Back
गुरुपौर्णिमेच्या उत्सवात शिर्डीत भक्तांची प्रचंड गर्दी!
KJKunal Jamdade
FollowJul 09, 2025 03:01:28
Shirdi, Maharashtra
Anc - साईनगरीत गुरुपौर्णिमा उत्सवाला पहाटेच्या काकड आरती नंतर भक्तिमय वातावरनात सुरुवात झाली आहे.साईबाबांना गुरू मानून गुरुौर्णिमेच्या दिवशी बाबांचे दर्शन घेण्यासाठी असंख्य साईभक्त शिर्डीत येत असतात.उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने असंख्य साईभक्तानी शिर्डीत हजेरी लावलीय.साई संस्थानच्या वतीनं गुरुपौर्णिमे निमित्त साई मंदिराला आकर्षक फुलांसह विद्युत रोषणाई करण्यात आलीये.उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्रींची प्रतिमा पोथी व वीणाची मिरवणूक काढून गुरुपौर्णिमा उत्सवाची सुरुवात करण्यात आलीये. गुरु पौर्णिमा उत्सवाची जयत तयारी साई संस्थान कडून करण्यात आली असून गुरु पौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी साई मंदिर भक्तांना दर्शनासाठी रात्रभर खुल असणार आहे.साई मंदिरांच्या दर्शन रांगेतून गर्दीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनीधी कुणाल जमदाडे यांनी..
Wkt - kunal jamdade
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKShubham Koli
FollowJul 09, 2025 07:43:48Thane, Maharashtra:
माजिवडा पेट्रोल पंप समो अशार प्लस बिल्डिंग या बांधकाम बाधित इमारतीमध्ये कलर कामाकरिता उभारण्यात आलेल्या Gondola Cradle (ओपन लिफ्ट) मध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे एक कामगार इमारतीच्या एकविसाव्या मजल्यावरती सुमारे पंधरा तास अडकला होता.
सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, कापूरबावडी पोलीस अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF टीम), आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०२ - पिकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान ०१- इमर्जन्सी टेंडर वाहनासह, महावितरण कर्मचारी व ०१- खाजगी जनरेटर उपस्थित होते. घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
अशार प्लस बिल्डिंग या बांधकाम बाधित इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे सदर व्यक्ती अडकला होता.
सदर घटनास्थळी खाजगी जनरेटरच्या सहाय्याने विद्युत पुरवठा सुरू करून आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF टीम), अग्निशमन दलाचे जवान, पोलीस कर्मचारी व महावितरण कर्मचारी यांच्या मदतीने सदर व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे...
1
Share
Report
SKShubham Koli
FollowJul 09, 2025 07:43:42Thane, Maharashtra:
*महिलेची पैशाची बॅग घेऊन पळणारा चोरट्याला कळवा पोलिसांनी केली अटक*
*चोरटा cctv मध्ये कैद*
Anc -ठाण्यातील कळवा मनिषा नगर शारदा अपार्टमेंटमध्ये भर दुपारी सुमारे ३:३० वाजता इमारतीत चोरीची घटना घडली आहे. एका घरकाम करणाऱ्या महिलेला पगाराची १२,००० रक्कम मिळाल्यानंतर ती घरी जात असताना ही घटना घडली. पगार झाल्या नंतर ती महिला घरी परतत असताना तिची पैशांची बॅग चोरट्याने इमारतीच्या जिन्यावरून चोरून पळवल्याची घटना घडली आहे.. सदर चोरट्याला कळवा पोलिसांनी अटक केली आहे...आरोपीवर पूर्वी देखील गुन्हे उघडकीस कळवा पोलिसांनी आणले असून अधिकचा तपास कळवा पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे...
0
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 09, 2025 07:43:33Nashik, Maharashtra:
nsk_netmetering
feer by 2C
vidoe 5
Anchor १० किलोवॅटपेक्षा जास्त वीज वापर जे उद्योजक अथवा वीजग्राहक करत आहेत त्यांना नेट मीटरिंगचा लाभ मिळणार नाही, असा निर्णय महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने घेतल्याने उद्योजक संतप्त झाले आहेत.. आजतागायत सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्यांना नेट मीटरिंगमध्ये उद्योजकांना वीज बिलात सवलत मिळत होती. आता मात्र नेट मीटरिंगचा लाभ मिळणार नसल्याने एकूण जे वीज बिल येईल ते कुठल्याही प्रकारची सवलत न मिळता संपूर्णपणे भरावे लागेल. या निर्णयाचा महाराष्ट्र चेंबरने विरोध केला आहे. नाशिकमध्ये या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेत शासनाच्या या निर्णयाचा विरोध करण्यात आला
Byte संजय सोनवणे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स नाशिक अध्यक्ष
0
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 09, 2025 07:43:20Shirdi, Maharashtra:
Sangmner News Flash
निळवंडे धरणाच्या कालव्यातून ओव्हरफ्लोचे पाणी तातडीने सोडावे...
माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचे विखे पाटिल यांना पत्र...
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी लिहिले पत्र....
भंडारदरा आणि निळवंडे धरणात पाण्याची समाधानकारक उपलब्धता...
या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीमार्गे होतोय मात्र दुसरीकडे निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने डाव्या आणि उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे...
बाळासाहेब थोरात यांची विखे पाटलांकडे मागणी...
2
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 09, 2025 07:41:33Raigad, Maharashtra:
स्लग - लेहमध्ये दरड कोसळलेल्या दरडीमुळे महाडचे तीन कुटूंब अडकले
सर्वजण सुखरूप पण रस्ता बंद असल्याने संपर्क तुटला .... खाण्यापिण्याचे हाल, निवारा नाही .....
अँकर ...... लेह - मनाली मार्गावर दरड कोसळल्याने अनेक प्रवासी पर्यटक रस्त्यात अडकले आहेत. यामध्ये महाडमधील तीन कुटूंबांचा समावेश आहे. अमोल महामुणकर, समीर सावंत आणि राजेंद्र दरेकर आणि त्यांचे परिवार सदस्य असे एकूण 9 जण या दरड दुर्घटनेमध्ये आडकुन पडले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दरडीमुळे रस्ता बंद होऊन येथील वाहतूक ठप्प झाली आहे तर परिसरात प्रचंड कडाक्याची थंडी देखील या ठिकाणी आहे. अन्न, पाणी आणि निवाऱ्याचा अभाव या ठिकाणी असून उपाशी रहाण्याची वेळ आली असल्याचे आडकलेल्यांच म्हणन आहे. प्रशासनाकडून मदत मिळावी तसेच अडकलेल्या प्रवाशांपर्यंत तातडीने अन्न, औषधं आणि गरम कपड्यांची मदत पोहोचवावी अशी कळकळीची मागणी आडकलेल्या या प्रवासी आणि पर्यटकांकडून होत आहे.
0
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 09, 2025 07:32:50Nashik, Maharashtra:
nsk_bhuseshalawkt
feed by live u
anchor राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या नाशिकमधील संपर्क कार्यालय चक्क मराठी शाळेमध्ये छापण्याचा घाट घातला जात आहे. नाशिक मधील या शाळेसमोरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी
अधिक माहिती
प्रभाग क्रमांक सातमधील पोलिस वसाहतीत असलेल्या महापालिकेच्या शाळेत कार्यालयाचा प्रस्ताव देण्यात आलाय...तीन जूनला मंत्र्यांच्या कार्यालयीन प्रमुख व वास्तुविशारदांनी कार्यालयाची पाहणी केली. दुसऱ्या मजल्यावर कार्यालय अधिक्षक व स्वीय सहाय्यकांसाठी स्वतंत्र दालन व इतर कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय व अभ्यागत कक्ष ठेवला जाणार आहे. यासंदर्भात महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी बोलण्यास तयार आणल्या तरी महापालिका आयुक्तांनी याबाबत अद्याप मंजुरी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केल आहे.शाळांमधील पटसंख्या घटत असल्याने पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याची बाब खुद्द शिक्षण मंत्री भुसे यांनी महापालिकेच्या बैठकीत अधोरेखित केली होती. येत्या काळात हा मुद्दा राजकीय पटलावर गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
3
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 09, 2025 07:32:23Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - सांगली पोलीस दलातल्या कूपर श्वानचे निधन..
अँकर - सांगली पोलीस दलात श्वान पथकात सेवा बजावणारया कूपर श्वानचे निधन झालं आहे.सांगली पोलीस दलाच्यावतीने
शासकीय इतमामात कूपर श्वानावर अंत्यसंस्कार करण्यात आले.आमचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी आदरांजली वाहत,या कुपरला अखेरचा निरोप दिला.कूपर श्वान हा पाच वर्षांपूर्वी सांगली पोलिस दलात दाखल झाले होते.त्याने 13 गुन्हे उघडकीस आणण्या बरोबर घरफोडीच्या गुन्ह्यातील 3 लाख 50 हजारांचा मुद्देमाल मिळवून देण्याबरोबर तब्बल 38 गुन्ह्यात कूपर याचे यशस्वी मार्गदर्शन पोलिसांना लाभले होते. तुझ्या निधनाने त्याला सांभाळणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी यावेळी भावुक झाल्या होत्या.
