Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

यशोमती ठाकूरने खासदार वानखडे यांना दिली संविधानाची प्रास्ताविका राखीच्या सोहळ्यात!

ADANIRUDHA DAWALE
Aug 09, 2025 05:19:51
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_RAKSHA_BANDHAN तीन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी बांधली खासदार बळवंत वानखडे यांना राखी; यशोमती ठाकूर यांनी दिली बळवंत वानखडे यांना संविधानाची प्रास्ताविका भेट अँकर :- आज रक्षाबंधन बहिण भावाच्या नात्यातला पवित्र सण यानिमित्ताने अमरावती जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे आणी माजी मंत्री काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन सोहळा साजरा केला. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी खासदार बळवंत वानखडे यांना ओवाळणी घालत राखी बांधली. यावेळी यशोमती ठाकूर यांनी खासदार बळवंत वानखडे यांना संविधानाची प्रास्ताविका भेट दिली त्यामुळे यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांची वेगळीच रक्षाबंधन पाहायला मिळाली.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HPHARSHAD PATIL
Aug 09, 2025 10:47:52
Palghar, Maharashtra:
पालघर - पालघर मध्ये देखील आज जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह पाहायला मिळाला . जिल्ह्यातील ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आदिवासी पारंपारिक वेशभूषेत आदिवासींनी आपली पारंपारिक वाद्य आणि नृत्य सादर केली असून यावेळी डहाणू येथे डहाणू विधानसभेचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले यांनी तारपा या पारंपारिक आदिवासी वाद्याच्या तालावर ठेका धरला . आदिवासी रूढी , परंपरा कायम रहाव्या म्हणून जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली देखील डहाणू येथे भव्य रॅलीकडून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला असून यावेळी आमदार निकोले यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या . Bite - आमदार विनोद निकोले
0
Report
SKSudarshan Khillare
Aug 09, 2025 10:46:49
Yeola, Maharashtra:
अँकर:- दक्षिण भारत व उत्तर भारताला जोडणाऱ्या प्रमुख महामार्गां पैकी एक असलेल्या पुणे- इंदोर महामार्ग हा येवला शहरातून जातो अनेक दिवसांपासून या महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत असून अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे एक एक दोन दोन तास वाहतूक कोंडी सुटत नसून वाहनधारकांना व नागरिकांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. येवल्याचे आमदार तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून पुणे- इंदोर महामार्गावर येवला शहरासाठी उड्डाणपूल अथवा बायपास व्हावा अशी मागणी केली आहे दरम्यान या वाहतूक कोंडीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 09, 2025 10:31:17
Parbhani, Maharashtra:
अँकर- महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत सहा लाख शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्यात त्याला शासनकर्त्यांना जबाबदार धरून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नारळी पोर्णिमेनिमित्त वेदनेचा धागा असे अभिनव आंदोलन करण्यात आले, या आंदोलना दरम्यान आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी आई बहिणीनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला काळी राखी बांधून कर्जमाफी,शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव देण्याची मागणी करीत दररोज होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा आर्त हाक घालण्यात आली. परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी हे अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि उपस्थित शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कृषी धोरणा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेती शेती मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचा आरोप करीत शेतकरी महिलांचं सिन्दुर वाचवा अस साकडं यावेळी सरकारला घालण्यात आलं. बाईट- शिवलिंग बोधने- प्रहार जनशक्तीपक्ष,जिल्हाध्यक्ष परभणी
3
Report
ABATISH BHOIR
Aug 09, 2025 10:30:42
Kalyan, Maharashtra:
डोंबिवली न्यूज फ्लॅश.. कल्याण शीळ रोडवर मोठया प्रमाणात वाहतूक काेंडी सकाळ पासून वाहतूक कोंडीत अडकली वाहने. मानपाडा ते शिळफाट्या गाठण्यासाठी लागतं आहे दोन तास. कल्याण आणि डोंबिवलीहुन शिळफाटेच्या दिशेने निघालेल्या नागरिकांचे प्रचंड हाल. कल्याणच्या शिळफाटा दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी सलग दोन दिवस सुट्या आणि आज रक्षाबंधन मुले नागरिक मोठ्या प्रमाणात गाड्या घेऊन पडले बाहेर. कल्याण कटाई नाक्या पर्यत मेट्रोच्या कामामुले देखील होतं आहे ट्राफिक जाम..
