षेप घेत आहात आम्ही मराठी बोलतो म्हणून आणि मराठी बोला असं सांगत आहोत म्हणून मराठी बोलणार नाही असं जेव्हा सांगितलं जातं महाराष्ट्रात तेव्हा त्यांच्याविरुद्ध लोकांचा रागाचा भडका उडतो आणि तो स्वाभाविक आहे
* ऑन उद्धव ठाकरे दिल्ली विधान*
* आम्ही सगळ्यांशी चर्चा करत आहोत हा तुमचा जो प्रश्न आहे तो चुकीचा आहे महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली आणि आघाडी लोकसभा निवडणुकांसाठी तयार झाली स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप कोणती आघाडी तयार झाली असेल तर मला सांगा तुम्ही आतापर्यंत इतिहास प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाडी निर्माण होत असतात हा आतापर्यंतचा इतिहास आहे त्यात राजकीय पक्ष सुद्धा नसतात त्याच्यामुळे त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्या त्या शाळेतला प्रमुख कार्यकर्ते आणि त्यांना असतात मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबई बाबत माननीय उद्धवजी आणि राजजी हे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत
*ऑन प्रेझेंटेशन स्थान *
* हे देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आता शिकवण्याचे गरज नाही आणि एवढा फुलका दाखवायचा कारण नाही ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचा पाप केलं ज्याने मराठी माणसाचं संघटना फोडून तो नजराना अमित शहा यांच्या पायाशी टाकला त्या लोकांनी आम्हाला स्वाभिमानाच्या गोष्टी सांगू नये
* आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही आमच्या पायावर स्वाभिमानाने उभे आहोत आम्ही लाचार नाही आम्ही दिल्लीत गेलो आम्ही आमच्या अटी आणि शर्तीवर दिल्लीत जातो आणि दिल्लीचा राजकारण करतो आम्ही लाचारी गरज नाही म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाला झुडकारून स्वतंत्र उभा राहिलो
* तुम्ही आमचा अपमान करण्याचा प्रयत्न केला अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यामुळे आम्ही स्वतंत्र भूमिका घेतली आणि आम्ही त्याविषयी ठाम आहोत आम्हाला लाचारी पतकरायची असेल तर आम्ही तुमच्या मागे शेपटी हलवत फिरलो असतो जसे इतर लोक फिरत आहेत आम्ही तुमच्याशी लाचारी कार्याला तयार नाही म्हणून तुम्ही पक्ष फोडला आमच्या आणि तो जो गट आहे लाचारांचा तो शेपटी हलवत तुमच्या मागे दिल्लीमध्ये फिरत आहे आम्ही त्यातले नाही लक्षात घ्या मिस्टर फडणवीस तेव्हा आम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करू नका
*शिंदे आदित्य ठाकरे आमने-सामने*
* आमचे कोणत्याही संघर्षाला तयार आहे जर कोणाला आमच्याशी संघर्ष करायचा असेल तर कोणताही संघर्ष आमची त्या संघर्षाला तयारी आहे तुम्ही पाळलेल्या निवडणूक आयोगाशी संघर्ष करत आहात तर हे संघर्ष करत आहे तर हे संघर्ष आमच्या शिवसेनेच्या पाचवीला पुजलेले आहेत वरळी कोळीवाड्यात माननीय आदित्य ठाकरे असताना राज्याचे डेप्युटी सीएम पोलिसांचा पाऊस फाटा जाऊन दादागिरी करत असेल तर आम्ही ती दादागिरी मोडून काढू आता सांगतो फार दादागिरी करू नका तुमची दादागिरी येथे फडणवीस म्हणून काढत आहेत
*ऑन कबूतर खाना*
* देवेंद्र फडणवीस यांनी याच्यावर मत व्यक्त करावा राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकार कुठे कुठे शेपूट घालणार आहे त्यांनी त्यांची यादी जाहीर करावे
6
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 09, 2025 05:47:11Washim, Maharashtra:
वाशिम :
File:0908ZT_WSM_CROP_DAMAGE
रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून त्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलाय तर नदीकाठच्या शेतांमध्ये सर्वत्र पाणी साचल्याच दिसून आले, विशेषतः हळदीच्या शेतामध्ये पाणी साचल्यामुळे हळद,तूर, सोयाबीन बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन पीक खराब होण्याचा धोका निर्माण झालाय. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.
