Back
जवान सोपान कुटे यांनी वडिलांच्या स्मृतीसाठी अनोखा वृक्षरोपण उपक्रम केला!
SKSudarshan Khillare
Aug 14, 2025 00:46:03
Yeola, Maharashtra
अँकर :- चिचोंडी येथील जवान सोपान उत्तम कुटे यांचे वडील उत्तम रघुनाथ कुटे यांचे वृद्ध काळाने निधन झाले होते यावेळी कुटे कुटुंबीयांनी उत्तम कुटे यांच्या दशक्रियेची राख नदी नाल्यात टाकून प्रदूषण न करता या राखेतून परिसरात वृक्षरोपण करून अनोखा संदेश देत वडिलांची स्मृती जतन करून ठेवली आहे या कृतीचे परिसरात आता कौतुक होत आहे
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowAug 14, 2025 03:18:22Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn ladki bahin av
Collected officer feed attached
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील सुमारे २६ लाख संशयित लाभार्थीच्या गृह चौकशीचे आदेश दिले आहेत. यामध्ये संभाजी नगर जिल्ह्यातील १ लाख ४ हजार अर्जाची फिजिकल पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ८४ हजार अर्ज हे एकाच घरातील तीन किंवा अधिक महिलांचे असल्याचे तपासणीत समोर आली आहे, तर २० हजार अर्ज २१ वर्षांखालील किंवा ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लाभार्थीचे आहेत. या सर्व अर्जदारांचा लाभ शासनाकडून थांबवण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात १०,१५,८३४ अर्ज आले होते त्यापैकी ९,२४,३४८ अर्ज मंजूर झाले.
3
Report
KPKAILAS PURI
FollowAug 14, 2025 03:18:12Pune, Maharashtra:
pimpri palika
kailas puri Pune 14-8-25
feed by 2c
Anchor - स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इमारतीवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत रोषणाईमुळे इमारत उजळून निघाली असून संपूर्ण परिसर या आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाईमुळे तिरंगा मय झाला आहे. याच विद्युत रोषणाईची ही खास झलक...!
4
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 14, 2025 03:18:05Beed, Maharashtra:
बीड:ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाकेंचा गाव पातळीवरील बैठकांवर जोर
Anc:मराठा आंदोलक मनोज जरांगें पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन होणार आहे. त्यापूर्वीच ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांच्याकडून ओबीसी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. लक्ष्मण हाके मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांनी बीड जिल्ह्यातून सुरुवात केली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी त्यांनी एल्गार पुकारलाय. हाके यांनी गावागावातून बैठका घेण्यास सुरुवात केली असून बैठकींना उस्फुर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.
2
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 14, 2025 03:17:56Dhule, Maharashtra:
ANCHOR - स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील आर्वी गावात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. न्यू एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दोनशे अकरा फूट तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीला माजी संरक्षणाचे मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली, विद्यार्थ्यांमध्ये देश भावना जनजागृती व्हावी तसेच हरघर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून ही रॅली काढण्यात आली होती. रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. रावेदरम्यान देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाला होत.
प्रशांत परदेशी, धुळे.
