Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

आरक्षण पर जानकर का बड़ा आरोप: बीजेपी जनता को झुला रही, संसद से बिल संभव

SRSHRIKANT RAUT
Sept 09, 2025 07:47:17
Yavatmal, Maharashtra
AVB जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी यानुसार सरकारने ज्यांची मागणी आहे त्यांना आरक्षण दिले पाहिजे मात्र सत्ताधारी भाजप ची आरक्षण देण्याची इच्छा नाही, सगळ्यांना झुलवत ठेवण्याचा त्यांचा प्लॅन आहे. असा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी यवतमाळ मध्ये केला. आरक्षण संसदेतून देता येऊ शकते त्यामुळे तामिळनाडू प्रमाणे संसदेत बिल पास करावे. सरकारने ज्या जातीला काही मिळाले नाही त्यांच्या ताटातले घेण्याच्या भानगडीत पडू नये असेही महादेव जानकर म्हणाले.     बाईट : महादेव जानकर : अध्यक्ष रासप 
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 10, 2025 18:01:55
Ambernath, Maharashtra:
नेपाळमध्ये मुरबाड मधील 112 पर्यटक अडकले काठमांडूमधील हिंसाचाराचं विदारक चित्र मुरबाडमधील पर्यटकांनी मोबाईल कॅमेऱ्यात शूट केला व्हिडिओ आमदार किसन कथोरे यांनी केली पर्यटकांशी बातचीत Bdl nepal Anchor  नेपाळमध्ये हिंसाचारामुळे परिस्थिती अतिशय गंभीर बनली असून या ठिकाणी भारतातील पर्यटक मोठ्या संख्येने अडकून पडले आहेत. त्यात मुरबाड मधील 112 पर्यटकांचा समावेश आहे. मुरबाड मधून दोन ग्रुप नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत. नेपाळ मधली परिस्थिती गंभीर बनल्याने भारताच्या सीमारेषा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे पर्यटक तिथेच अडकून पडलेले आहेत. आपल्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत आणि लवकरात लवकर आपल्याला भारतात आणण्याची व्यवस्था करावी अशी मागणी या पर्यटकांनी केली आहे. मुरबाड मतदार संघाच्या आमदार किसन कथोरे यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी फोनवरून बातचीत करून त्यांना धीर दिला तर या पर्यटकांची लवकरात लवकर सुटका केली जाईल अशी माहिती मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे. Byte किसन कथोरे byte पर्यटक चंद्रशेखर भुयार  बदलापूर
7
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 10, 2025 15:30:58
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग : आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पूजा गायकवाडला 3 दिवसाची पोलीस कोठडी - बीडच्या लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण - आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पूजा गायकवाडला 3 दिवसाची पोलीस कोठडी - गोविंद बर्गे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बार्शी प्रथमवर्ग न्यायदांडाधिकाऱ्यांनी सुनवली तीन दिवसची पोलीस कोठडी - पूजा आणि मृत गोविंद यांच्यात मागील दीड वर्षांपासून प्रेम संबंध होते. - गावाकडील घर नावावर कर, बार्शीत शेतजामीन घेऊन दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी त्या महिलेने दिली. - त्या महिलेविरोधात नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
10
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 10, 2025 15:17:04
Vasai-Virar, Maharashtra:
Date-10sep2025 Rep-prathamesh tawade Loc-vasai Slug-VASAI AUTO Feed send by 2c Type-Av Slug--लाथा बुक्यांनी मारहाण करून रिक्षा चालकाची हत्या वसई रेल्वे स्टेशन परिसरातील घटना अँकर - रिक्षा स्टँडवरील रिक्षाला मागून ठोकर का मारली हे विचारल्याच्या रागातून एका रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षाचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली.. या घटनेत जखमी रिक्षा चालक सतीश बरणवाल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उमेळमान येथे राहणारे सतीश बरणवाल हे रिक्षा चालवतात. ते रविवारी रात्री वसई स्टेशनच्या समाधान हॉटेलच्या जवळ चहा पीत उभे होते , यावेळी रिक्षाचा धक्का लागल्याच्या वादातून आरोपी रिक्षाचालक दुखी उर्फ देवा शहा (४५) याने रिक्षाचालक सतीश याच्या पोटात लाथा बुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली. या मारहाणीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.. माणिकपूर पोलिसांनी आरोपी दुखी उर्फ देवा शहा याला अटक केली आहे.