8
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 09, 2025 05:45:57Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_KARAD_POLICE
कराड - कराड शहर पोलीस ठाण्यात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला.चिमुकल्या मुलींनी पोलीस दादांना राखी बांधली तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्यासह पोलिसांनी मुलींना गिफ्ट आणि चॉकलेट देत ओवाळणी दिली. तसेच शहरातील महिलांनीही पोलीस ठाण्यात रक्षाबंधनासाठी हजेरी लावत अधिकारी, कर्मचारी यांना राख्या बांधल्या.
*बाईट :- राजू ताशिलदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड*
6
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 09, 2025 05:45:43Akola, Maharashtra:
Anchor : नुकत्याच राज्यभर वर्ग २ ते ८ पर्यंतच्या पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यात आल्या असून यामध्ये प्रचंड अनियमित्ता व नियोजनाचा अभाव निदर्शनास येत आहेय.. मागील वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा सरासरी अंदाज वर्तविण्यासाठी सदर पायाभूत परीक्षा घेतली जाते.. राज्यातील सर्वच शाळांमध्ये असंख्य विद्यार्थी शिक्षण घेत असून प्रत्येक विद्यार्थ्याला ही परीक्षा देणे अनिवार्य आहेय..परीक्षा घेण्यासाठी शासनाला प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणे महत्त्वपूर्ण आहेय.. शालेय संच मान्यते नुसार विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शाळेचा सरासरी संख्येच्या आधारे प्रश्नपत्रिका शाळेमध्ये पोहोचविल्या जातात. संचमान्यतेच्या आकडेवारीनुसार प्रश्नपत्रिकांची छपाई करण्यात येते, म्हणजेच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना पुरेपूर मिळणे अपेक्षित आहेय..परंतु यावेळी शालेय मोफत पाठ्यपुस्तक वितरण आणि पायाभूत प्रश्नपत्रिका संचा मध्ये मोठी तफावत बघावयास मिळाली..संच मान्यतेनुसार यावर्षी मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले आणि त्याच आकडेवारीनुसार आता पायाभूत परीक्षेच्या प्रश्नासंचाचे ही वितरण करण्यात आले.. मात्र दोन्ही वितरणामध्ये यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकापासून वंचित रहावे तर आता पायाभूत परीक्षेसाठी सुद्धा वंचित रहावे लागले..पायाभूत परीक्षा घेणे अनिवार्य असल्यामुळे शाळेतील शिक्षकांना स्वखर्चाने प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स करावी लागली आणि यामुळे शासनाच्या गोपनीय प्रश्नपत्रिकेचा बाहेर प्रसार तर झालाच परंतु शिक्षक व विद्यार्थ्यांना आर्थिक , मानसिक व शैक्षणिक त्रास ही सहन करावा लागला आहेय..पायाभूत परीक्षेसाठी लागणाऱ्या प्रश्नपत्रिका संच बाजारातून झेरॉक्स करून घेण्यास भाग पडलय..संच मान्यतेनुसार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व पायाभूत प्रश्नपत्रिका संच दिल्या जात असल्याचा कागदपत्री अहवाल सादर केला आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांना अपुरे पाठ्यपुस्तक व पायाभूत प्रश्नपत्रिका संच मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेय..नक्कीच शिक्षण विभागांमध्ये हा मोठा घोटाळा व भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास येत आहेय...संच मान्यतेनुसार मोफत पाठ्य पुस्तकांची व पायाभुत प्रश्न संचांची छपाई करण्याचे कागदोपत्री दाखविल्या जाते परंतु प्रत्यक्षात मात्र छपाई कमी होत असल्याचे दिसत आहेय..या प्रकारामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहे..
