Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421306

मुसळधार पावसामुळे कल्याण लोकल सेवा विस्कळीत!

ABATISH BHOIR
Aug 19, 2025 04:46:39
Kalyan, Maharashtra
मध्य रेल्वे दुसऱ्या दिवशी लोकल सेवा विस्कळीत; मुसळधार पावसामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक अनिश्चित काळासाठी वीस ते पंचवीस मिनिटं उशिराने सुरू. कल्याण रेल्वे स्टेशन हा मुख्य रेल्वे स्टेशन एक्सस्प्रेस गाड्या उशिराने असल्याने रेल्वे प्रवासी ताटकळत.. कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही मार्गावरील लोकल 20-25 मिनिटे उशिराने कालही सकाळ-संध्याकाळच्या गाड्या उशिराने धावल्यानं चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले होते आज नियोजित वेळेवरती लोकल गाड्या येतील अशी अपेक्षा होती मुंबई मध्ये मुसळधार व मात्र तांत्रिक अडचण आणि पावसामुळे आज सकाळपासून उशिरा सुरू असलेल्या या लोकल ट्रेनचा प्रवाशांना फटका वेळेत लोकल न धावल्याने प्रवाशांमध्ये व सकाळी कामाला जाणाऱ्या चाकरमानांची कल्याण स्थानकावर गर्दी. Wkt... आतिश भोईर
11
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRANAV POLEKAR
Aug 19, 2025 06:31:07
Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी - चिपळूणमध्ये पूर जन्य परिस्थिती वाशिष्ठी नदिनाइशारा पातळी ओलांडली वाशिष्ठी नदीची पाणी पातळी 5.50 मीटर इतरी चिंचनाका , मच्छिमार्केट परिसर ,बाजारपूल परिसर , जुना स्टँड बाजारपेठ परिसर सांस्कृतीक केंद्र या भागात दिड फुटांहून अधिक पाणी चिपळूणमध्येच ndrf ची टीम तैनात, प्रशासन देखील अलर्ट मोडवर नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये प्रशासनाच आवाहन
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 19, 2025 06:30:59
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 4 FILES SLUG NAME -SAT_GANPATI_WAI सातारा जिल्ह्यात वाई येथील धोम धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढल्याने धरण प्रशासनाने कृष्णा नदीपात्रात 5 वक्र दरवाजातून 8700 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यामुळे वाई येथील कृष्णा नदी पात्रालगत असणारे प्रसिद्ध महागणपती मंदिरात पाणी शिरले आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूने पाणी वाहत असून मंदिरातील गणपतीची मूर्तीच्या पायाला पाणी टेकले आहे.संपूर्ण मंदिर हे गुडघाभर पाण्यात बुडाले आहे. byte -पुजारी
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 19, 2025 06:30:48
Kalyan, Maharashtra:
डोंबिवली मध्ये देखील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पाणी साचले. स्टेशन काढण्यासाठी प्रवाशांची हाल.. दुकानं मध्ये शिरले पाणी... Anc.. सकाळ पासून मुसळधार पावसामुले कल्याण आणि डोंबिवली च्या सकल भागामध्ये पाणी साचले असते तरी डोंबिवलीच्या स्टेशन परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचल्याने रेल्वे स्थानक वर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे तसेच डोंबिवली स्टेशन परिसरातील दुकानांमध्ये देखील पाणी साचले याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी Wkt... आतिश भोईर डोंबिवली
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 19, 2025 06:30:35
Raigad, Maharashtra:
स्लग - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत ..... कळमजे येथील पूल जड , अवजड वाहतुकीसाठी बंद ..... घोड नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने निर्णय ...... पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन ...... अँकर - आताची कोकणातील पावसाची सर्वात मोठी अपडेट . मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. माणगाव जवळ कळमजे येथील घोड नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने या पुलावरून जड अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. केवळ छोटी वाहने इथून सोडली जात आहेत. मोठ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. काल रात्रीदेखील या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती. 5 तासानंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली मात्र आता पुन्हा नदीची पाणी पातळी वाढल्याने धोका होऊ शकतो हे लक्षात घेऊन अवजड वाहनांची वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई वरून येणारी मोठी वाहने पाली निजामपूर मार्गे माणगाव या पर्यायी मार्गाचा वापर करू शकतात. रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. बाईट - पुष्कराज सूर्यवंशी, डीवायएसपी
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Aug 19, 2025 06:16:40
Palghar, Maharashtra:
पालघर जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पालघर मधील सावरे येंबूर रस्ता पाण्याखाली गेल्याने जवळपास सहा गावांचा संपर्क तुटला आहे.तर सूर्य आणि वैतरणा नदीला सुद्धा पूर आला आहे.