3
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 14, 2025 03:17:47Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_nmc
प्रभागरचनेच्या हरकतींवर २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत होणार सुनावणी
अँकर
आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना २२ ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यावर दि. २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी नेमणूक करण्यात आलीये...खंदारे मनपात येऊन सुनावणी घेणार असल्याची त्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हरकती घेण्यासाठीदेखील प्रशासन नियोजन करीत आहे. मनपाने शासनाच्या आदेशानुसार चार सदस्यीय प्रभागाची रचना करून तसे सीलबंद पाकिटे शासनाला दिले आहे. मतदान केंद्राची संख्या वाढीबाबत चर्चा होणार आहे.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 14, 2025 03:17:41Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Pait Stop
File:02
Rep: Hemant Chapude(Khed)
Anc :- खेड तालुक्यातील कुंडेश्वर डोंगरावर झालेल्या भीषण अपघातात 10 महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पाईट व पापळवाडी गावांत शोककळा पसरली आहे. हळहळ व्यक्त करत गावकऱ्यांनी आज पाईट गाव बंद ठेवून एक दिवसाचा दुखवटा पाळला. सकाळी ग्रामसभा घेऊन मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात संपूर्ण गाव सहभागी असल्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ, संताप आणि शोकाचे वातावरण पसरले आहे.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 14, 2025 03:16:43Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 1408_BHA_STUDENT
FILE - 1 VIDEO
हेटी रस्त्यावर पुरच पूर.... विद्यार्थ्यांसह नागरिकांना शोधावा लागतो पुरातून मार्ग
Anchor : भंडारा जिल्ह्याच्या हेटी येथिल विद्यार्थी व वासियांना पाण्यातून मार्ग शोधावा लागत असल्याचं भिषण वास्तव समोर आला आहे. एक दोन नव्हे तर चक्क साठ सत्तर वर्ष तथा तीन पिढ्यापासुन वास्तव्यास असलेल्या हेटी गावातील बारा ते तेरा कुटुंबीयांना रस्त्यावर पुरच पूर असल्याने पुराच्या पाण्यातून वाट शोधावी लागत असल्याने भीषण संकट ओढवले आहे. पाऊस असो की नसो, पावसाळ्यात या रस्त्यावर मात्र सदैव पूर सदृश्य स्थिती असल्याने दररोज विद्यार्थी तसेच महिला पुरुषांना कमालीचा त्रास सहन करावा लागत. मात्र रस्त्याच्या दुरुस्तीकडे
शासन, प्रशासनाचे लक्ष नसल्याने त्याचा फटका विद्यार्थि तसेच सामान्य जनतेला बसला आहे. दरम्यान रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
0
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 14, 2025 03:16:32Dhule, Maharashtra:
ANCHOR - शिंदखेडा तालुक्यातील पिलखेड येथील श्री हनुमान मंदिरात चोरट्याने भगवंताचे दर्शन घेतल्यानंतर त्याच भगवंताच्या समोरील दानपेटीत चोरून नेले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये झाला आहे. या चोराने मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर आधी भगवान हनुमंताला नमस्कार केला व त्यानंतर दानपेटी उचलून नेले. ज्या पद्धतीने चोरी केली त्यामुळे सर्वजण थक्क झाले आहेत. हा चोरटा दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी मंदिर परिसरात फिरत असताना दिसून आला आहे.तोच व्यक्ती नंतर मंदिरातून दान पेटी उचलून निघून गेला असल्याची घटना घडली आहे.सीसीटीव्ही फुटेज समोर येताच ही घटना वाऱ्यासारखी पसरली. या चोरी संदर्भात पिलखेड येथील गुरू गोरक्ष नाथ आखाड्याचे योगी दत्तानाथजी महाराज यांनी सदर घटने विषयी शिंदखेडा पोलिसांना कळविले, पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखली शिंदखेडा पोलीस करीत आहेत.
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 14, 2025 03:16:23Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn police action av
Feed attached
संभाजी नगरात शहरातील १,९०६ धार्मिक स्थळांवरून ६,५९१ भोंगे उतरवल्याचा पोलिसांनी सांगितलंय..
शहर हे संवेदनशील असतानाही पोलिसांनी सर्व राजकिय, सामाजिक, धार्मिक संघटनांना विश्वासात घेऊन सर्व धर्माच्या मदतीने हे केल्याचं सांगितलंय...