4
Share
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 09, 2025 07:31:54Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_RAIN_LOSS पाच फाईल आहे
रिपोर्टर :–अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावतीच्या पार्डी देवी येथील अंडरपास मध्ये साचले पावसाचे पाणी; रेल्वे विभागाने रेल्वे क्रॉसिंग केले बंद, शाळकरी विद्यार्थ्यांना फटका
अँकर :– अमरावतीच्या पार्डी देवी येथील अंडरपास मध्ये पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. पार्डी देवी येथील रेल्वे अंडरपास भुयारी मार्गाचे काम अपूर्ण असल्याने रेल्वे विभागाने रेल्वे क्रॉसिंग बंद केले आहे. दरम्यान भुयारी अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने पाणी साचल्याने नागरिकांना व विद्यार्थ्यांना याच गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत असून अनेक विद्यार्थी शाळेविना घरी परतले आहे. स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊनही अजून पर्यंत यावर कोणताही तोडगा निघाला नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप असून रेल्वेच्या अपूर्ण कामाचा नागरिकांना फटका बसला आहे.
1
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 09, 2025 07:02:53Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0907ZT_CHP_BPURI_FLOOD_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने होत आहे वाढ, वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातल्या अनेक नदी-नाल्यांना पूर
अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातल्या अनेक नदी-नाल्यांना पूर आलाय. मुडझा-गांगलवाडी आणि गांगलवाडी-आरमोरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाल्यास तालुक्यात पूरपरिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची एक चमू ब्रह्मपुरीत दाखल झाली आहे. दरम्यान ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी-आरमोरी मार्गावर वैनगंगा नदीच्या पुराचे पाणी आल्याने एक टॅन्कर अडकला. टॅन्कर चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यात अडकून पडला. टॅन्कर चालक सुरक्षित असल्याची माहिती आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
12
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 09, 2025 06:38:53Nashik, Maharashtra:
nsk_ramkalpath
feed by link and 2ç
Nashik break
- नाशिकच्या ऐतिहासिक रामकाल पथ चा थ्रीडी वॉक थ्रू आला समोर
- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अगोदर बनवला जाईल रामकाल पथ
- नाशिकच्या काळाराम मंदिरापासून ते रामकुंड पर्यंत असणार आहे रामकाल पथ
- मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचे असणार रामायण काळातील चित्र
- रामायणातील अनुभूती येण्यासाठी बनविण्यात येणार आहे
https://drive.google.com/drive/folders/1GB_WsbsGhj9robPxG7tlktMx1Kw71EKt?usp=drive_link
Ram Kal Path walkthrough : google drive link
13
Share
Report
DPdnyaneshwar patange
FollowJul 09, 2025 06:33:45Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव:
DHARA_SAWANT
माजी मंत्री आमदार तानाजी सावंतांच नेमक चाललंय काय?
विधानसभेचा निकाल लागल्यापासून मतदार संघात न फिरकलेले तानाजी सावंत हे राज्यातील एकमेव आमदार?
विधानसभेत विजयाचा गुलाल उधळला, मात्र निकाल लागलेल्या दिवसापासून माजी मंत्री तानाजी सावंत गायब
मंत्रीपद न मिळाल्यामुळे आमदार तानाजी सावंत मतदारसंघात एकदाही फिरकले नाहीत ?