5
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Aug 19, 2025 06:16:31
Nala Sopara, Maharashtra:
Date-19aug2025 Rep-prathamesh tawade Loc-nalasopara Slug-NSP PROTEST Feed send by 2c Type-AV Slug- नालासोपारा संतोष भुवन येथे नागरिकांचा रस्ता रोको बुलेट ट्रेन च्या कामामुळे पाणी तुंबून लोकांच्या घरात गुडघाभर पाणी प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी नागरिक रस्त्यावर ANC : नालासोपारा संतोष भवन परिसरामध्ये बुलेट ट्रेन च्या कामामुळे पाणी तुंबून लोकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरलं आहे. त्यामुळे येथील संतप्त रहिवाशांनी रस्त्यावर येऊन रस्ता रोको केला आहे. संतोष भवन गरेड पाडा मायकल कंपाऊंड या परिसरातील नागरिक रस्त्यावर आल्याने नालासोपारा रस्ता आडवला आहे. त्यामुळे याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
4
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 19, 2025 06:16:24
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn sattar byte Feed attached राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे अनेक ठिकाणी शेतीचा नुकसान झालाय याबाबत कृषिमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे तात्काळ पंचनामे करावे आणि शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी माजी कृषिमंत्री आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलेली आहे,  सोबतच नव्या पिक विमा योजनेत 60% शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे त्यामुळे एक रुपयात पीक विमा योजना जी बंद केली आहे ती सरकारने पुन्हा सुरू करावी आणि हवालदिलं शेतकऱ्याला धीर द्यावा अशी ही मागणी अब्दुल सत्तार यांनी केली आहे.. Byte अब्दुल सत्तार, आमदार शिवसेना
3
comment0
Report
SMSarfaraj Musa
Aug 19, 2025 06:03:07
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - कृष्णा नदीची पाणी पातळी 19 फुटांवर जिल्हाधिकारयांनी नदीकाठाची केली पाहणी.. अँकर - कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि कोयना धरणातून सुरू असलेले विसर्ग यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे,सांगली कृष्णा नदीची पाण्याची पातळी सध्या 19 फुटांवर पोहोचली आहे.या पार्श्वभूमीवर सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी कृष्णा नदीची पाहणी केली आहे. आयर्विन पूल येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पाहणी करत प्रशासनाकडून संभाव्य पूर परिस्थितीचा आढावा देखील घेतलाय,त्याचबरोबर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,सध्याची परिस्थिती पाहता महापालिका क्षेत्रातील नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी,असा आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडून करण्यात आले असून पूर परिस्थिती उद्भवल्यास प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
3
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 19, 2025 06:01:50
Beed, Maharashtra:
बीड : माजलगाव धरण ५६ टक्क्यांवर, आवक कायम राहिल्यास रविवारपर्यंत ८० टक्के भरण्याची शक्यता..! Anc- गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे माजलगाव धरणातील पाणीपातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे. आज मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत धरण ५६ टक्क्यांवर भरले असून सध्या दहा हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. सततच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा जलद गतीने वाढत आहे. आवक याच वेगाने कायम राहिल्यास रविवार पर्यंत धरण ८० टक्क्यांवर पोहोचेल असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे. धरणातील वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे बीड आणि माजलगावसह २२ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला आहे.
1
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 19, 2025 06:01:35
Ratnagiri, Maharashtra:
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कोकणातील नेते प्रशांत यादव आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत.. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. प्रशांत यादव आपल्या हजारो समर्थकांसह, शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह सकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्यासह कोकणातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे.. प्रशांत यादव यांचा गत निवडणुकीत थोड्या मतांनी पराभव झाला होता. जवळपास 90 हजार मतं त्यांनी घेतली होती. त्यामुळे यादव यांच्या पक्ष प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपला बळकटी मिळणार आहे..