12
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 10, 2025 15:15:49
Akola, Maharashtra:
Anchor : अकोल्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. Vo 1 : ठाकरे बंधूंची युतीची भूमिका अद्याप अधिकृत नाही त्याकुळे चर्चा होईल त्यावेळी आमची पुढची भूमिका स्पष्ट करू आल्याचं शिंदे म्हणाले.. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकी संदर्भात बोलताना त्यांनी मत चोरीला जात असल्याचा आमचा आरोप खरा आल्याचं म्हंटलंय तर खासदार फोडले जात असतील तर ही अवघड परिस्थिती असल्याचंही ते म्हणाले , बहुमत असतानाही अशा हालचाली का घडत आहेत?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राहुल बोन्द्रे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत बोलताना शिंदे यांनी म्हटलं... "खोटे आणि चुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून लोकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे..आमची जर फूट झाली असती, तर भाजपकडून आम्हाला पाठिंबा मिळाला असता. YSR चे मत कोणत्या आधारावर पडले? यावरून आमचे आरोप खरे ठरत आहेत," असा दावाही त्यांनी केला.. मंत्रालयातील बोगस नोकऱ्यांच्या तक्रारीवर भाष्य करत शिंदे यांनी यंत्रणेलाच पोखरल्याचा गंभीर आरोप केला. त्याचबरोबर अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याच्या पद्धतीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. "अशा वागणुकीमुळे भीतीचं वातावरण तयार होतं आणि त्यामुळे अधिकारी त्या ठिकाणी काम करण्यासाठी येणार नसल्याचं ते म्हणाले.. रोहित पवार यांची भूमिका मला मान्य नाही. मात्र ही माझी वैयक्तिक भूमिका आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं..मुख्यमंत्री यांच्यावर बरेच जण नाराज असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. हेमंत शिंदे यांच्या जाण्याने उलट मला फायदा झाल्याचही ते म्हणाले तर जे गेले त्याबद्दल आम्हाला आनंद असल्याचाही ते म्हणाले..सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी जाहिरातीं प्रयत्न होत असल्याची टीकाही त्यांनी केली..यामुळे महाविकास आघाडीत पुढील भूमिका नेमकी काय असेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Byte : शशिकांत शिंदे , प्रदेशाध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार.
11
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Sept 10, 2025 15:04:48
Palghar, Maharashtra:
पालघर - डहाणूहून विरार कडे जाणाऱ्या लोकलमध्ये पालघर रेल्वे स्थानकावर बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती . मात्र आता विरार कडे जाणारी ही लोकल प्लॅटफॉर्म नंबर दोन वर थांबून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या प्लॅटफॉर्म नंबर तीन वरून सुरू करण्यात आल्या आहेत .मात्र वाहतूक सुरू असली रेल्वे लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. तर दुसरीकडे बंद पडलेली लोकल दुरुस्तीच काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
8
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 10, 2025 14:35:03
Nashik, Maharashtra:
*नाशिक @ देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री* *बाईट मुद्दे* *ऑन लॅब उदघाटन* - आज सीपीआरआय रिजनल टेस्टिंग लॅबचे उद्घाटन झाले आहे - केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते झाले - टेस्टिंगला भोपाळ किंवा हैद्राबादला पाठवायला लागायचे - इको सिस्टम तयार होत नव्हती - केंद्र आल्यामुळे फायदा होणार आहे - केंद्रीय मंत्र्यांना विनंती केली - ईव्ही हब तयार होते आहे त्याचेही टेस्टिंग लॅब व्हावी अशी मागणी केली - त्याला त्यांनी होकार दिला - एक अतीशय महत्वाचे कार्य झाले *ऑन नाशिक दत्तक घेतल्याची टीका* - मी दत्तक घेतल्यावर राज्य गेले होते - मी नाशिकला सोडणार नाही - माझं नाशिककर प्रेम आहे - मागील कुंभाला निधी दिला होता - आत्ताच्या कुंभाची कामे सुरू झाली आहे - अनेक कंपन्यासोबत चर्चा सुरू - नाशिकला औद्योगिक गुंतवणूक येणार - वाढवन बंदर नाशिकला जोडतोय - औद्योगिक इको सिस्टम तयार करतोय *ऑन विमानतळ विस्तार* - कुंभाच्या आधी विस्तार होईल *ऑन ठाकरे बंधू भेट* - माझी दोघांशी चर्चा झाली नाही - त्यांच्यात काय चर्चा झाली मला ते कळेल अशी माझ्याकडे टेक्निक नाही *ऑन महाराष्ट्र १ नंबर* - पॉवर मिनिस्ट्रीच्या माध्यमातून डोस्कोमचे रेटिंग केले जाते - आजच त्याचे रेटिंग आले आहे - ए रेटिंग मिळाले आहे - मला अतिशय आनंद झाला आहे - ९२ मार्क मिळवत महाराष्ट्र एक नंबरला आला आहे - मध्यंतरी खाली गेला होता आता पुन्हा वर आल्यानं आनंद आहे
