Back
औंढा नागनाथ मंदिरात श्रावण सोमवारवर भाविकांची भव्य गर्दी!
GDGAJANAN DESHMUKH
Aug 18, 2025 01:45:44
Parbhani, Maharashtra
अँकर- बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात भाविकांनी चवथ्या श्रावण सोमवार निमित्त दर्शनासाठी गर्दी केलीय. सलग तीन दिवसांपासून पाऊस सुरू असतांना ही भाविक आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी औंढा नागनाथाचा चरणी लीन होत आहेत. आज श्रावणातील चवथा आणि अखेरचा सोमवार आहे,त्यामुळे मंदिरात भाविकांचा ओघ बघायला मिळणार आहे,भाविकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये,शिवाय भाविकांचे दर्शन लवकर व्हावे यासाठी उपाययोजना मंदिर व्यवस्थापणाकडून करण्यात आल्या आहेत. बम बम भोले,हर हर महादेव च्या घोषणांनी मंदिर परिसर दणाणून गेला आहे...
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowAug 18, 2025 04:46:59Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1808ZT_NANDED_PEOPLE(2 FILES)
नांदेड :मुक्रमाबाद गावात पुराच्या पाण्यात बुडुन पन्नास म्हशीचा मृत्यू झाल्याची माहिती,अनेक लोक पाण्यात अडकले
अँकर : नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद गावात पुराच्या पाण्यात बुडुन पन्नास म्हशीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे .. लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील अनेक गावात साचले पाणी... शिवाय पहाटे या भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला.. भिंगोली, भेंडेगाव , हसनाळ, रावणगाव , सांगवी या गावांना पुराचा फटका बसला .. गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले .. काही लोकं अडकल्याची प्राथमिक माहिती आहे
बाईट : ग्रामस्थ
0
Report
MNMAYUR NIKAM
FollowAug 18, 2025 04:46:48Buldhana, Maharashtra:
मोठी बातमी आहे... शेगाव मेहकर पालखी मार्ग बंद झाला आहे
मेहकर-शेगाव पालखी मार्ग बंद: खातोडी पुलावर पुराचे पाणी, वाहतूक थांबली
Anchor : जिल्ह्यातील मेहकर-शेगाव पालखी मार्ग जानेफळ गावाजवळ मुसळधार पावसामुळे बंद झाला आहे.
खातोडी पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता पाण्याखाली गेला आहे. यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
पावसामुळे पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आले असतानाही, काही वाहनचालक धोका पत्करून त्यातून वाहने काढण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे कोणताही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या घटनेनंतरही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. प्रशासनाचे या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. जिल्ह्याच्या इतर काही भागांमध्येही अशीच परिस्थिती असून, अनेक ठिकाणी पूर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 18, 2025 04:46:24Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1808ZT_JALNA_LONIKAR_BYTE(6 FILES)
जालना : ब्रेकिंग : जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा,निवासी जिल्हाधिकारी आरोपींना पाठीशी घालत असल्याचा भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप
राज्य सरकारचे आदेश असतानाही निवासी जिल्हाधिकारी गुन्हे का दाखल करत नाही
लोणीकरांचा सवाल
चौकशी समितीने 72 पानांचा अहवाल राज्य सरकारला दिला
14 हजार 354 बोगस लाभार्थी
72 पाणी अहवालात 80 कोटींचा घोटाळा झाल्याचं सांगितलं
24 कोटी, बिड, अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्याचा लोणीकर यांचा आरोप
निवासी जिल्हाधिकाऱ्यांची गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ,74 लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश असताना निवासी जिल्हाधिकारी गुन्हे का दाखल करत नाही-लोणीकर यांचा सवाल
अँकर : जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीनं राज्य सरकारला 72 पानांचा अहवाल पाठवलाय.या अहवालात अतिवृष्टी अनुदान वाटपात 80 कोटींचा घोटाळा झाल्याचं म्हटलं असल्याचा दावा भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलाय.मात्र हा घोटाळा 100 कोटींपेक्षा अधिक रकमेचा असल्याचं लोणीकर म्हणालेत.राज्य सरकारने या घोटाळ्यात सहभागी असलेल्या 74 जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले असताना निवासी जिल्हाधिकारी आरोपींना पाठीशी घालत असून 8 दिवसानंतर देखील आरोपींवर गुन्हे दाखल का केले गेले नाही असा सवाल लोणीकर यांनी उपस्थित केलाय.या घोटाळ्यात निवासी जिल्हाधिकाऱ्यांचा कुठे संबंध आहे का अशी शंका देखील लोणीकरांनी उपस्थित केलीय.