4
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 09, 2025 10:03:38
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - शरणु हांडे अपहरण प्रकरणात अटक आरोपीना दोन्ही आरोपीना देखील 3 दिवसांची पोलीस कोठडी शरणु हांडे अपहरण प्रकरणात अटक आरोपीना दोन्ही आरोपीना देखील 3 दिवसांची पोलीस कोठडी राकेश भीमाशंकर कुदरे, श्रीकांत बाबुराव सुरपुरे या दोघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी शरणू हांडे अपहरण प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरून दोन्ही आरोपीन इंडी तालूक्यातील निंबाळ गावातून पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात शरणु हांडे अपहरण प्रकरणात या आधीचं चौघाना न्यायालयाने 12 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली होती आता राकेश भीमाशंकर कुदरे, श्रीकांत बाबुराव सुरपुरे या दोघांनाही न्यायालयाने 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय
6
Report
PNPratap Naik1
Aug 09, 2025 10:00:23
Kolhapur, Maharashtra:
Kop Bhrun Hatya Feed :- 2C Anc :- कोल्हापुरातील तळंदगे या गावात एका शेतात नवजात अर्भक पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. साधारणतः दोन ते अडीच महिन्याचे अर्भक पुरल्याचे आढळून आले आहे. हे अर्भक अनैतिक संबंधातून किंवा लिंग चाचणी केल्यानंतर गर्भपातकरून पुरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर हुपरी पोलीस अधिकारी आणि अप्पर तहसीलदार यांनी घटनास्थळाला भेट दिली. तळंदगे येथील धोंडिबा फडतारे यांच्या ऊसाच्या शेतात शेतात पुरलेल्या या अर्भकामुळे गावात खळबळ उडाली आहे. सकाळच्या सुमारास फडतारे हे आपल्या शेतात गेल्यानंतर त्यांना शेतामध्ये खड्डा खणलेला आढळून आला. त्याचबरोबर त्यांना मिठाची पिशवी व इतर संशयास्पद साहित्य आढळून आले. हे सगळं दृश्य दिसल्यानंतर फडतरे यांनी या घटनेची माहिती पाटील गावचे पोलीस यांना दिली. त्यानुसार हुपरी पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी आणि अप्पर तहसीलदारांनी घटनास्थळाला भेट दिली.
5
Report
APAMOL PEDNEKAR
Aug 09, 2025 10:00:17
Mumbai, Maharashtra:
Feed TVU mulund *मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस बाईट पॉइंटर* रक्षाबंधन हे बहिण भावाचा एक पवित्र बंधन बहिणीचीच नाही आपल्या भारत मातेच्या रक्षणाची आपण सर्व लोक संकल्पना करत असतो ..या पवित्र दिनी सर्व लाडक्या बहिणींना मनःपूर्वक शुभेच्छा देतो... *ऑन शरद पवार ऑन विधान सभा 160 गोप्यस्पोट* मला हे लक्षात येत नाही..पवार यांना राहुल गांधी यांना भेटल्यानंतर इतक्या दिवसांनी आठवण कशी आली.. राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेद प्रमाणे कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप वर रोज नवीन कपोल कल्पित कहाण्या सांगत आहे अशा प्रकारची अवस्था पवार साहेबांची तर झाली नाही ना? राहुल गांधी evm बाबत बोलत होते पवार साहेबांनी अनेक वेळा भूमिका घेतली evm ला दोष देणे अयोग्य आहे...आणि आता ते बोलत आहे राहुल गांधी यांच्या भेटीचा परिणाम दिसत आहे.. कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करा मात्र भारता एवढी फ्री अँड फेयर निवडणुका कुठेही होत नाही ... हे सर्व जण बोलत आहे मात्र इलेक्शन कमिशन ने बोलवलं तर कोणी जात नाही.. इलेक्शन कमिशनर समोर शपथपत्र द्यायला तयार नाही आणि सांगत आहे आम्ही संसदेत शपथ घेतली आहे संसदेतील शपथ सुप्रीम कोर्टात सांगत असेल आणि ते म्हणत असेल आम्ही संस्थेची शपथ घेतली हे चालेल का? शपथ पत्र मागितला असून सुद्धा तुम्ही का देत नाही तुम्ही खोटं बोलत आहे तुमचा खोटं बोलने पकड गेले तर तुमच्यावर उद्या कारवाई स्वरूपात होऊ शकते.. रोज खोटं बोलायचं आणि पळकुटे सारखे पळून जायचे हे तुमचे काम आहे..