11
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 10, 2025 14:34:32
Nashik, Maharashtra:
*मालेगाव BIG ब्रेकिंग* शिक्षक भरती घोटाळा आर्थिक गुन्हे शाखेने शिक्षण उप संचालक सह तिघांना अधिकाऱ्यांना अटक अटक केलेल्या अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर केले असता 13 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई अटकेत – शिक्षण उपसंचालक जिल्हा परिषद नाशिक उपशिक्षण अधिकारी कार्यालयीन अधीक्षक शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईमुळे राज्यभर खळबळ यापूर्वी शिक्षण संस्था चालकासह तिघे आधीच अटकेत दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अधिकारी आरोपी बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात धडाकेबाज कारवाई संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ *121, फिर्यादी – शेखर पाटील* *बाईट – राजू सुर्वे, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक*
13
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 10, 2025 14:06:04
Parbhani, Maharashtra:
अँकर- हेद्राबाद गॅझेट मधील नोंदीनुसार बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गामध्ये समावेश करून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे,यामागणीसाठी परभणीच्या जिंतूर येथे मागील सहा दिवसांपासून विनोद आडे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते, त्यांच्या उपोषणाला समाजातून मोठा प्रतिसाद ही मिळत होता. पण उपोषणकर्ते विनोद आडे यांची प्रकुर्ती खूपच खालावत जात होती, त्यामुळे बंजारा समाज आणि समाजातील विविध नेते मंडळींच्या आग्रहास्तव आडे यांनी आपले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले, लवकरच यापेक्षा मोठं आंदोलन उभारून बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यास शासनाला भाग पाडू असे म्हटले आहे,पण तूर्तास तरी हे आमरण उपोषण मागे घेण्यात आलय...
12
comment0
Report
KPKAILAS PURI
Sept 10, 2025 13:21:00
Pimpri-Chinchwad, Maharashtra:
pimpri cinema kailas puri Pune 10-9-25 feed by 2c for web also Anchor - पिंपरीचिंचवड मधल्या एका चित्रपटगृहात सिनेमा पाहताना 'स्टोरी आधी सांगू नका' आणि शांत बसण्याची विनंती केल्यामुळे एका २९ वर्षीय तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणाने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, एका दाम्पत्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आपल्या पत्नी आणि बहिणीसोबत चित्रपट पाहत होता. त्यावेळी त्याच्या मागील सीटवर बसलेल्या एका दाम्पत्याने सिनेमाची स्टोरी सांगणे आणि गोंधळ घालणे सुरू केले. त्यामुळे तरुणाने त्यांना 'स्टोरी आधी सांगू नका' आणि 'शांत बसा' अशी विनंती केली. यामुळे संतापलेल्या आरोपीने तात्काळ तरुणाची कॉलर पकडून त्याला मारहाण केली आणि जमिनीवर पाडले. आरोपीने त्याला लाथा-बुक्क्यांनी मारले, यात तरुणाच्या डाव्या हाताला, चेहऱ्याला आणि पोटाला दुखापत झाली. भांडण सोडवण्यासाठी त्याची पत्नी पुढे आल्यावर आरोपी आणि त्याच्या पत्नीने तिलाही मारहाण केली आणि दोघांना शिवीगाळ केली. या घटनेनंतर पीडित तरुणाने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरून अकिब जावेद निसार पटेल, व एक महिला यांच्या विरोधात चिंचवड पोलिसांत भारतीय न्याय संहिता 117 , 115, 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
9
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 10, 2025 13:02:00
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पटवी ज्वेलर्सच्या दुकानात चोरीची घटना घडली.तीन महिला ग्राहक असल्याचे भासवून दुकानात आल्या त्यांनी दागिने पाहण्याच्या बहाण्याने दुकानदाराचे लक्ष विचलित केले. दुकानदाराने त्यांना वेगवेगळे पेंडेंट दाखवले तेंव्हा त्यातील एका महिलेने हात चालाखी दाखवत एक आकर्षक पेंडेंट शांतपणे चोरून नेले.काही वेळाने दुकानदाराच्या लक्षात हे आले, त्यानंतर त्यांनी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित महिलांना ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनला नेले आहेत.
