Back
खग्रास चंद्रग्रहणामुळे विठ्ठल रुक्मिणीच्या नित्योपचारात महत्त्वाचे बदल!
SKSACHIN KASABE
Sept 05, 2025 17:48:53
Pandharpur, Maharashtra
खग्रास चंद्रग्रहणामुळे श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या नित्योपचारात बदल
Anchor:- खग्रास चंद्रग्रहण दि. 07 सप्टेंबर रोजी 2025 असल्याने श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या नित्योपचारामध्ये बदल करण्यात येणार आहे. यादिवशी रात्री 9.57 वा.ते 1.27 वाजेपर्यंत ग्रहणाचा कालावधी आहे. ग्रहणाचे वेध दुपारी 12.37 वाजले पासून सुरू होत असल्याने दुपारचा पोशाख व धुपारतीच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही.
रात्री 9.57 वाजता ग्रहण स्पर्श झाल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस व मंदिरातील इतर परिवार देवतेस चंद्रभागा नदीचे पाणी आणून स्नान घालण्यात येणार आहे. तसेच ग्रहण सुटेपर्यंत म्हणजे रात्री 1.37 वाजेपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन सुरू राहणार आहे.
ग्रहण सुटल्यानंतर ग्रहण सुटल्याचे स्नान चंद्रभागे नदीचे पाणी आणून घालण्यात येणार असून, मोक्ष झाल्यानंतर रात्री 2.00 वाजेपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन सुरू राहील व रात्री 2.00 वाजेनंतर शेजारती करण्यात येणार आहे. शेजारतीनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची विश्रांती पहाटे 5.00 वाजेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे दिनांक 8 सप्टेंबर रोजी काकड आरती पहाटे 5.00 नंतर सुरू होईल व त्यानंतर नेहमीप्रमाणे नित्यपूजा होऊन दर्शन सकाळी 6.30 वाजेपर्यंत सुरू होईल याची भाविक भक्तांनी नोंद घ्यावी असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HPHARSHAD PATIL
FollowSept 05, 2025 17:52:59Palghar, Maharashtra:
पालघर _
पालघर जिल्ह्यातील सर्वच भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. काही भागात जोरदार पाऊस पडत असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. भात शेतीसाठी हा पाऊस पूरक असून शेतकरी आनंदित आहे. तर सतत पडत असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे.
4
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 05, 2025 17:52:51Bhandara, Maharashtra:
*सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांचा केलेला कौतुक बाहेरून आहे की आतमधून हे तपासले पाहिजे बच्चू कडू यांचा खोचक टोला...*
Anchor : मराठा आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगली कामगिरी केली योग्य पद्धतीने हाताळले असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांचा कौतुक करण्यात आलं होतं यावर प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू यांना विचारले असता चांगली कामगिरी केली तर कौतुक व्हायला पाहिजे मात्र हे कौतुक आत मधून होतं की बाहेरून हे देखील तपासलं पाहिजे असा खोचक टोला यावेळी बच्चू कडूंनी लगावला...
Byte : ऑन सामना अग्रलेख
----------------------------------------------
*कार्यकर्त्यांना पोसावं लागत नाही का ? अजित पवारांच्या त्या वायरल व्हिडिओ वर बच्चू कडूंची प्रतिक्रिया...*
Anchor : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटी करत असल्याचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू यांना विचारले असता कार्यकर्त्यांना पोसावा लागत नाही का ? अजित दादांनी पैसे कमावले तर कार्यकर्त्यांनी देखील पैसा कमावला पाहिजे असं कार्यकर्त्यांचा वाटतं... याच्यासाठी ही सगळी व्यवस्था असल्याचेही बच्चू कडू म्हणाले...
Byte : ऑन अजित पवार व्हिडिओ
0
Report
Yavatmal, Maharashtra:
वंजारी फैल, जोडवीहिर येथे महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटना व कोसरे कलार समाजाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. डॉ. शशांत जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर ५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत पार पडले.
समाज बांधवांनी शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन कोसरे कलार समाजाचे अध्यक्ष विनायकराव कावरे, सचिव सुधाकर भाऊ उके, तसेच महाराष्ट्र कलाल-कलार समाजाचे जिल्हा व विभागीय पदाधिकारी यांनी केले.