8
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 09, 2025 09:50:17
Raigad, Maharashtra:
स्लग - एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू ........ श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील घटना ...... अँकर - एटीएम मशिन कक्षाच्या दरवाजाला हात लावताच विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला. भावेश पोवळे असं मृत तरुणाचे नाव आहे. कुडगाव येथील हा तरुण दिघी येथील बँकेच्या एटीएम मशिन मधून पैसे काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी एटीएम कक्षाचा दरवाजा उघडताच विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून बँकेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.
11
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 09, 2025 09:32:54
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0908ZT_JALNA_DANVE(12 FILES) जालना :ब्रेकिंग आजी-माजी खासदारांमध्ये महसूलमंत्री बावनकुळे यांच्यासमोरच विकासकामांवरून जुंपली आजी माजी खासदारांमध्ये मंजूर करून आणलेल्या कामांवरून श्रेय खेचाखेची कामं मि आणि संतोष दानवे मंजूर करून आणतो बातमी मात्र रावसाहेब दानवेंची येते-कल्याण काळे मि केलेल्या कामांवर मि जाणारच, मि खतरनाक जहरी नाग,बाप बाप होता है-रावसाहेब दानवे मि तुमच्यावर टिका करणार नाही पण माझी बातमी आल्यावर तुम्ही भडभड करू नका- रावसाहेब दानवे रावसाहेब दानवेंची काम करण्याची क्षमता जास्त, रावसाहेब दानवेंच्या सल्ल्याने काम करण्याचा बावणकुळे यांचा काळे यांना सल्ला अँकर: जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे आणि विद्यमान खासदार कल्याण काळे यांच्यात विकासकामांवरील श्रेयवाद चांगलाच उफाळून आलाय. या श्रेयवादावरून रावसाहेब दानवे आणि खासदार कल्याण काळे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते जालन्यातील जाफ्राबादमध्ये पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन शुभारंभ तसेच परिवहन महामंडळाच्या बस स्थानकाचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी आयोजित कार्यक्रमात दानवे आणि काळे यांच्यात महसुलमंत्र्यांसमोरच आयोजित कार्यक्रमात चांगलाच कलगीतुरा रंगला. विकासकामं मि आणि आमदार संतोष दानवे मंजूर करून आणतो बातम्या मात्र रावसाहेब दानवेंच्या येतात.असं म्हणत खासदार कल्याण काळे यांनी माजी खासदार रावसाहेब दानवे यांना चिमटा घेतला.दरम्यान काळे यांच्या या प्रश्नाला उत्तर देत रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या भाषणातून खासदार कल्याण काळे यांच्यावर कुरघोडी केली. विकासकामांसाठी मि पैसे आणलेले आहेत असं सांगत कामे मि केली आहे त्यामुळे मि कामांवर जाणारच असं ठणकावून सांगत माझ्या प्रत्येक कृतीची बातमी होते असा टोला दानवे यांनी काळे यांना हाणला.मि तुमच्यावर टिका करणार नाही पण माझी बातमी आल्यावर तुम्ही भडभड करू नका असं आवाहन देखील रावसाहेब दानवे यांनी काळे यांना करत चिमटा घेतला.दरम्यान बाप बाप होता है,मि कसा जहरी नाग आहे हे सगळ्यांना माहीत आहे असंही दानवे त्यांच्या भाषणात सांगायला विसरले नाहीत. दरम्यान बावनकुळे यांनीही त्यांच्या भाषणात दानवे आणि काळे यांना एकत्र बसून काम करण्याचा सल्ला दिला. साऊंड बाईट कल्याण काळे,खासदार जालना साऊंड बाईट : रावसाहेब दानवे,माजी खासदार बाईट : चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
12
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Aug 09, 2025 09:30:53
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 0908ZT_MAVAL_POLICE Total files : 04 Headline -कर्तव्यावर तैनात पोलिस बांधवांबरोबर देहूरोडमध्ये अनोखा रक्षाबंधन सोहळा Anchor: राखी पौर्णिमा भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा सण या सणाला बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भावावर येते याच पवित्र बंधनाचा कार्यक्रम २४ तास कर्तव्यावर असणाऱ्या देहूरोड पोलीस स्टेशनच्या पोलीस बांधवांना राखी पौर्णिमेला रघुवीर शेलार स्नेह ग्रुपच्या हिंदू आणि मुस्लिम बहिणींनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्यासह; पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून साजरा केला. तर राखी बांधताना भगिनींनी पोलिस बांधवांच्या रक्षणाचे वचन घेतले, तर पोलीस भावंडांनी आपल्या जीवाची बाजी लावून नागरिकांच्या सुरक्षेची शपथ पुन्हा दृढ केली. परस्पर प्रेम, स्नेह आणि कर्तव्यभावनेचा संगम घडवणारा हा सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला. साऊंड : विक्रम बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देहूरोड पोलीस स्टेशन (file no.04)
13
Report
KJKunal Jamdade
Aug 09, 2025 09:18:43