14
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 10, 2025 13:00:52
Yavatmal, Maharashtra:
हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी करीत यवतमाळ मधील बंजारा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक दिली. मराठ्यांना हैदराबाद गॅजेट लागू होत असेल तर सर्व पुरावे असणाऱ्या बंजारांना तर ते लागू झालेच पाहिजे. असे बंजारा समाज संघटनांनी म्हटले आहे.
12
comment0
Report
Sept 10, 2025 12:55:17
Darwha, Maharashtra:
अकोला येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ दारव्हा शहरात भोई समाज, सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. ६ सप्टेंबर रोजी तौहीद खान समीर खान याने चाकूचा धाक दाखवून हा अत्याचार केला. मोर्चाद्वारे आरोपीला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला, पीडितेला २५ लाखांची आर्थिक मदत आणि सामाजिक सुरक्षेची मागणी करण्यात आली. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात हजारो कार्यकर्ते सहभागी
13
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 10, 2025 12:47:25
Yavatmal, Maharashtra:
जनसुरक्षा विधेयकाविरोधात यवतमाळ मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून बसस्थानक चौकात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्य शासनाने प्रस्तावित केलेले “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४” हे अत्यंत अन्यायकारक, लोकशाही विरोधी व मूलभूत नागरिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. या विधेयकाच्या अंमलबजावणीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैयक्तिक गोपनीयता आणि संविधानाने हमी दिलेली नागरी हक्के गंभीरपणे बाधित होण्याची भीती आहे. हे विधेयक लोकशाही मूल्यांना धरून नाही. त्यामुळे जनतेच्या भावना व लोकशाही मूल्यांचा विचार करता “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४” तत्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. बाईट : वर्षा निकम जिल्हाध्यक्ष राकॉ शप किशोर इंगळे, जिल्हाप्रमुख शिवसेना उबाठा
13
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 10, 2025 12:45:38
Ratnagiri, Maharashtra:
फुरूस–पोयनार रस्त्याला मोठे भगदाड; खाली भुयार, वाहतूक ठप्प खेड तालुक्यातील फुरूस–पोयनार रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. खेड-दापोली मुख्य मार्गालगत असलेल्या फुरूस गावातून पोयनारकडे जाण्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या भगदाडाखाली मोठ्या स्वरूपाचे भुयार देखील तयार झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोयनार गावाला खासदार सुनील तटकरे यांची सासरवाडी म्हणून देखील एक वेगळी ओळख आहे. नुकत्याच बांधण्यात आलेल्या या रस्त्याची झालेली दुर्दशा हा कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारा प्रकार असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगली आहे.
13
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 10, 2025 12:37:34
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_BanjaraMorcha Feed on - 2C ------------------------------ Anchor - हैद्राबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाचा समावेश एस टी प्रवर्गात करावा आणि आरक्षणाची अबकड वर्गवारी करण्यात यावी या मागणीसाठी बंजारा समाजातर्फे हदगाव येथे मोर्चा काढण्यात आला. हैद्राबाद गॅझेट नुसार मराठा समाजाचा समावेश कुणबी म्हणून ओबीसी मध्ये करावा अशी मागणी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी केली होती. त्यानंतर बंजारा समाजाचे एक जात प्रमाणपत्र व्हायरल होत आहे. बंजारा समाज हा एस टी प्रवर्गात असल्याचे हे प्रमाणपत्र आहे. या नंतर पुन्हा एकदा बंजारा समाज एस टी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरलाय. हदगाव तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने बंजारा समजबांधव सामील झाले होते. बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करावा ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. आरक्षणाचे अबकड वर्गीकरण करावे म्हणजे कोणावरही अन्याय होणार नाही अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली. Byte - आंदोलक ----------------
14
comment0
Report
Advertisement
Back to top