पायाभूत प्रश्नसंच व मोफत पाठ्यपुस्तक यांची छपाई कमी का झाली?
संच मान्यतेनुसार विद्यार्थ्यांना प्रश्नसंच व मोफत पाठ्यपुस्तक का मिळाली नाही?
व शिक्षण मंडळाकडून पायाभूत प्रश्नपत्रिकांचे संच व मोफत पाठ्यपुस्तके कमी का आली?
7
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 09, 2025 05:45:30Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_KARAD_LEOPARD
कराड - कराड तालुक्यातील टाळगाव गावात एका गुरुजींच्या घरासमोर पहाटेच दारात असलेल्या कुत्र्याच्या शिकारीला बिबट्या आला. मात्र चक्क कुत्र्यानेच बिबट्याला माघारी पळायला लावले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरातील कैद झाला आहे. परंतु, दुसऱ्या ठिकाणी असलेल्या एका कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडला.
5
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowAug 09, 2025 05:31:55Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_RAIN_LOSS पाच फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाने अनेक हेक्टर पिकं पाण्याखाली; काही शेतकऱ्यांना पावसाचा दिलासा तर काही शेतकऱ्यांना फटका
अँकर :- गेल्या 15 दिवसा नंतर अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने बॅटिंग केली आहे. या मुसळधार पावसामुळे काही शेतकऱ्यांच्या पिकांना संजीवनी मिळाली तर काही शेतकऱ्यांची पिके ही पाण्याखाली गेल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. हवामान अंदाजानुसार कालपासून विदर्भात विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दर्शवली होती. त्यानंतर अमरावती जिल्हात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे .15 दिवसांनी आलेल्या या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या कपाशी तूर या पिकांना फायदा होणार आहे. मात्र अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांमध्ये कही खुशी काही गम असे चित्र पाहायला मिळत आहे.
4
Report
PNPratap Naik1
FollowAug 09, 2025 05:31:47Kolhapur, Maharashtra:
Bel Soudatti Rain Update
Feed :- 2C
Anc :- बेळगाव जिल्ह्यातील सौदत्ती मध्ये शुक्रवारी सायंकाळी ढगफुटी झाली. त्यामुळे सौंदत्ती त्याचबरोबर रेणुका मंदिर परिसर जलमय झाले होत. अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. ढगफुटी झाल्याने रेणुका मंदिर परिसरात व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं, त्याचबरोबर दर्शनासाठी आलेल्या भक्तांची मोठी तारांबळ उडाली. आज सकाळी देखील अनेक भागात पावसाचे पाणी साठवून होतं. रेणुका देवीच्या मंदिरात देखील गुडघ्यावर पाणी साठल होत, हे पाणी आता हळूहळू कमी होत आहे. पण सौंदत्ती मंदिर परिसरात सध्या चिखलाचा साम्राज्य पाहायला मिळत आहे. ढगफुटी मध्ये अनेक वाहन देखील वाहून गेल्याने मोठ नुकसान झाले आहे.
5
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowAug 09, 2025 05:19:51Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_RAKSHA_BANDHAN तीन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी बांधली खासदार बळवंत वानखडे यांना राखी; यशोमती ठाकूर यांनी दिली बळवंत वानखडे यांना संविधानाची प्रास्ताविका भेट
अँकर :- आज रक्षाबंधन बहिण भावाच्या नात्यातला पवित्र सण यानिमित्ताने अमरावती जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे आणी माजी मंत्री काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन सोहळा साजरा केला. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी खासदार बळवंत वानखडे यांना ओवाळणी घालत राखी बांधली. यावेळी यशोमती ठाकूर यांनी खासदार बळवंत वानखडे यांना संविधानाची प्रास्ताविका भेट दिली त्यामुळे यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांची वेगळीच रक्षाबंधन पाहायला मिळाली.