5
Report
Yavatmal, Maharashtra:
वणी तालुक्यातील वडगाव (ध) येथील ४/३/८० अ या प्लॉटवर सुरू असलेल्या OYO लॉजमध्ये अनधिकृतपणे व्यवसाय सुरू असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या या ठिकाणी परवाना व अग्निशमन प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अशा लॉज व हॉटेल चालकांवर फौजदारी कारवाई करून अटक करावी, अशी मागणी प्रहारने केली आहे. अन्यथा आमरण आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या वेळी शहरप्रमुख अहमद सैय्यद, उपजिल्हाप्रमुख मोबिन शेख, तालुकाप्रमुख अनिकेत चामाटे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
3
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 05, 2025 17:49:05Pandharpur, Maharashtra:
05092025
Slug - PPR_KRUSHANA_MILK
file 02
----
Anchor - सोलापूर जिल्ह्यातील करमाळा सहायक पोलीस अधिक्षक अंजना कृष्णा यांचे मनोबल वाढवण्यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. लाडक्या बहिणीचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलाना सन्मान दिला पाहिजे अशी भूमिका जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी मांडली
---
Byte - अतुल खुपसे
0
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 05, 2025 17:37:12Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0509ZT_WSM_ACCIDENT_CCTV
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम-पुसद मार्गावरील काकडदाती फट्यावर आज एक धक्कादायक अपघात घडला.रस्ता ओलांडत असताना 16 वर्षीय मुलगी संध्या सारसकर हिला भरधाव वेगाने येणाऱ्या खाजगी बसने जोराची धडक दिली.संध्या सायकलवरून रस्ता पार करत असताना पुसदकडे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसने तिला जबर धडक दिली.या भीषण धडकेत संध्याचा जागीच मृत्यू झाला.ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या अपघाताच्या घटनेन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 05, 2025 17:33:18Beed, Maharashtra:
बीड: कौतुकास्पद; गुलाल ऐवजी बाप्पावर फुलांची उधळण करत दिला निरोप...!
Anc: बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा येथील मानाचा युवराज गणेश मित्र मंडळाची मिरवणूक पारंपारिक पद्धतीने काढण्यात आली आहे. या मिरवणुकीत पर्यावरण आणि आरोग्याची काळजी घेत गुलाल अथवा इतर रंगांची उधळ न करता फुलांची उधळण करत गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते आहे. यावर्षी पोलीस विभागाने डीजे मुक्त गणेश मिरवणुकीवर भर दिला. याचीच अंमलबजावणी करत या मंडळाने पारंपरिक वाद्य लावून मिरवणूक काढली. आणि लाडाच्या बाप्पाला निरोप देण्यात आला..
0
Report
UPUmesh Parab
FollowSept 05, 2025 17:32:10Oros, Maharashtra:
अँकर ---- उद्या तळकोकणात 11 दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होणार आहे. सलग 11 दिवस पूजा केल्यानंतर बाप्पाला अर्पण केलेली फुले व इतर साहित्य गणेश भक्त नदीमध्ये टाकतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक देखील असते त्यामुळे प्रदूषणाचा धोका मोठ्या प्रमाणात असतो यावर उपाय म्हणून कलमठ ग्रामपंचायतच्या माध्यमातून विसर्जनच्या पूर्व संध्येला हे सर्व निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कलश गावातून फिरवला. या अभियानाला नागरिकांनी सुद्धा चांगले सहकार्य करत ग्रामपंचायतच्या कामाचे कौतुक केले. सदर निर्माल्य नदीत फेकून न देता त्यापासून खत निर्मिती करणार असल्याचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी सांगितले. असा उपक्रम राबविणारी कलमठ ग्रामपंचायत जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 05, 2025 13:06:21Akola, Maharashtra:
Anchor : उद्या होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी अकोला महापालिकेने मोर्णा नदीकाठी कृत्रिम जलकुंड तयार केले आहेत..नदीच पाणी दूषित न होण्यासाठी अकोल्यात गेल्या 15 वर्षांपासून नदीत गणेशाची मूर्ती विसर्जित न करता या जलकुंडात विसर्जित करण्याची परंपरा सुरू करण्यात आली आहेय..या अनुषंगाने अकोला महापालिकेने सात जलकुंड तयार केले आहेत उद्या सकाळी ११ वाजता पासून येथे गणेश विसर्जनाला सुरुवात होणार आहे..या संकलित केलेल्या मूर्ती अकोल्यापासून १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीत विसर्जित करण्यात येणार आहे..यासाठी महापालिका सोबतच पोलीस प्रशासनाने देखील जय्यत तयारी केली आहेय..
