Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

नाशिकच्या शाळेत जपानी व जर्मन भाषेची क्रांती!

SKSudarshan Khillare
Jul 11, 2025 01:00:54
Yeola, Maharashtra
*अँकर* : सरकारी शाळा नको रे बाबा असं म्हणणाऱ्या पालकांनी झी24तास चा हा विशेष रिपोर्ट नक्कीच पाहिला पाहिजे नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसुल येथील आदर्श जिल्हा परिषद शाळा राज्यात रोल मॉडेल ठरली असून या शाळेतील मुली चक्क जपानी व जर्मन भाषेचे धडे गिरवत आहेत. या शाळेतील मुली भविष्यातील स्पर्धेसाठी तयार व्हाव्या याकरता शाळेच्या शिक्षकांनी या मुलांना जपानी व जर्मन भाषा पाचवीपासूनच शिकवायला सुरुवात केली आहे. *व्हिवो 1*: एकीकडे राज्यात हिंदी भाषा शक्ती वरून वादविवाद सुरू असताना नाशिकच्या ग्रामीण भागात असलेल्या अंदरसुल येथील जिल्हा परिषद शाळेतील मुली जपानी व जर्मन भाषा शिकत आहेत पाचवीच्या वर्गातील मुलींना जपानी व जर्मन भाषा शिकणे आवडत असून भविष्यात त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर तयार करण्यासाठी या शाळेतील शिक्षकांनी उचललेले हे पाऊल आहे.... राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच या शाळेला भेट देऊन या विद्यार्थ्यांचे कौतुक केलं आहे... *बाईट* :- इयत्ता पाचवीतील जपानी व जर्मन भाषा बोलणाऱ्या विद्यार्थिनी विद्यार्थिनी व वर्गशिक्षिका यांच्यासोबत प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे *विव्हो 2*:- खाजगी शाळांच्या स्पर्धांमध्ये एकीकडे राज्यात जिल्हा परिषद शाळा मागे पडत असताना नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातील अंदरसुल येथील जिल्हा परिषद शाळा याला अपवाद ठरली आहे स्थानिक ते जागतिक या प्रवासाला इथल्या शिक्षणाने एक नवं वळण दिलं जात आहे.. शाळेच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुलींना जागतिक व्यासपीठाची ओळख मिळत आहे *बाईट 1* :- बाबासाहेब बेरगळ - मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा अंदरसुल. *बाईट 2* :- जयश्री पालवे, शिक्षिका *बाईट 3* - स्नेहल माळी,व समृद्धी देशमुख इयत्ता 5 वी विद्यार्थिनी *विव्हो*:- अंदरसुलच्या या शाळेची राज्यात आता चर्चा असून या शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी पालकांची देखील मोठी गर्दी होत आहे दरम्यान सर्व जिल्हा परिषद शाळांचा दर्जा असा सुधारला तर नक्कीच जिल्हा परिषद शाळांना सुगीचे दिवस येतील *End P2C* प्रतिनिधी :- सुदर्शन खिल्लारे झी 24 तास
13
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top