12
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 09, 2025 05:17:19Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0908ZT_WSM_TREE_RAKSHABANDHAN
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर :भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जात असलेला राखी पौर्णिमेचा सण आज देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बहिणी प्रेमाचे प्रतिक म्हणून आपल्या भावाला राख्या बांधतात आणि बहिणीचे रक्षण करावे तसेच आपल्या प्रिय भावास दीर्घायुष्य लाभावे या बद्दल देवाकडे प्रार्थना करतात.नेमका हाच संदेश वापरूनरक्षाबंधनाच्या पारंपरिक संदेशाला पर्यावरणपूरक वळण देत वाशीम येथील एस.एम.सी शाळेच्या राष्ट्रीय हरित सेनेतील विद्यार्थिनींनी अनोखा उपक्रम राबवला.राखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी वृक्षांना राख्या बांधून,“वृक्ष आमचे भाऊ असून ते दीर्घायुषी व्हावेत व प्रदूषणापासून आमचे रक्षण करावे” अशी प्रार्थना केली.दिवसेंदिवस कमी होत असलेल्या वृक्षसंख्येच्या पार्श्वभूमीवर चिमुकल्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्यांचा वापर करून वृक्षरक्षाबंधन केले. वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडून ग्लोबल वॉर्मिंगसारखी समस्या निर्माण होत असल्याचे भान विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून समाजाला दिले. हा आगळावेगळा उपक्रम वृक्षसंवर्धनाचा प्रभावी संदेश देणारा ठरला आहे.
बाईट: मोक्षदा चांदसकर,विद्यार्थिनी
बाईट: ज्ञानेश्वरी तडस, विद्यार्थिनी
बाईट:अभिजित जोशी, हरित सेना समन्वयक
8
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 09, 2025 05:16:11Pandharpur, Maharashtra:
09082025
Slug - PPR_TRANSGENDER_CITIZEN
file 03
-- -- -
Anchor - पंढरपूर शहरातील तृतीयपंथी नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेचा पुढाकार, नगरपालिकेच्या आऊट सोर्सिंग कामगारांमध्ये तृतीय पंथ नागरिकांचा समावेश करण्याबाबत विचार सुरू
तृतीयपंथी नागरिकांना समाजामध्ये अनेक ठिकाणी सन्मान जनक वागणूक मिळत नाही. पंढरपूर नगरपालिकेने त्यांच्या घरांच्या साठी प्रधानमंत्री आवास योजनेतून प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच बचत गटाच्या माध्यमातून त्यांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. ज्या तृतीयपंथी नागरिकाना रोजगार हवा आहे त्यांना पंढरपूर नगरपालिकेच्या आऊटसोर्सिंग कामामध्ये मध्ये अतिक्रमण विरोधी पथक तसेच कर वसुली तसेच बिल वाटणे या कामात सहभागी होऊ इच्छित असेल त्यांच्यासाठी संधी देण्याचा विचार पंढरपूर नगरपरिषद करत आहे.
-- --
Byte - महेश रोकडे, मुख्याधिकारी, नगरपरिषद पंढरपूर
12
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 09, 2025 05:01:02Parbhani, Maharashtra:
अँकर - हिंगोली जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी ओढ्याला पूर आलाय, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे शिवारातील ओढायला पुर आलाय, रोजच्या बांधलेल्या ग्राहकांपर्यंत दूध पोहोचवणं महत्वाचं असल्याने दुग्ध व्यवासायिकांचा असा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. मध्यरात्रीपासून पांगरा- शिंदे गाव परिसरात जोरदार पाऊस पडल्याने असे ओढ्याला पूर येऊन मार्ग बंद पडले आहेत...
9
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowAug 09, 2025 05:00:53Virar, Maharashtra:
Date-9aug2025
Rep-prathamesh tawade
Loc-virar
Slug-VIRAR POLICE
Feed send by 2c
Type-AV
Slug- बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या व्हॅनचा अपघात
४ पोलिस कर्मचारी जखमी
ॲंकर - विरारहून तुंगारेश्वर येथे बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या व्हॅनला कण्हेर फाटा येथे अपघात झाल्याची घटना घडली आहे... सकाळी विरार होऊन बंदोबस्तासाठी निघालेली ही व्हॅन कनेर फाटा येथे पोचली असता एका दुचाकी चालकाला वाचवण्याच्या नादात व्हॅन चालकाचे नियंत्रण सुटले ...आणि गाडी दुभाजकाला धडकून पलटी झाली... गाडीचा वेग नियंत्रित असल्याने मोठा अपघात टळला मात्र या गाडीत असलेले चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत त्यांच्यावर नजीकच्या दवाखान्यात उपचार सुरू आहेत..