14
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 05, 2025 12:17:34Parbhani, Maharashtra:
अँकर - मराठा आरक्षणासाठी लागू केलेला हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील येळी फाट्यावर ओबीसी बाधवांनी रस्तारोको आंदोलन करीत जीआर रद्द करण्याची मागणी लावुन धरली. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
4
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 05, 2025 12:17:20Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- गणपती विसर्जन तयारी
फीड 2C
Anc:-
अहिल्यानगरला गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून रूट मार्च काढण्यात आला आहे. या रूट मार्चमध्ये पोलिसांच्या वेगवेगळ्या तुकड्या सहभागी झाल्या होत्या. तसेच मिरवणुकीच्या वेळी सीसीटीव्ही तसेच ड्रोन कॅमेरा द्वारे देखील पोलिसांची करडी नजर असणार आहे. सोबतच घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणपती विसर्जनासाठी महापालिकेचेवतीने कृत्रिम तलाव करण्यात आले आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी हे तलाव उभारण्यात येणार आहे. तसेच दोन ठिकाणी विहिरी देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. जवळपास नगर शहरातील 17 ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या कृत्रिम तलावातच गणपती विसर्जन करावे असे आवाहन पालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी केला आहे
बाईट:- यशवंत डांगे,पालिका आयुक्त
बाईट:- वैभव कलुबर्मे, अप्पर पोलीस अधीक्षक
14
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 05, 2025 12:16:15Nashik, Maharashtra:
Feed send by TVU 51
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_cp_byte
*विसर्जन मिरवणुकीत नाशिक पोलीसांकडून केला जाणार AI तंत्रज्ञानाचा वापर.. कुंभमेळ्याच्या दृष्टीने ठरणार रंगीत तालीम..*
*मिरवणुकीत लेझर लाईट ला पूर्णपणे बंदी*
अँकर -
गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आता सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे यंदा प्रथमच पोलीसांकडून मिरवणूकीवर आधुनिक अशा AI तंत्रज्ञानाचा वापर करत नजर ठेवली जाणार असून प्रशासनासाठी कुंभमेळ्याच्या दृष्टीने ही रंगीत तालीम ठरणार आहे. कॅमेरांद्वारे वॉच, फेस रिडींग, गर्दीवर नियंत्रण, गर्दी अनियंत्रित होण्याआधी अलर्ट यांसह गर्दी व्यवस्थापनाचा एकूणच हा सराव असणार आहे. याव्यतिरिक्त मिरवणूक मार्गावर 84 सिसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले असून SRPF, बॉम्ब स्कॉड पथकासह 3 हजार पोलीस रस्त्यावर असणार आहेत.. त्याचबरोबर या मिरवणुकीमध्ये लेझर लाईट ला पूर्णपणे बंदी असल्याचं पोलीस आयुक्तांकडून सांगण्यात आलंय....
बाईट - संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर
6
Report
ABATISH BHOIR
FollowSept 05, 2025 11:30:23Kalyan, Maharashtra:
कल्याणच्या मुख्य बाजारपेठेत 20 तासापासून बत्ती गुल..
महावीरणच्या भोगलं कारभारामुले मुख्ख बाजारपेठेतील दुकानें बंद, करत निषेध,
Anc..कल्याण च्या छत्रपती शिवाजी महाराज ते महंमद आली रोड पर्यत काल पासून लाईट नसल्याने व्यापाऱ्यांनी संताप वेक्त केला आहे.ब ऐन सणासुदीत कल्याणच्या मुख्य बाजारपेठेत गेल्या २२ तासांपासून वीस पुरवठा खंडित असल्याने दुकानदारानी सांतप वेक्त करत दुकानें बाजारपेठेतील सर्व दुकानें बंद केली आहेत महावितरणकडे अनेकदा तक्रारी करून देखील वीज वाहिन्या दुरुस्त करत नसल्याचा आरोप दुकानदारांनी केलाय .तब्बल 20 तासाहून अधिक काळ मुख्य बाजारपेठेतच वीज पुरवठा खंडित असल्याने दुकानदाराने निषेध नोंदवत दुकाने बंद केली आज शांततेत दुकानें बंद करण्यात आली आहे यापुढे एम एस ई बी ने लक्ष दिला नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Byte..हरीश खंडेलवाल
व्यापारी
Byte..किरण चौधरी
व्यापारी.
14
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 05, 2025 11:18:52Raigad, Maharashtra:
स्लग - सोबतच्या महिलेला वाचवताना एका महिलेने गमावला जीव ........ म्हसळा श्रीवर्धन मार्गावर कारची धडक ......
अँकर - सोबतच्या महिलेला वाचवताना एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. म्हसळा श्रीवर्धन मार्गावर
वाडांबा इथं भरधाव कारने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. किशोरी जावळेकर असे मृत महिलेचे नाव आहे. दोघीही वाडांबा इथं बसमधून उतरल्या आणि रस्ता क्रॉस करत होत्या. त्याच वेळी समोरून येणारी भरधाव कार किशोरी यांना दिसली . या कारचा धक्का त्यांच्या सोबत असलेल्या प्राजक्ता गोगरकर यांना बसला असता हे लक्षात आल्याने किशोरी यांनी प्राजक्ता यांना मागे खेचले. मात्र यावेळी किशोरी यांना कारचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला झाला तर प्राजक्ता या थोडक्यात बचावल्या आहेत. कारचालक सोहम पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
0
Report