गाजावाजा न करता पोलिसांकडून शहराच्या शांततेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सर्व प्रार्थनास्थळांवरील नियमबाह्य भोंगे उतरवले आहेत. परवानगीधारक प्रार्थनास्थळांवर सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान केवळ ५५ डेसिबलच्या लाऊडस्पीकरला परवानगी असेल, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. या मोहिमेला सर्वांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून जवळपास सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवरील परवानगी नसलेले १०० टक्के भोंगे उतरवले गेले असल्याचा दावा पोलिसांनी केला. त्यासाठी शहर पोलिसांनी ८३ बैठका घेतल्या. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत कुठलेच भोंगे वाजणार नाहीत. ५५ डेसिबलपर्यंतच परवानगी. नियमभंग झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल..
0
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 14, 2025 03:04:04Dhule, Maharashtra:
Anchor श्रावणमास संपत आला तरी धुळे जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली नसल्याने जिल्ह्यातील धबधबे प्रवाहीत झालेले नाहीत.आणि यामुळे पर्यटकांनी धबधब्याकडे पाठ फिरवली आहे.धुळ्यापासुन जवळ असलेल्या लळींग येथील धबधब्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी बघायला मिळत असते मात्र जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने लळींग येथील हा धबधबा प्रवाहीत झालेला नाही. यासोबत सातपुडा पर्वत रांगेत असलेला नवादेवी धबाबा किंवा धाबादेवी धबधबा देखील प्रवाहीत नसल्याने पर्यटकांनी पाठ फिरवली आहे.जिल्ह्यात पावसाची प्रतिक्षा असतांनाच दुसरीकडे मात्र गेल्या आठ दिवसांपासून सुर्य आग ओकत असल्याने भर पावसाळ्यात उन्हाचे चटके जाणवत आहेत.यामुळे श्रावणमास संपत आला तरी धबधबे प्रवाहीत नसल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.
प्रशांत परदेशी, धुळे.
3
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 14, 2025 03:03:56Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_zp
प्रतीक्षेतील ४५ उमेदवारांना मिळणार नियुक्ती आदेश
अँकर
जिल्हा परिषद नाशिकतर्फे गट 'क' भरती प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या उमेदवारांचा सन्मान स्वातंत्र्य दिनानिमित्ताने विशेष पद्धतीने करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत दि. १५ ऑगस्टला आयोजित करण्यात येणाऱ्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेशांचे वितरण होणार आहे..सन २०२३ च्या भरती प्रक्रियेत जिल्हा परिषद नाशिकच्या विविध विभागांमध्ये गट 'क' श्रेणीतील विविध पदांसाठी नियुक्ती देण्यात आल्या. प्राथमिक निवड यादी जाहीर झाल्यानंतर उर्वरित पात्र उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली होती. शासनाच्या नियमांनुसार, रिक्त जागा उपलब्ध झाल्यास या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना प्राधान्याने संधी देण्याची तरतूद आहे. त्यानुसार, आता उपलब्ध झालेल्या जागांसाठी प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांची निवड करण्यात आलीये....
1
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 14, 2025 03:03:27Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - बार्शी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी, चांदणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने एसटी बस पडली अडकून
- सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पावसाची जोरदार
- तालुक्यातील आगळगाव ते उंबरगे दरम्यानच्या चांदणी नदीच्या परिसरात आडकली बस
- ओढा ओव्हर फ्लो झाल्याने आगळगाव ते उंबरगे वाहतूक खोळंबली
- रात्री मुक्कामी असणारी एसटी बस एका बाजूला पडली अडकून
- दरम्यानच्या पाण्याच्या ओव्हरफ्लोमुळे उंबरगे, भानसळे, खडकोनी, कळंबवाडी इत्यादी गावांचा संपर्क तुटला
- एसटी बाहेर काढण्यासाठी मार्गच नसल्याने शाळेला जाणारे विद्यार्थी तसेच ग्रामस्थांची होतेय गैरसोय
3