3
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 19, 2025 06:01:21
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1908ZT_CHP_TEMPLE_THEFT ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर शहरातील घनदाट वस्तीतल्या मध्यवर्ती भागातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात धाडसी चोरी, चोरट्यांनी रात्री खिडकी तोडून आत केला प्रवेश, एक दानपेटीच पळवून नेली, तर दुसऱ्या दानपेटीला फोडून आतील रक्कम लांबविली      अँकर:--चंद्रपूर शहरातील घनदाट वस्तीतल्या मुख्य मार्गावरील मध्यवर्ती भागातल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरात धाडसी चोरी उजेडात आली आहे. चोरट्यांनी रात्री खिडकी तोडून आत प्रवेश केला. मंदिरातील एक दानपेटीच पळवून नेली, तर दुसऱ्या दानपेटीला फोडून आतील रक्कम लांबविली आहे. पुजारी सकाळी मंदिरात पोचताच हा प्रकार उघडकीस आला. पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. श्वानपथक घटनास्थळी पोचले असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. बाईट १) कैलास सोमाणी, मंदीर ट्रस्टी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
1
comment0
Report
KPKAILAS PURI
Aug 19, 2025 06:01:05
Pimpri-Chinchwad, Pune, Maharashtra:
pimpri death kailas puri Pune 19-8-25 feed by 2c Anchor - .... पिंपरी चिंचवडच्या निगडी प्राधिकरण येथे बीएसएनएल चेंबरमध्ये गुदमरून तीन कामगारांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने लक्ष घातले असून याप्रकरणी जिल्हा प्रशासन, पोलीस, बीएसएनएल आणि महापालिका आयुक्तांनी येत्या तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगानं दिलेत. बीएसएनएल केबल तपासणीसाठी 15 ऑगस्ट ला हे तीन कामगार प्राधिकरणातील भेळ चौकात चेंबर मध्ये उतरले असता त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अनुसूचित जाती आयोगाकडे चौकशीची मागणी केल्यानंतर आयोगाने या प्रकरणी तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
1
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Aug 19, 2025 06:00:57
Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात गेल्या दोन तासापासून जोरदार पावसाला सुरुवात Ulh rain Anchor उल्हासनगरात सकाळी नऊ वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून , शहरातून वाहणारा वालधुनी नाला तुडुंब भरून वाहत आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानकाबाहेरील पूलही पाण्याखाली  जाण्याची शक्यता असून पूल खालून फक्त एक फुटावरून पाण्याचा प्रवाह वाहत आहे. .वालधुनी नदी तुडुंब वाहत असल्याने शहरातील सकल भागात पाणी साठण्याची शक्यता आहे मात्र  अजून कुठेही पाणी भरल्याची माहिती नाहीये चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
3
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Aug 19, 2025 06:00:41
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_YASHOMATI दोन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 तुम्ही पालकमंत्री आहात तर लोकांची काळजी करा; काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका शेतकऱ्यांच्या नुकसानीवरून यशोमती ठाकूर आक्रमक; शेती बांधावर जाऊन यशोमती ठाकूर कडून नुकसानीची पाहणी अँकर :– अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालं आहे, सोयाबीन, कपाशी, तूर यासह पिकांना मोठा फटका बसला आहे. उभे पीक आडवे झाल्याने शेतकरी हतबल झाला असून या संदर्भात काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी तिवसा तालुक्यात शेती बांधावर जाऊन पाहणी केली असून यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला यानंतर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. पालकमंत्री दहीहंडीमध्ये येतात पण साध कलेक्टरला नुकसान भरपाई बाबत विचारत नाही बैठका घेत नाही या गोष्टी सहन कशा काय करायच्या. वोट चोरी करूनच तुम्ही लोक सत्तेत आले आहेत हे आता सिद्ध झाल आहे तुम्ही पालकमंत्री आहात लोकांची काळजी करा असा टोला यशोमती ठाकूर यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला आहे. बाईट :– यशोमती ठाकूर, काँग्रेस नेत्या
4
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Aug 19, 2025 06:00:27
Virar, Maharashtra:
Date-19aug2025 Rep-prathamesh tawade Loc-virar Slug-VIRAR HOUSE WKT Feed send by 2c Type-pkg Slug- विरार एम बी इस्टेट परिसरात तळमजल्यावर राहणाऱ्या नागरिकांचे हाल तळमजल्यावरील घरांमध्ये झरे व पावसाचे पाणी साचले वयोवृद्ध नागरिकांचे खाण्यापिण्याचे हाल अँकर - विरार पश्चिमेच्या एमबीइस्टेड परिसरातील सोसायटीमध्ये गुडघाभर पावसाचे पाणी साचले आहे.. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, मीटर बॉक्स मध्ये पावसाचे पाणी शिरल्याने येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे... तळमजल्यावरील सर्वच घरात जमिनीतून निघणारे झरे व पावसाच्या पाण्याने दुकानदार , नागरिकांचे हाल होत असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.. आहेत तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी...
4
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top