आमदार तानाजी सावंतांच्या मतदार संघाचा कारभार चालवतो पुतण्या धनंजय सावंत
सावंत अधिवेशनाकडेही फिरकले नसल्याने सावंत नाराज असल्याच्या चर्चेला उधाण
पक्षाचे मेळावे, पक्ष बैठकीकडेही तानाजी सावंतांनी फिरवली पाठ
मतदार संघातील जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसेल राजीनामा देऊन पुण्यात रहा, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची मागणी
Anchor
धाराशिव- माजी मंत्री तथा भूम परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत नाराज असल्याच्या पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकी पासून सावंत अद्याप पर्यंत एकदाही मतदार संघात फिरकले नाहीत. त्यामुळे विधानसभेचा निकाल लागल्यापासून मतदार संघात न फिरकणारे तानाजी सावंत हे राज्यातील एकमेव आमदार असल्याच्या चर्चा मतदारसंघात होत आहेत.एवढंच नाही तर आमदार सावंत यांनी मतदारांचा संपर्क देखील तोडून टाकला आहे सावंत यांचा पुतण्या धनंजय सावंत हा सध्या भूम परंडा विधानसभा मतदारसंघाचा कारभार पाहत असल्याचे दिसत आहे. भूम परंडा विधानसभा मतदार संघातून सावंत अवघ्या 1500 मताने निवडून आले. त्यातूनच मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे सावध नाराज असल्याच्या चर्चा आहेत. सावंत यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाकडेही पाठ फिरवली आहे त्यामुळे तानाजी सावंतांच नेमकं चाललय काय? याची सध्या मतदार संघासह राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान तानाजी सावंत मतदारसंघात फिरतलेच नसल्याने लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसेल तर राजीनामा देऊन पुण्यात रहाल अशी टीका उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली.
बाईट- रणजीत पाटील, जिल्हा प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
11
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 09, 2025 06:33:26Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Gondia
Slug - 0907_GON_2DEATH
FILE - 5 VIDEO 4 IMAGE
चार चाकी वाहनावर झाड कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू....
मुख्य रस्त्यावर असलेला झाड कोसडला.... तर दुसरा गाडीतील लोक थोडक्यात बचावले...
Anchor :- गोंदिया जिल्ह्यातील मागील चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून आज सडक अर्जुनी येथे एक झाड चारचाकी वाहणावर कोसळल्याने चार चाकी वाहणामध्ये बसलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर मागे असलेल्या दुसऱ्या गाडी मधील लोक थोडक्यात बचावले आहे. दोघांचे मृत देह हे सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तर तपासणीसाठी पाठवण्यात आल्या मृताकांमध्ये मवासुदेव खेडकर, आनंदराव राऊत दोघेही सडक अर्जुनी येथील व्यवसायिक आहेत.
13
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 09, 2025 06:33:16Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - नदी नसताना गावात आली मगर, रस्त्यावर मुक्त संचार करताना केली जेरबंद...
अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यामधील
धामवडे गावात एका भल्या मोठ्या मगरीचा मुक्त संचार असल्याचा प्रकार समोर आला. यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या मगरीला वनविभाग व प्राणिमित्रांनी जेरबंद केले. रात्रीच्या सुमारास भर पावसात रस्त्यावरून मगर जात असताना नागरिकांना दिसून आली गावाच्या बाहेर रस्त्यावर मगरीचा मुक्त संचार पाहिल्यानंतर गावात भीतीच वातावरण निर्माण झालं होतं.याची माहिती मिळतेच वन विभाग व प्राणी मित्रांनी धामेवाडीत धाव घेत, मगरीला जेरबंद करत चांदोलीच्या अभयारण्यात सोडण्यात आले आहे.दरम्यान गावाच्या आसपास कोणत्याही प्रकारची नदी नसताना ही मगर कोठून आणि कशी आली.
आधीच गेल्या काही दिवसांपासून गावात बिबट्याची दहशत निर्माण झालेली असताना अचानक आलेल्या मगरीने गावात पुन्हा भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.
14
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 09, 2025 06:30:43Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0907_BHA_WKT
FILE - 6 VIDEO
गोसीखुर्द धरणाच्या 33 दरवाज्यातून 14956.32 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू....
Anchor :- भंडारा जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरुच आहे... जिल्ह्यात अनेक सखल भागात पावसाचा पाणी शिरला आहे. तर नदी, नाले ओसंडून वाहत असून या पावसामुळे वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे खुली करण्यात आली आहेत. या 33 दरवाज्यातून 14956.32 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर गोसीखुर्द धरणावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी.....
WKT - प्रविण तांडेकर
7
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 09, 2025 06:30:35Nashik, Maharashtra:
nsk_vijsamp
feed by 2C
Breaking -
- नाशकात मध्यरात्रीपासून वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू
- नाशिकच्या एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राच्या बाहेर संप सुरू
- वर्कस फेडरेशन, एसइए, मागासवर्गीय संघटनेचे सभासद संपात सहभागी
- एकदिवसीय संपात ३०० कर्मचारी संपात सहभागी
- खाजगीकरणासह विविध मागण्यांसाठी देण्यात आली होती संपाची हाक
- संपाची शासनाने दखल घेऊन कार्यवाही करण्याची मागणी
9
Share
Report