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 14, 2025 03:03:20Dhule, Maharashtra:
Anchor - खाद्य ओईलच्या टॅंकरमधून पुष्पा स्टाईल विदेशी दारुची तष्करी, मध्यप्रदेश राज्याकडून गुजरात राज्याकडे होतं होती, त्या दरम्यान टॅंकर वर कारवाई ही कारवाई करीत पोलिसांनी ,एक कोटींचा मुद्देमाल जप्त करील आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पुष्पा स्टाईलने खाद्य ओईलच्या टॅंकर मधून अवैध दारुची वाहतूक
धुळे एलसीबी आणि नरडाणा पोलिस पथकाने उघड केली आहे. टॅंकरच्या आत दारुचे बॉक्स लपविण्यासाठी सहा कप्पे बनविण्यात आल्याचे कारवाई दरम्यान उघड झाले आहे. मध्यप्रदेश राज्यातून गुजरात येथे दारु घेऊन जात असतांनाच कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी अंदाजे तब्बल एक कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.तब्बल ४५० विदेशी दारुचे बॉस टॅंकर मधील कंपन्यांमध्ये ठेवण्यात आले होते. मध्यप्रदेश राज्यातून गुजरात राज्याकडे विदेशी दारु वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांकडून तपासणी सुरु असतांनाच खाद्य तेलाच्या मोठ्या टॅंकरचे वरील बाजूस असलेले झाकण उघडले तेव्हा त्यात विदेशी दारुचे बॉस आढळून आले.या टॅंकर मध्ये एकुण सहा कप्पे करण्यात आले होते .यातील चार कप्यांमध्ये एकुण चारशे दारुचे बॉक्स ठेवण्यात आलं होते.
Byte - श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक
प्रशांत परदेशी, धुळे.
2
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 14, 2025 03:03:05Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn university av
Feed attched
छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर, उपपरिसरातील विविध अभ्यासक्रमांसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियाच्या प्रत्यक्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आज अंतिम मुदत आहे... बुधवारी सायंकाळपर्यंत विद्यापीठात ११७३ जागांवर प्रवेश झाले होते. स्पॉट अॅडमिशनमधील प्रवेश १८ ऑगस्टला होतील.
प्रवेश प्रक्रियेत यंदा दोन प्रवेश फेऱ्या, स्पॉट अडमिशन अशा ३ फेरी होणार आहेत. सध्या दुसऱ्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. बुधवारपर्यंत ११७३ जागांवर प्रवेश झाले. प्रवेशासाठी गुरुवारपर्यंत मुदत आहे. दोन फेरीनंतर स्पॉट अडमिशनसाठी रिक्त जागांबाबत संख्या स्पष्ट होणार आहे. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या २,३९१ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या फेरीसाठी १३६४ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली होती. त्यातील एकूण १ हजार ३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. दुसऱ्या फेरीसाठी एकूण १ हजार ५१० विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. त्यात बुधवारपर्यंत एकूण ११७३ जागांवर प्रवेश घेतले
4
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 14, 2025 03:02:45Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn paithan voter list
Use file voting shots
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या यादीत पैठण तालुक्यत तब्बल २५ हजार ८२० मतदारांची नावे दुहेरी नोंदवली गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये पैठण शहरातील २ हजार ६९८ आणि तालुक्यातील २३ हजार १२२ मतदारांचा समावेश आहे.
पैठण नगर परिषद हद्दीत सध्या ३५ हजार ७२२ मतदार आहेत. त्यापैकी २ हजार ६९८ जणांची नावे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या यादीतही नोंदवली गेली आहेत. यामध्ये ढोरकीन, मुधलवाडी, केकत जळगाव, दाभरुळ, विहामांडवा, बिडकीन, गेवराई बाशी, चितेगाव, सोलनापूर, आखतवाडा, पुसेगाव, वाघुंडी, तेलवाडी आदी गावांचा समावेश आहे. तालुकास्तरावरही एकाच मतदाराची नावे दोन ठिकाणी असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस आले आहेत. पैठण तालुक्यातील एकूण ३ लाख २ हजार २३१ मतदारांपैकी २३ हजार १२२ जणांची नावे दुहेरी आहेत. त्यामुळे निवडणूक विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
2
Report