बाईट : बबनराव लोणीकर आमदार भाजपा
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 18, 2025 04:45:12Parbhani, Maharashtra:
अँकर- हिंगोली जिल्ह्यात भल्या पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून या पावसामुळे नागरिकांची नियमित कामे खोळंबळी असून शेतकऱ्यांना दुग्ध पुरवठा करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे,ओढे नदी नाल्याला आलेल्या पुरामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. सकाळीच पाऊस सुरू झाल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागलीय. त्यामुळे सगळीकडे निरव शांतता पसरली आहे...
बाईट- शेतकरी
0
Report
PNPratap Naik1
FollowAug 18, 2025 04:32:10Kolhapur, Maharashtra:
Kop circuit bench
Feed :- Live U
Anc :- मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे शानदार उद्घाटन झाले त्यानंतर आजपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. डिव्हिजन बेंच मध्ये न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख याच्या समोर 79 खटल्यांची सुनावणी चालण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवसाचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले असून पहिली सुनावणी फौजदारी तर दुसरे सुनावणी दिवाणी होणार आहे. न्यायमूर्ती एस जी चपळगावकर यांच्या सिंगल बेंच समोर पहिल्याच दिवशी 147 कामे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाकडील सुमारे पाऊण लाख खटले कोल्हापूर सर्किट बेंच कडे वर्ग करण्यात आले आहेत. कोल्हापूर सह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फौजदारी दिवाणी अपिलांचा यामध्ये सहभाग आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी दीड पर्यंत पहिल्या सत्रातले कामकाज सुरू राहणार आहे. तर दुपारी अडीच ते साडेचार पर्यंत दुसरा सत्रातलं कामकाज सुरू राहील. जय कदम विरुद्ध महाराष्ट्र शासन या खटल्याने सर्किट बेंचच्या कामाला सुरुवात होणार आहे.
3
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 18, 2025 04:32:05Ratnagiri, Maharashtra:
अँकर -कोकणामध्ये मुसळधार याचा इशारा देण्यात आलाय. त्यानुसार कोकणातल्या बहुतांश भागात मध्यरात्रीपासून पाऊस आहे... किनारी भागांमध्ये देखील वाऱ्याचा वेग असून पाऊस जोराचा आहे... रत्नागिरीमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार बॅटिंग केलेल्या पावसाने पहाटेपासून देखील मुसळधार बरसायला सुरुवात केली आहे...उत्तर रत्नागिरीमध्ये पाऊस चांगला कोसळतोय तर दक्षिण रत्नागिरीच्या किनारपट्टी भागात वारा आणि पाऊस चांगलाच कोसळतोय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी
2
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowAug 18, 2025 04:31:10Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_CO_BYTE चार फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर गावात तब्बल 18 घरकुल बोगस; शासनाच्या 20 लाख पेक्षा अधिक रुपयांच्या निधीचा झाला अपहार
अँकर :–अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर गावात तब्बल 18 घरकुल बोगस असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे हा संपूर्ण तळेगाव दशासर ग्रामपंचायतचा प्रताप अजून जिल्हा परिषदेच्या सीईओंकडून चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात शासनाच्या 20 लाख पेक्षा अधिक रुपयांच्या निधीचा अपहार झाला आहे. बोगस नावे तयार करून गावातील काही लोकांनी घरकुल योजनेचे अनुदान लाटल्याचे पाहायला मिळाले असून एकाच कुटुंबात पती-पत्नीसह तिघांच्या नावाने घरकुल देण्यात आले असून गरजवंत कुटुंबाला मात्र घरकुलापासून अजूनही वंचितच रहावे लागले आहे.
बाईट :- संचिता मोहपात्रा, मुख्याधिकारी, जिल्हा परिषद
1
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 18, 2025 04:18:28Parbhani, Maharashtra:
अँकर _ हिंगोलीच्या सेनगांव तालुक्यातील अाजेगांव जवळील ओढ्याला मुसळधार पावसामुळे आज सकाळी महापूर आला असून ओढ्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. आजेगांव सह परिसरामध्ये तीन दिवसापासून मुसळधार पावसाने हाहाकार निर्माण केला असून त्यातच आजेगांव जवळील ओढ्याला मोठा पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर रात्री शेतामध्ये पिकांची राखण करण्यासाठी गेलेले शेतकरी शेतामध्येच अडकून पडले असून मागील 2 तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच या ओढ्याला मोठा पूर आल्याने सेनगांव,शेंदेफळ व गोरेगांव कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे ओढ्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
8
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 18, 2025 04:16:25Pandharpur, Maharashtra:
18082025
Slug - PPR_JCB_TIPPER_ACTION
file 01
----
Anchor - माढा तालुक्यातील कुर्डु येथील बेंद ओढ्यातून बेकायदेशीर अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या दोन जेसीबी आणि एका टीपरवर माढा तहसीलदार संजय भोसले यांची कारवाई
मौजे कुर्डू बारलोणी रोड ओढ्याच्या पात्रात दोन जेसीबी आणि एक टिपर सहाय्याने मुरूम उत्खनन आणि वाहतूक सुरू होती. यावेळी शासकीय कामासाठी निघालेल्या तहसीलदार संजय भोसले यांनी चौकशी केली असता हा सगळा बेकादेशीर प्रकार समोर आला. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून वाहने जप्त केली आहेत
7
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 18, 2025 04:03:28Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1808ZT_WSM_HIGHWAY_CLOSED
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिमच्या उतावळी नदीला पुर आल्याने छत्रपती संभाजीनगर ते नागपूर या महामार्गावरची गेल्या एका तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे.वाशिमच्या कुकसा, पिंपरी सरहद्द गावा जवळील पुलावरून उतावळी नदीचे पाणी वाहत असल्याने ही वाहतूक बंद झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.