9
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowAug 09, 2025 04:48:13Virar, Maharashtra:
Date-9aug2025
Rep-prathamesh tawade
Loc-virar
Slug-VIRAR BABA
Feed send by 2c
Type-AVB
स्लग : भोंदू बाबा'ने भूत काढण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
अँकर : विरारमध्ये एका भोंदू बाबाने भूत काढण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी अल्पवयीन आहे. ती मंदिरात दर्शनासाठी गेली होती. त्यावेळी तिच्या अंगात आले होते ते पाहून तिच्या मित्राने तिला एका भोंदू बाबाकडे नेले. भोंदू बाबाने तिला भूत उतरविण्यासाठी एक विधी करावा लागेल असे सांगितले. त्यानंतर तिला दुचाकीवरून राजोडी बीच वरील एका लॉजवर नेले. तेथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात भोंदूबाबसह मित्रावर बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी चार तासातच
अटक केली आहे.
Byte : लालू तुरे - वरिष्ठ पोलीस निरीक्षक ( विरार पोलिस स्टेशन )
14
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 09, 2025 04:47:42Ambernath, Maharashtra:
अंबरनाथ एमआयडीसीला दलालांचा विळखा!
प्लॉटची चार ते पाच पट दराने होते विक्री!
स्थानिकांकडूनही उद्योजकांना दिला जातोय त्रास
असंच सुरू राहिल्यास उद्योग राज्याबाहेर नेण्याचा इशारा!
Amb midc
Anchor अंबरनाथ एमआयडीसीत दलालांचा सुळसुळाट झाला असून एमआयडीसीचे प्लॉट चार ते पाच पट दराने विकले जात असल्याचा गौप्यस्फोट उद्योजकांच्या आमा संघटनेने पत्रकार परिषद घेत केलाय.
Vo : अंबरनाथ एमआयडीसीत गेल्या काही वर्षात रीतसर अर्ज करून प्लॉट घेतलेला एकही माणूस सापडणार नाही. एमआयडीसी ही स्थानिकांकडून भूसंपादन न करताच ती जागा परस्पर उद्योजकांना विकून टाकते. पण ती जागा ताब्यात नसल्यानं स्थानिक आणि उद्योजकांमध्ये वाद होतात. त्यामुळं उद्योग सुरू व्हायलाच तीन ते चार वर्ष लागत असल्याचा आरोप आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी केला. अंबरनाथ एमआयडीसीत स्थानिकांचाही त्रास असून ट्रान्सपोर्ट, लेबर अशा सगळ्या सुविधा दुप्पट ते तिप्पट किमतीने घ्याव्या लागतात, ज्यात उद्योजकांचं नुकसान होत असल्याचा आरोप तायडे यांनी केला. या सगळ्याला कंटाळून अनेक मोठ्या कंपन्यांनी आपलं बहुतांशी उत्पादन राज्याबाहेर नेलं असून यामुळं आपला रोजगार कमी झाल्याचा दावा उमेश तायडे यांनी केलाय. आम्ही स्थानिकांकडून सुविधा घ्यायला तयार आहोत, पण त्यांनी बाजारभावानुसार सेवा पुरवाव्यात, असं आवाहन उमेश तायडे यांनी केलं. तर हे सगळं असंच सुरू राहिल्यास अंबरनाथ एमआयडीसीतील १४०० कंपन्यांना राज्याबाहेर जाण्यावाचून पर्याय नसेल, असं उमेश तायडे म्हणाले.
Byte : उमेश तायडे, अध्यक्ष, आमा संघटना
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
14
Report