Shirdi, Maharashtra:
Akole News Flash अकोलेत जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह.... बँडच्या तालावर अकोलेत तरुणाई थिरकली... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन... आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅली आणि जाहीर सभेचे आयोजन... हजारोंच्या संख्येनं आदिवासी तरुणांसह ज्येष्ठांनी पारंपरिक वेशभूषेत , नृत्य ढोल ताशांच्या गजरात आदिवासी दिनाचा रंगतदार माहोल.... अकोले तालुका आदिवासी बहुल तालुका असल्याने जागतिक आदिवासी दिनाला विशेष महत्त्व... आदिवासी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम परिसरातून कार्यक्रमाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी... wkt kunal jamdade
14
Report
MNMAYUR NIKAM
Aug 09, 2025 09:17:39
Buldhana, Maharashtra:
बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस.... Anchor - बुलढाणा जिल्ह्यात गेल्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिखली, सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने विशेषतः कहर केला आहे. या पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी घरात शिरल्याने घरातील धान्य, फर्निचर, कपडे आणि इतर महत्त्वाच्या वस्तू पाण्यात भिजून खराब झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. गावातील रस्ते नद्यांसारखे वाहत आहेत, ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या मुसळधार पावसामुळे परिसरातील शेतजमिनींना तलावाचे स्वरूप आले आहे. शेती पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. पुरामुळे बाधित झालेल्या ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरित पाहणी करून नुकसानग्रस्त नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
14
Report
PNPratap Naik1
Aug 09, 2025 09:00:20
Kolhapur, Maharashtra:
मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आनूरमध्ये साजरे केले रक्षाबंधन. १०० हून अधिक बहिणींनी बांधली मुश्रीफ यांना राखी. Kop Mushrif Raksha Bandhan Feed :-2C Anc :- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आनूरमध्ये रक्षाबंधन साजरी केले. यावेळी शंभरहून अधिक बहिणीनी हसन मुश्रीफ यांना राखी बांधली. सैनिक भावनाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त हसन मुश्रीफ हे आनूर गावात पोहोचले होते. यावेळी हसन मुश्रीफ यांच्या स्वागताला जमलेल्या महिलांनी मुश्रीफ यांना राख्या बांधल्या. यावेळी बोलताना हसन मुश्रीफ यांनी माझ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी मी सदैव भाऊ म्हणून खंबीरपणे हिमालयासारखा उभा राहीन अशी ग्वाही दिली.
14
Report
GMGANESH MOHALE
Aug 09, 2025 08:46:47
Washim, Maharashtra:
वाशिम: File:0908ZT_WSM_DAM_WALL_LEAKS रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर:वाशिम च्या मानोरा तालुक्यातील पिंपरी येथील सिंचन तलावाची भिंत सध्या दोन्ही बाजूंनी खचत असून तातडीच्या दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे. लघु पाटबंधारे विभाग, मंगरुळपीर यांच्या देखरेखीखाली असलेल्या या तलाव खराब स्थितीमुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांत दुरुस्तीच्या कामाकडे पुरेसे लक्ष देण्यात आले नाही.यंदाच्या पावसाळ्यात भिंतीतील माती वाहून गेल्याने आणि तडे वाढल्याने भिंतीची मजबुती कमी होत आहे.जर वेळेत दुरुस्ती केली नाही, तर मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होऊन तलाव फुटण्याचा धोका संभवतो. स्थानिकांनी या परिस्थितीची माहिती संबंधित विभागाला दिली असून, लवकरात लवकर भिंत दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
13
Report
ADANIRUDHA DAWALE
Aug 09, 2025 08:46:25
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_RANA_RAKHI चार फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 आमदार रावी राणा यांना शेकडो बहिणींनी बांधली राखी; लाडक्या बहिणीच मानधन दुप्पट करावी रवी राणा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी अँकर :- आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात दरवर्षी रक्षाबंधन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याही वर्षी शेकडो बहिणींनी आमदार रवी राना यांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधून शुभेच्छा दिल्या तर लाडक्या बहिणीची रक्कम ही दुप्पट करावी अशी मागणी रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. लाडक्या बहिणीचा आशीर्वाद सदैव देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी राहील असे त्यांनी यावेळी सांगितलं बाईट :- रवी राणा, आमदार
14
Report
Advertisement
Back to top