समृद्धी महामार्गावरील साईट नाल्यांतुन वाहणारे सर्व पाणी उतावळी नदीत प्रवाहीत करण्यात आले आहे.त्यामुळे उतावळी नदीला नेहमीच पूर परिस्थिती निर्माण होत आहे.
14
Report
PNPratap Naik1
FollowAug 18, 2025 04:01:30Kolhapur, Maharashtra:
Kop Radhnagari Dam Open
Feed:-2C
Story :- कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पडत असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे सर्व 7 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. या धरणातून सद्या 11 हजार 500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात अनेक ठिकाणी अतिवृष्टी सुदृश्य पाऊस होत असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे, त्यातच धरणांमधून देखील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने नदी पातळी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. मध्यंतरीच्या काळात पावसाने उसंत घेतली होती, पण आता पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस सर्व दूर सक्रिय झाला आहे.
14
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 18, 2025 04:01:21Parbhani, Maharashtra:
हिंगोली- जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले,नदी ओढे नाल्यांना मोठा पूर आला असून जिल्ह्यातील महत्वाचे धरण 100 टक्के भरले आहेत. नदीमध्ये सोडलेल्या पाण्यामुळे शेती खरडून जाऊन मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 22 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून यामुळे पिकांची नासाडी होऊन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हळदीच्या शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी...
wkt गजानन
10
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 18, 2025 04:01:11Pandharpur, Maharashtra:
18082025
Slug - PPR_GARDI_LAKE
file 04
--------
Anchor - पंढरपूर तालुक्यातील गार्डी लोणारवाडी येथील साठवण तलावाचे काम काही स्वयंघोषित समाजसेवकांच्या तक्रारी मुळे रखडले , तातडीने भूसंपादनाची रक्कम देऊन काम सुरू करण्याची बाधित शेतकऱ्यांची मागणी
शासनाच्या मृद जलसंधारण विभागाच्या माध्यमातून पावसाचे पाणी साठवण करून त्याचा शेतकऱ्यांना शेती सिंचनसाठी उपयोग व्हावा. यासाठी गार्डी लोणारवाडी हद्दीत ओढ्याच्या प्रवाहावर साठवण तलाव प्रकल्प काम सुरू आहे. त्याचे 40% काम पूर्ण झाले. याचा 400 एकर शेतीच्या सिंचनासाठी उपयोग होणार आहे.
यासाठी 25 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन झाले आहे. अवघ्या काही दिवसात त्याचा मोबदला मिळणार आहे. अशातच काही स्वयंघोषित समाजसेवकांच्या तक्रारी मुळे मोबदला मिळण्यास उशीर होत आहे. ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या तक्रारी नाहीत मात्र काही लोक काम बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे
-----
Byte
1. विनायक साळुंखे ,शेतकरी ( PPR_GARDI_LAKE_2)
2. गोपाळ शिंदे ( PPR_GARDI_LAKE_3)
3. शक्ती बाजारे ( PPR_GARDI_LAKE_4)
9
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 18, 2025 04:00:49Washim, Maharashtra:
वाशिम :
File:1808ZT_WSM_GANAPATI_IDOL
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा फटका मूर्तिकारांना बसला आहे.गणेश उत्सव काही दिवसावर येऊन ठेपल्याने गणेश मूर्तीच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आहे मात्र मालेगावमध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मूर्तिकारांच्या गोदामांमध्ये पाणी शिरले असून मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती भिजल्या आहेत.या पावसामुळे मूर्तिकारांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
8
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 18, 2025 04:00:31Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_KOYNA_UPDATE
सातारा - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर वाढल्याने धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणातून 10 हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे .धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांनी उचलून विसर्ग करण्यात आला आहे.कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये असा एकूण 12100 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
12
Report